जे. एन. यु. एक वेगळा विचार
सध्याचा ज्वलंत आणि चघळुन झालेला हा विषय आहे, पण तरीही काही मुद्दे मांडायचा प्रयन्त करतो. या प्रकारात डावे आणि उजवे यांच्यात सरळ लढत झालेली दिसते. यात भाजपाचे काही आडाखे व डाव असतील आणि डावे त्यात अडकले असे वाटते. १० फेब्रु. पासुन या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. भाजपाला रोहित प्रकरण आणि दादरी प्रकारात जो धक्का बसला त्याची भरपाई करायची संधी डाव्यांनी दिली. भाजपाला अशी संधी हवीच होती. यामुळे भाजपा विरुध्द डावे + काँग्रेस यांची जुंपली बाकी सगळे गंमत पाहत आहेत. अफजलबाबत दिलेल्या घोषणांची ध्वनीचित्रफीत जशी अभाविप ने जाहीर केली तसे या घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल. (कदाचित वरीष्ठांना अगोदरच हे माहित असेल. त्यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली असेल. नंतर तिला प्रसिध्दी दिली गेली.) त्यातच डाव्या नेत्यांची मुले त्यात पाहुन तर आनंदच झाला असेल. त्यातच पुढे प. बंगालची निवडणुक आहे. असा पत्ता हातचा सोडणे भाजपाला शक्यच नव्हते. हे झाले नेपथ्य. प्रकरण उघड झाल्यावर त्यावर अपेक्षीतपणे डाव्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी त्याचे मस्त पणे समर्थन केले. काँग्रेसी नेते त्यामागे फरपटत गेले. राहुल गांधींनी जे.एन.यु. ला भेट देउन आगीत तेल ओतले. भाजपाने कन्हैयाला अटक करुन त्यात दुसरी चाल खेळली. खरे तर त्याला अटक केली नसती तरी चौकशी करुन काम भागत होते. (हे माझे मत आहे.) भाजपाने आपल्या ईतर संघटना यात उतरवुन दबाव कायम ठेवला. यात भाजपाला बर्यापैकी लाभ झाला आणि ते याचा पुढे बराच वापर करतील.
१. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात.
(बर्याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.)
२. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले.
३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले.
४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे.
५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार.
६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार.
मागे एका ठिकाणी म्हटल्यानुसार अश्या साठमार्या भाजपा आणि त्यांच्या संघटना पुन्हा पुन्हा करणार. कारण राजकारणात सत्ता नुसती दिसुन चालत नाही तर तिचा भविष्यासाठीसुध्दा वापर करायचा असतो.
वकिलांनी छातीठोकपणे त्याला कोर्टाच्या आवारात केलेली मारहाण आपल्याला मान्य आहे का?त्या वकिलांचे वागणे नक्कीच निषेधार्ह आणि लाजिरवाणे आहे आणि त्यांना त्यांच्या कृतीची योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. किंबहुना, त्यांच्या बेजबाबदार वागण्याने देशविघातक कारवाया करणार्यांचे समर्थन करणार्या संधिसाधूंच्या हाती आयतेच कोलीत मिळाले आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. मात्र, इतर कोणी (पक्षी, इथे : वकील) चुकीचे वागले म्हणून देशाचे तुकडे/बरबादी करण्याच्या घोषणा करणार्यांच्या गुन्ह्याची तीव्रता कमी होत नाही, हे नक्की. त्या दोघांनाही त्यांच्या गुन्ह्याप्रमाणे कायद्याने योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. या दोन चुका एकमेकांचे निवारण करू तर शकत नाहीतच, पण कोणतेही कारण देशविघातक कारवाईचे कधीच समर्थन करू शकत नाही, हे नक्की.मी इथे कुठल्याही विशिष्ट चॅनेलचे नाव घेतलेले नाही, कारण हा कुठल्या एका चॅनेलमुळे झालेला प्रकार नाही. मिडियाट्रायलचा मी नेहमीच निषेध करतो.नक्की ??? मग... माझ्या या प्रतिसादावर तुमची आयडी वापरून लिहिलेल्या या प्रतिसादात...कन्हयाकुमारचे खोटे विडियो तयार करुन त्याची मिडिया ट्रायल करुन त्यास थेट टीवीवरच अर्नब गोस्वामी सारख्या टिनपाट अॅन्करने देशद्रोही घोषित करणे आपल्याला मान्य आहे का?(तडक समजूतीसाठी मूळ प्रतिसादातले दोन शब्द हायलाईट केलेले आहे) हा प्रश्न कोणी विचारला होता असा प्रश्न मला पडलाय ?! :) ;) असो. मला जे काही सांगायचे आहे ते स्पष्टपणे सांगून झाले आहे. त्यातल्या मुख्य मुद्द्यांवर तुम्ही सहमती दर्शविलेली आहे. तेव्हा काही नवीन मुद्दा नजरेस येईपर्यंत मी फक्त वाचनाची मजा घेईन म्हणतो ;)