Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

र
राजेश घासकडवी
Wed, 02/24/2016 - 04:55
🗣 174 प्रतिसाद
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा. २. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या. ३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा. ४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. ५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं. ६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात. ७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला. ८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी. १०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं. ११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला. १२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. १३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली. १४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले. या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
वर्गीकरण
राजकीय

प्रतिक्रिया द्या
29118 वाचन

💬 प्रतिसाद (174)
प
पगला गजोधर Wed, 02/24/2016 - 05:14 नवीन
ही लक्शणे आज कुठेतरी हळुहळु दिसायाला लागलीयेत का हो ?
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Wed, 02/24/2016 - 07:25 नवीन
भारत देशाविषयी बोलताय का? कारण तसं असेल तर ११ वा मुद्दा "विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण" मला कुठेही दिसत नाहीये. उलट या युनिव्हर्सिटीज ना जास्तच स्वातंत्रय दिलं गेलंय. एखादा माणूस जवळच्या नाक्यावर अशा घोषणा देत असेल तर त्याचं काय होईल ते सांगायला नकोच. पण युनिव्हर्सिटीज मध्ये पोलीस पण जावू शकत नाहीत हा स्वातंत्र्याचा किती अतिरेक! बाकी हे विचारवंतच होते ना, पारितोषिकं परत करून मग परत घेणारे? त्यांना आत्तापर्यंतच्या गोष्टी दिसल्या नाहीत आणि मोदी सरकारचं एक वर्ष झाल्याबरोबर त्यांना असहिष्णुतेचा दृष्टांत झाला! तेव्हा सुडो-सेक्युलरांच्या कृत्याच्या मानानं अजून त्यांना बरेच फटके मिळायचे बाकी आहेत. त्यांना बोंबलायचंच असेल तर फटके पडल्यावर ते करायची मुभा आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
न
नाना स्कॉच Wed, 02/24/2016 - 08:49 नवीन
मालक त्यांनी मोदी किंवा भारतीय सरकार असे नावही घेतले नाहीये कुठेच! कश्याला भित्यापाठी ब्रह्मराक्षस करून मोदीजी अन त्यांच्या स्तुत्य कार्याला कमीपणा आणावा म्हणतो मी??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
प
पगला गजोधर Wed, 02/24/2016 - 08:58 नवीन
समजा एखाद्याने कुठे, "Will all great Neptune's ocean wash this blood clean from my hand? No, this my hand will rather the multitudinous seas incarnadine, making the green one red" Macbeth Quote (Act II, Sc. II). असा मॅक्बेथ मधला संवाद उधृत केला, की लगेच धावत येवून विचारतात, की आमच्या लाडक्या नेत्याला उद्देशूनच म्हटला का संवाद ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
क
काळा पहाड Wed, 02/24/2016 - 09:48 नवीन
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, तसंच हे समजा. बाकी "आज कुठेतरी हळूहळू" चा दुसरा काही मतितार्थ असेल तर मज पामरास समजावण्याची कृपा करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 09:50 नवीन
दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
म
मोदक Wed, 02/24/2016 - 10:01 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 10:22 नवीन
हा हा. माध्यमांनी तयार केलेली प्रतिमा आणि सत्य ह्यात जमिन आस्मानचा फरक आहे मोदकराव. तुम्ही हा विडियो टाकून लोक किती बालिश विचार करतात, त्यांना कसे भडकवल्याजाऊ शकते ह्याचा प्रत्यय दिलात. काळापहाड म्हणतात तसे जर पोलिस डोळे बारिक करुन दाढीधार्‍यांकडे बघायला लागले तर झाला हो दहशतवादाचा नायनाट. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 02/24/2016 - 10:56 नवीन
असेल ब्वा.. दहशतवादी मार्गाने का होईना पण शांततेचा प्रसार होतो आहे हे तरी तुम्हाला समाधानकारक वाटत आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 10:06 नवीन
आज कुठेतरी हळूहळूचा मतितार्थ Image removed. Image removed. Image removed. On 29 September 2008, three bombs exploded in Modasa, Gujarat and Malegaon, Maharashtra killing eight persons, and injuring 80. Several unexploded bombs were found in Ahmedabad, Gujarat. Hemant Karkare, as the chief of the state Anti-Terror Squad, led the investigation into the 2008 Malegaon blasts. In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, including a former ABVP student leader Sadhvi Pragya Singh Thakur, Swami Amritananda alias Dayanand Pandey, a retired Major Ramesh Upadhyay and a serving Army officer Lt. Col. Prasad Shrikant Purohit. Most of the accused belonged to a radical Hindutva group called Abhinav Bharat with prior links to Sangh Parivar organisations. Karkare's ATS identified, for the first time, Hindutva organisations as being responsible for terrorism in India, and political commentators began to call it Hindutva terror or Saffron terror.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 11:28 नवीन
७ वर्षे हे लोक जामिनाशिवाय तुरुंगात आहेत. ह्या बातमीतही suspects असा शब्द वापरलेला आहे. ही बातमी इथे देण्यामागे नक्की काय कारण आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:34 नवीन
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, >> सस्पेक्ट चा उगम इथे आहे. बाकी जामिनाशिवाय त्या लोकांना आत ठेवलंय तरी त्यांचे साथीदार, त्यांच्या संघटना, हिंदूत्ववादी काहीच करत नाहीत हे आश्चर्य जनक नाही काय? काय कारण असावे ब्रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 11:45 नवीन
बघा, पटतंय का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अद्द्या Wed, 02/24/2016 - 11:48 नवीन
कैच्याकाय अपेक्षा बोकोबा तुमच्या पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:50 नवीन
संशयितांना कुठलेही आरोप निश्चित नसतांना इतकी वर्षे तुरुंगात खितपत ठेवने ह्याविरूद्ध काहीच न्यायालयीन मार्ग नाही का? हा प्रश्न मी एक न्युट्रल सिटीझन म्हणून विचारत आहे. अशाने तर कुणासही संशयित म्हनुन बेमुदत तुरुंगात डांबून ठेवता येते असे दिसते. हे घटनाविरोधी नाही काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आनन्दा गुरुवार, 02/25/2016 - 07:27 नवीन
नाही.. त्यांच्यावर मोक्का लावला आहे. जोपर्यंत मोक्का काढला जात नाही तोपर्यंत ते जामीनपात्र होत नाहीत. मध्यंतरी सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही. बाकी पुरावे नाही मिळाले तर ते सुटतील लवकरच. तसेही सरकारला हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करण्याची सध्या तरी गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 10:22 नवीन
सीबीआयने बहुधा मोक्का काढण्याची तयारी सुरू केल्यावर सगळी माध्यमे पेटून उठली होती. पुढे काय झाले हे माहीत नाही. >> हे चिंताजनक व विचारात पाडणारे आहे. असे होत असेल तर न्युट्रली विचार करता सामान्य नागरिकांसाठी घातक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 11:46 नवीन
म्हनुन माझा कि बोर्ड चोरल्याबद्दल निषेध काही काही गोस्घ्ती आमचे राखीव कुरण असू द्या मालक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मोदक Wed, 02/24/2016 - 11:49 नवीन
विमान अपहरण, खेळाडूंची हत्या, बाँबस्फोट वगैरे अपेक्षित आहे का? त्यांच्या साथीदारांचे मार्ग वेगळे आहेत, इतिहास अभ्यासलात तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
शब्दबम्बाळ Wed, 02/24/2016 - 12:06 नवीन
In late October 2008, the ATS arrested eleven suspects, all Hindu, हे दुसर्या कुठल्या धर्माचे असते तर अशाच अक्षरात लिहिले असते का हो? आरोपींचा धर्म शोधून त्यांना न्याय देण्याची व्यवस्था आपल्या देशात तरी नाहीये. एखाद्याच्या हातातला झेंडा भगवा असो, निळा असो, हिरवा असो वा आणि कोणता असो जर कोणी देश विघातक कृत्य करत असेल तर त्या कृत्याला अनुसरून शिक्षा झाली पाहिजे! आणि हल्ली भगव्याला विरोध हि फ्याशन झालीये असे वाटत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 12:08 नवीन
सध्या एखादा दाढीधारी पाठीवरची पिशवी घेतलेला इसम दिसला तरी जशी पोलीसांची नजर बारीक होते, >> ही फ्याशन आहे हल्ली. काळा पहाड म्हणतात तसं. तुम्हाला नाय वाटत काय? असो. आम्ही इथंच थांबतो. धाग्यातल्या मूळ विषयावर चर्चा होऊ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
प
प्रमोद गवले Fri, 02/26/2016 - 13:48 नवीन
बरोबर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 05:18 नवीन
तर बाकी सगळे सोविएत रशियाला लागू पडतात. ९वा मुद्दा बाकी सगळ्यांसकट चीनला लागू पडतो. पण तरीही त्यांना फॅसिस्ट म्हटलं जात नाही. डाव्यांची जी Holier than Thou अशी मनोवृत्ती आहे ती अत्यंत स्पष्टपणे यात दिसते आहे. यात ज्या राजवटींचा अभ्यास लाॅरेन्स ब्रिट यांनी केलेला आहे, त्या जुलमी होत्या यात वादच नाही. पण स्टॅलिन, माओ, पाॅल पाॅट, किम (उत्तर कोरियाचा शासक. पूर्ण नावात नेहमी गोंधळ होतो म्हणून फक्त नाव देतोय) यांच्या राजवटी त्यातून वगळणं हे जर हेतुपुरस्सर असेल तर लेखक biased आहे आणि जर नसेल तर त्याचा अभ्यास कमी आहे असं म्हणावं लागतंय. त्यामुळे एक अभिनिवेशाने लिहिलेला typical JNU style लेख याशिवाय दुसरं मत व्यक्त करता येत नाही. ( हा अभिप्राय मूळ लेखाला आहे. अनुवाद छानच आहे आणि राजेश घासकडवी यांच्या लिखाणाचा मी फॅन आहे. गैरसमज नसावा म्हणून हे लिहितोय.)
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/24/2016 - 06:26 नवीन
कसं बोललात? एकदम मुद्द्यालाच हात. +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गॅरी ट्रुमन Wed, 02/24/2016 - 06:32 नवीन
सहमत आहे. हे सगळे मुद्दे वाचल्यावर अगदी हेच लिहायचे होते मला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पगला गजोधर Wed, 02/24/2016 - 06:34 नवीन
जुना रशिया, चीन, उत्तर कोरिया यासारखे अतिडाव्या किंवा फॅसिस्ट राजवटीसारखी,जुलमी राजवट, या लोकशाही देशात कधी येवू नये, किंवा आल्यास रुजू नये, अशीच सदिच्छा मी व्यक्त करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/24/2016 - 16:28 नवीन
+१ शिवाय, काही मुद्दे कालपरत्वे (काही कालखंडांत) लोकशाहीचे खंदे पुरस्कर्ते म्हटले जाणार्‍या / दावा केला जाणार्‍या देशांबाबतीतही खरे ठरले आहेत. प्रत्येक मुद्दा आपल्याला सोईच्या चष्म्यातून पाहिले म्हणजे त्याचा आपल्याला हवा तसा अर्थ काढायला (आपल्या विरोधकाला चिकटवायला) आपण मोकळे असतो... यालाच राजकारण * असेही म्हणतात. :) ;) ****** * संशयाचा फायदा द्यायचा असल्यास त्याला अतिसुलभिकरण असेही म्हणू शकतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीरंग_जोशी Wed, 02/24/2016 - 05:28 नवीन
उगाच फाफटपसारा नसणारा अन विषयानुरुप नेमकी मांडणी असणारा लेख आवडला. अनुवाद खूपच चांगला जमला आहे.
  • Log in or register to post comments
न
नया है वह Wed, 02/24/2016 - 07:43 नवीन
+१
  • Log in or register to post comments
स
स्पा Wed, 02/24/2016 - 08:51 नवीन
फुटकळ लेख, शाळेतल्या मुलाने निबंध लिहिल्यागत
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 02/24/2016 - 08:51 नवीन
नुकतीच डॉ.एस.एल.भैरप्पांची "तंतु" कादंबरी हातावेगळी केली.त्याची आठवण आली.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 02/24/2016 - 08:53 नवीन
चालता येईना डाव्या कडेने अन धुता येईना उजव्या हाताने.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Wed, 02/24/2016 - 09:00 नवीन
एक मिनिट. मला तर उपरोल्लेखित सगळी लक्षणे कॉम्ग्रेसच्या ५५ वर्षांच्या राजवटीत दिसत आहेत. म्हणजे काँग्रेसचे सरकार फॅसिस्ट होते की काय असे वाटु लागले आहे, बरे झाले ब्वो फॅसिस्टांच्या तावडीतुन सुटलो.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच Wed, 02/24/2016 - 09:37 नवीन
हा प्रतिसाद आहे का ट्रैप!! :D :D आजकाल काही भरोसा नाही कोणाचा! इतके नोंदवून पास घेतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 09:39 नवीन
१२ वा आणि शेवटचा हे मुद्दे लागू होत नाहीत. गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत. गुलाग किंवा मृत्यूछावण्याही बनवलेल्या नाहीयेत.शेवटचा मुद्दा - staged निवडणुकींचा तर अजिबातच नाही. इंदिरा गांधींना पायउतार करणारी १९७७ ची, भाजपच्या इंडिया शायनिंगचा फुगा फोडणारी २००४ ची, जगातलं पहिलं लोकनियुक्त कम्युनिस्ट सरकार आणणारी केरळातली १९५७ ची या staged निवडणुका नव्हत्या. बाकी मुद्दे आहेत. आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता कारण एका हुकूमशाही राज्यकर्त्याचे सगळे गुण इंदिरा गांधींमध्ये होते. पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
न
नाना स्कॉच Wed, 02/24/2016 - 09:43 नवीन
दंडवत!! ह्याला म्हणतात टाकलेल्या काडेपेटीच्या जळत्या काड़ी वर तर्काचा अन सदसद्विवेकबुद्धीचा टैंकर उपडा करणे!! मानाचा मुजरा घ्या बोका-ए-आज़म साहेब! खुप कमी उरले आहेत आजकाल तुमच्यासारखे लोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
पगला गजोधर Wed, 02/24/2016 - 09:50 नवीन
आणीबाणीच्या काळात जर त्याचा प्रतिकार झाला नसता तर देश कदाचित फॅसिझमच्या वाटेने गेला असता १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली.
१९७७ मध्ये काँग्रेसला पाडून, जनतेने या देशातील लोकशाही वाचवली. सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक Wed, 02/24/2016 - 09:58 नवीन
ओके, म्हणजे इंदिरा गांधींचे सरकार हुकुमशाहीचे सरकार होते हे तुम्हाला मान्य आहे तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पगला गजोधर
प
पगला गजोधर Wed, 02/24/2016 - 10:30 नवीन
त्यावेळची आणीबाणी = हुकुमशाही, एवढच मी म्हणालो...असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 10:41 नवीन
या हुकूमशाही वृत्तीच्या होत्या हे त्यांच्या चरित्रकारांनीही म्हटलेलं आहेच.(हे जाहीररीत्या बोलल्यावर काँग्रेसवाले अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने ते मान्य करतील का हा एक रोचक मुद्दा आहे.)संजय गांधींना त्यांनी दिलेली मोकळीक, विरोधी पक्षनेत्यांना आणीबाणीत झालेली अटक, जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या नेत्यांना मिळालेली वागणूक, मारुती इंडस्ट्रीजसारखे गैरव्यवहार, जबरदस्तीने केलेल्या नसबंदीच्या शस्त्रक्रिया - हा सगळा घडून गेलेला इतिहास आहे. पण हुकूमशाही वृत्ती असणं आणि खरोखर हुकूमशहा बनणं यातला फरक १९७७ च्या निवडणुकीने दाखवून दिला. पुढे जरी जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कर्माने आलेली सत्ता घालवली असली तरी त्यानंतर आणीबाणी आणण्याची हिंमत कोणत्याही राजकीय पक्षाने दाखवलेली नाही.जर १९७७ मध्ये काँग्रेसच जिंकली असती तर काय झालं असतं याची कल्पनाही करवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
नगरीनिरंजन Wed, 02/24/2016 - 15:10 नवीन
बरोबर. इंदिरा गांधी व संजय गांधी हुकूमशाही प्रवृत्तीचे होते हे कोणीही मान्य करेल. शिवाय इंदिरा गांधी या राजकीय भ्रष्टाचाराच्या जननी आहेत असे माझे वाचीव माहितीवर मत झाले आहे. असे लोक पाहिल्यावर एखाद्या देशात व्यक्तिपूजा कमी होईल असे एखाद्याला वाटणे स्वाभाविक आहे पण तसे अजून तरी दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक Wed, 02/24/2016 - 09:54 नवीन
गुन्हेगारांना क्रूर शिक्षा दिल्या नाहीयेत. बोकाजी.. तुम्हाला गुन्हेगार म्हणजे नक्की कोणता प्रकार अभिप्रेत आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 10:24 नवीन
जाणूनबुजून, हेतुपुरस्सर आणि वैयक्तिक फायद्यासाठी कायदेभंग करणारा/री अशी गुन्हेगाराची व्याख्या करता येईल. या लेखाच्या अनुषंगाने म्हणत असाल तर फॅसिस्ट देशांमध्ये एखाद्या धर्मात जन्माला येणं (उदाहरणार्थ नाझी जर्मनीतील ज्यू) हाही गुन्हा अाहे. ख्मेर रुजच्या अंमलाखाली असलेल्या कंबोडियामध्ये सुशिक्षित आणि बुद्धिजीवी असणं हा गुन्हा होता. आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत. खैरलांजी किंवा बिहारमधील बाथे लक्ष्मणपूर यासारखी हत्याकांडं ही सरकारी यंत्रणेने घडवलेली नाहीत आणि कसाब किंवा अफझल गुरु किंवा याकूब मेमन यांना show trial न करता सर्व कायदेशीर पर्याय देऊन मग long drop hanging या तुलनेने वेदनारहित आणि म्हणूनच अमानुष न मानल्या जाणाऱ्या पद्धतीने फाशी दिलं - या लोकांनी या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेलं असूनसुद्धा. हा मुद्दा मला मांडायचा आहे. त्यामुळे मृत्युंजयभौंच्या काँग्रेसची राजवट ही फॅसिस्ट होती या मताशी मी असहमत आहे. ती भ्रष्ट असेल, एका ठराविक धर्माचं लांगुलचालन करणारीही असेल पण फॅसिस्ट नक्कीच नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 02/24/2016 - 11:11 नवीन
आपल्याकडे फॅसिझम नव्हता कारण अशा कारणावरून सरकारने लोकांना शिक्षा दिलेल्या नाहीत. (वादासाठी वाद म्हणून) १९८४ सालचे शीख हत्याकांड किंवा संजय गांधींनी राबवलेले कुटुंबनियोजनाचे अतिरेकी प्रकार किंवा मारूती उद्योगासाठी केलेली एकंदर दडपशाही ही सगळी लक्षणे फॅसिझमचीच होती असे म्हटले तरी चूक होईल का? तुमचा मुद्दा लक्षात आला, काँग्रेसची राजवट ही १००% फॅसिस्ट होती हे माझेही मत नाही आणि बहुदा मृत्युंजयचेही नसेल. या धाग्यामध्ये किंवा सर्वत्रच सध्या ज्या पद्धतीने देशात जाणीवपूर्वक असहिष्णुतेचा बागुलबुवा पसरवला जात आहे, विकले गेलेले पत्रकार "मुद्दा असेल/नसेल पण दोष सध्याच्या सरकारचाच" अशा पद्धतीने बुद्धीभेद करत आहेत, आधीचे काँग्रेसचे राज्य म्हणजे रामराज्य आणि आता हुकुमशाहीचा उगम झाला अशा पद्धतीचे प्रतिसाद येत आहेत त्याला वैतागून मीही मृत्युंजयसारखाच प्रतिसाद दिला असता हे ही खरेच.! बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 11:19 नवीन
युनियन कार्बाईड सीईओ वाॅरन अँडरसनला भोपाळ दुर्घटनेनंतर भारताबाहेर जाऊ देणं या गोष्टी टाकायला विसरलो. बाकीचे मुद्दे लिहिले आहेतच. So मुद्दा हा आहे की जर मतदारांचा, विरोधी पक्षांचा आणि प्रसारमाध्यमांचा वचक नसेल तर एखादी राजवट फॅसिझमच्या दिशेने वाटचाल करु लागते. त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षाने (ज्यात काँग्रेस, भाजप, आआप, सपा, बसपा, वगैरे सगळे आले)लोकांना गृहीत धरु नये. त्यामुळे भारतात मतदारांनी एखाद्या पक्षाला फॅसिझम आणू दिला नाही असं म्हणणं जास्त बरोबर ठरेल. पक्षाला असलेलं श्रेय मर्यादित आहे. म्हणजे निवडणुकीत पराभव झाल्यावर तो मान्य करुन जिंकणाऱ्याचं अभिनंदन करुन पुढे जाणं या आणि याच गोष्टीसाठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:29 नवीन
सहमत. काही पक्षसमर्थकांचा देशाच्या जनतेच्या विवेकबुद्धीवर विश्वास नाही, इथे जनताच सार्वभौम आहे यावर विश्वास नाही. सांप्रत सरकार ने धिरूभाईंचा आदर्श ठेवला तर जास्त बरे होईल. 'वो जितना हमारे खिलाफ लिखे, उतना हमारे टर्नओवरके विग्यापन बढाओ'. खैर. धिरुभाईंकडे तरक्कीचा दणदणीत पुरावा होता तरी. इकडे तो आहे का नाही ह्याचा काहीच मागमूस लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक Wed, 02/24/2016 - 11:40 नवीन
बोकाजी.. येथे वेळ घालवण्यापेक्षा मोसादचा पुढचा भाग लिहा असा एक प्रेमळ आग्रह!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 11:55 नवीन
बोकासाहेब निष्पक्ष लिहित आहेत तर ते वेळ घालवणे वाटतंय होय. भाजप, संघाच्या आरत्या ओवाळल्या असत्या तर तेव्हा असा प्रतिसाद आला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Wed, 02/24/2016 - 12:01 नवीन
न्हाई ब्वा.. आम्ही भक्त नाही. पण झोपेचे सोंग घेतलेल्या लोकांना उठवण्यात त्यांचा वेळ जाऊ नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ह
होबासराव Wed, 02/24/2016 - 11:19 नवीन
बाकी NGO च्या नाड्या आवळल्यापासून हे असले बुद्धीभेदाचे प्रकार वारंवार घडत आहेत हे ही खरेच..! हे तर दिसुनच येतय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा