Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं

र
राजेश घासकडवी
Wed, 02/24/2016 - 04:55
🗣 174 प्रतिसाद
लॉरेन्स ब्रिट यांनी २००३ साली फॅसिझमविषयी एक लेख लिहिला होता. http://www.informationclearinghouse.info/article4113.htm त्यात त्यांनी ६ वेगवेगळ्या (मुसोलिनी, हिटलर, सालाझार, पापाडोपौलोस, पिनोशे आणि सुहार्तो) फॅसिस्ट राजवटींचा अभ्यास करून त्यांमध्ये समान दिसणारी फॅसिझमची १४ लक्षणं सांगितली होती. त्यांचा काहीसा स्वैर अनुवाद सादर करतो आहे. १. राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - राष्ट्राचा झेंडा, राष्ट्राची इतर चिन्हं यांबद्दल अतिरेकी जागरुकता. देशभक्तीचा जोरदार पुरस्कार. देशभक्त नसलेल्यांचा तिरस्कार. परकीय शक्तींबद्दल संशय. परकीयांबद्दल घृणा. २. मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - फॅसिस्ट राज्यकर्त्यांनी आपल्याला जे हवं आहे त्यात मानवी अधिकार, लोकांच्या जिवांची किंमत ही अडचण मानली. प्रचाराची साधनं वापरून होणारे अत्याचार क्षुल्लक आहेत इतकंच नव्हे तर ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तेच कसे नालायक लोक आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा अत्याचार भयंकर होत होते तेव्हा गुप्तता, इन्कार आणि अफवा/गैरसमज पसरवण्यात फॅसिस्ट राजवटी वाकगबार होत्या. ३. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व फॅसिस्ट राजवटींमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे लोकांना मुख्य प्रश्नांपासून लक्षवेध करण्यासाठी बळीच्या बकऱ्यांचा वापर. यामुळे अपयशांचं खापर फोडण्यासाठी आणि जनतेचं फ्रस्ट्रेशन नियंत्रित दिशेला वळवण्यात या राजवटींना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या समूहांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे कम्युनिस्ट, समाजवादी, सेक्युलर, लिबरल, ज्यू, अल्पसंख्यांक, शत्रुराष्ट्रं, परधर्मीय, समलिंगी आणि सर्वसमावेशक आतंकवादी. राजवटींना विरोध करणाऱ्यांना टेररिस्ट/देशद्रोही अशी विशेषणं लावून त्यांचा नायनाट केला जायचा. ४. सैन्याचं, सुरक्षा रक्षण व्यवस्थेचं वर्चस्व - राज्यकर्त्यांनी कायमच मिलिटरीला उच्च स्थान दिलं आणि मिलिटरी-इंडस्ट्रियल कॉंप्लेक्सला पाठिंबा दिला. इतर तीव्र गरजा असूनही राष्ट्राच्या बजेटपैकी मोठा हिस्सा मिलिटरीसाठी दिला गेला. मिलिटरीकडे प्रखर राष्ट्रवादाचं प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. ५. तीव्र लिंगभेद - राज्यकर्ते हे मुख्यत्वे पुरुष असल्यामुळे स्त्रियांकडे दुय्यम नागरिक म्हणून पाहाण्यात आलं. त्यांची भूमिका घर सांभाळणं, आणि मुलांना जन्म देऊन त्यांचं पालनपोषण करणं इतकीच राहावी असं ठासून सांगण्यात आलं. ६. मीडियावर प्रचंड प्रमाणावर नियंत्रण - काही राजवटींनी मीडियावर मालकी हक्क स्थापन केले तर काहींनी अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवलं. यात लायसन्सेस देणं, आर्थिक आणि राजकीय दबाव टाकणं, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाचं आवाहन करणं, सूचक धमक्या देणं वगैरे गोष्टी येतात. ७. राष्ट्रीय सुरक्षेबद्दलचा गंड - राज्यकर्ते जे काही करतात त्याला राष्ट्रीय सुरक्षेचा रंग चढवण्याचं काम या राजवटींनी केलं. विरोधकांना देशविरोधी आणि देशद्रोही ठरवण्याचा या राजवटींचा प्रयत्न राहिला. ८. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - कम्युनिस्टांनी धर्म नाकारला तर फॅसिस्टांनी तो कवटाळला. बहुसंख्येचा धर्माधार स्वीकारून त्या धर्माचे आक्रमक रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. राज्यकर्त्यांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. विरोधक हे धर्मद्वेष्टे आहेत आणि राज्यकर्त्यांना विरोध म्हणजे धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ९. मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - सामान्य माणसाचं आयुष्य नियंत्रित केलं जात असतानाच मोठ्या कंपन्यांना हवं ते करण्याचं अमर्याद स्वातंत्र्य दिलं गेलं. यात मिलिटरीसाठी आवश्यक उत्पादनं निर्माण करण्याची क्षमता म्हणून कंपन्यांकडे/कॉर्पोरेशन्सकडे पाहिलं गेलं. इतकंच नाही तर समाजावर नियंत्रण ठेवण्याची यंत्रणा म्हणूनही त्यांना महत्त्व दिलं गेलं. विशेषतः नाहीरे वर्गावर वचक ठेवण्यासाठी. १०. कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं - डाव्या शक्ती, एकत्रित झालेला कामगार वर्ग - कारखान्यातला वा शेतातला - ही आपल्या राजकीय नियंत्रणाला आव्हान समजून फॅसिस्ट राजवटींनी त्यांना पद्धतशीरपणे खच्ची केलं. गरीबांकडे तुच्छतेने पाहिलं गेलं. ११. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - विचारवंत आणि त्यांना अपेक्षित असलेलं विचारस्वातंत्र्या आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य हे या राजवटींना त्याज्य होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि देशभक्तीच्या आदर्शांच्या विरोधक मानलं गेलं. युनिव्हर्सिटींवर कडक नियंत्रण ठेवलं गेलं, राजकीय विरोधक असलेल्या प्राध्यापकांना त्रास दिला गेला किंवा काढून टाकलं गेलं. वेगळे विचार दाबून टाकण्यासाठी त्यांवर हल्ला केला गेला, त्यांची तोंडं दाबली किंवा बंद केली गेली. या राजवटींसाठी कला आणि साहित्य हे केवळ देशाच्या उन्नतीसाठी असायला परवानगी होती. देशाच्या त्रुटी दाखवणाऱ्या कलाकृतींवर व कलाकारांवर हल्ला केला गेला. १२. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - बहुतांश राजवटींनी अत्यंत क्रूर न्यायव्यवस्थेचा पाठपुरावा केला आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना तुरुंगात टाकलं. पोलिस व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात सामर्थ्य दिलं गेलं. साधे आणि राजकीय गुन्हे वाढवून-चढवून इतर मोठ्या गुन्ह्यांत गुंफले गेले होते आणि ते आरोप राजकीय विरोधकांवर वापरले गेले. भीती, दहशत आणि देशद्रोह्यांबद्दलची घृणा वापरून पोलिस अधिकारांची व्याप्ती वाढवण्यात आली होती. १३. भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी - उच्च पदांवर असलेल्यांच्या जवळचे आणि आर्थिकदृष्ट्या वरचे, म्हणजे उद्योगपती वगैरे यांचं उखळ पांढरं झालं. सत्ता आणि उद्योग यांचं साटंलोटं साधून प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार साधला गेला. याबाबतीत जनता कायमच अंधारात राहिली. १४. भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - बहुतांश राजवटींमध्ये निवडणुका हा फार्स होता. निवडणुका मॅनेज करण्यासाठी विरोधकांना तुरुंगात टाकणं, निवडणुक यंत्रणेवर नियंत्रण ठेवणं, विरोधी मतदारांना धमकावणं किंवा दहशत दाखवणं, खरी मतं नष्ट करणं असे अनेक उपाय वापरले गेले. या व इतर लक्षणांविषय़ी इथे चर्चा अपेक्षित आहे.
वर्गीकरण
राजकीय

प्रतिक्रिया द्या
29118 वाचन

💬 प्रतिसाद (174)
म
मृत्युन्जय Wed, 02/24/2016 - 10:15 नवीन
पण १९७७ मध्ये काँग्रेसला पाडून आणि त्याच जनता पक्षाला १९८० मध्ये पराभूत करुन जनतेने आपली वट दाखवून दिली. याचा अर्थ एवढाच की जनता घाऊकपणे फॅसिस्ट विचारांची नाही . पण सरकार पण नव्हते हे सिद्ध करा. काँग्रेस फॅसिस्ट विचरांची होती किंवा आहे असे मी म्हणत नाही आहे पण सगळी लक्षणे तर वेळोवेळच्या कॉम्ग्रेस सरकारांमध्ये दिसत आहेतच की. ही लक्षणे असणारी सरकारे फॅसिस्ट असतात असा लेखकाचा (म्हणजे गुर्जी नव्हे. त्यांनी तर फक्त जनकल्याणार्थ अनुवाद केला आहे) समज आहे . म्हणुन मी फक्त प्रश्न विचारला की मग कॉम्ग्रेस फॅसिस्ट होते काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मोदक Wed, 02/24/2016 - 09:43 नवीन
विदा द्या.. अन्यथा रिव्हर्स ट्रोलींग बंद करा. (बरेच दिवसांपूर्वी भाळी आलेला आळ पुढे सरकवल्याने निश्चिंत झालेला) मोदक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Wed, 02/24/2016 - 10:19 नवीन
विदा काय द्यायचा त्यात? इतकी ढळढळीत उदाहरणे आहेत की. आता डोळ्यांवर कातडे ओढुन बसायचे असेल तर गोष्ट वेगळी. आणि हे रिव्हर्स ट्रोलिंग म्हणजे काय असते आणि माझ्या प्रश्नात तुम्हाला ते कसे म्हणे दिसले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अन्या दातार Wed, 02/24/2016 - 10:52 नवीन
लक्षण क्र. २, ४, ७, १० व १२ ही क्रूर आहेतच यात वाद नाही. पण बाकीची लक्षणेही absolute आहेत का रिलेटिव? तूर्तास इतकेच.
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Wed, 02/24/2016 - 11:25 नवीन
उत्तम अनुवाद. (आपल्याकडे आज फॅसीझम नाही हे कळल्यामुळे जीव भांड्यात पडलेला)सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी Wed, 02/24/2016 - 11:36 नवीन
मला वाटते आणिबाणीबद्दल एखादी लेखमाला लिहावी काय ?
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 02/24/2016 - 11:44 नवीन
लिहा कि माझ्या सारखा नव्वदीच्या दशकात जन्मलेल्यांना कळेल नक्की काय प्रकार होता ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
म
मोदक Wed, 02/24/2016 - 11:44 नवीन
+१ नक्की लिहा. खरेखुरे वाचक स्वागत करतील आणि डुआयडी हिंदू धर्म, भाजपा, संघ यांवर पुराव्याशिवाय आरोप करत बसतील* *पुरव्याशिवाय आरोप करणारे सगळेच डुआयडी आहेत असे म्हणायचे नाहीये. "दहशवाद्यांना धर्म नसतो मात्र सगळेच दहशतवादी एकाच धर्माचे..." असे काहीसे वाक्य आहे. समजून घ्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
प
पैसा Wed, 02/24/2016 - 11:46 नवीन
लिहा लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
S
sagarpdy Wed, 02/24/2016 - 11:50 नवीन
कृपया लिहाच. अद्द्याला +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ब
बोका-ए-आझम Wed, 02/24/2016 - 12:10 नवीन
पण ते बार्बारोसा सोडू नका प्लीज!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी
ए
एस Wed, 02/24/2016 - 12:32 नवीन
त्याआधी 'द ग्रेट गेम' अर्धवट सोडलीये ती पूर्ण करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ध
धनावडे Wed, 02/24/2016 - 13:08 नवीन
आणि अफगानिस्तान पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
र
राजेश घासकडवी Wed, 02/24/2016 - 15:17 नवीन
आत्तापर्यंतची चर्चा वाचली. ऐसीवर गविंनी लिहिलेलं आहे की
कोणताही उद्देश न प्रकट करता सहजच या लेखाचा अनुवाद सध्या टाकणं म्हणजे साधारणपणे दादरी प्रकरणाच्या आसपास सहजच आपला "हिंदू धर्मातील गायीचे महत्व" असा लेख निरागसपणे टाकण्यासारखं आहे.
तर ताकाला जाऊन भांडं लपवणं, किंवा काहीतरी वैचारिक काडी टाकून कसं पेटलं हे बघत बसण्याचा माझा हेतू नाही. मांडणी मुद्दामच सर्वसाधारण केली होती, पण तरीही या सगळ्या लक्षणांचा भारतीय परिप्रेक्ष्यात विचार व्हावा हाच उद्देश होता. त्यामुळे माझी त्याबाबतची मतं मांडतो. सर्वप्रथम, इथे अनेकांनी फॅसिस्ट आणि डावी अत्याचारी सरकारं असा भेदभाव केलेला आहे. जणू काही फॅसिस्ट प्रवृत्ती ही केवळ उजव्यांची मक्तेदारी असते. अनेकांनी ही लक्षणं अनेक डाव्या राजवटींना लागू पडतात हे दाखवून दिलेलं आहे. तेही योग्यच आहे. पण पुन्हा तेच, फॅसिस्ट प्रवृत्ती या उजव्या-डाव्या विचारसरणीच्या पलिकडे जातात. म्हणजे वरच्या उदाहरणांत जिथे 'धर्म' म्हटलं आहे तिथे 'कम्युनिस्ट विचारसरणी' असं लिहिलं तर तोच मुद्दा स्टालिनलाही लागू पडतो. (कदाचित 'पोथीनिष्ठता' हा शब्दप्रयोग जास्त व्यापक ठरेल.) तुलना करायची तर डावे की उजवे अशी न होता फॅसिस्ट राजवट विरुद्ध लोकशाही अशी व्हायला हवी. आणि सर्वसाधारण आदर्श लोकशाहीपासून दूर एकाधिकारशाहीच्या दिशेने किती जवळ जात आहोत याचा अंदाज या लक्षणांवरून यायला हवा. याचा अर्थ कधीकाळी आदर्श लोकशाही होती असा दावा नाही. किंबहुना सर्वच जगात, जिथे लोकशाही ठीकठाक चालू आहे तिथेही सरकारं या सर्व मार्गांचा थोड्या प्रमाणात वापर करतातच. त्यामुळे शून्य फॅसिझम - संपूर्ण लोकशाही असं जगात कुठेच नसावं. भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'. आणि ही पावलं मला आधीच लोकशाहीपासून दूर असलेल्या भारतीय व्यवस्थेला अजून दूर नेणारी वाटतात. मात्र इटली, जर्मनीमध्ये त्याकाळी झालं तसं, तितक्या तीव्र आणि हिंस्र प्रमाणात भारतात फॅसिझम पसरेल असं वाटत नाही. तो काळ वसाहतवादाचा होता, आणि या राष्ट्रांना नवीन वसाहती हव्या होत्या, आणि त्या इतर राष्ट्रांकडून लुटायच्या होत्या. भारत त्यामानाने फारच प्रचंड मोठा देश आहे, आणि आसपासचं वातावरणही तिथे होतं तसं नाही. त्यामुळे भारताची घटना फेकली जाऊन हुकुमशाही येईल, भारत हिंदुराष्ट्र म्हणून घोषित केलं जाईल, किंवा मुसलमानांसाठी छळछावण्या उघडल्या जातील वगैरे मला बिलकुल वाटत नाही. मात्र आदर्श लोकशाहीच्या जवळ जाण्याऐवजी दूर नेण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि त्यांना यश मिळतं आहे हे मला काळजी करण्याजोगं वाटतं.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 02/24/2016 - 23:52 नवीन
तीव्र असहमत.
'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)'.
सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 06:35 नवीन
सध्याच्या राजवटीत असलं काहि घडण्याचं प्रमाण पुर्वीपेक्षा वाढलय असं अजीबात नाहि.
तीव्र असहमतीस तीव्र सहमती :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 02/25/2016 - 10:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
म
मोदक Wed, 02/24/2016 - 15:35 नवीन
मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात. उदाहरणार्थ 'विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण', 'धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं', 'राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार', 'शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं', 'तीव्र लिंगभेद', 'गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार (आचारपेक्षा विचार - या सगळ्या फुलीफुलींना अमुकअमुक केलं पाहिजे)' याबाबत अधिक माहिती वाचायला आवडेल.. एखादा तुलनात्मक विदायुक्त लेख.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 02/24/2016 - 16:11 नवीन
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही. एक सर्वसामान्य वाचक, नागरिक म्हणून जे कानावर येतं, पेपरात आणि इंटरनेटवर वाचायला मिळतं त्यातून तयार झालेली ही मतं आहेत. त्यामुळे त्यांना तितकंच वजन आहे. त्यामुळे जर कोणी अभ्यासू व्यक्तीने असा लेख लिहिला तर तो वाचून मी माझी मतं बदलायला तयार आहे. याचा अर्थ असा नाही की माझं म्हणणं चूक सिद्ध करण्याची जबाबदारी इतर कोणाचीतरी आहे. मला म्हणायचं आहे की माझी मतं भक्कम पायावर असण्यापेक्षा सर्वसाधारण निरीक्षणं यावर आधारलेली असल्यामुळे ती संपूर्णपणे बरोबर नसण्याची शक्यता आहे हे मी मान्य करतो. काही मुद्द्यांसाठी मला दिसलेली कारणं देऊ शकतो. विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण हे पद्धतशीरपणे चालू आहे. एफटीआयआय प्रकरण, जेएनयू प्रकरण, इतर शैक्षणिक संस्थांवर सरकारी पकड घट्ट करण्याचा प्रयत्न, विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं, आपल्या धर्मात/समाजात काय त्रुटी आहेत हे दाखवणारांवर होणारी पद्धतशीर घणाघाती टीका, वगैरे गोष्टी त्यात येतात. धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं धार्मिक भावनांना हात घालणं, बीफबंदी, सर्वच माहौलचं भगवीकरण, वगैरे गोष्टी समाजात घडताना दिसतात. यात प्रत्येक वेळी राजवट प्रत्यक्षपणे त्यात असतेच असं नाही. पण तसंही फॅसिस्ट राजवटींमध्ये काही प्रमाणात जनताही सामील असते/केली गेलेली असते. शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं हेही होताना दिसतं आहे ते मुख्यत्वेकरून मुसलमान समाजाला ज्या पद्धतीने स्टिग्मटाइज केलं जातं आहे त्यावरून. पाकिस्तानात चालते व्हा असं जागोजागी ऐकू येतं. पुन्हा, सरकार हे सगळं करतं असं नाही, तर समाजातल्या फॅसिस्ट प्रवृत्ती बळावल्याचं ते लक्षण आहे. तीव्र लिंगभेद सरकारी धोरणांतून हा दिसत नसला, तरी मत्र्यांकडून येणारी विधानं, सरकारी पक्षातल्या लोकांकडून आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या लोकांकडून येणारी विधानं ही पितृसत्ताक पद्धतीचा परिपोष करणारी असतात. हिंदूंनी पाच किंवा दहा पोरं काढावीत असं सहज ऐकू येतं. गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार/विचार मूळ लेखात याला प्रीऑक्युपेशन विथ क्राइम अॅंड पनिशमेंट असं म्हटलेलं आहे. रस्त्यावर दिसणाऱ्याला तिथल्या तिथे ठोकून काढलं पाहिजे असं कौतुकाने म्हटलं जातं. कोर्टाच्या आवारात कायदा हातात घेणारे काळे डगलेवाले राजरोस मिरवतात आणि शाबासकी मिळवतात. देशद्रोही हा शब्द पाकीटमारसारख्या सहजतेने वापरला जातो. असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विकास Wed, 02/24/2016 - 19:33 नवीन
विचारजंत-फेक्युलर-फुरोगामी या शब्दांत हिणवणं, या वरून हा हलका फुलका विनोद आठवला... कृपाया यात कोणी कुणाला हिणवते आहे असे समजू नये. ;) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
म
मोदक Wed, 02/24/2016 - 19:51 नवीन
दुर्दैवाने माझा या बाबतीत विदा देऊन मांडणी करण्याइतका, आणि त्यावर मुद्देसूद चर्चा करण्याइतका अनुभव, अभ्यास आणि अधिकार नाही. अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे. सर्वसाधारणपणे आपण एखादे मत मांडत असलो तर ते सिद्ध करण्याची जबाबदारी मतासोबत येतेच अन्यथा ते 'मत' आणि एखाद्या फालतू ट्रोल आयडीने टाकलेली पिंक यात फरक तो काय? ..आणि मत बदलण्याची तयारी असेल तर ते अभ्यासपूर्ण शंका स्वरूपात प्रकट केले जाणे हा सर्वमान्य संकेत पाळावयास हरकत नव्हती. असो.. एखाद्या (खर्‍या) अभ्यासू व्यक्तीने तुम्हाला अपेक्षित आहे तसा एखादा लेख लिहून ज्याचे त्याचे मतपरिवर्तन करण्यापेक्षा २०१९ च्या निवडणुकांची वाट पाहणे श्रेयस्कर असावे. विचारवंतांच्या तथाकथीत वैचारिक लेखापेक्षा ती सर्वात मोठी परिक्षा असेल आणि निकालही अजेंडा न राबवणार्‍यांकडून (किंवा पूर्वग्रहदूषीत नसलेल्या विचारधारेतून) लावला जाईल. बाकी तुमची विधानांनी निराशाच केली. तुमच्या जालीय वावराच्या आणि इतर ठिकाणी मांडलेल्या मुद्द्यांच्या तुलनेत थोडे परिपक्व मुद्दे अपेक्षीत होते. TRP मिळवण्यासाठी मिथुन बी ग्रेड सिनेमातून सतत काम करत राहिला तसे काहीसे वाटले (ह.घ्या.). :)) एफटीआयआय प्रकरण, बीफबंदी, धार्मिक भावनांना हात घालणं, पाकिस्तानात चालते व्हा हे मुद्दे अजुनही असतील तर अवघड आहे. असो. ही माझी निरीक्षणं आहेत. समाजशास्त्राबाबत अगदी काळं-पांढरं, गणिताने सिद्ध करता येण्यासारखं काही नसतं. तरीही मला जे जाणवलं आहे त्याचं हे वर्णन आहे. तुमची निरीक्षणे वाचायला दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला टोचणार्‍या घटना / प्रकरणाचा वरवरचा किरकोळ (निष्पक्ष!) अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण. पुढील अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 06:38 नवीन
जबराट!!! या प्रतिसादासाठी मोदकरावांना अगदी स्टॅन्डिंग ओव्हेशन!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/25/2016 - 06:57 नवीन
चपखल प्रतिसाद ! पूर्वानुभवावरून, शास्त्रिय विचार करणे अपेक्षित असलेल्या लेखकाकडून इतक्या गंभीर विषयावरचे, स्त्रोत माहित नसलेल्या लेखानाचे भाषांतर या स्वरूपात केलेले लेखन, आणि नंतर त्याची जबाबदारी झटकून टाकण्याच्या कृतीचे आश्चर्य वाटले व अँटीक्लायमॅक्स (?मराठी शब्द) वाटून दु:ख झाले ! :( अनुभव, अभ्यास आणि अधिकार नसतानाही "भारतातल्या सध्याच्या राजवटीला यातली अनेक लक्षणं लागू पडतात. त्यातली काही आधीच्या राजवटींनाही पूर्वापारपणे लागू होत होती, त्यामुळे या सरकारने काही नवीन केलेलं आहे असं नाही. मात्र काही गोष्टी अधिक तीव्रतेने वाढलेल्या दिसतात" असे मत मांडावेसे वाटले हे रोचक आहे. आजूबाजूला पाहिले तर यालाच हल्लीच्या भाषेत विचारवंतगिरी म्हणतात असेच दिसते ! अगोदर आपल्याला हवा असलेला निष्कर्श नक्की करून मग त्यासंबंधात असलेला-नसलेला-उत्पादित (मॅन्युफॅक्चर्ड) पुरावा जनतेच्या गळ्यात बांधणे, त्याच्या सत्यतेचा दावा सिद्ध करा म्हटले की "तू बावळट सामान्य आहेस, मी विचारवंत आहे, मी मला हवे तसे हवे तेव्हा बोलेन/लिहेन/वागेन, तो माझा विचारस्वातंत्र्याचा अधिकार आहे, ते बेजबाबदारपणाचे आणि सबळ पुराव्याशिवाय असले तरी त्याबद्दल जाब मागण्याचा तुला अधिकार नाही." असे आक्रस्ताळेपणाने म्हणणे अथवा दुसर्‍याच्या नावे सरळ हात झटकून मोकळे होणे हे विचारवंताचे लक्षण झाले आहे. भौतिकशास्त्र असो वा समाजशास्त्र असो, "सबळ पुराव्याशिवाय आणि / अथवा संदिग्ध मत तडक वा आडून देणे म्हणजे असत्याची भलावण करणे होते" हे शास्त्रिय मूलतत्व मागे पडत चालले आहे... शेवटी आपले मत/नेता/पक्ष/बाजू जिंकणे महत्वाचे, सत्याची ऐसी की तैसी ! =)) :( या सगळ्या पार्श्वभूमीवर "त्या बिचार्‍या गोबेल्स नीतिचा सतत निषेध का केला जातो बरे ?" असा विचार मनात येतो... पण वरवर एखाद्या गोष्टीचा निषेध करत तीच गोष्ट छुपेपणे करणे, हे गोबेल्स नीतिचे एक वैशिष्ठ्य आहे हे समजल्यावर या सगळ्या वेडेपणामागे एक अर्थ (मेथड इन मॅडनेस) आहे हे ध्यानात येते ! ;) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 02/25/2016 - 09:25 नवीन
शास्त्रिय विचार करणे अपेक्षित असलेल्या लेखकाकडून इतक्या गंभीर विषयावरचे, स्त्रोत माहित नसलेल्या लेखानाचे भाषांतर या स्वरूपात केलेले लेखन, आणि नंतर त्याची जबाबदारी झटकून टाकण्याच्या कृतीचे आश्चर्य वाटले
तुमची काहीतरी गफलत होते आहेत. ही लेखकाची स्टाईल आहे. त्या वि़ज्ञानाच्या लेखनातही हेच केलं आहे. कुठल्या गोष्टीला धड संदर्भ दिलेला नाही, विचारलेल्या प्रश्नांवर टाळाटाळ, सारवासारवी इतकच. उत्तर माहित नाही सांगण्याइतकाही प्रामाणिकपणा दाखवला नाही. कुठली तरी बुरसटलेली किंवा सिद्ध न झालेली थेअरी वापरायची, आणि लेखाच्या शेवटी धर्मावर ताशेरे ओढायचे हीच त्यांची स्टाइल आहे. थोडक्यात सांगायच तर लेखक वि़ज्ञानप्रेमी नाहीत, ते धर्मद्वेष्टे आहेत. Science is the mask he wears to hide his true motives!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 02/25/2016 - 09:27 नवीन
+१११११११११ तुमचा प्रतिसाद एकदम पॉइंट ब्लँक आहे. बरोबर ओळखले आहे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/25/2016 - 10:16 नवीन
कोणालाही आम्ही अगोदर संशयाच्या फायद्याचा लांब बांबू देतो... इतके करूनही नाईलाजच झाला तर मग त्याच बांबूचे फटके :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/25/2016 - 08:35 नवीन
आमच्यातर्फे टाळ्या. उत्तम प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
च
चिनार Fri, 02/26/2016 - 05:15 नवीन
मस्त प्रतिसाद !! अभ्यास आणि स्वत:च विशेष अजेंडा राबवणारे मिडीया चॅनल टाळले असते तरी निरीक्षणे बदलली असती. हे माझे निरीक्षण. या वाक्यासाठी सलाम स्वीकारावा ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 02:49 नवीन
चला एकेका मुद्याचा विचार करूया शीत युद्धात जग दोन गटात विभागले गेले तेव्हा साम्यवादी व भांडवलशाही वरील लेखातील लक्षणे अनेक राष्ट्रांच्या मध्ये आहेत पण त्यावरून निष्कर्ष काढण्या अगोदर त्या राष्ट्रांची सांस्कृतिक राजकीय सामाजिक आर्थिक स्थिती व तेथील समाजजीवन ह्या बाबी गृहीत धराव्यात गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार/विचार ह्याबाबतीत भारतात मी म्हणेन लोकांच्या दैनंदिन जीवनातून ह्या गोष्टी दिसून येतात त्यांना राजवट कोणतीही असली तरीही फरक पडत नाही , उदा रस्त्यावर स्त्री पुरुषाचे भांडण झाले किंवा तिने पुरुषावर आवाज चढवला किंवा पुरुषाने तिच्यावर आवाज चढवला किंवा त्यांनी एकमेकांवर हात उचलले किंवा मुलीची छेड काढली किंवा एखादा लहान मुलगा रस्त्यावरून शुल्लक गोष्ट चोरी करतांना पकडला गेलातर प्रगत भांडवलशाही देशात पोलिसांना बोलवून त्यांना पुढची कारवाई करायला देतात , मात्र गांधीच्या देशात जमाव पब्लिक धुलाई सुरु करतो येथे गंमत म्हणजे एवरी आपल्याकडे घरात महिलेला दुय्यम स्थान देणारे बाहेर पुरुषाने स्त्री वर हात चालला तर आपल्या मुठी आवळतात पण जर महिलेने पुरुषाला मारले तर नक्की चूक कोणाची अश्या फुटकळ गोष्टींच्या कडे दुर्लक्ष करून पुरुषाला त्याचीच चूक आहे असे गृहीत धरून मारले जाते परदेशात गाड्यांचे एकमेकांवर आपटून अपघात झाला तर पोलिसांना बोलवावे लागते तर भारतात वाहनचालक हिसेंचा शाब्दिक व शारीरिक वापर करतात म्हणूनच परदेशातील लेखकाने लिहिलेली लक्षणे सरसकट भारतीय समाजाला व राजकारण्याला लाऊ शकत नाहीत. रस्त्यावर पोलिसांनी कोणाला हटकले तर पता हे मेरा बाप कौन हे हे फक्त भारतात पाकिस्तानात प्रामुख्याने ऐकू येते ते प्रगत देशात ऐकू येत नाही , निमुटपणे दंड भरला जातो आपल्याकडे राष्ट्रध्वजाचे कपडे बनवत नाहीत परदेशात बनवले जातात आपल्याकडे असा कायदा बनवायच्या वेळी आपला स्वातंत्र्य लढा लोकांची बलिदान असे अनेक घटक अंतर्भूत आहेत माझ्या लहापणापासून दलितांची गावात निर्वस्त्र धिंड हा लज्जास्पद प्रकार घडत आला आहे त्यांचे समूहाने खून करणे सुद्धा वाचले आहे मात्र ह्यास मी राजवटीला संपूर्ण दोष देण्यापेक्ष्य आपल्या समाजाच्या मानसिकतेला दोष देईल ती बदल्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे व त्यास समाजातील घटकांनी साथ दिली पाहिजे , अमेरिकेत मुस्लिम समजून शिखांना मारणे किंवा हे प्रकार वाढले आहेत ह्या मी राजवटीला दोषी धरू कि तेथील समाजात जागरुगता व गांधीच्या भाषेत अहिसंक भाव कमी का आहेत ह्यासाठी सरकारला वेठीस धरावे ह्यात वर्ण भेद त्यातून होणारे हल्ले अश्या अनेक गोष्टी आहेत मुसलमान समाजाला अमेरिकेत सुद्धा टार्गेट केले केले किंबहुना एखादा समूह जेहा जाणीवपूर्वक स्वताला समाजातील इतर घटकांच्या पासून वेगळा ठेवण्यासाठी धर्म व त्यामुळे वेशभूषा मुल्ये ह्यात वेगळेपणा आणतो जेव्हा आपल धर्म ग्रथ घटनेच्या पेक्ष्या मोठा मानतो तेव्हा त्यंना समाजात टीका सोसावी लागते. अरब तुर्की पाकिस्तानी सुद्धा माझ्या पाहण्यात योगा करतात. पाकिस्तानात वीणा मलिक चे योगा करतांना कार्यक्रम आहेत . मात्र भारतात मुस्लिम योगा हे हिंद्त्वाचे प्रतिक मानून नाकारतात. लग्न घटस्फोटात धार्मिक कायदे मानतात तेव्हा भारतात कोणाचीही राजवट असो कोणाचेही सरकार असो उत्तर भारतात गावात मुस्लिम व हिंदूचे प्रेम जुळले तर त्याचा शेवट मृत्यूत होतो भाजप व कोन्ग्रेज नाही तर खाप चा निर्णय मानणारे लोक ह्या देशात कधीपासून आहेत. धर्माचे व राजकारांचे साटे लोट्याला अमेरिकेत व इतर अनेक देशात घटनेचे कोंदण आहे त्यांना राष्ट्र प्रमुख फक्त विशिष्ट धर्माचा लागतो बिचारा ओबामा आपण खिर्स्ती आहोत मुस्लिम नाही असे सांगत फिरतो भारतात समाजावर धर्मनिर्पेषता ही परकीय संकल्पना लादली आहे, इंग्रजाच्या लोकशाहीला सामान्य जनतेने स्व्कारले पण धर्म निर्पेक्षिता पूर्णपणे स्वीकारली नाही पूर्वीपासून प्रांतीय जातीय धार्मिक दबाव गट देशात कार्यरत आहेत जात नाही ती जात ही उक्ती पूर्वापार आहे . भारतातील सर्व प्रमुख राजकारणी नेत्यांनी आपले राजकीय नेतृत्व मुलांच्या हाती दिले मुलगा नसला तर ते मुलीकडे येते किंवा नाईलाजाने मुलींच्या कडे द्यावे लागते पितृ प्रधान समाज पूर्वापार आहेत ५ ते १० मुले हवीत ती हिंदू संख्या टक्का वाढवायला ह्या अर्थी काही हिंदू सनातन नेते बडबडतात त्यात फक्त मुले हवीत अशी अपेक्षा नसते इंबहुना मुले हवी भ्रूण हत्या इंदिरा काळात सुरु झाल्या असे सत्य मेव जयते मध्ये पाहिल्याचे स्मरते. भारताचे खरे तर आजच्याकाळात मोदींच्या नेतृत्वाच्या खाली जगातील प्रबळ सुन्नी कतार यु ऐ इ ते शिया इराण शी चांगले संबंध आहेत अनेक व्यापारी करार झाले आहेत कम्युनिस्ट चीन व रशियाची सुद्धा करार करतांना ख्रिस्ती व भांडवलसहीचा इयु व अमेरिका जपान शी च्नागले संबंध आहेत २००२ नंतर मौत का सौदागर म्हटले गेलेल्या मोदी सरकार वर अजूनही मुस्लिमांचा गंभीर आक्षेप असा नाही अकलाख घटनेला जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी नुकत्याच कम्युनिस्ट लोकांनी संघाच्या कार्यकर्त्याला मारले त्या बद्दल कोणीच काही जास्त बोलले नाही. मोदींची मिडिया ट्रायल करणारे त्यांना मौत के सौदागर हे सर्तीफिकीत देणारे आज अचानक उमर व कनैह्या च्या होणार्या मिडिया ट्रायल व देशभक्ती प्रशस्ती प्रत्रक वाटण्यावर आक्षेप घेतात मात्र हे पत्रक वाटांना वाटणार्याच्या फ्री स्पीच च्या अधिकार्याचा येथे विसर पडतो ज्यंना मोदींचे भक्त म्हणून हिणवले जाते त्या सुजाण सुसंस्कृत लोकांनी याकुब मेनन च्या फाशीवरून एवढी गंमत जमंत चालली असतांना संयम बाळगला कायदा हातात घेतला नाही , कमलेश तिवारी तुरुंगात केले तेव्हा त्यांच्या फ्री स्पीच वर बाष्कळ बडबड केली नाही. कानैह्या साठी त्यांच्या पक्षाचे येचुरी विद्यापीठात आले तेथून गृह मंत्र्यंना भेटले व मग युवराज येउन गेले मात्र हैद्राबाद मध्ये अभाविप च्या मदतीला स्मृतीचे एखादे पत्र आले तर ह्याच लोकांनी बोंबा बॉंब केली. भारतात आजतागायत धर्म निरपेक्ष सरकार व सरकारी संस्था मध्ये महत्वाच्या पदावर विद्यापीठात डाव्याची वर्णी अशी विभाजनी होती विचारवंत व कलाकार हे सरकारी वळचणीला असायचे त्यामुळे पुरस्कार राज्यसभेवर इतर लाभार्थी पदावर वर्णी लागायच्या , मोदिनी नुसती पंत प्रधान पदाच्या साठी उमेदवारी जाहीर केली तेव्हा ह्या लोकांनी खाल्या मिठाला जागून मोदींच्या विरुद्ध गरळ ओकली जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले तो भाग वेगळा आजही सोशल मिडिया वर सामान्य माणूस अभिव्यक्त होऊ शक्ती ह्यामुळे ह्या विचारवंत ते कलावंत ह्यांची गोची झाली आहे आता त्यांचे जुने विधान पोस्ट टीवटीव सामान्य लोक आंजा वरून शोधून त्यांच्या तोंडी मारतात , तर्क वितर्क करतात मुळात माहिती मिळवण्यासाठी पूर्वीच्या जुन्या माध्यमांची जागा नवीन माध्यमांनी घेतली आहे , व नवीन माध्यमांना देशात राजकारणात प्रभावीपणे वापरणारे रुजवणारे व यशस्वी करणारे मोदिनी मिपाच्या भाषेत अनेक जुन्या प्रस्थापित धेन्ड्यांचा बाजार उठवला आहे तेव्हा जळजळ होणार वैचारिक मूळव्याधेवर अजून रामबाण इलाज नाही. हे विचारजंत सामान्य जनतेला तुच्छ समजतात मात्र लोकशाहीत सामान्य जनता सरकार बनवते त्यांच्या पाठिंबा सरकार ला असेल तर विचारवंताची खेर नसते तेव्हा लोकांच्या कलाने न वागता आपण आपल्या बुद्धीने लोकांना आपल्या कलाने वागायला लावू असे अनेक विचारवंतांना वाटते असे करण्याचा जेवढ्या जोमाने ते प्रयत्न करतात तेवढे उघडे व केविलवाणे होतात. आपले पंचतारांकित नगरीत स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 03:06 नवीन
जर्मनीकर, तुम्हाला हा प्रश्न आधी कोणी विचारला असेलच. मला उत्तर द्या ना. तुम्हाला मराठी लिहिणे जमत नाही का? तुमच्या प्रतिसादात व्याकरणशुद्धी, विरामचिन्हे, परिच्छेद, पूर्ण विधाने, ह्याचा पूर्ण बट्ट्याबोळ असतो. इतके जुने लिहिणारे तुम्ही, तुमचा ब्लॉगही आहे म्हणता. तरी असे. काही समस्या आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 03:22 नवीन
मिपावर तुम्ही नवे आहात का अशुद्ध लेखन व्याकरण ह्यामुळे माझ्या अभिव्यक्त स्वातंत्र्यावर मी गदा आलेली येऊ दिली नाही आहे. मिपा प्रशासनाने मला फ्री स्पीच सारखी फ्री रायटिंग चा अधिकार दिला आहे असे मी मानतो ह्या बद्दल मी त्यांचा ऋणी आहे असो आता मुद्देसूद प्रतिवाद घालायचा नसल्यावर येथे अवांतर न करता व्यनि करावा. काही दिवसांनी मीच घोषणा देणार आहेत हमे चाहिये आझादी व्याकरण से आझादी शुद्द लेखन से आझादी सून ले तर्राट जोकर हमे चाहिये आझादी आपले पंचतारांकीत नगरीत स्वागत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 03:54 नवीन
अभिव्यक्ती पण स्वातंत्र्याला चर्चेत भाग अनुमोदन घेतांना सभेचे नियम पाळायला लागतात स्वातंत्र्य आहेच, कसे बोलायचे ह्याचे नियम तरी पाळाल काय बोलायचे ह्याचे की नाही त्रासदायक आहे काय लिहिलंय ओ का ठो समजत नाही दुसर्‍यांना दुर्बोध, तुमचं फ्रीरायटींग सुखी राहा वाचायला वाचायला बसा खुशाल तुमचे कष्टप्रद असणारं लिहायचा जसा तुम्हाला अधिकार आहे तसा त्याविरूद्ध पंचतारांकित नगरीत बोलण्याचा डोंबलाची करणार एकतर्फी तुम्ही तुमची आझादी कुरवाळत मलाही आझादी आहे मुद्देच समजले नाही तर चर्चा काय आपल्या आझादीसह. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनुमोदन. पण चर्चेत भाग घेतांना सभेचे नियम पाळायला लागतात. काय बोलायचे ह्याचे स्वातंत्र्य आहेच, कसे बोलायचे ह्याचे नियम तरी पाळाल की नाही. तुमचं फ्रीरायटींग वाचायला त्रासदायक आहे, काय लिहिलंय ओ का ठो समजत नाही. दुसर्‍यांना दुर्बोध, वाचायला कष्टप्रद असणारं लिहायचा जसा तुम्हाला अधिकार आहे, तसा त्याविरूद्ध बोलण्याचा मलाही अधिकार आहे. तुम्ही तुमची आझादी कुरवाळत बसा खुशाल, तुमचे मुद्देच समजले नाही तर चर्चा काय डोंबलाची करणार. पंचतारांकित नगरीत आपल्या एकतर्फी आझादीसह सुखी राहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
निनाद मुक्काम … गुरुवार, 02/25/2016 - 11:52 नवीन
आमचे लिखाण वाचायला या असे हळदी कुंकवाचे आमंत्रण दिले नाही . आमचे विचार लेखन शैली किंवा अशुद्ध लेखन किंवा आम्ही आपणास पसंद नसेल तर दुर्लक्ष करावे बाकी मिसळपाव च्या नियमावलीत शुद्ध लेखनाचा उल्लेख नाही तेव्हा नियमबाह्य असे आम्हीच काहीच केले नाही अभ्यास वाढवा आणि अवांतर करण्यापेश्या मूळ मुद्यांवर या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 12:02 नवीन
आमचं स्वातंत्र्य बोचलं का... स्वारी बर्का, दुर्लक्ष करायची संधी होती, गमावलीत. पंचतारांकित स्वागतही करता आणि आमंत्रण दिले नाही म्हंटा...ब्वारं ब्वारं. अभ्यासाचा कंटाळा आहे, उंटावरुन शेळ्या हाकलयाचा अभ्यास करुन काय उपयोग. तुमच्याकडे शोभतो तो अभ्यास. राहू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
न
नाना स्कॉच गुरुवार, 02/25/2016 - 12:17 नवीन
अहोपन्नीयमदुर्लक्षकेलेटरपरिस्थितिकहिशिअशिहोतेकुल्कर्निसहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 12:57 नवीन
बिरुटे सरांच्या धाग्यावर मिपा संस्थापकाच हा प्रतिसाद बरेच काहि सांगुन जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 13:31 नवीन
बरसचासततच्मिथेइतेथितेलिहिलेल्कुनीकुनीव्याक्रनाबद्दलाम्हालासगळ्यात्बाजूब्ददल्सहानुभूतीआहेअभिव्यक्तीस्वातंत्र्यस्गल्यचेमान्य्व्हाचेअशेइछर्होतीध्न्यव्द
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/25/2016 - 08:42 नवीन
माफ करा स्पष्ट बोलतो. पण तुमचा लेख हा ताकाला जाउन भांडे लपवण्याच्या प्रकारातलाच होता. पहिल्यापासुन तुमच्या लेखाचा उद्देश सध्याच्या सरकारवर टीका करणारा होता. तो उद्देश साध्य होत नाहिसे दिसुन आणि उलट सर्व लक्षणे पुर्वीच्या कॉम्ग्रेस्स सरकारवर उलटत आहेत हे बघुन तुम्ही हा स्पष्ट प्रतिसाद दिलात. परत प्रतिसादात सुद्धा काही ठिकाणी "सरकार करत आहे असे नाही तर समाज करत आहे" असे म्हणत आहात. मग समाज जर बदलला असेल तर त्याचा दोष सरकारच्या माथी मारण्याचा खटाटोप म्हणजे पुर्वग्रहदुषित दृष्टिकोनातुन सद्य सरकारला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासारखे वाटते. अगदी स्पष्ट बोलायचे झाले तर "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं" या फॅसिस्ट प्रवृत्तीकडे झुकणारा बिनबुडाचा आरोप आहे हा. वेगळ्या दृष्टीकोनातुन बघायचे गेल्यास "सरकारला प्रत्येक गोष्टीत उगाच बळीचा बकरा बनवण्याचा" विरोधकांचा प्रयतन चालु आहे आणि हे तुम्हाला पटलेल्या दृष्टीकोनातुन बघायचे झाल्यास फॅसिस्ट मनोवॄत्तीचे लक्षण आहे. त्यामुळे सध्या तरी असेच मानायला लागेल की सद्य सरकार फॅसिस्ट नसुन विरोधक मात्र आहेत. हे तेच विरोधक जे या आधी सत्तेत होते आणी फॅसिस्ट होते असे माझ्यासकट बर्‍याच लोकांनी म्हटलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
न
नया है वह गुरुवार, 02/25/2016 - 12:45 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
व
विकास Wed, 02/24/2016 - 17:46 नवीन

मुदलात हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण? अथवा खरेच कोणी आहे का?

जेंव्हा अशी भाषांतरे केली जातात तेंव्हा ज्यांच्या लेखनाची ती केली जातात ते कुठेतरी प्रथितयश असतात असा माझा समज आहे. प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक माणूस माहीत असेलच असे काही नसते. तेंव्हा वरील "माहितीपूर्ण" लेख वाचत असताना आपल्याला हे ब्रिट साहेब माहीत नाहीत, म्हणजे आपले तोडकेमोडके ज्ञान देखील किती क्षुल्लक आहे असे वाटले. म्हणून मग प्रश्न पडला की हा लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण की ज्याचे वाक्य ब्रम्हवाक्य, सॉरी आयमीन टू से बुद्धीवादीवाक्य म्हणून घ्यावे? मी जनरल नॉलेजचा नसेन कदाचीत पण जंक नॉलेजचा नक्कीच भुकेला आहे. (हे असे एक खाद्य आहे, जे जंक असून देखील कॅलरीज वाढवत नाही!) आता अशावेळेस जे काही अतिसामान्य माणसे करतात तेच मी देखील केले... Laurence W. Britt असे म्हणले आणि गुगलले. काय आश्चर्य! या नावाची व्यक्ती म्हणून काहीच पुढे आले नाही. आला तो फक्त परत परत तोच लेख जो एकाने आधी कुठेतरी टाकला, मग दुसर्‍याने नवीन पत्त्याने आणि गाडी चालूच राहते... त्यातील काही दुव्यांवरून असे देखील समजले की, हा लॉरेन्स ब्रिट नुसताच नाही तर डॉ. लॉरेन्स ब्रिट आहे. त्यामुळे मी अजूनच दबलो की बापरे हे मोठ्ठे प्रस्थ दिसतयं! तरी देखील त्यात एक समजले की हा लेख मूळ Free Inquiry Magazine, Vol 22 no 2, [15 July 2003] येथे आला आहे. मग Free Inquiry Magazine गुगलले की मूळ लेख शोधावा... तर Free Inquiry - Council for Secular Humanism याचा दुवा मिळाला... गंमत म्हणजे आमच्या फायरफॉक्स ला कसला तरी वास आला आणि खालील वॉर्निंग मिळाली: Image removed. म्हणलं आपल्या संगणकावर असल्याने फायरफॉक्स पण उजवे असेल म्हणून मग गुगलक्रोम वापरले. हुश्श! त्या साईट्चे साईटसिइंग झाले! (आता फाफॉ ने सांगितल्याप्रमाणे त्या साईटवरून काही व्हायरस, माहीती चोरी वगैरे झाले नसले म्हणजे मिळवले!) मग त्यात परत एकदा ब्रिटसाहेबांना त्या संस्थळावर शोधले. मग एक हा लेख दिसला आणि दुसरा "Islamofascism Is a Gross Misnomer" नामक एक लेख दिसला. अर्थातच ते त्यास्थळावर जे वर्गणीदार आहेत त्यांनाच दिसतात. म्हणून मला दिसणे शक्य नव्हते. ;) आता हे नॉन पिअर रिव्ह्यूड आहे. पण त्याने मला खरेच काही फरक पडत नाही, जो पर्यंत लिहीणार्‍या व्यक्तीबद्दल अधिक माहीती समजू शकते... म्हणूनच माझी अवस्था कठोपनिषदातील नचिकेतासारखी झाली होती. म्हणजे असे की सगळी उत्तरे हे गुगल देत होते पण परत परत "लॉरेन्स ब्रिट आहे तरी कोण?" म्हणून विचारले, की यमाप्रमाणे, तेव्हढे सोडून सगळे सांगतो असे उत्तर, असे काहीसे! :( अगदी अ‍ॅमेझॉन वर या लेखकाच्या नावाने June 2004 तीन रिव्ह्युअर्सच्या सरासरीने साडेतीन (दिवसारात्री कधिही दिसणारे)तारे असेलेल एक पुस्तक आहे. पण लेखक कोण म्हणून शोधायला गेलो तर, परत तेच... आम्ही नाही जा! शेवटी एक काहीसा दुवा मिळाला. आता काहीसा म्हणायचे कारण इतकेच की त्यात सर्व संदर्भ बरोबर येत आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर असे:
A search of the internet reveals no “Doctor Laurence Britt, political scholar,” nor can any of his works be found aside from the 14 Warning Signs themselves. Does this man exist? As it turns out, yes and no. There is no “Dr. Laurence Britt, political scientist” and there never was. There is only Laurence Britt, former executive and author of a single book, who wrote the 14 Signs. Far from being anything resembling an expert on politics, much less Fascism specifically, Britt is a former corporate executive who worked for such corporations as Allied Chemical, Mobil and Xerox Corp and studied business at Northwestern University. .... So what was the inspiration for his article? As it turns out, it was nothing more than a propaganda piece intended to serve as an argument claiming the Bush administration was in fact, Fascist and that it was a basis for his book “June 2004,” in which America descends into Fascism following the election of a strangely Bush-like far-right politician, a book which he maintains has been “quite predictive,” though one might have to actually care to read the book to determine whether or not this is true.
यात पुढे हा लेख कसा बरोबर नाही अथवा त्यात सांगितलेली चिन्हे कुठल्याही चळवळीत, सरकारमधे कशी दिसतात वगैरेचा उहापोह आहे. पण तो वेगळा मुद्दा आहे. कारण तसेच मुद्दे चर्चाप्रस्तावात ज्या लेखाचा दुवा दिला आहे त्यातील प्रतिसादात पण आहेत आणि त्यात काहीजणांनी काही चुका दाखवून दिल्या आहेत. पण मुद्दा तो नाही... हा ब्रिट्स आहे तरी कोण? त्याव्यतिरीक्त वरील संशोधन करणार्‍या व्यक्तिमुळे हा दुवा मिळाला... यात स्वत: ब्रिट्स साहेबांनीच लिहीलेले आहे की:
Laurence Britt Says: September 21st, 2006 at 9:41 pm Dear Ryan, I’ve read this thread with interest. For your information I never made a claim that I was a “Dr.” Someone on the internet made that ASSUMPTION when they passed on the artice. I am a retired bsunessman with a life long interst in history and current events. I have a personal book collection on these subjects of over 3000 volumes. I’ve contributed chapters to three books, written another, and am working on a second. I’ve written aproximately 25 magazine and newespaper articles on political and econmic affairs. I spent about 200 hours researching the fascism article building on a lifetime interst in the subject. My novel, “June , 2004” was written in 1997 and published in 1998. It was a fictional treatment of a future of fascism in America, which has turned out quite predictive of actual events since it was published.Regards, Larry Britt
म्हणजे ते स्वतःला काही डॉ वगैरे म्हणवून घेत नाहीत. पण त्यांचे विचार पसरवणार्‍यांनी त्याचे महत्व वाढवण्यासाठी त्यांना डॉक्टर केले. वरच्या भाषांतरात (चर्चाप्रस्तावात) तसे नाही आहे पण त्या विचारांचा प्रचार करणार्‍या जालीय सेक्युलरांमधे नक्की आहे जसे भारतात भाविक लोकं एखाद्याचे तत्वज्ञान आवडल्यास त्याला संत म्हणतात तसे कदाचीत हे पाश्चिमात्य प्रेमाने डॉक्टर म्हणत असतील नाहीतर गेला बाजार इंटलेक्च्युअल म्हणत असतील... अजून एक "मान गये उस्ताद" म्हणावेसे वाटणारी गोष्ट म्हणजे हा लिबरल माणूस स्वतःचे जालीय अस्तित्व मात्र पूर्णपणे खाजगी ठेवतो... पण एकंदरीत मुद्दा इतकाच, की स्वतःच्या पुस्तकाची अप्रत्यक्ष जाहीरात करण्यासाठी म्हणून एक माणूस काहीतरी एक लेख २००३ मधे लिहीतो आणि मग तमाम बुश विरोधी जनता त्याचा फायदा घेण्यासाठी त्या लेखाला जालावर विविध अनुदिनीमंधे चिकटवत तापवत ठेवते. याला काय संशोधनात्मक जाउंदेत पण विचारात्मक लेखन का ट्रोलात्मक लेखन म्हणायचे? (एक मुद्दा: मी बुश ना झोपेत पण कधी पाठींबा दिला नव्हता!) मग ओबामा आल्यावर ते तिकडे बंद होते. आता भारतात मोदी आले म्हणून चालू होते... काय राव! हे म्हणजे सनातन प्रभात मधील लेखाचा हिंदू धर्माच्या तत्वज्ञाने लिहीलेला लेख म्हणून दुवा देण्यासारखे झाले. अर्थात मला माहीत असलेले सगळे बरोबर आहे अशी भ्रामक समजूत नाही, म्हणूनच आपल्याला ह्या लेखकाबद्दल अधिक माहिती असल्यास अवश्य सांगावीत, ही विनंती... अजून एक विनंती: स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याऐवजी हे असले कुठल्यातरी उपटसुंभाच्या लेखाचे भाषांतर करणे काही पटले नाही...पण बाकी त्या निमित्ताने, उत्तर म्हणून मला एव्हढे मोठे मुद्दे असलेला लेख आणि बिनचेहर्‍याचा लेखक आठवत नाही तर मध्ययुगातील इटालियन कवी डांटेचे एक वाक्य आठवते ते सांगून माझे अल्पसे मत संपवतो ;)
The hottest places in hell are reserved for those who, in times of great moral crisis, maintain their neutrality.
- Dante
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Wed, 02/24/2016 - 17:59 नवीन
अरे भाई, आखिर तुम कहना क्या चाहते हो? १. लॉरेन्स ब्रिट या नावाची व्यक्ती आहे, पण ती डॉक्टर किंवा संशोधक नाही. ठीक आहे. मी या लेखात त्याला डॉक्टर वगैरे काही म्हटलेलं नाही, किंवा त्या माणसाचा महाप्रचंड अभ्यास आहे असं म्हटलेलं नाही. त्यांना जी साम्य दिसली ती त्यांनी लेखात मांडली, मी स्वैर अनुवाद केला. २. ते लिखाण ट्रोलात्मक निश्चितच नाही. त्यात अत्यंत संयत भाषेत काही मुद्दे मांडलेले आहेत. चुकीचे वाटतील ते खोडून काढायला कोणाचीच हरकत नाही.
स्वतःचे मत स्पष्टपणे मांडण्याऐवजी हे असले कुठल्यातरी उपटसुंभाच्या लेखाचे भाषांतर करणे काही पटले नाही...
३. मुद्दामूनच भारतीय परिप्रेक्ष्यात विचार करायला लावण्यासाठी तटस्थता राहावी म्हणून आधी केवळ भाषांतर केलं. नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं. मात्र लेखक कोणीतरी क्षुद्र, हे लिखाण करायला लायकीचा नाही वगैरे आक्षेप घेण्याचं कारण कळलं नाही. माणसाच्या लायकीनुसार त्याच्या लिखाणाची लायकी ठरवली जात नाही, तर लिखाणाच्या योग्य-अयोग्यतेमुळे लेखकाची लायकी ठरते असं मी मानतो. मुद्द्यांबद्दल बोला सर. मला अॅड होमिनिम चर्चा करण्यात रस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
व
विकास Wed, 02/24/2016 - 19:23 नवीन
मात्र लेखक कोणीतरी क्षुद्र, हे लिखाण करायला लायकीचा नाही वगैरे आक्षेप घेण्याचं कारण कळलं नाही. माणसाच्या लायकीनुसार त्याच्या लिखाणाची लायकी ठरवली जात नाही, तर लिखाणाच्या योग्य-अयोग्यतेमुळे लेखकाची लायकी ठरते असं मी मानतो. मी पण! मात्र तसे टिपकली डावे अथवा डावीकडे झुकलेले करत नाहीत. भारतीय परिप्रेक्ष्यात बोलायचे तर साधे इराणीबाईंचेच उदाहरण घ्याना! त्यांची डिग्री काढतात. हिंदू धर्माची माहिती लिहीण्याची वेळ आली की फक्त डॉनिंजर बाई आणि तत्सम विद्यापिठीय विचारवंतांच्याच म्हणण्याला महत्व दिले जाते. तुम्हाला हे योग्य वाटते का? कळले तर बरे होईल. त्याही पुढे जाऊन जेंव्हा एखादी व्यक्ती आपले नाव गाव फळ फूल जालावर अत्यंत गोपनीय ठेवते, आणि "विचार" पसरवायला लागते ती व्यक्ती मला स्वतःला काहीतरी गडबड करणारी वाटते. जे ह्या ब्रिट्स साहेबांच्या बाबतीत झाले आहे. त्यामुळे हा लेख माझ्या दृष्टीने काही चांगला नाही. फॅसिजम वर बोलायचे आहे का? मोदी सरकारवर टीका करायची आहे का? अवश्य करा. जमत नसेल तर विचारा, मी देखील सांगेन कशी करता येईल ते! ;) पण हे असले टिपकली जे अंधश्रद्ध उजवे (सगळे नाही!) कशालाही महत्व देत तत्व सांगायला लागतात तशी तुमच्याकडून तरी अपेक्षा नव्हती... असो. तरी देखील तुमचा हट्टच असेल तर आणि म्हणून त्यातील मुद्द्यांसदर्भात बोलायचेच झाले तर भारतात सध्या स्वार्थी लिबरल लेबल लावलेले तथाकथीत विचारवंत फॅसिस्ट आहेत असे माझे म्हणणे आहे. ते गेले दिड वर्षे अक्षरशः कांगावखोरपणा करत थयथयाट करत आहेत. नजिकच्या भूतकाळातली फासिस्टपणाची काही उदाहरणे खालील प्रमाणे: #३ "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं " दहा वर्षे अक्षरशः गरळ ओकली, तरी देखील मोदी सरकार आले आहे. मी काही मोदी भक्त नाही. पण अत्यंत खोटे आरोप करत त्यांना जे काही "मौत का सौदागर" म्हणत केले गेले त्यामुळे सोनीया गांधी पासून ते अमर्त सेन यांच्यापर्यंत (मधे अरुंधती रॉय, बरखा दत्त, वगैरे आलेच) यांनी तुम्ही वर लिहीलेल्या, #३ "शत्रूसमुदायाकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं " मुद्दा वापरला आणि देशाचे अक्षरशः वैचारीक विभाजन करत वाट लावायचा प्रयत्न केला. खरं म्हणाल तर आत्ता देखील फासिस्ट वगैरे चर्चा करत कुठलाही अभ्यास न करता एकांगीपणे आपण देखील असेच करत नाही आहोत ना, असा प्रामाणिकपणे विचार करायला हवा असे वाटते. याच काळात तिव्र लिंगभेद (#५) झाला ज्यामुळे स्त्रीयांचे प्रमाण कमी झाले. आता बेटी बचाव - बेटी पढाव योजना आणि त्याही पेक्षा महत्वाचे काही धोरणात्मक बदल घडवले जात आहेत ज्याचा परीणाम या लिंगभेद प्रश्नावर सकारत्मरित्या होईल. #६ माध्यमांवर दबाव आता सरकारचा येत नसून दोन्ही कडून समर्थक अथवा विचारांचा येतो. याचे क्लासिक उदाहरण म्हणजे ज्या पद्धतीने अर्णब गोस्वामीला सध्या वाईट ठरवले जात आहे त्यात पहाता येईल. आता #४ मधे म्हणलेल्या मिलिटरी बजेट बद्दल. वर्ल्ड बँकेप्रमाणे २०११ साली ते जिडीपीच्या २.६% इतके होते तर २००१४ साली ते २.४% इतके झाले आहे. विकीप्रमाणे ते २००९ मधे २.९% होते तर २०१४ मधे २.६% इतके आहे. म्हणजे ते देखील काही आत्ता वाढलेले नाही. आता #१० कामगार आणि शेतकरी यांची शक्ती खच्ची करणं या बद्दल बोलायचे तर, शेतकर्‍यांचा वीमा वाढवला आहे आणि शेतीक्षेत्रात अधिक सुरक्षा आणण्यात आली आहे. कामगार काय, मधे धंदेच नव्हते. म्हणून तर मेक इन इंडीया करत मोदी सगळीकडे मार्केटींगचा माणूस असल्यासारखे फिरले. तरी देखील लिबरल्स त्यांना तुच्छच लेखत बसले. उद्या धंदे वाढले की जातील युनियनबाजी करायला... #१३ भ्रष्टाचार आणि बगलबच्चेगिरी आधी किती होती आणि आता किती आहे असे वाटते? अर्थातच जर-तर मधे उत्तर देऊ नका. जे दिसते ते सांगा. नसलेले असणे सांगणे म्हणजे माया... आणि मायावाद बुध्दीवाद्यांना मान्य नसतो. युपिएच्या काळात $५०५ बिलियन्स हे केवळ शेवटच्या १-२ वर्षात अनधिकृतपणे भारतातून बाहेर गेले आहेत. म्हणून सुप्रिम कोर्टाच्या चौकशी समितीने अधिक माहिती गोळा करायला सांगितली आहे... #१४ भ्रष्ट किंवा खोट्या निवडणुका - त्या झाल्या आहेत असे जर सिद्ध झाले तर मग दिल्ली, बिहार मधे सत्तांतर होईल. आणि जर लोकसभेच्या निवडणुका खोट्या होत्या असे म्हणायचे असेल त्या निवडणुका आमलात आणताना सत्तेत असलेल्या काँग्रेसला भ्रष्टाचार आणि खोटे पणा जमत नाही असे म्हणावे लागेल. पण असे वाटणे खोटेच ठरेल! ;) #१५ विचारवंत व कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - आता यातील विचारवंतांची व्याख्या करणे खरेच अवघड आहे. पण आधीच्या सरकारच्या राजाश्रयाखाली निवांत राहून विचार करणारे म्हणजे विचारवंत आणि त्यांनाच काय ते सगळे समजते असे म्हणायचे असेल तर काय सगळे संपलेच! :( उदा. आता मुंबई आय आय टी मधील विचारवंतांना जे एन यु मधे सरकार चुक वाटले तर मद्रास आय आय टी तील विचारवंतांना विद्यार्थ्यांचे वर्तन चुक वाटले. मग नक्की विचारवंत कोण? बरं आता कलावंताच्या बाबतीतच बोलायचे तर तो आमिर काय वाट्टेल ते बरळला. त्याचे काँट्रॅक्ट संपल्यावर केंद्राने नवीन कलाकारांना घेतले त्यात काय चूक. बरं ज्या पक्षाचे राज्य आहे त्यांनी आमिरला आता कोणी घेत नाही हे पाहील्यावर उदार होऊन महाराष्ट्रात कामाला घेतलेच. आता असे कधी आधी झाले होते का? #९ मोठ्या कंपन्यांचे हात बळकट करणं - अहो कोणी कुणाला बळकट करत नसतं. स्वत:च्या कामाने लोकं / कंपन्या बळकट होतात. ते सगळे तुम्हाला - आम्हाला आवडणार नाही (मला देखील खरेच मान्य नाही). पण मला सांगा सत्यम सारखे ज्यांना मुडदूस झालेला आहे त्यांना खोट बाळसे देऊन बळकट करणे झाले आहे का? आता आधीचे सरकार निव्वळ एनजीओंचे ते देखील डाव्या विचारसरणीच्या एनजिओंचे हात बळकट करायचे परीणामी देशातली कामे होत नव्हती, नक्षलता वाढत होती. आता उलट चालू आहे. नक्षलवाद्यांना खोगिरभरती करता येत नाही आहे. सरकार शरणार्थींना सामान्य जीवनात परत येण्यासाठी आर्थिक मदत करत आहे, जमिनीचा तुकडा पण काम-शेती करण्यासाठी देत आहे. (आणि हे मोदी विरोधकांनी लिहीलेले आहे) आता याचा अर्थ काय मोठ्या कंपन्यांचे हातच बळकट होत आहेत. आणि हो ते स्टार्टअप इंडीया विसरलोच की! #१२ गुन्हे आणि त्यांना शिक्षा देण्याबद्दल अतिरेकी तीव्र आचार - अफझल गुरूची फाशी चोरीचोरी चुपके चुपके अमलात आणली ती युपिए मधील काँग्रेसच्या गृहमंत्र्यांनी. त्याचे दफन कुठे झाले ते देखील माहीत नाही... त्याउलट मेमनची फाशी आमलात आणली ती जाहीर करून, नातेवाईकांना कळवून, अगदी मध्यरात्रीनंतर कोर्टसुनावणी होऊन (भले ते कोर्टाने स्वतंत्रपणे केले असले तरी) आणि त्याचे पार्थिव जनतेमधे आणून सार्वजनिक कब्रस्तानात दफनास परवानगी देऊन...आता कोर्टाने सर्व विचार करून दिलेल्या रेअरेस्ट ऑफ दी रेअर शिक्षा (पक्षी: फाशी) देणे बरोबर का चूक हा मुद्दा वेगळा आहे. पण त्यांनी केलेले गुन्हे काही कमी नव्हते. त्यातही गंमत म्हणजे निर्भया प्रकरणात बलात्कार्‍यांना फाशी द्या म्हणणारे लिबरल्स अफझलच्या बाबतीत मात्र गळे काढताना दिसले आहेत. #८ धर्म आणि राज्यकर्त्यांचं साटंलोटं - अच्छा म्हणूनच मोदी सरकार आल्या आल्या, साध्वी प्रग्या झालं काय अथवा आसाराम बापूंसारखे झाले काय तात्काळ मुक्त झाले! बाकी इंदिराजींच्या काळातले धिरेंद्र ब्रम्हचारी आणि नंतर तमाम सर्वपक्षिय नेते जात असलेले सत्यश्री साईबाबा आठवतात का? म्हणजे ते देखील आत्ता चाललेले आहे असे वाटत नाही. #२ मानवी अधिकारांबद्दल तुच्छता आणि संकोच - अहो ते मोदी पण मानवच आहेत आणि सगळे संघस्वयंसेवक देखील पण त्यांच्याबद्दल तुच्छता दाखवली गेली ती कुणाच्या काळात? आणि कोणी दाखवली? केवळ सत्ताधार्‍यांनी? किंबहूना हे विचारवंत समजणार्‍यांनी जास्त विष पेरले आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागते... आत्ता तर केरळ मधे आई-वडीलांसमोर एका तरूण संघस्वयंसेवकाला जीवे मारले. नंतर त्याच लोकांनी तिथल्या संघकार्यालयाची नासधूस केली... तसे म्हणाल तर मोदी सरकारने तिकडे राष्ट्रपती राजवटच आणायला हवी होती नाही का? ते काही झाले नाही. आणि तिथल्या कम्युनिस्ट सरकारने देखील काही कारवाई केली नाही. इतकेच नव्हे तर गळचेपी होत नसलेल्या प्रसिद्धी माध्यमांनीपण यावर आवाज उठवला नाही की असहीष्णुता म्हणत राजाश्रीत विचारवंताने पुरस्कार परत केला नाही... #१ राष्ट्रवादाचा जोरदार आणि सतत पुरस्कार - आपण एक काम करा. ज्या देशात आत्ता रहात आहोत त्या देशाबद्दल वाट्टेल त्या घोषणा करा म्हणजे देश के तुकडे तुकडे वगैरे) आणि त्याचा व्हिडीओ काढून युट्युबवर टाका - विचारस्वातंत्र्य म्हणून. करायला तयार आहात? उत्तर मिळाले तर आभारी राहीन. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ह
हुप्प्या गुरुवार, 02/25/2016 - 06:25 नवीन
डाव्या नथीतून तीर मारायचा प्रयत्न उत्तम प्रकारे हाणून पाडला आहे. तरी मला अशी भीती वाटते आहे की ज्या खर्‍या खोट्या कारणांचा वापर करुन प्रस्थापित डावे, डाव्या विचारांची माध्यमे ज्या प्रकारे रान उठवत आहेत ते पाहून असे वाटते की मोदी पुन्हा निवडून येणे शक्य वाटत नाही. बिहारनंतर उत्तरोत्तर घसरण चालूच रहाणार असे वाटते. (देव करो आणि तसे न होवो!). भारताने जे विचारस्वातंत्र्य दिले आहे ते वापरुन त्या स्वातंत्र्यदात्या देशाचे वाटोळे व्हावे असे विचार उघडपणे मांडणे कितपत मान्य केले जावे हा एक प्रश्नच आहे. संभावितपणाचा आव आणून फॅसिजम हे भाजपालाच कसे तंतोतंत लागू पडते हे दाखवायचा प्रयत्न आपण तोंडघशी पाडलात ह्याबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 02/25/2016 - 07:19 नवीन
संभावितपणाचा आव आणून फॅसिजम हे भाजपालाच कसे तंतोतंत लागू पडते हे दाखवायचा प्रयत्न आपण तोंडघशी पाडलात ह्याबद्दल आभार.
सहमत आहे. विकासरावांचा प्रतिसाद अगदी प्रचंड आवडला आहे. काल हा लेख वाचला तेव्हाच सुरवातीला फॅसिझमविरूध्द असलेली गाडी शेवटी भारतात सध्याचे मोदी सरकार कसे फॅसिस्ट आहे यावर घसरणार हे कळलेच होते.गरज होती ती गाडी तिथे गेल्यावर ताबडतोब योग्य मुद्द्यांनी ठोकून काढायची. विकासरावांनी ती गरज अगदी १०००% पूर्ण केली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनुप ढेरे गुरुवार, 02/25/2016 - 06:43 नवीन
मुद्दा क्र ६ वर तर खांग्रेस सरकारचा ट्रॅक रेकॉर्ड रोचक आहे. ६६ए त्यांनीच आणलं. चेपू, ट्विटरवर बंदी आणायचा प्रयत्न केला.

२जी, कोळसा वगैरे घोटाळ्यांमध्ये उद्योगपतींचे हात कोणी बळकट केले हे देखील उघड आहे.

नरेगामुळे शेतमजूर मिळत नाहीत. किंवा काय्च्या काय मजुरी मागतात असं ऐकलं आहे. म शेतकर्‍याचं खच्चीकरण कोणी केलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 02/25/2016 - 09:28 नवीन
+१०० सद्या "विचारवंत = कांगावाखोर" हे समिकरण ठरावे इतका धडधडीत आचार-विचार-प्रचार चालला आहे. इतका की, जनतेला डोकेच नसते हा या लोकांचा ठाम विश्वास आहे हे पटावे ! २०१४ च्या निवडणूकीनंतर सुरुवातीला भाजपाशी संलग्न असलेल्या/असावेत अश्या काही लोकांनी उच्छाद मांडून "असे लोक असले तर भाजपा शत्रूंची गरज नाही" असे वाटायला लावले होते. नंतर, भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे. भविष्यात दिसेलच, जनतेला किती डोके आहे की नाही ते !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मोदक गुरुवार, 02/25/2016 - 09:44 नवीन
भाजपविरोधकांनी स्वार्थी हितसंबंधासाठी ते कोणत्याही टोकाला जावू शकतात, अगदी देशविघातक बोलण्या-करण्याला पाठिंबा देऊ शकतात, याचे उघड प्रदर्शन करून भाजपाला मदत करायला सुरुवात केली आहे. चांगले आहे.. बुरखे टराटरा फाटत आहेत. अजेंडा समोर येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 02/25/2016 - 11:11 नवीन
धन्यावाद. कष्ट वाचवलेत. असेही व्यक्तीस्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, माध्यमांची गळचेपी यांच्याबद्दल बोलणारे इंदिरा गांधींना "आयर्न लेडी" वगैरे म्हणतात तेव्हा गंमत वाटते (हे गुर्जींसाठी नव्हते. हे जनरल स्टेटमेंट होते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
म
मोदक गुरुवार, 02/25/2016 - 09:24 नवीन
नंतर माझी मतंही खोलवर मांडली. माझी या विषयात थोडं वाचन असलेल्या सामान्य माणसाइतकीच गती आहे हे मानलं. ही परस्परविरोधी वाक्ये वाटत आहेत. एखादा प्रतिसाद तिकडून इकडे चिकटवायला विसरला आहात का? नसल्यास मला कृपया लिंक द्या. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 02/24/2016 - 18:06 नवीन
काय हे विकाससाहेब ? इतका शिरेस संवाद चालला होता त्याला सुरुंग लावताय ? कुठे फेडाल ही राजकारणात शास्त्रिय उत्खनन करण्याची पापं ? ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा