राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे..
१. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
२. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे.
३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच.
या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्यापैकी बदलतो माझ्या मते.
माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.१०० % सहमत ! मात्र "अमुक गोष्ट राष्टद्रोह आहे, तर मग तमुक राष्ट्रद्रोह का नाही ?" असे एका चुकीचे समर्थन दुसरी चूक पुढे करून केले जाते, ते चूक आहे. त्याऐवजी "अमूक गोष्ट राष्ट्रद्रोह आहे आणि तिच्याबाबतीत कायदेशीर कारवाई होत आहे ती योग्यच आहे. पण, त्याबरोबर तमुक राष्ट्रद्रोही गोष्टीसंबंधीही योग्य ती कारावाई व्हायला हवी" असा विचार/लेखन समतोल होईल... राष्ट्रहिताच्या संबंधात एखादे कृत्य कोणी (पसंतीच्या/नापसंतीच्या, पक्षाने/नेत्याने/माणसाने) केले हे पाहण्यापेक्षा ते राष्ट्रद्रोही आहे की नाही हे पाहणे महत्वाचे, आणि ते कृत्य राष्ट्रद्रोही असल्यास ते कोणीही केले असले तरी त्यावर निष्ठूरपणे कारवाई होणे जरूरीचे आहे... तरच देशाला आणि पर्यायाने त्यातल्या नागरिकांना उज्ज्वल भवितव्याची आशा ठेवायला जागा राहील. क्ष ने माती खाल्ली तेव्हा त्याला काही केले नाही, म्हणुन आता य ने माती खाल्ली तर त्यालाही माफ करायला हवे हे राजकारण झाले... हे टाळायला हवे... निदान राष्ट्रद्रोहासारख्या कळीच्या मुद्द्यासंबंधात तरी.जर समान न्याय लावायचा झाला तर या न्यायाने चोरी आणि सदोष मनुष्यवध या दोघांनाही सारखीच शिक्षा झाली पाहिजे.हा तुमचा शब्दप्रयोग आहे... माझा (दूरान्वयानेही) नाही. मी जरूर त्या ठिकाणी "योग्य ती शिक्षा" असेच लिहिले आहे... आणि ते अनवधानाने नाही तर विचारपूर्वक लिहिले आहे. ****** अजून कोणी/कोणता शब्दच्छल (बाल की खाल) करू/होऊ नये यासाठी अ़जून एक... "योग्य शिक्षा" या शब्दांचा या संदर्भातला अर्थ = प्रचलित कायद्याने गुन्ह्याच्या स्वरूपाप्रमाणे योग्य असलेली शिक्षा :) ;)त्याला कोर्टाच्या आवारात तीन तास मारहाण करणारे वकिलतीन तास ?... रबर जरा जास्तच ताणले आहे असे वाटत नाही का ? ;) =)) ======= तो वकील चूक होता, त्याला योग्य ती शिक्षा व्हायला हवी हे अगोदरच लिहिले आहेच. त्या वकिलाने अतिरेकी वर्तनाने जी चूक केली तिच इथे शाब्दिक अतिरेकाने होत आहे ;) :)