Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रभक्ती, देशद्रोह आणि घोषणा

आ
आनन्दा
Wed, 02/24/2016 - 05:34
🗣 111 प्रतिसाद
खरेतर मोरेकाकांच्या धाग्यावर मी हा प्रश्न उपस्थित केला आहे, पण या प्रश्नाचे धागामूल्य ध्यानात घेऊन वेगळा धागा काढत आहे.. १. भारत सरकारविरुद्ध घोष्णा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. २. भारत देशाविरुद्ध घोषणा देणे म्हणजे देशद्रोह नव्हे. ३. नुसत्या घोषणा म्हणजे देशद्रोह नाहीच. या दोन्ही वाक्यांबद्दल तुमचे मत जाणून घ्यावयास आवडेल. दोन वाक्यांमध्ये निसटता फरक आहे, पण अर्थ बर्‍यापैकी बदलतो माझ्या मते. माझे मत येईलच चर्चेमध्ये, पण मी संभ्रमित आहे. तुमचे मत काय?

प्रतिक्रिया द्या
15025 वाचन

💬 प्रतिसाद (111)
म
मृत्युन्जय Sat, 03/05/2016 - 06:52 नवीन
वरील दोन गोष्टीतला एक मुलभूत फरक आपण समजुन घेतलेला दिसत नाही. देशविरोधी घोषणा देणॅ. देशद्रोही कामे करणे आणि उद्योगधंदा करत असताना त्यात नुकसान होणे यात मूलभूत फरक आहे. उद्योगधंद्यात नुकसान होणारा प्रत्येक उद्योगपती हा पैसे घशात घालतो असा एकांगी समज करुन घेणे म्हणजे प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी असतो असे म्हणण्यासारखे आहे. धंदा म्हटल्यावर चढ उतार येणारच. कधी कधी काही गणीते चुकु शकतात. हे करताना नुकसान देखील होणारच. नुकसान सहन करणारा माणूस अजुन जास्त हातपाय मारुन गाळातुन वरती यायचा प्रयत्न करतो आणी या प्रयत्नात जास्त गाळात जातो. त्याने कितीही सचोटीने धंदा केला तरी काही समीकरणे बिघडुन कर्जे बुडीत जाऊ शकतात. शेतीमध्ये वेगळे काय होते? तिथेही शेती गाळात जाते, बॅ़कांची कर्जे बुडवली जातातच की. त्यामुळे केवळ नुकसान झाल्याने धंदा बुडाला आणि कर्जे परत करु शकले नाहित तर उद्योगपती चोर ठरत नाहित. देशद्रोही तर नाहिच नाही. ज्या उद्योगपतींनी पैसा घशात घातला ते चोर ठरु शकतात. मल्याचे उदाहरण घ्यायचे तर त्याने किंगफिशर एयरलाइन मध्ये पैसा गुंतवला आणि तो डुबला. त्याने बँकांनाही डुबवले. ही धंद्यातली खोट झाली. जोपर्यंत असे सिद्ध होत नाही की मल्याने एयरलाइनच्या नावाने पैसा घेउन स्वतःचे बंगले बांधले तोवर तो चोर ठरत नाही. आपल्याला मल्याची लॅविश लाइफस्टाइअल दिसते आणि त्याने बँकांची बुडवलेली कर्जे दिसतात पण त्याने कर्जे एयरलाइनची बुडबली. त्याने बुडवली म्हणजे त्याच्या कंपनीने बुडवली कारण ती कंपनी गाळात गेली आणि पार्ट्या तो त्याच्या इतर उत्पन्न स्त्रोतातुन करतो. त्यामुळे तो चोर ठरत नाही. अर्थात यातुन माणसाची नियत दिसते. त्याने कर्मचार्‍यांचे पैसे देखील थकवले. आपल्या इतर उद्योगांतुन स्वतःचे पैसे अय्रलाइन मध्ये लावुन तो काही देणी चुकवु शकला असता. त्याने जे केले ते मनाला रुचत नसले तरी त्यात बेकायदेशीर काही नसल्याने तो अजुन बाहेर आहे ( त्याने कंपनीच्या पैशावर स्वतःचे इमले बांधले असतील तर गोष्ट वेगळी) थोडक्यात धंद्यातली खोट हा देशद्रोह काय साधी चोरी पण ठरत नाही पण खोटेपणाचा धंदा ही चोरीच झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आनन्दा Wed, 02/24/2016 - 07:36 नवीन
भारतीय कायदा याबद्दल काय सांगतो?
  • Log in or register to post comments
प
प्रणवजोशी Wed, 02/24/2016 - 09:12 नवीन
http://www.pravakta.com/deshdroh-se-tirange-tak/
  • Log in or register to post comments
प
पुष्करिणी Wed, 02/24/2016 - 11:43 नवीन
जिथंतिथं 'विचावंत' लोकांकडून सध्या आळवलं जाणारं धृपद 'Dissent is not anti-national' हे जितकं खरं आहे तितकाच सोयीस्कर रित्त्या विसरलेला त्याचा व्यत्यासही खरा आहे .
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 14:16 नवीन
काश्मिरी आतंकवादी मकबूल भट याची विकीपिडियावरची माहिती संतुलित नाही. त्याचे उदात्तीकरण करुन त्याला हिरो बनवणारी वाटते. संबंधित लक्ष देतील काय? https://en.wikipedia.org/wiki/Maqbool_Bhat
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Wed, 02/24/2016 - 14:17 नवीन
आपल्या नेहमीच्या आयुष्यातही आपण चटकन बोलून जातो " ते... अमुक ना कोणालाही दुखवीत नाहीत अर्थात ते फार सद्ग्रूहस्थ आहेत. " माझ्या मते त्यांच्या या गोडव्या पेक्षा ते किती सरळ वा वाकडे वर्तणुकीत आहेत हे मला महत्वाचे वाटते. मी राष्ट्रध्वजाला वंदन करतो पण आयकर बुडवितो. भारत्माताकी जय म्हणतो पण रांगेत घुसतो तर मी एक देशद्रोहीच आहे. जला दो जला दो जला दो ये दुनिया...... असे वैतागाने म्हणणारा॑ कवि मग मानवाचा एक नंबरचा शत्रू म्हणावयास हवा. आपण आपली घटना आपल्यासाठी बनविली आहे ती आपल्यासाठी आहे आपण तिच्यासाठी नाही. सबब ती बदलू असे सुचविणे हा देखील देशद्रोह मानू लागलो तर वरती अस्मानातच वस्ती करून रहावे लागेल. थोडक्यात देश, धर्म राष्ट्र,संस्कृति भाषा राज्यघटना या समूहासाठी आहेत. मानवाने त्याचा अतिरेकी अभिमान बाळगू नये. पण कृति करताना आपण काही इतरांच्या जगण्यातच उपद्रव ठरणार असू तर खुद्ध एखादा शास्ता देखील देश्द्रोही म्हणावा लागेल. नव्हे आज देखील जर्मनीतील लोक॑ हिटलरला देशद्रोहीच मानतात.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Wed, 02/24/2016 - 15:11 नवीन
तर्राटजी जोकर, माझं एक सुक्ष्म निरीक्षण सांगतो, असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.
देशाचं नुकसान करणारा प्रत्येकजण आपल्यासाठी देशद्रोहीच आहे. भले ते घोषणा देणारे असो वा गुपचूप चुना लावनारे.
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का?
बाबाजी, १.१४ लाख कोटींचे कर्ज आपल्याच करातून उद्योगपतींच्या घशात गुपचुप घातलेत. तेव्हा आपण आपल्या बोलण्याचा हक्क बजावला की नाही?
माझ्या अल्पज्ञानानुसार भ्रष्टाचार हा गुन्हा जरूर आहे,यामुळे देशाचे नुकसान होते.पण ते देशद्रोह या क्याटॅगिरीत मोडत नाही. भंकसबाबांनी देशविरोधी घोषणा देण्यार्यांना कुत्रे संबोधले आहे,पण तुम्ही परत उद्योगपतींना कर्ज देणे वगैरे असंबंधित मुद्दा उपस्थित केलात.आणि त्यांनासुद्धा कुत्रे म्हणण्याचा हक्क बजावलात का? म्हणून विचारलं. देशद्रोही घटनांची इतर घटनांबरोबर तुलना करू नये सरकारचे धोरण,दुटप्पीपणा,भ्रष्टाचार वगैरे मुद्दे मांडण्यासाठी दुसरे धागे आहेत,किंवा तुम्ही दुसरा धागा काढा. पटलं तर घ्या नाहीतर द्या सोडून.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 02/24/2016 - 15:26 नवीन
करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 16:35 नवीन
म्हटले तर ट्रूमनसाहेबांच्या प्रतिसादात धागा संपला. अजून वेगळं कोण काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
भ
भंकस बाबा Wed, 02/24/2016 - 17:53 नवीन
मानधन वैगेरे मिळते का हो शेंचुरीला? माझा हेतु उद्योगपतिची पाठराखण करण्याचा नव्हता. हे देशद्रोही गोबेल्स तंत्रानुसार प्रचार करत आहे. काही काळाने हे टीनपाट बोलतील तेच सत्य असा समज पसरायला वेळ लागणार नाही. कदाचित माझा पोरगा (वय वर्षे 5) दहा वर्षानी मला विचारेल की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला का मारले? जर तो दुष्ट होता तर मग त्याच्या नावाने दर्गा का आहे? तिथे मन्नत का मागितली जाते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
उ
उगा काहितरीच Wed, 02/24/2016 - 17:59 नवीन
करू द्या हो. नाहीतर माझी शेंच्युरी कशी होणार?
हे नाही आवडलं ! आपण केवळ टीआरपी मिळावी म्हणून का असले धागे काढता ? एकदा आपण विचार करा हा मुद्दा किती गंभीर आहे याबाबतीत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 02/25/2016 - 02:26 नवीन
थोडीशी थट्टा चालते, नाही का? मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला. नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा. मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
उ
उगा काहितरीच गुरुवार, 02/25/2016 - 06:43 नवीन
थोडीशी थट्टा चालते, नाही का?
सहमत , चालावीच थोडीफार थट्टा . पण त्यासाठी भरपूर इतर धागे आहेत ना . हे असे सिरीयस धागे मिपाच्या सदस्व्ययांतीरीक्तही इतर लोकही वाचतात. कदाचित त्यामुळे मिपाची प्रतिमा "कोणत्याही धाग्यावर थट्टामस्करी करणारे संस्थळ" असे होउ शकते.
मी वरच लिहिले की हा विषय मी मोरेकाकांच्या धाग्यात काढला होता, पण त्याचे धागामूल्य लक्षात घेऊन मी वेगळा धागा काढला. नाहीतर त्यांचा धागा हाय्जॅक व्हायचा.
होय, ते आलं लक्षात आणी हे योग्यच केलेत. धन्यवाद !
मी टीआरपी साठी धागे काढतो का हे आपण माझ्या इथल्या इतिहासावरून ठरवावे. मी काय बोलणार?
बिलकुल नाही! तुमचे धागे चांगलेच असतात उगाच गैरसमज नको. पण त्याचं काय आहे ना, मी सहसा लेखावर प्रतिक्रिया देताना लेखकाचा पुर्वेतिहास बघत नाही. लेखकावर नाही तर लेखावर प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतो. . बहुत काय लिहीणे , आपण सुज्ञ आहात. काही चुकलं असेल तर क्षमा असावी . -आपला नम्र उका .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ब
बोका-ए-आझम Sat, 03/05/2016 - 07:58 नवीन
साठीच धागा काढत असतो. तो लोकांनी वाचावा आणि प्रतिक्रिया द्याव्यात हा प्रत्येकाचाच उद्देश असतो. त्यात चुकीचं काहीच नाही. टीआरपीचा हाच अर्थ लावतात ना? का काही वेगळा मिपीय अर्थ आहे? (कवितेत जसे कोडाईक‌नाल आणि भुछत्री हे खास मिपावरचे काव्यरस आहेत तसं).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 08:25 नवीन
सवंग लोकप्रियता म्हणजे टी आर पी असा मिपीय अर्थ आहे. ह्यामध्ये धाग्याचा विषय काय निवडला आहे ह्यावरुन धागालेखकाचा उद्देश बरेच्दा कळून येतो. प्रतिसादांतूनही दिसुन येतं. काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते. काही विशिष्ट विषय जसे शाकाहारी-मांसाहारी, आध्यात्म-विज्ञान, स्त्री-पुरुष, आरक्षण इत्यादी विषय ट्यार्पी विषय म्हणून ओळखले जातात. धागालेखकांचे पुर्वकर्म बघूनही धाग्याचा उद्देश हा ट्यार्पीचाच आहे असेही सुज्ञ मिपाकर ओळखून घेतात. दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 09:45 नवीन
काही लेख कितीही सुंदर, चर्चेस पोषक बीज देणारे असले तरी पब्लिक इग्नोर मारते असेही दिसून येते.
दुर्दैवाने लांडगा आला रे आला सारखे कधी कधी चांगले धागे ट्यार्पीच्या नादात बट्ट्याबोळ होऊन जातात.
तुमच्या "राष्ट्रपाव" या धाग्याच्या अनुभवावरून सांगताय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 10:07 नवीन
साहेब, मी माहितगार यांच्या धाग्यांबद्दल बोलतोय, असे अनेक आहेत. राष्ट्रपाव हा धागा तद्दन टाइमपाससाठी होता, ट्यार्पीसाठी नाही. जितके प्रतिसाद आले त्याबद्दल ना दुख ना आनंद. स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 03/05/2016 - 10:12 नवीन
मग ठीक आहे. तुम्ही सर्वत्र इतक्या पोटतिडीकीने आणि गांभिर्याने प्रतिसाद देता, त्यामुळे मला वाटलं की तो धागा सुद्द्धा तसाच असेल.
स्वतःच पाचशे प्रतिसाद टाकून धागे हजारी करण्याइतकं निर्ढावलेलं मन नाहीये माझ्याकडे.
पेला अर्धा रिकामा आहे का अर्धा भरलेला आहे हे ज्याच्यात्याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 03/05/2016 - 10:27 नवीन
धागा कुणी लिहलाय यावरुन मत बनवता काय? ओके ओके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आनन्दा Sat, 03/05/2016 - 15:29 नवीन
झाली माझी शेंच्युरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 15:42 नवीन
असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता.>> अचाट तर्क लावनार्‍यांचा फोलपणा दाखवला की ते मुद्दे असंबधितच वाटणार. देशविरोधी घोषणा आणि टॅक्सपेयरचा मुद्दा सुसंगत नाही. उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का? >> नाही. अजिबात वाटत नाही. कायद्याच्या पळवाटा वापरुन देशविरोधी कार्यवाया करणे पटण्यासारखे नाही. असो. शेवटी मी माझ्यातर्फे एक सांगतो. मिसळपाववर कुठलीही चर्चा एकतर्फी होऊ नये असे वाटते. समविचारींचा कळप बनवून भावनाशील उमाळेच काढायचे असतील तर तसे धाग्यावर स्पष्ट नमूद करावे. तिकडे फिरकणार नाही. देशभक्ती, देशद्रोह हा ब्लँकेट मुद्दा आहे, ज्यात कोणीच देशवासी असहमत असूच शकत नाही. पण त्याचा आधार घेऊन काहीही विधानं करणे योग्य नाही. मी असे म्हनत नाहीच की माझे बरोबर. माझ्या तर्कातल्याही चुका दाखवा, मलाही नवीन विचार मिळेल. पण इथे बोलू नका अशी अप्रत्यक्ष सुचवणी मिपाधोरणाशी सुंसंगत नाही. धाग्याचा विषय व प्रतिसाद धरुनच माझे प्रतिसाद आहेत. तसे नसतील तर अवांतर आणि अनावश्यक ते सर्व उडवण्याचे संपादकांना सर्व अधिकार आहेत. बाकी, डाव्यांच्या अतिघातक मतांशी मी सहमत नाही. म्हणून उजव्यांची तर्कहिन मतेही मान्य असतील असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे Wed, 02/24/2016 - 16:45 नवीन
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का? >> नाही. अजिबात वाटत नाही. कायद्याच्या पळवाटा वापरुन देशविरोधी कार्यवाया करणे पटण्यासारखे नाही.
Ok.you continue उर्वरित प्रतिसाद छान आहे.
अचाट तर्क लावनार्‍यांचा फोलपणा दाखवला की ते मुद्दे असंबधितच वाटणार.
या धाग्यात अचाट तर्क कोणी केलाय ते सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रदीप साळुंखे Wed, 02/24/2016 - 17:27 नवीन
या धाग्यात अचाट तर्क कोणी केलाय ते सांगा. 21:15 या वेळेपर्यत,पुढे कोणी केला तर माहित नाही उत्तर द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 17:40 नवीन
देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
आ
आनन्दा Wed, 02/24/2016 - 17:42 नवीन
जऊ द्या हो ते भंकस करत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
भ
भंकस बाबा Wed, 02/24/2016 - 18:00 नवीन
मी माझ्या संतापाला वाट करून देत आहे. तुम्ही पण तेच करत आहात. का तुम्ही शाहेनशहा सारखे रात्रि बाहेर पडून गाणी म्हणत दुर्जनांचा नाश करता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 18:23 नवीन
संतापाला वाट मोकळी कराच, पण चुकीची गृहितकं पसरवण्याला आवर घालणे महत्त्वाचे. आपल्या टॅक्सपेक्षा जास्त काही इथे महत्त्वाचे आहे. तुम्ही टॅक्स भरता म्हनून तुम्हाला अधिकार आहे हा समज चुकीचा. तुम्ही भारतीय आहात त्या न्यायाने संताप होणे योग्य. नको तिथे पैसा आणला तर इतर प्रश्न उभे राहतात. म्हणजे कसं की जे तुमच्या टॅक्सच्या पैशावर जगत नाहीत, उघड घोषणा देत नाहीत त्यांच्या देशविरोधी कारवायांना विरोध नाही असे काही होते का? नाही. पैसा कोणाचाही असो, भारताविरूद्ध कारस्थाने करणार्‍यांचा तेवढाच राग मला येतो. असो. ह्याबद्दल वेगळा धागा पाहिजे का? टॅक्सपेयरचा पैसा आणी देशद्रोह, विषय खरंच मोठा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा गुरुवार, 02/25/2016 - 05:00 नवीन
अगदी मोठ्यातला मोठा माणूस देखिल सरकारकडून असलेल्या सवलती ओरपतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 05:05 नवीन
कोणीही सरकारच्या दयेवर जगत नाही. असो. हा विषय आत थांबवतो. तुमच्या भावनांना पूर्ण पाठिंबा आहेच. टॅक्सवाला मुद्दा वगळून. त्याबद्दल नंतर कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/25/2016 - 03:25 नवीन
देशाविरुद्ध घोषणा देणे ज़रा अजुन जास्त खटकते जेव्हा हे विद्यार्थी असतात आणि त्याच देशाच्या फेकलेल्या तुकड्यावर जगत असतात. मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत

हा अचाट तर्क मला तरी वाटत नाही,इतरांनाही वाटत नसावा.

देशविरोधी घोषणा देण्यार्यांना ते कुत्रे म्हणत असतील तर म्हणू द्या ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 03:37 नवीन
मला यांना कुत्रे बोलण्याचा हक्क् आहे कारण मी टॅक्स नियमित भरतो.माझ्याच पैशानी ही कुत्री माजली आहेत >> मोठा विषय आहे प्रदिपसाहेब, इथे भावनाच बघायच्या असतील तर तर्क राहूदेत बाजुला. भावनांच्या प्रदर्शनाबद्दल कोणताही आक्षेप नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/25/2016 - 03:39 नवीन
. तुम्ही टॅक्स भरता म्हनून तुम्हाला अधिकार आहे हा समज चुकीचा.
देशद्रोह्यांना

कुत्रे

म्हणण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. त्यांना कुत्रे म्हणता तर मग भ्रष्टाच्यार्यांनाही कुत्रे म्हणा! हा तर्क

असंबंधित

आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
त
तर्राट जोकर गुरुवार, 02/25/2016 - 03:59 नवीन
कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/25/2016 - 04:42 नवीन
देशद्रोही आणि भ्रष्टाचारी यांना तुम्ही एकाच तराजूत तोलत आहात. त्यामुळे तुम्हाला तुमचा तर्क संबंधित वाटत असेल. मी देशद्रोही आणि भ्रष्टाचारी यांना एक तराजुत तोलत नाही,त्यामुळे मला तो तर्क असंबंधित वाटतो. . . . बाकि अपना अपना स्टाईल होता है| . . थांबतो आता धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आनन्दा गुरुवार, 02/25/2016 - 04:23 नवीन
कुत्रे हा शब्दच असंसदीय आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 02/25/2016 - 04:44 नवीन
होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
न
नाखु गुरुवार, 02/25/2016 - 05:04 नवीन
कुत्र्यांचा अवमान करण्याचा कुणालाही अधिकार नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
ट
ट्रेड मार्क Wed, 02/24/2016 - 19:49 नवीन
उघड उघड देशविरोधी घोषणा देणारे आणि गुपचूप चुना लावणारे यांच्यामध्ये तुम्हाला फरक वाटत नाही का? >> नाही. अजिबात वाटत नाही.
हे तुमचं मत फायनल असेल तर मग या न्यायाने सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून झोपडपट्टी बांधून फुकट वीज व पाणी वापरणारे, सरकारकडून झोपडीच्या बदल्यात पक्कं घर फुकटात पदरात पडून घेणारे आणि त्यावर कडी म्हणजे ते पक्कं घर भाड्याने देऊन स्वतः परत झोपडीत राहणारे पण देशद्रोहीच असावेत. तुम्ही तर तुमच्या या धाग्यात तर या सर्व गोष्टीचं समर्थन केलं आहे. असो. उगाच विषयांतर नको. बाकी १. १४ कोटींच्या कर्जमाफी (?) विषयी वेगळा प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 02/24/2016 - 19:54 नवीन
तुम्ही तो धागा प्रतिसादांसकट पूर्ण वाचला असता तर इथे तो विषय मांडलाच नसता. परत विषयांतर नको असेही म्हटलंय. मग उत्तर देऊ की नको?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
स
सुबोध खरे Wed, 02/24/2016 - 15:17 नवीन
असल्या विषयांच्या धाग्यावर तुम्ही असंबंधित मुद्दे काढून धागा हायजॅक करण्याचा प्रयत्न करता. सहमत
  • Log in or register to post comments
A
Anand More Wed, 02/24/2016 - 16:50 नवीन
कायद्याच्या दृष्टीने बघायला गेलं तर सरकारविरुद्ध बेकायदेशीर मार्गाने केलेले कुठलेही कृत्य मग त्यात घोषणा देखील आली, म्हणजे देशद्रोह असे मानले जाऊ शकते. पण पुढे न्यायालय असते आणि त्यात आपले कृत्य देशद्रोह नाही किंवा ते बेकायदेशीर मार्गाने केलेले नाही असा बचाव त्या व्यक्तीला करता येऊ शकतो.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 02/24/2016 - 17:30 नवीन
सरकारविरुद्ध की देशाविरूद्ध? माझ्यनव्हेसरकार म्हणजे संसद नव्हे.. संसद म्हणजे देश आहे का हे माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More
A
Anand More Wed, 02/24/2016 - 17:46 नवीन
मी कायद्याच्या दृष्टीने असा शब्दप्रयोग केला आहे. तेंव्हा याला भावनिक दृष्टीने बघू नका. आणि सरकार या शब्दाचा लोकशाहीतील अर्थ, सत्ताधारी पक्ष असा केला जातो. आता जास्त बोललो तर माझ्या लेखमालेचा एखादा भाग वेळेआधी इथेच जन्म घेईल. तस्मात थांबतो… :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा गुरुवार, 02/25/2016 - 03:04 नवीन
मी भावनेच्या भरात हा प्रश्न विचारला नाही. माझ्या दॄष्टीने भारताचा पंतप्रधान, भारतीय संसद आणि भारत हा देश या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उद्या मी जर माझा पंतप्रधान मूर्ख आहे असे म्हटले तर तो देशद्रोह ठरत नाही. संसदेत बसलेले सगळे मूर्ख आहेत असे म्हटले तरीही मी देशद्रोही नाही. खरे तर संसद हे प्रतिनिधिमंडल आहे, त्यामुळे प्रत्यक्ष संसदेचा अपमान कदाचित देशद्रोह ठरू शकतो, जसे संसदेवरचा हल्ल. पण मला माहित नाही. पण भारत या एंटिटीबद्दल अनुचित शब्द वापरणे कदाचित देशद्रोह होईल माझ्या मते, ते देखील विशिष्ट परिस्थितीत. असो - तुम्ही एक लेख लिहिणार आहात म्हटल्यावर प्रश्नच मिटला. इथे काही लिहू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Anand More
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 03/03/2016 - 05:49 नवीन
Breach of Privilege ठरू शकतो. आपल्या देशात संसद सर्वश्रेष्ठ नाही, घटना सर्वश्रेष्ठ आहे. त्या घटनेने लोकप्रतिनिधींना काही विशेषाधिकार दिलेले आहेत. त्यांचा भंग होतोय असं वाटलं तर त्या माणसाला संसदसदस्य बोलावून घेऊ शकतात आणि जाब विचारू शकतात. मला वाटतं यूपीएच्या पहिल्या कार्यकाळात भारताचे अमेरिकेतील राजदूत रोनन सेन यांना संसदसदस्यांबद्दल Why are they running around like headless chicken असा शेरा मारला म्हणून संसदेत स्पष्टीकरणासाठी बोलावण्यात आलं होतं. महाराष्ट्र विधानसभेत माजी राज्य निवडणूक आयुक्त नंदलाल यांना बोलावण्यात आलं होतं आणि सभागृहाचा अवमान म्हणून एक आठवड्याची कैदही देण्यात आली होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
ह
होबासराव गुरुवार, 02/25/2016 - 09:49 नवीन
कालचि बातमि पाहिलि का कोणि लातुरची, एका पोलिस असिस्टंट सब इन्स्पेक्टर ला ज्या तर्‍हेने पोलिस चौकितुन काढुन जमावाने मारहाण केलि, हि बातमि महाराष्ट्रातिल आहे ह्यावर विश्वासच बसत नव्हता. सगळ्या दोषिंना कडक शासन व्हायला हवे. झुंडशाहि मग ति कुठल्याहि पक्षाचि, धर्माचि असो निषेधार्हच असायला हवि.
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 03/02/2016 - 15:50 नवीन
वास्तवीक कन्हैय्या कुमार ने घोषणाच दिल्या नाहीत. त्या शिवाय कपिल सिब्बल सारखे दिग्गज वकील आणि सारी भारतीय जनता त्याच्या पाठीशी उभी असल्याने, सुप्रिम कोर्टात प्रयत्न करून झाला. सुप्रिम कोर्टाने सांगितले की उच्च न्यायालयात जा. आणि आज दिल्ली हायकोर्टाने बाइज्जत सोडण्याऐवजी जामिनावर सोडले.... ;) सारांश असा:
  1. आमच्या अशिलाने देशविरोधी घोषणा केल्या नव्हत्या असे कपिल सिब्बल यांचे मत होते तर पोलीसांचे मत आहे की आमच्याकडे पुरावा आहे.
  2. कोर्टाने वरकरणी तरी पुर्ण निर्दोष असल्याचे मान्य न करता खटला चालवायचे ठरवलेले दिसत आहे.
  3. त्याकाळात सहा महीन्यांसाठी रु. १०,००० जामिनावर सुटका.
  4. जे एन यु च्या किमान एका प्राध्यापकाला त्याच्या जामिनासंदर्भात जबाबदार रहावे लागणार आहे.
  5. कन्हैय्या पोलीसांच्या चौकशीला सहकार्य करेल.
  6. टाईम्स आणि एनडीटिव्ही च्या संस्थळावरील एक वाक्य खूपच रोचक आहे: "Mr Kumar had also distanced himself from Umar Khalid and Anirban Bhattacharya, the two other accused arrested in the case."
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 03/02/2016 - 15:54 नवीन
"Mr Kumar had also distanced himself from Umar Khalid and Anirban Bhattacharya, the two other accused arrested in the case." विकास, मला चांगले बुद्धिबळ नाहि खेळता येत, पण त्यात एक चाल असते जिथे घोडा चालुन येतो आणि तुमच्या समोर आव्हान असत एक तर वजिराचा बळि द्या नाहि तर हत्ति चा.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Wed, 03/02/2016 - 15:55 नवीन
म्हणण्या पेक्षा एक तर हत्ति वाचव नाहि तर वजिर...
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 03/02/2016 - 17:33 नवीन
सहमत होबासराव! कायद्याने त्यांना कायद्याच्या चौकटीत चाल खेळायचा हक्क दिला आहे. तो ते खेळत आहेत. पण त्यांची अथवा त्यांचा राजकीय प्याद्यासारखा उपयोग करवून घेणार्‍यांची राजकीय चाल चुकली होती असे स्पष्ट होत आहे. म्हणूनच, "मी नाही त्यातली.." म्हणायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा