छगन भुजबळांच्या निमित्ताने...
छगन भुजबळांच्या मागचा एसीबी सामेमीरा हटायचे काहि लक्षण दिसत नाहि. त्यांना आता कोर्टाने समन्स बजावला म्हणतात.
यामागे काय राजकारण असायचं ते असु दे. राज्यसरकार, बारामतीकर, भाजपा-काँग्रेसचे स्टेकहोल्डर्सचा या प्रकरणातला सहभाग पण वेगळा विषय आहे. मला प्रश्न पडलाय हे असे घोटाळे (झाले असतीलच तर) होतात तरी कसे.
सरकरी कंत्राटं मिळवायचे, त्यांचा निधी बनावट कंपन्यांकडे वळवायचा, तो परत लेजीटीमेट कंपन्यांना ट्रान्स्फर करायचा. या सगळ्या प्रकरणात नेमका पैसा कसा आणि कुठे मुरतो ? बनावट कंपन्या म्हणजे नेमकं काय तयार करतात हे लोकं ? कुठेतरी त्याचं रजीस्ट्रेशन होतच असणार ना ? लाचलुचपत शोधायला काय टेक्नीक वापरतात? साधं हौसींग लोन घेतो म्हटलं तर एल.आय.सी, एस.बी.आय हज्जारदा कागदपत्रं चेक करतात आपले. मग इतक्या मोठाल्या रकमांचे ट्रान्स्फर्स कुठेही ट्रेस न ठेवता, कुठेही तपासल्या न जाता होतातच कसे? नेमके काय लूपहोल्स असतात सिस्टीममधे जे या प्रकरणात प्रथमदर्शनी एक्स्प्लॉइट केल्या गेले ? आणि मुख्य म्हणजे, गोष्टी या थराला जात पर्यंत उजेडात येत कशा नाहित? आणि बरच काहि...
💬 प्रतिसाद
(103)
ब
बबन ताम्बे
गुरुवार, 03/17/2016 - 13:33
नवीन
स्टेट बँकेकडून २०११ साली घेतलेल्या फ्लेक्सी बाँडचे व्याज पाच वर्षांनी बँक अकाउंट मधे जमा झालेय. त्यावरही कर द्यावा लागणार आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 03/17/2016 - 14:36
नवीन
असं नाही. स्वत: शेती करून पैसे मिळवले तर कर नसतो.कोणाकडून करून घेण्याचा करार सापडला तर कर लागतो.
प्रचंड अनाकलनीय रक्कम सिद्ध करावी लागते.बियाणे कितीचे,खत कितीचे,वाहतूक करून कुठे विकले ,त्या दिवशी किती भाव होता,पेरले कधी आणि कापणी कधी केली,किती मजूर लागले वगैरे बिलं ,पावत्या मागितल्या तर दाखवाव्या लागतात.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 03/17/2016 - 14:27
नवीन
काही लोक श्रीमंत झाले तरी पैसे रिचवण्यात कच्चेच असतात.दीड शहाणे अकाउंटंट त्यांना सल्ले देतात कसा कर वाचवायचा ते.तर काहीवेळा दिडशहाणे श्रीमंत लोक चांगल्या प्रामाणिक सिएची सर्वीस घेऊन त्यालाच डुबवायला बघतात.मग तो सीए त्याला एका झटक्यात वठणीवर आणतो.वेळ आली की ------
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3