मोदींच्या काही चुका
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात.
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते.
असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती.
२. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते.
३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे.
४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते.
५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते.
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
डायरेक्टिव प्रिंसिपल्स ऑफ़ स्टेट पॉलिसी
दिली आहेत ती 3 तत्वांवर आधारित आहेत. 1 समाजवादी तत्वे 2 गांधियन तत्वे 3 लिबरल इंटेलेक्चुअल तत्वे गोहत्या बंदी ही आर्टिकल 48. च्या अंतर्गत येते , हे तत्व गांधियन तत्वांच्या अंतर्गत घटनेत समाविष्ट केले गेले आहे , आता मग कसे हो? गोहत्या बंदी झाल्याने तुम्हाला त्यात जे कायदेशीर दिसते आहे ते गांधियन तत्वांच्या अंतर्गत आहे, मग आता एक कबुल करा की 1 गांधी हे प्रचंड मोठे हिंदु समर्थक होते (हे तुमच्या राजकीय स्टैंड ला कमीपणा आणेल) किंवा 2 पुर्ण मसूदा समिती (ड्राफ्टिंग कमिटी) हुकलेली होती. गोहत्याबंदी बद्दल कलम 48 म्हणते "Organisation of agriculture and animal husbandry The State shall endeavour to organise agriculture and animal husbandry on modern and scientific lines and shall, in particular, take steps for preserving and improving the breeds, and prohibiting the slaughter, of cows and calves and other milch and draught cattle" ह्यात हिंदु धर्माचा संबंध कुठे आला? की आता म्हणता घटना समिति ला गाँधीवादी तत्वे अन हिन्दुत्वातला फरक कळत नव्हता?? कारण गांधी तर तुमच्यालेखी हिंदु विरोधी होते, नाही का? उगाच काय वाटेल ते बोलु नका दादा , धन्यवाद