बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI
त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे:
http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-changed-judges-thrice/
http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-pratap/
(हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )
जोक
आहे,हे मिपावरील कोणीही सुज्ञ मंडळी सांगू शकतील. मी कशाला काय सिद्ध करू,मिपावरील सूज्ञांना सर्व माहिती आहे. मोदी,संघ,भाजप यांना विरोध अवश्य करा,काहीही दुमत नाही,फक्त खोडसाळपणा सोडा एवढचं,अर्थात हे सांगणारा मी कोण?पण बघा एकंदरीत पटतयं का!!नाहितरी तुम्ही अभ्यासू असूनसुद्धा तुम्हाला कोणी सिरीयस घेणार नाही.३) अशा नृशंस हत्त्याकांडातल्या प्रमुख आरोपीला वाचवणारा सूत्रधार जर सर्वसत्ताधिश झाला असेल तर त्याची काय दहशत असेल याची नुसती कल्पना करा ! तुम्ही कधी खुनाच्या आरोपातून निर्दोष सुटून आलेले गुंड पाहिले असतील तर तुम्हाला कल्पना येईल की त्यांना विरोध सहनच होत नाही. ते केंव्हा आणि कसे सटकतील आणि कोणत्या थराला जातील काही सांगता येत नाही. अशा सर्वसत्ताधिशाचा मूळ हेतू फक्त सत्तालालसा असतो आणि ज्या कारणानं तो सत्तेवर विराजमान झाला त्या कारणासाठी तो आतून सदैव कार्यरत असतो. कारण एकदा सत्ता गेली की तो कायमचा गोत्यात येणार असतो.हा मुद्दा थोडा जास्त परिणामकारकरीत्या १९८४ च्या दंगलीला आणि काँग्रेसला लागू होतो.