बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल.
https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI
त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते.
ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे:
http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-changed-judges-thrice/
http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-pratap/
(हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )
सांगायचा मुद्दा असा की मोदींना दोषी समजणं सोडून द्या.या एका वाक्याने तुम्ही किती दुकाने एका फटक्यात बंद करत आहात ते लक्षात आले का..? ;)