Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

बाबु बजरंगी : वास्तविकतेशी प्रांजळपणाची सरळ भेट!

त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:12
🗣 116 प्रतिसाद
गुजरात दंगलीमधे केलेल्या नृशंस हत्याकांडाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा झालेला एक तरुण किती प्रांजळ असू शकतो. व्यवस्थेबद्दल कोणतीही भीडभाड न बाळगता मोकळेपणाने, विचारलेल्या वैविध्यपूर्ण प्रश्नांची किती सत्य उत्तरं देऊ शकतो याची कल्पना सदस्यांना या मुलाखतीवरुन येईल. https://www.youtube.com/embed/OFZBNUnG5pI त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या एकसंधतेबद्दल उत्सुकता म्हणून वर दिलेला इंटरव्यू बघितला आणि खरोखर थक्क झालो. त्याच्या वरचे चार्जेस न्यायालयात सिद्ध झाले असल्याने असल्यानं सध्या त्यावर काही भाष्य करता येणार नाही, पण या मुलाखतीतून एक सरळ, साधी, सुस्पष्ट आणि वेगळा विचार असणारी प्रामाणिक आणि निर्भय व्यक्ती समोर येते. ह्या मुलाखतीचे ट्रान्सस्क्रिप्ट इथे: http://www.tehelka.com/2007/11/to-get-me-out-on-bail-narendrabhai-changed-judges-thrice/ http://www.tehelka.com/2007/11/after-killing-them-i-felt-like-maharana-pratap/ (हे विडंबन नाही. प्रेरणा म्हणावी असे बरेच धागे आणि प्रतिसाद बघितलेत म्हणून हा धागा. आखिर हमारा भी अभिव्यक्ति स्वातंत्र्य है की नही? )

प्रतिक्रिया द्या
16014 वाचन

💬 प्रतिसाद (116)
प
पिलीयन रायडर Mon, 03/14/2016 - 13:41 नवीन
फार फार मनातुन अनुमोदन!! कंटाळा येत नाही का? सगळीकडे एकच एक विषय बोलुन बोलुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ब
बोका-ए-आझम Mon, 03/14/2016 - 17:25 नवीन
आजकाल मिपावर यायचाच कंटाळा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ब
बेकार तरुण Tue, 03/15/2016 - 02:53 नवीन
पहिल्या पानावर निम्मे धागे चिखलफेकीचेच असतात, आणी तेच जाणकार आणी तेच मुद्दे आणी त्याच मारामार्‍या ! ह्यासाठी वेगळे दालनच उघडुन दिले तर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गामा पैलवान Tue, 03/15/2016 - 07:45 नवीन
बेत, धुळवडीसाठी वेगळं मैदान आखून दिलं जात नाही. लोकांना सार्वजनिक ठिकाणीच ती खेळायला आवडते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेकार तरुण
प
पक्षी Tue, 03/15/2016 - 07:01 नवीन
अगदि सह्मत... आज काल फारच कंटाळा येतो या असल्या useless ani hopeless धाग्यांचा आणि प्रतिसादांचा तेच ते मोदि/कॉंग्रेस/ब्रिगेड/हिंदू/मुस्लिम/ब्राह्मण/.....(दादा/फुजी/नाना/हितेश/तजो). बाकीचे जाऊदे, पण मिपा वर अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट लेख लिहिणारे कशाला अश्या फालतू धाग्यांना footage देतात. असल्या काथ्याकुटातून कुठलच conclusion निघालेलं नाही आणि निघत नाही, पण चर्चा भलतीकडेच भटकते. असले धागे वाचून खुपचं negative वाटत.... ह्म्म्म.........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ज
जेपी Mon, 03/14/2016 - 15:29 नवीन
आगा 100 झाले की, त्यानिमीत्त सर्वांना 'बजरंगी भाईजान' चित्रपटाचे मॅटिनी पास* देऊन सत्कार करण्यात येत आहे.. -शुभच्छुक-जेपी आणी मॅटिनी शो प्रेमी कार्यकर्ते.. *पासच ब्लॅक करु नये..
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Mon, 03/14/2016 - 16:06 नवीन
खिक... तुम्ही नेमकं सावज टिपून ठेवता कि काय? 49,99 प्रतिसाद कि एकदम झडप घालून सत्कार करून रिकामे होता.:'( . . "वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
त
तर्राट जोकर Mon, 03/14/2016 - 16:26 नवीन
"वास्तविकतेशी प्रांजळपणाची भेट" पार्ट 4 कधी येणार काथ्याकूटक्यांनो?? >> आता कोणाचा नंबर? १९८४ बद्दल कोणाचा स्टिंग, मुलाखत आहे का? पार्ट ५ वाल्यांनी आणीबाणी तयार ठेवा. असे करत करत पार्ट ७८३४८९ हा १९ लाख वर्षांआधी रिवत (का रायवत?) इथं झालेल्या होमो सेपियन्सच्या आक्रमणाचाही असू देत. तेवढंच घासकडवी सरांना पुरक लेखमाला होईल आणि हेही कळेलः माणूस कधीच, कशानेच बदलत नाही. भांडणाची कारणे आणि मारामारीची साधने बदलतात. भांडण करण्याची खुमखुमी काही बदलत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
S
sagarpdy Mon, 03/14/2016 - 16:56 नवीन
परत एकदा, पुर्णपणे सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाखु Tue, 03/15/2016 - 04:54 नवीन
"आनंदा" यांच्या प्रतिसादासाठी हा धागा वाचनखूण केला आहे. बाकी इथले बरेच मिपाकर हे न्यायालयाच्या आणि संसदेच्या, घटनेच्याही,देशहिताच्या बरेच वर आहेत. आणि त्या बद्दल मिपाकरांनी अभिमान बाळगला पाहिजे (अमेरिका,इंग्लड इथेच मार खातात). स्वतंत्र धुळवड विभाग झालाच पाहिजे. नुरा कुस्तीला वैतागलेला नाखु
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 03/15/2016 - 12:58 नवीन
धन्यवाद. या विषयावर एक पूर्ण चर्चा घडवून आणायचा मानस आहे. जरा हा धुरळा बसला की पाहतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
त
तर्राट जोकर Tue, 03/15/2016 - 07:33 नवीन
बरेच लोक राजकिय चर्चांच्या नावाने बोटे मोडतात, मेगाबायटी प्रतिसादांबद्दल नाकं मुरडतात. त्यांना ते वाचल्याशिवाय समजत असेल काय? जर वाचण्याची आवड व गरज वाटते तर मग इथे अशा राजकिय चर्चा-प्रतिसादांबद्दल नाकं का मुरडतात? मला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Tue, 03/15/2016 - 07:51 नवीन
ला तर हा प्रकार म्हणजे कोंबड्यांच्या झुंजींची मजाही घ्यायची आणि मुक्या प्राण्यांवर अत्याचार म्हणून आरडओरडा करायचा, असा वाटतो. ;-)
अगदी अगदी.. मोदींना मध्ये आणून धुरळा उडवायचा आणि नंतर मोदींचा काय संबंध म्हणून आरडओरडा करायचा,असा वाटतो. http://www.misalpav.com/comment/816617#comment-816617
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Tue, 03/15/2016 - 07:55 नवीन
आणि वरून फोलपणा मान्य करायचा नाही ' ' श्री श्री हट्टयोगी बाबा प्रसन्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
प
पक्षी Tue, 03/15/2016 - 09:11 नवीन
तजो साहेबांचे प्रतिसाद नेहमीच अभ्यासपूर्ण आणि relevant असतात
  • Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन Tue, 03/15/2016 - 13:25 नवीन
हीच पध्दत असेल तर याला दोन बाजु आहेत. १. माजी पंतप्रधान कै. राजिव गांधी शिखांच्या हत्ये संदर्भात काय म्हणाले. २. त्या ह्त्याकांडाचे संशयीत आरोपी ज्यांच्यावर कधीच खटला चालला नाही यांचे काय म्हणणे आहे. ३. ह्या संदर्भात आणखी काही
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा