आयडी = ?
इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला
दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्याने इमॅजिन करतो.
हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत:
श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी,
एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण.
(वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;)
तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ?
होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
💬 प्रतिसाद
(147)
म
मधुरा देशपांडे
Wed, 03/16/2016 - 10:25
नवीन
तुमचे धागे मी वाचतच नाही असं अजिबात नाही. मध्यंतरी बर्याच कामात व्यस्त होते, त्यामुळे कदाचित काही वाचले नसतील आणि वाचले तिथेही प्रतिसाद दिले नाहीत किंवा द्यायला जमले नाही. तुमची बॅनर्स आवडली तेव्हा कौतुकही केलंच, आता नाही पटला एखादा धागा तर तसं लिहिलं. आणि याआधीही तुमच्या धाग्यांवर जमेल तसे, वेळ असेल तेव्हा आणि प्रामाणिकपणे वाटले ते लिहिलेच आहे. मौजमजा वाल्या धाग्यांचा प्रॉब्लेम नाही मला, विडंबनांचा पण नाही. हे सगळे मिपाचेच भाग आहेत. पण सतत तेच तेच होतंय असं वाटलं. असेच धागे सतत सुरू राहिले की मग पुढे प्रतिसादातून मात्र बरेचदा लेव्हल घसरत जाते. (हे पुन्हा तुम्हाला एकटीला नाही, जनरल बोलतेय) अनेक आयडी, डु आयडी सतत तेच धागे वर येत राहतात. आधीच राजकारण वगैरे धाग्यांवर धुळवड चालू आहे, त्यात फक्त मौजमजा म्हणून असे धागे काढायचे आणि तेही खफ वर तुम्हीच याबाबत बोलला आहात बरेचदा म्हणून जास्त जाणवले. मग इतर धुळवडीला तरी कशाला बोलायचे.
मृणाल कुलकर्णीशी तुलना वगैरेचा राग अजिबातच आला नाही, ते ह. घेण्याइतपत मिपावर रुळलेली आहे. आता त्या तुलनेने हसू आले यात काय चूक?
असो, अजून वाद वाढवायचे नाहीयेत. त्यामुळे लेखनसीमा.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 03/15/2016 - 14:55
नवीन
ह्म्म !!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 03/15/2016 - 15:11
नवीन
काय हे ?? बाकीच्या रणधुमाळीत बदल म्हणून असे खेळीमेळीचे निव्वळ करमणुकीसाठी धागे लिहिते मी,
त्यात कसलाही खोडसाळपणा फालतूपणा नाही.
वर काही लोकांनी वेडेवाकडे प्रतिसाद दिलेत, असे लोक आणि प्रतिसाद मलाही नकोत माझ्या धाग्यावर, पण त्यासाठी
धाग्याला वाईट म्हणायचं प्रयोजन समजत नाही.
गंभीर लिहिले तरी प्रॉब्लेम, गंमतीशीर हलकेफुलके लिहिले तरी प्रॉब्लेम, का मुळात प्रॉब्लेमच वेगळा आहे..
To write or not to write....
असो, संमं धागा उडवला तरी चालेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 15:16
नवीन
बिनधास्त लिहा.
याच्याशी सहमत. कधीकधी लोक्स १०० कपडे असूनही काय घालू याची टोटल न लागणाऱ्या माणसांसारखे वागतात. सोडून द्या. त्यांची नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 03/15/2016 - 15:27
नवीन
हाहाहाहा
भारी आयड्या.
एक अॅडीषन. आपणच असल्या माणसाच्या पतंगाच्या मांजाला फुल्ल ढील द्यायची आधी. मग आपणच हळूच मांजा काटायचा. ट्रीपल मज्जा.
टाइमपास झाला, मांजा काटल्याचे सुख, गेला उडत म्हणायला मोकळे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 15:31
नवीन
बाय डिफाॅल्ट सहमत!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/15/2016 - 15:32
नवीन
बिनधास्त लिहा. नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा !
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 03/15/2016 - 15:38
नवीन
हे करताना म्हणायला गाणे आहेच.
.
अन बाई मी पतंग उडवित होते.
अहाहाहाहा. लाखात अशी देखणी जयश्री गडकर आन आशा भोसले. (एखांदी आयडी साधी मानसं वाली जयश्री गडकर सारखी नाही का?)
होउ द्या शिट्ट्या.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 15:44
नवीन
'साधी माणसंमधली जयश्री गडकर' असा आयडी घेतला तर संंमं मान्य करेल का ब्रे? काय म्हणता प्राडाॅ?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/15/2016 - 15:53
नवीन
आपली कै हरकत नै. पण तुम्ही नै आयडी घ्यायचा. बोका ए आझम ही प्रतिमाच आमच्या मनामधे घट्ट होऊ द्या.
आपली प्रतिमा म्हणजे आपण रविंद्र महाजनी. शांत, गंभीर, शक्यतो विचार करुन बोलणे, वगैरे इत्यादी. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 15:57
नवीन
मी हे बायकोला दाखवलं आत्ता. तिला हसणं आवरत नाहीये. शांत, गंभीर, विचार करून - सहन होत नाहीये तिला!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/15/2016 - 16:02
नवीन
हाहा. हसमुख, मिश्किल आणि राजा माणुस तर नक्की आहात, हे तरी वहिनी मान्य करा. :(
( कौतुक करतोय तुमचं. भेटल्यावर मित्रांचा पेयपानाचा बंदोबस्त करा.)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/15/2016 - 16:21
नवीन
कधीही या!
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 03/15/2016 - 16:27
नवीन
होलि ! कब है होलि ? कब ? कब?
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 03/15/2016 - 20:21
नवीन
24 मार्च ला आहे म्हणतात.
आठ दिवस आधी बोंबा मारु शकतात लोक
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 09:52
नवीन
सपोर्ट साठी मन:पूर्वक धन्यवाद,
'त्यांची नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा!'
:)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 03/15/2016 - 15:19
नवीन
485 वाचनं झाली की हो निमोताई, एंजॉय माडी!
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Tue, 03/15/2016 - 15:38
नवीन
माडी नाय ब्वॉ एंजॉय केली कधि!! ;)
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 03/15/2016 - 15:57
नवीन
ओ दादा, कानडी बोलतेय ना. प्यायची माडी नव्हे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 03/16/2016 - 07:37
नवीन
प्यायची नव्हे तर पायर्या असणारी( उंच नेणारी) "माडी"
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Wed, 03/16/2016 - 10:20
नवीन
एकदमच चूक डॉ. निमोताई, एन्जॉय करा, असा अर्थ आहे बरं.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 03/15/2016 - 15:30
नवीन
निमो धागा आवडला. मस्तय. खरं तर मला आयडीवरुन बरेच चित्र रंगवावी वाटली पण मिपाकरांचे प्रतिसाद वाचण्यातच मला हल्ली मजा येते.
निमो आपला धागा मौजमजेच्या खालील परंपरेतील धागा आहे. उदाहरण द्याययचं तर मिपाकरांनो तुमचे वय काय, मनोक्रमी मिपाकर, बालपणीचे मिसळप्रेमी असे अनेक धागे हे पुरुषांनी काढलेले आहेत. आज पहिल्यांदा एक महिलेने बिंधास्तपणे आयडी वरुन काही कल्पना रंगवली आहे एक वाचक मिपाकर म्हणुन धागा आवड्ला.
निमो लिखते रहो. आपण मिपाच्या मुख्य बोर्डावर नेहमीच धागे रंगवत असतात लिहित राहा. बाकी, उपेंद्र लिमयेत आणि आमच्यात काही साम्य लोकांना आढळतात. बाकी, टॉलीवूडचा हिरो तर आहेच आहे. बाकी, लेखनासाठी शुभेच्छा. ;)
-दिलीप बिरुटे
(मिपास्टार)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 03/15/2016 - 16:00
नवीन
का सर,
आम्ही केलेले टीशर्ट इसरलाव का?
असला गोंधळ नको म्हणून तर पुढचा लॉट कॅन्सल केला. ;)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 08:54
नवीन
आपण नेहमीच प्रोत्साहन देत असता त्यासाठी धन्यवाद.
तुम्ही वर काही धाग्यांचे उल्लेख केलेत तसाच काहीसा धागा अपेक्षित होता, आणि हाच धागा इतर कोणी काढला असता तर किमान द्विशतकी झाला असता हेही नक्की. असो, चालायचे.
बाकी शरद पोंक्षे आणि तुमच्यातही काही साम्य आढळतात.
(आता मात्र पळा.. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/16/2016 - 09:27
नवीन
>>>>> बाकी शरद पोंक्षे आणि तुमच्यातही काही साम्य आढळतात
:( आजपासून प्रोत्साहन प्रतिसाद भत्ता बंद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 09:45
नवीन
बाकी सगळ्यांचे जाऊ दे, तुम्हाला तुम्ही स्वतः कोणासारखे वाटता?
'खरं तर मला आयडीवरुन बरेच चित्र रंगवावी वाटली पण मिपाकरांचे प्रतिसाद वाचण्यातच मला हल्ली मजा येते.'
- रंगवा की चित्रं, ते प्रतिसादांचे पतंग उडविण्यची शिकवण तुमचीच न..
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 03/15/2016 - 15:34
नवीन
मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे असाच विचार का यावा? कायम तू लिहिते त्याला चांगलंच म्हणत राहावे अशी अपेक्षा आहे का?
आपण कोलित द्यायचे आणि नंतर वंडरिंग व्हाय मुद्रेत जायचे हेही चुकीचेच आहे.अशा धाग्यावर काय प्रतिसाद अपेक्षित होते?
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 03/15/2016 - 15:41
नवीन
च्च च्च
असे कडु बोलवते तरी कसे?
गोगोड धागा
-
लालरंग गोडबोले
- Log in or register to post comments
य
यशोधरा
Tue, 03/15/2016 - 15:59
नवीन
स्पावड्या, आज वेळ आहे वाटते! =))
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 03/15/2016 - 16:03
नवीन
तेच की कित्ती काळीज पिळवटणारं आणि कटु लिहीलंय बघ की!!
गोग्गोड लिहायचं आणि चार लोकं लिहीत असतील त्याच्या नेमकं उलट लिहायचं, पण ते चितळे यांच्या साजूक तुपात तळून मग पाकात घोळलेलं असलं पाहिजे.
-सुरंग उडविले. ;)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 08:07
नवीन
मुळात प्राॅब्लेम वेगळा आहे असाच विचार का यावा?
- गरज नसतांना, कारण नसतांना तिरकस प्रतिसाद येत असल्यावर असा विचार मनात आला तर काय चुकलं.
काही कंपूतील लोक माझ्या धाग्यांवर प्रतिसाद देत नाहीत हे माझ्या लक्षात येत नसेल असे तुम्हाला वाटते का ?
अर्थात त्याने मला काही फरक पडतो असे मुळीच नाही. माझ्या धाग्यांवर निवडक लोक चांगले प्रतिसाद देतात,
(या लोकांत तुम्हीही आहात) कधी कुठे न लिहीणारेही माझ्या धाग्यांवर आवर्जून प्रतिसाद देऊन जातात याचे मला कायमच अप्रूप वाटते, किंबहुना तीच माझे इथे लिहीत राहण्यामागची प्रेरणा आहे.
कायम तू लिहिते त्याला चांगलंच म्हणत राहावे अशी अपेक्षा आहे का?
- अशी अपेक्षा करण्याइतकी मूर्ख वा स्वकेंद्रीत मी नाही.
आपण कोलित द्यायचे आणि नंतर वंडरिंग व्हाय मुद्रेत जायचे हेही चुकीचेच आहे.
- तुम्हाला कोलीत दिसले, काहींना निखळ टाईमपास दिसला, ज्याची त्याची दृष्टी.
तुमच्या मनात माझ्याविषयी असा विचार आला म्हणजे तुम्ही अजून मला ओळखलेच नाही, हे अर्थात माझे दुर्दैव.
अशा धाग्यावर काय प्रतिसाद अपेक्षित होते?
-पहिलेच दोन प्रतिसाद धाग्याला अपेक्षित उत्तरे देणारे होते. त्यानंतरही अनेकांचे जसे, मराठी कथलेखक, भाऊंचे भाऊ, मितभाषी, जेपी, श्री गावसेना प्रमुख, जव्हेरगंज इ.चे प्रतिसाद धाग्याला पूरक होते.
कदाचित ह्यां लोकांनी कुठलाही चष्मा न लावता पाहिले असावे त्यामुळे त्यांना कोलीत वगैरे न दिसता साधेसरळ प्रश्न दिसले ज्यांची त्यांनी तशीच उत्तरे दिली.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 09:35
नवीन
-ज्यांना खटकले ते चष्माच लावून वाचतात आणि चांगले म्हणाले ते बिनचष्म्याचे का?हेही एक अॅझम्प्शनच नाही का?
-
याबाबतीत सहमत आहेच.दरवेळी अनाहिता अंकाला अगदी हाच अनुभव घेतो आम्ही.काही लोक तर कसे खोड्या काढता येतील हेच बघायला येतात! आम्ही आता अशांसाठी 'गच्छ सुकर भद्रं ते' ही पाॅलिसी वापरतो.ट्राय करायला हरकत नाही.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 10:17
नवीन
-ज्यांना खटकले ते चष्माच लावून वाचतात आणि चांगले म्हणाले ते बिनचष्म्याचे का?हेही एक अॅझम्प्शनच नाही का?
- असे होऊ शकते ना, म्हणून तर 'बी पॉझिटिव्ह' 'बी पॉझिटिव्ह' हा मंत्र जपण्याची हल्ली फार गरज पडते ;)
आधी मी जे आवडेल त्या सर्व धाग्यांवर प्रतिसाद द्यायचे, नंतर कळत गेलं आपण सगळ्यांना प्रतिसाद देतो मात्र ते viceversa होत नाही, काय लिहीलेय पेक्षा कोणी लिहीलेय पाहून सिलेक्टीव्हली प्रतिसाद येतात, म्हणजे आपण किती
मोठे ...... बनतोय, मग आता जशाला तसे धोरण स्वीकारते आहे तरी अर्थात जिथे द्यायचे तिथे प्रतिसाद देतेच.
अनाहितांबद्दल काही बोलणे म्हणजे वादाला निमंत्रण, पण मी म्हटले तसे एक हाथ दो एक हाथ लो ही जगाची रीत आहे. त्यांच्याकडून निवडक लोकांना, लेखांना प्रतिसाद देणे इ.होत असेल तर त्यांच्यासोबतही तसे होऊ शकते.
'गच्छ सुकर भद्रं ते' म्हणजे काय सांगा, ट्राय करायला बरं :)
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 10:43
नवीन
एकदा अनुभव घेतला की कोणीतरी तुम्हाला मुद्दाम टार्गेट करुन खोड्या काढतंय,कोणाच्या तरी सांगण्यावरून बरळतय तरच अनाहिताकडून असे दिसून येईल.आणि या प्रकाराला सुरुवात कोणी केली हेदेखील दाखवायला मिपावरचे धागे साक्ष आहेत आणि अनाहिताचे अंक देखील.कोण कुठे प्रतिसाद देतात दिसून येईलच.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 03/15/2016 - 15:53
नवीन
बिनधास्त लिहा. नावं पतंगावर लिहा आणि गेले उडत म्हणून आनंद व्यक्त करा !
+1000000000
हेच म्हणतो !!
लय वैताग देतात राव हि मंडळी !
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 03/15/2016 - 16:07
नवीन
विदागाराच्या माहितीप्रमाणे नीलमोहर यांच्य एकूण २१ धागे आहेत.पैकी दोन दिवाळी अंकासाठी. एक शशक. राहिले १८. त्यात ९ धागे म्हणजे ५०% मिपासंबंधी आहेत. याबद्दल नीलमोहर यांना मिपाभूषण पुरस्कार लकडी पुलावर देण्यात येईल. बहुधा नीलकांतचेही मिपाचे काय होणार, मिपावरचे आयडी/डुप्लिकेट आयडी याबद्दल इतके धागे ९ वर्षात झाले नसावेत.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 07:33
नवीन
माझ्याा लेखनाचं विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद :)
२१ पैकी ९ म्हणजे साधारण ४० % धागे मिपाविषयी आहेत, यावरूनही माझं मिपा प्रेम सिध्द होत नसेल तर अजून कशानेच ते होणार नाही.
कोणी 'मिपामुक्ती केंद्र' अथवा 'मिपाहॉलिक्स अॅनॉनिमस' काढणार असेल तर डाऊन पेमेंटने पूर्ण फी भरून
पहिले सदस्यत्व घेण्यास मी तयार आहे.
बाकी पुरस्कार साभार परत.. जो मिल रहा है काफी है..
- Log in or register to post comments
म
मास्टरमाईन्ड
Wed, 03/16/2016 - 10:12
नवीन
हसून मेलो.
ऑफिसमधले इतर सहकारी माझ्यासाठी बहुतेक "येरवड्यात" बुकिंग करावं की नको या आविर्भावात पाहात आहेत.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Tue, 03/15/2016 - 20:19
नवीन
लेख वाचला.
नीमो काकींचे रडार वर आल्याबद्दल अभिनंदन करतो.
ललिता पवार, दुर्गा खोटे, रिमा, रोहिणी हट्टंगडी या अशा नायिका आहेत ज्या खरोखर तशा खाष्ट वगैरे नसताना तसं वागण्याचा उत्तम अभिनय करतात.
- फुंकर मारुदे
आणि ए अभ्या.. प्यान्ट सांभाळून हुबा ऱ्हा बे. उगा फ्लेक्स गुंडाळून बसायला लागायचं. ;)
- Log in or register to post comments
भ
भाते
Wed, 03/16/2016 - 09:19
नवीन
मिपावर असे मोजकेच हलकेफुलके धागे वाचायला वाचायला मिळतात म्हणुन मिपा सोडवत नाही.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 09:59
नवीन
आंटी ब्रिगेड आज नाराज झालेले दिसते.
-बॅरन व्हॉन गॉथम.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 03/16/2016 - 10:44
नवीन
"आंटी ब्रिगेड"चा आणि आम्चा काही संबंध नाही
-सेनोरिता
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 03/16/2016 - 11:02
नवीन
जाऊ दे ना ब्याट्या. कशाला हात दाखवून अवलक्षण करुन घेतोयेस!!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 11:47
नवीन
अबे जाऊ देतोच आहे बे. एक कमेंट नोंदवली फक्त, तीही आता ब्रिगेडच्या नजरेस पडल्यावर उडवतील यात शंका नाही.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 11:55
नवीन
वरी नाॅट भाचा ब्रिगेड!
वर लिहिलीये बघ पाॅलिसी.अर्थ हवाच आहे नीमोला ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 12:03
नवीन
फक्त वयामुळे आंटी म्हणतोय बरंका. नपेक्षा काय म्हणू? काकू?
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 12:13
नवीन
काकू म्हंटलंस तर मला तिच पोस्ट पुतण्या करावी लागेल.कशाला फुकटचे अवांतर.
नीमो छान काहीतरी घेऊन ये नेहमीसारखं!I am never shy of words to appreciate anybody!! आता तुझ्या या धाग्यावर येणे नाही.फाटे फुटायला लागले!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 12:18
नवीन
लयच बॉ तुम्ही. काही झालं की नात्याचं शेपूट जोडू लागले.
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 12:42
नवीन
लय आहोतच आम्ही.आंटी काकू आमच्यात नातीच म्हणतात.तुम्ही जे शेपुट जोडलं ना त्याचं एक्स्टेन्शनच आहे ते!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 12:47
नवीन
शब्द वापरला की नातं झालं हा अच्रतपणा त्या कोनाड्यात चालत असेल, बाहेर चालत नाही.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »