आयडी = ?
इथे मिपावरील काही सदस्यांना आपण चेहर्याने ओळखतो, काहींना नाही. प्रत्येक आयडीच्या येथील वावरावरून, प्रतिसादांतून, लेखनातून त्या व्यक्तिची एक प्रतिमा आपल्या मनात तयार झालेली असते. कधी कधी त्या प्रतिमेला
दृश्य रूप देण्यासाठी आपण एखाद्या ज्ञात व्यक्तिचा चेहरा त्या आयडीला लावून त्याला त्या चेहर्याने इमॅजिन करतो.
हा चेहरा कोणत्याही क्षेत्रातील असू शकतो, इथे फक्त उदाहरणादाखल चित्रपट सृष्टीतील नावे दिली आहेत:
श्रीरंग जोशी = अमोल पालेकर, स्नेहांकिता = रिमा लागू, जेपी = आमिर खान, मधुरा देशपांडे = मृणाल कुलकर्णी,
एस = माधवन, डिबी = मामूट्टी/ रजनीकांत, टका = रणवीर सिंग, अभ्या = वरूण धवन + अजय देवगण.
(वरील लोकांनी हलकेच घ्यावे ही विनम्र धमकी ;)
तर तुम्ही कोणत्या आयडीसाठी कोणता चेहरा इमॅजिन करता/ करू शकाल ?
होऊदे (बँडविड्थ) खर्च, मिपा आपल्याच घरचं :)
💬 प्रतिसाद
(147)
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 13:06
नवीन
तुम्हांला काय वाटतं याचं कोनाड्याला देणंघेणं नाही. कोणाला उगाच काहीही संबोधणे यालाच आम्ही अच्र्त्पणा म्हणतो!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 13:14
नवीन
द फीलिंग इज़ म्युच्युअल. हा चिकटपणा तिथेच राहिलेला बरा.
स्वतःच स्वतःचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल धन्यवाद. =))
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 13:21
नवीन
आईये आगे सुनते हैं 'आपकी फरमाईश' कार्यक्रम में सब लोगों की पसंद पर एक बेहतरीन गीतः
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 13:23
नवीन
गाने का नामः
ओम शांति ओम..
शांति शांति ओम..
- Log in or register to post comments
अ
अजया
Wed, 03/16/2016 - 13:32
नवीन
सुरुवात कोणी केली संशोधन जरुर करा.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 03/19/2016 - 08:05
नवीन
इतक्यातच आग विझली??? छ्या...पूर्वीचं मिपा राहीलं नाही अता
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 12:31
नवीन
छान काहीतरी घेऊन ये नेहमीसारखं!
- काय बिशाद माझी..
आ ता मा झ्या त ता क द ना ही ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/16/2016 - 11:29
नवीन
तुझसे नाराज नहीं जिंदगी, हैरान हु मै. ओ हैरान हु मै.
तेरे मासूम सवालोसे परेशान हू मै, ओ परेशान हु मै. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 11:49
नवीन
गाणं म्हणत नाही, ऐकत आहे - मन आणि मेंदू दोन्हीही क्लिअर, टोटल मनःशांति :)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/16/2016 - 12:02
नवीन
आत्ता त्या दुसर्या सरांना मात्र मिस करत आहे, त्यांना सांगता आले असते की जेव्हा मनात विचारांचा गोंधळ असतो अशा वेळेस तो कोलाहल मिटवण्यासाठी आम्ही 'मैं खुदा' ऐकत नाही, असे संगीत ऐकतो ;)
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Wed, 03/16/2016 - 12:04
नवीन
त्या निराकार गाढवाला कोणीतरी बोलवा रे. लय मिसतोय त्याला.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 03/16/2016 - 14:11
नवीन
यानिमीत्त सत्कार समितीची ओळख..
--
नाखु काका -देवेंद्र फडणवीस (विरोधी नामोहरम)
पैसाताय - स्म्रुती इराणी(रोखठोक),
टवाळ कार्टा -धनंजय मुंडे(कायम विरोधी बाकडा नशिबात),
जेपी-राहुल गांधी(अत्यंत बालीश)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/17/2016 - 08:06
नवीन
१० महिन्यांनंतर, २१ धाग्यांनंतर सत्कार शब्द ऐकला म्हणून मोठ्या आशेने काम सोडून धावत आले तर इथे काहीच नाही.. सत्काराला बोलवतात आणि करतच नाहीत :(
तुमच्याकडे पोगो चॅनलच दिसणार नाही, बसा शोधत.. छोटा भीम :p
- Log in or register to post comments
इ
इरसाल
गुरुवार, 03/17/2016 - 10:16
नवीन
जेपी-राहुल गांधी(अत्यंत बालीश).......
काय हे ????????????
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
गुरुवार, 03/17/2016 - 11:07
नवीन
माज्याविषयी बोला ना कुणीतरी!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/17/2016 - 12:23
नवीन
मास्कशिवायचा तुमचा चेहरा इमॅजिन करता येईना.. काढताय का मास्क ?
नाहीतर तुम्हीच सांगा तुम्ही कोण :)
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Fri, 03/18/2016 - 03:14
नवीन
अहो मास्क लावतच नाही हल्ली!
आमची फिल्म हिट झाल्यामुळे बिनामास्कचे उनाडत असतो!
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Fri, 03/18/2016 - 04:04
नवीन
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/17/2016 - 12:27
नवीन
नीलमोहर = स्मिता पाटील
वल्ली =
गवि =
यशोधरा =
स्वाती दिनेश =
बयाटमन =
बिका =
स्नेहान्किता =
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/17/2016 - 16:42
नवीन
स्मिता पाटील ?? लाजवताय की बकरा बनवताय सर, राजहंस आणि बदकाची तुलना होते का कधी? (तेही डाएटवर असलेलं बारीक बदक) समजायला मी मारे स्वतःला तब्बूसारखी बुद्धिमान, मितभाषी, गूढ वगैरे समजते, पण नंतर आरशात स्वतःचा गबाळा काकूबाई अवतार पाहून मग... असोच, तिच्या करंगळीच्या कोपऱ्यातील नेलपेंटच्या कणाचीही कोणाला सर नाही.
वल्ली - टेडी बेअर (कोण रे म्हटलं ते ;)
गवि -?
यशोधरा - काजोल
स्वाती दिनेश = ?
बयाटमन = इरफान खान
बिका = गिरीश ओक
स्नेहान्किता = का रे दुरावा, एका लग्नाची गोष्ट मधील इला भाटे
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
गुरुवार, 03/17/2016 - 12:27
नवीन
फास्टर फेणे वाटतो
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/17/2016 - 13:06
नवीन
आता मी आपल्या मिपावरील वावराचा अभ्यास केला. मनातल्या मनात एक विदा तयार केला आणि त्याचं विश्लेषण केलं तेव्हा लक्षात आलं की आता आपण थांबलं पाहिजे, आपण थांबत नसाल तर आपल्याला थांबवलं पाहिजे, चिमण्यांच्या शाळेतून आपलं नाव काढून टाकलं पाहिजे असं काहीसा एक विचार मनात आला. आणि माझ्या संशोधनाचा निष्कर्ष असा आहे की -
आता आपण काही गंभीर लिहावं म्हणजे डोळ्यात पाणी बीनी आलं पाहिजे. आपल्या लेखाची आठवण आली की महिलांनी (मिपावरच्या नै रे भो) डोळ्याला पदर बिदर लावून स्फुंदून स्फुंदून रडल्या पाहिजे, पुरुषांनी हाफिसात रुमाल काढून, शेतावरील लोकांनी उपरण्याने, शाळेतील मुलांनी रुमालांनी डोळे पुसले पाहिजेत. आपल्याकडे लेखन करण्याची क्षमता आहे, अजून काय म्हणु, हं सर्जनशीलता आहे, अजून काय म्हणु हं, शब्द संग्रह आहे, अजून काय म्हणू बरं, हं कल्पकता आहे, आणि मुख्य म्हणजे मिपावर मुख्य खेळाडु प्रमाणे फटकेबाजी करण्याची क्षमता आहे, म्हणजे तुम्ही विराट कोहली वगैरे आहात.
(खुप कौतुक केलंय हं, माझा एखादा धागा आला की, प्रा.डॉ. काय भारी लिहिता, वगैरे असा मोठा प्रतिसाद लिहायचा)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सस्नेह
गुरुवार, 03/17/2016 - 16:06
नवीन
आमची हीपण तक्रार आहे की प्राडाॅ हुच्च केपेसिटी असूनसुद्धा लेखनात वापरत नाहीत :)
न्हेमी काय नुसत्या रनाच काढायच्या ? कधीतरी क्लासिकपण खेळ दाखवावा !
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/17/2016 - 16:39
नवीन
आम्ही जातो अमुच्या गावा आमचा राम राम घ्यावा.
ज़रा मिपा इंजॉय करू देत नै ही म्हातारी माणसं. :(
छ्या. मीपा सोडलं आजपासून. आता फक्त वाचनमात्र. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
स्पा
गुरुवार, 03/17/2016 - 16:46
नवीन
चला सुटले सगळे
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/17/2016 - 16:16
नवीन
आता या प्रतिसादाचा पूर्वार्ध सहज सोप्या मराठीत सांगा हि विनंती, चिमण्यांची शाळा काय, काही कळाले नाही :(
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
गुरुवार, 03/17/2016 - 14:03
नवीन
मला तर तऱ्हाट जोकर हे सिंहासन मधले दिगु टिपणीस (निळू फुले)वाटतात ,राजकारणामुळे हताश झालेले व सत्ताधारी आणि विरोधी दोघांकडून निराश झालेले।
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 03/17/2016 - 14:20
नवीन
रामदास काका
आणिप्रभू मास्तरांबद्दल काय ल्यायचे.
- Log in or register to post comments
ब
बेकार तरुण
Fri, 03/18/2016 - 04:33
नवीन
क्रिकेटच्या भाषेत - रामदास = डॉन ब्रॅडमन किंवा व्हिव रिचर्ड्स
बाकीचे फक्त रन्स करतात, हे सामने गाजवतात !!
- Log in or register to post comments
म
मी-सौरभ
Fri, 03/18/2016 - 22:07
नवीन
खालील पात्रान साठी आप आपल्या आवडी प्रमाणे आय डी जुळवा
दशरथ राजा :
कैकयी:
मंथरा:
कौसल्या:
सुमित्रा:
राम : बॅटमॅन
लक्ष्मण: टका
शत्रुघ्न: क मु
भरत:
सध्या इतकेच
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 03/18/2016 - 23:09
नवीन
ब्यॅट्या आणि राम????...गोकुळ आणेल तो रामायणात =))
भरतः चिमण
दशरथ राजा :
कैकयी:
मंथरा:
कौसल्या:
सुमित्रा:
यांच्याबाबत स्फोटक दारुगोळा तयार आहे ;)
जाताजाता शुर्पणखा, अशोकवनातल्या दासी, इंद्रजीत, रा-वण यांना पण घ्या
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 03/19/2016 - 04:26
नवीन
मी भरत?
नायबा.केअरटेकर राजा नायबा मी. बॅट्या राम? अयायायागं!!!!
रच्याकने= रावण "अण्णांना" विसरलास कै?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 03/19/2016 - 08:04
नवीन
तु भरत म्हणूनच योग्य आहेस...पद आहे पावर नाय =))
अण्णा रामायणात सूट नाय होत...नैतर नवीन रामायण लिही :)
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 03/20/2016 - 08:48
नवीन
स्पा उर्फ पांडू उर्फ पां डुब्बा! = मोहन गोखले! =))
.................................
..
- Log in or register to post comments
म
मितभाषी
Sun, 03/20/2016 - 09:46
नवीन
सहीच.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 03/20/2016 - 10:11
नवीन
या अभिनेत्याविषयी कुणाला काही विशेष माहिती आहे का?
जालावर शुभांगी गोखलेंचे पती यापलिकडे विशेष माहिती मिळत नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 10:18
नवीन
मोहन गोखले जबराट कलाकार. लवकर गेला.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 03/20/2016 - 11:16
नवीन
असं काय करता सगासर!! :(
हे मोहन चंद्रकांत गोखले! मराठीतील दिवंगत अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे पुत्र व सध्याचे मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांचे मोठे बंधू. यांचे "सूर्याची पिल्ले" हे नाटक यूट्यूबवर उपलब्ध आहे!
ती जुनी अतिप्रसिद्ध "अरे ये पीएसपीओ नही जानता" जाहिरात यांचीच. त्यातल त्यांच, "मुझे लगा पीक स्पीड परफॉर्मन्स आऊटपुट" हे त्यांच्या अभिनयामुळे लै लहानपणी बघितलेल अजून तस्संच आठवतं!
Sandy
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 03/20/2016 - 11:25
नवीन
'लिमिटेड माणुसकी' हा चित्रपट विशेषत्वाने आठवतो.
अगदीच कुणा नवगताला 'विठूमाऊली तू माऊली जगाची' हे गाणं व त्याचा 'अरे संसार संसार' हा चित्रपट सांगावा.
फार लवकर गेला हा माणूस त्यामानाने.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 03/20/2016 - 11:38
नवीन
विठूमाऊली हे गाणं मला त्यांच्या चित्रपट अभिनय प्रवासातलं ठळकपणे आठवणारं गाणं!
अतिशय बोलक्या डोळ्यांच्या या अभिनेत्याच्या अकाली जाण्याने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीही एका गुण्या अभिनेत्याला मुकली असेच मला वाटते! :(
PSPO चा मोठ्ठा फ्यान!
Sandy
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 03/20/2016 - 14:15
नवीन
चलो भैय्या, आपकी नॉस्टेल्जियाके नाम. मोहन गोखले इन पीएसपीओ अॅड.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Sun, 03/20/2016 - 15:13
नवीन
मोहन गोखलेचा महत्वाचा
माफीचा साक्षीदार
कसे हो विसरलात!?
- Log in or register to post comments
स
स्पा
Sun, 03/20/2016 - 16:09
नवीन
लोल =))
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 03/20/2016 - 15:20
नवीन
तर्राट जोकर -- शोलेमधील अंग्रेजोके जमानेके जेलर असरानी.
नाना स्कोच -- शोलेमधील सुरमा भोपाली जगदीप.
अस्मादिक -- गब्बरसिंग
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Sun, 03/20/2016 - 15:33
नवीन
श्रीरंग जोशी पिंजरा मधिल मास्तरच्, पण त्यांच्या प्रतिसादावरुन वाटत नाही की ते कधी बाईच्या नादाला लागून पिंजर्यातला पोपट बनतील.
श्रीरंग साहेब हल्केच घ्या.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 03/20/2016 - 18:09
नवीन
हं. त्यांच्या सुविचार पट्ट्या उडत असतात इतस्ततः.
.
.
.
(हलक्या असतात, हलक्याच घेणे)
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 03/21/2016 - 01:42
नवीन
जबरी धागा...
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3