Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार

प
पॉइंट ब्लँक
Mon, 03/28/2016 - 08:57
🗣 146 प्रतिसाद
आजकाल नास्तिक लोक फक्त तेच वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे आहेत आणि जगाचं भलं करयाचा मक्ता केवळ त्यांच्याकडेच आहे असा टेंभा मिरवताना दिसतात. विज्ञानाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे हा रोचक (कि विस्फोटक) प्रश्न असू शकतो. ह्यावर काही संशोधन Case Western Reserve University आणि Babson College येथे करण्यात आले. त्याबद्द्लच्या लेखाची लिंक इथे देत आहे http://phys.org/news/2016-03-conflict-science-religion-lies-brains.html शास्त्रज्ञांची काही महत्वाची मते खालीलप्रमाणे १. Analytic thinking discourages acceptance of spiritual or religious beliefs. But the statistical analysis of data pooled from all eight experiments indicates empathy is more important to religious belief than analytic thinking is for disbelief. म्हणजे धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही. 2. Atheists, the researchers found, are most closely aligned with psychopaths—not killers, but the vast majority of psychopaths classified as such due to their lack of empathy for others. तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा ( तो नास्तिक नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. :p ) ३. They refer to Baruch Aba Shalev's book 100 years of Nobel Prizes, which found that, from 1901 to 2000, 654 Nobel laureates, or nearly 90 percent, belonged to one of 28 religions. घ्या, नास्तिकवादाने काय जास्त दिवे लावले नाहीत. ४. "Far from always conflicting with science, under the right circumstances religious belief may positively promote scientific creativity and insight," Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict." आता धार्मिक लोकांना कमी लेखायचं थांबवा ५. Although it is simply a distortion of history to pin all conflict on religion," Jack said. "Non-religious political movements, such as fascism and communism, and quasi-scientific movements, such as eugenics, have also done great harm." जगाचं भलं फक्त नास्तिकच करू शकतात ही फक्त बुवाबाजी आहे.

प्रतिक्रिया द्या
29455 वाचन

💬 प्रतिसाद (146)
स
स्पा Mon, 03/28/2016 - 09:01 नवीन
ओके
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/28/2016 - 11:03 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed. Image removed.
↩ प्रतिसाद: स्पा
ए
एस Mon, 03/28/2016 - 09:04 नवीन
नास्तिकांना शिव्या घालणारा अजून एक लेख.
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/28/2016 - 09:12 नवीन
कामच तसं करतात. मग जग तरी काय करणार!
↩ प्रतिसाद: एस
अ
अत्रे Mon, 03/28/2016 - 09:05 नवीन
धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही.
सहमत। काही वेळा नास्तिकता ही फक्त कट्टर धर्मिकतेला प्रतिक्रिया म्हणून असू शकते। पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का? किंबहुना देव मदतीला येणार नसल्याने आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे असा नास्तिक लोक जास्त विचार करत असतील का?
च
चित्रगुप्त Mon, 04/04/2016 - 06:45 नवीन
आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे
'दुसऱ्याची' मदत आणि 'दुसऱ्याला' मदत यातील फरक कृपया 'दुसऱ्याची मारणे' आणि 'दुसऱ्याला मारणे' या आधारे समजून घ्यावा, ही विनंती. बाकी चालूऊऊऊऊऊऊऊ द्या.
↩ प्रतिसाद: अत्रे
प
पॉइंट ब्लँक Mon, 03/28/2016 - 09:15 नवीन
पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का?
हो. त्यांना इतरांबद्दल फारशी सहानुभुती नसते हा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि म्हणूनच त्यांची तुलना मनोविकार असलेल्या लोकांशी केली आहे.
अ
अत्रे Mon, 03/28/2016 - 09:41 नवीन
ते ठीक आहे, पण याचे कारण/मेकॅनिझम काय? नास्तिकतेचा सहानुभूतीशी संबंध कसा जोडायचा। देव नसणे या गृहितीकाशी सुरुवात करून असहानुभूती कडे कसे पोहोचायचे? किंवा याच्या उलट।
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 10:01 नवीन
कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल की प्रत्येक धर्मात ईश्वरी कृपा होण्यासाठी परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा अशी तत्वे सांगितली आहेत. त्यामुळे गहन ईश्वरी अनुभव घेऊ इच्छिणा-या प्रत्येक आस्तिकाला हे यम-नियम पालन करावेच लागतात. असे बंधन नास्तिकावर नाहीये. त्यामुळे त्याचा निसर्गतः कल जर वर नमूद सद्गुणांकडे असेल तरच तो तसे वागेल, नाहीतर देव नाही, आत्मा परमात्मा काही नाही, मी एक स्वतंत्र biological entity आहे, मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो...
↩ प्रतिसाद: अत्रे
अ
अत्रे Mon, 03/28/2016 - 10:11 नवीन
हम्म। पटतंय थोडं पण धार्मिकांची सहानुभूती स्वधर्मीयांसाठीच राखीव असावी असे वाटते। उदा. ISIS फिलॉसॉफी। नास्तिकाकडे गृप्रिझम नसल्यामुळे त्यांची सहानुभूती (असल्यास) सर्वासाठी असावी।
↩ प्रतिसाद: बंकू
म
माहितगार Mon, 03/28/2016 - 10:38 नवीन
मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो...
नास्तिकेतर इतरांचा विचार अधिक करतात आणि नास्तिक इतरांचा विचार कमी करतात ?, काही विदा आहे आपल्याकडे ?
↩ प्रतिसाद: बंकू
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 19:42 नवीन
डोळ्यावर पट्टी बांधून उचल जीभ आणि लाव टाळूला हे आपण नेमके कुठून शिकला आहात कारण माझ्या माहितीतल्या हिंदू धर्मात उचल जिभ लाव टाळूला वर्तन टाळण्यास सुचवले जाते: मी म्हणतो तुम्ही उचलली जीभ लावली टाळूला का करताहात?
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 19:43 नवीन
संदर्भ आणि विदा देण्याची जबाबदारी दावा करणार्‍यांची असते. तुम्ही पण एक प्रकारे दावाच करत आहात की नाही... नीट विचार करा?
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 03/28/2016 - 19:50 नवीन
तुम्ही पण एक प्रकारे दावाच करत आहात की नाही... नीट विचार करा?
मी संदर्भ आणि विदा मागतो आहे. १ नास्तीक लोक परफेक्टली हिंदू असू शकतात या बाबतीत स्वतःचा हिंदू धर्माचा अभ्यास वाढवून यावे नाही तर मी आपणास अभ्यासासाठी पुरेसे संदर्भ देऊ शकतो २) इतरांचा विचार करणार्‍या नास्तिकांमध्ये अनेक हिंदूत्ववादींचा आणि देशप्रेमींचा समावेश आहे, नास्तिक असून देशप्रेमी आणि हिंदूत्ववादी असलेल्या लोकांचा तुमच्याकडून नकळत अवमान होत आहे. तेव्हा अद्वातद्वा विधाने करण्यापुर्वी विदा देणे ही तुमची स्वतःची जबाबदारी बनते.
↩ प्रतिसाद: बंकू
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 19:55 नवीन
मागासाहेब माझ्या विधानातील शकतो आणि शकते ही क्रीयापदे नीट समजून घ्या... मग तुम्हाला समजेल की मी कुठलेच संख्याशास्त्रीय विधान केलेले नाहीये... मी फक्त एक सामान्य निरीक्षण नोंदवले आहे...
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 19:57 नवीन
कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल की प्रत्येक धर्मात ईश्वरी कृपा होण्यासाठी परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा अशी तत्वे सांगितली आहेत. त्यामुळे गहन ईश्वरी अनुभव घेऊ इच्छिणा-या प्रत्येक आस्तिकाला हे यम-नियम पालन करावेच लागतात. असे बंधन नास्तिकावर नाहीये. त्यामुळे त्याचा निसर्गतः कल जर वर नमूद सद्गुणांकडे असेल तरच तो तसे वागेल, नाहीतर देव नाही, आत्मा परमात्मा काही नाही, मी एक स्वतंत्र biological entity आहे, मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो... प्लीज या शकणेचा अर्थ समजून घ्या... मी कुठेही संख्याशास्त्रीय विधान केलेले नाहीये... एक सामान्य निरीक्षण नोंदवलेय..
↩ प्रतिसाद: बंकू
म
माहितगार Tue, 03/29/2016 - 09:01 नवीन
एक सामान्य निरीक्षण नोंदवलेय..
आपण व्यक्तिगत किंवा काही लोकांनी मिळून बनवलेल्या या विधानाची वस्तुनिष्ठता साशंकीत आहे. आपले विधान मुलतः सापेक्षता आणि पुर्वग्रहांवर आधारीत आहे. माझ निरीक्षणच नव्हे तर खरा व्यक्तिगत अनुभव एकाच मार्च महिन्यात तीन स्वतंत्र ऑफीसमध्ये तीन वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथाचे पठण (कि सोंग) करणार्‍या आस्तीक स्त्रीयांनी अत्यंतीक लोचटपणा करत टेबलखालून पैसे घेतले आहेत. किमान अशा दोन अत्यंत आस्तीक स्त्रीयांना ओळखतो की ज्यांनी स्वतःच्या नसलेल्या प्रॉपर्टी हजम केल्या आहेत. हे झाले व्यक्तिगत अनुभव आणि व्यक्तिगत निरीक्षणे. व्यवस्थीत समाजशास्त्रीय नोंदी झालेले हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणारे असे काही (जाती)समूहही होते आणि आहेत जेथे चोरी अथवा डाका टाकण्या आधी चोरी/डाक्यात यशप्राप्तीसाठी दैवताची प्रार्थना केली जाते. दुसर्‍याच्या पत्नीचे हरण करणारा कोणताही रावण आस्तीकही असू शकतो. तुम्ही म्हणाल हिंदू धर्मातीलच उदाहरण का देता अगदी इराक मधील याझिदी स्त्रीयांचे हरण करणारेही त्यांच्या धर्माच्या आस्तीकतेचा हवाला देऊन हरण करतात, दुसर्‍या धर्मांकडे बोट दाखवल्या नंतर स्व धर्माकडे वापस येऊन जालंधरपत्नी वृंदेवर ओढवलेल्या प्रसंग आणि आस्तीकांच्या कोलांटउड्या कशा पवित्र करुन घेतल्या जातात ते सांगा -तरीही मी तुळशी पावित्र्याचा समर्थक आहे तुळशी पुजनाचा विरोधक नाही, तुळशी विवाहाच्या प्रथे बद्दल मात्र साशंक आहे-. किंवा गतजन्मीच्या शापांमुळे आपल्या स्वतःच्या पुत्रांना नदीत सोडणारी गंगा सुद्धा अस्तीक असते अथवा नसते. सर्वच धर्मसंस्थांच्या इतिहासाकडे वापस या त्या त्या धर्मांनी पाळलेल्या विषमता विषयक प्रथा मग हिंदू असूदेत का ख्रिश्चन अथवा बौद्ध धर्मीय या आस्तीकांनी पाळलेल्या विषमता नव्हत्या का? आणि या विषमता परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा या सर्वांना प्रत्यक्ष जिवनात तिलांजली देण्याची असंख्य उदाहरणे इतिहासात ऑन रेकॉर्ड आहेत संदर्भ हवे असतील तर देतो. आता तुम्ही म्हणाल की मी अपवादांवरुन नियम सिद्ध करतो आहे तर ते कदाचित बरोबर असेल पण नास्तीकांच्या बाबतही तुम्हाला अपवादावरुनच नियम सिद्ध करावा लागेल, हिंदू धर्मातील सांख्य तत्वज्ञान असो अथवा बौद्ध तत्वज्ञान असो हे इश्वरी अस्तीत्वावर अवलंबून नाही तरीही त्या तत्वज्ञानांचे बहुसंख्य भक्त समुह परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा यांची काळजी घेतानाही दिसतात. तसा इश्वर-निरीशवर वादाचा अर्थशास्त्राशी संबंध असावयास नको पण कम्युनिस्टांनी लावला कम्युनिस्टांच्या अर्थशास्त्रीय मर्यादा असतील पण इश्वर आणि धर्म दोन्ही नाकारत समता मागताना समतेच्या मुल्याच्या आग्रहा मागे कष्टकरी मानवा विषयी आत्मीयताच असते आणि या आत्मीयतेसाठी त्यांना इश्वर आणि धर्माची गरज भासत नाही. रशिया अथवा चीन किंवा इतर कम्युनीस्ट काळात त्या त्या देशातील सर्वसामान्य जनतेची समाजाची सर्वसाधारण मुल्य व्यवस्था घसरली असे दिसत नाही. (मी कम्युनीझमचा समर्थक नाही) बेसीकली मुल्य व्यवस्थेचे आणि संकेत नियम आणि कायद्यांचे सामाजीकरण हा समाजशास्त्रातील अनेक पैलू असलेला अभ्यास आहे आणि अनेक पैलूतील धर्मसंस्था कदाचित एक पैलू असू शकेल पण एकमेव पैलूच असेल असे सांगता येत नाही. या विषयावर अधिक अभ्यासासाठी Socialization आणि Legal socialization या दोन लेखांचे आपणास दुवे देतो त्यातील लिगल सोशलायझेशन या लेखावर माझ्या परीने माझे लेखन चालू असते. आता आपण आमेरीका (युएसए) कडे येऊ आमेरीकेतील अंदाजे २२ टक्के लोक इश्वर मानतात पण कोणताही धर्म मानत नाहीत १५ टक्के लोक इश्वर मानतात पण सर्व धर्म त्यांच्या साठी सारखे आहेत अथेईस्ट आणि अ‍ॅग्नॉस्टीक मिळून नास्तीकांची संख्या ७ टक्के आहे, सर्व धर्मांना एकसारखे मानणारे धर्म न मानणारे आणि निरीश्वर वादी यांची एकुण संख्या ४४ टक्क्यांच्या आसपास जाइल, म्हणुन आमेरीकेत भारताच्या तुलनेत जास्त गुन्हेगारी आहे आणि सर्व नास्तीक गुन्हेगार आहेत असे नसावे. तुम्ही आमची मुल्यव्यवस्था आमेरीकनांपेक्षा श्रेष्ठवर याल त्या साठी आपण नास्तीकतेच्या कड्डक व्याख्या अभ्यासू आस्तीकतेच्या स्ट्रीक्ट व्याख्येत केवळ त्यात्या धर्मातील त्या त्या पंथाचेच लोक आस्तीक असतात बाकीचे उर्वरीत सर्व जग नास्तीक असते, ज्युडायिक धर्मीयांना मुर्तीपुजा करणारे नास्तीक असतात आणि मुर्तीपुजा करणार्‍यांना मुर्ती पुजा न करणारे नास्तीक असतात, इस्लामीसाठी ख्रिश्नन नास्तीक असतात ख्रिश्चनांसाठी इस्लामी नास्तीक असततात - हे कड्डक व्याख्येने झाले म्हणजे उर्वरीत ९९.९९ टक्के लोक एकमेकांच्या व्याख्ये नुसार नास्तीक असतात. आपण ०.१ टक्क्याचा अपवाद देऊ पण बाकी सर्वांची नास्तीकतेची व्याख्या स्विकारुन गाळणी लावली तर जगातील ९९.९९ टक्के लोक नास्तीक असतात आणि त्यांची मुल्यव्यवस्था घसरलेली असते. हा मुद्दा समजला तर बघा नाही तर सावकाशीने वेगळा धागा टाकून एक्सप्लेन करेन. मुख्य मुद्दा तुमच्या सापेक्ष व्यक्तिगत/मर्यादीत पुर्वग्रहीत विधानातून बहुसंख्य नास्तीकांचे सरसकट नकारात्मक चित्रण होते आहे एवढेच नव्हे त्यांना मनोविकाराच्या लेव्हलवर घेऊन जात आहात ते वस्तुनिष्ठतेच्या निकषांवर कितपत टिकते याबाबत मी साशंक आहे. आता तुम्ही म्हणाल मी निरीश्वरवाद्यांच्या बाजूनेच बोलणारा आहे म्हणून हे सर्व लिहितो आहे तर तेही वस्तुस्थितीस आधारुन असणार नाही. संत मिराबाईंना मनोविकारांच्या लेव्हलवर नेले जातानाही मनोविकाराचा मुद्दा मी अगदी हिरहिरीने खोडला आहे ह्याची साक्ष स्वतः माननीय बिरुटेसरच देऊ शकतीलच. पण त्या शिवाय मी लिहिलेल्या विवीध धागा लेखाची खालील यादी पहा. * गुढी उभारनी * इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न * बगाड परंपरा आणि परंपरेतील वगळण्याजोगे अमानुष अंश * संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस * मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव * अभिषेक प्रकारांची माहिती हवी * गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी * संत एकनाथांचा नैवेद्य - काही शब्दार्थ/पदार्थ माहितकरून हवेत * विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे * गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी आणि गीतारहस्या बद्दलही एक धागा लेख आहे. * थिऑसॉफी, आणि थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल माहिती हवी * महाराष्ट्री प्राकृतातील जैन, महानुभावपंथीय आणि यादवकालीन साहित्याविषयी माहिती हवी * धर्मांवरील टिका: (त्या अजूनही आहेत) * संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** इतर धर्मावरील टिका * थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ? * ज्युडायिक परंपरेतील चातुर्यकथा, व्यक्तिपूजा आणि छळगंड * :) शिर्क ? चंद्र, पृथ्वी एक टिका प्रतिसाद **मध्यंतरात व्यक्तिगत टिकेने भरकटलेल्या चर्चेच्या अनुषंगाने अवांतर ** बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर ** कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?
↩ प्रतिसाद: बंकू
त
तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 09:58 नवीन
हाणतेज्यायला. ते बंकूषेठ तिकडं चक्कर येहून पडलं असंल बगा. =))
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कपिलमुनी Tue, 03/29/2016 - 12:08 नवीन
तुमच्या मारुतीच्या शेपटीशी स्पर्धा करणार्या प्रतिसादाचा मी फॅन आहे
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कपिलमुनी Tue, 03/29/2016 - 12:08 नवीन
तुमच्या मारुतीच्या शेपटीशी स्पर्धा करणार्या प्रतिसादाचा मी फॅन आहे
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बॅटमॅन Tue, 03/29/2016 - 16:38 नवीन
मेलो मेलो मेलो _/\_
↩ प्रतिसाद: माहितगार
S
sagarpdy Mon, 04/04/2016 - 14:22 नवीन
जोकर ने बॅटमॅनला हसवून हसवून मारले आहे :P
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अनिरुद्ध.वैद्य Sun, 04/03/2016 - 16:12 नवीन
.
↩ प्रतिसाद: माहितगार
ब
बोका-ए-आझम Mon, 03/28/2016 - 09:17 नवीन
म्हणजे - मला xyz अनुभव आले त्यावरुन देव नाही हे माझे ठाम मत बनले. त्यामुळे मी नास्तिक आहे. असं म्हणत असेल तर चालेल. पण नास्तिकतावादी कधीकधी सुरूवातच उलटी करतात. मी नास्तिक आहे आणि त्यामुळे हे अनुभव हे असेच असले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असतं. याला बाकी काहीही म्हटलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच म्हणत नाहीत.
ब
बंकू Mon, 03/28/2016 - 09:38 नवीन
प्रतिसाद आवडला...
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गरिब चिमणा Mon, 03/28/2016 - 09:28 नवीन
छान आर्टिकल,नास्तिक रुड असतात पण सगळेच रुड असतात असे न्हवे.मी स्वतः नास्तिक आहे ,but I am a staunch empath
अ
अत्रे Mon, 03/28/2016 - 11:05 नवीन
नास्तिक रुड असतात
पण लेखातील ठळक वाक्ये वाचून आस्तिक नास्तिकांबद्दल रुड असतात का, हादेखील प्रश्न पडतो।
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
अ
अनुप ढेरे Mon, 03/28/2016 - 16:51 नवीन
नास्तिक रुड असतात पण सगळेच रुड असतात असे न्हवे.
उलट नास्तिक जास्तं मृदु असतात असं वाटायला लागलं आहे. मिपावर यनावाला किंवा दाभोळकर हे अत्यंत नम्रपणे त्यांची मतं मांडत असतात/असायचे. त्यांचा विरोध करणारेच खूप आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतात.
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
प
प्रसाद१९७१ Tue, 03/29/2016 - 09:10 नवीन
गुपचुप चटका द्यायचा आणि भाजलेला माणुस ओरडायला लागला की मग "बघा हा कसा ओरडतोय" असा कांगावा करायचा. आधी दुसर्‍यांच्या वैयक्तीक गोष्टीत टिप्पणी करायला जायचेच कशाला?
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
च
चौकटराजा Mon, 03/28/2016 - 09:29 नवीन
धर्म व देव या संकल्पना आहेत व दोन्हीही एकाहून भिन्न.त्यान्चा एकमेकात काय बी सम्बण्ध नाही. बाकी चालू द्या ....
ग
गॅरी शोमन Mon, 03/28/2016 - 10:21 नवीन
विज्ञानाने आणि वैज्ञानिकांनी अनेक कोडी सोडवुन जनतेवर अनंत उपकार केले आहेत या मताचा मी आहे. पण याचा अर्थ सर्वच कोडी सुटली असे नाही. एका सेल पासुन दुसरी सेल निर्माण होते हे सायन्स आहे. दुसरी निर्माण होणारी सेल आधीच्याय सेल चे गुणधर्म घेऊन येते. पण मनुष्य जन्माची कहाणी पाहिली तर त्या विघटन किंवा जी काय प्रक्रिया म्हणाल त्यातुन अनेक प्रकारच्या वेगवेगळे गुण असलेल्या सेल्स तयार होतात. या चमत्काराचा जनम कोण हा प्रश्न कधी पडलाय ? माणुस ऑक्सीजन मुळे जगतो म्हणुन ऑक्सीजन तयार झाला की ऑक्सीजन आहे म्हणुन मानव निर्माण झाला याचे मुलभुत ज्ञान कोणाकडे होते ? फार कशाला, ज्याला पर्जन्य शास्त्र म्हणुन मान्यता आणि सरकारी अनुदान आहेत ते एक साधे मॉडेल जे शास्त्रावर आधारीत असुन अनेक वेळा फसते त्या मानवाच्या बुध्दीची मर्यादा आहे आणि मग कोणीतरी एक नियंता ज्याल ईश्वर म्हणा नाही तर आकाशातला देव म्हणातशी काहीशी शक्ती याच्या मागे आहे हे मानणे जर विज्ञान नसेल तर विज्ञान म्हणजे नेमके काय आहे ?
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 11:52 नवीन
बाकी सगळे ठिक आहे. होतं काय की एकदा अशी अवर्णनीय शक्ती इत्यादी मानली की पुढचा प्रवास पटपट होऊन देवभोळा समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे अशी काही शक्ती अस्तित्वात आहे जिच्या निर्णयामुळे निसर्गात काही घडतं असं मानणं देवभोळेपणा आहे. अनेक प्राचीन प्रश्न आता प्रश्न उरले नाहीत, त्याची उत्तरं मिळाल्यावर त्यामगचे दैवतीकरण नष्ट झाले. कोनती तरी शक्ती मानणे हे सर्व प्रश्न सुटेपर्यंत चालूच राहणार. क्षितिजाचा आरंभ शोधण्यासारखे देवाचे अस्तित्व शोधणे आहे.
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन
अ
अत्रे Mon, 03/28/2016 - 11:09 नवीन
आस्तिक लोकं जास्त सहानुभूती असलेले असतील तर त्यांनी नास्तिकांशी सहानुभूतीने वागले पाहिजे असं वाटतं।
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 03/28/2016 - 12:01 नवीन
चित्रपट तर बनवलाय आणि तो चालूसुद्धा आहे,पण त्याला निर्माता/दिग्दर्शकच नाही असं कसं होईल?
भ
भाऊंचे भाऊ Mon, 03/28/2016 - 12:43 नवीन
प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. ....मला नास्तिकते मधे जीवनाचे नेमके अधिष्ठान सापडवताना संपूर्ण गोंधळ उडतो म्हणून जीवनात महत प्रयासाने आस्तिक भाव टिकवून आहे. म्हणून लेखकाने वर व्यक्त केलेल्या मतांशी नाइलाजानेच पण सहमत होंणे मला क्रमप्राप्त आहे. त्या तुलनेत आस्तिकता सर्व गोष्टी सोप्या करते.
अ
असंका Tue, 03/29/2016 - 04:20 नवीन
विचार करायला लावणारे... धन्यवाद!
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
आ
आनन्दा Tue, 03/29/2016 - 11:02 नवीन
तुमच्या मताशी सहमत्त आहे. पण लेखकाच्या मतांशी फारसा नाही. माझे व्यक्तिगत अनुभव मला नास्तिक होऊ देत नाहीत म्हणून मी आस्तिक आहे. तर्कावर मी नास्तिकतावाद केव्हाच स्वीकारला आहे.
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/29/2016 - 13:19 नवीन
You are free to complicate things as much as you want/can... As long as you do not forget the fact that science can never answer a purpose of life, it can only answer function of life... CHILL BRO!
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 03/29/2016 - 16:02 नवीन
असो - एकच दुरुस्ती..
today's science can never answer a purpose of life, it can only answer function of life.
बाकी सहमत आहेच.
↩ प्रतिसाद: भाऊंचे भाऊ
भ
भाऊंचे भाऊ गुरुवार, 03/31/2016 - 04:27 नवीन
you are free to complicate things as much as you want...!
↩ प्रतिसाद: आनन्दा
म
महेश_कुलकर्णी Mon, 03/28/2016 - 13:53 नवीन
आवडला
स
सोनुली Mon, 03/28/2016 - 16:15 नवीन
+1
प
प्रकाश घाटपांडे Mon, 03/28/2016 - 16:24 नवीन
अश्रद्ध माणसाला श्रद्धेचा आधार मिळत नाही व कधी कधी विज्ञानाचाही आधार मिळत नाही. कारण प्रत्येक वेळी विज्ञान तुमच्या दैनंदिन आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवण्यास मदत करेलच वा ती मदत व्यवहार्य असेलच असे नाही. अशा वेळी कुत्ता न घर का न घाटका अशी अवस्था होते.
ग
गामा पैलवान Mon, 03/28/2016 - 19:18 नवीन
तजो, >> होतं काय की एकदा अशी अवर्णनीय शक्ती इत्यादी मानली की पुढचा प्रवास पटपट होऊन देवभोळा समाज >> निर्माण होण्यास वेळ लागत नाही. यासंबंधी काही विदा मिळेल का? अन्यथा हे विधान केवळ गृहीतक म्हणून धरावे लागेल. आ.न., -गा.पै.
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 20:02 नवीन
देव आहे ह्याचा विदा मिळेल काय? अन्यथा हे देव मानणे केवळ गृहितक म्हणून धरावे लागेल. काय म्हणता? हजारो डॉक्टर्स, इंजिनीअर्स, उच्चशिक्षित इत्यादी लोक देवळांबाहेर, मशिदींबाहेर, चर्चेसबाहेर रांग लावून असतात. विज्ञानाद्वारे मिळालेले ज्ञान शिकून सवरुन, त्यावरच पोटापाण्याचा व्यवसायकरणार्‍या लोकांना जर खुळचट कल्पना टाकून द्याव्याशा वाटत नसतील तर तुम्हाला अजुन ह्यापेक्षा मोठा विदा काय हवाय?
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Mon, 03/28/2016 - 22:10 नवीन
तजो, देव ज्याम किचकट संकल्पना वाटत्येय. तिच्या आधी आपण जरा सोपी संकल्पना बघूया. इलेक्ट्रॉन नक्की अस्तित्वात असतो का? ज्याअर्थी बटण दाबल्यावर दिवा लागतो, त्याअर्थी इलेक्ट्रॉन नावाचं काहीतरी अस्तित्वात असावं. तर ते नेमकं कुठे असतं? आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/29/2016 - 08:23 नवीन
देव आहे ह्याचा विदा मिळेल काय?
https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof हे न कळाल्यास आपण सुधारित सत्यनारायणाची पुजा घालावी म्हणजे आपल्याला पुरोगामी सत्यनारायण पावेल =))))
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
स्पा Tue, 03/29/2016 - 09:01 नवीन
लोलबंध
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 03/29/2016 - 09:22 नवीन
आजची सही:- आत्याचाय्रांना अभय,आणि पीडितांना लाथ!
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Tue, 03/29/2016 - 11:35 नवीन
बुवा, एक खरा पुरोगामी माणुस जिथे आपला अभ्यास नसतो तिथे "मला माहीत नाही / माझा अभ्यास नाही" असे म्हणतो , उगाच टनाटनि , माकड अन मतिमंद वगैरे वगैरे वापरुन आपले सुधारित पुरोगामित्व का हायलाईट करता ... हे घ्या प्रूफ : अजुन जरासा अभ्यास करु : Image removed. हे कळायला कोणालाच सोप्पे नाही पण , अभ्यास केल्यास अवघड ही नाही , हे पहा अजुन जरा जास्त स्पष्टीकरण http://math.stackexchange.com/questions/248548/g%C3%B6dels-ontological-proof-how-does-it-work The modal operator □◻ refers to necessity; its dual, ◊◊, refers to possibility. (A sentence is necessarily true iff it isn't possible for it to be false, and vice versa.) P(φ)P(φ) means that φφ is a positive (in the sense of "good") property; I'll just transcribe it as "φφ is good". I'll write out the argument colloquially, with the loss of precision that implies. In particular, the words "possible" and "necessary" are vague, and you need to understand modal logic somewhat to follow their precise usage in this argument. Axiom 11: If φφ is good, and φφ forces ψψ (that is, it's necessarily true that anything with property φφ has property ψψ), then ψψ is also good. Axiom 22: For every property φφ, exactly one of φφ and ¬φ¬φ is good. (If ¬φ¬φ is good, we may as well say that φφ is bad.) Theorem 11 (Good Things Happen): If φφ is good, then it's possible that something exists with property φφ. Proof of Theorem 11: Suppose φφ were good, but necessarily nothing had property φφ. Then property φφ would, vacuously, force every other property; in particular φφ would force ¬φ¬φ. By Axiom 11, this would mean that ¬φ¬φ was also good; but this would then contradict Axiom 22. Definition 11: We call a thing godlike when it has every good property. Axiom 33: Being godlike is good. Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists. Proof of Theorem 22: This follows directly from Theorem 11 applied to Axiom 33. Definition 22: We call property φφ the essence of a thing xx when (1) xx has property φφ, and (2) property φφ forces every property of xx. Axiom 44: If φφ is good, then φφ is necessarily good. Theorem 33 (God Has No Hair): If a thing is godlike, then being godlike is its essence. Proof of Theorem 33: First note that if xx is godlike, it has all good properties (by definition) and no bad properties (by Axiom 22). So any property that a godlike thing has is good, and is therefore necessarily good (by Axiom 44), and is therefore necessarily possessed by anything godlike. Definition 33: We call a thing indispensable when something with its essence (if it has an essence) must exist. Axiom 55: Being indispensable is good. Theorem 44 (Yes, Virginia): Something godlike necessarily exists. Proof of Theorem 44: If something is godlike, it has every good property by definition. In particular, it's indispensable, since that's a good property (by Axiom 55); so by definition something with its essence, which is just "being godlike" (by Theorem 33), must exist. In other words, if something godlike exists, then it's necessary for something godlike to exist. But by Theorem 22, it's possible that something godlike exists; so it's possible that it's necessary for something godlike to exist; and so it is, in fact, necessary for something godlike to exist. QED. आता थोडा अभ्यास करु आणि मग निवांत चर्चा करु काय म्हणता ????
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा