Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार

प
पॉइंट ब्लँक
Mon, 03/28/2016 - 08:57
🗣 146 प्रतिसाद
आजकाल नास्तिक लोक फक्त तेच वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे आहेत आणि जगाचं भलं करयाचा मक्ता केवळ त्यांच्याकडेच आहे असा टेंभा मिरवताना दिसतात. विज्ञानाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे हा रोचक (कि विस्फोटक) प्रश्न असू शकतो. ह्यावर काही संशोधन Case Western Reserve University आणि Babson College येथे करण्यात आले. त्याबद्द्लच्या लेखाची लिंक इथे देत आहे http://phys.org/news/2016-03-conflict-science-religion-lies-brains.html शास्त्रज्ञांची काही महत्वाची मते खालीलप्रमाणे १. Analytic thinking discourages acceptance of spiritual or religious beliefs. But the statistical analysis of data pooled from all eight experiments indicates empathy is more important to religious belief than analytic thinking is for disbelief. म्हणजे धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही. 2. Atheists, the researchers found, are most closely aligned with psychopaths—not killers, but the vast majority of psychopaths classified as such due to their lack of empathy for others. तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा ( तो नास्तिक नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. :p ) ३. They refer to Baruch Aba Shalev's book 100 years of Nobel Prizes, which found that, from 1901 to 2000, 654 Nobel laureates, or nearly 90 percent, belonged to one of 28 religions. घ्या, नास्तिकवादाने काय जास्त दिवे लावले नाहीत. ४. "Far from always conflicting with science, under the right circumstances religious belief may positively promote scientific creativity and insight," Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict." आता धार्मिक लोकांना कमी लेखायचं थांबवा ५. Although it is simply a distortion of history to pin all conflict on religion," Jack said. "Non-religious political movements, such as fascism and communism, and quasi-scientific movements, such as eugenics, have also done great harm." जगाचं भलं फक्त नास्तिकच करू शकतात ही फक्त बुवाबाजी आहे.

प्रतिक्रिया द्या
29455 वाचन

💬 प्रतिसाद (146)
न
नन्द्या Tue, 03/29/2016 - 13:49 नवीन
संगणक आल्यापासून सर्व गोष्टीत 'द्वैत' वाद बोकाळला असे मला वाटते. म्हणजे एका बाजूला नास्तिक म्हणजे एकदम शास्त्रवादी! डोंबल. शास्त्र काय हे नक्की कळते का? तसेच आस्तिक म्हणजे फक्त धर्म. बोंबलायला धर्म तरी कुणाला नीट कळतो का? मग टोकाला जाऊन कृति होते. पण जग तसे नाहीच. जगात डोके नि हृदय दोन्हींची गरज आहे. बर्‍याच धार्मिक सणात, उत्सव, आनंद, एकत्र भेटणे इ. गोष्टी येतात. त्यात कर्मठ धर्मवाद आणून त्याची मजा घालवू नये. तसेच अति शास्त्रवादी होऊन गणपतीची आरती करणार्‍यांची टिंगल करू नये. मोदक नि प्रसाद खायला काय हरकत आहे? लग्नात सुद्धा धार्मिक कार्याखेरीज इतर बरीच मजा असते, जेवण असते, लोक भेटतात, एकमेकांना भेटी देतात, इथे शास्त्र कुठे आडवे येते? उगाच टीका करण्यासाठी काही तरी शोधायचे. अजिबात देवाला नाकारून दररोज दारू पिऊन चकणा खाण्यात वेळ घालवणे यात तरी काय मोठे शास्त्र आहे? मजेखातर काही काही गोष्टी कराव्या, पण मर्यादेत. त्यात आस्तिक नास्तिकवाद सगळीकडे घुसडू नये. त्यामुळेच शेवटी घटनेने सर्वांना आचार्‍ विचार स्वातंत्र्य दिले, तरी आपले दुसर्‍यांच्या आचार विचारांची टिंगल, त्यांना विरोध. हे काय सभ्यपणाचे लक्षण आहे का? तो अंगी यायला नुसते शाळेत जाऊन भागत नाही. पूर्वी ख्रिश्चन नि मुस्लिम धर्मात, जे स्वतःच्या धर्मात नाहीत त्यांना माणूसच मानायचे नाही, त्यांना मारून टाकले तरी चालेल अश्या समजुती होत्या. आता जसे शास्त्र प्रगत झाले, शारिरीक बल वाढले, तसे मनाचेहि बल वाढायला पाहिजे, ज्या योगे असले कर्मठ विचार बाजूस सारून, सर्वांनी एकत्र गुण्यागोविंदाने जगावे.
इ
इरसाल Tue, 03/29/2016 - 14:33 नवीन
कधी कधी असं वाटतं की, दुसर्‍याला खाली दाखवायला म्हणुन जे अद्वातद्वा बोलले जाते त्याने लोकांचे भान सुटत आहे. विनाकारण काड्या करण्यात मजा मिळत आहे दुसर्‍याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आहे कदाचित असल्या वागण्याने स्वतःचे, कुटुंबाचे मनस्वास्थ्यावर परिणाम करुन घेणे होत आहे कदाचित स्वतःमधे असलेली कुठली तरी कमी, मनोरुग्णपणा , हैवानियत, खाज, अभाव ह्याचा राग आंतर्जालावर काढुन समाधान मिळवण्याचा प्रयत्न चालु आहे.
प
पॉइंट ब्लँक Tue, 03/29/2016 - 15:08 नवीन
+१००
↩ प्रतिसाद: इरसाल
म
मराठी कथालेखक Tue, 03/29/2016 - 15:30 नवीन
हं...हे योग्य बोललात , पण दोन्ही बाजूनी हे मनावर घ्यायला हवं.
दुसर्‍याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आहे
कुणी कुणाची हेटाळणी करु नये हे खरेच. पण व्यक्त होणे म्हणजे हेटाळणी नव्हे. एखादा अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती आपल्या श्रद्देखातर एखादा भक्तीपर लेख लिहतो, कथा लिहतो, कुणी चित्रपटही बनवतो. अनेकदा अशा साहित्यात नास्तिक कसे चुकतात, आणि शेवटी ते कसे अस्तिक बनतात असलं काहीतरी दाखवलेलं असतं (नुकताच मी देऊळबंद नामक सुमार चित्रपट पाहिला, माझ्या अस्तिक आणी श्रध्दाळू पत्निलाही तो अजिबात आवडला/पटला नाही) तसेच जसा भाविकांना त्यांच्या श्रद्धांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे तसाच नास्तिकांनाही त्यांच्या निरिश्वरवादाचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. कुणाची कुत्सितपणे टिंगल-टवाळी न करता जर एखादा नास्तिक स्वतःचे विचार योग्य रितीने व्यक्त करत असेल तर त्यास मनोरुग्ण म्हणणे योग्य नाही. आणि अस्तिक व्हा अथवा नास्तिक अंतिमतः मनःशांती मिळणे, स्वतःचे जीवन सुखासमाधानाने जगणे आणि दुसर्‍याला न दुखवणे हे सगळ्यात महत्वाचे, नाही का ? ----------- माझा नवीन धागा
↩ प्रतिसाद: इरसाल
भ
भाऊंचे भाऊ Tue, 03/29/2016 - 16:27 नवीन
कदाचित स्वतःमधे असलेली कुठली तरी कमी, मनोरुग्णपणा , हैवानियत, खाज, अभाव ह्याचा राग आंतर्जालावर काढुन समाधान मिळवण्याचा प्रयत्न चालु आहे. माझ्या पुरते बोलाल तर हो 11% सहमत. थोड़ी खाज, हैवानियत मनोरुग्णपना याचे मिश्रण असते बाबा माझ्या पर्तिसादात. दुसर्याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आह हे ही बरेच प्रतिसादाकांबाबत 1000% सत्य. खेदाने म्हनेन मिपावर ईंटोलरन्स वाढला आहे ज्याचा कशाशी संबंध आहे याची मला अजिबात कल्पना नाही.
↩ प्रतिसाद: इरसाल
अ
अन्नू Tue, 03/29/2016 - 19:23 नवीन
कीव चलती हय पवन...... कीव झुमै हय गग्गन....... कीव मच्लत्ता हय मन्न्.............. ना तुम ज्यानै ना हम... :P
भ
भाऊंचे भाऊ Wed, 03/30/2016 - 13:43 नवीन
देवाचे अस्तित्व सिध्द करताना जो कोणी इतरांची ( संतांची) उदाहरणे /दाखले/उतारे देइल तो हुकलेला समजावा. देव त्याला भेटला नाही भेटणार नाही... लक्षात घ्या आधी कृष्ण दिसला मग मीरा भजने गाउ लागली त्यातच तल्लीन राहु लागली इतकी लोक तिला वेडी समजू लागले... असं नाही की आधी वेड लागलं नंतर कृष्ण दर्शन झालं :)
ह
होबासराव Wed, 03/30/2016 - 17:56 नवीन
कीव दळते है दळन......!?
अ
अन्नू Wed, 03/30/2016 - 18:09 नवीन
झिंग झिंग झिंगाट झिंगाट झिंगाट! ;)
↩ प्रतिसाद: होबासराव
र
राजेश घासकडवी गुरुवार, 03/31/2016 - 02:54 नवीन
अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान, आरोग्य, इतरांविषयी सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक शांतता, भ्रष्टाचाराचा अभाव या आणि इतर अनेक गोष्टी जास्त चांगल्या असतात. सर्वाधिक धार्मिक देशांत गरीबी, अज्ञान, समाजातलं खुनांचं प्रमाण, स्त्री-पुरुष असमानता वगैरे अनेक वाईट गोष्टी अधिक असतात. http://www.city-data.com/forum/religion-spirituality/1571809-non-religius-countries-do-much-better.html तुम्हाला ऑनसाइट असाइनमेंट मिळणार असेल तर कुठच्या देशांत जाल? स्वीडन, नॉर्वे, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, जपान, चीन की होंडुरास, र्वांडा, अफगाणिस्तान, टांझानिया, युगांडा, नायगर, एरिट्रिया, इथियोपिया, बुरुंडी... वगैरे वगैरे पहिल्या गटातल्या देशांत नास्तिकांची संख्या प्रचंड आहे, दुसऱ्या गटातल्या देशांत आस्तिक ९८% आहेत.
S
sagarpdy गुरुवार, 03/31/2016 - 06:59 नवीन
यात नास्तिकता हे "कारण" आहे की "परिणाम" ?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Sun, 04/03/2016 - 15:10 नवीन
नास्तिकता हा अर्थात परिणाम असू शकेल. कोरिलेशन असलेल्या बाबींमध्ये कुठचं कारण आणि कुठचा परिणाम हे सांगणं कठीण असतं. माझा अंदाज असा आहे की जसजशी सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान वाढतं तसतशी मानवी जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती वाढत जाते, आणि ईश्वरावर अवलंबून राहाण्याची गरज कमी होत जाते. आणि ईश्वरावर अवलंबून राहाण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे प्रयत्नशीलता वाढत असेल कदाचित. आणि हे सुष्टचक्र चालू राहिल्यामुळे श्रीमंत, सुशिक्षित देशांत नास्तिकतेचं प्रमाण वाढताना दिसत असावं. मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'आस्तिकता कमी झाली तर माणसाला देवाची भीती उरणार नाही, आणि तो प्रचंड पापं करेल, समाज ढासळेल' वगैरे युक्तिवाद केले जातात. ती भीती निराधार आहे.
↩ प्रतिसाद: sagarpdy
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 15:50 नवीन
प्रतिसाद आवडला. खरे तर 'आस्तिकतेच्या नावाखाली प्रचंड पापं केल्या जात आहेत' ह्या विधानाला आधार देणारं बरंच आहे.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
अ
अर्धवटराव Mon, 04/04/2016 - 07:12 नवीन
मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'आस्तिकता कमी झाली तर माणसाला देवाची भीती उरणार नाही, आणि तो प्रचंड पापं करेल, समाज ढासळेल' वगैरे युक्तिवाद केले जातात. ती भीती निराधार आहे.
+१०० सर्व प्रकारची सुबत्ता, स्थैर्य जर अ‍ॅट द कॉस्ट ऑफ (सो कॉल्ड) आस्तीकता येत असेल तर अशी आस्तीकता लवकर संपावी म्हणुन अनुष्ठानं करायला पाहिजे :ड
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
S
sagarpdy Mon, 04/04/2016 - 10:23 नवीन
कुरुंदकरांचा (स्वतः समाजवादी) एक लेख वाचनात आला होता. यात समाजवादी सत्ता हुकुमशाही वृत्तीच्या दिसतात याबद्दल उहापोह केला होता. त्यांच्या मते समाजवाद म्हणजे संपत्तीचे समान विभाजन - याचाच अर्थ समाजवादी सत्ता यशस्वी (लोकोपयोगी) होण्यासाठी मुळात संपत्ती असली पाहिजे, परिणामी गरीब देशात समाजवादी सत्ता येणे धोकादायक असू शकते. [हा माझ्या अल्पमतीने काढलेला निष्कर्ष, येथे समाजवाद चूक कि बरोबर हि चर्चा करायची नसून एक तर्कविचार पद्धती दाखवावी एवढाच उद्देश आहे] मांडत असलेला मुद्दा : एखादी कल्पना वाईट नसून ती कोणत्या परिस्थितीत व कशा प्रकारे राबवली जाते हे महत्त्वाचे असते. याच मुद्द्याला धरून - आपण म्हणता त्याप्रमाणे नास्तिकता वाईट नाही, पण अल्पशिक्षित, गरीब देशातील नास्तिक समाज व सुबत्ता असलेल्या देशातील नास्तिक समाज यात अशी सरळ तुलना करणे चूक होईल. आणि तथाकथित "पापे" होण्याचे प्रमाण वाढूही शकेल (शक्यता). हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने अप्रगत, नास्तिक आणि तरीही "पुण्य"वान समाज असल्याचा काही विदा आहे का ?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 04/04/2016 - 12:29 नवीन
हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने अप्रगत, नास्तिक आणि तरीही "पुण्य"वान समाज असल्याचा काही विदा आहे का ?
दुर्दैवाने देशपातळीवर तरी माझ्या माहितीत असा विदा नाही. माझ्या एका मित्राने फेसबुकवर लिहिलं होतं की नास्तिक्य ही भरल्यापोटी करण्याची गोष्ट आहे. त्यात तथ्य आहे. कारण गरीब, हलाखीत जगणारे लोक खरोखरच अनेक संकटांना तोंड देतात. आणि हातातले सर्व उपाय संपले की देवाचा धावा करतात. हा मनुष्यस्वभावच आहे. जर मी गरीब असेन, अप्रगत देशात राहात असेन तर माझ्या हातात फार उपायच नसतात. मूल आजारी पडलं आणि जवळ हॉस्पिटल नाही किंवा मला डॉक्टर परवडत नाही तर मी अज्ञात शक्तीचा आधार घेणारच. त्यामुळे देशाचं जीडीपी, सुशिक्षितता, आरोग्य जसजसं सुधारत जातं तसतसे देशातले लोक देवधर्मावर कमी अवलंबून राहातात. हा अमेरिकेतल्या राज्यांसाठीचा विदा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (उत्पन्न, आरोग्य आणि सुशिक्षितता या तिन्हींवर आधारित निर्देशक) विरुद्ध धार्मिकता Image removed. हा जगातल्या देशांसाठीचा विदा. क्ष अक्षावर वेगवेगळे देश आहेत, आणि य अक्षावर त्या त्या देशातल्या लोकांसाठीचं धार्मिकतेचं महत्त्व आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. Image removed.
↩ प्रतिसाद: sagarpdy
व
विजय पुरोहित Mon, 04/04/2016 - 12:34 नवीन
रा.घा. सर मुद्दा आवडला. पण तुम्हांला अशी खात्री आहे का की भारतासारखा आस्तिकवादी देश जरी उच्च उत्पन्न गटातील देशांच्या पंक्तित जाऊन बसला तर येथील आस्तिकताही हळूहळू नास्तिकतेत परावर्तित होईल? असं होण्याला कितपत बळकटी आहे? याबाबत काही सांगू शकता?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
S
sagarpdy Mon, 04/04/2016 - 14:36 नवीन
या विदामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी कि "धर्माचे महत्त्व" (नास्तिकता नाही - नक्कीच विवादास्पद) आणि "सुबत्ता" यांच्यातील संबंध - निरीक्षण म्हणून तरी - दिसतो. आता धर्माचे महत्त्व कमी होणे उदा. बीफ बंदी नसणे, समान नागरी कायदा इ., धर्म-जातीवर आधारित भेद सार्वजनिक जीवनात न करणे - पण तरीही देवाच्या अस्तित्त्वावर बऱ्यापैकी समाजाने विश्वास ठेवणे, याचा परिणाम म्हणून प्रगती हा तर्क पटण्याजोगा आहे.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
प
पॉइंट ब्लँक गुरुवार, 03/31/2016 - 08:01 नवीन
अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान, आरोग्य, इतरांविषयी सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक शांतता, भ्रष्टाचाराचा अभाव या आणि इतर अनेक गोष्टी जास्त चांगल्या असतात.
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेही योग्य स्टॅटिसटिकल अ‍ॅनालिसिस केलेले नाही. लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत. त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे. संदर्भ दिलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.
तुम्हाला ऑनसाइट असाइनमेंट मिळणार असेल तर कुठच्या देशांत जाल?
ऑनसाइट असाइनमेंट तुमच्यासाठी महत्वाची असेल, म्हणून ती इतरांसाठी असावी अस मानु नये. प्रश्न दुय्यम असला तरी उत्तर देतोच - जिथं माझ्या आवडीचं काम मिळेल तिथं. One cane face "Hostile Work Environment" in any organization irrespective of the country it comes from.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Mon, 04/04/2016 - 03:13 नवीन
लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत.
त्यांनी कटऑफ लावलेले नाहीत. त्यांनी रॅंकिंग दिलेलं आहे. पहिल्या पंचवीस देशांत अमुक इतके देश नास्तिक आधिक्याचे आहेत एवढंच म्हटलेलं आहे.
त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे.
https://www.gfmag.com/global-data/economic-data/richest-countries-in-the-world?page=12 इथे Sources Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress The World Bank Country Profiles Global Finance Magazine Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress IMF Fiscal Monitor, October 2014 International Monetary Fund: Homepage International Monetary Fund (IMF) World Economic Outlook (WEO) database, October 2014 International Monetary Fund, World Economic Outlook Database, October 2014 New York Times: "The Rise and Fall of the G.D.P."- are there better ways to measure a country's wealth and happiness? Principles of Economics, by N. Gregory Mankiw (South-Western, Div. of Thomson Learning, 2003) The measurement of Gross domestic product The World Bank: Classification of Countries The World Bank: Homepage WEO Database October 2014-IMF WEO Press Briefing October 2014-IMF World Bank Homepage World Bank – Poverty Indicators World Bank's classification of countries by income group World Economic Outlook of the International Monetary Fund, October 2014 असं म्हटलेलं आहे. त्यांवर विश्वास ठेवायचा नसेल तर तसं सांगा.
आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.
वादळ आलं की शहामृग वाळूत डोकं खुपसून बसतं. आणि मग त्याला 'वादळ नाहीच्चे' असं म्हणता येतं. मी लिहिलेल्या पहिल्या गटातले देश चांगले की दुसऱ्या गटातले देश चांगले याला तुम्ही कुठच्याही पीअर रीव्ह्यूड रिपोर्टच्या आधारे द्या उत्तर.
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक
न
नाखु Mon, 04/04/2016 - 05:56 नवीन

पुन्हा तेच दळण , गिरणी तीच फक्त डबे बदलले.

आणि हो बुवांकडूनच ट्णाट्णी शब्दाची खरी खुरी व्याख्या वाचायला आवडेल म्हणजे आम्ही ट्णाट्णी आहोत का नाहीत ते कळेल. रच्याकने : गावडे मास्तर का फिरकले नाहीत या धाग्यावर तेच कळेना (कुठ पूजेत अडकायची शक्यता नाही पण पूजेच्या नादी तर नाही......) शंका बालक नाखु
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/04/2016 - 16:16 नवीन
टनाटनी हे सनातनी ह्या शद्बाच खिल्ली उडविण्याच्या दृष्टींनी केलेलं विडंबन आहे. सनातनी ह्या शब्दाचा निसर्गनियमित व नैतिक असा अर्थ गृहीत धरून जे लोक स्वतः मात्र त्या पडद्याखाली विषमता स्त्री/पुरुष शोषक मूल्यांचाहि उल्लेख सनातन मूल्य किंवा एखादा धर्म म्हणून करतात त्यांना दिलेली हि शाब्दिक चपराक आहे. तुम्ही ह्यातले आहात,असे मला वाटत नाही. तुम्हाला वाटते का?,ते पहा. धन्यवाद.
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/04/2016 - 16:29 नवीन
सनातनी ह्या शब्दाचा निसर्गनियमित व नैतिक असा अर्थ गृहीत धरून जे लोक स्वतः मात्र त्या पडद्याखाली विषमता स्त्री/पुरुष शोषक मूल्यांचाहि उल्लेख सनातन मूल्य किंवा एखादा धर्म म्हणून करतात
१) सत्यनारायण स्कंदपुराणे रेवाखंडे की काय असे काही जण गृहीत धरतात २) सत्यनारायण हे सरळ सरळ धार्मिक दहशतवाद माजवुन सर्वसामान्यांचे शोषण करण्याचे साधन आहे असे खरेपुरोगामी म्हणतात. ३) आणि तरीही काही लोकं "मी स्वतःहुन सत्यनारायण करुन घ्या अशी जाहिरात केली नाही, लोकांनी माझ्याकडे विनंती करुन सत्यनारायण करवुन घेतला म्हणुन माझा सत्यनारायण शोषण करणारा नाही " असे म्हणतात . आता ह्या हिशेबाने खरे सनातनी कोण आहे हे सर्वांनाच ठावुक आहे की हो !!
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/04/2016 - 16:51 नवीन
@ "मी स्वतःहुन सत्यनारायण करुन घ्या अशी जाहिरात केली नाही, लोकांनी माझ्याकडे विनंती करुन सत्यनारायण करवुन घेतला म्हणुन माझा सत्यनारायण शोषण करणारा नाही " असे म्हणतात . >> हा अत्यन्त खोटारडा आरोप माझ्यावर केलेला आहे. मी असं कुठे म्हणालेलो आहे ? ते दाखवा आता.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 17:21 नवीन
परतेक हिंदु भटजीने रोज त्रिकाळ संध्या करणे अपेक्षित आहे. पण आपण तर http://www.misalpav.com/comment/770334#comment-770334 येथे संध्येची अधिष्ठात्री देवता गायत्री माँ हिच्याविषयी काढलेल्या गैर उद्गारांना ख्या ख्या करत मान्यता दिलेली आहे. कृपया स्पष्ट कराल का की एक हिंदु भटजी देवीदेवतांचा असा घृणास्पद अपमान करुन पुन्हा भटजीगिरी करुन पैसे कमवायला कसा रिकामा होतो? येथे जे उद्गार काढले आहेत ते कुठल्या बुद्धीवादात मोडतात? आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार व प्राप्त संस्कारांनुसार प्रतिसादकर्ता अपोद्गार काढतो व तुम्ही बिनदिक्कत ख्या ख्या का करता?
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 17:23 नवीन
कृपया उत्तर द्या की संध्येच्या अधिष्ठात्री देवतेचा असा बिनडोक अपमान करुन आपण पुन्हा भटजीगिरी करायला कसे धजावता?
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/04/2016 - 17:43 नवीन
सदर उल्लेख मी केलेला नाहीच.. त्यामुळे .. असो!
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 17:46 नवीन
मग तिथे निषेध व्यक्त न करता ख्या ख्या का करत बषला? हा हिंदू भटजीच्या बेसिक नियमांचे उल्लंघन नाही का? प्रत्येक हिंदु भटजीने आदरपूर्वक माँ गायत्रीची उपासना केलीच पाहिजे. संध्या करत नसेल तर तो भटजी नाहीच. मग तुम्ही धार्मिक कृत्ये कोणत्या अधिकाराने करता?
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रचेतस Mon, 04/04/2016 - 18:36 नवीन
गायत्री माँ कुठली हो? सांगा ना प्लीज. गायत्री हा छंद आहे आणि हा मंत्र सूर्याला उद्देशून आहे.
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 18:43 नवीन
बुवांच्या मदतीला धावून जाण्याअगोदर त्यांना नीट हिंदु भटजीसारखे वर्तन करायला सांगा. अंतरी नास्तिकता बाळगून भोळसट हिंदु भाविकांना फसवण्याची परवानगी आपण देऊ नये ही विनंती. त्याऐवजी दुसरा व्यवसाय करा म्हणावे इतकीच जर ईश्वराची अॅलर्जी असेल तर...
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 04/04/2016 - 18:47 नवीन
माझ्या प्रश्नाचे उत्त्तर टाळण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. बाकी ही बुवांना केलेली मदत वाटत असेल तर ह्याच धाग्यावरील मी बुवांना दिलेले प्रतिसाद पाहावेत.
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 18:49 नवीन
गायत्री हा छंद आहे आणि हा मंत्र सूर्याला उद्देशून आहे. हे तर कुणालाही माहित्ये. आपल्यालाच माहित्ये असा ग्रह करून घेऊ नये. त्याऐवजी हिंदु देवतांच्या नावाने गरळ ओकणार्यांना समज द्यावी ही विनंती... गायत्री छंदः 8×3 अशी छंद रचना आहै. मूळ रचना विश्वामित्रांची आहे.
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 04/04/2016 - 18:52 नवीन
खिक्क्क... तुमचं चाललंय वर गायत्री माँ..गायत्री माँ.... बाकी इतरांना समज देणारा मी कोण?
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 18:58 नवीन
त्यापेक्षा तुमच्या मित्रालाच समज द्या की पोट चालवणार्या व्यवसायावर गरळ ओकू नये ते!!! :)
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Mon, 04/04/2016 - 19:08 नवीन
ओके. देतो समज. ओ बुवा..ऐका हो ह्यांच कळकळीचं सांगणं.
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 19:12 नवीन
नका हो इतकी कळकळ करू. पोट दुखेल. त्याऐवजी आजून काही चिखलफेक करणे सोपे जाईल त्यांना आणि तुम्हालाही. :)
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/04/2016 - 17:24 नवीन
http://www.misalpav.com/comment/718079#comment-718079
कुठे केली जाहिरात या गुरुजींनी? कोणाच्या घराघरांमधे "य्या य्या ..मी तर सुधारणावादी गुर्जी..माझ्याकडून पूजा करुन घ्या..आणि द्या मला खर्ची..(पक्षी :- खर्चा-पानी!) ...अशी जाहिरात केली..
http://www.misalpav.com/comment/763152#comment-763152
मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीच
वगैरे वगैरे ...
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/04/2016 - 17:41 नवीन
@मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीच >> ह्यातच सर्व काही आले. मी शोषक स्वरूपाच कामच करत नाही. म्हणूनच तुम्ही जाणीवपूर्वक आरोप केला,हे आपोआप स्पष्ट झालं.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 17:52 नवीन
तुम्हाला एखादा धार्मिक विधी करायला बोलवणारा भाविक हिंदु हा तुम्ही मनोभावे आस्तिक असालच याच उद्देशाणे बोलवतो. त्याला जर समजले की तुम्ही आंतरजालावर माँ गायत्रीची अआशी अपमान करत ख्या ख्या करत पिरता तर तो तुम्हाला बोलवेल का घरात तरी? त्याला सांगा मी नास्तिक आहे, हिंदु देवीदेवतांचे अपमाण करत फिरतो, त्यांचा कुठे अपमान झाला तर णिषेध करायच्या एवजी ख्या ख्यि करत बसतो तर तो तुम्हाला हातात नारळ देवून घराबाहेर काढेल. एकतर इथे आपण हिंदु भटजी आसल्यिची जाहीरात करुन पुजेची सुपारी मिळवायची आणि पुन्हा इथेच या देवीदेवतांविषयी गलिच्छ टिका एंजाॅय करत सुटायची. धिक्कार असो त्या चित्रगुप्य आयडीचा आनी तुमचाही. .
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 18:10 नवीन
अजून एक सांगा. प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी देवीदेवतांचे रीतसर आवाहन केले जाते. ते आवाहन आपण कोणत्या अधिकाराने करता? कारण जर ईश्वरी शक्तीच नसेल तर त्याचे आवाहन आपण काय म्हणून करता हे जाणून घ्यायचे आहे. तसेच प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी रीतसर न्यास करुन दैवी शक्तीचे आवाहन पुजार्याच्या अंगोपांगात केले जाते. ते न्यासविधी आपण अंतरी नास्तिकता बाळगून कसे करता हे पण जाणून घ्यायला फार आवडेल. तसेच प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी रीतसर प्रत्येक देविदेवतेला आवाहन करुन तिची षोडशोपचार पूजा केली जाते. तो पूजावीधी आपण नास्तिकता बाळगून कसे करता याचे आश्चर्य वाटते. कारण ईश्वरच नसेल तर त्याची षोडशोपचार पूजा हा आस्तिकांची फसवणूक करणारा ठरत नाही का? कृपया शंकानिरसन करावे.
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ग
गामा पैलवान Mon, 04/04/2016 - 18:23 नवीन
एकांतप्रेमी, धिक्काराशी सहमत. गुरूजींकडून चैतन्यदायी मंत्रांबद्दल किमान आदर बाळगणे अपेक्षित आहे. शोषणबिषण केवळ सांगोवांगीच्या बाजारगप्पा आहेत. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: एकांतप्रेमी
ए
एकांतप्रेमी Mon, 04/04/2016 - 19:18 नवीन
अहो कुठला आदर आणि काय? पैसे मिळाले की झाला विधी समजतात ते! मग तिकडे विधीची काही का वाट लागेना? पुन्हा आंजावर बोंबा मारायला रिकामै हिंदु धर्माच्या नावाने! पोट भरल्याशी कारण असल्यांना. जे मत पटत नाही ते सोडूनच द्यावे, त्याच्या नावावर पैसा कमवू नये इतकी पण समज नाही असल्या स्वार्थी व्यक्तींना.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/04/2016 - 18:31 नवीन
पण
हा अत्यन्त खोटारडा आरोप माझ्यावर केलेला आहे. मी असं कुठे म्हणालेलो आहे ? ते दाखवा आता.
ह्याला उत्तर दिले आहे . दावा खोटारडा नाही हे पुराव्याने शाबित !!
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 04/04/2016 - 18:49 नवीन
पुरावा खोटारडे पणाने वापरला आहे. अर्थात तुम्ही हेच करणार, यापलीकडे काहीही करणार नाही, हे हि माहीत आहे. यापुढे जेंव्हा प्रत्यक्ष भेटू, तेंव्हा आमने सामने वाद करू. तिथे ह्या लबाडी ला वाव मिळणार नाही तुम्हाला.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रचेतस Mon, 04/04/2016 - 18:53 नवीन
कुठे करायचा कट्टा? रामदेवला येता का बुवा वीकांती?
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/04/2016 - 19:21 नवीन
नको . त्यांनी रामाला देव म्हणले आहे आणि पुढे बाबा ही जोडले आहे , ह्यातुनच त्यांचा बुवाबाजीचा टनाटनी उद्देश दिसुन येतो. माझ्यासारखा महान एकमेवाद्वितीय अंनिस अ‍ॅप्रुव्ह्ड पुरोगामी व्यक्तीने तिथे जाणे शोभुन दिसत नाही =))))
↩ प्रतिसाद: प्रचेतस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा