तंत्रजगत

गाडीला ब्रेक हवा

Primary tabs

जी साधने आपण वापरतो. ती घेऊन आपण जसे सुस्साट धावत सुटतो तसेच कुठे थांबायचे याचेही भान हवे. कॉम्प्यूटर हा आज आवश्यक भाग बनला आहे. त्याचे अगणित उपयोग आहेत. आपल्या अनेक कामात आपण त्याचा वापर करून घेतो. त्याला इंटरनेटची जोड दिल्याने तर गाडी एकदम सुपरफास्ट धावू लागली आहे. पूर्वी एक निरोप देण्यासाठी प्रत्यक्ष जाण्याची गरज पडायची. त्या ऐवजी ते काम एका एसएमएस ने होऊ लागले आहे. वेळ खूप वाचू लागला आहे. कंप्यूटर अनेक कार्यालयामधे वापरणे सुरु झाल्याने कामे सुकर झाली आहेत. लाईफ बीकेम ईझियर. मात्र गरजेसाठी ही साधने आहेत हे भान राहत नाही. नीड आणि ग्रीड यातला फरक बर्‍याच लोकांच्या लक्षात येत नाही. साधन हाताशी आहे म्हणून काहीतरी काम काढणे सुरु झाले आहे.

यामधे आता फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्स अशा साईटसची भर पडली. अनेक जण या साइटसचा नियमित वापरही करू लागले. ते करताना आपण त्याच्या अधीन केव्हा झालो हेही अनेकांच्या लक्षात येत नाही. सतत कुणाचा एसएमएस, व्हॉट्स अ‍ॅप मेसेज आलाय का चेक करायचे. आपण फेसबुकवर टाकलेल्या पोस्टला दर दोन मिनिटांनी किती लाईक्स आले आहेत, किती कमेंट्स आले आहेत हे चेक करायचे ही अनेकांची सवय बनली आहे. अनेकांना हे आभासी जगच सोयीचे वाटू लागले आहे. इथे आपण खरे कसे आहोत याचा लोकांना पत्ता लागत नाही. कधी कधी नेहमीच्या जगात होत नाही ते कौतुक आपल्या पोस्टवर मिळू शकते. मग माणूस याच जगात रमतो. इथे त्याला सुरक्षित वाटू लागते. वास्तव जगातली प्रत्येक गोष्ट अनुभवत असताना ती फेसबुकवर कशी मांडायची याचा नकळत विचार सुरु असतो.

मनुष्य समोर असला तर आपण विचार करून प्रतिक्रिया देतो पण इथे कुठल्याही पोस्टवर झटकन प्रतिक्रिया देण्याची सवय लागते. यातून माणसे तुटतात, त्यांच्या भावना दुखावतात याचे भान राहत नाही. हीच सवय वास्तविक जीवनात झिरपते.

पेपरही कंप्यूटरवर वाचता येतो. त्यातही मोठमोठे लेख असतात. ते वाचण्याची अनेकांची आवड असते. पण एका बाजूला पेपर, ब्लॉग मधील लेखांचे वाचन सुरु असले तरी फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप सुरुच असते. एक लेख मनापासून वाचता वाचता फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅप ची नोटीफिकेशन्स खुणावतात. मग लक्ष तिकडे वळते. कंप्यूटर करतो तसेच माणूसही आजकाल मल्टिटास्किंग करू लागला आहे. एकाच वेळी दहा विन्डो ओपन. खरंच याचा फायदा होतो का...

एक काम मन लावून करत असताना दुसरीकडे लक्ष वळते. काही वेळ दुसर्‍या कामात दिल्यावर पुन्हा पहिल्या कामाकडे आल्यावर ते काम पूर्वीच्या एकाग्रतेने करता येत नाही. लक्ष विचलित व्हायला काही सेकंद पुरतात. पण पुन्हा एकाग्रता साधायला अर्धा तासही जाऊ शकतो.

मोठ्या माणसांचे वैशिष्ट्य हेच असते की ते एका वेळी एका कामावर फोकस करु शकतात. इकडून तिकडे उड्या मारत बसत नाहीत. यालाच कंप्यूटरच्या भाषेत स्विचिंग असे म्हणतात.

यामुळे सतत नवे नोटिफिकेशन काही आले आहे का, नव्या मेल्स, मेसेज आले आहेत का याचा शोध सुरु होतो. आज २ मेल्सनी समाधान झाले तरी उद्या दोन ने होत नाही. उद्या अधिकचा डोस घ्यावा लागतो. परिणाम इतर व्यसनांसारखाच असतो. अशा काही लोकांना व्यसन मुक्ती केंद्रातही दाखल करावे लागले आहे म्हणे.

या सगळ्यामधे मोठे लेख, पुस्तके वाचण्याची सवय हरवून जाते. फार काळ एका जागी मन एकाग्र करणे अशक्य होवून बसते. ज्या लोकांना पूर्वी प्रचंड वाचायची, त्यावर मनन चिन्तन करायची, पुस्तकातल्या गोष्टी विज्युवलाईझ करायची सवय होती त्यांनाही आता मोठे लेख वाचणे संकट वाटते. अगदी छोटीशी चौकट ते वाचू शकतात. कुठल्याही विषयात खोलवर जाण्यास मन धजत नाही. चुकून पुस्तक हाती पडले तरी अकारण सतत मोबाईल तपासावासा वाटतो. आता कंप्यूटरच्या जोडीला मोबाईल आला आहे. तोही बहुतेक सर्व सुविधा देतो. पुन्हा आकार छोटा, वापरायला फार सोपा. त्यामुळे कुठेही बसून कनेक्टेड राहण्याची सोय उपलब्ध झालेली आहे.

म्हणूनच आपली गरज किती हे आपणच ओळखायला शिकले पाहीजे. छान गाडी मिळाली तरी थांबायचे कुठे कळले पाहीजे. अन्यथा अपघात अटळ !

आनन्दा

अश्या प्रकारचा काहीतरी आजार पण डेफाईन केला आहे असे ऐकतो..

एस

तंत्रजगतातला उत्तम व समर्पक लेख.

सुबोध खरे

Internet addiction disorder has also been found to correlate positively with damaged self-esteem, which underlying mechanism parallels that of clinical conditions such as bulimia nervosa. This occurrence of compulsions may be attributed to an automatic defense mechanism in which the individual avoids anxiety.[52]
A 2009 study suggested that brain structural changes were present in those classified by the researchers as Internet addicted, similar to those classified as chemically addicted.[53]
A current study on the effects of online internet gaming reveals how excessive internet addiction could significantly impair a student’s brain. For this study,the researchers selected seventeen subjects with online gaming addiction and another seventeen naive internet users who rarely used the internet. Using a magnetic resonance imaging scanner, they performed a scan to "acquire 3-dimensional T1-weighted images" of the subject's brain. The results of the scan revealed that online gaming addiction "impairs gray and white matter integrity in the orbitofrontal cortex of the prefrontal regions of the brain".[54] According to Keath Low, psychotherapist, the orbitofrontal cortex "has a major impact on our ability to perform such tasks as planning, prioritizing, paying attention to and remembering details, and controlling our mention".[55] As a result, these online gaming addicts are incapable of prioritizing their life or setting a goal and accomplishing it because of the impairment of their orbitofrontal cortex.

असंका

हे तर जवळजवळ ए डी एच डी सारखंच झालं ?

नाखु

एका जागेवर बसून वाचन (अगदी वर्तमान पत्रातील विशेष पुरवणीचंही) पुस्तके तर सोडाच हे फक्त सेवा निवृत्तांचे (किंवा होवू घातलेल्यांच) काम आहे अशी धारणा मी मोठ्या कुटुंबात पहात आहे (काही सन्माननीय अपवाद आहेतही)

आव्डीने बैजवार पुस्तके वाचणारे आणि त्याच्या संदर्भासह(च) चर्चा करणारे गावडे सर आणि बिरुटे सर त्यांच्या प्रतिसादातूनही दिसून येतात.(आजकाल दोघे काही नवीन लिहित नाहीत ही खंत आहेच)

गुगलच्या जमान्यात वरवरच्या माहीतीलाच ज्ञान समजणे असावे कदाचीत.

जुनाट नाखु

पैसा

लेख आवडला. अशी उदाहरणे कितीतरी दिसतात हल्ली आसपास. खरे आयुष्य आणि नेटवरचे आयुष्य यात फरक करता न येणे हे तर नेहमीच दिसते.

नेटवरच्या आभासी जगातल्या ओळखीना खरी मैत्री समजायची चूक बरेच जण करतात. बरेच जण काही ना काही इनसिक्युरिटीने पछाडल्यासारखे मग आभासी जगात येऊन समुहाने हल्ले करतात. समुहातल्या लोकांबद्दल प्रेमाचे प्रदर्शनही. कारण नॉर्मल आयुष्यात हे सगळे आपण कधी करत नाही.

आभासी जगात तुमचा काल्पनिक शत्रू तुमच्यासमोर नसतो. मग प्रत्यक्षात त्याच्याशी कधी भेट झाली, त्याचा खरा चेहरा दिसला की त्याच्यासमोरून पळून जायची वेळ येते. कोणा नवख्याला झुंडी करून कंपूने छळणे हेही प्रत्यही दिसणारे. अशा कंपूतले लोक प्रत्यक्षात फार मवाळ असू शकतात. प्रत्यक्षात जे करू शकत नाहीत ते सगळे ते नेटवर करू पाहतात. आभासी जगात त्यांच्यातल्या सगळ्या विकृती उघड्यावर येतात.

मात्र अशा एखाद्या समुहातल्या व्यक्तीचे लग्न वगैरे झाले किंवा दुसरे काही मोठे स्थित्यंतर झाले की आभासी जगातली तकलादू नाती विसरून मग ते आपापल्या आयुष्यात परत जातात. मात्र एकंदरीत आता हा आभासी आणि खर्‍या जगातला फरक फारच थोडे लोक समजून घेतात असे वाटते. सुरुवातीला टाईमपास म्हणून नेटवर येणारे लोक नंतर अट्टल दारूबाजासारखे वागू लागतात. आपण आभासी जगाशिवाय राहू शकतो का परीक्षा घेण्यासाठी चार दिवस घरातले, मोबाईलवरचे इंटरनेट बंद करून बघावे मग कळेल आपण कुठे आहोत ते!

हे मी अनुभवले आहे

एक आजीबाईकुठल्या तरी विषयावर आग लावली पाहिजे हिम्मतच कशी होते वगैरे भाषा बोलत. त्यांना म्हटलं, तुम्ही करा पुढारीपण आम्ही आहोत तुमच्या बरोबर.

तर म्हणाल्या, "आता गात्रे थकली. आता बोलण्या पलिकडे काहिही करु शकत नाही"

पण इतरांनी केलेले दंगे धोपे पाहण्याची मात्र हौस होती आजी बाईंना

पैसा

फुकटची करमणूक कोणाला नको? काही लोक दुसर्‍या कोणाला पुढे करून आपले साधून घ्यायला बघतात. ते इतक्या खुबीने की वापरले गेलेल्यानाही कळत नाही की आपण वापरले गेलोय.

एकूणच हे आभासी जग व्यसन बनले आहे

लोकांच्या क्षमतांवर परिणाम होतोय