Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संघाने मला काय दिले?

र
रमेश भिडे
गुरुवार, 05/12/2016 - 05:03
🗣 221 प्रतिसाद
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

प्रतिक्रिया द्या
34005 वाचन

💬 प्रतिसाद (221)
M
mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 05:08 नवीन
हे सगळे आम्ही संघात न जाताही करतो.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 05/12/2016 - 16:46 नवीन
आपल्याला वार लावून जेवण्याचा अनुभव आहे हे समजून बरे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 05:58 नवीन
एवढे साधे संस्कार घरी करु शकत नाहीत...??? आश्चर्य आहे.
  • Log in or register to post comments
र
रिम झिम गुरुवार, 05/12/2016 - 16:49 नवीन
एक तर हे साधे संस्कार वाटतात तेवढे सोपे नसतात त.जो. साहेब.. त्यासाठी एक तर तुम्हाला खुप कडक स्वभाव असावा लागेल अथवा तुमच्या घरात सगळेच शिस्तप्रिय असावे लागतील. सामान्यपणे असे असण्याचे प्रमाण खुपच कमी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आनन्दा गुरुवार, 05/12/2016 - 06:03 नवीन
समूहात आणि प्रत्यक्ष फिल्डवर शिकलेल्या गोष्टी जास्त पक्क्या असतात. ज्यांना केवळ विरोधासाठी विरोध करायचा आहे त्यांचा भाग सोडून द्या.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 06:09 नवीन
त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. पोराबरोबरच बापालाही संघात जाण्याची गरज आहे . पुढच्या शिबिरात बापाने जावे.
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड गुरुवार, 05/12/2016 - 06:36 नवीन
तुला कामधंदा नाही का काही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
स
सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 06:34 नवीन
छिद्रान्वेष
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/12/2016 - 06:51 नवीन
"संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात." ????????????????? ?????????????????????????/// ?????????????????????????????????????????// कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे....
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 05/12/2016 - 07:11 नवीन
शिबिरात चांगलेच पिदवून घेतलेले दिसतेय लेकराला, 'टेली शॉपिंगच्या' जाहिरातीसारखे वाटते. संघात जाणार्‍या माझ्या बर्‍याच (सगळ्यांच्या नव्हे) मित्रांच्या घरातील वॉश बेसिनच्या नळाला हात लावायलाही किळस वाटेल इतके कळकट असतात, त्यांच्या पाणी प्यायच्या पेल्यालाही ओशट वास येतो.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 07:25 नवीन
संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. लेखात लिहिलेल्या सवयी आम्हाला गरीबी ने शिकवल्या आहेत १ आवरून ठेवणे - घरात बोंबलायला सामानच कमी त्यात कपडे वर्षात दोन जोड़ी न आवरून जातोय कुठे कपडे फाटले तर उघडे रहावे लागले ह्यातून आवराआवर शिकलो २ म्हातारी कंबर तुटेपर्यंत काम करुन परत पाण्याला मैलभर चालत जायची तिथे पाणी वाचवणे शिकलो ३ घरात टीवी वगैरे चैन कधीच नव्हती तेव्हा गोट्या अड्डूल गस्टिल खेळणे अन पुस्तके वाचणे हे शिकावेच लागले ४ नेतृत्व गुण शिकायला कारणीभूत, कांडी हरवल्यामुळे भोकाड पसरलेला मित्र अन त्याला पेन हरवला म्हणून अर्धमेला होइस्तोवर कुटनारा त्याचा बाप ह्यांच्यापासून वाचवायला सगळ्या पोराकडून चार चार आणे वर्गणी काढून मित्राला पेन घेऊन देणे अन मुस्काड मारून परत हरवु नको हे सांगणे ठरले बघा विशेष सूचना :- अस्मादिक बाल शाखेत गेलेले आहेत अन अस्मादिकांची कॉमेंट ही वैयक्तिक अनुभवांवर आधारीत आहे, संघ ऑन अ लार्ज असेलही महान वगैरे मी मला जो वैयक्तिक अनुभव आला अन जो बप्तिस्मा संघाने द्यायचा प्रयत्न केला त्या आधारावर बोलतो आहे. आग्रहाची विनंती :- संघ अनुभवायची गोष्ट आहे वगैरे मखलाशी आहेर आणु नये, आपले शिव्याशाप हाच आमचा आहेर "आमच्या ककाच्या डोक्याला ताप द्यायला नाही यायचं बरं" -बाल शाखेत जाणारा पुतण्या बबल्या अजिबात कळवु नये अन लोभ तर मुळीच ठेऊ नये धन्यवाद
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 05/12/2016 - 07:33 नवीन
अगदी अगदी, उपरोल्लेखित गुण शिकण्यासाठी संघाची गरज भासली नाही. किंबहुना संघात नियमित जाणार्‍या सहाध्यायींपेक्षा जास्त चांगले वागायला जमले. आईबाप आणि परिस्थिती शिकवतेच. शिकणे आणि शिकवणे यात कोताही झाली की बाह्याधाराची किंमत वाटायला लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 07:36 नवीन
आभार अभ्या मुद्दा समजलेला तू घावला बघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 07:58 नवीन
तुम्ही वेगळ्या संघाबद्दल बोलत असाल कदाचित. हा धागा बहुधा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल आहे. ज्याच्याबद्दलचा माझा अनुभव वेगळाच आहे. मी काय शिकलो ही गोष्ट वेगळी. पण वाईट काही शिकलो नाही. बाकी संघात शिकायला मिळत नाहीत अश्या गोष्टी बर्‍याच असाव्यात. पण योग्य वेळी योग्य गोष्टी शिकायला मिळाले तरी खुप झाले. असो. संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. तुमच्या रुपाने एक उदाहरण आमच्यासमोर आहेच. संघात जाउनही कदाचित आमच्या हातुन आपल्या एवढी देशसेवा घडु शकत नसेल (आमच्यापरीने प्रयत्न करतो). परंतु तरीही संघामुळे अनेक चांगल्या गोष्ती मनावर बिंबल्या हे नक्की. संघ नसता तर हे घडले नसतेच असे सांगता येत नाही पण संघामुळे घडले असेल तर वाईट काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चिनार गुरुवार, 05/12/2016 - 12:13 नवीन
बापू साहेब, ज्या गरिबीने आपल्यासारखा चांगला माणूस घडवला तीच गरिबी कधी कधी गुन्हेगार घडवायला सुद्धा कारणीभूत ठरते. अर्थात श्रीमंत घरातून सुद्धा गुन्हेगारी प्रवृत्ती बळावू शकते. मुद्दा असा आहे, ध्येयापासून भरकटलेल्या गरीब किंवा श्रीमंत मुलाला संघासारखी एखादी संघटना योग्य मार्गवर आणत असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. आता ही गोष्ट फक्त संघातच घडू शकते असं काहीही नाही. बाकी सैन्यानंतर संघा इतकी शिस्तबद्ध संघटना माझ्या तरी पाहण्यात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 12:33 नवीन
तुम्ही सैन्य आणि संघाची शिस्तीबद्दल तुलना केली तर एक सहज विचार माझ्या मनात आला. सैन्यात शिस्त बाणवायला Conformity व Obedience आवश्यक असते. ह्याबद्दल खरेसर आणी बापुसाहेब जास्त योग्य सांगू शकतील. सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी. ह्या विषयावर चर्चा झाल्यास आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
म
मन१ गुरुवार, 05/12/2016 - 13:39 नवीन
सैन्यासारखी शिस्त संघात येत असेल तर ते वरील दोन गोष्टींशिवाय शक्य नाही असे वाटते. त्यापैकी Conformity हा मुद्दा जास्त गंभीर आहे असे मला वाटते व माझ्या संघाबद्दलच्या मतांमधे ह्या मुद्द्याचा मोठा भाग आहे. कन्फॉर्मिटीचा मला अभिप्रेत अर्थ असा की वरिष्ठ सांगतील ते मुकाट फॉलो करणे, त्याविरुद्ध विचार प्रकट न करणे, त्या वरिष्ठांच्या मूळ विचाराला छेद देईल असे कोणतेही कृत्य न करणे (भले त्यात मानवी मूल्यांचे हित समाविष्ट असले तरी). जे विशिष्ट हेतूने, ध्येयाने एकत्र येतात, संघटन करतात त्यांच्यात ह्या गोष्टीचा मोठा प्रभाव असतो. जबरदस्त इंटीग्रीटी असलेली कोणतीही संघटना त्यास अपवाद नसावी.
हं . सगळ्याच केडर बेस्ड संघटनांत हे थोड्याफार फरकानं असणारच की . राजकिय, सामाजिक विषयांचा मी जाणकार नाही. पण माझा अंदाज असा की अगदि कम्युनिस्टांतही हे लक्षण/ फीचर दिसणारच. कदाचित स्वातंत्र्यपूर्व काळातल्या काँग्रेसमध्ये, भारवलेल्या कार्यकर्त्यांतही दिसेल. आणि कोणतीही संघटना असू देत किंवा कंपनी, कोणतीही ओर्गनायझेशन ही प्रत्येक सदस्याच्या सहमतीनंतरच चालेल असं ठरवलं तर तिचं चालणं मुश्किल होइल. आपण काम करतो ती कंपनी सुद्धा एक ऑर्गनायझेशन असते. तिची सगळी ध्येय धोरणं आणि हरेक कृती कुठं आपल्याला मान्य असतात ? मला खुद्द आपल्या देशाची काही धोरणं मान्य नाहित. पण राहतोच की मुकाट्यानं इथ एक कायदाभिरु नागरिक म्हणून. (स्वगत -- च्यायला लैच अवांतर होतय का ? सॉरी बॉस.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रदीप गुरुवार, 05/12/2016 - 14:48 नवीन
संघाने मला काय दिले?? कंपुबाजी द्यायचा प्रयत्न केला , मीच घेतली नाही. दांभिकता द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतली नाही. इतरांना तुच्छ लेखणे द्यायचा प्रयत्न केला, मीच घेतले नाही. ह्याविषयी, तसेच आपण जेव्हा बालशाखेत जात होतात त्यावेळचे इतरही काही बरेवाईट अनुभव असतील, त्या सगळ्याबद्दल आपण इथे कृपया सविस्तर लिहाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 08:07 नवीन
संघात न जाताही एक चांगला माणूस घडु शकत नाही असे काही नाही. प्रतिसाद पोचला धन्यवाद! मी गेलो तो संघ किंवा मुळ संघाला माझ्यासमोर विपर्यस्त पद्धतीने मांडणाऱ्या लोकांबद्दल बोलतो आहे बुआ मी तर! मुद्दा काय उडदामाजी काळे गोरे! संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल ह्यावर बहुदा तुमचे आमचे एकमत असावे परत एकदा धन्यवाद
  • Log in or register to post comments
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 08:33 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 08:56 नवीन
संघ १०० टक्के चुकही नाही अन बरोबरही नाही व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल हे फारच जेनेरिक विधान आहे. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. - संघाशी असंबंधित सामान्य माणूस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 09:20 नवीन
. हे संघालाच नाही तर सगळ्याच आस्थापना, संस्था, व्यक्ती, सुरक्षा दले यांनासुद्धा लागू होते. अगदी अगदी लागु होते त्यात काही वादच नाही, १००% sacrosanct काहीच नाही ह्यात वाद असायचे कारण नाही, कदाचित म्हणून मला मी करतो ते काम जस्ट अनदर जॉब वाटतो त्यात ग्लोरिफिकेशन नसावे हे मी वेळोवेळी नमूद सुद्धा केले आहेच तुम्ही त्यापलीकडे जाऊन ते दांभिकता, कंपूबाजी वगैरे लिहिले आहे. म्हणून म्रूत्युंजय साहेबांनी लिहिले असावे. ह्यावर मी पुढे "संघ असेलही महान फ़क्त मला दिसलेला अन आलेला अनुभव जसा आला त्यावरून मांडतो आहे" अश्या स्वरुपात बोललोच आहे, मला संघ म्हणून जो जो अनुभव आलाय तो मी लिहिला आहे बुआ वैयक्तिक मी माझ्या अनुभवांची जबाबदारी घेतोय, त्यावर प्रतिसाद देताना कोणाला पुर्ण संघाची जबाबदारी घ्यायची असले तर तो त्याचा प्रश्न आहे माझा नाही, माझ्या अनुभवांवरुन आकलनावरुन निरीक्षाणांवरुन संघ जसा वाटला ते मी मांडले त्याचे सर्वत्रिकरण करायची गरज नाही , शिवाय धागा लेखकांनी सुद्धा "मला काय मिळाले" हेच मांडले आहे तेव्हा मी धागा प्रमाणिक लिहिले असे मी समजतो बाकी ते वैयक्तिक अनुभवाचे काही पटले नाही. एखादा तुकडी चुकार असेल तर संपूर्ण सैन्याला दोषी धरण्यासारखेच आहे. ऑन अ लार्ज स्केल काही चुकीचे धोरण वगैरे टीका असेल तर पटू शकते. धागा धोरणात्मक संघ त्याची ध्येय धोरणे इत्यादीवर असता तर मी ऑन अ लार्ज स्केल संघात चांगले वाईट काय मिळाले/नाही मिळाले, असते/नसते ते बोललोही असतो, धागा वस्तु वैयक्तिक काय मिळाले वर केंद्रित आहे म्हणून मी तितकेच बोललो, बाकी तुमची मर्जी अप्पा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 09:38 नवीन
ओके
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 09:52 नवीन
संघाबद्दल तुमचे आणि माझे अनुभव पुर्ण वेगळे आहेत हे तर ओघाने आलेच. फक्त एक शाखा म्हणुन नाही तर संघातील ज्या प्रचारकांची, कार्यकर्त्यांची ओळख झाली आहे त्यापैकी बरेच लोक तत्वनिष्ठ, शिस्तप्रिय, सुसंस्कारी आणि दुरदृष्टी असलेले विद्वान लोक होते त्यामुळे तुमचा आणि माझा संघाबद्दलचा दृष्टीकोन वेगळा असणार यात शंकाच नाही. पण एक संघटना म्हणुन संघाच्या सेवाभावी वृत्तीबद्दल आणि कार्याबद्दल मला आदर आहे. त्यामुळेच तुमचा आणि माझा संघच वेगळा आहे असे लिहावेसे वाटले. त्यामुळेच संघ आणि इतर म्हणजे उडदामाजी काळे गोरे हे मला मान्य नाही. पण व्यक्ति तितक्या प्रकृती हे संघाला अन त्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा लागु असेल यावर दुमत नाही. असो. धन्यवाद. वैचारिक मतभेद असुनही शांतपणे चर्चा करता येणार्‍या थोड्या आयडी पैकी आपण एक असल्याने आपण आपले आपले अनुभव मांडले आहेत त्यावर येथेच थांबुयात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
A
amit_m गुरुवार, 05/12/2016 - 08:34 नवीन
छिद्रान्वेष..Perfect
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/12/2016 - 09:11 नवीन
माझं संघाबद्दल फार चांगलं मत नै ये, पण व्यक्तिमत्वात बदल होणार्‍या कोणत्याही उपक्रमाचं ब्वा मला लै कौतुक हेही नम्रपणे नमुद करतो. आपल्या मुलामधे बदल झालेले पाहुन आनंद वाटला. शुभेच्छा. अजून एक, मी कॉलेजला जाईपर्यंत अशा सांस्कृतिक उद्योगात होतो. शीबीर, शाखा, खेळ, शहरप्रमुख अशी सर्व पदंही भूषवली आहेत. पण, तेव्हा काय कळत नव्हतं, आता थोडं थोडं कळायला लागलं आहे. -दिलीप बिरुटे (दक्ष)
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/12/2016 - 09:25 नवीन
म्हणजे तुम्च्या सदैव दक्ष राहाण्याचे मूळ संघाच्या शाखेमुळे (जात होता तेंव्हा पासून आहे तर). भीतीने लांब पळालेला नाखुस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
च
चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 10:01 नवीन
मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 10:04 नवीन
तांदुळात एक खडा निघाला. तेंव्हा सगळे तांदूळ खड्यानीच भरलेले आहेत असे म्हणण्यासारखा हा प्रतिसाद आहे. सरळ स्पष्ट ब्राम्हण द्वेष आणी संघ द्वेषाने भरलेला प्रतिसाद आहे. इतके खाली उतरू नका चंद्रनील साहेब. संघाला थोडे सुद्धा ओळखणारे लोक हा प्रतिसाद अजिबात अमान्य करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 05/12/2016 - 10:20 नवीन
संघाला ओळखणारे किंवा संघ जाणणारे हे कधिच मान्य करणार नाहित. एखाद खडा असेल गोष्ट वेगळी मात्र त्यामुळे संघ असा आणि तसा म्हणणं चुकीचं....तशी वागणुक देणार्‍यांनाही आणि प्रस्तुतकर्त्यालाही संघ कळला नाही अस सिद्ध होतयं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/12/2016 - 20:37 नवीन
आजन्म संघात घालवलेले, आसिंधु-सिंधु हिंदु बांधवतेच्या गर्जना देणारे अनेक संघी जातीय द्वेषापासुन स्वतःला सोडवु शकत नसलेले बघुन मला फार आश्चर्य वाटायचं. पण मग जातीभेद समाजात मुरल्याची कारणं, एकुणच हिंदु संघटनेचा कन्सेप्ट, संस्कृती आणि देशकारणाचा परस्पर संबंध, देशाच्या समस्या आणि त्यांचं परिशीलन या बद्द्ल परस्परविरोधी पण एकदम लॉजीकल विचारधारा, या सगळ्यांचा शेवटी मानवतेवर होणारा परिणाम... हे सगळं पुढे येत गेलं व संघ आणि संघी यातला भेद समजत गेला. ज्यांच्यापुढे केवळ नतमस्तक व्हावे असे अनेक महानुभाव भेटले, त्यातले बरेचसे संघी देखील होते. सांगायचा मुद्दा असा कि संघावर जातीयतेचा आरोप लागण्याचं एक कारण जुन्या पिढीतल्या अनेक संघी लोकांची मानसीकता आहे. हे एकदम नाकारता येत नहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
वैभव जाधव गुरुवार, 05/12/2016 - 20:59 नवीन
http://misalpav.com/comment/839359#comment-839359 विठा मोड- हे आधीच सांगितले आहे, तस्मात आपला मुद्दा नवीन राहिलेला नाही- विठा मोड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 11:39 नवीन
मी जोशी हायस्कूलमध्ये असताना एकदा एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या जोशी हायस्कूल मध्ये शिकल्या होत्या. घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आलेजोगळेकर म्हणजे तू भटाचा का असे एक आजी म्हणाल्या. मी पुन्हा एकदा मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले. अत्यंत सापत्न वागणुक मिळाली. तेव्हा या शाळेचे जातियवादी स्वरुप समजले. ही शाळा फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला तेंव्हा खुली झाली, जेंव्हा मी शाळा सोडून कोलेज मध्ये गेलो. त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने जोशी हायस्कूलचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये. तसेच मुलांना कोणत्याही आजींच्या संपर्कात येऊ देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 11:42 नवीन
हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, एखादी शाळा किंवा जगातल्या सगळ्या आज्या 'ऑन अ लार्जर स्केल' महान असतीलही पण माझी कमेंट वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 11:54 नवीन
खिक्क
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 12:06 नवीन
जसे या उपरोधिक प्रतिसादातून तुम्ही चंद्रनील यांच्या अनुभवातील ३ पिढ्या संघात घालवलेल्या कुटुंबाच्या विचारसरणीचा/वर्तणूकीचा संघाशी संबंध नाकारताय, त्याच मापदंडाने रमेश भिडे यांच्या लेखातील १०-१५ दिवस शिबिरात घालवलेल्या मुलाच्या वागणूकीचाही संघाशी संबंध नाकारता येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 12:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 12:20 नवीन
नाही नाकारता येत कारण रमेश भिड्यांच्या लेखातल्या देवर्‍यांनी स्वतः तो बदल संघामुळे झाला आहे असे म्हटले आहे. ती बाब त्यांची स्वतःशी निगडीत आहे. आणी मुल्हेरकर एका व्यक्तीच्या अनुभवावरुन संघाबद्दल निष्कर्ष काढत आहेत. एका व्यक्तीवरुन संघटनेबद्द्दल निष्कर्ष काढता येत नाही. माझ्या ३ पिढ्या संघाशी संबंधित आहेत आणि मी सर्व जातिधर्माच्या लोकांकडे जाउन जेवुन आलो आहे आणि ते देखील माझ्याकडे येउन जेवुन गेले आहेत. तसे करताना त्यात माझ्याबाजुने तरी कुठलाही भेदभाव कधी केला गेला नाही. किंबहुना असे करताना "जात " हा विचारच कधी मनात आला नाही. सध्या पद्धतशीरपणे जो ब्राह्मणांबद्दल अपप्रचार केला जातो तेव्हा त्यामुळेच हे सगळे विचित्र वाटते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 12:33 नवीन
देवरे आणि चंद्रनील दोघांचाही अनुभव आहे .. दोघांना वेगळे अनुभव आले.. ठीक आहे. माझा मुद्दा अप्पांच्या प्रतिवादाविषयी होता.. असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. बाकी देवरे आणि चंद्रनील यांच्या अनुभव कथनात दोघांचाही संघाविषयीचा पूर्वग्रह डोकावतोय.. दोन्ही विरुद्ध टोकांना अतिशयोक्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 12:38 नवीन
आणि हो.. वाईट अनुभवाविषयी संघ तुम्हाला समजलाच नाही आणि चांगल्याचं श्रेय द्यायला चढाओढ हे आता खूप अंगवळणी पडलय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 12:51 नवीन
परत एकदा सांगतो.: १. एक स्वयंसेवी संस्था आहे. त्या संस्थेच्या विचारसरणीने माझ्या आयुष्यात आमुलाग्र सकारात्मक बदल घडुन आला. मला ती संस्था आवडते. असे एक माणुस म्हणतो. २. एक माणुस एका स्वयंसेवी संस्थेचा सभासद आहे. त्या माणसाचा व्यवहार अभद्र आहे. त्यासाठी ती संस्थाच अभद्र आहे असे दुसरा माणुस म्हणतो. संस्था अनेक सभासदांनी बनलेली असते. त्यामुळे त्या संस्थेतील अधिकाधिक लोक जर नकारात्मक प्रवृत्तीचे असतील तर ती संस्था चुकीची म्हणता येइल कदाचित. पण एका माणसाच्या चुकीच्या वर्त्नामुळे (जो काही संघटनाप्रमुख पन नाही) आख्खी संघटनाच चुकीची आहे हा आरोपच मुळात हास्यास्पद आहे आणि त्यामुळे पहिल्या अनुभवाशी दुसरा अनुभव कंपेअर करता येत नाही, आणि हो. उठसुट संघाला नावे ठेवायची फ्याशन फार जुनी आहे फक्त आता मोदीविरोधामुळे संघविरोधही प्रबळ आहे इतकेच. आता सरावलो आहे त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 14:55 नवीन
तुम्हाला संघ आवडतो की नाही यावर काहीच वाद नाहिये इथे. ते परत मला कशाला सांगताय. प्रतिवादाच्या पद्धतीवर प्रतिसाद होता.. आणि जसं चांगल्या अनुभवावरून लोक संघाला चांगलं म्हणू शकतात तसं वाईट अनुभवावरून वाईट म्हणणारच.. वाईट आलं की मात्र त्या माणसाला संघापासून नामानिराळा करणे योग्य नव्हे.. जसं शिबिर भरवणारे संघाचे प्रतिनिधित्व करतात तसचं संघाच्या कामाला आलेल्या माणसांची संघप्रेमासाठी रहायची सोय करणारी कुटुंबही संघाचंच प्रतिनिधित्व करतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
आ
आनन्दा गुरुवार, 05/12/2016 - 19:57 नवीन
मी स्वतः आयुष्यातला काही काळ संघात घालवलेला आहे. संघाच्या अनेक उपक्रमांमध्ये सहभागी पण झालेला आहे. विविध गोष्टींच्या निमित्ताने संघाचे कार्य जवळून बघितले आहे, आणि तसेच शाखेत असणार्‍या काही "कार्यकर्त्यांच्या" टवाळक्या, इतकेच नव्हे तर काही संघाच्या क्रियाशील सभासदांच्या जीवनाची काळी बाजू देखील जवळून पाहिलेली आहे. काही वेळेस त्याची झळ देखील सोसलेली आहे. परंतु संघाचे तत्वज्ञान आणि सकारात्मक कार्य इतके मोठे आहे की त्यापुढे या गोष्टींचे फारसे महत्व वाटत नाही. एका विशिष्ट वळणावर वैचारिक मतभेदांमुळे संघापासून वेगळा झालो, पण तरीही मी आजन्म संघाचा हितचिंतक राहीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 13:06 नवीन
असा उपरोधिक प्रतिसाद लिहून मूळ देवरे यांच्या लेखाचेही वाभाडे काढता येतील एवढेच.. जरुर काढावेत. मुल्हेरकरांनी उगाच इथे 'जात' आणली आहे म्हणून प्रतिसाद देणवाआवश्यक वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
म
मी-सौरभ गुरुवार, 05/12/2016 - 17:26 नवीन
सदर सदस्य हे कसलेलब, बळि घेणारे गोलंदाज आहेत तेव्हा जपुन बरं का. हितचिंतक, सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
न
नाखु Fri, 05/13/2016 - 11:07 नवीन
दुसर्याचे खरे खुरे अनुभवही यांना कल्पनाविलास वाटतात आणि त्यांचे पालन-पोषणकर्ते त्याचा अगदी मनःपूत पाठींबा देऊन जयजयकारही करतात. चालायचंच शिक्ष्णाने माणुस प्रगल्भ होते यावर कितपत विश्वास ठेवावा हेच आपले आपण ठरवावे. तयार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 15:32 नवीन
आपण निश्चित खोटे बोलत आहात. एवढेच म्हणेन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 16:55 नवीन
का, तर त्यांच्या कुठल्यातरी पुतणीने ब्राम्हण मुलाशी लग्न केलेलं म्हणून. मी ना त्या मुलाचा भाऊ ना त्याचा काका-मामा. आणि ही मुंबईतली गोष्ट आहे. आता बोला. तरीही आमच्या मोठ्या बहिणीने मराठा मुलाशी लग्न केलं तेव्हा आम्ही कुठलाही विरोध केला नाही. हे आमचे जावई सगळ्या सासुरवाडीत एकदम आवडते आहेत. एका कुटुंबाकडून असला अनुभव आल्यावर संपूर्ण संघटनेविषयी इतकी टोकाची भूमिका घेणं हे जरा जास्तच आहे. आणि हे जातीयवादी संस्कार त्यांच्यावर संघाने केले होते याचा काय पुरावा आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ख
खटपट्या गुरुवार, 05/12/2016 - 20:08 नवीन
९६ कुळी मराठा अशी कोणतीही जात अस्तीत्वात नाही. कागदावर फक्त "हींदू मराठा" ही एक जात आहे. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 21:22 नवीन
असं तेच लोक स्वतःला म्हणवून घ्यायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा