Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संघाने मला काय दिले?

र
रमेश भिडे
गुरुवार, 05/12/2016 - 05:03
🗣 221 प्रतिसाद
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

प्रतिक्रिया द्या
34005 वाचन

💬 प्रतिसाद (221)
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:41 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:41 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:41 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:41 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:43 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:43 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:43 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:43 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:44 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:44 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:44 नवीन
  • Log in or register to post comments
व
विटेकर Fri, 05/13/2016 - 07:44 नवीन
  • Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा Fri, 05/13/2016 - 13:53 नवीन
संघाने मला काय दिले?
काही नाही तरी २०० प्रतिसादी धागे दिले बघा.. ;)
  • Log in or register to post comments
ज
जेपी Fri, 05/13/2016 - 16:47 नवीन
द्विशतका निमीत्त सर्वांना एक एक सोटा देऊन सत्कार करण्यात येत आहे. -शुभेच्छुक: जेपी आणी तमाम सोटा धारी कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Fri, 05/13/2016 - 18:14 नवीन
त्यास दंड असे संबोधले जाते. -प्रचल १ २ १ २
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
आ
आरोह Sat, 05/14/2016 - 18:51 नवीन
नमस्ते सदा वत्सले मातृभूमे.. मला संघाची हि प्रार्थना नेहमीच ऐकायला आवडते..अर्थपूर्ण आहे माझा संघाशी तसा डायरेक्ट संबंध नाही आला पण इंजिनीरिंगला असताना एक सर होते. ते VJTI मध्ये प्रोफेसर होते. संध्याकाळी ते डोंबिवलीच्या कन्या शाळेत फुकटात गणित विषय शिकवायचे. माझ्यासारख्या कित्येक ढ मुलांचा गणित विषय त्यांच्यामुळेच सुटला.शिकवायला ते डायरेक्ट शाखेतून हाफ चड्डीत यायचे.बोलायला रोखठोक,करड्या शिस्तीचे नाखरे सर मानापासून विषय सोपा करून सांगत. त्यांनी कधी आम्हाला एकदाही शाखेत जाण्याचा सल्ला नाही दिला कि संघाची जाहिरात केली नाही. असो सहज आठवलं म्हणुन लिहिलं
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 05/16/2016 - 06:46 नवीन
"जातीय"वादी संघटनेबद्दल एक बातमी http://www.thestatesman.com/news/india/in-kumbh-mohan-bhagwat-lunches-with-sanitary-workers/142181.html
  • Log in or register to post comments
र
रणजित चितळे Wed, 05/18/2016 - 07:09 नवीन
लेख वाचून मला माझ्या लहानपणची आठवण ताजी झाली. संघाने मला बरेच काही दिले. व्यक्तिमत्व घडवण्यात सिंहाचा वाटा. एक उत्तम समाजसेवी संस्था. मला गर्व आहे अशा संस्थेवर.
  • Log in or register to post comments
R
Ram ram गुरुवार, 05/19/2016 - 09:34 नवीन
Jyanna jyanna uchhvarniyanbaddal dvesh vat to tyanni Israel sarkhe vegale vhave . Amhi support karu. Keval uchhvarniy mulinshi lagna kelyane aapan aapla nyungand sodu ha keval gairsamaj ahe.
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे गुरुवार, 05/19/2016 - 14:37 नवीन
अशा प्रतिसादांना या धाग्यावर स्थान मिळू नये. निषेध.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
त
तर्राट जोकर Sat, 05/21/2016 - 17:51 नवीन
उच्चवर्णिय मुलींनी आपल्याला डावलेले दिसतंय..? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा