Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

संघाने मला काय दिले?

र
रमेश भिडे
गुरुवार, 05/12/2016 - 05:03
🗣 221 प्रतिसाद
कालच दहावीची परीक्षा दिलेला माझा धाकटा मुलगा संघाचे पंधरा दिवसांचे शिबीर पूर्ण करून परतला. आठ दिवस सातारा येथे प्राथमिक शिबीर झाले आणि नंतर लगेच विस्तारक म्हणून शिरवळ येथे फिल्ड वर काम केले. तिथे तो वार लावून जेवला. वरती पत्रा असलेल्या एका जुन्या वाड्यात राहिला. तिथे त्याला स्वावलंबन शिकायला मिळाले. गावातील अनेक लोकांकडे दिवसभर फिरून त्याने अनेक ओळखी करून घेतल्या. सायंकाळी लहान मुलांच्या शाखेत काम केल्याने नेतृत्व कसे करावे हे त्याच्या लक्षात आले. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संघाची शिस्त त्याच्या अंगात भिनू लागली. त्याची आई गावाला गेलेली, त्यामुळे घराची अवस्था बघण्यासारखीच होती. "काय बाबा, घर आहे की उकिरडा ?" असे म्हणून चहासुद्धा न पिता त्याने संपूर्ण घर आवरले. पादत्राणे एका ओळीत ठेवली. यावेळचा उकाडा सहन न होऊन तो पूर्वी मला म्हणाला होता, "बाबा, एसी किंवा कुलर घ्या की !" त्या वाक्याची त्याला आठवण करून दिली तर तो उत्तराला, "अजिबात नको कुलर वगैरे......झोपडपट्टीतल्या लोकांकडे पंखाही नसतो !" बाथरूम मधला नळ टिपकत होता, ते पाहिल्यावर त्याने स्वतः प्लम्बरला फोन केला. अर्थात प्लम्बर आला नाहीच, पण मुलाने टिपकणा-या नळाखाली बालदी लावली आणि रात्री त्यातले पाणी कुंडीतल्या झाडांना घातले. मला म्हणाला, "बाबा आम्ही शिबिराच्या पहिल्या दिवशी 33000 लिटर पाणी वापरले पण आम्हाला पाणी कसे वाचवायचे हे शिकवले त्यामुळे शेवटच्या दिवशी फक्त 12000 लिटर पाणीच खर्च झाले. आम्हाला शिक्षकांनी शिकवले की दुस-याला नावे ठेऊ नका, चांगल्या कामाची सुरवात स्वतः:पासून करा !" ह्या मुलाला क्रिकेट पाहण्याचे भयानक वेड होते, ते या पंधरा दिवसात निघून गेले. IPL पाहण्यापेक्षा पुस्तक वाच असे सांगता सांगता माझ्या दाताच्या कण्या झाल्या पण त्याने ऐकले नव्हते. गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. आज सकाळी तो सवयीने लवकर उठला आणि लगेच स्नान करून स्वतः:चे कपडे स्वतः: धुवून टाकले. आणि म्हणाला, "आई एवढे काम करते मग कशाला तिला आणखी त्रास ?" हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! एका आईबापाला मुलांकडून दुसरे काय हवे असते ? संघाने आमचा मुलगा घडवायला मदत केली, "हे" दिले संघाने आम्हाला ! अभय देवरे, सातारा सातारा येथे नुकताच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित केला होता. संघ स्वयंसेवक अभय देवरे ह्यांना आलेला त्याचा अनुभव त्यांच्याच शब्दात.

प्रतिक्रिया द्या
34005 वाचन

💬 प्रतिसाद (221)
श
श्रीगुरुजी गुरुवार, 05/12/2016 - 17:31 नवीन
मी संघात असताना एकदा ब्राह्मण कुटुंबाकडे राहयची वेळ आली, त्या कुटुंबाच्या तीन पिढ्या संघात होत्या.घरात गेल्या गेल्या मला माझी जात विचारण्यात आली,मी जातपात हे भेद मानत नाही असे त्यांना सांगितले तेव्हा माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघण्यात आले.बाकी विप्रांची झोपणाची व्यवस्थाअ घराच्या आत करण्यात आली, व आम्हा दोघातीघांची व्यवस्था बाहेर पडवीत करण्यात आली.अत्यंत सापत्न वागणुक मिळाली.तेव्हा या संघटनेचे जातियवादी स्वरुप समजले,ही संघ संघटना फक्त जातीयवाद पोसण्यासाठी आहे हे स्म्जले व फुले शाहू आंबेडकरांच्या उदात्त विचारसरनीची दारे मला खुली झाली, त्यामुळे ज्याला सर्व समावेशक भुमिका घ्यायची आहे त्याने असल्या संघटनेचे पाउलही चढू नये व मुलांना ही तिथे पाठवू नये.
हे वाचून गोंदवले प्रकरणाची आठवण आली व सदस्य कोण आहे याचाही अंदाज आला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ख
खटपट्या गुरुवार, 05/12/2016 - 20:17 नवीन
चंमु साहेब, खूप सरसकटीकरण होतय. ठाण्यातल्या एका अग्रगण्य बँकेत काम केले आहे. या बँकेची स्थापना संघाने केली. बँकेच्या व्यवस्थापनाने मुद्दामुन ठाण्यातील दुरवर असलेल्या खेड्यापाड्यातील आदीवासी आणि दलीत मुलांना नोकर्‍या देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुसंख्य कर्मचारी ब्राह्मण आहेत हे मान्य तरीही ब्राह्मणेतर मुलांना शिक्षणात आणि मार्कांत विशेष सुट देण्यात येते. यातील कीतीतरी मुले नंतर वरच्या पदावर पोचली. कामात चुका करत असतानादेखील त्यांना सांभाळून घेण्यात आले (याठीकाणी ब्राह्मणांवर मात्र कडक कारवाइ होत असे) त्यामुळे एखादा संघातील माणूस फक्त तुमच्याशी वाइट वागला म्ह्णून अख्खा संघच तसा आहे असे म्हणू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
च
चंद्रनील मुल्हेरकर गुरुवार, 05/12/2016 - 10:11 नवीन
डॉक्टर माझा अनुभव लिहिणे ही गैर आहे का? जगभरातल्या अनेक संघटनांचा दाखवायचा हेतू एक आणि अंत्यस्थ हेतू वेगळाच असतो हे मला सुचित करायचे आहे.
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 05/12/2016 - 10:54 नवीन
असा अनुभव आला असेल तर निस्श्चीत्च तो चांगला नाही आणि निंदनीय आहे.पण जरा ही चित्रफीत पहा आणि ठरवा भुजबळ कुटुंबीय भारावले ही बाब तुम्ही वरिष्ठांच्या नजरेस आणून दिली आहे काय? किंवा त्याचा पाठपुरावा केला आहे काय असल्यास तोही टंकावा. नितवाचक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रनील मुल्हेरकर
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 10:38 नवीन
त्या ब्राह्मण कुटुंबाची वागणूक चुकीचीच आहे, पण अशी किती कुटुंबं तुम्हाला भेटली? तुम्ही म्हणता ते फुले आंबेडकरांच्या विचाराने वागणारे सर्वच जण सर्वसमावेशक वागतात का?
  • Log in or register to post comments
M
mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 10:57 नवीन
राजस्तान की गुजरातेत शालेय अभ्यासात नेहरुंचा उल्लेख गाळला आहे व संघ गाणी पुस्तकात सामील केली आहेत म्हणे. आता लवकरच या राज्यांत सुसंस्कारीत प्रजा जन्मास येइइल अशी अपेक्षा.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 10:59 नवीन
पाठ्यपुस्तके वाचुन पोरे निपजतात का निपजलेली पोरे ठराविक वयाची झाली की शाळेत जाऊन बुके वाचतात!?? अरे भाई कहना क्या चाहते हो आप??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
अ
अद्द्या गुरुवार, 05/12/2016 - 11:07 नवीन
त्यांना काय म्हणायचं नसतं , त्यांना फक्त अंधळा द्वेष करायचा असतो बापू :) जाऊद्या , तुम्ही कायला शक्ती आणि वेळ वाया घालवताय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
M
mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 11:10 नवीन
दोन्हीही होइल हो. शाळेत सध्या असलेली मुले आता सुधारतील. नंतर काही काळानी त्यानाही मुले होतील. ती बाय डिफील्ट जन्मापासुनच सुसंस्कारीत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 11:21 नवीन
कृपया कोणती संघ गाणी सांगू शकाल का? शालेय मुलांना शिकवू नयेत असे त्यांचे अर्थ आहेत का? संघाचे एक गाणे आपल्या आर्मीच्या मराठा लाईट इंफंट्रीच्या बँड पथकाने गेल्या महिन्याच्या 21 तारखेला रायगडावर म्हंटलेले मी स्वतः पाहिले व ऐकले आहे. हेही आपण चूक म्हणाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
स
सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 11:33 नवीन
चंद्रनील साहेब, मी "संघात असताना " तुम्ही जर खरंच संघात होतात तर संघ जातपात मानत नाही हे तुमच्या लक्षात आलं असतं. ते जर तुमच्या लक्षात आलं नसेल तर तुम्ही संघात गेलातच नाही असा आरोप करण्याचे मी धारिष्ट्य करेन. तीन पिढ्या "संघात" असलेले "ब्राम्हण" कुटुंब असा देखावा उभा करून तुम्ही एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे तो खालच्या पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. संघ पोथीनिष्ठ आहे झापडबंद आहे हे मी मान्य करेन. किंवा त्यांची वरिष्ठ पिढी पुराण मतवादी किंवा हटवादी पण आहे हे हि मान्य करेन पण संघ जातपात मानतो हे मला मान्यच नाही. आपलयाला असा अनुभव आला त्याबद्दल आपण संघातील कोणाशी चर्चा केलीत का?आपला ब्राम्हण द्वेष स्पष्ट दिसतो आहे आणि त्यात संघाला गोवण्याचा आपला प्रयत्न अतिशय हीन पातळीचा आहे एवढेच मी म्हणेन. तो पूर्ण तुमचा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे कोणी शहानिशा करण्याची शक्यता नाही अशी खेळी खेळण्यात आपला काय हेतू आहे ते मला माहित नाही. लष्करात असल्यामुळे माझा संघाशी संबंध फारसा आलेलाच नाही परंतु लातूर किंवा गुजरात येथे झालेल्या भूकंपात काम करणारे देशभरातील स्वयंसेवक मी प्रत्यक्ष पहिले आहेत . आम्ही लष्करी माणसे आपली नोकरी म्हणून तिथे भूकंप सहाय्य कार्याला गेलो होतो आणि तो आमच्या कर्तव्यच भाग होता. परंतु स्वतःच्या खिशातील पैसे टाकून हे स्वयंसेवक काय श्रद्धेने तेथे काम करत होते ते पाहिले तर हि माणसे काय मातीची घडवली गेली आहेत याचा प्रत्यय येतो. लष्कर किंवा निमलष्करी दले सोडली तर तोंड बंद ठेवून इतक्या शिस्तीत काम करणारी संघटना भारतात दुसरी नसेल असे मला वाटते. असाच अनुभव माझ्या मित्रांना सुद्धा उत्तराखंड येथे भूकंपात आणि काश्मीरच्या पुरात आला आहे. काश्मीर मध्ये तर त्यांनी तेथील जनतेला( सर्व मुसलमानच होते ) मदत केली ती तर त्यांच्यावर मुस्लीम द्वेष्टे असा जाहीर आरोप असतानाही. जर आपण डोळे उघडे ठेवून पाहण्याचा प्रयत्न केलात तर सत्यस्थिती आपल्याला जाणवेल पण केवळ द्वेषाने भारून तुम्हाला आपलेच म्हणणे खरे आहे असे म्हणायचे असेल तर मी येथेच पूर्ण विराम देतो आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/12/2016 - 11:35 नवीन
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
निशाचर गुरुवार, 05/12/2016 - 14:40 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 11:50 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अजया गुरुवार, 05/12/2016 - 12:21 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 11:52 नवीन
नेपाळ भूकंपाच्या वेळी सुद्धा जगभरातल्या मिल्ट्रीज आल्या असताना ढिगार्याखाली गाडलेल्या प्रेतांना बाहेर काढण्याचे काम करणार्या केवळ तीनच संघटना होत्या; भारतीय लश्कर, भारताची आपातकालीन सेवा संस्था आणि राषट्रीय स्वयंसेवक संघ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 11:54 नवीन
साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. म्हणजे सगळेच वैयक्तिक अनुभव खोटे नसतील पण असे बरेच 'वैयक्तिक अनुभव' लिहिले गेले की आपोआप बदनामी होतेच. टिंगल करावी असे बरेच मटेरिअल शाखेत असते. पण द्वेष करावा असे काय आहे हे समजण्या पलीकडे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाखु गुरुवार, 05/12/2016 - 12:56 नवीन
खात्रीने सांगतो ते उत्तर देणार नाहीत आणि त्यांची जाहीर पाठराखण करणारे इकडे फिरकणार नाहीत हे ही खरे मी वर विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे दिली जाणार नाहीत. ठोकुनी दे ऐसाजे आणि इतरांनी दिलेल्या अनुभवास मात्र "कल्पनाविलास" म्हणून हेटाळणे खचितच भूषणास्पद नाही. मिपा नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
M
mugdhagode गुरुवार, 05/12/2016 - 11:58 नवीन
आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती व संघटना काम करत असतात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 05/12/2016 - 12:26 नवीन
आपत्तीच्या काळात अनेक व्यक्ती व संघटना काम करत असतात .
हो ना, आलेली मदत लाटण्याची. किंवा मदत पोचायच्या आधीच त्याचे पैसे लुबाडायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode
अ
अनिरुद्ध प्रभू गुरुवार, 05/12/2016 - 12:04 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
भ
भंकस बाबा Fri, 05/13/2016 - 15:27 नवीन
मागे असाच प्रतिसाद मुग्धा घोड़ेना दिला होता. गायब झाले होते धाग्यावरुन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
किसन शिंदे Sun, 05/15/2016 - 06:21 नवीन
डाॅक्टरांचा प्रतिसाद वाचून दोन वर्षांपूर्वीची माळीण दुर्घटना आणि संघाचे कार्य आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा गुरुवार, 05/12/2016 - 12:01 नवीन
गेल्या पंधरा दिवसात एकदाही टीव्ही पहावा असे त्याला वाटले नाही. उलट त्याने शिबिरात वाचलेल्या पुस्तकांची मला माहिती दिली आणि कोणती पुस्तके विकत आणायची याची यादी मला दिली. प्रकरण फार गंभीर झालेल दिसतय गोळवलकर गुरुजींची पुस्तके तर नाहीत ना त्या यादीत ? मनुस्मृती वगैरे विषय इ.इ.
  • Log in or register to post comments
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 12:05 नवीन
मनुस्मृती गोळवलकर गुरुजींनी लिहिलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 12:04 नवीन
अप्पा मी जे काही बोललो तुम्ही त्याच धाटणी वर बोलताय असे दिसते, जर आपणांस काही प्रॉब्लम असता/आहे तर आपण थेट मला विचारलेले श्रेयस्कर कसे? उगाच पेड़गाव ट्रिप कश्याला , ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. असो. तुमचे तुमच्यापाशी, मी थेट बोलतो म्हणून विचारतो आहे हे असले प्रकार जमत नाहीत मला तरी
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 12:57 नवीन
मला तुमच्याशी काही एक प्रोब्लेम नाही. किंबहुना 'अकादमी' आणि 'एका ढिशक्यांवची कहाणी' वाचल्यापासून मी तुमचा निस्सीम 'पंखा' आहे आणि राहणार. ओके म्हणून नंतर ते प्रतिसाद वापरणे बरे दिसत नाही. धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे हे माझ्याकडून दुर्लक्षित झाले. तुम्ही ते लक्षात आणुन दिले त्याबद्दल आभारी आहे. आणि म्हणूनच 'ओके' लिहिले. बाकी इथे टिंगल टवाळी, तिरके प्रतिसाद असे प्रकार चालतातच. मी तुमचा 'पंखा' आहे म्हणून तुम्ही लिहाल ते सगळेच गोड मानून घेणे किंवा +१ करणे मला जमणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 13:34 नवीन
टिंगल टवाळी किंवा मस्करीयुक्त तिरके कळतात मला . असो बाकी माझे पंखे व्हा किंवा माझ्या म्हणण्याला +१ करा अश्या अक्षता मी कधीच कोणाला वाटलेल्या नाहीत, गैरसमज नसावा. जे आहे ते समोरासमोर , विचार पटत नसले अन तसे तोंडावर सांगितलेले चालते, नथीतुन तीर मारणे होत ही नाही अन रुचत पण नाही . आभारी आहे _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर
अ
अप्पा जोगळेकर गुरुवार, 05/12/2016 - 13:57 नवीन
मीदेखील तुमचा पंखा होतो आहे, मंजुरी द्या. असा अर्ज खरडला नाही. अर्थातच तुमचा 'पंखा' होणे/न होणे हे तुमच्या इच्छेवर अवलंबून नाही. असो.मंडळ आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 12:07 नवीन
साहेब, धाग्याची विषय वस्तू वैयक्तिक आहे त्यामुळे 'वैयक्तिक अनुभव' या नावाखाली काहीही ठोकून द्यावे असा प्रकार आहे. हे धागा लेखकाला सुद्धा लागु असेल का असा प्रश्न पडला आहे! की विरोधी काही बोलले की "वैयक्तिक अनुभव" अवतरणात टाकून गोग्गोड तितके वैलिड मानायचे हा एजेंडा आहे ते कळेना झालंय बरंका अप्पा
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 12:11 नवीन
तुम्हाला वाईट अनुभव आले की ते लोक संघाचे नसतातच मुळी. चांगले अनुभव आले तर ते लोक संघाचेच असतात. हा फॉर्मुला आहे बापुसाहेब. तुम्ही संघात जाउन तुम्हाला कळला नाही असे म्हणत असाल तर तुम्ही संघात कधी गेलेच नाही असा दावा मी धारिष्ट्याने करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 16:48 नवीन
बाकी संघ आणि भाजप म्हटल्यावर तुम्ही कसे नसणार तिथे? पण आता जरा नवीन मुद्दे आणा हो. तेच तेच मुद्दे आणि तेच प्रतिवाद वाचून कंटाळा आला. प्रत्येक सर्कशीत जोकरने त्याच कोलांट्या उड्या मारल्या तर हसू येईनासं होतं. नवीन आयटेम दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
र
राजो Fri, 05/13/2016 - 14:30 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ट
ट्रेड मार्क Fri, 05/20/2016 - 22:42 नवीन
मूळ लेखकाने संघाच्या शिबिरात त्यांच्या मुलाला संघाबद्दल आलेला अनुभव, त्यामुळे लेखकाला स्वतःला मुलात दिसलेला फरक लिहिलाय. तर चंमुंनी त्यांना स्वतःला कोणा एका व्यक्तीचा आलेला अनुभव लिहिलाय. आणि चंमुंच्या म्हणण्याप्रमाणे ती दुसरी व्यक्ती ब्राम्हण असून त्यांच्या गेल्या ३ पिढ्या संघाशी संबंधीत होत्या. याचा काही पुरावा आहे का? आता सिद्धच करायचं म्हणलं तर संघाच्या विरोधकांना एखाद्या शिबिरात जाउन शहानिशा करता येईल. चंमुंनी त्या "संघिष्ठ ब्राह्मणाच्या" वागण्याचा पुरावा द्यावा. विषय मिटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
शान्तिप्रिय गुरुवार, 05/12/2016 - 12:12 नवीन
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 12:15 नवीन
भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते.
असे संघकार्याचे ग्लोरिफिकेशन करण्याचीपण 'फ्याशन' आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शान्तिप्रिय
म
मितान गुरुवार, 05/12/2016 - 12:19 नवीन
ग्लोरिफिकेशन ???? खिक्क !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
अ
अजया गुरुवार, 05/12/2016 - 12:25 नवीन
ग्लोरिफिकेशन! संघाला गरज नव्हती आणि नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान
ब
बाळ सप्रे गुरुवार, 05/12/2016 - 12:42 नवीन
गरज नाहीच .. पण भक्तांना चैन नाही पडत हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
श
शान्तिप्रिय गुरुवार, 05/12/2016 - 12:12 नवीन
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. ता क - मी संघाचा सदस्य नाही तरिहि मी वरील बाबींशी १००% सहमत आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 12:17 नवीन
संघावर टीका करणे ही फ्याशन झाली आहे. >> आजकाल कुणावरही टिका करणे हीच फ्याशन झाली आहे संघ ही अतिशय नि:स्वार्थी सामाजिक संघटना आहे. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. भूकंप , त्सुनामी यासार्ख्या संकटात संघाने केलेली स्वयंसेवा ही केवळ उल्लेखनीय होते. >> अगदी अगदी. दुसरं कोणंच नाही जगात. महात्मा गांधी यांनी देखील संघाच्या कार्याची मुक्तकंठे प्रशंसा केली होती. >> महात्मा गांधी??? सिरियसली??? कट्टर संघभक्त आणि कट्टर गांधीद्वेष्टे असे दोन्ही एकाच वेळेस असलेले एक मिपासदस्य आहेत, सदर वाक्याची त्यांचे कडून पावती घ्यायला लागेल. संघाने राजकारणापासुन अलिप्त राहावे. >> मग कशासाठी चाललंय तर?
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 13:14 नवीन
संघ नि:स्वार्थी सघटना आहे आणि त्यांची स्वयंसेवा उल्लेखनीय आहे असे म्हणताना इतर कोणीही तसे नाही असे कुठे लिहिलेले मला दिसत नाही. हे म्हणजे अक्षय कुमार अतिशय उत्तम कलाकार आहे असे म्हटल्यावर त्याचा अर्थ इतर कुणीही उत्तम कलाकार नाही असा होत नाही. की तुम्हाला संघ आवडत नाही म्हणुन इतर कुणी त्यांच्या चांगल्या कामाची स्तुती करुच नये? की असा काही नियम आहे की एकाची स्तुती करताना त्या क्याटेगरीतल्या इतर सगळ्यांची स्तुती कंपल्सरी केलीच पाहिजे अन्यथा तो फाउल असतो. उगा कशाला त्रागा करुन घेताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ह
हकु गुरुवार, 05/12/2016 - 14:20 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
श
शि बि आय गुरुवार, 05/12/2016 - 12:34 नवीन
डॉ. खरे साहेबांशी १००% सहमत
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 15:42 नवीन
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 05/12/2016 - 17:51 नवीन
हे "विद्यार्थी लभते विद्या धनार्थी लभते धनम्" सारखं झालं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
क
कपिलमुनी Fri, 05/13/2016 - 07:40 नवीन
संघात गेल्यावर Appraisal चांगला होता का ? अखिलभारतीयबिगरअनुदानितआयटीहमालसंघटना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विवेकपटाईत गुरुवार, 05/12/2016 - 15:42 नवीन
कुणी व्यक्ती संघाची काही वर्ष संबंधित राहिला तर त्याच्या विचारात निश्चित परिवर्तन होते. संघात जाणार कधीच बेरोजगार राहत नाही. दुकानदार असेल तर त्याचे दुकान चांगले चालेले. आमच्या गल्लीत एक पटरीवर भाजी लाव्नार्याचे घर आहे. तो रोज शाखेत जातो. जिथे त्याच्या सोबतीचे भाजीवाले दिवसाला ४००-५०० कमवत असेल त्याची कमाई त्यांच्या पेक्षा दुप्पट आहे. (कारण चांगले बोलणे, व्यवहार इत्यादी बाबी न कळत शिकल्या जातात). बाकी कोणी असत्य आरोप लावणारे असतील तर त्याला काहीच करता येत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 15:51 नवीन
हे सारे बदल किती दिवस टिकतील मला माहीत नाही पण पाऊल घसरू शकणा-या या वयात संघाने मनावर बिंबवलेले संस्कार सहजी पुसले जाणार नाहीत हे नक्की ! हे उद्गार एका प्रामाणिक बापाचे आहेत असे जाणवले. बाकी संघावर केवळ टीका करणाऱ्याच्या उद्देशाने लिहिणाऱ्या लोकांचे मन बदलणे त्यांना स्वतःलाच शक्य आहे इतर कोणालाही नाही. प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ दा कृ सोमण यांचे उद्गार आजही आठवतात. आकाशातील ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत नाही पण "दुराग्रहा"चा जरूर होतो असो.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव गुरुवार, 05/12/2016 - 15:56 नवीन
संघात जात थेट विचारली जात नाही हे खरं आहे. आता तर फार विषय देखील निघत नाही. पूर्वी संघिष्ट म्हणजे ब्राह्मणी तोंडवळा असलेली संघटना असा विषय असताना संघ स्वयंसेवकांच्या घराचे जुने सदस्य जे थोडे कर्मठ होते ते त्यांच्या मानसिकतेनुसार असले प्रश्न विचारायचे. मात्र काही काळानंतर ती पिढी इन जनरल च संपल्यानंतर असे अनुभव दिसत नाहीत. यात संघाच्या हिंदू संघटन आणि संवर्धन या विचाराचा मोठा सहभाग असावा असं वाटतंय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा