तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
💬 प्रतिसाद
(135)
म
मुक्त विहारि
Fri, 05/13/2016 - 09:30
नवीन
हे सांगणारा मी पहिला....
आहाहाहाहा!!!!!!!!!!!!!
किती दिवसांनी पहिला प्रतिसाद दिला...
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 09:50
नवीन
एक दोन तीन चार
टिळकनगरची पोरं हुशार!
- Log in or register to post comments
स
स्पा
Fri, 05/13/2016 - 11:07
नवीन
स व्वा जोशी...................
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 05/13/2016 - 14:10
नवीन
+१००००००....
- Log in or register to post comments
स
स्पार्टाकस
Tue, 05/17/2016 - 21:02
नवीन
सुलतानाच्या आमदानीत शिकलेली टिळकनगरची पोरं ;)
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 05/13/2016 - 09:32
नवीन
मय बी दसवी तक मराठी मिडियममैच पढ्या!
- Log in or register to post comments
प
पथिक
Fri, 05/13/2016 - 09:36
नवीन
लोअर केजी ते २ री - इंग्लिश मिडीयम
३ री ८ वी - सरकारी मराठी शाळा
९ - १० वी - सेमी इंग्लिश
- Log in or register to post comments
ग
गौतमी
Fri, 05/13/2016 - 09:41
नवीन
फक्त आणि फक्त मराठी मिडीयम.........
- Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा
Sun, 05/15/2016 - 20:19
नवीन
फ़क्त मराठी ... पहिली ते दहावी, आणि कुठे अजिबात अड़ले नाही.
पुणेकर.
- Log in or register to post comments
स
स्वधर्म
Fri, 05/13/2016 - 09:44
नवीन
नंतर इंग्रजीतून पदव्युत्तर पर्यंत. सध्या मुले मराठी माध्यमाच्याच शाळेत.
- Log in or register to post comments
व
वेल्लाभट
Fri, 05/13/2016 - 09:49
नवीन
मराठी माध्यम. १० वी पर्यंत.
पुढे कॉलेजात इंग्रजी.
असो इतकंच विचारलंत, इतकंच सांगतो.
शंभरीवाला धागा होण्याच्या जस्ट जवळ पोचलात. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 05/13/2016 - 09:56
नवीन
मराठी माध्यम. जिल्हा परिषद प्रशाला. आवं, आत्ता जी मंडळी चाळीशी आणि पुढे असतील ती सर्व जवळ जवळ सरकारी आणि मराठी माध्यमातलीच, अपवाद असतीलही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/13/2016 - 12:08
नवीन
मयबी झेडपी शालेके मराटी माद्यममेच पढ्या. लेकिन उससे मेरा भोत लुस्कान हुव्या.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 13:43
नवीन
का तुम्ही वेगळ्या शाळेत होतात?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/13/2016 - 14:02
नवीन
पहिली ते चौथी झेडपी. पाचवी ते बारावी ना. म. जोशी ला.
आता अकरावी-बारावी नामजोशीतून वेगळे काढले आहे.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Fri, 05/13/2016 - 10:01
नवीन
शतकोत्तर धाग्यासाठी शुभेच्छा ...
तो तिकडे दुसरा एक धागा तसाच आहे तो पण बघून येतो ...
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Fri, 05/13/2016 - 10:48
नवीन
मी पदवीपर्यंत मराठी माध्यमात शिकलो, पदव्युत्तर इन्ग्लिशमध्ये.
अवांतर/जाहीरातः सहा मानवी आणि तीन संगणकी भाषा जाणतो.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 05/13/2016 - 10:53
नवीन
अबे एक उडवा की.
राम शाम दोन्ही कशे चालतील?
- Log in or register to post comments
अ
अपरिचित मी
Fri, 05/13/2016 - 11:21
नवीन
तो चुकून तयार झाला...
कसा उडवायचा सांगा न प्लीज ..
- Log in or register to post comments
अ
अपरिचित मी
Fri, 05/13/2016 - 11:21
नवीन
तो चुकून तयार झाला...
कसा उडवायचा सांगा न प्लीज ..
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 05/13/2016 - 18:56
नवीन
हिथं पन दोनदा!
- Log in or register to post comments
न
नाखु
Fri, 05/13/2016 - 11:20
नवीन
बारावीपर्यंत मायबोली, नंतर MY बोली....
अडलं नाही पण इंग्रजी पुस्तके वाचू शकलो नाही पेपर वाचण्याइतपतच प्रगती राहिली.
अपत्यांनी मराठी न सोडता इंग्रजीत प्राविण्य मिळवावे असे नक्कीच वाटते.(आणि अल्पस्वल्प प्रयत्नही चालू आहेत)
या धाग्यावर श्री रा रा धन्या,बॅट्या आणि वल्ली-चौरा प्रतिसाद अपेक्षीत.
जिवन शिक्षण मंदीर शाळा विद्यार्थी नाखु
- Log in or register to post comments
ख
खटासि खट
Fri, 05/13/2016 - 11:28
नवीन
कॉन्व्हेन्ट आणि इंग्रजी माध्यम समानार्थी शब्द म्हणून रुळलेत.
यातील कुठल्याही प्रकारातून शिक्षण झालेले नसल्याने इथे लावलेल्या सापळ्यात अडकण्याची भीती नाही.
(डिग्री दाखवा, लीविंग सर्टिफिकेट दाखवा, रोल नंबर, ओळखणारे विद्यार्थी, गुरुजी, बाई (तिथे काय म्हंतात) यांच्या साक्षी आणा... आणि शेवट पोलिसांकडून या वर्गातून त्या वर्गात टेक्नोवरात !!)
- Log in or register to post comments
स
साहेब..
Fri, 05/13/2016 - 11:33
नवीन
मराठी मिडीयम...
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Fri, 05/13/2016 - 11:34
नवीन
पाचवीपासून पुढे संपूर्ण इंग्लिश. पदवीसुद्धा इंग्लिश भाषेतील. पण मराठी वाचनाचं काही फार अडलं नाही. ;)
कुठचं माध्यम आणि काय याचा तुम्ही कसं वाचता/लिहिता याच्याशी फार संबंध नसावा..
- Log in or register to post comments
स
सूड
Fri, 05/13/2016 - 11:37
नवीन
मराठी माध्यम
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू
Fri, 05/13/2016 - 11:39
नवीन
प्राथमिक शिक्षण जि.प्र. आणि त्यानंतर रयत शिक्षण संस्थेतुन १० पर्यन्त शिकलो.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Fri, 05/13/2016 - 11:54
नवीन
पदव्युत्तर पर्यंत इंग्रजी माध्यम, बोलीभाषा मराठीच,
शाळेत फक्त सातवीपर्यंत मराठी, त्यानंतर संस्कृत त्यामुळे मराठीतून लिहितांना थोडं अवघड जातं,
लहानपणापासून मराठी वाचन आहे म्हणून बरंय.
मात्र काही 'मऱ्हाटी' माध्यमातील लोकांपेक्षा मराठी पुष्कळ चांगलंय असं म्हणता येईल :)
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Fri, 05/13/2016 - 12:00
नवीन
१ ली ते ४.५ वी - मराठी, जिल्हापरिषदेची शाळा
४.५ वी ते ७ वी - मराठी, जिल्हापरिषदेची शाळा
८ वी ते १० वी- मराठी, विद्याप्रसारक मंडळाची शाळा
११ ते १२ वी - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत)
पदवी - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत)
पदव्युत्तर - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत)
आता ठरवा व्हाट इज माय माध्यम ऑफ शिक्षण ?
मराठी - लिवाबोस
इंग्रजी - लिवाबोस
अहिराणी - लिवाबोस
हिंदी- लिवाबोस
गुजराती - वाबोस
हरियाणवी - वास
पंजाबी - स
- Log in or register to post comments
अ
अपरिचित मी
Fri, 05/13/2016 - 12:06
नवीन
हे आवडलं!!
- Log in or register to post comments
श
शान्तिप्रिय
Fri, 05/13/2016 - 12:32
नवीन
मराठी माध्यम
तुम्ही मुंबई सारख्या बहुभाषिक शहरात असलात आणि इन्ग्रजी माध्यमातून शिक्लात तर मराठीत मागे पडालच!
अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतात. पण वरील विधान ९५% खरे आहे.
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Fri, 05/13/2016 - 13:48
नवीन
आमचे शिक्षक acceleration ला असिलरेशन म्हणायचे.
Engineering ला असताना एक जण 'बाय द मी' म्हणाले होते.
आम्ही अडाणी (ते नाही नॉर्मल) च राहिलो.
- Log in or register to post comments
ब
बापू नारू
Fri, 05/13/2016 - 13:49
नवीन
जिल्हा परिषद शाळा- हौदमळा,कराड .
मळाईदेवी शिक्षण संस्था ,कराड.
- Log in or register to post comments
व
विवेकपटाईत
Fri, 05/13/2016 - 14:06
नवीन
पहाडगंजच्या शाळेत हिंदी माध्यमातून शिकलो, घरी कधी मराठीत तर कधी हिंदीत (हिंदी हि अशी कि त्यात उर्दू, पंजाबी हरियानवी शब्दांचा घोळ) विचार करायचो . आंग्ल भाषेची वैर असल्यामुळे आपले काही भविष्य नाही, पण तरीही सरकारी नौकरी साठी आंग्ल भाषेत काय ते म्हणतात आशुलीपी शिकलो. (आमचे खट्टर सर म्हणायचे was शब्दाचा अर्थ माहित नसला तरी चालेल. जे तोंडातून निघाले ते डोळे बंद करून टिपायचे. डोक्याचा वापर बिलकुल करायचा नाही, अर्थात जनकपुरी आणि टिळक नगर हून अनेक चार्टर बसेस त्यांच्या मुळे चालतात १९७० ते २००० पर्यंत १००० वर आशुलीपिक आणि २००० हून वर बाबू सरकारला पुरवले असतील, पण सकाळी ५ वाजता क्लास घायचे). काय लिहिले आहे, ते कळो न कळो पण आंग्ल भाषेतल्या आशुलीपित प्राविण्य मिळविले. मोठ्या कार्यालयात सर्वोच्च स्तराच्या अधिकाऱ्या बरोबर काम करताना विदेशी लोकांसोबत हि बोलावे लागत होते. च्यायला मी चक्क हिंदीत बोलायचो. (माझे बास दाक्षिणात्य असले तरी म्हणायचे हे ....लोक आपल्या सोबत काही आपल्या भाषेत बोलत नाही, तू हि चक्क हिंदीत बोलत जा गरज असेल तर झक मारून समजतील , किंवा हिंदी शिकतील....). मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत काम करून हि मी कधी आंग्ल भाषेचा वापर केला नाही. एक नमूद करायचे आहे, मुंबईकर मराठी माणसांसोबत मराठीत बोलायचो तरी बहुतेक वेळा उत्तर मोडक्या तोडक्या हिंदीत यायचे, कधी कधी आवर्जून सांगावे लागायचे, बाबा अशी हिंदी बोलण्यापेक्षा मराठीत बोला, मला समजते. असो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/13/2016 - 20:56
नवीन
दो दुनी चार पाहिल्यापासून दिल्लीतले ट्यूशन टीचर असेच येतात डोळ्यांसमोर!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 05/15/2016 - 07:40
नवीन
शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द भन्नाट आवडल्या गेला आहे.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 05/15/2016 - 08:33
नवीन
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 14:57
नवीन
हा अर्थ होतो त्याचा? भारी!
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 05/13/2016 - 14:23
नवीन
3 री पर्यंत झेडपी..नुकसान ना फायदा मास्तर शिकवायचे नैत मी शिकायचो नै..
पुढे सरकरी शाळा पदवी पर्यंत ..
टोटल मराठी माध्यम तरीही इंग्रजी विषय तेवढा इंग्रजीत होता आणी 10 वी ला टॉप कियेला है अंग्रेजीत..
- Log in or register to post comments
अ
अफ्रिकेचा मुम्बैकर
Fri, 05/13/2016 - 14:30
नवीन
बस काय भाऊ
मराठी माध्यम. १० वी पर्यंत.
पुढे कॉलेजात इंग्रजी.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Fri, 05/13/2016 - 17:49
नवीन
मी दहावीपर्यंत कानडी माध्यम...
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 05/13/2016 - 19:09
नवीन
सातवीपात्तूर मऱ्हाटी. मंग आटवीपास्नं धाव्वीपरेंत ईज्ञान आन घणित विंगर्जीतनं. फुडं समदं विंग्रजी.
आंतर्जालावर सुर्वातीस विंग्रजीतनं पर्तिसाद देयाचो. येके दिशी डोस्क्यास शाट लागला. म्हनलं काय म्होटी लागून गेलीये इंग्रजी? म्हराटीत काय कमीये? तिच्यातंच लिवू तिच्यायला फुल्ल पर्तिसाद. मग लागली अक्कल चालाया मऱ्हाटीत.
-गा.पै.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/13/2016 - 19:52
नवीन
आम्हाला अकरावी बारावीला रसायनशास्त्र शिकवणारे प्राध्यापक "ऑक्झॅलिक अॅसिड" चा उल्लेख विचित्र करत असत. आम्हाला ते "ओसाड ओसाड" ऐकू येत असे.
- Log in or register to post comments
अ
असा मी असामी
Sat, 05/14/2016 - 09:51
नवीन
आणि ईथेन-मीथेन चा असा काही उच्चार करायचे कि आम्ही मजेत ईथुन - मीथुन म्हणायचो.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Fri, 05/13/2016 - 20:22
नवीन
मला वाटत कुठल्या माध्यमात शिकलो यापेक्षा पाठ्य पुस्तकाबाहेर काहीतरी वाचायची गोडी लावणारे, भाषेतलं, शब्दातल सौंदर्य उलगडून दाखवणारे शिक्षक असले की भाषा सहज येते. तसे शिक्षक मिळाले म्हणून खूप नशीबवान समजते स्वत:ला :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 05/13/2016 - 20:25
नवीन
हे काम चांगली पुस्तकं करतात.
- Log in or register to post comments
म
मन्याटण्या
Sat, 05/14/2016 - 01:46
नवीन
आमच्या घरातली सध्याची पीढ़ी (पहिली ते पाचवी) जी इंग्रजी शाळेमध्ये जातात त्याना बरेच मराठी शब्द समजत नाहीत किंवा बोलताना आठवत नाहीत. मग मधेच हिंदी किंवा इंग्लिश शब्द वापरतात. टेंशन येत असल मराठी ऐकून.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 05/14/2016 - 01:52
नवीन
तुम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त शुध्द मरठीत बोलायचा प्रयत्न करा. घरात मराठी वर्तमानपत्र येत असेल तर ते त्यांच्याकडून वाचून घ्या. जे शब्द त्यांना कळत नाहीते ते समजावून सांगा.
अवांतर - माझा मित्र त्याच्या मुलाला अजिबात मराठी कळत नाही (लीहीता, वाचता, बोलता येत नाही) हे अभिमानाने सांगत होता. संतापून त्याला चार गोष्टी सुनावल्यावर बरेच दीवस बोलत नव्हता माझ्याशी...
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 05/14/2016 - 01:53
नवीन
तुमचा मित्र मराठीत बोलत नव्हता की इंग्लीशमध्ये?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Sat, 05/14/2016 - 20:34
नवीन
फक्त डोळ्यांनी बोलत होता.... :)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »