Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??

अ
अपरिचित मी
Fri, 05/13/2016 - 09:02
🗣 135 प्रतिसाद
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??

प्रतिक्रिया द्या
24067 वाचन

💬 प्रतिसाद (135)
उ
उगा काहितरीच Sat, 05/14/2016 - 03:11 नवीन
बारावी पर्यंत मराठी. पदवी , पदव्युत्तर इंग्रजी .
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/14/2016 - 03:13 नवीन
मराठी मध्यम.. स्वारी.. माध्यम! ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 04:57 नवीन
आता पर्यंत ४५ प्रतिसाद आलेले दिसतात (त्यात पुन्हा प्रतिसाद आणि अवांतरही आहेत) आणि आता पर्यंत *संपूर्ण शालेय शिक्षण केवळ इंग्रजीत झालेली १ व्यक्ती आणि बर्‍याऐकी आधीपासून म्हणजे ५ वी पासून इंग्रजीत शिक्षण १ व्यक्ति =२ या शालेय शिक्षण इंग्रजीतून या सदरात मोजता येतील असे वाटते * शालेय शिक्षण कानडी आणि हिंदीतून झालेली प्रत्येकी १ व्यक्ती =२ (धागा लेखाचा विषय वेगळा असला तरी दखल घेण्यास हरकत नसावी) म्हणजे आतापर्यंतच्या प्रतिसादातील चार व्यक्ति अमराठी शाळेतून शिक्षण झालेल्या असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Sat, 05/14/2016 - 05:28 नवीन
माझे शिक्षण ७ वी पर्यंत पूर्ण मराठी माध्यमात, ८ वी ते १० वी सेमी इंग्लिश माध्यमात (गणित आणि सायन्स इंग्लिशमधून आणि इतर विषय मराठीतून) आणि ११ वी पासून पूर्ण इंग्लिश माध्यमात झाले. तरीही माझे शिक्षण पहिल्यापासून इंग्लिश माध्यमातच व्हायला हवे होते असे फार वाटते. इंग्लिशवर चांगली कमांड यायला जी वर्षे खर्ची पडली त्या काळात जर्मन किंवा फ्रेंच अशी कुठलीतरी दुसरी भाषा कामापुरती तरी शिकता आली असती त्या काळात आणि त्याचा शिक्षण/ करिअरसाठी काहीतरी उपयोग झाला असता :)
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 05/14/2016 - 07:31 नवीन
वसंत गोवारीकरांची मुलाखत आठवतेय. "मी मराठी माध्यमातून शिकलो. भारत स्वतंत्र झाला असला तरी इंग्रजांबद्दल राग असलेले दिवस होते ते. त्यामुळे इंग्रजी विषय सुध्दा इयत्ता आठवीत सुरू झाला. पण त्यामुळे इंग्रजी शिकणे काही अवघड गेले नाही. सर्व जगभर हिंडलो पण शाळेत इंग्रजी माध्यम नसल्याची खंत वाटली नाही. इंग्रजी चांगले येण्यासाठी अगदी लहानपपणापासून इतिहास भूगोल सुध्दा इंग्रजीतून शिकायची आवश्यकता नाही." तुलनात्मक दृष्टयामराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे. लिहिणे वाचणे सोपे आहे. ऐकणेही थोड्या प्रयत्नाने जमू शकते. फक्त बोलण्याला सराव व धीटपणा लागतो व तिथेच साधारणत: घोडे पेंड खाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मुक्त विहारि Sat, 05/14/2016 - 07:43 नवीन
कसे ते सांगाल का? (अज्ञानी) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/14/2016 - 08:14 नवीन
कसं ते सांगाल काय ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
शाम भागवत Sat, 05/14/2016 - 08:36 नवीन
भाषा शास्त्रज्ञांनाच्या मते चिनी भाषा ही सर्वात अवघड. ३५२ मुळाक्षरे व त्यांचे उच्चार व लिपी. मराठीत व्यंजने व स्वर यांची संख्या त्यामानाने खूपच कमी म्हणजे अंदाजे १/६ इतकी. इंग्रजीत फक्त २६ मुळाक्षरे. प्रत्यय लावणे सोपे. मराठीच्या मानाने व्याकरण सोपे. तुलनात्मक हा शब्द या अर्थाने वापरला होता. जेणेकरून इंग्रजी भाषेची भिती कमी होईल व अगदी बालवयापासून इंग्रजी आवश्यक आहे असे वाटणे बरोबर की चूक यावरपण चर्चा होऊ शकेल. अगदी याच हेतूने गोवारीकरांचे उदाहरण दिले होते. थोडक्यात इंग्रजी जरूर शिकावी त्यात प्रभूत्व जरूर मिळवावे. पण हा सर्व प्रकार करणे अवघड आहे हा न्यूनगंड कमी व्हावा इतकाच उद्देश होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 09:48 नवीन
भाषा शास्त्रज्ञांवर नका हो ढकलू.. भाषाशास्त्र असली मिथके मानत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Sat, 05/14/2016 - 10:17 नवीन
मी नक्की हे कुठे वाचले हे नाही सांगता येणार. भाषा शास्त्रज्ञांचा केलेला उल्लेख चूकीचा असूही शकेल. पण मांडलेला मुद्दा चूकीचा असेल तर मात्र जरूर सांगा. बरोबर काय आहे हे शिकायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 10:33 नवीन
कोणतीही मानवी भाषा शिकण्यास सोपी/कठीण नसते. तसं असतं तर चिनी मुलांना बोलण्यास इंग्रजी मुलांपेक्षा जास्त वेळ लागला नसता का? ज्या भाषेचे तुम्हाला एक्स्पोजर मिळते, ती तुम्ही सहजपणे शिकू शकता. राहिला मुद्दा स्वर-व्यंजनांचा. इंग्रजीत पाचच स्वर आणि मराठीत अनेक याला काही अर्थ नाही. तुम्ही भाषा आणि लिपी यांना एक समजत आहात. आपल्या लिपींना भाषाशास्त्रामधे फारसं महत्व नाही. भाषाशास्त्रीय पद्धतीने लिहिताना International Phonetic Alphabet वापरले जाते. एका ध्वनीला एक प्रतीक अशी त्याची मांडणी आहे. कोणतीही मानवी भाषा या तक्त्यामधे मांडलेल्या चिन्हांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपल्या लिपीत दिसणार्‍या एका चिन्हाला खरं तर अनेक प्रकारे उच्चारलं जातं, जे या आयपीएचा वापर करून फोनेटिकली दाखवता येऊ शकतं. इंग्रजी सोपी वाटण्याचं कारण सरळ आहे, तिचं एक्स्पोजर जगभरातच जास्त आहे. त्याला भाषाशास्त्रीय कारण काही नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 10:35 नवीन
स्वर-व्यंजनांच्या ऐवजी तुम्ही एकूण 'मुळाक्षरे' असा शब्द वापरला आहे. पण उत्तर त्यालाही हेच राहतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
श
शाम भागवत Sat, 05/14/2016 - 11:02 नवीन
मुद्दे लक्षात आले. आता फक्त एकच मुद्दा राहिला. एखाद्या भाषेचे व्याकरण सोपे किंवा अवघड असेल तर त्याप्रमाणात भाषा शिकणे सोपे किंवा अवघड असते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 11:57 नवीन
'एखाद्या भाषेचे व्याकरण' ही लिपीसारखीच भाषेच्या आधारावर उभारलेली कृत्रिम रचना असते. वस्तुतः सामान्य मानवी भाषेचे नियम सारख्याच तत्वांवर आधारलेले असतात. त्यामुळे रचित व्याकरणांच्या अनुषंगाने भाषेचे सोपी/अवघड असे वर्गीकरणही कृत्रिम आहे. आपण भाषा शिकतो ती काही त्याच्या व्याकरणापासून नाही(इथे शाळेतील स्कोरिंगसाठी भाषा शिकवण्याची पद्धत ग्राह्य धरलेली नाही. त्या पद्धतीने 'भाषा' नाही, तर तिचं हे कृत्रिम व्याकरण समजतं फक्त). आपण आपल्या भाषेच्या नियमांच्या आधारावर दुसर्‍या भाषेच्या नियमांना अंतर्भूत करत शिकतो. इथे नियम 'देवः, देवौ, देवा:' सारखे रचलेले नियम म्हणायचे नाही आहेत मला. या नियमांची आपल्याला कदाचित जाणीवही नसते, पण तरीही आपण त्या नियमांनी बद्ध अशी भाषा वापरतो. मग ती कोणतीही का असेना..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ग
गामा पैलवान Sat, 05/14/2016 - 13:40 नवीन
पिशी अबोली, हे विधान रोचक वाटलं :
>> या नियमांची आपल्याला कदाचित जाणीवही नसते, पण तरीही आपण त्या नियमांनी बद्ध अशी भाषा वापरतो.
म्हणजेच आपण हे नियम पार आत्मसात करून टाकतो. असं असेल तर व्याकरणास कृत्रिम का म्हणावं बरं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 14:07 नवीन
मी 'व्याकरण' या संकल्पनेला कृत्रिम म्हणत नाहीये. एखाद्या स्पेसिफिक भाषेच्या व्याकरणाला कृत्रिम रचना म्हणतेय. म्हणजे, विभक्ती ही संकल्पना माहीत नसूनही बहुतांश लोक ती वापरतातच की. पण 'मराठीमधे या या विभक्ती असतात' हे विधान म्हणजे युनिवर्सल ग्रामर मधील विभक्तीच्या अमूर्त संकल्पनेला कृत्रिम रूप दिल्यासारखं आहे. सात विभक्ती आणि त्यांना दिलेली नावं ही झाली ती नियमांच्या रूपात मांडलेली कृत्रिम रचना. पण ती रचना न शिकताही आपण, किंवा कुणीही कुठल्याही भाषेचे भाषक त्या विभक्ती त्यांच्या त्यांच्या भाषेत व्यक्त करू शकतात.
म्हणजेच आपण हे नियम पार आत्मसात करून टाकतो.
मुळात आपण व्याकरणाकडे उलट्या दिशेने पाहतो. भाषेला व्याकरण बांधतं असा आपला समज असतो. पण खरं तर, भाषा व्याकरणाला बांधते. एका प्रकारची अनेक उदाहरणं बघून त्यातून एक सर्वसामान्य नियम तयार होतो. अशा अनेक नियमांनी एखादं पारंपारिक व्याकरण बनतं. पण एकूण मानवी भाषेचे सर्वत्र एकसारखे चालणारे असेही नियम आहेत. त्याच्या फीचर वॅल्यू भाषेप्रमाणे कमी-जास्त, किंवा +/- होत राहतात. भाषाशास्त्रामधे अभ्यास केल्या जाणार्‍या व्याकरणाचा अतिशय वरवरचा आणि ढोबळ अर्थ हा आहे. या नियमांची जाणीव नसूनपण आपण ते वापरत असतो. श्वसनसंस्थेबद्दल माहिती नसून श्वास घेऊ, तसंच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 05/14/2016 - 15:57 नवीन
पिशी अबोली, मला वाटतं की कृत्रिमच्या जागी मूर्त हा शब्द अधिक चपखल बसावा. व्याकरण सहजगतीने पाळता येत असलं तरी शब्दांत व्यक्त करतांना लिपीप्रमाणे मूर्त स्वरूपात आणावं लागतं. अर्थात, इथे माझी दिशा नेमकी संज्ञा वापरण्याकडे आहे. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिशी अबोली
प
पिशी अबोली Sat, 05/14/2016 - 17:18 नवीन
मी व्याकरणाची भाषाशास्त्रीय संकल्पना जी सांगितली, तिला 'मूर्त' व्याकरण म्हणणं prefer करेन. कारण अमूर्त universal grammar चं ते केवळ व्यक्त होणं आहे. पण पारंपारिक व्याकरण मात्र inductively तयार केलेल्या नियमांसाठी एक पूर्ण वेगळी शब्द-संकल्पना व्यवस्था तयार करतं. या व्यवस्थेला मूर्त म्हणण्यापेक्षा कृत्रिम म्हणणं मलातरी जास्त योग्य वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ह
हुप्प्या Sat, 05/14/2016 - 17:01 नवीन
इंग्रजी ही भाषा मराठीपेक्षा कितीतरी जास्त फोफावलेली आहे. मातृभाषा इंग्रजी नसणारे कोट्यावधी लोक ती भाषा शिकू इच्छितात. इंग्रजी शिकवणे हा भरपूर मागणी असणारा व्यवसाय आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातले बुद्धीवान लोक आपापल्या परीने डोके लढवून ही भाषा सोपी करून कशी शिकवता येईल याचे प्रयोग करत आहेत. गेले शतक दोन शतके असे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ती भाषा शिकवणे सोपे झालेले आहे. एक म्हणजे भरपूर साहित्य उपलब्ध आहे जसे पुस्तके, चित्रफिती आणि ध्वनीफिती याबरोबरच दुसरे म्हणजे इंग्रजी भाषेतल्या कुठल्या संकल्पना शिकवायला अवघड आहेत आणि त्या सोप्या कशा करता येतील यावर मोठे विचारमंथन झालेले आहे. शिकणार्‍याची मातृभाषा कोणती यावर त्याला/तिला इंग्रजीतल्या कुठल्या गोष्टी अवघड जातील ते अवलंबून आहे. पण त्यावरही भरपूर संशोधन केले गेले आहे. स्पेलिंगे आणि उच्चार कशी शिकावीत, क्रियापदे, आणि त्यांची रुपे कशी शिकावीत, ए, अ‍ॅन, दी ही आर्टिकल्स कशी वापरावीत, ह्या सगळ्या बाबी उत्क्रांत होत होत आता चांगल्याच प्रगत झालेल्या आहेत. कुठल्याही भाषेबाबत असे होऊ शकले असते जर पुरेशी मागणी असती तर. हे सगळे मराठीबाबत झालेले नाही आणि होत नाही. घरात वा आपण रहातो तिथे मराठी बोलले जात नसेल तर अन्य कुणाला ती भाषा शिकणे अवघड आहे कारण मराठी भाषा शिकण्याकरता चांगले साहित्य उपलब्ध नाही कारण अशा प्रकारच्या कौशल्याला बाजारात मागणी नाही. त्यामुळे इंग्रजी शिकणे तुलनेने सोपे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
ट
टवाळ कार्टा Sat, 05/14/2016 - 17:41 नवीन
कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर सोडला तर मराठि हि इंग्रजीच्या तोडिसतोड आहे....कुठल्याहि बाबतीत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Sat, 05/14/2016 - 18:00 नवीन
इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे. एक तर ती जास्त जुनी भाषा आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्यामुळे त्यातील साहित्य विपुल आहे. ते निर्माण करणारे प्रतिभावंतही जास्त आहेत. भाषा ही अशा साहित्यिकांद्वारे समृद्ध होत असते. नवे शब्द, नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी, नव्या परिभाषा अशा अनेक नव्या गोष्टी अशा प्रतिभावंत लोकांमुळे भाषेत निर्माण होतात. उदा. शेक्सपियरने अनेक नवे शब्द जन्माला घातले आहेत. पूर्वग्रह बाजूला ठेवून अशी तुलना करून बघा की इंग्रजी लिहिणारे किती साहित्यिक आज जगात आहेत आणि मराठी लिहिणारे किती? ह्या तफावतीमुळे मराठी इंग्रजीपेक्षा खूपच मागे आहे. एक तटस्थ परीक्षक म्हणून असे म्हणेन की इंग्रजी हिमालय असेल तर मराठी पुण्याची पर्वती म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. Sat, 05/14/2016 - 18:06 नवीन
सोडा बर तटस्थपणा. आपलीय ना. बाससस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सतिश गावडे Sat, 05/14/2016 - 18:08 नवीन
मला मराठीबद्दल आदर आहे, अभिमान आहे. अगदी मराठी भाषिक मुलांचे शालेय शिक्षण मराठीतूनच व्हावे या मतासाठी आग्रही आहे. तरीही मराठी ही इंग्रजीच्या तोडीची भाषा आहे हे मुळीच पटत नाही. हुप्प्या यांच्या प्रतिसादाशी मी पुर्ण सहमत आहे. प्रगत तंत्रज्ञान किंवा विज्ञान विषयक काही वाचावयाचे झाल्यास मराठीच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवू लागतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ट
टवाळ कार्टा Sat, 05/14/2016 - 19:00 नवीन
अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को मै क्या बोल्या वो नै सम्झ्या मला म्हणायचे होते कि quantity बघता इंग्रजीत निश्चितच जास्त साहित्य आहे कारण इंग्रजी जाणणारे लोक जास्त आहेत...पण साहित्यप्रकारांतले वैविध्य हे दोन्ही भाषांत जवळपास सारखेच आहे...तंत्रज्ञान युरोप्+अमेरिकेत शोधले गेले म्हणून ते इंग्रजीत आहे...पण तेच जर इथे शोधले गेले असते तर ते मराठित असते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 05/14/2016 - 19:19 नवीन
मुद्दा कळला. >>पण तेच जर इथे शोधले गेले असते तर ते मराठित असते आहे की. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Sat, 05/14/2016 - 19:40 नवीन
आहे की. :)
sarcasm??? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हुप्प्या Sat, 05/14/2016 - 21:59 नवीन
इंग्रजी भाषेतील वैविध्य अफाट आहे. मराठी भाषा त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. उदा. प्रवासवर्णन. जगभरातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याविषयी प्रवासवर्णन ह्या प्रकारचे साहित्य हे इंग्रजीत प्रचंड आहे. अगदी १००-२०० वर्षापूर्वीचीही पुस्तके आहेत. उदा. रिचर्ड बर्टनने इजिप्त, नाईल नदी, सौदी अरेबिया अशा कितीतरी भागात जाऊन प्रवासवर्णन लिहिले आहे. कित्येकदा भारत वा महाराष्ट्रातील जागांची वर्णने ही इंग्रजी पुस्तकात जास्त खोलात जाऊन केलेली आढळतात. १९०० साली "ए फरगॉटन एम्पायर" ह्या नावाचे विजयनगरच्या साम्राज्याचे वर्णन एका इंग्रज लेखकाने पुस्तकरुपाने प्रकाशित केले आहे. जिम कॉर्बेटचे शिकारीच्या निमित्ताने केलेले प्रवासवर्णन हे अजून एक. हे सगळे मूळ इंग्रजीत होते. मराठीत गोडसे भटजींचे प्रवासवर्णन, मुंबईचे वर्णन अशी मोजकीच प्रवासवर्णने आहेत. आधुनिक काळातली पु. ल. देशपांडे, अत्रे, ग. दि. माडगूळकर, मीना प्रभू अशी काही नावे आठवतात. पण त्या मानाने ही संख्या खूप कमी आहे. अफ्रिका, दक्षिण अमेरिका, दोन्ही ध्रुव, अशियातील (इंग्रजांना) अपरिचित भाग इथे जाऊन इंग्रजी लेखकांनी आपले अनुभव लिहिले आहेत. मराठी भाषेत अशा प्रकाराची वानवा आहे. तीच गोष्ट इतिहासाची. तीच गोष्ट तत्त्वज्ञानाची, तीच गोष्ट भाषाशास्त्राची. माझे असे आव्हान आहे की कुठलाही विषय निवडा आणि त्यात मराठी आणि इंग्रजीतले वैविध्य सारखेच आहे हे सिद्ध करा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ग
गॅरी ट्रुमन Sun, 05/15/2016 - 16:48 नवीन
इंग्रजी भाषेतील वैविध्य अफाट आहे. मराठी भाषा त्याच्या पासंगालाही पुरणार नाही......अफ्रिका, दक्षिण अमेरिका, दोन्ही ध्रुव, अशियातील (इंग्रजांना) अपरिचित भाग इथे जाऊन इंग्रजी लेखकांनी आपले अनुभव लिहिले आहेत. मराठी भाषेत अशा प्रकाराची वानवा आहे....तीच गोष्ट इतिहासाची. तीच गोष्ट तत्त्वज्ञानाची, तीच गोष्ट भाषाशास्त्राची.
छ्या हुप्प्याराव. तुम्हाला मराठी बाणा अजिबात दिसत नाही. हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको. (मराठी बाणे वगैरे गोष्टींना फाट्यावर मारणारा) ट्रुमन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Sun, 05/15/2016 - 19:21 नवीन
जरी मी इंग्रजीचे श्रेष्ठत्व मान्य करत असलो तरी माझे मराठीविषयीचे ममत्व कमी होत नाही. म्हणजे ओबामाचे व्हाईट हाऊस (किंवा प्रणव मुखर्जी रहातात ते राष्ट्रपती भवन) कितीही भव्य, दिव्य, सुंदर असले तरी आपले घर ते आपले घर! इंग्रजी कितीही थोर असली तरी ती एक परकी भाषाच रहाणार. ती (माझ्यासाठी) मराठीचे स्थान घेऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
वपाडाव Tue, 05/17/2016 - 06:53 नवीन
Lovely प्रतिसाद...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
मृत्युन्जय Tue, 05/17/2016 - 09:48 नवीन
माफ करा पण मर्यादा मराठी भाषेच्या नसुन मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आहेत. "लेखन"हे भाषेचे केवळ एक माध्यम आहे. एक भाषा म्हणुन मराठी नक्कीच इतर कुठल्याही भाषेएवढीच किंबहुना बर्‍याच भाषांपेक्षा जास्त समृद्ध आहे. इंग्रजी भाषेतुन अधिक प्रमाणावर लोक साहित्य निर्मिती करत आहेत किंवा काही प्रकरचे लेखन आजवर केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे या कारणासाठी मराठी भाषा इंग्रजी पेक्षा कनिष्ठ ठरत नाही. अभिव्यक्तीच्या संदर्भात मराठी भाषा इंग्रजी इतकीच समृद्धी आहे आणि एक परकीय भाषा म्हणुन बर्‍याच गोष्टी इंग्रजीमध्ये मला तरी तितक्या परिणामकारकरित्या मांडता येत नाहित त्यामुळे माझ्यापुरती तरी मराठी जास्त समृद्ध देखील आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आदूबाळ Tue, 05/17/2016 - 13:34 नवीन
+१. जबरदस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मराठी कथालेखक Tue, 05/17/2016 - 15:44 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 18:08 नवीन
इंग्रजी ही ..................एक तर ती जास्त जुनी भाषा आहे.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
स
सतिश गावडे Sat, 05/14/2016 - 18:10 नवीन
चित्राचा वापर अनाठायी झाला आहे असे वाटते. हुप्प्या यांचा "जास्त जुनी" हा भाग वगळता प्रतिसाद पटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 18:21 नवीन
त्यांना संदर्भ तर शोधून पाहूद्यात, मिळेलही कदाचित.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ह
हुप्प्या Sat, 05/14/2016 - 18:35 नवीन
मराठी भाषेतील साहित्य म्हणायचे तर ते १२ व्या आणि १३ व्या शतकापासून आढळते. त्याआधीचे शिलालेख जे काही लोकांच्या मते मराठीत आहेत तर काहींच्या मते प्राकृतमधे आहेत असे सापडलेले आहेत. इंग्रजीचे काय? इंग्रजीतले जुन्यात जुने साहित्य हे ८ व्या शतकात आढळले आहे. ७ व्या शतकातील इंग्रजीचे साहित्यही आढळलेले आहे असे काही लोकांचे मत आहे. त्यामुळे इंग्रजी साहित्याचे वय हे मराठीपेक्षा ५०० वर्षांनी जास्त आहे. आता बोलीभाषा नक्की कधी बोलली जात होती, इंग्रजी कशाला म्हणायचे, प्राकृत आणि मराठी ह्यातील सीमारेषा कुठली हे सगळे प्रश्न सोडवणे अवघड आहेत. पण प्रस्तुत पुराव्यावरून तरी इंग्रजी ही मराठीच्या आधी बोलली जात होती असे वाटते. विकीवरती ही माहिती मिळाली आहे. तुम्हाला वेगळी माहिती असल्यास त्याचे संदर्भ द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
अभ्या.. Tue, 05/17/2016 - 15:49 नवीन
ओ माहीतगार साहेब, राग येणार नसेल तर एक सांगतो, हे चित्र बदला राव. कसले बोगस केलेय. ग्राफीक्स भंगार, टेक्स्ट नॉन रीडेबल, कलरपण इतका भडक निवडलाय. का आवडते तुम्हाला हे चित्र? अगदी प्रेमाने जिथे तिथे टाकता. वाटल्यास एखादे छोटेसे ग्राफीक्स करुन देउ का मी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
आ
आदूबाळ Tue, 05/17/2016 - 16:30 नवीन
या चित्राला घाबरून/वैतागून/नॉशियाटिक होऊन लोक संदर्भ देतील अशी ऐड्या असावी. तू चिकनं ग्राफिक बनवून दिलंस आणि लोकांनी वा वा म्हटलं पण संदर्भ दिला नाही तर काय उपयोग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
झ
झेन Sun, 05/15/2016 - 08:40 नवीन
इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे ? अहो कसं शक्य आहे एक तर पुण्यामध्ये जास्त मराठी बोलली जाते, इथेच सगळे संपते. झालच तर मिपा पण मराठीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 08:11 नवीन
...आणि ११ वी पासून पूर्ण इंग्लिश माध्यमात झाले. तरीही माझे शिक्षण पहिल्यापासून इंग्लिश माध्यमातच व्हायला हवे होते असे फार वाटते. इंग्लिशवर चांगली कमांड यायला जी वर्षे खर्ची पडली त्या काळात जर्मन किंवा फ्रेंच अशी कुठलीतरी दुसरी भाषा कामापुरती तरी शिकता आली असती त्या काळात आणि त्याचा शिक्षण/ करिअरसाठी काहीतरी उपयोग झाला असता :)
:) या पेक्षा मातृभाषाच इंग्रजी असतीतर ? (ह. घ्या, उपहासा बद्दल क्षमस्व)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
असंका Sat, 05/14/2016 - 08:17 नवीन
+१.. अगदी हेच मनात आलेलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन Sat, 05/14/2016 - 12:01 नवीन
या पेक्षा मातृभाषाच इंग्रजी असतीतर ?
इंग्रजी मातृभाषा असती तर काय फरक पडला असता? इतरांचे माहित नाही पण माझ्यात अजिबात काहीही फरक पडला नसता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
अ
असंका Sat, 05/14/2016 - 12:14 नवीन
मारवा यांनी एक धागा काढलेला ज्यान अनेक सूक्ष्म विनोद होते. त्यात एक होता 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? त्याचं उत्तर पण त्यांनी दिलेलं इथे- http://www.misalpav.com/comment/745394#comment-745394 त्याखाली मी लिहिलेलं की काही कळलं नाही. पण बहुतेक आता मला म्हणता येइल की कळलं म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Sat, 05/14/2016 - 12:16 नवीन
पण बहुतेक आता मला म्हणता येइल की कळलं म्हणून.
म्हणा की मग. हू केअर्स?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
अ
असंका Sat, 05/14/2016 - 12:18 नवीन
द वन हू रीप्लाइज नन्दलेस..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 12:54 नवीन
इंग्रजी मातृभाषा असती तर काय फरक पडला असता? इतरांचे माहित नाही पण माझ्यात अजिबात काहीही फरक पडला नसता.
आमची एक धागा जाहीरात: इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ए
ए ए वाघमारे Sat, 05/14/2016 - 06:44 नवीन
०१ली ते ०७वी पूर्ण मराठी ०८वी ते १०वी सेमीइंग्लिश (म्हणजे सायंस व मॅथ्स) नंतर बारावी,पदवी(अभियांत्रिकी) व पदव्युत्तर(कॉमर्स) पूर्ण इंग्रजी. पण इंग्रजीची कधी अडचण भासली नाही.कारण सुदैवाने घरचं चांगलं वातावरण आणि चांगले शिक्षक. एकदाच फक्त राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राराष्ट्रातील वाद असे सांग़णार्‍या इतिहासाच्या शिक्षिकेशी पाला पडला. बाकी आजवरचं सगळं लिखाण मराठीतच. आजही नोकरी ऑफिशियली इंग्रजीत असली तरी प्रत्यक्ष संवाद मराठीतच चालतात.पण प्रॅक्टीकल विचार केला तर आज इंग्रजी येणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 05/15/2016 - 05:49 नवीन
कोपरापासून नमस्कार तुमच्या या बाईंना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/14/2016 - 07:08 नवीन
१० वी पर्यंत शुद्ध मराठी माध्यम. अभियांत्रिकी पदविका+ पदवी मिंग्रजी, हिंग्रजी, इंग्रजी अश्या त्रैभाषिक वातावरणात शिकलो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा