तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
💬 प्रतिसाद
(135)
अ
असंका
Sat, 05/14/2016 - 08:35
नवीन
सहमत..स्टॅमिना बद्दल सोडून- ते जरा थट्टा केल्यासारखं वाटू शकतं.
मी या गोष्टीवर विचार केला नाही. करायची इच्छा कधी झालीच नाही. केला तरी असा निष्कर्ष काढता येइल असं वाटत नाही.
पण एक धागा काढून प्रत्यक्ष माहिती मिळवण्याच्या आपल्या इच्छेचा आणि प्रयत्नांचा आदर वाटतो.
कुठे चाललोय आपण काही कळेना.
...
खरी रीअॅक्शन- "ऑ ?"
तोंडदेखली रीअॅक्शन- "अरे वा! नशिबवान आहात! हार्दिक अभिनंदन.."
चांगलं सांभाळून घेतलंत. ओके.
मी पण अनेकदा थक्क झालोय. मुजरा करत नाही कारण कल्पना आपली आहे आणि मी इथे डल्ला मारल्यासारखे होइल.
आता खरं धर्मसंकट सुरु झालंय.
म्हणजे ज्या ज्या कुणी इथे उत्तर देणं अपेक्षित आहे, त्या सगळ्यांची अशी खात्री पटलेली असायला हवी की त्यांना किंवा त्यांच्या लेखनशैलीला पाहून आपण थक्क झाला आहात आणि वरून जो मुजरा देत आहात तो त्यांच्यासाठीच आहे!!
अवघड आहे.
- Log in or register to post comments
अ
अपरिचित मी
Sat, 05/14/2016 - 10:11
नवीन
माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून दिलेल्या स्पष्टीकरणा बद्दल आभार! मुजरा नाही म्हणणार..जरा अतीच होईल.. भा.पो.माझ्या तुमच्या पर्यंत..
राहिला प्रश्न प्रतिक्रियांचा... तर तो फक्त english माध्यमात शिकलेल्या व्यक्तिंनी देणे अपेक्षीत होते.. तरीही या निमित्ताने सगळे एकमेकांशी संवाद साधत असतील तर माझी त्यास काहीच हरकत नाही.. उलट आनंदच आहे...
माहीतगारांनी दिलेल्या माहितीस धन्यवाद!! तुमचं परीक्षण खूप आवडलं!!!! :)
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 05/14/2016 - 10:28
नवीन
कसचं कसचं... ;)
- Log in or register to post comments
अ
अविनाशकुलकर्णी
Sat, 05/14/2016 - 10:44
नवीन
मी मराठी माध्यमातुन शाळा शिकलो..पण मुलाना convent school म्धे शिकवायचे वा प्रवेश मिळाला नाहि तर नुमवी..आदी मराठी माध्यमाच्या शळेतुन असे ठरवले..सुदैवाने मुला मुलीना convent school शाळेत प्रवेश मिळाला.
मुली पुण्याच्या सेंट हेलेना.व मुलगा बिशप शाळेत शिकला..
आता मुले परदेशी असतात..
मात्र मुलीला सांगीतले आहे नातवाला harvard school of business मधुन मास्टर कर म्हणुन..
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Sat, 05/14/2016 - 12:29
नवीन
सातवीपर्यंत पालिकेच्या शाळेत शिक्षण झाले. पुढे दहावीपर्यंत शहरातल्या नामवंत मराठी शाळेत शिकलो. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे पुढील संपूर्ण शिक्षणही मराठीतूनच झाले.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 05/14/2016 - 14:35
नवीन
झेडपी तच सारं श्री क्शान झालंय जी
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sat, 05/14/2016 - 14:36
नवीन
*शिक्शान
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 05/14/2016 - 15:42
नवीन
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही मरठीतून!
- Log in or register to post comments
र
रेवती
Sat, 05/14/2016 - 15:42
नवीन
मी अंगठेबहाद्दर आहे, तीही मराठीतून!
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 15:49
नवीन
=))
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/15/2016 - 05:51
नवीन
आणि मराठीतून एकदा वारल्या गेले आहे. ))
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sat, 05/14/2016 - 15:44
नवीन
एखादा दुसरा विषय सोडला तर पूर्ण शिक्क्षण मराठीतून पदवी पर्यन्त.
मराठी माध्यमाबद्द्ल आग्रही. पण त्याची कारणे सांस्कृतिक.
हिंदी भाषेबद्द्ल पुरेसा आदर.
मात्र...... मात्र ,,,इथेच घोडे पेंड खाते. .....वापरायला सर्वात आवडते इंग्रजी. स्पेलिंग हा एक मोठाच दोष त्या भाषेत आहे.
श्लेष हाही दोष आहे पण हा दोष बहुदा सर्वच भाषांमधे आहे.
जोडून काढता येते म्हणून रोमन लिपीबद्द्ल तसेच मोडी बद्द्ल सन्मानाची जागा. पण देवनागरी सर्वात क्लास !
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sat, 05/14/2016 - 23:11
नवीन
पिशी अबोली,
तुमचा इथला संदेश वाचला. युनिव्हर्सल ग्रामर म्हणजे नक्की काय? जरा विस्ताराने ही संकल्पना सांगणार का? विकीवरचा लेख वाचला पण डोक्यावरून गेला. वेगळा धागा उघडलात तर सोन्याहून पिवळं.
आता तुमच्या विधानाकडे वळतो :
inductively म्हणजे काय? व्याकरण हे आपोआप उत्क्रांत होत असतं ना? कोणी एका माणसाने बनवलेलं नाही. मग ते कृत्रिम कसं?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sun, 05/15/2016 - 09:02
नवीन
इथे हे खूप अवांतर होतंय. खवमधे बोलू.
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 05/17/2016 - 07:12
नवीन
आम्हाला रेडी टु ईट रेशीपी मिळते ना पण...
खवउपा करण्याची वेगळी गरज पडणार नाही...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sun, 05/15/2016 - 07:43
नवीन
पहिली ते दहावी शुद्ध मराठी माध्यम. अकरावीपासून पुढे पदवीपर्यंत मिंग्रजी, इंग्रजी आणि हिंग्रजी. पदव्युत्तर काळात मात्र इंग्रजीच.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sun, 05/15/2016 - 08:06
नवीन
पहिली ते दहावी, अकरावी-बारावी मिंग्रजी. पदवीला पहिल्यावर्षी इंग्रजीतून गप्प बसायचो!* ;)
नंतर गाडी सुमाट सुटली ती अमेरिकन अॅक्सेंट्पाशी येऊनच थांबली आहे सध्या!
(*कल्पना श्रेय डॉ.अनिल अवचट)
(हाडाचा मराठी)चतुरंग
- Log in or register to post comments
म
मनीषा
Sun, 05/15/2016 - 08:44
नवीन
चांगले शिक्षण घेण्यासाठी, ज्या भाषेच्या माध्यमातून शिकायचे ती भाषा उत्तम प्रकारे अवगत असणे जरूरीचे आहे असे वाटते. सध्याच्या काळात गणित आणि शास्त्र (जीव, भौतिक, रसायन इ.) साठी इंग्रजी येणे अनिवार्य आहे. पण बाकीचे विषय मातृभाषेतून शिकायला काय हरकत आहे ?
माझे १०वी पर्यंतचे शिक्षण संपूर्ण मराठीत .
११ वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन .. संपूर्ण इंग्रजी .
- Log in or register to post comments
न
नमकिन
Sun, 05/15/2016 - 09:33
नवीन
कॅानव्हेंटवाले बहुधा इथे वावरत नसावेत. फारच "प्रॅक्टीकल" असावेत
- Log in or register to post comments
न
नमकिन
Sun, 05/15/2016 - 10:50
नवीन
सौ खरे कॅनव्हेंट शिक्षित आहेत, पण बहुतेक मिपावर थेट लिहित नाहींत, माईसाहेबांसारखंच प्रकरण.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 05/15/2016 - 11:26
नवीन
त्यात काय एवढे, मीपण हाय. कॉलेज ला मराठी मिडीयम असले तरी मी एकटाच इंग्लिश थिअरी पेपर दिलेला.
काय विशेष नसते. इंग्लिश माझं पण कच्चे आहे, मराठी बरे आहे.
- Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर
Sun, 05/15/2016 - 12:48
नवीन
चौथीपर्यंत मराठी माध्यम. पाचवीपासून इंग्रजी.
इंग्रजीत शिक्षण सुरू झाल्यापासून जो त्रास होतोय त्याच्या बद्दल एक लेख मी मिपावर प्रकाशित केला होता.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 05/15/2016 - 16:46
नवीन
इंग्रजी स्पेलिंग्ज इतकी तर्कशून्य का?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Mon, 05/16/2016 - 04:48
नवीन
हि रिपोर्ट कुठे पाठवायचा आहे? या माहितीचं काय करणार?
- Log in or register to post comments
भ
भीमराव
Mon, 05/16/2016 - 12:31
नवीन
मास्तर कृपेने आम्ही इंजिनेरींग सुद्धा मराठीत घोळलेल्या कुठल्याशा भाषेत शिकलोय, बाकी झेडपी व नंतर कभापावि मधे मराठी जमेल तशी या माध्यमामधुन १० वी पर्यंत कसेबसे पोहोचलो
- Log in or register to post comments
स
स्वीट टॉकर
Mon, 05/16/2016 - 15:42
नवीन
हो. बरोबर आहे. तोच लेख.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Mon, 05/16/2016 - 15:52
नवीन
खुद्द कॉन्वेंट अन त्यातही प्रॉपर सेंट फ्रांसिसचा :P
पण संस्कृत प्रचुर मराठीत संभाषणास प्रत्यव्याय नाही !त्याचं काय न 5 तास शाळेत पाठवतो आम्ही म्हणून आमच्या आई बापाने उरलेल्या 19 तासात आम्हाला असेच मोकाट सोडले नाही उत्तम जेवण जेवायची कला शिकवली, खड्या आवाजात रामरक्षा शिकवली, ती पुर्ण आरोहअवरोहासकट नीट जमेपर्यन्त घोटून घेतली नंतर योग्य वयात हातात पुस्तके दिली चांगल्या लेखांची अन लेखकांची ओळख करुन दिली त्यामुळे हिंदी मराठी उत्तम झाली आमची.
माझ्या स्वतःच्या उदाहरणावरुन तरी मी हेच म्हणतो कॉन्वेंट/मराठी/हिंदी माध्यमाने फरक पडत नाही पोरे 19 तास आपल्या हाती असतात वेळेचा सदुपयोग करणे शिकवले की इंग्लिश पण उत्तम होते अन मातृभाषेशी असलेली नाळ सुद्धा घट्ट होते.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 05/17/2016 - 07:38
नवीन
सहमत. घरात काय नि कसे बोलले जाते ह्यावर सगळे अवलंबुन आहे. जन्मभर मराठीत शिकुन अत्यंत भिकार मराठी असणारे अनेक लोक परिचयात आहेत.
मी पहिली ते सातवी - मराठी
आठवी - दहावी - सेमी इंग्लिश
पुढे सर्व शिक्षण इंग्रजीत..
- Log in or register to post comments
म
महामाया
Mon, 05/16/2016 - 16:30
नवीन
जन्मस्थान नागपूर आहे. आई सर्वात मोठी. म्हणून वर्षांतून एक चक्कर नागपूर चा व्हायचाच. तिथे वास्तव्या दरम्यान आसपास आढळणारं वाचण्यासारखं सगळं साहित्य मराठीत असे. अगदी वर्तमानपत्रां पासून मामे-मावस भावांच्या शाळेच्या पुस्तकां पर्यत. मराठी वाचायची सवय तिथूनच जडली. पुढे वसंतरावांच्या नाट्य गीतांमुळे, माणिक वर्मांच्या भावगीतांमुळे मराठी भलतीच आवडू लागली. पुढे लाइब्ररीतील मटा मधे पानभरुन लेख दिसला-अभी तो मैं जवान हूं...लेख आवडला...त्या दरम्यान त्यांत प्रकाश जाेशींचं सदर येत असे...त्यासाठी मटा घेटला. तर पंधरा दिवसांत गोविंद तळवळकरांनी आपलंसं करुन टाकलं...मराठी किती सोपी आहे...हे त्यांनीच ठसवलं मनांत...एकूण शिक्षण हिंदी मीडियम...
http://www.aisiakshare.com/node/5039
- Log in or register to post comments
च
चंद्रनील मुल्हेरकर
Tue, 05/17/2016 - 10:05
नवीन
गोड गैरसमज आहे ,इंग्रजी भाषा मुळातच अवघड आहे,भारतीय भाषा व इंग्रजी यांच्यात साम्य कमी असल्याने इंग्रजी शिकणे अवघड पडते.
इंग्रजी शिकायला व ती फाडफाड बोलायला मुळातच माणुस हुशार लागतो.सिंम्पल टेन्सच्या पलिकडे बहुतेकांची झेप जात नाही याचे कारण इंग्लिशमधले modality ,conditionals,would should could या ऑक्झीलरी वर्बचा अनियमीत वापर बहुतेकांच्या डोक्यात शिरत नाही.तो शिरायचा असल्यास मुळातच माणुस हुशार हवा .कॉन्व्हेंटला घातल्याने आपली मुले फाडफाड इंग्लिश बोलतील या गैरसमजातून बाहेर यायला हवे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/17/2016 - 10:38
नवीन
पिशी अबोली हाजीर होsssssss
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Tue, 05/17/2016 - 10:37
नवीन
पिशी अबोली हाजीर होsssssss
- Log in or register to post comments
व
विटेकर
Tue, 05/17/2016 - 12:00
नवीन
१ली ते १० वी - मराठी
११ - १२ - पदविका - अभियांत्रिकी पदवी / व्यवस्थापन पदव्यूत्तर - इंग्रजी
आणखी एक पदव्युत्तर - मराठी
विद्यावाचस्पती ( पूर्ण व्हायची आहे ) - इंग्रजी
मराठीत शिकल्याने शष्प देखील फरक पडला नाही. मात्र इंग्रजी वाचन / चित्रपट पाहणे खूप कमी आहे
- Log in or register to post comments
र
रणजित चितळे
Tue, 05/17/2016 - 12:31
नवीन
मी डोंबिवलीत साऊथ इंडीयन इंग्लीश मीडियमचा
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 05/17/2016 - 13:36
नवीन
मेंदूच्या विद्युत-रासायनिक संकेतभाषेत शिकलो. आमच्या ब्रोकाज एरियात मराठी व इतर भाषा थोड्या कालांशाने साठवल्या गेल्याने डॉमिनंट वा प्रमुख भाषा ही मराठी म्हणता येईल.
बाकी धेडगुजरीपणाचं म्हणाल तर त्याला आमच्या मेंदूचा वेर्निकेज एरिया जबाबदार आहे बुवा. ;-)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3