Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल

श
श्रीगुरुजी
Wed, 05/18/2016 - 11:29
🗣 231 प्रतिसाद
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. _________________________________________________________________ (१) तामिळनाडू २०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २३४ अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १) द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३) भाजप व इतर पक्ष - ० २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ३९ अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७ सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४ न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४ चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१ अ‍ॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४० सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८ मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे. तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे. _________________________________________________________________ (२) केरळ २०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४० संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७) डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५) भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - २० काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते) सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १ भाजप - ० (१०.३० % मते) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १ सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ० सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ० २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३ सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४ टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८ चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२ केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे. _________________________________________________________________ (३) पश्चिम बंगाल २०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - २९४ तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते भाजप - शून्य जागा, ४.०६% मते बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - ४२ तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते) २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३ नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८ एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११० सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९ टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२० चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९ पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्‍याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. _________________________________________________________________ (४) आसाम २०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते. एकूण जागा - १२६ काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती. एकूण जागा - १४ काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १ २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६ सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६ नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २ एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १० २०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज आजतक-अ‍ॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३ एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३ सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१ न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७ चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७ _________________________________________________________________ बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल. एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
वर्गीकरण
राजकारण
निवडणुक
निकाल
विधानसभा

प्रतिक्रिया द्या
35802 वाचन

💬 प्रतिसाद (231)
ऋ
ऋषिकेश Wed, 05/18/2016 - 13:43 नवीन
सी एस् डी एस ने या वेळी एज्झिट पोल्स घेतलेत नाहित काय? ही एक त्रस्यस्थ आनि बर्‍यापैकी विश्वसनीय संस्था आह (योगेन्द्र यादव यात असेपर्यंत तरी होती.)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/18/2016 - 17:24 नवीन
सी एस डी एस चे सर्वेक्षण कोठेही दिसले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 04:30 नवीन
हे लिहिताक्षणी मतदानयंत्रे उघडली जाऊन मतमोजणीला सुरवात होत आहे. पहिले कल दहा मिनिटात हाती येतील.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 04:45 नवीन
पहिला अर्धा तास पोस्टल मते मोजली जातात आणि या मतांचा आकडा फार जास्त नसतो. त्यामुळे पहिल्या अर्ध्या तासात आलेले कल तितकेसे प्रातिनिधीक नसतात. मी २०११ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह बघितले नव्हते. आताच टाईम्स नाऊवर चर्चा झाली की त्यावेळी पहिल्या अर्ध्या तासात पोस्टल मतांमुळे तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीवर होता.पण नंतर मशीनमधली मते मोजली जाणे सुरू झाल्यावर अण्णा द्रमुकने मुसंडी मारली. NDTV वर सांगितले की केरळमध्ये एका मतदारसंघात कॉंग्रेस आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. (पोस्टल मतांमध्ये)
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 04:58 नवीन
पहिले कल हाती आले आहेत. मी टाईप करण्यापेक्षा एका जेपीजी इमेजमध्ये सर्व माहिती कळेल अशा पध्दतीने इमेज पेस्ट करत आहे. त्यामुळे पोस्ट करण्यात थोडा उशीर होईल (काही मिनिटांचा) Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 05:32 नवीन
सकाळी ८.५८ वाजता पुढील कल उपलब्ध आहेत: Image removed. आताचे चित्रः १. पश्चिम बंगाल: तृणमूलचा जबरदस्त स्वीप २. तामिळनाडू: अण्णा द्रमुकची कामगिरी द्रमुकपेक्षा जास्त चांगली. जयललिता जिंकल्यास आश्चर्य वाटू नये. ३. आसामः भाजपची जोरदार मुसंडी ४. केरळः डावी आघाडी पुढे. हे लिहिताक्षणी भाजपने केरळमध्ये ५, बंगालमध्ये ६ तर तामिळनाडूमध्ये १ जागेवर आघाडी घेतली आहे. भाजपचा "उत्तर भारतीय जनता पार्टी" हा टॅग काही प्रमाणात पुसायला या निकालांमुळे मदत होईल असे दिसते. एकूणच अमित शहा आतापर्यंतच्या कलांवरून खूष असतील.
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा गुरुवार, 05/19/2016 - 05:49 नवीन
आसाम-भाजप सत्तेत येण्याची शक्यता बंगाल-भाजपची वाढती टक्केवारी केरळ-भाजपचा चंचुप्रवेश (रूझान के अनुसार)
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 05/19/2016 - 06:04 नवीन
आसाममध्ये विजय, केरळात डाव्यांचा विजय, आणि जयललिथाचा-ममतांचा विजय ही भाजपासाठी विन-विन सिचुएशन आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 06:13 नवीन
सहमत आहे. जयललितांचा तामिळनाडूत विजय झाला तर तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये जयललिता स्वत:ची दावेदारी सांगणारच. ममता, नितीश आणि नवीन पटनायक हे नेते पण त्या शर्यतीत असणारच आहेत. त्यात भरीस भर म्हणून केजरीवालही असणारच आहेत. तेव्हा विजय मिळविल्यामुळे आपले वाढलेले इगो घेऊन हे सगळे नेते आपली दावेदारी नेतृत्वासाठी सांगायला लागले तर २०१९ मध्ये तिसऱ्या आघाडीमध्ये हे सगळे नेते एकत्र आले तरी हे किती वेळ एकत्र राहणार हा प्रश्न उभा राहिलच. आणि लोकसभा जागांच्या दृष्टीने बंगाल आणि तामिळनाडू ही मोठी राज्ये आहेत. त्यामुळे नितीश कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांच्यापुढे आता जयललिता आणि ममता हे दोन तगडे प्रतिस्पर्धी असतील. अगदी असेच व्हावे असे मला वाटतच होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अर्धवटराव गुरुवार, 05/19/2016 - 06:19 नवीन
पण दिदी आणि अम्मा यांना इतर घटकांचा पाठिंबा मिळणं कठिण आहे. नितीश केंद्रस्थानी ठेवण्यासाठी लालु जीवाचं रान करतील. दिदीला डावे पाठिंबा देणार नाहि. अम्मांना केजरीवाल स्विकारणार नाहि. (केजरीवालला बहुतेक कुणीच स्विकारणार नाहि)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 05/19/2016 - 06:40 नवीन
नवीन पटनाईक त्या कडबोळ्यात पडतील असं वाटत नाही. न्याशनल अँबिशन आहे त्यांना अस वाटत नाही. तो माणूस कधीच चुकीच्या कारणासाठी बातम्यांमध्ये नसतो. काम चांगलं करतो आहे असं वाटतय. कारणं मोदी लाटेतही ओरिसामध्ये भरभरून शीटा आलेल्या यांच्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
व
विकास गुरुवार, 05/19/2016 - 12:23 नवीन
तथाकथित तिसऱ्या आघाडीमध्ये आता काँग्रेसचे अस्तित्व नगण्य झालेले असल्याने, दुसरी आघाडी असे म्हणणे योग्य ठरेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
अ
अनुप ढेरे गुरुवार, 05/19/2016 - 06:30 नवीन
आसाममध्ये भाजपा जिंकेल असं आत्ता तरी वाटतय. पण त्यांची तेवढीच मोठी अचिव्ह्मेंट म्हणजे बंगालमध्ये १०-१२ सीट्स आणि केरळमध्ये ३-४ सीट्स येणं (जेवढ्या आत्ता लीड्स आहेत.)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 05/19/2016 - 07:03 नवीन
अगदी असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 07:02 नवीन
सकाळी १०.३२ वाजताचे कल-- Image removed.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक गुरुवार, 05/19/2016 - 07:06 नवीन
सर्व राज्यांचे कल एकाच वेळी (शक्यतो मराठीत) बघण्याकरिता कोणते संकेतस्थळ चांगले ? (मिपाचा हा धागा आहेच म्हणा.. पण तरी.. :)
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 05/19/2016 - 08:19 नवीन
लोकसत्ता: आपोआप उप्देत् पण होतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/19/2016 - 07:08 नवीन
आसामात भाजपने नेत्रदीपक यश मिळवले आहे. या क्षणी भाजप आघाडी ७१ जागांवर पुढे आहे. केंद्रीय मंत्री सरबानंद सोनोवाल मुख्यमंत्री होणार हे नक्की झाले आहे. हे मुळचे आसाम गण परिषदेचे नेते होते. बांगलादेशी घुसखोरांविरूध्दच्या आंदोलनातून जन्माला आलेला हा आसाम गण परिषद पक्ष आहे. NDTV वर बोलताना सोनोवाल यांनीही बांगलादेशी घुसखोरांविरूध्द भूमिका मांडली. त्या भूमिकेवर त्यांनी कायम राहावे ही अपेक्षा. आणि हो जर एका एक वर्षात धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमाविंनी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे केजरीवाल आणि आआप समर्थकांनी सोनोवाल यांच्यावर टिका करायला सुरवात केली नाही तर सोनोवाल काहीही करू शकलेले नाहीत हेच अनुमान मी काढेन. मी स्वत: कुठल्याही नेत्याविषयीची भूमिका ठरविताना धर्मनिरपेक्ष बुबुडाविपुमावि टिका करत आहेत की नाही हा एक महत्वाचा घटक मानतो.
  • Log in or register to post comments
आ
आबा गुरुवार, 05/19/2016 - 07:22 नवीन
आसामवासीयांना सहानुभूति
  • Log in or register to post comments
ख
खेडूत गुरुवार, 05/19/2016 - 08:23 नवीन
का ब्वॉ? आमची तर तमीळींना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा गुरुवार, 05/19/2016 - 12:08 नवीन
चालायचंच, आपलं आपलं मत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/19/2016 - 08:28 नवीन
मनातल्या मनात दोन मिनिटं मौन पाळून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मुक्त विहारि गुरुवार, 05/19/2016 - 08:32 नवीन
१. मुग्धा गोडे आपल्या कोण? २. हितेश भाऊ कसे आहेत? ३. नाना नेफळे आजकाल काय करतात? ४. माईंना नानांशिवाय करमते का? ५. उद्दाम आणि सचिन, अजूनही आंतरजालावर आहेत का? ६. तुम्ही पण तिसर्‍या मुंबईत हितेशभाऊंच्या बरोबर रहायला जाणार का? आणि ७. अज्जून आपले इथे किती नातेवाईक आहेत? ================================================= काही प्रश्र्न अज्जून पण ते मिपाकरांना.................... अ) ७-७ वर्षे झोपलेले आय.डी. अचानक कसे जागे होतात? आ) ते नेमके काही ठराविक धाग्यांवरच प्रतिसाद द्यायला आणि तीच तीच ठराविक विचारसरणी घेवून का येतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
आ
आबा गुरुवार, 05/19/2016 - 11:55 नवीन
:) अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनुप ढेरे गुरुवार, 05/19/2016 - 12:14 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मिहिर गुरुवार, 05/19/2016 - 23:50 नवीन
एक आपल्याला न पटणारा/आवडणारा प्रतिसाद दिला की थेट नाना, माई, हितेश वगैरेंचा डु-आयडी? असो. आता मलापण डुआयडी म्हणतील ‌वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
आ
आनन्दा Fri, 05/20/2016 - 06:47 नवीन
ते तेव्हढ्यावरून ठरत नाही. प्रतिसाद लिहुण्याची पद्धत, पॅटर्न, मुद्द्यांची निवड वगैरे असे बरेच निकष असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
आ
आबा Fri, 05/20/2016 - 07:13 नवीन
Ay, That's remarkable Holmes! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
क
कपिलमुनी Fri, 05/20/2016 - 07:33 नवीन
काही आयडी लाडके असतात, त्यांचा ट्रोलींग चालता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिहिर
आ
आबा Fri, 05/20/2016 - 08:05 नवीन
पण मी ट्रोलींग करत नव्हतो माझं खरंच तसं मत आहे आसाम बद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अनुप ढेरे Fri, 05/20/2016 - 08:06 नवीन
हेच बोल्तो. आणि इथेतर ट्रोलिंग अजिबात नाही दिसलं. केवळ विरोधी मत दिसलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Fri, 05/20/2016 - 10:55 नवीन
विरोधी मत दिसला की त्याला डुआयडी ठरवून प्रतिसाद देण्याबद्दल लिहीला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
ब
बोका-ए-आझम Fri, 05/20/2016 - 16:28 नवीन
तुम्ही, सोन्याबापू, संदीप डांगे, बाळ सप्रे - अनेकांनी विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत. तुम्हाला कधी कुणी डू आयडी वगैरे म्हटलंय कधी? जे डू आयडी आहेत त्यांनाच डू आयडी म्हटलं जातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अनुप ढेरे Fri, 05/20/2016 - 17:19 नवीन
आबांच्या मूळ प्रतिसादात नक्की काय ट्रॉलिंग दिसलं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
आ
आबा Sat, 05/21/2016 - 06:27 नवीन
काही अबजेक्टीव पुरावा आहे, की अश्याच हवेत गोळ्या?! स्वतः बाळोत्यात असलेल्या आयडीना दुसर्याची लिजीटमसी काढताना पाहून मजा येतेय :) अवांतर: मिपा वरचं वातावरण या पातळीला आनण्यात श्रीगुरूजी या आयडीचा मोठा वाटा आहे (असं माझं निरीक्षण आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 06:30 नवीन
"मिपा वरचं वातावरण या पातळीला आणण्यात "डू-आयडींचा" मोठा वाटा आहे. (असे माझे ठाम मत आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
इ
इरसाल Sat, 05/21/2016 - 13:57 नवीन
म्हणजे तुम्हाला, मला (उर्फ डु-आयडी) असे म्हणायचेय ना मुवि. माझे एक्सेलशीट हरवलेहो नायतर तुम्हाला दाखवले असते मी..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 14:42 नवीन
हो नाही तर काय? तू, सूड आणि झालंच तर जेपी, तुम्ही सगळे एका माळेचे मणी. कधी कुणाचे धोतर फेडून जाल, काही सांगता येणार नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 06:34 नवीन
10000% सहमत! श्रीगुरुजी ह्या आयडीने जाहिर मी अन ते कुठले कोण चंद्रनील मुल्हेरकर एकच आहोत असे ठोकुन दिले होते! त्यांची संबंधितांकडे तक्रार करुन सुद्धा काहीच निवाडा झाला नाही, मुल्हेरकर स्वतः एक ट्रोल आयडी होता अन तो उडाला त्यात काही विशेष नाही पण विशेष हे वाटते की श्रीगुरुजी सर्रास इतर आयडीवर कॉमेंट्स मधुन चिखलफेक करताना दाखवून दिल्या नंतर सुद्धा त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
ब
बोका-ए-आझम Sat, 05/21/2016 - 14:14 नवीन
त्यांनी चंद्रनील मुल्हेरकर आणि पिंपळगावचा पिराजी हे नाव घेतलं होतं. तुमचं नाव घेतलेलं नाही. हवंतर चेकवू शकता. बाकी आबांनी आपण डू आयडी नाही याचा पुरावा दिलाय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 14:29 नवीन
पिंपळगावचा पिराजी मीच होतो सर, ह्या असल्या दळभद्री कॉमेंट अन टिका पाहून "मैत्री नको टिका आवर" नियम लावला अन प्रशांतजी ह्यांना वैयक्तिक निरोप करुन आयडी बदलून घेतला मी! शिवाय माझा आयडी बदलल्याबद्दल ज्या धाग्यावर (विन्स्टन चर्चिल) ह्या श्रीगुरुजीने माझ्यावर वहीम घेतला तिथे स्पष्टीकरण सुद्धा टाकले होते की बुआ असो पुढे गैरसमज नको म्हणून आयडी बदलून घेतो आहे, ह्यांच्याकडे दखल घेण्या इतपतही सौजन्य नाही अन त्याची कंपुवाली मित्रमंडळी इथे येऊन आमचीच तासते आहे. इतकेच काय तर माझं मुळ नाव शिक्षण वगैरे इंट्रो टाइप मी खरड़फळा इथेही टाकले होते! त्यावरही काही सन्माननीय सदस्यांनी मला डू आयडी समजून "बाळ चार दिवसांचं आहे" "गाठोडे वळले तरी हात बाहेर काढतंय" वगैरे म्हणले होते!. असो. आयडी बदलल्या बद्दल प्रशांतजी ह्यांना विचारू शकता आपण साक्ष म्हणून "वैयक्तिक निरोप उघड्या फोरम वर" पेस्ट करणे तितकेसे रुचत नाही म्हणून म्हणतो आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 05/21/2016 - 14:35 नवीन
तसं असेल तर मला हे माहित नव्हतं. क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 14:49 नवीन
तुम्ही नका राव सॉरी वगैरे म्हणू कृपया! तुमची काहीच चुक नाही :/ :( _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनुप ढेरे Sat, 05/21/2016 - 07:10 नवीन
मिपा वरचं वातावरण या पातळीला आनण्यात श्रीगुरूजी या आयडीचा मोठा वाटा आहे
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आबा
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 13:02 नवीन
थोडक्यात काय तर तुमचा (आबा, बहिर्जी आणि अनूप) राग, श्रीगुरुजी ह्यांच्यावर आहे तर.... असो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 14:03 नवीन
होय माझा स्पष्ट राग आहेच अन त्याला कारण त्यांचे धागे किंवा विचार नाहीत कारण मुळात मी तितके वाचलेले नाहीत श्रीगुरुजी, फ़क्त ज्याची आपली जालीय किंवा वैयक्तिक ओळख नाही अश्या माणसाने एखादा वेगळा अन विरोधी विचार दिल्यास किंवा त्याचे आयडी साधर्म्य एखाद्या जुन्या ट्रोल आयडी सोबत असणे ह्या सुतावरुन त्या मेंबरची जाहिर बदनामी करणाऱ्या कॉमेंट्स करत्या माणसाची एकंदरित काय लायकी असेल ते लक्षात येते! ह्या कारणांमुळे माझा हे कोण श्रीगुरुजी आहेत त्यांच्यावर राग आहे! बाकीच्या मंडळीचं मला माहीती नाही अन माहीती करुन घ्यायची इच्छा ही नाही , माझा श्रीगुरुजींवर राग असल्यामुळे त्यांच्या कंपुतल्या कोणाला माझा राग दुस्वास वगैरे करायचा असल्यास करोत मला त्याच्याशी काही घेणे देणे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनुप ढेरे Sat, 05/21/2016 - 14:04 नवीन
मुवि, माझा तरी आक्षेप इथे तुमच्या वरच्या प्रतिसादावर होता. केवळ आबांना भाजपाच विजय आवडला नाही म्हणून डायरेक ते डुआयडी त्या ग्रेटथिंकरचे? श्रीगुरुजी देखील हे असे आरोप खूप वेळेला करत असतात त्या माईसाहेब आयडीलापण असच उगा श्या घातल्या लोकांनी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ब
बोका-ए-आझम Sat, 05/21/2016 - 14:21 नवीन
याचा पुरावा आहे का? बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं त्यामुळे मिपावर हे वातावरण झालंय त्याला तेच जबाबदार आहेत. त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे. माझा तरी पाठिंबा श्रीगुरुजींना आहे. आता होऊनच जाऊ दे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 14:39 नवीन
मग....भले त्यांचे राजकीय विचार मला पटोत अथवा न पटोत किंवा त्यांचे आय.पी.एल.वरचे धागे मला पटोत किंवा न पटोत. श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात. व्यक्ती-विरोधापेक्षा विचारांमध्ये भेद असणे, हे कधी पण योग्यच. व्यक्ती विरोध किंवा व्यक्ती-स्तोम वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
न
नाईकांचा बहिर्जी Sat, 05/21/2016 - 15:05 नवीन
श्रीगुरुजी विचारांना विरोध करतात आणि बर्‍याचवेळा त्यांच्या विचारसरणीला अनुसरून लिंका पण देतात. अहो असतील तुमचे जवळचे म्हणून इतके फेकु नका हो सर!! विचारसरणीचा एक मुद्दा दिला ते ही बीजेपी काँग्रेस वगैरे विषय नाही तर विन्स्टन चर्चिल विषयावर तर विचारावर न बोलता तुमचे हे मित्रवर्य थेट आमच्या आयडीवर घसरले होते! किती पट्टया बांधणार अजुन डोळ्यावर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा