पाककृती

आंब्याची कढी

Primary tabs

साहित्यः
पाऊण लिटर ताक,
दोन मोठ्या हापूस आंब्यांचा रस,
जिरं,
मोहरी,
कडीपत्ता,
हिंग,
दोन मिरच्या बारीक चिरून,
साखर मीठ आवडीनुसार

कृती:

ताक , मीठ , साखर आणि आंब्याचा रस एकत्र करायचा.
साजूक तुपात मोहरी, जिरं, कडीपत्ता, हिंग, मिरच्यांची फोडणी करून ताक आणि आंब्याच्या मिश्रणात ओतायची.
थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं.

*फेसबुकावर पूर्वप्रकाशित.

kadhi

रेवती

रेसिपी वेगळी, छान आहे. ही पाकृ गारच उपयोगात आणावी लागत असेल.

प्रचेतस

आंबे हे आंबे म्हणूनच खावेत किंवा रस करून. कढी वगैरे करून असं वाया घालवणं म्हणजे महापाप.

सूड

असं वाया घालवणं म्हणजे महापाप.

हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)

सतिश गावडे

उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?

प्रचेतस

ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारावं लागेल.

असंका

मलये भिल्लपुरंध्री चंदनतरूकाष्ठम् इंधनम् कुरुते।

तसंच काहीसं ना?

जेपी

अवघड आहे.
आमरस आणी कढी या दोन वेगळे पदार्थ खाण्यासाठी आहेत असा समज आहे..

सतिश गावडे

हा विचार वर घाटावरच येऊ शकतो. कोकणात आंबे मुबलक मिळतात, मग त्याचं काय करु नि काय नको असं होतं. इकडे आंब्यांची कमतरता त्यात कोकणातल्या सुग्रणींपेक्षा घाटावर पाककला अंमळ कमीच, त्यामुळे चालायचंच!! :)

प्रचेतस

उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषालाही सुगरण म्हणतात का?

सतिश गावडे

ते उत्तम स्वयंपाक करता येणाऱ्या पुरुषाला विचारुन सांगतो.

नाखु

वेगळा (आणि खरच मला माहीत नसलेला )पदार्थ अज्मावून बघायला हरकत नाही. मला करता येईल का ते माहीत नाही.धन्याने केल्यास आस्वाद घ्यायला नक्की येईल.

ता.क. वल्ली (इतरांसाठी प्रचेतस आम्च्या साठी वल्लीच० नक्की कुणाच्या बाजूने आहीत आंब्याच्या की कढीच्या ?

कंजूस

यालाच कोयाडं / सासव म्हणतात. ही पाककृती गुजराती चानेल कलर्स ( इटिव्हि) वर दाखवलेली परवा.त्याला ते लोक फजितो म्हणतात.

रमेश भिडे

धोकलोउंधियोडॉटकॉम वर टाकली गेली असेल ही पाकृ नाई का?

सूड

सासव निराळं. ओलं खोबरं, सुक्या मिरच्या आणि मोहरी हे असतात सासव बनवताना आणि फोडणी नाही.

यशोधरा

नै, नै सासव निराळं. त्यासाठी झाडी/ गावठी आंबेच हवेत. त्यांची चवच अलग असते. कोकणातही फारसे मिळत नाहीत :(

यशोधरा

हसायला काय झालं? आँ?
संवेदनाशील मोड संपला काय तुमचा? =))

प्रचेतस

छ्या.
अशा रम्य कातरवेळा असता कोण संवेदनशील होणार उगा :)

ते कुठल्यातरी गावांत श्रीखंडाच्या पाण्याची थंड कढी करतात तुम्ही पण असेच करा....

अरे,

कुठे नेवून ठेवली आहे आमची खाद्य-संस्कृती????????????????????////

चतुरंग

"का त्या हापूसवरती असा 'सूड' उगवतो आहेस?" असा विचार मनात आल्याखेरीज राहिला नाही.. ;)

(आंबा/कढी प्रेमी)रंगा

आनन्दा

आंब्याची आमटी पण करतात. आंबट आंबा असेल तर उत्तम, नाहीतर आमसुल घालून पण चालते.

आंब्याची भजी काय, आंब्याची कढी काय, मला हे सर्व एकमेकांच्या विरुद्ध चवी वाटतात. पण चला पाककृतींची ओळख होते.
छान पुपाशु.

-दिलीप बिरुटे

सस्नेह

कढीत आंब्याची झलकसुद्धा दिसत नाही. तस्मात आंब्याचा फटू वेगळा टाकावा.

अनन्न्या

पण मला ती आवडत नाही, त्यामुळे त्याची रेसिपी नाही देणार!
सूड, मस्त रेसिपी, छान लागते ही कढी.. थोडे नारळाचे दुध मिसळा आणि आंबा थोडा आंबट चवीचा हवा.
हापूसचे गोड प्रकार जास्त चांगले होतात.
अर्थात हे माझे मत!!!!!!!!!!

सूड

आमच्याकडे सहा जण जेवायला असताना पातेलंभर केलेली ही कढी शेवटी बघायलासुद्धा उरली नाही. कढी पिणार्‍याला सुरुवातीला दोनेक सेकंद कसली कढी आहे ते समजून घेण्यात जातात आणि शेवटी आंब्याची मस्त चव जीभेवर रेंगाळत राहते.
मला एकदा निव्वळ नारळाचं दूध घालून करून बघायची आहे.
@रेवती: हो, थंडच वापरावी लागते.

त्रिवेणी

ही खरी खरी पाककृती आहे का कुणीतरी सांगा राव.
नाहीतर खरच करायला जाईन आणि मग उद्धार होईल ते वेगलच्.

सूड

ओये, खरी आहे ही पाकृ. खरी वाटली म्हणजे काय?

सतिश गावडे

मला माहिती आहे रे खरी आहे ते. तुझ्या सुगरणपणाची माहिती आहे मला. त्यांनी अविश्वास दाखवला तर मी जरा गंम्मत केली.

सूड

करणार असाल तर नुसती प्यायच्या हिशोबात करा. भातावर घ्यायला वैगरे नको. ताक अमूलचं घेतलत तर बरं!!

त्रिवेणी

धन्यवाद.
उद्या दुपारी करते आणि फ़ोटो टाकते इकडे.
डाळीच्या पीठाच आलान नाही लावयचे का?

सूड

नाही नाही, रसाचा घट्टपणा पुरतो. आणि याला उकळी काढायची नाहीये, पीठ लावून कसं चालेल!!

पैसा

पुढच्या वेळी ताकाऐवजी नारळाचे दूध आणि हापूस ऐवजी रायवळ आंबे घेऊन बघ आणि फरक सांग

वाह!! कढी छानचं दिसतेय.
मी खरंतर कढीप्रेमी नाही पण या पाकृत डाळीचे पीठ न लावल्यामुळे नक्की करुन बघणार: )
वाखु साठवलिये.