तंत्रजगत

बाइक्स घेताना - भाग ५ - बायकांच्या बैका

Primary tabs

बाईक्स घेताना - भाग १ - बायकर्सचे प्रकार
बाइक्स घेताना - भाग २ - १००-११० cc
बाइक्स घेताना - भाग ३ - १२५ cc
बाइक्स घेताना - भाग ४ - १३५ cc

(पूर्वी...कोणे एके काळी) आधी जाहीर केल्याप्रमाणे हा भाग अनाहिता पेश्शल :)

भारतात जश्या १९९० नंतर स्कूटरचा जमाना मागे पडून बाईक्स जास्त लोकप्रिय होऊ लागल्या अगदी तस्सेच्च २००५ नंतर हळूहळू ऑटोमॅटिक स्कूटरची लोकप्रियता वाढत आहे. मला आठवते त्यानुसार भारतात ऑटोमॅटिक स्कूटर बहुतेक पहिल्यांदा "TVS सनी / स्कुटी" (तीच ती काजूतैंकडची) होती (त्या आधीचे म्हैत नै कारण मी फार लहान होतो :D) आणि त्या नंतर पटकन आठवणारे नाव म्हणजे "Kinetic होंडा". शालेय जीवन संपेपर्यंत या दोनच "स्कुटी" माहित होत्या..."स्कुटी" हे नाव सर्रास ऑटोमॅटिक स्कूटरसाठी वापरले जाते (जसे फ़ोटोकोपी साठी xerox) यावरून "TVS सनी / स्कुटी"ची लोकप्रियता समजावी. पण हिरो-होंडाच्या बाईक्सच्या उदयानंतर "बाईक्स = माचो लुक्स" म्हणून पुरुषांसाठी आणि "ऑटोमॅटिक स्कूटर = चालवायला सोप्या...आकाराने आणि पॉवरने कमी" म्हणून बायकांसाठी असा सोपा हिशोब झाला...त्यातच Bajaj ने Pulser साठी "Definitely male" अशी टॅग लाईन वापरून त्यावर शिक्कामोर्तब केले.

आणि बायकांमध्ये ऑटोमॅटिक स्कूटर लोकप्रिय असण्याचे सगळ्यात मुख्य कारण म्हणजे साडी / ड्रेस घालूनसुध्धा चालवता येते :)

आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि भारतात ऑटोमॅटिक स्कूटर इतक्या लोकप्रिय झाल्यात की जवळपास प्रत्येक बाईक बनवणार्या कंपनीने ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटसाठी कमीतकमी १ स्कूटर बनवली आहे. भारतात आत्ता बाकी कोणत्याही टू-व्हिलर सेगमेंटपेक्षा ऑटोमॅटिक स्कूटर साठी सगळ्यात जास्त पर्याय उपलब्ध आहेत. या स्कूटर लोकप्रिय होण्याची काही महत्वाची कारणे म्हणजे...

  • काही लोकांना क्लच दाबून ठेवा + गिअर बदला + क्लच हळूहळू सोडा ही प्रोसेस किचकट वाटते
  • काही जणांना गीअर बदलणे नीट जमत नै
  • आणि काही आळशी असतात :D

अश्या सगळ्या लोकांसाठी ऑटोमॅटिक स्कूटर ही चालवायला अतिशय सोपी आहे...ना गीअर्सची कटकट ना क्लचची भानगड...फक्त बटण दाबा आणि भुर्रर्र :)

  • सर्वसाधारण भारतीय उंचीच्या लोकांसाठी पर्फ़ेक्ट
  • बाईकच्या तुलनेत डिकीची जागा भरपूर...ऑफिसातून घरी येताना भाजी / सामान / काही वेळेला जड ग्यास सिलिंडर "खरा आणि साहेब म्हणायचे तो सुध्धा" :D आणताना हा मोठा फायदा असतो

या पासून ते अगदी

  • घरातली पहिली दुचाकी अशी असावी की घरातल्या बायकांसकट सगळ्यांना चालवता यावी
  • जवळच्या जवळ जायला म्हणून घरात बाईक / कारबरोबर सेकंड दुचाकी म्हणून

अगदी माझ्या काही मित्रांनी लग्न झाल्या झाल्या जवळपास २-३ महिन्यांच्या आतच "लग्न झाल्यावर घरात ऑटोमॅटिक स्कूटर असलेली बरी असते" असे म्हणत ऑटोमॅटिक स्कूटर बुक केल्यासुध्धा (बिच्चारे लग्नाआधी ते सगळे बुलेट घ्यायचे प्लान बन्वत होते हा भाग अलहिदा :D)

परंतू या सर्व फायदयांबरोबरच बाईकच्या तुलनेत काही उणीवा सुध्धा आहेत

  • व्हेस्पाचा अपवाद वगळता बर्याच ऑटोमॅटिक स्कूटर जवळपास १००cc च्या असूनसुध्धा मायलेज फार कमी असते (३०-४० kmpl), १५०-२००cc च्या बाईक सुध्धा इतकेच मायलेज देतात
  • बाईकच्या तुलनेत फार लहान चाके असल्यामुळे स्थिरता (balance) कमी असतो, तोल गेल्यावर पटकन सावरणे कठिण असते
  • low ground clearance असल्यामुळे कच्च्या अथवा दगडधोंड्यांनी भरलेल्या रस्त्यावरून / उंच स्पीडब्रेकरवरून जाताना स्कूटरचा खालचा भाग घासला जाण्याची शक्यता जास्त असते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो फक्त छोट्या (१५ कि.मी. अथवा त्यापेक्षा कमी) अंतरासाठी चांगल्या आहेत, त्यापेक्षा जास्त अंतरासाठी वरचेवर वापरल्यास स्कूटर (आणि चालवणार्याची पाठसुध्धा) फार लवकर खिळखिळी होऊ शकते, कारण यांचे सस्पेंशन बाईकसारखे जास्त दणके सोसवण्यासाठी नसते
  • ऑटोमॅटिक स्कूटर शक्यतो कमी (४५-५० कि.मी.प्र.ता. अथवा त्यापेक्षा कमी) वेगातच चालवाव्या, त्यापेक्षा जास्त वेगात वरचेवर वापरल्यास इंजीनावर ताण येतो तसेच छोट्या चाकांमुळे स्थिरता (balance) कमी होते...मात्र मी बर्याचदा हायवेला या स्कूटर ७०+ च्या स्पीडने पळवताना बघितल्यात
  • धक्का स्टार्ट नाही करता येत, त्यामुळे किक लिव्हर नसेल तर पावसाळ्यात अथवा थंडीत बॅटरी डाऊन झाल्यावर मेकॅनिकला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही (विना किक लिव्हरची ऑटोमॅटिक स्कूटर आहे की नाही ते म्हैत नै पण जर असलीच आणि कोणी घ्यायचा विचार करत असेल तर हा मुद्दा ध्यानात ठेवा)

या भागात मुद्दामच इलेक्ट्रिक स्कूटर्स विचारात घेतल्या नाहीत कारण भारतात दुर्दैवाने अजूनही इलेक्ट्रिक वाहनांसाठी पुरेसे infrastructure नाहीये :(

काही स्कूटर सोडल्यास बाकी स्कूटरबद्दल मला फार थोडी माहिती आहे कारण मला स्वत:ला स्कूटर आवडत नाहीत त्यामुळे बर्याचश्या स्कूटरबद्दल माहिती थोडक्यात गुंडाळलेली आहे :D

Honda Activa i / Activa 3G / Activa 125 - (तिच ती गुर्जींची उडनमांडी फेम)

honda activa

२००१ साली होंडाने हिरो-होंडा सोबत पार्टनरशीपमध्ये असतानाच स्वत:सुध्धा भारतीय मार्केटमध्ये सेपरेट उतरण्याचा निर्णय घेतला आणि सगळ्यांचे आडाखे चुकवून बाईकऐवजी "Activa" ही ऑटोमॅटिक स्कूटर आणली. ज्या वेळेस भारतातून गीअर्ड स्कूटर नामशेष झालेल्या आणि नवीन जास्त मायलेजवाल्या ४-स्ट्रोक बाईकचा जमाना होता त्या वेळेस ऑटोमॅटिक स्कूटर मार्केटमध्ये आणणे आणि ते सुध्धा पहिले प्रोडक्ट म्हणून हा फार धाडसाचा निर्णय होता. But Activa proved it's mettle and initiated a new era in Indian bike market.

Activa भारतात कैच्याकै लोकप्रिय झाली...आणि त्याची मुख्य कारणे वर दिलेली आहेत ती आहेतच पण त्याबरोबरच होंडाला first mover's advantage सुध्धा मिळाला.

Activa is sole anchor for Honda's success in India and this is true even now. Activa ही भारतात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त विकली गेलेली दुचाकी आहे...हिरो स्प्लेंडर आणि बजाज डिस्कव्हरपेक्षा सुध्धा जास्त
सध्ध्या Activa i / Activa 3G / Activa 125 असे ३ पर्याय उपलब्ध आहेत...यातल्या Activa 125 साठी मोठे १२५cc इंजिन, telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत...१२५cc इंजिनमुळे मायलेज थोडे आणखी कमी होते पण बजाज पल्सरला (१५०cc वाली) पिकपमध्ये बरोबरीची टक्कर देते :)

Honda Dio (काजूतैंच्या भाषेत झुरळ...ख.व.उ.पा.मंडळाकडून साभार :D)

honda dio

होंडाची कॉलेजमध्ये जाणार्यांना डोळ्यासमोर ठेउन डिझाईन केलेली स्कूटर...काहीजणांना हिचे डिझाईन थोडे ढिंच्याक वाटू शकेल...अश्यांनी "आपण आता काका/काकू कॅटेगरीमध्ये गेलो" असे खुशाल समजावे :)
टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे

Honda Aviator

honda aviator

हि होंडाची अजून एक स्कूटर...Activa चे यश बघून होंडाने ही आणलेली पण हि Activa इतकी लोकप्रिय नाही झाली...टेक्निकली हिच्यात आणि Activa मध्ये तसा काहीच फरक नाहीये...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण हिच्यात Activa 125 सारखे telescopic front suspension, front disk break असे खूप चांगले फायदे आहेत

Honda Navi (with USD Suspension??)

honda navi

हि होंडाने नुकतीच आणलेली नवीन स्कूटर...व्यक्तीश: मला याचे लुक्स अज्जीबात आवडलेले नाहीत...ना धड स्कूटर ना धड बाईक...लुक्स किती जणांना आवडेल माहीत नाही...यात Activa चेच ११०cc चे इंजिन आहे पण "नवी"न डिझाईन मध्ये टाकीखाली सामान ठेवायला जागा आहे...पण हि स्कूटर मुळात ज्या बाईकवरून inspired आहे ती बघितली तर नवीचे डिझाईन हे ताजमहाल समोर बीबीका मकबरा वाटेल...जरा होंडाच्याच MSX-१२५ या बाईककडे बघा :)

honda mcx 125

Hero Motocorp

Pleasure

hero pleasure

हिरो होंडापासून विभक्त झाल्यानंतरसुध्धा आत्ताआत्तापर्यंत होंडाचीच इंजिने वापरते आहे...Pleasure ही खास कॉलेजमध्ये जाणार्या मुलींना डोळ्यासमोर ठेवून मार्केटिंग केलेली स्कूटर आहे त्यामुळे डुएल टोन कलर्स आहेत

Maestro Edge

hero maestro

हिरोची ही स्कूटर हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते... features च्या बाबतीत मात्र ही होंडाच्या Activa ला टक्कर देऊ शकते...यात telescopic front suspension, digital instrumental console, mobile charger, engine immobilizer (anti-theft system) असे काही फायदे आहेत जे बाकी स्कूटर्स मध्ये नाहीत...आकाराने सुध्धा ही स्कूटर बर्यापैकी मोठी आहे

Duet

hero duet

हिरोची ही स्कूटरसुध्धा हिरोने Engines Engineering बरोबर बनवलेले नवीन ११०cc चे इंजिन वापरते...ही जवळपास हिरो Pleasure सारखीच आहे पण यातसुध्धा mettle body, telescopic front suspension, external fuel filling, digital instrumental console, mobile charger, tubeless tires असे चांगले features आहेत

Yamaha

Ray Z

yamaha ray z

ऑटोमॅटिक स्कूटरची वाढती मागणी पाहून यामाहानेसुध्धा त्यात उडी घेताना रे स्कूटर आणली...दिसायला साधारण होंडाच्या डिओ सारखी आहे पण यात आकर्षक स्टिकर्स असल्याने डिओपेक्षा जास्त उठून दिसते
features जवळपास बाकी स्कूटरसारखेच आहेत

Alpha

yamaha alpha

यामाहाची अजून एक स्कूटर...यापलीकडे मला अजून काही इंट्रेस्ट नाही :D

Fascino

yamaha fascino

बर्याचश्या स्कूटर एका ठराविक प्रमाणानंतर जवळपास सारख्याच दिसतात त्यामुळे यामाहाच्या फॅसिनोचे कर्वज् उठून दिसतात :)
यामाहाने हि स्कूटर मुख्यत्वे बायकांना नजरेसमोर ठेउन डिझाईन केलीये आणि वेगळेपण दिसते सुध्धा. बस्स इतकेच...बाकी जवळपास इतर स्कूटरसारखेच

Suzuki

Let's

suzuki lets

सुझुकीला बाईक्स मध्ये यश मिळत नसताना त्यांना त्यांच्या स्कूटर्सने बर्यापैकी हात दिला...Let's ही सुझुकी कडून आणलेली ११०cc ची स्कूटर

Access १२५

suzuki access

सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Access १२५ ला मात्र ठिकठाक विकल्या गेल्या...त्याचे मुख्य कारण म्हणजे बर्याच वेळेपर्यंत १२५cc च्या स्कूटर प्रकारात फक्त सुझुकीच होती...बाकी सगळ्या स्कूटर्स ११०cc च्या होत्या

Swish १२५

suzuki swish

सुझुकीला बाईक्स मध्ये मार्केट मिळत नसताना Swish १२५ सुध्धा ठिकठाक विकल्या गेल्या...बर्याच वेळेपर्यंत त्याची प्रतिस्पर्धी सुझुकीचीच Access १२५ होती

TVS

Jupiter

tvs jupiter

जेव्हा TVS च्या बाईक्स पॉपुलर होत नव्हत्या (एक अपाचे सोडली तर) त्यावेळेस स्कूटर्सनी मात्र बर्यापैकी लोकप्रियता मिळवली...बहुतेक Activa नंतर TVS च्याच स्कूटर जास्त दिसतात.
Jupiter हि सध्ध्यातरी Honda Activa ला मुख्य प्रतिस्पर्धी आहे...कारण एक इंजिन सोडल्यास TVS हि Honda पेक्षा जास्त features देते...ते सुध्धा कमी किंमतीत...सध्ध्या हि स्कूटर TVS ची सगळ्यात बेस्ट स्कूटर आहे...आणि नुकताच यात डिस्क ब्रेकसुध्धा आणला आहे

Vego

tvs vego

हि Jupiter च्या आधी आलेली...Jupiter हि high end स्कूटर तर हि थोडी स्वस्त...वजनाला थोडी हलकी सुध्धा

Scooty Zest ११० / Streak / Pep+

tvs scooty

भारतात ऑटोमेटीक स्कूटर मधल्या सुरवातीच्या काही काळातली Scooty हि एक आहे...काळानुरुप TVS ने थोडे थोडे बदल केलेत पण आजसुध्धा Scooty हि वजनाला हलकी असल्याने नाजूक पाखरांमध्ये लोकप्रिय आहे ;)

Mahindra

Gusto

mahindra gusto

महिंद्रा बाईक / स्कूटर मार्केटमध्ये उशीराच आले...त्यांची सुरुवातच Kinetic च्या बाईक विभागाला विकत घेऊन झालीये. पहिल्यांदी १०० cc इंजिन असणारे मॉडेल होते पण नंतर १२५ cc इंजिन असणारे मॉडेल आणले आहे

Rodeo

mahindra rodeo

हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे

Duro

mahindra duro

हिच्यात काडीचाही इंट्रेस्ट नाही त्यामुळे मला काहीही माहित नाही पण १२५ cc चे इंजिन आहे आणि महिंद्रा नवीन असूनसुध्धा बर्यापैकी खपली गेली आहे

Bajaj

Nothing

बाकी कंपन्या वाढणार्या स्कूटर सेगमेंटकडे वळत असताना बजाज मात्र त्यापासून ४ हात लांबच आहे...अगदी अधिकृतरीत्या सांगितले की आम्हाला स्कूटरमध्ये इंट्रेस्ट नाही...कदाचित एकेकाळी क्रिस्टल नावाने आणलेली स्कूटर फ्लॉप गेली त्यामुळे असेल

एकेकाळी "...बुलंद भारत की बुलंद तस्वीर...हमारा बजाज...हमारा बजाज" म्हणत "बजाज चेतक" घराघरात पोचलेली (आमच्याकडे २० वर्षे वापरली)...या जाहिरातीचे गाणे आजही नोस्टेल्जिक करून जाते :(

Vespa - इतालिअन ब्युती

Vespa १५० / १२५ / Elegante

vespa

स्कूटरमधला सध्ध्याचा माझा सगळ्यात आवडता ब्रँड :)

  • भारतीय कंपन्या किंमत कमी ठेवायला थोडे स्वस्तातले मटेरिअल वापरतात त्यामुळे देशी स्कूटर थोड्या गरीब दिसतात
  • जॅपनीज भन्नाट इंजिन क्वालिटी ठेवतात पण डिझाईन मात्र ठोकळे नाहीतर टोकदार काहीतरी बनवतात...काहीच नाही तर नाव कैच्याकै ठेवतात (आठवतेय सुझुकी "हयाते" बाईक??)
  • ईटालिअन...त्यांच्यासारखे तेच...सुंदरता देखणेपण ठसठशीतपणे उठुन दिसले पाहिजे...भले क्वालिटी जॅपनीज प्रॉडक्टसारखी नसेल पण लोकांनी यांच्याकडेच यायला हवे

एकेकाळी बजाज चेतकला तोडीसतोड टक्कर देणारी वेस्पा स्कूटर नंतर मात्र भारतातून निघून गेली...त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांनी भारतीय लोकांचा बाईक्सकडे वळणारा कल समजून घेतला नाही आणि फक्त स्कूटरवरच लक्ष दिले...पण सुदैवाने ती परत आली :)

सध्ध्या १५०cc च्या स्कूटर्स फक्त वेस्पा बनवते...दिसण्याच्या बाबतीत मात्र there is Vespa and then there are others :) ...गीअरवाले इंजिन जाउन ओटोमॅटिक इंजिन आले तरी बाह्यरुप तसेच "रेट्रो" ठेवले आहे...वळणदार डिझाईन आणि उठावदार रंग यामुळे बाकी स्कूटरसमोर वेस्पा उठुन दिसते...ठिकठाक दिसणारी पाखरेपण वेस्पावर भाव खावून जातात ;)

आणि हि फक्त दिसण्यातच नाही तर खालील बाबतीतही बाकी स्कूटरपेक्शा उजवी आहे

  • १५० cc चे ३ व्हॉल्व्ह इंजिन
  • मायलेज बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • इंजिन पॉवर बाकी स्कूटरपेक्शा जास्त
  • सगळ्यात मोठी पेट्रोल टाकी
  • सगळ्यात मोठे ट्युबलेस टायर्स
  • सगळ्यात जास्त रंगांत उपलब्ध...पाखरांना मॅचिंग रंग शोधायला सोपे =))

बाकी डिस्क ब्रेक आणि अलॉय व्हील्स आहेतच...आणि शेवटचे म्हणजे वेस्पा आणखी एका बाबतीत बाकी सगळ्या स्कूटरच्या पुढे आहे...किंमत :D ...but it's worth it ;)

मिरवायचे असेल / हौस असेल / नीट वापरणार असाल / परवडत असेल तर वेस्पा सोडून दुसरीकडे बघूच नका...अशी दुसरी नाहीच सापडणार :)

यात telescopic front suspension असते तर हि आखुडशिंगी बहुगुणी भरपूर दूध देणारी गाय याचे उत्तम उदाहरण ठरली असती :)

स्कूटर कशी निवडावी

औटोमटिक स्कूटरमध्ये शक्यतो खालील गोष्टी असाव्यात...वेस्पा घेणार असाल तर पुढे वाचू नका ;)

  • telescopic front suspension
  • tubeless tires
  • वजन चालवणार्याला झेपले पाहिजे
  • kick lever

स्कूटर घेताना ध्यानात ठेवावे की स्कूटर्सना re-sell value नसल्यात जमा असते...त्यामुळे घ्यायच्या आधीच पूर्ण विचार करावा

क्रमशः

Disclaimers -
या लेखातली सर्व मते माझी खाजगी मते आहेत
सर्व फ़ोटो इंटरनेटवरून साभार

शाम भागवत

माझ्या काकांनी पहिल्या लॉट मधली ल्युना घेतली.किंमत फक्त १६५०/-
मला दोन लिटर पेट्रोल ९ रुपये १० पैसे व मोठा हार ४० पैशालाआणल्यचे आठवतय.

रमेश भिडे

काकांचं आडनाव भागवत च का? की काही वेगळं होतं दोन जोडाक्षरी वगैरे?

पैसा

१०० सीसी वाली बजाज कब बरोबर. प्रिया नव्हे ती.

अभ्या..

काहीच मेहनत नाही ह्यात. आहे ती करंट माहीती आहे. बर्‍याच गोष्टी माझ्या जन्माआधीचे माहीत नाही, मला इंटरेस्ट नाही, मला काडीची माहीती नाही असे करुन टाळल्या आहेत. भारताचे बाइक मार्केट अगदीच काही मोठे नाही. इथे मिपावरच जावा यझदी चालवलेले लोक्स आहेत तेव्हा जरा माहीती घेऊन लेख लिहिला असता तर बरे. अर्थात टकासाहेब गांभीर्याने घेतले तरच. अन्यथा त्यांला नेहमीपरमाणे सर्वानाच फाट्यावर मारायचा पर्याय आहेच.
स्कूटरस्टोरी वेस्पापासून सुरु होते. त्यावरुन बजाज आली. बजाजची तीन गिअरची कब, सुपर ह्या १५० सीसी. चेतक ४ गिअरची आडवा हेडलाइटवाली. त्यानंतर एफ इ सेरीज आली. मॅट टर्शरी कलर्स वाली ही सेरीज चांगली चालली. रीड व्हॉल्व ची ब्राव्हो ही स्कूटर बजाजने उतरवलेली पण रिस्पॉन्स कमी अस्ल्याने फोर स्ट्रोक स्कूटर इंजिन वर लेक्ष केन्द्रीत केले. क्रिस्टल ही बजाजची फोर स्ट्रोक स्कूटर पण जास्त चालली नाही. टू स्ट्रोक स्पिरीट त्यापेक्षा जास्त चालली. तकलादू फायबर पार्टस. कायमचा मेंटेनन्स आणि कमकुवत इंजिनची स्पिरीट अजूनही काहीजण वापरताना दिसतात. ५० सीसी एमफिफ्टीनंतर ८० सीसी एमेटी भरपूर चालली. त्यात मेजर हे फोर स्ट्रोक मॉडेल बजाजने उतरवले. जुन्या एमेटीइतके चालले नाही. त्याच इंजिनावर बीवायके नावाची लोकॉस्ट बाइक काढली तीपण फेल गेली.
.
बजाज सुपरसारखीच महाराष्ट्र स्कूटर्सची प्रिया. गुजरात स्कूटर्सची नर्मदा प्रिन्स १५० (ट्रोलीत हत्ती बसवून त्याला ओढलेली अ‍ॅड) ह्या सिरिजला कॉम्पिटिशन दिली व्हेस्पानेच पण एलएमएल (लोहिया मोटार्स) च्या जोडीने. त्यांची एनव्ही, स्टार, सुप्रीमो ह्या १५० सीसी. पल्स १२५ सी.सी. होती. मोठा आकार, इंजिन्च्या विरुध्द बाजूस असलेली स्टेपनी मुळे असलेला बॅलन्स. प्रचंड पिकप ही एलएमएल ची वैशिष्ट्ये. आतापर्यंतची सर्व इंजिने टू स्ट्रोक होती. एलेएमेलने बाइक्स वर लक्ष केन्द्रीत केले. अ‍ॅड्रीनो, एनर्जी, फ्रीडम, ग्राफ्टर, सीडी १०० सारखी मॉडेल एकापाठोपाठ फेल गेली. शेवटचा उपाय म्हणून रेट्रो स्टाइलने एनव्ही उतरवायचा उपायही करुन पाहिला पण एलेएमएल चे मार्केट संपले ते संपलेच.
.
बजाजने स्कूटरेट मध्ये सनी उतरवण्याआधी मोपेड मार्केट जोरात होते. सुवेगा ही ३ गिअरची मोपेड होती. कायनेटीकची लुना टीएफआर, डबलप्लस, मॅग्नम, स्पार्क, विंन्ग्स ही मॉडेल हवा करत होती. सर्वांचे इंजिन ५० सीसी. त्यांना कॉम्पीटिशन टिव्हीएसने टीव्हीएस ५० च्या रुपात दिली. त्यातही एक्सेल वगैरे मॉडेल उतरवले. एस्कॉर्टने ५० सीसी सेरीजमध्ये सिल्व्हरप्लस आणि एक्सप्लोरर मॉडेल आणलेले. झुण्डापचे इंजिन असलेल्या ह्या गाड्यात बरीचशी अत्याधुनिक वैशिष्ट्ये होती जी आजच्या गाड्यात आढळतात. उदा वायझर, अ‍ॅलॉय व्हील, बटनस्टार्ट, इंडिकेटर पॅनल, फ्रंट डॅश. ही दोन्ही मॉडेल गिअरवाली होती. ह्यासारखेच एक मॉडेल पिआजिओचे स्पोर्टीफ. ही भारताची पहिली बटनस्टार्ट ऑटोगिअर म्हणता येईल. अवंतीने गरेलीसोबत कोलॅबरेशन करुन उतरवलेल्या मोपेडसनी अ‍ॅव्हरेज ह्या एका युएसपीवर मार्केट मिळवले. त्यात दोन मॉडेल गिअरवाले व एक ऑटोगिअर होते. ज्यावेगाने मिळवले त्याच वेगाने अदृष्य झाली हि मोपेड. हिरोने पुक ह्या मॉडेलने मोपेड मार्केट एन्ट्री केली. त्यावेळी हिरो होंडा फक्त सीडी हन्ड्रेड आणि स्लीक विकत होते. हिरो होंडाची स्ट्रीट आणि स्मार्ट ही मॉडेल मोपेड म्हणता येतील अशी होती. रोटरी गिअर आणि क्लचलेस अशी हि मॉडेल्स जास्त चालली नाहीत.
.
कायनेटीकची स्कूटर स्टोरी डीएक्स ने सुरु झालेली बरीच चालली. ही पहिली ऑटोगिअर स्कूटर म्हण्ता येइल. त्यानंतर कायनेटीक मार्व्हलने पण बराच गाजावाजा केला. कायनेटीकने मोपेड मणता येईल अशी एमेटीसारखी फोर स्ट्रोक मोपेड के फोर नावाने उतरवेलेली. अ‍ॅव्हरेज चांगले असले तरी तकलादू पार्टस मुळे लवकर आउट झाली. डिसेंट कर्व्ही लुक अस्ल्याने ही बरीच चालली. नोव्हा, फ्लाइट, रोडीओ, ड्युरो अशी वाढत गेलेली कायनेटीक सुलज्जा फिरोदिया मोटवानी कडून महिन्द्रा कडे आली. त्यातले रोडीओ आणि ड्युरो हे मॉडेल्स महिन्द्राने अ‍ॅज ईट ईज लोगो बदलून चालवले आहेत. अर्थात बाइकमध्येपण महिन्द्राने कायनेटीकचे चॅलेंजर हे मॉडेल पंटेरो नावाने व व्हेलॉसिटी सेन्ट्युरो नावाने मेकओव्हर करुन उतरवले आहे व चालवत आहेत. गस्टो ही त्याच प्लॅटफोर्मवर मेकओव्हर केलेले मॉडेल आहे.
.
टीव्हीएसने स्कूटरमधील स्पेक्ट्रा हे पहिले १५० सीसी फोर स्ट्रोक मॉडेल उतरवले. मार्केट रिस्पॉन्स नसल्याने परत ६० सीसी स्कूटीकडे लक्ष केन्द्रीत केले. स्कूटी टीन्झ, स्कूटी स्ट्रीक, स्कूटी पेप, पेप प्लस, झेस्ट, वेगो, ज्युपिटर अशी सिरिज काही अपवाद वगळाता सध्या मार्केटमध्ये आहे.
.
टीव्हीएस बरोबर भागीदारी मोडून सुझुकीची अ‍ॅक्सेस बाजारात आली. मेटल बॉडी, टेलेस्कोपिक सस्पेन्शन असल्याने अ‍ॅक्टीव्हाला बरीचशी टक्कर दिली. डिओला कॉम्पीटिशन म्हनून स्विश आली. लेटस हे नवीन मॉडेल ११० सीसी आणि स्लीक आहे. नवीन अ‍ॅक्सेस मात्र फुल्ल मॅटॅलिक बॉडी, व्हेस्पाप्रमाणे क्रोम फिनेश हेडलाईट आण स्लीम लुकसह मार्केटमध्ये अवतरली आहे.
.
ह्यामध्ये अजून बरीच माहीती आणी मॉडेल्स अजून अ‍ॅडवता येईल. पण भारतीय मोपेड, स्कूटरेट, स्कूटर हा भाग खर्‍या अभ्यासकाला इंटरेस्टिंग आहे हे मात्र खरे.

अभ्या..

लिहिण्याच्या ओघात काही राहून गेले आहे. उदा लुना विंग्स ३५ सीसी विदाउट पासिंग होती, गस्टो रॉडीओच्या प्लॅटफोर्मवरच आहे अशा लहान सहान गोष्टी आहेत. कुणी दर्दी मिपाकर असला तर ह्याबद्दल छिद्रान्वेषीपण न करता एकडाव पार्टीला बसून ह्या विषयावर चरचा केल्यास अधिक आनंद होइल.

टवाळ कार्टा

कुणी दर्दी मिपाकर असला तर ह्याबद्दल छिद्रान्वेषीपण न करता एकडाव पार्टीला बसून ह्या विषयावर चरचा केल्यास अधिक आनंद होइल.

मी दर्दी नसेल कदाचित पण पार्टीला बसायला आवडेल ;)

अभ्या..

यंदाची पार्टी जरा वेग्ळ्या ग्रामीण वातावरणात लोकसंगीताच्य साक्षीने करण्याचे ठरले आहे आपले टक्याजी.
विसरला नाहीत ना?

पैसा

प्रतिसाद आवडला. फक्त मला आठवते त्याप्रमाणे बजाज कब १०० सीसी, सुपर १२५ सीसी आणि चेतक १५० सीसी होत्या. कबची चाके पण छोटी होती.

अभ्या..

हावो.
सुपर आणि चेतकमध्ये चाकात अंतर असलेले जरासे लहान मडगार्ड, उंच सस्पेन्शन आणी जास्ती ग्राउंड क्लीअरन्स मुळे चेतक उंच दिसायची. फरक गिअर बॉक्सात आणी पुढच्या डिकीत होता. चेतकला एक गिअर आणि पुढची इनबिल्ट डिकी जास्ती होती. कब, सुपरला बसवून घ्यावी लागे. काही लोक जाळीची किंवा पत्र्याची बसवत.

टवाळ कार्टा

काहीच मेहनत नाही ह्यात. आहे ती करंट माहीती आहे. बर्‍याच गोष्टी माझ्या जन्माआधीचे माहीत नाही, मला इंटरेस्ट नाही, मला काडीची माहीती नाही असे करुन टाळल्या आहेत. भारताचे बाइक मार्केट अगदीच काही मोठे नाही. इथे मिपावरच जावा यझदी चालवलेले लोक्स आहेत तेव्हा जरा माहीती घेऊन लेख लिहिला असता तर बरे. अर्थात टकासाहेब गांभीर्याने घेतले तरच. अन्यथा त्यांला नेहमीपरमाणे सर्वानाच फाट्यावर मारायचा पर्याय आहेच.

अभ्याशेट धाग्याचे नाव "बाइक्स घेताना" असे आहे, उद्देश हा कि जर कोणी नवीन बाईक घेत असेल तर थोडीफार माहिती मिळावी...मला ज्या दिवशीपासून बाईक्समध्ये इंट्रेस्ट वाटायला लागला तेव्हापासूनच्या बाईक्सबद्दल माहिती आहे...त्या आधीचे जास्त काही माहित नाही (काही ठरावीक बाईक्स सोडल्या तर...जसे आरडी :) )

अभ्या..

उद्देश हा कि जर कोणी नवीन बाईक घेत असेल तर थोडीफार माहिती मिळावी

टकाजी, धाग्यातली ही सगळी, किंबहुना ह्यापेक्षा जास्त माहीती ओव्हर्ड्राइव्ह किंवा ऑटो इंडीयाच्या शेवटच्या पानावर प्रत्येक अंकात असते. भारतात गाडी घेणे हा केवळ टेक्निकल स्पेसिफिकेशनचा किंवा लुकचा प्रकार नसतो. टेक्निकल स्पेसिफिकेशन अत्युत्तम असून फेल गेलेले कित्येक मॉडेल आहेत. गाडीचा ग्राहक बाजारात लक्ष असलेला, गाड्या वापरलेला आणी पैसा टाकायला तयार असलेला असतो. लहानपणापासून गाड्यांचे, त्यांच्या मॉडेल्सचे ग्राहकाच्या मनावर वेगेवेगळे इंप्रेशन पडत असतात. नवीन गाडी खरेदी करण्यात ह्या इंप्रेशनचा फार मोठा वाटा असतो. ग्राहकासाठी स्पेलंडर हा नुसता ब्रॅन्ड नसतो. त्यामागे हिरोहोंडा स्टोरी असते. प्रुव्हन इंजिन हा शब्दप्रयोग अजूनही युएसपी म्हणूनच वापरला जातो. म्हणून चिल्लर मेकओव्हर करुन सुध्दा स्पेलंडर/पॅशन दणक्यात विकली जाते. अ‍ॅक्टीव्हाइतकेच सगळे फीचर काहीवेळा तर चक्क जास्त असून इतर स्कूटरेट अ‍ॅक्टीव्हाइतक्या बिझ्नेस करु शकत नाहीत. यामागे काही कारणे असतात. त्यांचा शोध घेउन लेख लिहिणे तुझ्याकडून अपेक्षित होते. तू वापरल्या नसतील्/माहीती नसेल तर ते घेउन लिहावे पण असे अधांतरी लिहिणे मला तरी बरोबर वाटत नाही. मीही तुझ्याच पिढीतला, कदाचित थोडा सिनियर असेन पण अगदीच बाबा आदमच्या जमान्यातील हिरोमॅजेस्टीक चालवणारा नाही. धाग्याइतकी माहीती नॉर्मली सगळ्यानाच असते. ऑटोमोबाइल फिल्ड मध्ये तुझा इंटरेस्ट असेल तर सामान्य लोकांना माहीत असलेल्या लोकांपेक्षा जास्त माहीती द्यायलाच हवी. (असे मला वाटते)
.
बाकी तुझी ३५० सिरीज आली तर बुलेट सोबत आर्डी३५० स्टोरी टाकेन प्रतिसादात.
(त्यापेक्षा जुनी माहीती चौराकाकांना आहे. यामाहा पर्ल बाबतपण सांगू शकतील, जी तू अद्याप ऐकली/पाहीलीही नसेल)

अभ्या भावा. प्रिया लैच जबरी होती मुख्य म्हणजे मटरेल लैच हायक्लास आमची प्रिया तीन गियर वाली वडिलांनी बावीस वर्षे चालवली नंतर मी जेव्हा अकरावी मधे गेलो तेव्हा वडिलांचा विरोध न जुमानता वापरायला घेतली, ती मी पुर्ण केळीची पिकलेली साल असते तश्या पिवळ्या रंगात आमचा दोस्त असलेल्या इस्माईल मिस्त्रीच्या गेरेज मधे बसुन कंप्रेसर अन स्प्रे पेंटिंग वगैरे कुटाने करुन रंगवली होती!तेव्हा कळले ती गाड़ी काय चीज़ असेल ते बावीस वर्षा नंतर सुद्धा गंज लागणे दूर चासीच्या पत्र्याचा टावका सुद्धा उडाला नव्हता महाराजा

अभ्या..

क्रोम यलो चक्क?? पार क्युबन लूकच की.
फुलाफुलाचा शर्ट घालून एक वेताची टोपी आणी चड्डी घालून फिरायला कसला जबरा लूक. ;)

अभ्या..

मागल्या शीटावर एखांदी बोहेमियन ब्रावनी नगो का?

भावा लेम्ब्रेटा इसरलास लगा!! लेम्ब्रेटा म्हणजे एकेकाळी म्हणजे आमच्या बापुसच्या काळी कॉलेज कुमारांची आवडती होती की रे अर्थात लेम्ब्रेटा स्कूटर म्हणवी का इथून प्रश्न आहेतच!!

अभ्या..

बघ टक्या. मी फक्त बजाज कब पर्यंत मागे गेलेलो. इथे जुन्या वेस्पा, लॅम्ब्रेटावाले पब्लिक आहेत.
रिस्पेक्ट बापूसाब. तुमच्यासाठी फक्त रिस्पेक्ट.
लॅम्ब्रेटा चीजच भारी होती फक्त ती इंडीयात बनत होती का ह्याबद्दल मी कन्फर्म नव्हतो. मी चालवलीय ती. सोलापुरात एका शेठजीने दिवाणखान्यात फुल्ल मेटल क्रोम फिनीश करुन दिवाणखान्यात शोपीस म्हणून ठेवलीय. काय ते आडवे हॅन्डल त्याचे, तो लांबट आकाराचे साईड काउल. वॉव न विन्टेज चीज. आजकाल चालू कंडीशनच्या नसतीलच लॅम्ब्रेटा. वोडाफोनच्या प्रिंट जाहीरातीत झळ्कताना दिसायची ३-४ वर्षाखाली.

अभ्या त्या शेठजीला म्हणाव तिकीट लावा गाड़ी दाखवायला !! मी पैला लायनीत लागतो. लेम्ब्रेटा बहुदा इटली मधुन किट्स येत अन आपल्याकडे असेंबली होत असे! कुठं ते मिस झालं राव नाय आठवत आता, बाकी वोडाफोनच्या ऐड सेन्सची लेवलच वायली देवा! त्याच्या लोकेशन स्काउट करणाऱ्या माणसाच्या एस्थेटिक सेन्सची दाद देऊ वाटते, कायम anchrestal लोकेशन्स कधी पॉन्डिचेरी मधले क्लासिक फ्रेंच आर्किटेक्चर कधी पोर्तुगीज अम्बिएंस लैच भारी त्यातही शूटिंग सीपिया टोन मधलं! खल्लास असो,! विषयांतर होऊ लागलं तिच्येयला

बहुगुणी

लॅम्ब्रेटा इटलीच्या Innocenti कंपनीशी केलेल्या लायसेन्स करारानंतर आधी A.P.I (Auto Products Of India) ही मुंबई-स्थित कंपनी आणि मग १९७१ पासून स्कूटर्स इंडिया लिमिटेड (S.I.L) ही लखनौ ची कंपनी बनवायची. मामाकडे होती, खूप चालवलीय! स्कूटर्स इंडिया लिमिटेड पुढे रिक्शा तयार करायला लागली आणि लँब्रेटा बंद पडली.
--

टवाळ कार्टा

मेहनतीने लिहिलास. पण काही माहिती ऐतिहासिक आहे ती जरा तपासून घ्यायला हवी होती.

हा थोडे उल्टेपाल्टे झालेले असू शक्ते...ऑटोमॅटिक स्कूटरची सेगमेंट टाळून पुढेचे लेख लिहिणे मनाला पटले नाही त्यामुळे हा लेख लिहिलाय...बाकी तुम्ही ज्या काळातल्या स्कूटरबद्दल लिहिले आहे त्यावेळेस मी शाळेत होतो...आणि बराच पुस्तकी किडा होतो त्यामुळे बाईकबद्दल जास्त माहिती नव्हती

सिरुसेरि

छान माहिती . या लेखामुळे जावा , इंड सुझुकी , हिरो पुक , कायनेटिक स्पार्क अशा गाड्या आठवल्या .

मराठी_माणूस

पहीली शोरुम डीलेव्हरी, विजय ह्या स्कूटर ने आणली. फाल्कन, सुपर , पुष्पक अशी नावे असलेली मॉडेल्स वेगवेगळ्या राज्यांच्या प्लांट्स मधुन तयार होत असत. पुढे काय बिनसले माहीत नाही, पण ती कंपनी नामशेष झाली.

शाम भागवत

अहो, राजीव गांधींनी कोणी किती गाड्या तयार करायच्या ही अटच काढून टाकली आणि दूचाकीच्या बाजारपेठेचे स्वरूपच बदलून गेले. फक्त चांगले ते टिकले. बाकीचे नामशेष झाले. उदारीकरणाचे सगळे श्रेय मनमोहनसिंगाना दिले जाते पण भारतात उदारीकरणाचे पहिले पाऊल राजीव गांधींनी उचलले. बजाजचा वार्षिक दोन लाख गाड्यांचा कोटा होता. पण कोटा सिस्टिम गेली व बजाजची स्कूटर, जी १० वर्षांनी मिळायची ती ३ वर्षांच्या कालावधीनंतर ताबडतोब मिळायला लागली. या तीन वर्षात बजाजचे उत्पादन (सहा का सात) कित्येक पटीने वाढले. बजाजमधे १९८७ सालचा संप झाला नसता तर ते अजूनही कितीतरी वाढले असते.

शि बि आय

लेख मस्तच…

बाकी ती छप्परवाली बाईक लईच झकास दिसतीय… कधी बाजारात येनार हाय ??
आता तीच घिउन टाकावी.. उना- पावसाचा आणि हेल्मेटचा तरास नको... आणि सामान बी चिक्कार मावल…

व्हेस्पाचा अपवाद वगळता बर्याच ऑटोमॅटिक स्कूटर जवळपास १००cc च्या असूनसुध्धा मायलेज फार कमी असते (३०-४० kmpl), १५०-२००cc च्या बाईक सुध्धा इतकेच मायलेज देतात

बहुतांश आटोमेटिक स्कूटरेट ह्या बेल्ट ड्राइव असणे ह्याच्याशी लो एवरेजचा संबंध असावा काय? का तो आमचा गैरसमज आहे??

टवाळ कार्टा

पॉवर ट्रांसमिशनसाठी शाफ्ट ड्राईव्ह मग चेन ड्राईव्ह आणि मग बेल्ट ड्राईव्ह असा प्राधान्यक्रम असतो बहुतेक...पण ऑटोमॅटिक स्कूटरचा लो अ‍ॅव्हरेज असण्यामागे मुख्य कारण म्हणजे मॅन्युअल गीअर्ड स्कूटरपेक्शा यात गीअर्स जास्त वारंवारतेने बदलले जातात...कारण गीअर कोणता असावा हे इंजिन RPM वर अवलंबून असते...आणि प्रत्येकवेळी गीअर बदलताना ऑटोक्लचमुळे थोडे पेट्रोल जास्त वापरले जाते (कॉल्लिंग मेक्यानिकल विंजीनेर्स...चिमण्/बॅट्या/पिरा)
याच कारणामुळे ऑटोगीअर कारसुध्धा मॅन्युअल गीअर्ड कारपेक्शा कमी मायलेज देतात

अभ्या..

स्कूटरची लहान डायमीटरची चाके, जास्त एअर रेझिस्टन्स ही कारणे सुध्दा आहेत.
सेम मेक, सेम इंजिन, सेम बॉडी असलेली होंडा अ‍ॅक्टीव्हा ४५ मायलेज आणि होंडा ईटर्नो ५० मायलेज द्यायची. इटर्नो ट्रॅडिशनल हातातले गिअरवाली, पायात ब्रेक असलेली स्कूटर होती. बंद झाली. ऑटोगिअरने साधारण फरक पडतो. जास्त नाही.

टवाळ कार्टा

तुम्ही लात भरून पाव्लो...टीआरपीसाठी तुम्चे उडनमांडीफेम रेखाचित्र लाव्णार होतो लेखात :)

मार्मिक गोडसे

धक्का स्टार्ट नाही करता येत, त्यामुळे किक लिव्हर नसेल तर पावसाळ्यात अथवा थंडीत बॅटरी डाऊन झाल्यावर मेकॅनिकला शरण जाण्याशिवाय पर्याय नाही

आजोबांसाठी घेतलेल्या कायनेटिक होंडाचा एके दिवशी स्टार्टर अडकला. स्टार्टर व इंजिन दोन्हीही चालू, स्वीच बंद करून चावी काढली तरी गाडी बंद होत नव्हती. गाडीला गिअर नसल्यामुळे गिअर टाकून क्लच पटकन सोडून गाडी बंद करण्याचाही पर्याय नव्हता. फ्युअल ऑटो सक्शन असल्याने फ्युअल कॉक नव्हता,त्यामुळे पेट्रोल बंद करता येत नव्हते. शेवटी बाबांनी बॅटरीचा कप्पा खोलून वायर्स बॅटरीपासून वेगळ्या केल्यावर कुठे ती गाडी बंद झाली.

शाम भागवत

अहो, सायलेन्सरच्या तोंडावर म्हणजे जिथून धूर येतो तिथे पाय (चपला बूट घालून) ठेवून ते भोक बंद करायचे. १५ -२० सेकंदात गाडी बंद होते.

मार्मिक गोडसे

सायलेन्सरच्या तोंडावर म्हणजे जिथून धूर येतो तिथे पाय (चपला बूट घालून) ठेवून ते भोक बंद करायचे.

अशा पद्धतीने कोणतीही गाडी बंद करू नये. ४ स्ट्रोक बाइकच्या इंजिन वॉल्व्हचे नुकसान होऊ शकते व गाडीचा सायलेन्सर फूटू शकतो.

एम ८० च्या डिझाईन मधे अतिउत्तम सस्पेन्शन व आधुनिक फिचर्स असलेली बाईक आहे का?
एम ८० चे डिझाईन उत्तम असून का दुर्लक्षित राहिले?

शाम भागवत

तुम्ही कधी पर्ल यामाहा चालवली आहेत का?
क्लच वाली तसेच ऑटो क्लच वाली?
१९६९ ला त्या प्रथम भारतात आल्या.

कदाचीत चालवली नसावीत म्हणून एम ८० चे डिझाईन तुम्हाला उत्तम वाटतेय.
त्या गाड्या ७३ सीसी च्या होत्या. खरच अफलातून होत्या. पण बजाजला त्याच्या जवळपासही जाता आले नाही.

तसा प्रकार हीरो होंडा स्ट्रीट मधे होता. एकदम मस्त. १००सीसी चे इंजीन असूनही ६०+ चे अ‍ॅव्हरेज. उत्तम सस्पेंशन व रोटरी गिअर, मोठी चाके. बटणस्टार्टवाली असेल तर गिअरमधे असतानाही चालू व्हायची. ६०-७५ चा स्पीड आरामात घ्यायची व सेफ पण वाटायच.
पण.....
नाही चालली.

आज ही निव्वळ स्पेअर पार्ट मिळत नाहीत म्हणून लोक नाखुषीने त्या गाड्या विकताहेत. आता कोणीच तसे काही बनवत नाहीय्ये.