Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

म
मोदक
गुरुवार, 06/16/2016 - 18:29
💬 79
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे. तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले. गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले. लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.
  1. LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
  2. Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
  3. स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
  4. थंडीचे आणि साधे पायमोजे.
  5. एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
  6. ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
  7. बलक्लावा आणि राईडींग मास्क.
  8. किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
  9. गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
  10. थर्मल वेअर्स.
  11. थंडीचे जॅकेट.
  12. एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
  13. एक बॅकपॅक / सॅक.
  14. सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
  15. सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
  16. २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
  17. दोरी / रोप.
  18. सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
  19. आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
  20. पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
  21. गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
  22. आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
  23. गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
  24. गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
  25. गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अ‍ॅक्सलरेटर केबल.
  26. जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
  27. चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
  28. पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
  29. भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
  30. वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)
वरचे सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तर कांही अत्यावश्यक सामान / खाद्यपदार्थ एकावर एक अशा दोन तीन पिशव्यांमध्ये व्यवस्थीत गुंडाळून व वरती रबरबँड ने पक्के जखडून घेतले होते. वरचे सगळे सामान बॅगेत भरून आणि बॅग गाडीला बांधून एक १५-२० किमीची राईड केली आणि बॅग नीट बसत आहे का ते चेकवले. निघण्याची तारीख शेवटपर्यंत नक्की होत नव्हती. शेवटी २६ मे ला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची घोषणा झाली आणि २७ ला निघण्याचे ठरले..! चला तर मग.. जॅकेट चढवा, हेल्मेट घाला आणि लेहवारी साठी सज्ज व्हा..!!! . . . . . . . . . (क्रमशः)
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - चंदीगड, मनाली
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - लेह शहर आणि BRO
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पँगाँग लेक
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - खार्दुंगला पास
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - कारगिल वॉर मेमोरीयल
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - फिरोझपूर (आणि समाप्त..!)

Book traversal links for ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक ›

प्रतिक्रिया द्या
48128 वाचन

💬 प्रतिसाद (79)
ख
खेडूत गुरुवार, 06/16/2016 - 18:35 नवीन
अरे वा! नेहेमीप्रमाणेच जबरदस्त मालिका होणार. नकाशा पाहूनच उत्सुकता ताणली गेलीय. पु भा प्र..
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र गुरुवार, 06/16/2016 - 18:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
आ
आदूबाळ गुरुवार, 06/16/2016 - 18:46 नवीन
ये बात! भाग मात्र लौकर लौकर टाका.
  • Log in or register to post comments
ए
एस गुरुवार, 06/16/2016 - 19:01 नवीन
ते इनो हाये काय शिल्लक?
  • Log in or register to post comments
न
निशदे गुरुवार, 06/16/2016 - 19:23 नवीन
कडक.......... प्रचंड उत्सुकता आहे..... येऊ द्या पटापट.....
  • Log in or register to post comments
म
मित्रहो गुरुवार, 06/16/2016 - 19:38 नवीन
पुण्यावरुन लेह जबरदस्ता उत्सुकता भयंकर म्हणजे अगदी भयंकर वाढली.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 06/16/2016 - 19:52 नवीन
ज्जे ब्बात!!! जे नाम रोसण कर देया छोरे णे गोतीयण का! खल्लास मोदक शेठ ! एनफिल्ड फॉरेव्हर एनफिल्ड फॉर लाईफ! बी स्ट्रॉंग राईड मेटल!! जियो भाग लवकर लवकर येऊ द्या
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/17/2016 - 06:59 नवीन
एन्फिल्डबाबत इथेच धाग्याचे काश्मिर करायचे का मी शेप्रेट धागा काढणार आहे तिथे? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 06/17/2016 - 07:24 नवीन
जशी माननीय टका शेठची विच्छा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 06/17/2016 - 07:28 नवीन
खिक्क...माझ्या धाग्यावर करु दंगा...मोदकला ट्यार्पीची हौस नै =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 06/17/2016 - 08:16 नवीन
एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक ईट ऑर हेट ईट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मोदक Fri, 06/17/2016 - 10:02 नवीन
एन्फिल्ड, एन्फिल्ड है! लाईक ईट ऑर हेट ईट.
+१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
च
चाणक्य गुरुवार, 06/16/2016 - 20:00 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य गुरुवार, 06/16/2016 - 20:22 नवीन
वाचतोय.
  • Log in or register to post comments
ब
बाबा योगिराज गुरुवार, 06/16/2016 - 20:28 नवीन
येक नम्बर भावा. क्रमांक 2 चा फोटू बघून पुन्हा जळजळ झालेली आहे. पुलेशु, पुभाप्र
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Fri, 06/17/2016 - 07:36 नवीन
क्रमांक 2 चा फोटू बघून पुन्हा जळजळ झालेली आहे.>>>> सेम हियर.. बाकी पुढिल भाग लवकर येवूदेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा योगिराज
क
कंजूस Fri, 06/17/2016 - 03:16 नवीन
सायकल ? जय्यत तयारी यादी मस्तय.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/17/2016 - 06:58 नवीन
सायकल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
व
वेदांत Fri, 06/17/2016 - 06:16 नवीन
फोटो दिसत नाहीत. पुभाप्र .
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 06/17/2016 - 06:58 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदांत
स
सस्नेह Fri, 06/17/2016 - 06:52 नवीन
साक्षेपी कथन. ते फोटोंच्या मधलं वर्णन गायबलंय काय ?
  • Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर Fri, 06/17/2016 - 06:59 नवीन
मस्त.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/17/2016 - 07:05 नवीन
झकास लेख जरा अजून सविस्तर असायला हवा होता असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे Fri, 06/17/2016 - 07:14 नवीन
राइड सुरु असताना व्हॉट्सॅप वर अपडेट येतच होते तुमच्याकडून पण लेख स्वरूपात वाचताना खूपच थ्रिलिन्ग वाटतेय ! अभिनन्दन अन पुढच्या राइडला शुभेच्छा पुभाप्र
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Fri, 06/17/2016 - 07:19 नवीन
लेह-लडाख लोन (बुलेट सकट) नावाची योजना बँकांनी काढावी अशी विनंती. लाभार्थी तयार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 06/17/2016 - 07:21 नवीन
सुरुवात तर मस्त झालीय मोदक्शेठ. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Fri, 06/17/2016 - 07:33 नवीन
मोदकाचा लेख व शीर्षक पाहून प्रथम वाटलां की सायकलवरून लेह स्वारी की काय!!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 06/17/2016 - 07:46 नवीन
पुभाप्र! Sandy
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 06/17/2016 - 07:48 नवीन
मस्त सुरवात !!
  • Log in or register to post comments
न
नाखु Fri, 06/17/2016 - 07:57 नवीन
तुझ्या दोन्ही (सायकल आणि मोटारसायकल ) भटकंतीचे एक पुस्तक व्हावे ही ईच्छा आहे. बारीक सारीक बाबींची यादी, तपशीलवार माहीती आणि काय करावे/करू नये याची कारणमीमांसा असते म्हणून वाटते. ज्याला आवड आहे पण माहीती नाही त्याला नक्की उप्युक्त ठरेल.(इतका अनुभव नक्कीच तुझ्यापाशी आहे) पुभाप्र नाखु
  • Log in or register to post comments
अ
असंका Fri, 06/17/2016 - 10:04 नवीन
+१.. अगदी मॅन्युअल बनेल फस्क्लास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 06/17/2016 - 08:11 नवीन
सुरुवात झकास! फोटो सुद्धा मस्त. अन यादीचे अगदी डिटेल वर्णन केलेत. आम्हाला उपेगी पडणार :) (बाकी जेलुसिल आणुन ठेवलेय) पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे Fri, 06/17/2016 - 08:49 नवीन
अजून एका थ्रिलिन्ग लेखमालेसाठी सरसावून बसलोय.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/17/2016 - 10:01 नवीन
प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद मंडळी..!!! एसराव - इनो शिल्लक आहे अजून. आणखी काही महिन्यात देतो. :p स्नेहांकिता म्याडम व डॉक्टरसाहेब - हे फक्त टीजर्स आहेत.. ट्रेलर. म्येन शो सुरू होईल पुढच्या भागापासून. बाळ सप्रे - सायकलवरून लेह हे एक प्रकरण विशलिस्टमध्ये होते. आता नाही. सायकलवरून लेह करण्याचा विचार बहुतेक बारगळला आहे - पण काही सांगता येत नाही. हुक्की आली तर कदाचित जाईनही.. नाखुकाका.. आयड्या भारी आहे. :)
  • Log in or register to post comments
द
दिग्विजय भोसले Fri, 06/17/2016 - 10:05 नवीन
जंगी तयारी दिसतेय!! इन्जाय!!
  • Log in or register to post comments
स
स्नेहल महेश Fri, 06/17/2016 - 10:24 नवीन
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
ज
जगप्रवासी Fri, 06/17/2016 - 10:24 नवीन
आवडत्या विषयावर लेखमालिका, लदाख बद्दल कोणी कितीही लिहील तरी वाचायचा कंटाळा येत नाही आणि आता तर मोदकराव लिहिताहेत म्हटलं तर एकदम मस्तच असणार आहे.
  • Log in or register to post comments
म
माझीही शॅम्पेन Fri, 06/17/2016 - 10:30 नवीन
वाह एकदम जबरदस्त सुरूवात , पहिल्यांदा ह्या महाप्रवासाबद्दल कळल तेंव्हा खर वाटल नाही , पण आता हे सगळ वाचताना कळतय की किती ग्रेट आहे हे सगळ , पुलेशु
  • Log in or register to post comments
भ
भुमन्यु Fri, 06/17/2016 - 11:12 नवीन
उत्सुकता ताणली गेलीये त्याच बरोबर ईनो घेउन सज्ज झलो आहे. टाका पुढचे भाग.
  • Log in or register to post comments
च
चेक आणि मेट Fri, 06/17/2016 - 11:39 नवीन
अरे व्वा मस्तच!! या एवढ्या एक्ससेरीज च्या बजेटमध्ये एखाद्या गरीबाचं घर बांधून होईल मोदकराव:-(
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/17/2016 - 11:42 नवीन
खरं आहे राव.. मला जास्ती सामान घेवून प्रवास करायची सवय आहे. :( पण वरील लिस्टमधली कोणतीही वस्तू अनावश्यक वाटली नाही आणि न वापरता परत आली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
ज
जिन्गल बेल Fri, 06/17/2016 - 11:49 नवीन
__/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अभ्या.. Fri, 06/17/2016 - 11:45 नवीन
मस्त. बुलेट म्हणजे अलगच चीज असती.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 06/17/2016 - 12:04 नवीन
खरंय दादा... कसल्या कसल्या बेक्कर रोडवरून गाडी घातली.. दगड धोंडे आणि माती होती एका सेक्शनला तर चक्क तीन साडेतीन फूट पाणी होते. पण गाडी चट्टान जैसी कायम होती. ठरलेल्या रस्त्यावरून जरा हालली नाही. एकाच ठिकाणी राक्षसी वार्‍यासमोर गाडीने टिकाव धरला नाही. पण त्या वार्‍यात फोर्ड एंडेव्हर आणि टोयोटा फॉर्च्युनर सारख्या गाड्यापण मुकाट शेपूट घालून बाजुला थांबल्या होत्या. याबद्दल अधिक माहिती पुढील भागात येईलच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जिन्गल बेल Fri, 06/17/2016 - 11:50 नवीन
हि ओळख छान होती!!! पटापटा टाका पुढचे भाग... प्रतीक्षेत आहोत!! :)
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 06/17/2016 - 11:53 नवीन
अभ्या लगा तुह्याकडं हाय का बुलेट नसल्यास तडक एक काढ! तुला गरज हाय :D , आमचे फादर कायम एक म्हण सांगतात (त्यांना त्यांच्या मारवाडी मित्राने सांगितली होती) ती म्हणजे 'भुका मरो पर झोल मत खाओ' बुलेट घेतली तेव्हा हाच विचार केलता आम्ही!अवरेज कमी आहे ? मारो गोली !! दिवसाला टायल्या करत 50 किमीच्या जागी 5 किमीच फिरू पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच्याच शाही मयतात चालतोय!! :D
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/17/2016 - 11:57 नवीन
पर ते पाच असे शाही फिरू जसं का मी स्वतः रोमचा सिझर आहे अन स्वतःच्याच शाही मयतात चालतोय!! :D ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मोदक Fri, 06/17/2016 - 11:59 नवीन
ह्या quote साठी तुम्हाला एक पटियाला ग्लास लस्सीचा!! +१११ जियो बापुसाहब..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर
अ
अभ्या.. Fri, 06/17/2016 - 12:24 नवीन
इसरला का सोन्याबापू त्यो कुणाचा तरी बुलेटचा धागा? माज असतो म्हणल्यावर आमी तर लढवली बुलेटची खिंड. आठवीत असतानाच चालवायला शिकलेलो आहे. तीर्थरुपांची होती. नंतर ८५ मॉडेल बुलेट सोता ५ वर्श वापरली. मॉडीफाय करुन विकली. अजून एक हाय भावाकडं. अ‍ॅक्चुअली तवाच डेझर्टस्टॉर्म घ्यायची होती पण परिस्थितीने दगा दिला. नव्हता तवा टाइम आपला. फक्त थोडे दिवस अजून... एक आरई असणारच आपल्याकडं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Fri, 06/17/2016 - 12:30 नवीन
आठवले नीट सगळे! तुझ्याकडं लवकर डीएस येऊ दे ही प्रार्थना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा