Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

म
मोदक
गुरुवार, 06/16/2016 - 18:29
💬 79
मनरावने लेहवारी केली तेंव्हा भरपूर इनो घेतले होतेच. कांही गोष्टी ती लेखमाला वाचतानाच ठरवल्या गेल्या. एक म्हणजे बुलेट घेणे, दुसरी म्हणजे त्यावरून भरपूर भटकणे आणि एकदा लेहला जाणे. तर पहिल्या दोन गोष्टी ठरल्याप्रमाणे पार पडल्या. लेहला जायचे जायचे असे विचार सतत सुरू होतेच, वरवरची माहिती काढणे, मार्ग कसा असेल त्याचा अंदाज घेणे आणि तेथे काय काय बघायचे याची सतत उजळणी सुरूच होती. मात्र इतकी रजा मिळेल का हा मुख्य प्रश्न होता. एका अर्जंट प्रोजेक्टमुळे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुफान काम करावे लागले. त्यावेळी दीड महिन्यात एखादी आठवड्याची सुट्टी मिळाली असेल. त्यावर उतारा म्हणून एक मोठी सुट्टी मंजुर झाली आणि पुन्हा लेहचे वेध लागले. या दरम्यान मित्रांचा एक ग्रूपही जमला होता. सुरूवातीला पांच जण तयार झाले होते; शेवटी रोहित, विजय आणि मी असे तीन जण जाण्याचे फायनल झाले. गाडीचे पुणे-लेह-पुणे प्रवासाच्या अनुषंगाने खास सर्विसिंग करून घेतले. बेअरींग्स, प्रॉकेट्स, क्लच केबल, ब्रेक पॅड वगैरे पार्ट्स बदलून घेतले. आम्ही तिघांनी प्रॅक्टीस म्हणून एक ४०० किमीची राईडही केली. इतके मोठे अंतर कापण्याच्या दृष्टीने गाडीमध्ये किरकोळ बदल करणे आवश्यक होते.. आनंदरावांच्या मित्राकडे गाडीसाठी बकेट सीट बसवून घेतली. एक हवा तसा बॅक सपोर्टही मिळाला. (हा सपोर्ट मागच्या सीटसाठी उपयोगी आहे पण मला सामान ठेवण्यासाठीही याचा उपयोग झाला) योगेश बापट, कपिलमुनी त्यांच्या त्यांच्या मित्रांचे अनुभव सतत सांगत होते.. मनरावशी बोलणे सुरू होतेच. मनरावच्याच मदतीने रूट प्लॅनींग झाले आणि सामानाची यादी करणे सुरू झाले. लेह ला जाण्यासाठी सोबत घेतलेल्या वस्तू आणि त्या मिळतील ती पुण्यातील ठिकाणे.
  1. LS2 आर्मर जॅकेट, रेन लाईन आणि विंटरलाईन सह (प्रो बाईकर शोरूम कँप)
  2. Pro Biker नी गार्ड (प्रो बाईकर शोरूम कँप)
  3. स्टीलचा टो असलेले भक्कम शूज (मकाटी स्टोअर्स कँप)
  4. थंडीचे आणि साधे पायमोजे.
  5. एक साधे चप्पल / फ्लोटर्स - संध्याकाळी भटकताना वापरण्यासाठी.
  6. ३ प्रकारचे हातमोजे १) डॉक्टर लोक्स वापरतात ते सर्जिकल ग्लोव्हज २) थंडीसाठीचे लोकरी हातमोजे ३) प्रो बाईकर राईडींग ग्लोव्हज. (हे सर्व प्रत्येकी २ नग - एक वापरण्यासाठी आणि एक बॅकप म्हणून)
  7. बलक्लावा आणि राईडींग मास्क.
  8. किमान २ गॉगल्स (मी दिवसाचे ३ आणि रात्रीचा एक गॉगल सोबत नेला होता).
  9. गरम वातावरणात वापरण्यासाठी ड्रायफिट टीशर्ट आणि थंडीसाठी पूर्ण हातांचे टीशर्ट.
  10. थर्मल वेअर्स.
  11. थंडीचे जॅकेट.
  12. एक भक्कम सॅडल बॅग (पीक स्टोअर्स भवानी पेठ.)
  13. एक बॅकपॅक / सॅक.
  14. सॅडल बॅग आणि सॅकचे रेन कव्हर.
  15. सॅक बांधण्यासाठी स्पायडर / ऑक्टोपस
  16. २ सेलोटेप - एक मोठ्ठा, बॉक्स पॅक करण्यासाठी वापरतो तसा आणि एक वायरमन कडे असतो तसा.
  17. दोरी / रोप.
  18. सर्व आवश्यक औषधांनी सज्ज असलेला फर्स्ट एड बॉक्स.
  19. आवश्यक ते सर्व क्रीम / फेसवॉश वगैरे वगैरे.
  20. पेपर स्प्रे (किंवा डिओ / मूव्ह सारखे स्प्रे पण पेपर स्प्रे सारखे वापरू शकता - गरज लागल्यास)
  21. गाडीची सर्व ओरिजिनल कागदपत्रे. (ड्रायव्हिंग लायसन्स, आरसी, इन्शुअरन्स, पीयुसी)
  22. आयडी प्रूफ आणि अ‍ॅड्रेस प्रूफ आणि वरील सर्व कागदपत्रांच्या किमान ५ प्रती.
  23. गाडीची दुसरी किल्ली (शक्यतो सोबत असलेल्या मित्राकडे द्यावी)
  24. गाडीला आवश्यक असणारे पाने, स्क्रू ड्राईव्हर्स आणि टायर उघडण्यासाठी लागणारी हत्यारे.
  25. गाडीचे आवश्यक ते स्पेअर्स आणि जादाची क्लच केबल आणि अ‍ॅक्सलरेटर केबल.
  26. जादाच्या (टायरमधल्या) ट्युब आणि पंक्चर काढण्याचे सर्व सामान.
  27. चेन ऑईलींग करण्यासाठी वेगळे ऑईल.
  28. पेट्रोल साठी कॅन. हा साधासा कॅन कुठेही मिळतो मात्र कॅन घेण्याचे शेवटचे ठिकाण मनाली समजावे. पण मी पुण्यातून नेला होता. (मनाली-लेह रस्त्यावर टंडी येथे शेवटचा पेट्रोल पंप आहे त्यानंतर ३६५ किमी कोणताही पेट्रोल पंप नाहीये त्यामुळे येथे ५ ते १० लिटर वेगळे पेट्रोल घ्यावेच लागते.)
  29. भरपूर प्रमाणात सुकामेवा, बाकरवडी, चिवडा, लाडू आणि चिक्की. हे सामान जवळजवळ दुप्पट प्रमाणात घेतले होते. मुख्यतः काश्मीर आणि लेह लदाख ला भेटलेल्या सैनिकांसाठी भरपूर साठा जवळ बाळगला होता.
  30. वेगवेगळ्या आकाराच्या भरपूर प्लॅस्टिक पिशव्या (शक्यतो झिप लॉक वाल्या)
वरचे सगळे सामान वेगवेगळ्या प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये तर कांही अत्यावश्यक सामान / खाद्यपदार्थ एकावर एक अशा दोन तीन पिशव्यांमध्ये व्यवस्थीत गुंडाळून व वरती रबरबँड ने पक्के जखडून घेतले होते. वरचे सगळे सामान बॅगेत भरून आणि बॅग गाडीला बांधून एक १५-२० किमीची राईड केली आणि बॅग नीट बसत आहे का ते चेकवले. निघण्याची तारीख शेवटपर्यंत नक्की होत नव्हती. शेवटी २६ मे ला प्रोजेक्ट पूर्ण झाल्याची घोषणा झाली आणि २७ ला निघण्याचे ठरले..! चला तर मग.. जॅकेट चढवा, हेल्मेट घाला आणि लेहवारी साठी सज्ज व्हा..!!! . . . . . . . . . (क्रमशः)
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - चंदीगड, मनाली
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - लेह शहर आणि BRO
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पँगाँग लेक
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - खार्दुंगला पास
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - कारगिल वॉर मेमोरीयल
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग
  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - फिरोझपूर (आणि समाप्त..!)

Book traversal links for ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.

  • ७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक ›

प्रतिक्रिया द्या
48128 वाचन

💬 प्रतिसाद (79)
अ
अभ्या.. Fri, 06/17/2016 - 12:35 नवीन
आपके मुंहमे ओएम. सॉरीसॉरी.. घीशक्कर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अस्वस्थामा Fri, 06/17/2016 - 12:34 नवीन
मस्तच रे मोदका.. एक नंबर सुरुवात.. :)
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 06/17/2016 - 20:58 नवीन
पुभाप्र
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 06/18/2016 - 05:43 नवीन
मोदकभाउ , तुझा॑ हा प्राक्रम घर्च्याना सांगितले ते म्हणतात मोदकाला याड लागलं काय ? आता त्येना काय सांगावा की मोदक कसा येडा हाय ते. जातान जो रस्ता आहे तो येताना अस्तित्वात असेलच अशी ग्यारंटी नाही असा तिथला लौकिक आहे म्हणे. ( रोहटांग च्या अलिकडे तसा अनुभव येतोही). ७००० किमी ? अगागा !
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 06/18/2016 - 06:47 नवीन
तुम्ही लोकं या बुलेटवर फिरुन आम्हाला कोणी नाय बोलवत !!!! पुभाप्र.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Sat, 06/18/2016 - 08:10 नवीन
+१११ जियो मोदक राव . पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments
व
विलासराव Sat, 06/18/2016 - 08:17 नवीन
मी १५ मेपासून १३ जून पर्यन्त साबू व्हिलेज लेह येथे होतो. मधे २ दिवस एक अव्हेंजर रेंटने घेऊन लेह, अल्ची, खालसे, गारकोंन,संजा,बोधखरबू, लामायुरु ते लेह असा प्रवास केला. याआधी एकदाच अव्हेंजर चालवली होती लेह ते खारदुंगला पास. खुप सावकाश चाललो पण सुखरूप प्रवास केला. गारकोन आर्यन व्हॅली मधील छोटे गाव. ३ गावच आहेत त्या आर्यन लोकांचे. खालसेवरुन इंडसच्या उजव्या काठाने ७० किमी. तिथे होम स्टे केला. पायुपा नावाने गेस्ट हाउस आहे तिथे. १ गोरेगावची (मुंबई) फेमिली होती मुक्कामी.
  • Log in or register to post comments
भ
भरत्_पलुसकर Sat, 06/18/2016 - 09:20 नवीन
झकास!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/18/2016 - 09:44 नवीन
भन्नाट! हे करायच आहे एकदा!
  • Log in or register to post comments
र
रातराणी Sat, 06/18/2016 - 09:46 नवीन
पहिला फोटो अशक्य सुंदर आहे! _/\_
  • Log in or register to post comments
स
सुजल Sat, 06/18/2016 - 10:17 नवीन
अरे वा. छानच :)
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Mon, 06/20/2016 - 15:30 नवीन
ये बुलेट मेरी जान मंझिलों का निशान! बाईक म्हणजे बुलेट. एसरावांना देऊन उरलं असेल तर इनो द्या जरा!
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर Tue, 06/21/2016 - 06:41 नवीन
वाह. फिरोज्पूर ला गेल्याच कळल मॅप मधे डेरा बाबा नानक किंवा पिरोजपूर बॉर्ड्र बघितलीत का? अंगावर शहारे येण्याच्या जागा आहेत ह्या
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 07/08/2016 - 18:13 नवीन
पुढच्या भागात कळेलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
स
सविता००१ Tue, 06/21/2016 - 12:55 नवीन
अशक्य माणसा, पुढचे भाग पटापट येउदेत. मस्त लिहितो आहेस. नेहमीप्रमानेच. नाखुंशी सहमत. पुस्तक काढच.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 06/21/2016 - 14:12 नवीन
ज्ब्रा!
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Tue, 06/21/2016 - 14:37 नवीन
जबराट!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 06/21/2016 - 15:48 नवीन
खत्रा! (हा टिजर प्रतिसाद आहे. जसे लेख येतील तसा खरा प्रतिसाद मिळेल!)
  • Log in or register to post comments
व
वटवट Wed, 06/29/2016 - 06:19 नवीन
वाचतोय, बघतोय ..... खूप आवडतंय
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 06/29/2016 - 14:44 नवीन
वाचतेय. मस्त सुरुवात!
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 06/29/2016 - 19:24 नवीन
जबरदस्त ! याशिवाय दुसरा प्रतिसाद देऊच शकत नाही.
  • Log in or register to post comments
उ
उल्का Wed, 06/29/2016 - 19:44 नवीन
पुभाप्र. गेल्या आठवड्यात ट्रॅव्हल क्सपि वर रोहन पाटोळेने लेह लडाखला गेलेल्या बाइकर्सची मुलाखत घेतली होती. त्यात तुम्ही होता का? :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 07/08/2016 - 18:12 नवीन
नाही हो.. आमची मुलाखत कोणी घेतली नाही. :) उशीरा प्रतिसाद दिल्याबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उल्का
झ
झेन Sun, 07/10/2016 - 15:54 नवीन
झकास !!! खूप गोष्टी खूप लोक ठरवतात, पण जे ठरवून अमलात आणतात ते खरे जगतात बाकीचे फक्त कारण शोधतात. हॅट्स ऑफ मोदकराव. बाय द वे फोटोत अॉव्हेन्जर दिसत आहेत त्या तुमच्या टीम मधल्या आहेत का आणि त्या बुलेट इतक्या स्थिर आहेत का
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू गुरुवार, 07/21/2016 - 10:02 नवीन
आगस्ट मधये जाणारा आहे का कुणी लडाखला ? व्यनी करा प्लीज..
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ गुरुवार, 07/21/2016 - 10:13 नवीन
नवा भाग कधी आहे?
  • Log in or register to post comments
म
मोदक गुरुवार, 07/21/2016 - 10:27 नवीन
आज किंवा उद्या...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
व
वेदांत गुरुवार, 07/21/2016 - 13:37 नवीन
फोटो दिसत नाहीत ..
  • Log in or register to post comments
ज
जातवेद गुरुवार, 07/21/2016 - 15:26 नवीन
पुभाप्र!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

User account menu

  • येण्याची नोंद
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा