जनातलं, मनातलं

क्षितीज (कविता)

Primary tabs

दूर क्षितीजावर सूर्य ढगात लपला
केशराची रांगोळी नभी फ़ेकून चालला
उंच उडते पाखरू पाही रंगांची लीला
सय ये पिल्लाची प्राण पंखात आला

आकाशी केशर मंद किरमिजी झाले
उडणारे पाखरु पंख मारून थकले
दाटला अंधार दोन ठिपक्यांचे डोळे
पाही मनात पिल्लू दूर घरी थांबले

घरट्यात भुकेले मूक घाबरून
शुष्क चोंच आं वासून वासून
मी आणिला न दाणा शोधून
पिल्लू बघे बाहेर आससून

चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही
दाद जग देई पाखरू त्राही त्राही
बेरंगी रंगातून कसे भूक साही
दूर क्षीतिजी पिलू वाट पाही

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड

अनिल हटेला

वाह !!

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड

छान !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

प्राजु

सुंदर कविता...
अतिशय सुरेख. भरल्यापोटी सगळेच छान वाटते. पण आपले पिलू भुकेले आहे, एकटे आहे घरी..... काय आकाश आणि काय त्याचे रंग.. सगळंच बेरंग!!

- (सर्वव्यापी, एका चिमुकल्या पाखराची आई)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर

फारच सुंदर अन् वास्तववादी कविता...!

छान क्षितिज, केशरी रंग वगैरेचं कौतुक तुम्हाआम्हाला! परंतु,

चित्र मनोहारी ह्या क्षीतिजी राही
दाद जग देई पाखरू त्राही त्राही
बेरंगी रंगातून कसे भूक साही
दूर क्षीतिजी पिलू वाट पाही

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड

हेच अधिक खरं!

संध्यारेषांचं वर्णन करणार्‍या समस्त कवी-लेखकांना अन् मावळतीचे संध्यारंग टिपणार्‍या समस्त चित्रकार-छायचित्रकारांना अंमळ एक लहानशी चपराक देऊन भानावर आणणारी कविता...! :)

तात्या.

ऋचा

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड

हे खुप आवडल!!

(मी क्षितिजा) ऋचा

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

ईश्वरी

सुंदर कविता.

भरल्या पोटी रंग तरंगांचे ढंग
निसर्ग कला तृप्त मनाचेच छंद
नको ते क्षीतिज नको ते मंदरंग
भुकी जीवाला एक घासही उदंड

ह्या ओळी क्लासच

ईश्वरी