व्हेज बार्बेक्यू - भरली वांगी आणि भरली भेंडी
Primary tabs
गोपाळरावांनी खड्डा कोंबडीची लैच सोपी पाकृ दिल्याने घरच्या कोळशाच्या शेगडीवर सुरू असणारे कणीस, भरीत करण्यासाठीचे वांगे, कांदे, बटाटे, रताळी वगैरे भाजण्याचे प्रयोग पुढच्या श्रेणीला नेणे क्रमप्राप्त होते.
सकाळी एका हार / फुलेवाल्याकडून केळीची पाने मिळवली आणि तयारी सुरू केली.
साहित्य -

१) केळीची पाने आणि अॅक्युमिनीयम फॉईल
२) भाजीसाठी वांगी, बटाटे आणि भेंडी (नंतर चव बघण्यामध्ये निम्म्याहून जास्त संपतात त्यामुळे बटाटे आणि भेंडी त्या प्रमाणात.)
३) कांदा - बारीक चिरून
४) धणे पावडर
५) शेंगदाण्याचे कूट
६) जिरे पावडर
७) कांदा लसूण मसाला
८) मीठ
९) जिरावण / जिराळू पावडर
१०) खोवलेले खोबरे
११) कोथिंबीर
१२) गूळ / साखर
१३) तेल
सोबत भाजण्यासाठी

१) मक्याचे कणीस
२) कांदे
३) बटाटे
४) रता़ळी
५) तुम्हाला जे आवडे ते..
सर्वप्रथम आपण ज्या कशात बार्बेक्यू करणार आहोत त्यामध्ये लाकडे पेटवा. भरपूर जाळ झाला पाहिजे व नंतर भरपूर कोळसे तयार झाले पाहिजेत. मी मातीची कुंडी वापरली.
लाकडे पेटायला वेळ लागला. :(

वांगी धुवून घ्या.
वांग्यांचे देठ काढून टाका व त्याला देठाच्या दिशेने ३ / ४ उंचीच्या डॉक्टरांच्या चिन्हासारख्या चिरा द्या.
वरील सर्व जिन्नस वापरून भरली वांगी करताना आपण जसा मसाला तयार करतो तसा मसाला तयार करा व वांग्यांमध्ये भरा.
बटाटे धुवून व साल काढून घ्या.
बटाट्याला आरपार छिद्र करणे शक्य असेल तर तशी २ / ३ छिद्रे करा.
केळीची पाने स्वच्छ धुवून घ्या. हारवाल्याकडे शक्यतो खुंट मिळतात. त्यातला सर्वात आतला भाग एकदम कोवळा व स्वच्छ असतो. त्या भागावर भरलेली वांगी आणि बटाटे ठेवा. वरून राहिलेला मसाला थापा.
भेंडी साठी वरचे मसाले वापरा व भेंडी भरून घ्या. भेंडीच्या मसाल्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घाला.

केळीच्या पानांचे ३ थर करा व त्याची पोटली बांधून घ्या. या तयार पोटलीला ३ वेगवेगळ्या दिशांनी अॅल्युमिनीयम फॉईलने गुंडाळा.

मातीच्या कुंडीत तळाशी भरपूर धगधगीत कोळसे घाला.
त्यावर या पोटल्या आडव्या ठेवा. (उभ्या ठेवू नयेत, खालची भाजी जळते - स्वानुभव.)
वरून आणखी एक धगधगीत कोळशांचा थर द्या. वरच्या कोळशांच्या थरावरती कणीस, कांदे, बटाटे किंवा रताळी भाजा.
साधारणपणे पाऊण तासाने भेंडीची पोटली बाहेर काढा.
तासाभराने वांगी-बटाट्याची पोटली बाहेर काढा.

भाजी तयार आहे. हवे असल्यास सोबत पोळी / भात घ्या अन्यथा आहे असेच खाल्ले तरी चालेल. :)


**********************************
मी गोपाळरावांच्या प्रमाणे अॅल्युमिनीयमचे कंटेनर वापरले नाहीत म्हणून फॉईलचे ३ थर दिले
कोणत्याही परिस्थितीमध्ये एका तासापेक्षा जास्त वेळ कोळशाची धग लागून देवू नका - भाजी करपते / जळते.
**********************************
लै भारी मोदक राव !
हायला
ही कुंडीत बार्बेक्यू करण्याची आयडिया लै म्हणजे लैच भारी आहे. आणि फोटोही भन्नाट आहेत.
"तोंपासु"
वाह!!
दु दु मोदक. जीभ खवळवली...
या विभागात(ही) दणक्यात पदार्पण!
पोपटी घरात ( ब्लॅाकमध्ये ) केल्याबद्दल कौतुक आहे.फार चांगलं जमलंय.
झकास भावा एक नंबर झकास!!!
आता लवकरच सामिष पाककृती येऊ द्या!
नक्की सर. :)
मस्तच जमलंय. घरी आमची गँग बोलावून बार्बेक्यु कट्टा करणार आता!
वा!मोदकभौ,रहाता कुठे तुम्ही?रविवार असूनही भाजी बघून तोंडात पूर आलाय.
छान
तोंपासु.
फार छान
लय भारी मोदक राव
लवकरच पाक्रु करुन बघणेत येइल
भारी. करून बघणार नक्की.
जबरी आहे. च्यायला माझ्या घरात मला असे उपद्व्याप करायला वेळ मिळेल, देव जाणे..
पिंगूशेठ.. का फुलटॉस देता दर वेळी? :p
=))
@जिरावण / जिराळू पावडर ››› इ का है जी? कबी सुना नही है |
ओ कधी लोकांना तोंडदेखलं तरी बोलवत जा की...
बरं जमलय..
भालो आछे!
भालोच भालो!!
आणि "पाक"सिद्धता
इती मोदकायन
पुभाप्र नाखु
मस्तय!
तों पा सु.
जेब्बात !
काहीभाज्या डायरेक्ट सळईत खुपसुन निखार्यावर भाजून चांगल्या लागतील असे वाटते.
केळीच्या पानाचा मस्त फ्लेवर आला असेल यात शंका नाही.
जिराळू पावडर म्हणजे काय रे ? फटू च्या बाबतीत आमचा गणेशा झालाय त्यामुळे विशेष काही जळजळ वगैरे झाली नाही.
मास्तुरे आणि बुवा - जिराळू / जिरावण पावडर ही खास गुजराथी / इंदोरी खासीयत आहे.
गुजरातेत जिराळू असे म्हणतात तर इंदोरात जिरावण - दोन्हीच्या चवी साधारणपणे सारख्या आहेत. ..आणि थोडक्यात वर्णन करायचे असेल तर "चाट मसाल्याचा मोठा भाऊ" आहे. चाट मसाला वापरला तर फार फरक पडणार नाही. पण या मसाल्याची वेगळी चव येते.
माझी बडोदा ट्रीप होणार आहे, आणतो तुमच्यासाठी :)
हापिसच्या बाहेर नुकतंच एक इंदोरी पोहेवाला चालू झालाय, तो पोह्यांवर एक कसलीशी मातकट रंगाची पावडर टाकून देतो. बरी असते चव त्याची पण नक्की पत्ता लागत नाही कसली असावी ते. बहुदा तू म्हणतोयस तीच पावडर असावी. विचारतो त्याला.
तेच असणार. औंध मध्ये कुठेतरी मिळते असे इंदोरी दोस्ताने आत्ताच सांगितले आहे.
नक्की माहिती काढून कळवतो.
प्रोत्साहनाबद्दल सर्वांचे आभार..!!! :)
फोटो दिसत नाहीत ..
वाह मोदक एकदम भारी पा कृ , हेही क्षेत्र पादाक्रांत करायचं सोडलं नाहीस , फोटो बघून खतरनाक प्रकार वाटलं
पु पा शु (पुढील पाककृती साठी शुभेच्छा)
आम्हाला कधी बोलावणार ?
बाकी, त्या कणसांचे, बटाट्यांचे आणि रताळ्याचे काय झाले पुढे ?
तुम्ही कुठे असता? कोण तुम्ही? तुम्हाला मी ओळखतो का?
;)
अ र्र र्र र्र...
पिराला द्यायचा प्रतिसाद चुकून तुला पडला. आता असूदे. तुला पण लागू आहेच. :p
केळीच्या पानाची छोटी टिप : पान थोडं त्या निखार्यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी जस्ट धग लावली, की नरम पडतं, मग त्याची पुरचुंडी वळण्याचं काम सोपं होतं.
*
"दवे का दिव्य जिरावण" या नावाने रेडिमेड मसाल्यांच्या सेक्शनमधे कोणत्याही सुपरमार्केटात जिरावण मिळायला हरकत नाही.
*
खालच्या पोटल्या शिजेपर्यंत कणीस्/बटाट्या/रताळ्यांचं पुढे नाही, तर आधीच गट्टम झालं असावंसं दिसतंय. ;)
आमचा रेफरन्स दिल्याबद्दल अनेक धन्यवाद!देणार की राव रेफरन्स.. तुमची कोंबडीच तर आमची प्रेरणा होती..!!!
केळीच्या पानाची छोटी टिप : पान थोडं त्या निखार्यावर किंवा गॅसवर भाजून घ्यायचं. अगदी जस्ट धग लावली, की नरम पडतं, मग त्याची पुरचुंडी वळण्याचं काम सोपं होतं.मला मिळालेली केळीची पाने खूपच कोवळी होती. सहज दुमडत होती आणि न फाटता पुरचुंडी बांधली गेली.
खालच्या पोटल्या शिजेपर्यंत कणीस्/बटाट्या/रताळ्यांचं पुढे नाही, तर आधीच गट्टम झालं असावंसं दिसतंय. ;)सही जवाब. ते कणीस आणि रताळी, बटाटे पोटल्या तयार होईपर्यंत गट्टम झाले. :)
त्या बाबा कणसा पेक्षा बेबी कॉर्न वापरायला पाहिजेत.
कं बोल्तो?
आहे आहे.. ते पण लिस्टावर आहे.
कुंडीची आयडिया एकदम जबरदस्त.
भारी पाककृती , आवडली.
जुम्ही जे पण करता मनापासून, त्यावर इथे लिहिता ते पण अभ्यासपूर्ण, फोटोपण सुरेख. फक्त एकच वाटतं एवढी सगळी मेहनत वांगी आणि भेंडी यावर नॉट जस्टिफाईड, अश्याने कोंबडीच्या जीवाला काय वाटेल ? :-)
मी धागा वाचला नाही. फटु बघितले नाहीत. मी मोदकाला ओळखतच नै.
बाब्बॉ जबरी, हे करायची इच्छा आहे पण फसन्ञाचे चान्सेस जास्त दिसताय माझ्याकडुन :(
प्रयत्न करा हो.. सहज जमेल.
तीन थर केळ्याच्या पानाचे, तीन थर अॅल्युमिनीयम फॉईलचे आणि एक तास धग. हे बेसीक गणित.
मी आज पुन्हा वांग्याची आणि भेंडीची भाजी केली होती. व्यवस्थीत जमली. :)
मस्त् भाजी
क्या बात है ! मस्त पाक्क्रुति ! धन्यवाद !
केळीची पाने हवी तशी वळायची असली (अगदी तिच्या विणे विरुद्ध) तरी एक सोपी शक्कल आहे, पाने धुवून स्वच्छ केली की तुम्ही पेटवलेल्या अगोटीवर अंदाजे अडीच फूट वर धरून दोन्ही बाजूने थोडी शेकून घ्यावीत (पान थोडे गरम करणे, पार धूर नाही) अशी गरम केलेली पाने वाटेल तशी पुरचुंडी बनवली तरी फाटत नाहीत, हा स्वानुभव :)
दोन वर्षं भट्टी चालूच ठेवली काय?
जिरावण = जिरे पावडर अधिक आमचूर पावडर.