Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?

म
मुक्त विहारि
Sat, 07/09/2016 - 21:51
🗣 175 प्रतिसाद
प्रिय संपादक, मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे. इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला? मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक. कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन. पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.) आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला. प्रामाणिकपणे सांगायचे तर, इथे खूप काही मिळाले. व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे. काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.) पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच, डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे. माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही. पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच. मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती. मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे. आपलाच, मुवि

प्रतिक्रिया द्या
46685 वाचन

💬 प्रतिसाद (175)
आ
आदूबाळ Sun, 07/10/2016 - 08:12 नवीन
गविंना चावी मारा. (दिसत न्हाईत कुठं हल्ली.) विठाना गाठा. ...वगैरे
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अभ्या.. Sun, 07/10/2016 - 08:23 नवीन
आदूबाळाला टाळा, (लै चावायलाय) ;)
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अनुप ढेरे Sun, 07/10/2016 - 08:52 नवीन
गवि आजकाल फक्त पाककृत्यांवर दिसतात.
↩ प्रतिसाद: आदूबाळ
म
मारवा Sun, 07/10/2016 - 10:29 नवीन
इश्य आदुबाळा........... काय हा चाळा.......... पुरे आदुबाळ थांबव हा खेळ.. @ बोकोबा मोगांची राखा निगा आगागागा यासाठी बोका ए आझम बात मे है दम चंपा अनुकंपा ला तोड नाही मात्र यावरुन मिसळतापे बहु तापलो रामराया का घातले मला मोकलाया अस काही तरी जमु शकेल बहुधा आहे आहे स्कोप आहे धाग्याला
↩ प्रतिसाद: आदूबाळ
च
चौकटराजा Sun, 07/10/2016 - 07:31 नवीन
मी तर मुवींचे असे बोट वर करून पगडी घालून व्यंगचित्र ( सॉरी अर्कचित्र )काढून त्यात " या संपादकांचे डोके ठिकाणावर आहे काय....? " असा संवाद टाकणार होतो. पण टक्कल लपले असते व ते मुवि न वाटता टिळकच वाटले असते. व जे स्वतः च एक संपादक होते ते असे म्हणतीलच कसे अशी तांत्रिक चूक काही अभ्यासूनी काढली असती. सबब बेत रद्द ! ता.क. हे डू आय डी वगैरे प्रकरण संपादकांच्या हातात नसून ते मालक व उपमालक यांचे हातात आहे असे कळते ती म्हाईती बरोबर आहे काय मुवि....?
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 07/10/2016 - 07:48 नवीन
मुविसाहेब, नको त्या लोकांना उगा महत्व देण्याने त्यांचा खाजवून खरूज काढण्याचा हेतू सफल होतो आणि त्यांना प्रोत्साहन मिळून त्यांचे चाळे अजूनच वाढतात. त्यांना दुर्लक्षाने मारले की अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मर्कटलिला करण्यातला रस निघून जातो असा सर्वसामान्य अनुभव आहे. फारच अतिरेक झाला तर त्यासंबंधी कारवाई होते हा इतिहास आहेच. मात्र, "अती म्हणजे नक्की किती अती ?" हा सार्वकालिक व सार्ववैषयिक यक्षप्रश्न नेहमीचाच आहे... आणि त्यावर एकमत होणे नाही, हे पण सार्वकालिक सत्य आहे हे तुम्हालाही माहीत आहेच. सार्वजनिक रस्त्यावरून जाताना आपण कचरा (आणि कायकाय) टाळून पुढे जातो... फारतर त्याला मनातल्या मनात दोनचार श्या हासडतो आणि पुढच्या दोन पावलांत ते विसरूनही जातो... व आपल्याला पाहिजे त्या गंतव्यावर पोहोचण्याचे सोडत नाही. हेच माहिती महामार्गावर (इन्फर्मेशन हायवे) करावे असे मला वाटते. मुख्य म्हणजे, ज्यांच्याकडे आपण सहज दुर्लक्ष करू शकतो अश्या खोडसाळ प्रवृत्तींमुळे आपले मनःस्वास्थ्य बिघडवून घ्यावे इतकी त्यांची लायकी अजिबात नसते, असे माझे मत आहे.
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 07:59 नवीन
मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे प्रतिसादांवरून जाणवले. आंतरजालावर वावरणारा सोशल जाणिव नसलेला श्रेष्ठत्वाच्या अहंभावात कळपाने राहणारा एक समाज आहे. अवांतर : मुवि टेंशन घेऊ नका.
ध
धनंजय माने Sun, 07/10/2016 - 11:54 नवीन
>>>>>मिपावर सूज्ञ लोकही आहेत हे प्रतिसादांवरून जाणवले. या वाक्याचा निषेध.
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
मितभाषी Mon, 07/11/2016 - 16:28 नवीन
का बरे निषेध? ???
↩ प्रतिसाद: धनंजय माने
ध
धनंजय माने Sun, 07/10/2016 - 08:44 नवीन
धागा पेटला. कुठले कुठले म्हातारे (आणि म्हाताऱ्या) शेकोटीला आले. ;)
प
प्रसाद गोडबोले Sun, 07/10/2016 - 09:01 नवीन
वाह वाह खतरनाकच धागा मुवी ! फुल्ल इन्टर्टेन्मेन्ट होणार इथे ! बाकी चंपाताईंनी तुकोबांचा अभंग दिल्याने आपण तर फॅनच झालो त्यांचे ! त्यांना ह्या निमित्ताने तुकोबांचा एक अभंग ऐकवावा म्हणतो :
आधी होता वाघ्या | दैवयोगे झाला पाग्या| त्याचा यळकोट राहिना | मुळस्वभाव जाईना|| आधी होते ग्रामजोशी | राज्यपद आले त्यासी | त्याचे पंचांग राहीना | मुळस्वभाव जाईना || आधी होती देवदासी | पट्टराणी केले तीसी| तिचे हिंडणे राहीना |मुळस्वभाव जाईना|| आधी होता संतसंग | तुकाझाला पांडुरंग | त्याचे भजन राहीना | मुळस्वभाव जाईना ||
बिरुटे सरांचे पत्र कम सल्ला आवडले एस्पिशियली ते गेंड्याची कातडी वगैरे तर भारीच ! मागे एका मिनि कट्ट्याला एका माजी मिपाकराने मांडलेले मत आठवले की चंपा , नाना , मोगा , हितेश सारखे डु आयडी मिपाच्या दृष्टीने एका अर्थी गरजेचे आहेत कारण त्यांच्या मुळेच तर मिपावर इतका हिटरेट आहे. मुवी मी तुम्हाला ग्रेग चॅपेल आणि गांगुलीची गोष्ट सांगितली आहे का हो ? नसेल तर पुढील कट्ट्याला जरुर आठवण करुन द्या , आवर्जुन सांगेन !! आणि माझे वैयक्तिक मत म्हणुन सांगतो की तुमच्या लेखनावर येवुन असला कोणी डु आयडे की जो'शी' करत असेल तर संपादकांना व्यनि करावा , किमान त्या प्रतिसादावर तरी कारवाई केली जातेच !
च
चंपाबाई Sun, 07/10/2016 - 09:32 नवीन
तुकोबा पोस्ट आज सकाळी व्हाट्सपवर आले. इथे संदर्भ मागणारी भुतावळ मागे लागू नये म्हणुन गुगलवरुन संदर्भ काढुन कन्फर्म करुन ते लिहिले. आtaa पुण्यात मंदिर मशीद आमने सामने असलेला तो रोड कुठचा , पुजारी मौलवी यांच्या खापरपणजोबांचे फोन नंबर , हे तुकोबा नक्की तेच की दुसरे कुणीतरी , इ इ प्रश्न विचारणारे येतील
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 09:38 नवीन
हेच बोल्तो. वैयक्तिक कूणी त्रास देत असेल तर योग्य ठिकाणी तक्रार करावी. मिपावर नक्की दखल घेतली जाते.
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ध
धनंजय माने Sun, 07/10/2016 - 10:23 नवीन
याच धाग्यावर लिहीतो. मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण??? मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का? आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी? सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का? ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का? अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का? चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???
ध
धनंजय माने Sun, 07/10/2016 - 10:23 नवीन
याच धाग्यावर लिहीतो. मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण??? मिपा ला बऱ्याच जणांची गरज नाही तसं बऱ्याच जणांची गरज आहे का? आम्ही सांगतो ती पोततिडीक आणि बाकीच्यांची टिंगळ टवाळी? सामान्य सदस्याला दिसणारे पर्याय वेगळे, आतल्या वर्तुळासाठी 'संवाद' वेगळे का? ठराविक लोकांसाठीच काही घोषणा, अमुक तारखेला लेखमाला लिहायची असे उपक्रम असं का? अमुक एक जण काड्या च करायला येतो, त्याला बाजूला सारा असं predefined मत का? चार लेख लिहून स्वत:च्या मिपाबाह्य पात्रतानिकषावर खुर्च्या पकडून बसलेल्या लोकांबद्दल बोललं की त्रास होतो ते का???
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 11:49 नवीन
मिपाचे हितकर्ते म्हणजे नेमके कोण कोण???
हा कळीचा मुद्दा आहे. इथे डांगे, बापू या उत्तम लिहिणार्या लोकांना जाणीवपूर्वक त्रास देणारे आहेतच. चांगलं लिखाण करणार्‍या नवोदितांमूळे नेमके कोणाचे आसन डळमळीत झाले? =))
↩ प्रतिसाद: धनंजय माने
म
मारवा Sun, 07/10/2016 - 11:27 नवीन
तुम्हाला व्यनि केलेला आहे.
प
प्रकाश घाटपांडे Sun, 07/10/2016 - 12:31 नवीन
मुवि बिपिन कार्यकर्त्यांचा हा लेख वाचा http://www.misalpav.com/node/11148 दुर्लक्ष करणे तत्व अवलंबा
स
स्वीट टॉकर Sun, 07/10/2016 - 13:42 नवीन
'डू आय डी' हा प्रकार कितपत तापदायक आहे याची मला काही कल्पना नाही. मात्र 'दुर्लक्ष करणे' हे तत्व अवलंबणे मला स्वतःला पटंत नाही. 'डू आय डी' ही संकल्पनाच dishonest आहे. ती एखाद्याला अवलंबवावी लागते याचाच अर्थ दालमे कुछ काला है| त्यामुळे त्यांचा निचरा करणं मिपाच्या तब्येतीच्या दृष्टीनी जरूरीचं आहे. त्याला सगळ्यात सोपं आणि प्रॅक्टिकल उत्तर आहे मोबाईल फोन नंबर. हे नंबर नीलकांतांकडे गोपनीय राहतील. आज जगभर सगळीकडे मेंबरशिपसाठी मोबाईल फोन नं. वापरला जातोय.
ज
जव्हेरगंज Sun, 07/10/2016 - 14:21 नवीन
+1
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
स
सामान्य वाचक Sun, 07/10/2016 - 14:38 नवीन
एक माणूस किमान 5 7 नंबर असे देऊ शकतो , ज्या मोबाईल ला त्याला access असेल। म्हणजे otp वगैरे पाठवला आणि वेरिफिकेशन compulsary केले तर दुर्लक्ष्य एव्हडा एकमेव उपाय आहे हौशे नवशे गवशे हे सगळीकडे असायचेच आपल्याला जेवढे स्वतंत्र आहे व्यक्त होण्याचे, तेवढेच त्यांना हि आहे आपल्याला त्यांची मते, विचार, लेखन आवडत वा रुचत नसेल तर सोडून द्या 2 5 न आवडणाऱ्या लोंकां साठी बाकी 50 मित्रांपासून कशाला दूर जात ? मिपा बाहेर संपर्कात राहिलात तरीही तुम्ही बऱ्याच गोष्टी , ज्या मिपा मुळे common आहेत, त्या मिस कराल शेवटी कुणाचेच कुणा वाचून आडत नसते। ना तुमचे संस्थळावाचून किंवा संस्थळाचे तुमच्या वाचून शाळा कॉलेजात नोकरीत कमी लोकांकडे दुर्लक्ष्य करावे लागते का? Trolls हे सगलीकडे असतातच च च च त्याला संस्थळ हे कसा अपवाद असेल? लोकं ची उपद्रव क्षमता हि तुम्ही दुर्लक्ष केलेत कि 0 होते हे लक्ष्यात घ्या
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
ल
लॉरी टांगटूंगकर Sun, 07/10/2016 - 15:48 नवीन
मुविंनी लैच प्वाईंटाचा मुद्दा मांडलेला आहे. भात ताटात आल्यावर खडे काढत बसण्यात मजा नाही. आयडी मंजूर करायचे फिल्टर्स वाढवले जाउ शकतात किंवा संपादन कठोर केलं जाउ शकतं. (पैसाताई, वल्लीबुवा वगैरे संपादक असतांना ट्रोलगिरी कमी होती- बायस असू शकतो, माहीती नाही. किंवा सध्या संपादकांची संख्या कमी असल्याने त्यांना वेळ देता येत नसावा) दरवेळी शिशुपालाचे शंभर अपराध होउ द्यायचे आणि मग काहीतरी करायचे. दुर्दैवाने आयडींच्या ट्रोलगिरीला संपूर्णपणे दुर्लक्षिले जात नाही. दुर्लक्ष करायला हरकत नाही पण उत्तम धाग्याच्या शेवटच्या क्षणी केलेली ट्रोलगिरी पाहून आधी बासुंदी Image removed. आणि त्यावर लिंबू जिभेवर ठेवायला दिलं की कसं होईल तसं वाटतं.Image removed. आणि अजूनही दुर्लक्ष करायचं म्हणत असाल तर आधीचे आयडी कशाला ब्लॉक करता आहात. राहू देत की. करू दुर्लक्ष.
↩ प्रतिसाद: स्वीट टॉकर
स
सतिश गावडे Sun, 07/10/2016 - 14:40 नवीन
मुवि, आभासी जगाचं फार टेन्शन घेतलंत. आपल्याला त्रासदायक वाटणारे लेख वाचायचेच नाहीत. तुम्ही ज्या पद्धतीच्या आयडींना त्रासून लेख लिहीला आहे त्यांना तांत्रिक भाषेत Internet troll म्हणतात. त्यांच्याबद्दल वाचा. एकदा वाचलेत की तुम्ही आपोआप दुर्लक्ष करु लागाल. इथून आपण काय घ्यायचं हे एकदा मनात पक्कं ठरवलं की मिपा हा माणसं जोडण्यासाठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे. मस्त उगाचच मित्रमंडळींच्या खरडवह्यांमध्ये डोकवायचं, त्यांची मस्करी करणारी खरड टाकायची. कधी वेळ असल्यास भेटायचं, सोबत पुस्तकं खरेदी करायची, जेवायचं, मस्त रक्त वारुणी किंवा आपल्या सोनेरी पेयाचा आस्वाद घ्यायचा. एक राहिलं, एखादा मित्र माझ्या धाग्यावर प्रतिसाद दे म्हणून फारच मागे लागला तर लेख उघडायचा. झरकन पेज स्क्रोल करायचे आणि "छान लिहिलंय" किंवा "मस्त लिहिलंय" असं एक विशेषण आणि एक क्रियापद असणारा दोन अक्षरांचा प्रतिसाद टाकायचा. प्रयत्न करा. नक्की जमेल. आपण इथे मौज करण्यासाठी येतो. मनस्ताप करुन घेण्यासाठी थोडेच येतो. :)
अ
अभ्या.. Sun, 07/10/2016 - 15:56 नवीन
गावडे सर अगदी बरोबर सांगितलेत मुविकाका. म्हणजे कसंय ना की गावडे सर बोलतो तसा वागणारा माणूस. अगदी मी सुध्दा "वाच की मी लिहिलेली कथा" असे मागे लागलो की "मस्तय, अप्रतिम लिहिलेय" असे धाग्यावर चार थेंब शिंपडून जातात. कारण एकच. त्यांना मी लिहितो ते कथाविषयात गम्य नसतेच. मग मीही टेन्शन घेत नाही. त्यांनी अध्यात्मावर काही लिहिले की असेच चार थेंब परत करुन येतो. संपला हिशोब. बाकी धन्या हा मित्र अ‍ॅक्चुअली कसाय हे मला चांगले माहीताय. व्यावहारिक जीवनात त्याचे सल्ले मोलाचे असतात. अडीअडचणीला तो कसा धावून येतो हे आम्हाला कळते. मग आभासी अन खरे यातला फरक पटकन कळून जातो. राहता राहिला डूआयडी अथवा ट्रोलाचा प्रश्न. मला तर वैयक्तिक ट्रोलांचा त्रास कधी झालाच नाही. कारण मी लिहिणार कथा बिथा. तिकडे ट्रोल फिरकत नाहीत. एखाद्या विघ्नसंतोष्याने तसा परयत्न केला तर मिपाकरच परस्पर चंपी करतात. आपण काई करावेच लागत नाही. ट्रोलांचे हक्काचे कुरण म्हणजे राजकीय, सामाजिक आणी काही इतिहासावरचे धागे. मी तिकडे जास्त फिरकतच नाही. सो टेन्शनका सवालच नै पैदा होता. काही ट्रोलांची काही मते खरोखरी विचारात पाडणारी असतात. अशांनी चर्चा एकतर्फी न होता नाण्याची दुसरी बाजू पण आहे असे वाटते. सो तेवढाच डोस्क्याला खुराक. डूआयडी हा जरा विवादास्पद मॅटर आहे. खर्‍या आयडीने मनातली मळमळ ओकता येत नसेल म्हणून काढलेले डूआयडी, स्वतःची लोकप्रियता वाढवायसाठी वापरलेले डूआयडी, उगी चर्चेत राहण्यासाठी असलेले अटेंशन सीकर डूआयडी, अ‍ॅक्चुअली ओरिजिनल आयडी बिझी असल्याने येत नाही पण मिपाशिवाय राहावत पण नाही म्हणोन काढलेले डूआयडी आणि कुणाला तरी त्रास द्यायचाच ह्या हेतूने काढलेले डूआयडी अशी मानसिक रोगाची लक्षणे असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच हितावह. अगदीच त्रास होत असेल तर सरळ मालकाकडे तक्रार करावी. ते अशा मानसिक रोग्यांना मग ते आयडी असोत की डूआयडी, नुसते सरळ नाही करत तर योग्य ती ट्रीटमेंट देतात याचा अनुभव आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 07/10/2016 - 15:01 नवीन
सकाळच्यान लग्णात हुतो,त्यामुळे आता धागा अणि प्रतिसाद वाचलो, या जगामध्ये संतुलन आवश्यक आहे,पांढरा रंग असला कि काळा असतोच,देव जर असतील तर दानव असणारच,सुख असेल तर दुख हे असणारच त्यामुळेच तर जग टिकून आहे. तराजूच्या एकाच तागडीत माल भरला तर तोलता येत नाही,म्हणून दुसर्या तागडीत वजन ठेवावे लागते त्याशिवाय संतुलन साधता येत नाही. कसय ना मित्रांनो कोणत्याही गोष्टीत संतुलन आवश्यक आहे,हेच मिपाला सुद्धा लागू होते. By the way,what is the definition of troll??
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 07/10/2016 - 15:14 नवीन
मी तुम्हाला किती वेळा सांगितलय की असं खाली मुंडी घालून नका येत जाऊ. वर मुंडी ठेवली असती तर हे https://en.m.wikipedia.org/wiki/Internet_troll दिसलंच असतं ना ? -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sun, 07/10/2016 - 15:34 नवीन
डेफिनेशन सुद्धा भावनाप्रधान माणसांच्या कंपूने बनवली असावी. मुळात विचार हे तार्किक असले पाहिजेत न कि भावनिक, आणि तार्किक विचार भावनिक लोकांना झेपले नाहीत कि भावनिक विचारवाले तार्किक विचारवाल्यांना 'ट्रोल' असे संबोधतात. आणि मिपावर ट्रोल का जन्मतात? उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 16:14 नवीन
मिपावर ट्रोल का जन्मतात? उत्तर- एकांगी,दांभिक विचारसरणीला कंटाळून.
पाॅइंट आहे.
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
अ
अभ्या.. Sun, 07/10/2016 - 16:18 नवीन
हो ना, एकांगी दांभिकतेवर लाथाळ्या झाडणार्‍या गाढवाचे कौतुक होत असेल तर इतरांना शिव्या देण्यात काय पॉइंट?
↩ प्रतिसाद: मितभाषी
स
सुधांशुनूलकर Sun, 07/10/2016 - 15:26 नवीन
'८०-२० (Eighty-twenty)' हा व्यवस्थापन शास्त्रातला नियम इथेही लागू होतो. २०% मिपाकर ८०% त्रासदायक आहेत, असं सर्वसाधारण प्रमाण आहे. आपण उरलेल्या ८०% (चांगल्या) मिपाकरांकडे लक्ष देऊ. (म्हणजे आपल्याला फक्त २०%च त्रास होईल.) जास्त कट्टे करू. तिथे हे ८०% (चांगले) मिपाकर भेटतील याची खातरी. (ह.घ्या.)
व
विवेकपटाईत Sun, 07/10/2016 - 15:38 नवीन
१. मिसळपाव नावातच सर्व आहे, अनेक पदार्थांची भेळ त्यात आंबट-गोड, कडू-तिखट सर्वच राहणार. २. प्रत्येक सदस्याचे व्यक्तिगत विचार असतात, तो मांडतो. ३. काहींना स्वत:चे विचार मांडताना भीती वाटते, कारणे काहीही असू शकतात. ते अनेक नावे धारण करतात. त्यात मला तरी गैर वाटत नाही. ४. आपल्याला जे पटले नाही आपण त्याला नकारात्मक प्रतिसाद देतो. लिहिणारा डू आय डी असेल त्याला भरपूर कडू-तीखट प्रतिसाद मिळतातच. ५. संपादक मंडळाला धागा किंवा प्रतिसाद उडविण्याचा अधिकार आहे. तो अधिकार कसा वापरायचा याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. बाकी माझे मत, चंपाबाई नी लिहिलेली कविता काढण्याचे मला तरी काहीच कारण दिसले नाही. त्यांना त्यांचे मत मांडू द्या, आम्ही आमचा प्रतिसाद देऊ. वाचणार्यांना जे रुचीकर आहे, ते ग्रहण करतील. ६. मिसळपाव सारखे 'संकेतस्थळ' अजून तरी मराठीत अन्य नाही. इथे लोक वाचतात आणि भरपूर प्रतिसाद हि देतात. ७. संकेतस्थळ सोडण्याची भाषा करण्यापेक्षा आपले मत अधिक जोमाने मांडा.
अ
अनुप ढेरे Sun, 07/10/2016 - 16:13 नवीन
चंपाबाई या आयडीने नक्की कोणाचं काय वाकडं केलय / कोणाला काय त्रास दिलाय हे कोणी समजावू शकेल काय?
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 16:15 नवीन
हेच बोल्तो.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 07/10/2016 - 16:46 नवीन
ते मुस्लिम धर्माचे श्रीगुरूजी आहेत (किंवा तसे उगा भासवतात) म्हणून लोकांना त्यांचा त्रास होत असावा =)) =)) =)), त्याचे तसे असण्यात आम्हाला काही हरकत नाही वैयक्तिक , फक्त इस्लामच्या नादात जेव्हा हे राजेश्री पाकिस्तान वगैरे शत्रूराष्ट्र किंवा दार उल उलूम वगैरेची भलामण करत बसतात ते पाहून आमचे शिपूरडे इमान जळते, त्यालाही कोणी आमची वैयक्तिक बौद्धिक कुवतीची सीमा असे समजल्यासही आमची काही हरकत नाही हे ही स्पष्ट बोलतो! बाकी आम्हाला वैयक्तिक इग्नोरस्र आवडते, आधी जमत नसे आता जमते, त्यामुळे आजकाल श्रीगुरुजी ह्यांचा ही त्रास होत नाही अन मोगा/नाना/हितेश ह्यांचा ही नाही.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
अ
अनुप ढेरे Sun, 07/10/2016 - 18:09 नवीन
त्यांची बहुतांश मतं मलाही अजिबात पटत नाहीत. पण पटत नाहीत म्हणून आयडी उडवा असे गळे काढायचे?
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
माहितगार Sun, 07/10/2016 - 16:59 नवीन
अनुपजी मुविंचे किंवा इतरांचे काय आक्षेप आहेत माहित नाही, - मी अगदी डूआयडींचाहि कधी विरोध करत नाही केवळ विचारांवर फोकस ठेवतो, - चंपाबाई या आयडी ची एक मिपा संपादकांनी उडवलेली कवितेतील किमान एक ओळ एका स्त्रीचे व्यक्तीचे अनावश्यक चारीत्र्य हनन स्वरुपी असावी असे माझे मत मी तेथील प्रतिसादात नोंदवले होते असे आठवते. बाकी चालू द्या.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
म
मितभाषी Sun, 07/10/2016 - 19:07 नवीन
चंपाबाईची कविता मी वाचली नाही. त्यामुळे काही मत व्यक्त करू शकत नाही.
↩ प्रतिसाद: माहितगार
व
वगिश Sun, 07/10/2016 - 19:20 नवीन
खर तर मालक यावरून काहीच उपाय करू शकत नाही.डुआयडी ची ओळख पटवन्यात तांत्रिक अडचणी आहेत, त्यामुळे चर्चा निरर्थक आहे.
ब
ब़जरबट्टू Mon, 07/11/2016 - 05:44 नवीन
भारताला सन्नी लोयोनी चालते, तर तुम्हाला चंपाबाई का नाही..? प्रयत्न करा बघू, आमची आजी सांगायची, कावळ्यासोबत लगीन झाले, तरी हळूहळू ते पण आवडायला लागेल,.. :) जी आली, जशी आली चालवून घेशील.. :)
ग
गॅरी ट्रुमन Mon, 07/11/2016 - 07:28 नवीन
असे काय मुविकाका? तुम्ही कुठेही राहायला असलात (डोंबिवली/चिपळूण) तरी आम्ही मात्र तुम्हाला मिपा सोडून कुठे जाऊ देणारच नाही. रच्यकने, मला स्वतःला पण मिपावरील खिकारणार्‍या ट्रोलभैरवांचा एकेकाळी खूपच त्रास झाला होता.मला पण मिपा सोडावे असे वाट॑त होते.नंतर मात्र कातडी निबर करून गेंड्याची कातडी बनवली. अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेले उत्तम असे मला वाटते. अर्थातच तुम्हाला काही सांगायचा माझ्यासारख्यांना अधिकार नाहीच.पण अशांकडे दुर्लक्ष करता आले तर बघा ही आग्रहाची विनंती मात्र आहेच. (मुविकाकांच्या कित्येक पुतण्यांपैकी एक) ट्रुमन
म
मृत्युन्जय Mon, 07/11/2016 - 07:36 नवीन
मिपावर टका बॅन होतो, बॅटमॅन बॅन होतो, विमे बॅन होतो, सुहास बॅन होतो. चंपा सुद्धा होइल. तुम्हाला त्रास इतकाच होतो आहे ना की: १. पहिले चार जेन्युइन आहेत आणि पाचवा विघ्नसंतोषी आहे. २. पहिल्या चारांचे मिपाच्या जडणघडणीत योगदान आहे आणि पाचवा इथे फक्त उच्छाद मांडण्यासाठी येतो. ३. पहिले चौघे विषयानुरुप लिहितात आणि चौथा फक्त गरळ ओकतो. ४. पहिले चारांनी काही उत्कॄष्ट लेख / प्रतिक्रिया दिल्या आहेत आणि पाचवा फक्त जिथे तिथे हागुन ठेवतो. ५. पहिल्या चारांकडुन एखादी चूक झाली असेल / नसेल आणि पाचवा सतत ओकार्‍या काढत असतो. ६. पहिले चार द्वेषमूलक लिखाण करत नाही आणि पाचवा कायम आपली जळजळ बाहेर काढुन इथे घाण करतो. अजुनही काहीए गोष्टी खुपत असतील तुम्हाला कदाचित पण फक्त एवढ्यासाठी मिपा सोडुन जायचे? पहिल्या चारांबद्दल ज्यांनी निर्णय घेतला ते पाचव्या बद्दलही घेतील की. तुम्ही उगी रहा बरे. अगदीच असह्य झाले तर "रंग माझा वेगळा"म्हणायचे आणी बाजुला व्हायचे. हाकानाका.
न
नाखु Mon, 07/11/2016 - 08:13 नवीन
नितवाचक नाखु. स्वगत : तुम्ही मिपातून बाहेर पडू शकता मिपा तुमच्यातून बाहेर पडत नाही, हे असले तरी मिपाबाहेरही जग आहे हेही सत्य आहे.
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
इ
इरसाल Mon, 07/11/2016 - 08:16 नवीन
जसं मला आकलन झालय त्यांच, त्याप्रमाणे अस वाटतय की थोडा भावनिक, हळव्या मनाचा माणुस. आपण भलं आपलं काम भलं या सदरातला. खोटेपणा करायचा नाही किंवा करु द्यायचा नाही असा स्टँड ! पण सध्या तसं जग राहिलय कुठे ? उलट खोटारडेपणाला भाव आलाय. तर मुवि मिपावर (फक्त हं) कातड कमवुन घ्या (गेंड्यासारख कमवाल तर अतिउत्तम....... माहित आहे की नाही जमणार तुम्हाला). स्वतःला का मनस्ताप करुन घ्यायचा ? आता मी जेव्हा दिल्लीला कामाला होतो तेव्हा भुसावळ ते भोपाळ दरम्यान ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते. शेवटी......आभासी जगात मित्र असलेले काही मोजकेच पण चांगली माणसे गमवावी वाटत नाहीत.
स
सुबोध खरे Mon, 07/11/2016 - 18:46 नवीन
हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.
↩ प्रतिसाद: इरसाल
स
सुबोध खरे Mon, 07/11/2016 - 18:47 नवीन
हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. हे लै म्हणजे लैच भारी.
↩ प्रतिसाद: इरसाल
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 07/11/2016 - 19:46 नवीन
ट्रेन मधे हिजडे खुप त्रास द्यायचे म्हणुन मी काही ट्रेनने येणे जाणे सोडले नाही. तस्मात तुम्हीही ही ट्रेन सोडु नये असे वाटते. +१०००
↩ प्रतिसाद: इरसाल
ख
खटपट्या Mon, 07/11/2016 - 19:48 नवीन
याला म्हणतात शालजोडीतला...
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
आ
आदिजोशी Mon, 07/11/2016 - 12:45 नवीन
मुवी काका, असा त्रास नका करून घेऊ. आज डुआयडींना कंटाळलात म्हणून मिपा सोडायला निघालात, उद्या संपादकांना कंटाळाल. मी संपादकांना कंटाळून एकदा मिपा सोडलेही होते. त्यावेळी संपादकांच्या मनमानीला वैतागून अनेकांनी सोडले होते मिपा. पण काळाच्या ओघात ते संपादक गेले आणि बहुतांश चिमण्या घरट्याकडे परत आल्या. त्यामुळे हे डुआयडीही येतील जातील, मिपा सोडणे हा उपाय होत नाही.
स
सूड Mon, 07/11/2016 - 13:07 नवीन
कट्टप्पांच्या मित्रयादीत स्थाण मिळालेलं बघून भारी वाटलं. आता डोळे मिटायला मोकळा!! =))
इ
इरसाल Mon, 07/11/2016 - 13:23 नवीन
इतक्यातचं ???? आपलं काय ठरलय सगळ्यांच्या यादीत (अगदी किराणा यादीत्सुद्धा) नाव आल्याखेरीज डोळे मिटायचे नाहीत.
↩ प्रतिसाद: सूड
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा