@ संपादक.....चंपाबाई सारखे डू.आय.डी. किती दिवस आम्ही सहन करायचे? किंवा मी मिपा सोडावे का?
प्रिय संपादक,
मी गेली ४ ते ५ वर्षे नियमित पणे मिपाचा सदस्य आणि वाचक आहे.
इथे उत्तम पैकी ज्ञान विशेषतः पा.कृ. आणि भटकंती, मिळते हा फायदा आहेच. उगाच खोटे का बोला?
मिपाने मला फार उत्तम मित्र पण मिळवून दिले. सुबोध खरे, डॉ. म्हात्रे आणि इतरही अनेक.
कित्येकां बरोबर वाद-विवादही होत असतात, पण मी तरी ते त्या-त्या धाग्यांपुरतेच ठेवत होतो, ठेवतो आणि ठेवीन.
पण इथे सध्या चंपाबाई नामक आय.डी. बहूदा हाच आय.डी. आधी मोगा, मुग्धा गोडे, उद्दाम, सचिन ह्या आय.डी.ने कार्यरत असावा. (असा संशय आहे.)
आम्ही (म्हणजे मी आणि इतरही अनेकजण) इथे येतो ते, काही तरी मिळवायला, मग ते ज्ञान असो किंवा, आमच्या स्वभावाला शोभतील अशा व्यक्ती आणि वल्ली शोधायला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर,
इथे खूप काही मिळाले.
व्यक्तीशः अनेक उत्तम माणसे मित्र आणि सवंगडी म्हणून आयुष्यभरासाठी मिळाली.पुढे-मागे मी मिपाचे सदस्यत्व सोडले किंवा मिपाने माझे सदस्यत्व रद्द केले तरी पण नाखू, सुरंगी, पैसा, अजया,सुबोध खरे,बोका, वल्ली, सूड, स्पा, विनोद१८, टका, प्यारे१, कुंदन, सगा, रामदास, सर्वसाक्षी,गवि, नानबा, अजय इंगळे, निनाद मुक्काम प.ज., आत्मू गुरुजी,डॉ. म्हात्रे,नंदादीप, मंदार कात्रे, भटक्या खेडवाला, शैलेन्द्र, रघूनाथ केरकर, पम्या, प्रगो, असे अनेक मिपासदस्य माझे मिपा सवंगडी असतीलच.ह्याची खात्री आहे.
काहींना भेटता आले तर काहींना खूप प्रयत्न करून पण अजिबात भेटता आले नाही. (उदा. इरसाल, सोन्याबापू, चिनार, खेडूत, पि.डां, जेपी,स्पार्टाकस, फारएन्ड, चित्रगुप्त, चतुरंग, हुप्प्या, आजानुकर्ण, विवेक पटाईत, गणपा, अजिंक्य विश्वास, डॉ. बिरुटे, जैनांचे कार्टे, अशी बरीच आहेत.पटकन आठवली ती नावे लिहिली.)
पण आता मात्र मिपाचा उबग आला आहे, कारण एकच,
डू.आय.डी. विशेषतः माई, नाना, ग्रेट थिंकर सारखे.
माझ्यासारख्याच विचारसरणी सारखे इतरही असतील किंवा नसतीलही.
पण इथे एखादा माझ्यासारखा सामान्य आय.डी.पण त्याची व्यथा मांडू शकतो, म्हणून हा प्रपंच.
मिपावर आमचा लोभ आहेच आणि तो वाढेलही पण कृपया, ह्या डू.आय.डींचे, आता तरी काही तरी करा आणि एखादे ठोस पावूल तरी उचला, अशी नम्र विनंती.
मिपा वर येणे सोडल्याने किंवा मिपाचे माझे सदयत्व रद्द झाल्याने, माझेच नुकसान आहे, ह्याची मला पुर्ण कल्पना आहे.
आपलाच,
मुवि
💬 प्रतिसाद
(175)
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 13:25
नवीन
मला वेळ आहे रे अजून डोळे मिटायला. ;)
प
पिलीयन रायडर
Mon, 07/11/2016 - 14:33
नवीन
जे वातावरण बिघडवत आहेत त्यांना संपादक बघुन घेतीलच. आणि जे आपल्याला टारगेट करुन मुद्दाम लिहीतात त्यांना
"चल ए.. फुट" म्हणुन लाथ घालायची. कुत्तरड्यांच्या कोण नादाला लागतं का काका?
एवढ्यासाठी मिपा कशाला सोडायचं?
ब
बोका-ए-आझम
Mon, 07/11/2016 - 19:29
नवीन
णिशेध! यवरी डाॅग हॅज हिज डे बरं का पिरातै!
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Mon, 07/11/2016 - 16:01
नवीन
हे सगळ नक्की काय चाल्लय? कोण चंपाबाई?
न
नूतन सावंत
Mon, 07/11/2016 - 18:11
नवीन
मुवि,तुम्हीच मिपावरच्या इतक्या मैत्रपरिवाराचा ऊल्लेख केला आहात.त्यापुढे अशा डुआयडींची काय मातब्बरी?अहो, इथे राष्ट्रध्वजाचा अपमान झाला म्हणून स्वतः न रागावता, केलेली तक्रार रागावून न करता, खेळीमेळीने करता आली असती असा शहाणपणा शिकवणारे मूर्खसुद्धा इथे भेटले आहेत.त्याना घाबरून मिपा सोडायचं कशाला?
म
मितभाषी
Mon, 07/11/2016 - 18:30
नवीन
मला पहा आणि फुलं वहा
=))))))))))
म
मितभाषी
Mon, 07/11/2016 - 18:38
नवीन
101
अ
अभ्या..
Mon, 07/11/2016 - 18:48
नवीन
हायला मुविकाका,
100 ला कसा सत्कार करायचा बरे तुमचा?
एक ऍग्रोवन चा अंक, आणि पम्पासाठी 5 लिटर डिझेल देऊन करावा म्हणतोय. सोबत एक इरले पण.
म
मितभाषी
Mon, 07/11/2016 - 18:52
नवीन
5 लि. कहाला दलिन्द्री.
डायरेक पंपाव खातंच काढूण देऊणा मुविला =))
ध
धनंजय माने
Mon, 07/11/2016 - 19:45
नवीन
मुविंचा सत्कार शांताबाई गाण्याची सीडी, कुराणाची प्रत आणि 'मी मिपाहितकर्ता' लिहिलेली टोपी देऊन करावा काय????
-पळून गेलेला
ख
खटपट्या
Mon, 07/11/2016 - 19:49
नवीन
मुवि धागा टाकून निघून गेलेत परत काय आले नाहीत धाग्यावर...
च
चंपाबाई
Tue, 07/12/2016 - 05:08
नवीन
वारीला जायच्या तयारीत असतील.
सोळा सोमवार , श्रावण सोमवार , श्रावणी , गणोबा देवी , शुक्रवार , ऋषी पंच्मी , दोन एकादश्या ... पुण्य मिळवायच्या इतक्या संधी तोंडावर असताना दूसरों के घर मे क्यु टाचा उपर कर कर के देख रहे है , समझ मे नै आ रहा.
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 07/12/2016 - 12:53
नवीन
कुत्रे काय?हिजडे काय??
सभ्य म्हणवून घेणारे आयडी कुठल्या पातळीवर येतात बघा.
अ
अनुप ढेरे
Tue, 07/12/2016 - 13:04
नवीन
+१
स
सतीश कुडतरकर
Tue, 07/12/2016 - 13:55
नवीन
+1
स
संदीप डांगे
Tue, 07/12/2016 - 20:28
नवीन
कसं बोललात...? ;)
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 04:48
नवीन
तथाकथित सभ्यजनांची भाषा!
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/13/2016 - 07:08
नवीन
तृतीयपंथी व्यक्तीला हिजडा हा शब्द आहे आणि कुत्रा हा एक प्राणी आहे. यात पातळी कुठे आली? उलट तुमच्या मनात या व्यक्तींविषयी आणि प्राण्यांविषयी हीन भावना आहेत असं का म्हणू नये?
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 07:35
नवीन
जाऊ द्या बोका भाऊ, डिफेंड करायचे असले कोणाला किंवा कोणाच्या कन्सेप्टला करा डिफेंड पण इथे तृतीयपंथीय किंवा कुत्रा हे फक्त एखादे लिंग किंवा एखादा प्राणी ह्या अर्थाने खचितच वापरलेले शब्द नाहीयेत हे आपणही नीट जाणताच, उगाच त्याला पांढरा रंग द्यायचा प्रयत्न करू नका, तुमच्या सारख्या विचारी माणसाकडून हे अपेक्षित नाही इतके नोंदवतो.
रच्याकने, कुतरड्या म्हणणे म्हणजे नुसता प्राण्याचा उल्लेख आहे असे मानत असल्यास आपल्या तुम्हांस शुभेच्छा भरभरून, शिवाय उद्या जर कोणी मला "ए बाप्या कुत्र्या, हिजड्या" अशी हाक मारली तर मी त्याने मला शिवी दिली म्हणावी का त्याने फक्त मला एका प्राणीविश्वातल्या एका स्पिशीजच्या नावाने पुकारून माझे पुल्लिंगी संबोधन गडबड केल्याचे म्हणावे??
अति अवांतर :- ह्या शिव्या मोगांच्या लायक आहेत का नाही हे माहिती नाही, पण पब्लिक फोरमवर त्या देणे हे गैरच आहे इतके मी आवर्जून नोंदवतो, संबंधितांनी व्यनि, खव ह्या सुविधांचा लाभ घ्यावा ही विनंती!, गंमत म्हणजे मागे डांगेंनी इथेच एक प्रयोग ठरवून केला होता, त्यावेळी भाषिक शुचिता अन मिपापावित्र्य ह्या विषयावर, डांगेंचा प्रतिसाद पडल्या पडल्या येऊन अक्कलामृत (डांगेंनाही नाही मलाच!!!) पाजणाऱ्या लोकांनी इथे न लावलेली हजेरी हाच काय तो डोक्यात जाणारा डोकेबाज कंपूबाज शाहजोगपणा!!
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 07:43
नवीन
बापू,
माणूस एखाद्याला शिव्या देतो ना तो गळ्यापर्यंत आल्यानन्तर. प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी खुसपट काढून काहीतरी तिरकं बोलणारी, श्रद्धास्थानावर घाण उडवणारी, किमान सभ्यता बाळगावं असं न समजणारी व्यक्ती शिव्यांच्या पात्र ठरते.
एकदा केलं तर चुकून झालं मानता येतं.
परत परत तेच????
मोगा/ चंपाबाई, 'प्लीज कंसल्ट अ सायकियाट्रिस्ट' असं इथून पुढे प्रत्येक धाग्यावर सांगणेत येईल याची नोंद घ्यावी.
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 07:56
नवीन
मोगांप्रती लोकांची काय भावना आहे, त्यांनी किती लोकांना खाजवून त्रास दिलाय हे मला माहिती आहेच, त्यामुळे जर कोणाला शिव्या द्याव्या वाटल्या तर त्याने त्यांच्या व्यक्तिगत संपर्कसूत्रात जाऊन त्या नोंदवाव्यात हे ही मान्य, पब्लिक फोरमवर शिव्या दिल्या तर मी हरकत नोंदवू नये का?? ह्यात मोगाची वकिली हा हेतू नाही तर, संबंधितांस अन त्यांच्या कंपूस टेस्ट ऑफ देयर ओन मेडिसिन आहे, बरं publically शिव्या देऊनही जर कोणी तिसरेच (ह्या केस मध्ये बोका भाऊ) त्या शिव्या कश्या नाहीत असे समजावत बसले तर त्यांना रिप्लाय देणे चूक असेल का??
महत्वाचे :- मोगा काय बोलतात ते मला अजिबातच पटत नाही, पण म्हणुन मी त्यांना अश्या सार्वजनिक शिव्या देऊन त्यांच्याच रांगेत जाऊन बसणार नाही (त्यांची रांग म्हणजे असंबद्ध अन उचकवणारे बड्बडणे)
ब
बोका-ए-आझम
Wed, 07/13/2016 - 09:25
नवीन
त्यामुळे तुमच्याशी सहमत. माझ्यासाठी काय म्हटलंय हे महत्वाचं आहेच, कोणी म्हटलंय तेही महत्त्वाचं आहे. खामुपाधुंनी घेतलेला आक्षेप जर तुम्ही घेतला असता तर मीही असे शब्द वापरण्याचा निषेध केला असता. पण खामुपाधु माझे मित्र नाहीत त्यामुळे मी त्याचा निषेध करणार नाही. ही biased वागणूक आहे का - तर आहे. काहीजण न सांगता biased वागतात. मी सर्वांना सांगून biased वागतो.
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 09:51
नवीन
बाकी बायस वाला मुद्दा स्पष्ट बोललात ते आवडले!, आम्ही असेच आहोत हे सांगायला (इतर) लोकं का लाजत असतात ते आजवर कळलेले नाही, उगा नथीतून तीर मारणे रुचत नाही, एक घाव 2 तुकडे बरे, त्याबद्दल आपले अभिनंदन अन मैत्रीखात्यात का होईना मुद्दा समजून घेतल्याबद्दल आभार
इ
इरसाल
Wed, 07/13/2016 - 07:16
नवीन
हिजड्यांबद्दलचा उल्लेख माझ्या प्रतिसादात आलाय म्हणुन हा प्रतिसाद.
कृपया प्रतिसाद पुन्हा एकदा नीट वाचावा, नी आपण जे म्हणत आहात त्यावर नीट विचार करावा.
कधी कधी रामदासस्वामी म्हणतात ते बरोबर आहे हे पक्के होते....(पुर्ण ग्रंथ पाहिल्याविण उगाच ठेवी जो दुषण......)
म
माहितगार
Wed, 07/13/2016 - 07:51
नवीन
इरसालजी, बदलत्या काळात लिंगवाचक अथवा प्राणीवाचक हेटाळणी शीष्टसंमत मानली जात नाही. आपला आधिचा प्रतिसाद वाचून खटकले केवळ आपल्या आयडीच्या विशेषनामाचे स्वरुप लक्षात घेऊन आश्चर्य वाटले नाही. डॉक्टर साहेबांचा ही खाली प्रतिसाद दिसतोय त्यांनी शब्द प्रयोग revisit करावा असे वाटते.
'काही' लोक त्रास द्यायचे आणि मी दुर्लक्ष करत असे म्हणणे आणि समाजात सरसकट हिनत्व दर्शक उद्देशानी वापरला जाणारा लिंगवाचक शब्द वापरण्याचा आग्रह 'उपमा, उत्प्रेक्षा, रूपक, अपन्हुती, अन्योक्ती, पर्यायोक्ती या मराठी भाषेतील अलंकारांपैकी कुठे बसत नाही ना अशी साशंकता आणि म्हणुन शब्द प्रयोगाबाबत खेद वाटणे स्वाभाविक वाटते.
इ
इरसाल
Wed, 07/13/2016 - 08:01
नवीन
पटले.
पण मी जे लिहीले ते कोणाबद्द्ल संबोधन नसुन भुसावळ ते भोपाळ दरम्यान होणार्या हिजड्यांच्या त्रासाबद्द्ल बोललो. त्या प्रतिसादावर खालीमुंडीपाताळधुंडी साहेबांनी मी ते चंपाबाईसाहेब यांनाच (च ठळक) बोललो असे गृहित धरुन प्रतिसाद दिला त्यावर लगेच्च ४/५ जणांचे +१.
असच चालु राहिलं तर भविष्यात केसरी रंग, हिरवा रंग वापरता येणे अशक्य होईल हो.
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 08:07
नवीन
ताकाला जाऊन भांडी लपवणे बरे नसते दादा, तुमच्याविषयी आदर आहे म्हणून सांगतोय, शिव्या (रुपकात का होईना) दिल्या आहेत तर मग डंके की चोट पर त्याची जबाबदारी पण घ्यावी, असो.
इ
इरसाल
Wed, 07/13/2016 - 09:46
नवीन
रुपकात का होईना, पण मी त्यांना बोललेलोच नाही. कदाचित तुम्ही मला अजुनही ओळखत नाहीत म्हणुन अस म्हणाला असाल.
जेव्हा गरज पडेल तेव्हा त्यांना इथेच काय समक्ष जावुन सुद्धा हे बोलेन.
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 09:52
नवीन
ए लोणी!
(ते तुम्हीच ना?)
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 07/13/2016 - 09:55
नवीन
हे काय आणि नवीन माने साहेब?
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 10:03
नवीन
इरसाल साहेब का पैजारबुवा कोणाचा तरी किस्सा आहे. हार्डवेअर च्या दुकानात जाऊन काहीशी असंबद्ध वस्तू मागितली, ती वस्तू नाही असं सांगून वर अपमान वगैरे केला दुकानदाराने. त्यावर या साहेबांनी लोणी आहे का विचारलं. आणि पुढे ओळीने अनेक दिवस रोज त्याच्याकडे जाऊन लोणी आहे का हाच प्रश्न. दुकानदार दुकानाबाहेर येऊन शिव्या द्यायला लागला. लोकांना आणि कटत्यावरच्या पोरांना पण कळलं. जातायेता आपले साहेब आणि ती पोरं पण ' ए लोणी', 'ए लोणी' सुरु.
इ
इरसाल
Wed, 07/13/2016 - 10:49
नवीन
ते पैजारबुवा मी नव्हे,
बाकी कपडे बदलल्यापासुन तुम्ही असं काय करायलात ओ माने ?
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 11:13
नवीन
वय झालं ओ आता.
आय माय स्वारी. :(
च
चंपाबाई
Wed, 07/13/2016 - 14:00
नवीन
निरंजन बाबांचा आंबा खर्या बायकोला दिला का?
स
सूड
Wed, 07/13/2016 - 14:32
नवीन
प्यारेकाका कसेही असले तरी ही जरा अगदीच वैयक्तिक प्रतिक्रिया झाली चंपाआत्याबाईमामी.
अ
अभ्या..
Wed, 07/13/2016 - 14:41
नवीन
चंपाआत्याबाईमामी हि मात्र वैयक्तिक न होता सामाजिक प्रतिक्रीया झाली. ;)
बादवे जाता जाता कसेहि असलेल्या प्यारेकाकांना सोडले नाही ते भावले. ;)
स
सूड
Wed, 07/13/2016 - 14:48
नवीन
तू जावयाची जात शिणुमा बगितला नाय काय? त्यात आहे 'गंगूमामीबाई-तेलीणमावशीबाई'!!
अ
अभ्या..
Wed, 07/13/2016 - 14:54
नवीन
अशोक सराफच असणार बहुतेक त्यात. नाही बघायला. :(
किंवा थोडा थोडा बघतल्यागत वाटतोय. रंजना, म्हैस, दोन वाडे असा काहीतरी मसाला.
स
सूड
Wed, 07/13/2016 - 15:04
नवीन
पर्फेक्ट, तोच!! रंजना त्याला टिनपाट म्हनत अस्ती..लाडानं!!
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 15:07
नवीन
अरे किती अवांतर कराल?
त्या ह्यांनी पोटतिड़कीनं लेख टाकला आहे, काही ही आहे का नाही मिपाच्या ह्याची????
प
पैसा
Wed, 07/13/2016 - 15:10
नवीन
जावयाची जात मधे पद्मा चव्हाण आणि कुलदीप पवार आहेत. रंजना, अशोक सराफ आणि म्हैस वाला "बिनकामाचा नवरा"
च
चंपाबाई
Wed, 07/13/2016 - 15:19
नवीन
रंजना , अशोक सराफ .. टिनपाट .. सासू तेलीण .. तिचा नवरा म्हणजे अशोक सराफचा सासरा घरातून फरार होऊन पोपटवाला ज्योतिषी झालेला असतो. .. तो सिनेमा .. सासू वरचढ जावई ... शेवटी आई मुलगी दोघी एकदम प्रेग्नंंट होतात.
बिनकामाचा नवरा .. यात अशोक सराफ आहे. आणि निवडणुकीची स्टोरी आहे.
स
सूड
Wed, 07/13/2016 - 15:21
नवीन
होय होय, धन्य्वाद चंपाआत्याबाईमामी.
प
पैसा
Wed, 07/13/2016 - 15:25
नवीन
बिन कामाचा नवरा मधेही अशोक सराफ, रंजना आणि तिची गंगी म्हैस आहे.
च
चंपाबाई
Wed, 07/13/2016 - 15:25
नवीन
सासू वरचढ जावई हा अनिल कपूरच्या जमाईराजाचा गावठी वर्जन आहे.
अ
अभ्या..
Wed, 07/13/2016 - 15:34
नवीन
च्यायला हे दादाकोंडकेंच्या पिच्चरना शोभेल असे नाव कस काय घेतले ब्वा.
चांगलेय चांगलेय.
धाग्याचा मूळ विषय डूआयडी हेही वरचढ जावयापेक्षा कमी नाहीत असे निरिक्षण जाता जाता नोंदवतो. ;)
ध
धनंजय माने
Wed, 07/13/2016 - 15:01
नवीन
चंपाबाई, अहो आम्ही नुसतं बघितलं तरी.... असो!
कुणी गरजू असलं तर द्या पाठवून.
त्यामुळे आम्हाला आंबा फ़क्त खायला आवडतो.
म
माहितगार
Wed, 07/13/2016 - 08:14
नवीन
अधिक चिकित्सा करत नाही, चीड आणि अगदी अपशब्द तोंडात येणे स्वाभाविक आहे, या गोष्टी परिस्थिती आणि व्यक्ती सापेक्ष असतात, आंतरजालावर टाळलेले बरे, आपण मराठी लोक कठोर टिकेस टिकाकरताना घाबरत नै त्यामुळे मी मिपावर पहिल्या लावलेल्या चर्चेचा विषयच कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? असा होता.
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/13/2016 - 08:49
नवीन
काही गफलत होते आहे का ?
हिजडा (तृतियपंथी) हा शब्द लिंगवाचक आहे व त्यासंदर्भाने त्या व्यक्तीसमुहाची कोणी अवहेलना केली तर ते निषेधार्हच आहे.
त्याचबरोबर, "सार्वजनिक स्थानांवरून आपल्या मार्गाने सरळपणे जात असलेल्या माणसांचा शाब्दीक छळ करणे, त्यांच्या अंगचटीला जाणे व एकंदरीत इतरांना विनाकारण त्रास देणे" हा पण त्या व्यक्तीसमुहाचा एक सर्वसामान्य वागणूकीचा गुणधर्म व्यवहारात दिसतो... आणि तोही तितकाच निषेधार्ह आहे.
केवळ तृतियपंथी आहे म्हणून हा व्यवहार समजून घेण्याजोगा नाही आणि योग्य तर अजिबात नाही. असा व्यवहार केवळ त्या व्यक्तीसमुहानेच नव्हे तर इतर कोणीही केला तरी तो तेवढाच त्रासदायक, चीड आणणारा आणि निषेधार्ह असतो... कारण त्या व्यवहाराचा संबंध लिंगाशी नसून वागण्याशी आहे.
जर हा त्याज्य गुणधर्म (ज्याचा लिंगाशी नाही तर वागणूकीशी संबंध आहे) दुसर्या कोणामध्ये सतत आढळल्यास आणि म्हणून त्या दोघांच्या वर्तणुकीची तुलना झालयास, त्यामधे लिंगसंदर्भ आणणे कठीण नाही, पण तो जरासा ओढून ताणूनच आणला असे होईल, असे वाटते.
बाकी, "एकाच वाक्याचा प्रत्येकाने आपापल्या पसंतीचा/सोईचा वेगवेगळा अर्थ लाऊन घेणे" हा एक लोकशाही हक्क आहे यात संशय नाही.
("आचार-विचार-बोलणे-लिखाण-इत्यादी प्रकारे व्यक्त होण्यासंबंधीचे मानवी अधिकार/व्यक्तिस्वातंत्र्य ही दुधारी तलवार असते." असे म्हटले जाते ते बहुदा यामुळेच ! :) )
च
चंपाबाई
Wed, 07/13/2016 - 15:34
नवीन
हिजडा शब्द आम्हीही पूर्वी उपहासानेच वापरायचो.
पण गेली तीन वर्षे एच आय व्ही शी संबंध आल्याने त्यांची दु:खे जाणवतात . आता तो शब्द उपहासाने वापरावा वाटत नाही. इतरत्र कुठे फारसे वापरात नसले तरी आमच्या सर्व कागदपत्रात मात्र पु स्त्री व तृ असे तीन्ही ऑप्शन्स असतात. आमच्या सेंतरमधील लोकांचे बर्थडे वगैरेसाठी जेवणाचे काँट्रॅक्ट एका आमच्याच तृ. पेशंटला देण्यावर सर्वांचे एकमत झालेले आहे. संक्रांतीला त्याने बाजरीची भाकरी व वांग्याची भाजी सर्वाना दिली होती.
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »