Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

होय , मधुमेह पूर्ण बरा होतो

व
विटेकर
Tue, 07/19/2016 - 14:21
🗣 173 प्रतिसाद
नमस्कार ! २००६ साली, वयाच्या ३८ व्या वर्षी मला मधुमेहाचे निदान झाले! घरात परंपरा होतीच शिवाय स्थौल्य आणि बैठी जीवनशैली यामुळे हे अपेक्षित होते. फक्त फार लवकर ही ब्याद मागे लागली म्हणून किंचित वाईट वाट्ले. मूळात गोड खाण्याची आवड आणि व्यायामाचा आळस त्यामुळे साखर कमी जास्त होत राहीली ( कमी कधीच नव्हे , सतत जास्तच !) गेल्या ९ वर्षात अनेक चढ- उतार आले, तात्पुरता व्यायाम - पथ्य पाळले जाई, पुन्हा येरे माझ्या मागल्या ! यात नवीन काही नाही , बहुतेक मधुमेहींची हीच कहाणी असते. २०१२ पासून दरवर्षी नर्मदेवर जायला सुरुवात केली, या काळात खाण्याचे काही खरे नसे म्हणून गोळ्या घेत नसे ( हा ही एक मूर्खपणाच ! पण मूळात मधुमेह असताना देखील नर्मदेवर जाणे या मुख्य मूर्खपणापुढे तो किन्चित गौण!) आणि परत आल्यावर hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) आश्चर्यकारक रित्या कमी असे ! तेव्हा माझ्या लक्षात आले की , व्यायाम, खाणे पाळले तर आपली साखर मर्यादित राहू शकते (कारण तिथे रोजचे किमान २०-२५ किमी चालणे होई) आणि औषधे फारशी परिणामकारक नाहीत , उलट डोस वाढत जातात. २०१४- १५ मध्ये मला पायाला मुंग्या येणे, भेगा पडणे हा त्रास सुरु झाला होता. पोटाची तर कायमच बोन्ब असे ! मला हे पक्के माहीत होते की मधुमेह असाच वाढत जाणार आहे आणि डोस ही असाच वाढत जाणार आहे.. .. माझा आत्मविश्वास खचू लागला होता. अन्य मधुमेहीप्रमाणे मी ही सतत वेगेवेगळ्या प्याथी आणि औषधांच्या शोधात असे. त्यातून आयुर्वेदिक डो़क्टरांनी सांगितल्याप्रमाणे S - VYASA चा कोर्स ही केला. या सार्‍या उपायांनी साखर नियंत्रणात येई पण गोळ्या ( GLUCORYL M1 सकाळ / रात्री १-१-) सुटत नव्हत्या, गोळी अर्धी देखील होत नव्हती. सतत आंतरजालावर शोधत असे, त्यातच http://www.freedomfromdiabetes.org सापडले, ८ ऑगस्ट २०१५ रोजी पुण्याच्या अल्पबचत भवनला त्यान्चे अर्ध्या दिवसाचे सत्र होते. त्यांनी मधुमेह पूर्ण बरा होतो - कोणत्याही औषधाशिवाय - फक्त जीवन शैलीत सुयोग्य बदल करावा लागतो असे सांगितले , बरा होऊ शकतो असे सांगणारे बरेच होते पण औषधाशिवाय फक्त आहार, व्यायाम आणि मनःशांतीद्वारा हा प्रकार नवीन होता ! आणि माझा अनुभव ही काहीसा असाच होता. तसाच भारावून घरी आलो , विटूकाकूला सांगितले , आज पासून चहा बंद ! ( ८ औगस्ट २०१५ दूध घातलेला घरी प्यालेला शेवटचा चहा ! ) त्यांनी सांगितलेले सगळे नियम पाळायला सुरुवात केली, घरच्या घरी रोज तीन वेळा साखर चेक ( ग्लुकोमीटर द्वारे) करायला सुरुवात केली ... (वास्तविक त्यांनी त्यांच्या ईन्टेन्सिव प्रोग्राम ला प्रवेश घ्यायला सांगितले होते , ते मी केले नाही पण जीवन शैली करुन बघू जमते का म्हणून सुरुवात केली होती ) या नव्या आहारामुळे हायपो ( रक्तातील साखर कमी होणे ) होऊ लागला म्हणून १३ ऑगस्ट्ला सकाळची गोळी अर्धी केली , २० ला सकाळची बंद आणि रात्रीची अर्धी केली , २३ औगस्ट्ला रात्रीची गोळी बंद झाली. ( हा उद्योग माझा मीच केला, हा मूर्खपणा आहे , वैद्यकीय सल्ल्याशिवाय असे करणे धोकादायक आहे !) २३ ऑगस्ट २०१५ ला मी शेवटची GLUCORYL M1 घेतली. माझ्या दोन्ही गोळ्या पंधरा दिवसात बंद झाल्या या छोटेखानी विजयानंतर आता विश्वास बसल्याने आणि आत्मविश्वास वाढल्याने प्रोग्राम सुरु केला. एकून १३ चाचण्या करायला साण्गितल्या , बी १२ ,डी , लिवर फन्कशन इत्यादी इत्यादी बी १२ आणि डी खूपच कमी होते, hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ८.६८ म्हणजे साधारण २५६ ! त्यांनी सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम सांभाळताना , नोकरी , देश- परदेश प्रवास, शिवशक्ती संगम ची धावपळ आणि जाग्रणे हे सारे सुरु होते. पण पथ्य - व्यायमही सुरुच होता अगदी ऐन दिवाळीत सुद्धा ! २०१५ च्या दिवाळीत लाडवाचा एक कण देखील खाल्ला नाही ! दिवाळीनंतर म्हणजे प्रोग्राम सुरु केल्यावर १४ आठवड्यात hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) होती ५.९ आणि वजन १४ किलो कमी झाले होते ! त्यानंतर मार्च मध्ये पुन्हा तपासण्या केल्या , ब१२ / डी अतिउत्तम आणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) फक्त ६.० ( गोळ्या बंद करुन ही ) ५ जुलै ला hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा )- ६.१ डिसेंबरमधील तपासण्यानंतर थोडा सैलावलो - संक्रांतीला गुळाच्या पोळ्या आणि अनेक वर्षात पहिलयांदा वड्या आणि लाडू खाल्ले , बर्यापैकी गोड खाणे सुरु झाले, रोज साखर तपासत असे ! सकाळची साखर १०० ते ११० ला स्थिरावली होती. मार्चच्या तपासणी नंतर सुटलोच , ९ वर्षात पहिल्यंदा आंबे चेपले, किती खाल्ले ? पैशाचा हिशोब करायचा तर यावर्षी फक्त हापूसच १२,००० रुपायचे खाल्ले आम्ही चौघांनी ! अर्थात माझा वाटा सिंंहाचा होता. नौ वर्षाचा ब्याकलॉग भरुन काढायचा होता ! शिवाय घरचे रायवळ आणि रसाचे पायरी वेगेळे ! मे महिन्यातील सर्व लग्नात भरपेट जेऊन आहेर वसूल केले, सूट्टीत मुलांच्या बरोबर आईसक्रीमपण चेपले पण अगदी मर्यादेत ! जुलई मधले hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) ६.१ आल्यावर जी टी टी ( तुम्ही मधुमेही आहात की नाही हे ठरविणारी चाचणी) द्यायचे ठरवले त्यात मात्र नापास याचा अर्थ माझ्या प्यांक्रिया अजून पुरेसे इन्शुलिन पंप करत नाहीत , मी आय जी टी आहे. तो ट्प्पा आता पार पाडायचा आहे ! मधल्या काळात वजन पुन्हा ३ किलो वाढले आहे ! पण गोळ्या बंद्च आहेत अणि hb1ac ( तीन महिन्याची सरासरी रक्तशर्करा ) नियंत्रणात आहे ! हा माझा फार मोठठा विजय आहे असे मला वाटते , गेल्या १० वर्षात माझ्या व्यक्तिगत आयुष्यात इतकी आनंदाची गोष्ट घडली नव्हती ! हा शरिरापेक्षा मनावर विजय आहे ! अधिक माहितीसाठी केव्हाही संपर्क करावा, वरती संकेतस्थळ दिले आहेच !
वर्गीकरण
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
128355 वाचन

💬 प्रतिसाद (173)
म
मोदक Tue, 07/19/2016 - 14:36 नवीन
अरे व्वा.. वाचून आनंद झाला. अभिनंदन. प्रमोद त्रिपाठींबद्दल वाचले आहे, अनेक लोकांचे चांगले अनुभव प्रत्यक्ष पाहिले आहेत. आणखी एकदा अभिनंदन..!!!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 07/19/2016 - 14:40 नवीन
मस्त! अभिनंदन!
  • Log in or register to post comments
श
शि बि आय Tue, 07/19/2016 - 14:44 नवीन
व्वा अभिनंदन ! वाचून आनंद झाला. तुमच्या जीवनशैलीविषयी (आधीच्या आणि आताच्या )जरा अजुन सविस्तर सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
र
रुस्तम Wed, 07/20/2016 - 06:56 नवीन
+1 हे ही वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
र
रुस्तम Wed, 07/20/2016 - 06:56 नवीन
+1 हे ही वाचायला आवडेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 10:02 नवीन
काही विशेष नाही त्याबद्द्द्ल , अगदी सामान्यच होती ! अट्टल चाहाबाज असल्याने सुटीच्या दिवशी सहज १०-१२ कप दूध घातलेला साखर कमी असलेला चहा होई , सामान्य पणे आठवड्यतून ४ दिवस योगासने होत पण घाम काढणारा व्यायाम नसे , हालचाली मंद आणि सतत निरुत्साही वाटे ! तिन्ही त्रिकाळ पोट्भर जेवणे , सतत चरत राहणे , चमचमीत , मिसळीची अतीव आवड आणि घाबरत घाबरत गोड खाणे ! औषधाची मात्रा वर सांगितली आहेच ! व्यसन कुठलेच नाही/ नव्हते आणि जन्मापासून कधीही सामिष खाल्ले नाही/ खात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शि बि आय
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Tue, 07/19/2016 - 14:44 नवीन
अभिनंदन आपले,आपल्या अनुभवाचा इतरांनाही फायदा देत आहात हे चांगले.संपुर्ण मधुमेहमुक्त आयुष्यासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 07/19/2016 - 14:49 नवीन
आमच्या घरात प्रत्येक जनरेशन मध्ये मधुमेही आहेत. तुमचा हा लेख त्यांना वाचायला संगतो.
  • Log in or register to post comments
म
मोहनराव Tue, 07/19/2016 - 16:19 नवीन
तु वाचुन रहा रे बाबा.. व्यायाम कर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ
क
कपिलमुनी Wed, 07/20/2016 - 12:30 नवीन
पथ्य-पाणी सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
म
मी-सौरभ Wed, 07/20/2016 - 14:20 नवीन
फक्त तेवढं 'दुआ में याद रखना...'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
स
सस्नेह Tue, 07/19/2016 - 14:54 नवीन
अभिनंदन काका ! तुमच्या आहारातील बदलाविषयी तपशीलवार सांगा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/19/2016 - 15:10 नवीन
अहो, तपशीलवार इथेच सांगा नो भो.सांगितलेली पथ्ये आणि व्यायाम, आहार कोणता करायचा ते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण Tue, 07/19/2016 - 15:22 नवीन
मधुमेहाने होणारे त्रास जवळून पाहिले आहेत. त्या नरकयातनांपासून तुम्हाला मुक्ती मिळाली यासाठी अभिनंदन आणि शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 07/19/2016 - 15:24 नवीन
प्रयत्न करतोय, मोबाईल वरून चोपय पेस्ट होत नाहीये !
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 07/19/2016 - 15:32 नवीन
ऊतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही हे व्रत कसे करावे ? १. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत २. बेकरी पदार्थ वर्ज्य ३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद ४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ ५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी ६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे) ६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर ७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास ) ८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम ९ . रोज ३ वेळा ग्लुकोमीटर द्वारे साखर तपासणी. फलश्रुती : ४ ते ६ आठवड्यात गोळ्या/ इन्शुलिन पूर्ण बंद रक्तदाब, गुडघेदुखी, पाठदुखी गायब वजन आटोक्यात आणि वय किमान दहा वर्षे कमी होणार उत्साह आणि ऊमेद वाढणार अधिक माहितीसाठी Www.freedomfromdiabetes.org
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/19/2016 - 15:44 नवीन
माहितीबद्दल आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
च
चंपाबाई गुरुवार, 07/21/2016 - 19:48 नवीन
वय किमान दहा वर्षे वाढणार ...... असे हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
म
मुक्त विहारि Tue, 07/19/2016 - 15:54 नवीन
मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन. आणि दुसरे म्हणजे, तुमचे अनुभव इथे दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:22 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:23 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:25 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:26 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:28 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:34 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:36 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
अ
अनिरुद्ध प Wed, 07/20/2016 - 09:37 नवीन
माहिती साठी धन्यवाद, आणि मधूमेहाच्या विळख्यातून सुटल्याबद्दल अभिनंदन विटेकर काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ए
एस Tue, 07/19/2016 - 15:57 नवीन
छान अनुभव. अभिनंदन.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Tue, 07/19/2016 - 15:59 नवीन
पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो. माझी शुगर४३० झाली होती. अतिशय निराश होतो. पण पुन्हा जॉबात सेटल झाल्यावर रोजचे चार ते सात किमि चालणे ठेवणे. खाणॅ कंटृओळ केले तरी किमान गरजेचे तरी खाल्लेच पाहिजे. रमजानचे रोजे केले. अगदी कडक. इतर महिन्यात एकदाच जेवुन दीवस लीक्विड ज्युसवर घालवणे प्लॅन आहे. पण अजुन जमले नाही. शुगर गेली. गोळ्या बंद आहेत.
  • Log in or register to post comments
व
विटेकर Tue, 07/19/2016 - 16:12 नवीन
अरे व्वा, छानच ! अभिनंदन !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
भ
भाते Tue, 07/19/2016 - 17:07 नवीन
आयडी चंपाबाई स्त्रीलिंगी आणि प्रतिसादात "पाय मोडल्यावर दोन वर्षे घरीच होतो." होतो??? होतो म्हणजे पुलिंगी ना? या नानामाईच्या डुआयडीला पुलिंगी आणि स्त्रीलिंगी मधला फरक सुध्दा कळत नाही का? समजवा रे ह्याला (का हिला) कोणीतरी. मुवि, तुमच्या या धाग्यावर मी प्रतिसाद दिला नव्हता कारण मी याच संधीची वाट पहात होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Tue, 07/19/2016 - 17:30 नवीन
मी नाना माई नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
अ
अनुप ढेरे Tue, 07/19/2016 - 18:21 नवीन
काहीही, उद्या सी बी आय आयडीकडे CBI चं ओळखपत्र मागाल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
आ
आनंदी गोपाळ Tue, 07/19/2016 - 19:27 नवीन
ते जामोप्या आहेत, अन त्यांनी ते लपवायचा प्रयत्न कधीही केलेला नाहिये. हे तुम्हालाही ठाऊक आहे. तेव्हा जौद्या ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
क
कानडाऊ योगेशु Wed, 07/20/2016 - 05:15 नवीन
रमजानचे रोजे केले. अगदी कडक.
मधुमेही व्यक्तींनी असा उपास केलेला चालतो का? धार्मिक बाब दूर ठेवु पण अश्या केलेल्या उपासाचा त्रासच अधिक होण्याची शक्यता जास्त नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Wed, 07/20/2016 - 06:02 नवीन
दिवसातून एकदाच खावे ते सहादा खावे अशा प्रकारचे सल्ले सर्वत्र दिसतात.... यातले नेमके कोणते चांगले कोणते वाइट माहीत नाही. ज्याने त्याने आपली सहनशक्ती , आहाराची उपलब्धता , डेलि रुटिन इ वर निर्णय घ्यावेत. दिवसातुन एकदा किंवा दोनदाच खावे , ते आरोग्याला कदाचित जास्ती पोषक आहे, असे माझे मत आहे. हे माझ्यापुरते मर्यादित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
स
सुबोध खरे Wed, 07/20/2016 - 06:20 नवीन
http://drc.bmj.com/content/3/1/e000108.full https://www.diabetes.org.uk/ramadan चम्पाबाई असे अनेक दुवे आहेत जरा वाचून घ्या आणि प्रकृतीची काळजी घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Wed, 07/20/2016 - 08:38 नवीन
सकाळीच फास्टिंग शुगर केली... १०३ आहे. ग्लायकोसिलेटेड एच बी ला स्याम्पल दिले आहे. रात्री रिपोर्ट येईल. यावर्शी रमजानच्या काळातच डिप्लोमाची परिक्षाही होती... थेअरी पेपर उपाशीपोटीच लिहिलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 10:07 नवीन
एच बी ला स्याम्पल दिले आहे
किती आली? मुद्दाम टोकत नाही, पण आपली साखर लपविण्याचा मधुमही लो़कांचा कल असतो. माझाही असायचा ! आणि आपली साखर काळजी करण्यासारखी नाही अशी ही समजूत घालण्याकडे कल असतो म्हनून विचारले इतकेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई गुरुवार, 07/21/2016 - 19:31 नवीन
।एच बी ए वन सी ... ५.१ ब्लड शुगर .... ९३ ... ( एच बी वाले त्याच्या बरोबर करतात ती ) आमच्या ल्याबमध्ये शुगर १०३ होती. फास्टिंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर
स
साती Fri, 07/22/2016 - 14:05 नवीन
काही इतर काँप्लिकेशन्स नसतील तर योग्य ती काळजी घेऊन रमजानचे रोजे आणि इतर लोक आपापले कडकडीत उपासही ;) करता येतात मधुमेहींना. रमजानपूर्वी माझ्या सगळ्या रोझेदार मंडळीण्ची एक व्हिजीट असते माझ्याकडे डोस अ‍ॅडजस्ट करून घ्यायला. 'डायबेटीक्स अँड रमादान- प्रॅक्टीकल गाईडलाईन्स' नावाची छोटी पुस्तिका ' इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन 'आणि ' डायबेटीस अँड रमादान इंटरनॅशनल अलायन्स' यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी डॉक्टर लोकांकरिता प्रसारित केली जाते. त्यात या विषयाबद्दल अगदी सांगोपांग माहिती दिलेली असते. जामोप्या स्वतः डॉक्टर आहेत त्यामुळॅ प्रश्नच नाही. इतर कुणी रोजे ठेवणार असेल तर यातले मुख्य मुद्दे मी एक स्वतंत्र धागा काढून लिहेन. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु
च
चंपाबाई Fri, 07/22/2016 - 15:51 नवीन
पुढचे रोजे उन्हाळ्याकडे सरकणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
व
विटेकर Tue, 07/19/2016 - 16:13 नवीन
डॉक्टर खरे सरांच्या प्रतिसादास उत्सुक आहे
  • Log in or register to post comments
स
साती Tue, 07/19/2016 - 16:15 नवीन
सर्वप्रथम या कामगिरीबद्दल आपले अभिनंदन! आपल्याला सांगितलेली जीवनशैली टाईप टू डायबेटीसकरिता अत्यंत योग्य अशीच आहे. आणि तुम्ही ती मनापासून अवलंबिलीत म्हणून तुम्ही हे साध्य करू शकलात. आमच्या ओपिडीत आपल्यासारखी क्लिनीकल प्रोफाईल असणार्‍या प्रत्येक रूग्णाला हे समजावून देऊन आणि लिहून देऊनही याप्रकारे गोळीमुक्त होणारे रूग्ण शेकडा सहा ते सातच असतात. कारण सातत्य आणि प्रयत्नांचा अभाव. त्याबरोबरच आमचेही मोटिव्हेशन करण्यात कमी पडलेले प्रयत्न. मात्र जे असा सल्ला मनापासून ऐकतात आणि पाळतात ते नक्की दुवा देतात. मलाही एखादा पेशंट काही काळासाठी का होईना ओ एच ए मुक्त झाला की त्या पेशंट इतकाच आनंद होतो. पुढिल आयुष्यासाठी शुभेच्छा! (सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही टाईप टू डायबेटीस होण्याचा कार्यकारणभाव वैज्ञानिक दृष्ट्या समजून घेतला आहे आणि आय जी टी रेंजमध्ये तुम्ही आहात हे समजून घेतले आहे. हे आम्हाला रूग्णाला समजावून सांगताना दमछाक होते.)
  • Log in or register to post comments
N
nanaba Wed, 07/20/2016 - 06:41 नवीन
Sati, what is IGT?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
स
साती Wed, 07/20/2016 - 08:26 नवीन
इम्पेअर्ड ग्लुकोज टॉलरन्स. म्हणजे रक्तातील साखर सामान्यवेळी मधुमेहाच्या लेव्हलला नसते पण साखरेचा अतिरीक्त भडीमार होतो तेव्हा हे लोक ती साखर नॉर्मल लेव्हलला आणू शकत नाहीत. रक्तात मिसळलेल्या साखरेच्या प्रमाणात जितके इन्स्युलिन पँक्रियांनी स्रावित करायला हवे तितके होत नाही. याकरिता एक ठराविक मापाचे प्युअर ग्लुकोज पाण्यातून प्यायला देऊन मग अर्ध्या अर्ध्या तासाने रक्त आणि लघवीतले साखरेचे प्रमाण मोजण्यात येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: nanaba
व
विटेकर गुरुवार, 07/21/2016 - 10:10 नवीन
ओजीटीटी ७५ मिली ग्लुकोस पाण्यातून ढवळून प्यायला देतात ( अंदाजे १५ चमचे आपली नेहमीची साखर ) दोन तासांनी रक्तशर्करा १४० च्या आत आल्यास आपण मधुमेही नाही असे म्हणता येते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
N
nanaba गुरुवार, 07/21/2016 - 12:04 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
म
मोहनराव Tue, 07/19/2016 - 16:21 नवीन
छान सल्ला...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 07/19/2016 - 16:33 नवीन
साती ताईंच्या इतक्या सुंदर प्रतिसादानंतर आणखी मी काय लिहिणार आपली दिनचर्या मधुमेहीसाठी आदर्श अशी आहे. १. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ वर्ज्य करावेत २. बेकरी पदार्थ वर्ज्य ३. रोज सकाळी कडधान्यांची न्याहारी ( मोड आलेले मूग / मटकी/ हरभरे , त्याचे डोसे , आप्पे , उसळ, डाळ ढोकळा, मिसळ इत्यादी) धान्य घ्यायचे नाही म्हणजे पोहे उप्पीट इडली बंद ४. एक धान्य जेवण - दोन्ही जेवणात कोणतेही एकच धान्य घ्यावे . भाकरी/ हातासडीभात / खपली गव्हाची पोळी पैकी फक्त एक पदार्थ ५. जेवताना २५:२५:२५:२५ हे गुणोत्तर पाळावे २५%धान्य २५%डाळ २५%कच्चा भाजीपाला , दही नसलेली कोशिंबीर २५% शिजवलेली भाजी ६. रोज सकाळ संध्याकाळ चहाऐवजी स्मूदी ( स्मूदी? गुगलून पहावे , स्मूदी बनवण्याचा विडिओ पाठवला आहे) ६. पायऱ्या चढण्याचा व्यायाम anti gravity exercise न्याहारी आणि प्रत्येक जेवणानंतर ७. पुरेशी चिंतामुक्त झोप (७ ते ८ तास ) ८. रोज सकाळी घाम येईपर्यंत ४५ मिनिटे व्यायाम फक्त आपण लिहिलेली दिनचर्या पाळण्यासाठी केवळ तुमचेच नव्हे तर तुमच्या सौं. चेही अभिनंदन. कारण सहज सोपे मिळणारे पदार्थ पाव, बिस्किटे, दुधाचे पदार्थ सोडून प्रत्येक वेळेस काहीतरी आरोग्यकारक पदार्थ करून देण्यासाठी लागणारे कष्ट घेण्याची घरच्या गृहिणींची "तयारी" असावी लागते. शिवाय "पायऱ्या चढणे आणि ४५ मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम करणे" रोज हे करण्यासाठी किती जणांचा मनोनिग्रह असतो आणि असला तर किती दिवस टिकतो हा मूळ प्रश्न आहे. बऱ्याचशा मधुमेही रुग्णांची मनोवृत्ती आपण "खाण्यासाठी" जन्माला आलो आहे अशी असते. बटर चिकन आणि पनीर टिक्का खाल्यावर कॅलरी जास्त झाल्यामुळे "डाएट कोक" पिणारी पिढी आहे. आपल्या निग्रह आणि सातत्याबद्दल आपले अभिनंदन.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा