काश्मीर - वल्गना आणि वास्तव.
काश्मीर मध्ये पुन्हा आझाद कश्मीरच्या घोषणा निनादू लागल्यापासून उथळ राष्ट्रवाद्यांना चेव चढला आहे. मोदी सरकारची ही कसोटीची वेळ आहेच पण त्याहूनही अधिक मोदी समर्थकांची जणू इज्जत पणाला लागली असल्याचे चित्र समाजमाध्यमातून उमटते आहे. ह्या अतिराष्ट्रवाद्यांना असे वाटत होते की एवढी वर्ष मुस्लिम तुष्टीकरण करणारे काँग्रेसचे सरकार कडक भूमिका घेत नव्हते त्यामुळे काश्मिरातील मुसलमान शेफ़ारलेत आणि पाकिस्तानच्या पाठिंब्यावर स्वतंत्र काश्मीर मागतायत. काँग्रेसने जी कडक भूमिका घेतली नाही ती आता अतिराष्ट्रवादीमेरुमणीमोदी लगेच घेतील आणि माजलेल्या काश्मिरींना तात्काळ वठणीवर आणतील. यामध्ये एकंदर सूर असा आहे की एकदा सैन्याला मोकळे सोडले की सैन्य सगळे प्रश्न एक झटक्यात सोडवेल आणि एकदम इस्त्री मारलेल्या कापडासारखा काश्मीर प्रश्न सुरळीत होऊन जाईल. ही भावना व्यक्त करणारे स्क्रिप्ट लिहून शूटिंग केलेले व्हिडीओ, ज्यामध्ये एक ताव भरलेल्या मिशांचा, फौजी असल्याचा आव आणणारा नाटकातला खोटाखोटा सैनिक गुरगुरत आणि अभिनिवेशाने हातवारे करत धमक्या देताना दिसतो की आमचे बांधलेले हात सोडा आणि बघा जेएनयू पासून काश्मीर पर्यंतचे तमाम देशद्रोही कसे सुतासारखे सरळ करतो ते.
याउप्पर इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल आहेतच आणि ते कसे ७२ तासात शांतता प्रस्थापित करतील अश्या वल्गना करणाऱ्या पोस्टही फिरत आहेत.
हे सगळे अपरिपकव वर्तणूक या सदरात मोडते आणि म्हणूनच हास्यास्पदही आहे. स्वतः मोदींचे निवडणूकपूर्व भाषण आणि आवेश असाच होता जो आता भक्तांमधून झिरपतोय. जुन्या काळाच्या पद्धतीप्रमाणे एखाद्या प्रांतात बंडाळी झाली तर राजांनी दरबारातील एखाद्या सरदाराची नेमणूक करावी किंवा एखाद्याने विडा उचलावा आणि स्वारीवर जाऊन त्याने मोठ्या शौर्याने गनिमांचा बिमोड करून शांतता आणि विजयश्री दरबारात पेश करावी असे आत्ताही होईल असा अनेक भक्तांचा भाबडा समज होता.
पण काश्मीरमधील परीस्थितीचे आकलन जसे-जसे प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे होत गेले तसतसा उन्माद कमी होऊ लागला. आता नेहरूंनीच कसा काश्मीर प्रश्नाचा मुळातच विचका करून ठेवला आणि कसे गांधीजी त्यावेळी गप्प राहिले हे दळण दळणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमातून फिरू लागतील हे नक्की.
ज्या राज्यांमध्ये गेली अनेक वर्षे 'सैन्यदले (विशेष अधिकार) कायदा १८५९ - AFSPA 1958' लागू आहे आणि जेथे मूलभूत अधिकार खुंटीला टांगून ठेवलेले आहेत आणि कधीही, कोणालाही, कुठूनही अटक करून कितीही दिवस तुरुंगात डांबण्याचा सैन्याला हक्क आहे अश्या ठिकाणच्या नागरिकांनी हे सगळे देशहिताच्या दृष्टीने गपचूप सहन करावे अशी उर्वरित नागरिकांची अपेक्षा असेल तर ती नक्कीच चुकीची आहे. अशी वेळ माझ्यावर आली तर माझी काय प्रतिक्रिया असेल हे प्रत्येकाने स्वतःला विचारून बघावे. अशी कल्पना करणे सोपे जावे म्हणून केवळ पुण्यात घडलेला पुढील प्रसंग आठवावा.
पुण्यात संभाजी उर्फ लकडी पुलावरून सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात दुचाकी वाहनांना जायला बंदी आहे. दिनांक ३१ जानेवारी २०१२ रोजी रात्री ८ च्या सुमारास सैनिकी अभियांत्रिकी महाविद्यालय (CME) दापोडीचे दोन सैनिक विद्यार्थ्यांना नो एंट्री मधून आल्याबद्दल अलकाटॉकीजच्या चौकात वाहतूक पोलिसांनी अडवले. सैनिकांनी पोलिसांशी वाद घातला आणि दंड भरण्या ऐवजी फोन करून आपल्या साथीदारांना बोलावले. अर्ध्याच तासात सैन्यदलाच्या तीन गाड्या भरून सैनिक तेथे आले. पोलिसांना न जुमानता हुल्लडबाजी करत, नागरिकांना धमकावत, गाड्यांच्या काचा फोडत, पत्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेत जणू संपूर्ण चौक ताब्यात घेऊन ओलीस ठेवला. सुमारे पाऊण तास सैनिकांचा हा धिंगाणा चालू होता. नंतर सैन्यातील आणि पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना येणे भाग पडून त्यांच्या मध्यस्तीने सगळं गोंधळ थांबला. पुणेकरांनी सैनिकांची ताकद आणि त्यातून येणारी दहशत काय असते याची छोटीशी चुणूक तासाभरासाठी अनुभवली आणि कशी सार्वत्रिक भयभीतावस्था आणि असहाय्यतेची भावना निर्माण होते हे ही अनुभवले. १ फेब्रुवारी २०१२ चे सगळे पेपर काढून पाहिले तर हा सगळा अनुभव आजही पुन्हा घेता येईल.
आता मुद्दा असा आहे की शांत अशा पुण्यासारख्या सुशिक्षित शहरात काही मोजके निःशस्त्र सैनिक छात्र कायद्याच्या विरुद्ध जाऊन सगळी यंत्रणा वेठीला धरून दहशत निर्माण करू शकतात तर काश्मीर सारख्या अशांत (Hostile) प्रदेशात कायद्याचे पाठबळ असलेले, प्रचंड संख्येने उपस्थित असलेले सशस्त्र सैन्य काय धुमाकूळ घालत असेल? आणि एक नागरिक म्हणून जर रोजच तुम्हाला हे सहन करावे लागत असेल तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? प्रत्येक सुजाण नागरिकाने स्वतःची लोकशाहीची व्याख्या अधिक प्रगल्भ करण्यासाठी स्वतःला हे विचारून बघावे ही विनंती.
💬 प्रतिसाद
(271)
श
शाम भागवत
Sat, 07/23/2016 - 12:34
नवीन
मनोंचा प्रतिसाद येऊन २४ तास व्हायला आले आहेत तरीही ....
"भाऊ तोरसेकर? खी..खी..खी.."
असा एखादा प्रतिसाद आला नाही हे एक आश्चर्यच!!!
:))
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 13:13
नवीन
भाऊ तोरसेकरावर खर्च करावेत इतकेही स्वस्त माझे तरी खी खी खी नाहीत म्हणुन सोडले बघा भागवत साहेब
बाकी ताम्हनकर साहेब विरोधी पक्षाचे तोरसेकर होऊ शकतील असे वाटते ;)
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sat, 07/23/2016 - 14:53
नवीन
:))
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/25/2016 - 07:41
नवीन
तो अनुभव हमीद दलवाई यांचा आहे बाप्पु. तोरसेकरांनी केवळ लिहिला. तरीही खीखीखी करायची असेल तर काय करणार. कदाचित दलवाई मुसलमानांचे भाऊ तोरसेकर आहेत असे ऐकायला मिळेल आता.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/25/2016 - 07:51
नवीन
बापरे. आता काय होणार?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 08:23
नवीन
एकतर भाऊ भाट आहेत, इतकी वर्ष मुंबई महापालिका हातात असताना सुद्धा रस्त्यावर असलेल्या खड्डयांची जबाबदारी सेनेची कशी नाही ह्यावर लेख पाडतात ते, त्यामुळे हो, भाऊंवर माझे खी खी खी मी बरबाद करणार नाही हे खरे, बाकी कोणीतरी कोणाचातरी कोणीतरी आहे असे समजा मी मागे कधी म्हणले असेल तर तो माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे अन तो माझ्या अल्पमतीनुसार मी बनवलेला आहे, त्याचा इथे अस्थानी उल्लेख करायचे अन भाऊंवर खी खी खी बरबाद करणार नाही असे म्हणल्याने तुम्हाला झोम्बायचे कारण मात्र कळले नाही मृत्युंजय भाऊ
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/25/2016 - 10:02
नवीन
मिपावर लेख पाहुन नाही तर माणुस पाहुन प्रतिसाद पडतात असा एक आरोप नेहमी करण्यात येतो (थोडक्यात काय लिहिले आहे ते महत्वाचे नसुन कोणी लिहिले आहे ते महत्वाचे आहे असे दिसते). खरे खोटे देव जाणे. सद्यस्थितीत भाऊ तोरसेकरांबद्दलची कमेंट त्याच सदरात मोडते. पण केवळ एखादा अनुभव भाऊ तोरसेकरांनी लिहिलेला आहे म्हणून तो हास्यास्पद होत नाही. सद्य परिस्थितीत तर अनुभव पण तोरसेकरांचा नाही.
अनुभव तोरसेकरांचा असो किंवा दलवाईंचा, त्या अनुभवामागची दारुण वस्तुस्थिती काश्मिरमधली भयावह परिस्थिती विदीत करते. अश्या वेळेस त्या परिस्थितीवर हसण्यासारखे काय आहे हे मला नक्कीच उमजलेले नाही.
भागवतांचा प्रतिसाद वाचा:
\
त्यावर तुमचा प्रतिसाद वाचा:
थोडक्यात म्हणजे वरचा संपुर्ण अनुभव (दलवाईंचा - तोरसेकरांनी लिहिलेला) हा हास्यास्पद आहे असे म्हणून त्या वस्तुस्थितीची कुचेष्टा करण्यामागचे कारण समजले नाही. काश्मीरमध्ये सामान्य माणसाच्या मनात काय पराकोटीचा भारतद्वेष आहे आणि तो केवळ धर्माच्या नावाखाली आहे हे त्या अनुभवातुन दिसते. ही अतिशय दारुण परिस्थिती आहे आणि त्याला अर्थातच तोरसेकर जबाबदार नाहित. असे असता त्यावर खीखीखी करुन हसण्यासारखे काही कारण मला दिसत नाही सोन्याबापु. त्यामुळेच हे अस्थायी विधान प्रचंड खटकले. इथे लेखक तोरसेकर नसुन हमीद दलवाई असले असते तरी हेच म्हणालो असतो किंबहुना अगदी राहुल गांधीने जरी हा अनुभव लिहिला असता आणी त्यावर तुम्ही हा प्रतिसाद दिला असता तरी तो तेवढाच खटकला असता.
या वाक्याचा संदर्भ, मतितार्थ, आशय आणि उपयोग नाही कळाला त्यामुळे यावर प्रतिसाद देत नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 10:25
नवीन
सगळे उलगडतो, प्रथम एक विनंतीवजा मागणी पूर्ण करता आली तर पहा, ती म्हणजे, हमीद दलवाई ह्यांचा हा अनुभव त्यांच्याच फर्स्टहँड लेखनात मिळाला तर सांगा किंवा द्या (मला कल्पना नाही), मला वाचायला आवडेल, जर इतका महत्वाचा अनुभव खुद्द दलवाईंच्या लेखनात नसला तर पुढे काय? आजकाल कोणाचा भरवसा घेता? अनुभव एकाचा मांडतोय दुसरा..
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/25/2016 - 10:40
नवीन
माहिती नाही. तोरसेकरांना हा अनुभव कसा माहिती झाला ते माहिती नाही. पण तोरसेकरांनी धादांत खोटे लिहिले आहे असे कोणी म्हणत नाही. त्यामुळे त्यावर शंका घ्यायचे काही कारण मला दिसत नाही. त्यांनी तद्दन भूलथापा मारल्या आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय सोन्याबापू?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 10:57
नवीन
नाही, मला असेच म्हणायचे नाहीये, मला फक्त इतके म्हणायचे आहे की संवेदनशील विषयात पब्लिक फोरम पक्षी ब्लॉग वगैरे वर जर कोणी "हियरसे" प्रकारचे अनुभव मांडले तर त्यावर एकदम डोळे झाकून विश्वास ठेवू नये, ह्यात लेखक कोण आहे ह्यावर बायस असायचे कारण नाही, शिवाय भाऊंच्या विषयाला भागवतांनी आऊट ऑफ द ब्लु तोंड फोडले म्हणून मी त्या कॉमेंट संबंधित माझी मते त्याच्याखाली नोंदवली आहेत,
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/25/2016 - 11:12
नवीन
सोन्याबापू तुम्हाला जो त्रास झाला त्याबद्दल प्रथम सॉरी.
खरे सांगायचे तर कोणीतरी तोरसेकरांबद्दल खी.खी.खी. असे लिहिल्याचे आठवत होते. तुम्ही ते लिहिलेय हे गावीही नव्हते. तुमच्या उत्तरावरून माझी कॉमेंट तुम्हाला दुखवून गेल्याचे जाणवल्याने मी स्मायली देऊन थांबलोही होतो. असो.
मला तुमच्या बद्दल आदर आहे. तसेच तुम्हाला दुखवायचा माझा कोणताही हेतू नव्हता हे इथे स्पष्ट करून मी परत एकदा सॉरी म्हणतो.
ओके?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/25/2016 - 11:02
नवीन
मी दलवाईंचा लेख खूप पूर्वीच वाचला होता. पण नक्की कुठे ते आठवत नव्हते.
आत्ता तोरसेकरांचा तो लेख वाचला त्यानुसार
अवांतरः मलाही तोरसेकरांची सर्व मते पटत नाहीत. पण तरीही मला त्यांच्या अनेक पोस्ट मधून विचार करण्यासारखे बरेच मुद्दे मिळाले आहेत.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 11:10
नवीन
हाच संदर्भ अगोदर मिळाला असता तर पुढले अवांतर टाळता आले असते असे वाटते भागवत साहेब मला.
असो झाल्यागेल्यावर मी माझ्यातर्फे पाणी टाकतो :)
कसे?
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Mon, 07/25/2016 - 11:59
नवीन
_/\_
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 10:34
नवीन
बाकी , आमच्या "उप-प्रतिसादाची" पिसे काढायला हिरीरीने आलात, तेव्हा खुद्द अनुभवावर काहीही मत न देता ,नुसते भाऊंच्या विरोधकांवर श्लेष करणाऱ्या भागवतांच्या कॉमेंट वर काही बोलला नाहीत ते? एकदाही नाही सांगावे वाटले का भागवतांस की बोआ तुम्ही का अनुभव सोडून लेखक-सादरकर्त्यावर घसरताय, जरा विषण्ण परिस्थितीवर बोला, बोलायचे नाही ठरवले होते पण विषय वाढवलाच आहात तर बोलतो, हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 10:58
नवीन
ह्यावर काही?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/25/2016 - 11:01
नवीन
भागवतांना समज द्यावीशी वाटली नाही त्याचे कारण असे की त्यांनी तोरसेकर विरोधकांवर कुत्स्तित टिप्पणी केली होती पण त्यामुळे काश्मीर मधल्या परिस्थितीची कुचेष्टा होत नाही. तुमच्या प्रतिसादातुन तसे होत आगे. त्या अनुभवावर खीखीखी करुन हसणे किंवा (याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता) असे म्हणुन काश्मीर मधील भयाणा परिस्थितीची कुचेष्टा करणे हे मात्र मला खटकले.
जे आहे ते स्पष्तपणे त्या अनुभवात मांडले आहे. तुम्हाला तोरसेकर आवडत नाहित म्हणून तोरसेकरांनी लिहिलेल्या प्रत्येक गोष्टीची कुचेष्टा करण्याचे काहिच कारण नाही. मिपावरील बर्याच आयडींचे विचार हे माझ्या प्रकृतीच्या विरोधात जाणारे आहेत पण म्हणुन त्यांच्या प्रत्येक प्रतिसादावर अथवा धाग्यावर फक्त हेटाळणीच करायची असे काही मी करत नाही विशेषतः तसे केल्याने जेव्हा एखाद्या व्यक्तिची, घटनेची अथवा वस्तुस्थितीची हेटाळणी होत असेल किंवा गांभीर्य कमी होत असेल तेव्हा. त्याउप्परही तोरसेकर म्हटल्यावर तुच्छतापुर्वक उल्लेखच करायचा असल्यास त्यासही माझा आक्षेप नाही कारण ते एखाद्याचे वैयक्तिक मत असु शकते मात्र तसे करण्याने विदित केलेल्या देशविघतक वस्तुस्थितीला नाकारले जात असेल, त्याची हेटाळणी होत असेल किंवा त्याकडे दुर्लक्ष होत असेल तर माझा नक्कीच आक्षेप आहे. तोरसेकरांचा विरोध करुन अथवा तोरसेकरांना उचलुन धरुन. तोरसेकरांना शिव्या घालुन अथवा तोरसेकरांबद्दल गोग्गोड बोलुन, तोरसेकरांची निंदा नालस्ती करुन अथवा तोरसेकरांचा जयजयकार करुन , काय वाटेल ते करून, देश अभंग राहायला(च) हवा" Because the Union Must Persist.
थोडक्यात आक्षेप तोरसेकर विरोधाला नाहिच.
हा मुदलातलाच डबल स्टॅण्डर्ड मलाही काही खास रुचला नाही बरंका मृत्युंजय भाऊ :)
डबल स्टेंडर्ड असण्याचा प्रश्नच नाही, कारण वरती विदित केलेच आहे. स्पष्टपणे बोलुन दाखवले. त्याबद्दल नाईलाज आहे. तुम्हाला रुचले नाही याचा खेद आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/25/2016 - 11:18
नवीन
(याचा अर्थ असा होतो की तोरसेकरांनी न लिहिता अजुन कोणी लिहिले असते तर तुम्ही खी खी खी करुन हसले असता)
हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो
"तोरसेकर ह्यांच्यावर खर्च करण्याइतके माझे खी खी स्वस्त नाहीत"
ह्यात मी कश्मीर परिस्थितीची कुचेष्टा कशी केली ते सांगा? शिवाय तोरसेकर हा माझा एकमेव सोर्स नाही काश्मीर बद्दल अभ्यास करायला, का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Mon, 07/25/2016 - 11:33
नवीन
हा अर्थ कसा निघाला बुआ?? मी स्पष्ट बोललोय की तोरसेकरांबद्दल माझे मत प्रतिकूल आहेच, त्यातून मी काश्मिरी परिस्थितीची कुचेष्टा करतोय हा जावईशोध आपण लावलाय भाऊ, माझे मत परत एकदा मांडतो
तोरसेकरांबद्दलचे तुमचे मत काहिही असले तरीही त्यांनी लिहिलेल्या सत्य अनुभवावर खीखीखी करणे किंवा केवळ त्यांनी लिहिले आहे म्हणुन खीखीखी देखील करणार नाही असे लिहिणे यातुन त्या परिस्थितीची कुचेष्टाच होते सोन्याबापु. तो शोध नाही. जाव्ईशोध तर त्याहुन नाही. तुम्ही जुनेच मत परत व्यक्त केल्याने त्या परिस्थितीत काहिही बदल होत नाही. तुम्हाला तसे म्हणायचे नव्हते असे म्हणा वाटल्यास.
का मी तोरसेकरांना मना करतोय म्हणून मी काश्मीरला कुचेष्टेने पाहतोय असे सोलॉजिझम लढवलेत आपण?
परत एकदा लिहितो:
आधी लिहिलेले अजुन एक वाक्य वाचा
वरची २ वाक्ये एवढी स्पष्ट असुनही तुम्ही तोरसेकरांना विरोध करताय म्हणुन मी हे सगळे लिहितोय असे घोडे तुम्हाला पुढे दामटायचे असेल तर तो तुमचा प्रश्न आहे सोन्याबापु. त्याबद्दल मी काहीच करु शकत नाही.
त्यामुळे तुम्ही जे लिहिले आहे त्यातुन जो अर्थ प्रतीत होतो आहे त्याला Theory of Deduction म्हणा अथवा syllogism म्हणा, परिस्थिती बदलणार नाही. फक्त बघण्याचे चष्मे बदलतील.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/25/2016 - 15:24
नवीन
भाऊ तोरसेकर?????
>>>> खी खी खी
→ असे विधान मी केले होते,श्रीगुरूजींना उपप्रतिसाद दिला होता जाकिर नाईकांच्या धाग्यावर बहुतेक!!!
तुम्ही कृपया वाद घालत बसू नका.
.
.
.
.
आणखी एक राहिलचं
"खी खी खी खी"
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 07/23/2016 - 10:29
नवीन
हा 'ऐसी'वर शोभणारा लेख चुकुन इथे टाकलेला दिसतोय. 'ऐसी'वर या लेखात ओकलेल्या गरळीचे समर्थन करणारे आतापर्यंत किमान १००० प्रतिसाद आले असते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 07/23/2016 - 10:55
नवीन
Eka sansthalavar dusarya sansthalavar badnami..???
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 11:09
नवीन
आपापली वतनं असतात एकेकाची! चालायचेच!!
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sat, 07/23/2016 - 11:00
नवीन
लेख आवडला.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/25/2016 - 15:25
नवीन
अनुपजी,
हे पटलं नाही.
- Log in or register to post comments
अ
अरवीन्द नरहर जोशि.
Sat, 07/23/2016 - 12:28
नवीन
अत्यन्त चुक लेख लिहिलेल असुन पुर्न अविचरि अहे अशन तेह्तेच पथविले पहिजे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Sat, 07/23/2016 - 12:38
नवीन
- Log in or register to post comments
व
वटवट
Sat, 07/23/2016 - 13:03
नवीन
सुरुवातीला वाटले रात्रीच्या नशेत लिहिलाय हा लेख.....
पण नंतर बघीतलं...चक्क दुपारी पोस्टलाय हा लेख??? ऑ ....
दुपारी दुपारीच असं कसं ब्वॉ???
- Log in or register to post comments
स
संदीप ताम्हनकर
Sat, 07/23/2016 - 14:04
नवीन
दखलपात्र प्रतिक्रियां संबंधी: -
'इंडियन जेम्स बॉन्ड श्री. अजित डोवाल' - हे मी लिहिलेले नाही. अशा पोस्ट समाजमाध्यमातून जोरात फिरत आहेत. कोण पुढे पाठवतं ते सगळे जाणतातच.
प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का? आणि सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो ही जगभरातील वस्तुस्थिती आहे. भारतात अनेक राज्यात १९५८ पासून आफ्स्पा लागू आहे, त्या मणिपुरी मानवाधिकार कार्यकर्त्या आरोम चानू शर्मिला गेली अनेक वर्षे सत्याग्रह करतायत तो का आणि कसा ते जरा वाचा. काश्मिरी उपास करत नाहीत तर दगड फेकतात.
श्री डोवाल यांची काशिरातील कामगिरी काय हे अजून समोर यायचंय. तोपर्यंत संघ परिवारातला माणूस म्हणून ज्यांना त्यांच्या आरत्या करायच्यात त्यांनी जरूर कराव्या.
काश्मिरात पाक पुरस्कृत अशांतता आणि दहशतवाद आहे यात कोणाचेच दुमत नाही. प्रश्न कसे हाताळावे हा मुद्दा आहे. केवळ सैन्याच्या बळावर काश्मीर प्रश्न सोडवता येईल असे वाटणारे मुर्खांच्या नंदनवनात वावरतायत हे नक्की. याबाबत अतिराष्ट्रवाद्यांचा अभिनिवेश हास्यास्पद आहे. अश्याने खरे नंदनवन हातातून निसटून जाईल.
आर्मीने, अर्ध-सैन्यबलांनी केलेले अत्याचार आणि बळाचा अतिरिक्त वापर यावरही बरेच मटेरिअल आंतरजालावर उपलब्ध आहे.
मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
सध्याच्या अशांततेच्या, दंग्याच्या, गोळीबाराच्या, पॅलेट गनच्या कमरेच्या वर चालवण्याच्या अनेक स्टोरीज आंतरजालावर आहेत. बहुतेकवेळा कॅमेरा सैन्याच्या (बाजूने) समोरील आंदोलकांचे चित्रण करतो. या चित्राची दुसरी बाजूसुद्धा आहेच.
दहशतवादाचे पीक पेरण्यासाठी जमिनीची मशागत भारतीय सैन्यदले पाकिस्तानला फुकटात करून देतायत, असे चित्र आहे.
बाकी टवाळखोरांचे सगळे मटेरिअल साभार परत.
- Log in or register to post comments
व
वटवट
Sat, 07/23/2016 - 14:27
नवीन
आयला... अजित डोवाल आणि आरएसेंस संबंध.... नवीनच ब्वॉ...
(दादा.. दुसर्या बाजूचेपण व्हिडीओ उपलब्ध आहेत... जमल्यास ते बघा...)
असो...
पण एक खरंय... तुमच्यासारखे विचारवंत असतील तर आर्मी काही फार चांगले करू शकेल असे वाटत नाही....
खेद ह्याच गोष्टीचा आहे कि तुमच्या काश्मीरमधल्या वास्तव्यात काश्मिरी पंडितांना कधी भेटू वाटलं? त्याबद्दल लिहायचा प्रयत्न करा.. आणि जमल्यास आर्मीमधल्या लोकांशी पण बोला जे तिथे आहेत...
साली ही देशातली कीड आधी संपली पाहिजे. बाहेरचे लोक मारणे खूप सोपे... पण हे असले साप.... अतिभयंकर...
(खरं तर मी एव्हढं भडक कधीच बोलत नाही... पण वस्तुस्तिथीचे योग्य आकलन नं करता जर कोणी अकलेचे तारे नां..... सटकते राव...)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 14:28
नवीन
अतिराष्ट्रवाद्यांना म्हणजे काय?
ह्याचे उत्तर दिलेत तर उपकृत होईन ताम्हनकर साहेब,
दुसरे म्हणजे, माझा रास्वसंघ विरोध हा मिपावर बरेच जणांना माहिती आहे, त्याला माझी काही वैयक्तिक कारणे आहेत, अन ती बदलावीत असे सकारात्मक संघाने राजकीय आघाडीवर काही केलेले मला आजवर दिसलेले नाही, पण तो भाग वेगळा, ते तुमच्यासमोर मी सिद्ध करावे ही ऑथॉरिटी मी वैयक्तिकरित्या तुम्हाला देत नाहीये, अजून जर विषय संबंधित बोलायचे झाले तर डोवल हे रास्वसंघसंलग्न आहेत हे मला माहिती होते/आहे, पण फक्त ते संघ संबंधित होते म्हणुन त्यांची इंटेलिजन्स ब्युरो मधील कारकीर्द जर तुम्ही नाकारत असाल किंवा त्याची हुर्यो उडवत असाल तर संघडले अन तुमच्यात फरक तो काय उरणार न? की मग
१. तुम्ही स्वतः आयबी मध्ये नोकरी करत होतात म्हणून तुम्हाला डोवल ह्यांचे उदात्तीकरण माहिती आहे?
२. का ते फक्त संघाशी संबंधित होते म्हणून त्यांचे मीठ तुम्हाला अळणी आहे?
उरता उरला काश्मीरचा प्रश्न तर,
माझ्या नोकरीत (मला दरवेळी उल्लेख करायला आवडत नाही तरीही) अर्धसैनिकबल असलेल्या एका संघटनेचा एक अधिकारी म्हणून माझ्या पाहणीत आलेले अनुभव हे भयानक अन अतिशय सेन्सिटिव्ह श्रेणीतील असल्यामुळे मी ते इथे मांडू शकत नाहीये, फक्त टाळी एका हाताने कधीच वाजत नसते इतके सांगतो.
पटले तर घ्या नाहीतर आम्हालाही गाढवात काढा :)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Sat, 07/23/2016 - 14:35
नवीन
एक नंबर समतोल प्रतिसाद....
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/24/2016 - 11:06
नवीन
यात काही सत्य आहे का नाही हे समजण्याएव्ढी तुम्हाला बुद्धी आहे का नाही? इथे ते टाकण्याआधी सारासार विचार केला होता का? कशाला इतरांच्या आड लपता? मी कायअप्पावर अनेक गटांचा सदस्य आहे. असली पोस्ट आजतगायत कोणत्याही ग्रुपवर आलेली नाही. या असल्या उपसाहात्मक पोस्ट्स तुमच्यासारख्या निधर्मांधांच्या डोक्यातून बाहेर पडत असतात.
अत्यंत निर्बुद्ध वाक्य! अतिरेक्यांशी, दंगलखोरांशी लढायला सैन्य पाठवितात ते काय निर्बुद्ध सैनिक असतात का? भारतात फक्त काश्मिर, मणिपूर इ. मोजक्या ठिकाणीच सैन्य का आहे व सैन्याला विशेषाधिकार का द्यावा लागला आहे हे समजण्याइतकी बुद्धी आहे का? सैन्याला विशेषाधिकार दिले की त्याचा अतिरेक होतो म्हणे. सैन्याने काय आणि किती वेळा अतिरेक केला? काश्मिरमध्ये आणि देशात इतरत्र एके ४७ आणि ग्रेनेड्स घेऊन अतिरेकी हल्ले करतात, गोळ्या घालून व बॉम्बस्फोट करून निष्पापांना जीवानिशी मारतात, काही जणांना जन्माचे अपंग करतात, या क्रूर नरभक्षक जनावरांना काही स्थानिक लोक पाठिंबा देतात, लहान मुलांच्या आडून सैन्यावर दगडफेक होते, जमावात मागे उभे राहून सैनिकांच्या दिशेने ग्रेनेड फेकतात, त्यात सैनिक जखमी होतातच पण जमावात पुढे असलेली लहान मुलेही जखमी होतात, एका पोलिसाला जमावाने घेरून मारहाण करून त्याचे डोळे फोडले, अजून एका पोलिसाला जमावाने त्याच्या वाहनासकट नदीत फेकून दिले . . इ. क्रूर कृत्यांबद्दल चकार शब्द नाही. ही कृत्ये होत असताना सैन्याने काय गुलाबाची फुले वाटून शांततेचे आवाहन करायचे का? अशा कृत्यांना विरोध करून अतिरेक्यांशी लढताना सैन्याला जे जे करावे लागते ते क्षम्य आहे. त्यात कोणताही अतिरेक नाही. अतिरेक वाटत असला तर तो होणारच. संचारबंदी जाहीर झालेली असून रस्त्यावर अतिरेक्यांशी लढण्यासाठी सैन्य असताना अतिरेकी बुर्हान वाणीच्या मृत्युचा निषेध करण्यासाठी संचारबंदी मोडून रस्त्यावर उतरलेल्या व सैनिकांवर व पोलिसांवर हल्ले व दगडफेक करणार्या वाणीच्या समर्थकांना आपल्या दुष्कृत्यांची शिक्षा भोगावी लागणारच. बुर्हान वाणी हा काही साधुसंत नव्हता. तो अतिरेकी होता आणि त्याच्या समर्थनासाठी संचारबंदी असतानाही रस्त्यावर उतरलेले सुद्धा साधुसंत नव्हते. ते घराबाहेर पडले नसते तर बाकी प्रश्न उद्भवलेच नसते.
अत्यंत बेताल वाक्य. डोवाल संघ परिवारातले कधीपासून झाले? ते १९८४ च्या आधीपासून कार्यरत आहेत. त्यांच्या कोणीही आरत्या ओवाळत नाही. ते आपके काम करताहेत. ते संघ परिवारातले आहेत म्हणून त्यांच्या आरत्या केल्या जाताहेत हे अत्यंत मूर्खपणाचा आरोप आहे.
सैन्याला व सरकारला एकवेळ नसेल कळत काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते, पण तुम्हाला आहे का अक्कल काश्मिर प्रश्न हाताळायची? असली तर सैन्याला व सरकारला जाऊन सांगा. तुम्हाला इथे बसून समजतंय का काश्मिर प्रश्न कसा हाताळायचा ते. आंतरजालावर बरेच काही असते. ते काय सगळे खरे असते का? अतिरेक्यांनी केलेल्या निष्पापांच्या हत्या, सौरभ कालिया सारख्या पकडलेल्या सैनिकांचे लिंग कापून केलेले हालहाल, भारतीय सैनिकांची कापलेली मुंडकी इ. सुद्धा बरेच मटेरिअल आंतरजालावर आहे. ते वाचलंय का? बुर्हान वाणीसुद्द्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावत होता. इसिस आणि जाकीर नाईक सुद्धा आंतरजालाच्या माध्यमातून लोकांना भडकावतात.
काश्मिरात सैन्य नसते तर पहिल्याच भेटीत पैगंबरवासी झाला असता हे लक्षात येतंय का? का स्वतःला जेम्स बाँड समजता? सैन्यामुळेच तिथे ३-३ वेळा निर्वेध फिरू शकलात आणि त्याचमुळे इथे येऊन मूर्खासारख्या पोस्ट्स टाकू शकलात याची जाणीव आहे का? ३ वेळा काश्मिरात फिरून सुखरूप परत आलात याचे श्रेय सैन्याला देऊन कृतज्ञ राहण्याऐवजी कृतघ्नपणे सैन्यावरच दुगाण्या झाडताना शरम कशी वाटत नाही?
सैन्यावर व पोलिसांवर हल्ले होत असताना जगातील कोणतेही सैन्य हात बांधून स्वस्थ बसणार नाही. गोळीबारात जे लोक जखमी झाले आहेत ते स्वतःच्या चुकीमुळे जखमी झालेले आहेत. संचारबंदी सुरू असताना त्यांनी घरात बसणे अपेक्षित आहे. ते न करता मेलेल्या अतिरेक्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर येऊन सैन्यावर हल्ले करण्याची ही किंमत द्यावी लागत आहे. सैन्याच्या गोळ्या खायच्या नसतील तर संचारबंदी सुरू असताना घरात बसा किंवा रस्त्यावर आलात तर शांततेने निदर्शने करा. पोलिसांवर व सैनिकांवर हल्ले केलेत तर प्रत्त्युत्तर मिळणारच.
परत एकदा मूर्खपणा. पाकिस्तान हा सुरवातीपासून दहशतवादी निर्माण करणारा देश आहे. जगातल्या अनेक देशात, जिथे भारतीय सैन्याचा काहीही संबंध नाही, त्या देशात सुद्धा पाकिस्तानने दहशतवादी हल्ले केलेले आहेत. भारतात सुरू असलेल्या दहशतवादाचे खापर भारतीय सैन्यावर फोडणे हा पराकोटीचा मूर्खपणा आहे.
तुम्ही कोणाचेही मटेरिअल साभार परत करा. तो तुमचा प्रश्न आहे. पण अत्यंत बेताल व मूर्खपणाचे लेख लिहिणार्या तुमच्या सारख्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 07/24/2016 - 11:17
नवीन
+१०००ⁿ
Shregurujinshi kitihi matbhed asale Tari ya vishayavar 'vayam panchadhik shatam'
Btw ti dowal-jamesBonnd post mi baghitali aahe aani ti circulate karnare bindok aahet he hi titakech khare
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 07/24/2016 - 11:37
नवीन
धन्यवाद! मूळ लेख वाचल्यावर निधर्मांधांची नेहमीचीच मतलबी आरडाओरड अशी समजूत करून दुर्लक्ष केले होते. परंतु लेखकाचा नंतर आलेला प्रतिसाद वाचल्यावर संताप आला आणि म्हणून प्रतिसाद दिला.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Sun, 07/24/2016 - 14:49
नवीन
प्रचंड सहमत!!!
- Log in or register to post comments
स
सामान्य वाचक
Sun, 07/24/2016 - 15:06
नवीन
100 टक्के सहमत
हा देश या देशावर प्रेम करणाऱ्या आणि देशाला आपले मानणाऱ्या सगळ्यांचा आहे
मग तो कुठल्याही जात, धर्म, वय, पंथ, विचारधारेचा असो
आणि त्याचे जर देशावर प्रेम नसेल, तर तो कुठल्याही जात धर्म पंथाचा असेल तरी तो देशद्रोही च आहे
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 07/24/2016 - 21:29
नवीन
श्रीगुरुजींशी अनंतवेळा सहमत.
-गा.पै.
- Log in or register to post comments
श
शिद
Mon, 07/25/2016 - 11:44
नवीन
____/\____
मस्तच श्रीगुरूजी...उत्तम चिरफाड केलीय.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Mon, 07/25/2016 - 15:29
नवीन
गुर्जींशी सहमत!!
.
.
.
भारत माता कि जय
जय हिंद
- Log in or register to post comments
भ
भंकस बाबा
Mon, 07/25/2016 - 09:40
नवीन
तुम्ही अरुन्धती रॉयचा चश्मा वापरता काय?
काश्मिरी पण्डिताचा उल्लेख टाळून लेख पाडलाय म्हणुन विचारले.
काश्मिरी जनतेची फारच कीव आलेली दिसत आहे तुम्हाला, काय उद्योगधंदे आहेत हो यांचे.
आज सेनेच्या नियंत्रणामुळे कश्मीर दिल्ली आणि पाकिस्तानमधे बफर स्टेट बनून राहिलय , नाहीतर आज जसे अफगनिस्तानात हल्ले होत आहेत ते पार जम्मू , पंजाब , दिल्ली पर्यन्त पोचले असते.
आमचे राजनाथसिंग भले सर्टिफिकेट देत फिरतील की भारतीय मुस्लमान आईएससारख्या अतिरेकी संघटनेची कास नाही पकडणार, मग आता ही कनेक्शन निघत आहेत ती काय भारतीय गुप्तचर विभागाची कारस्थानं आहेत?
काश्मीरबाबत तुर्तास इतकेच बोलू शकतो की 'नजर हटी तो दुर्घटना घटी'
रच्याकने ते काश्मिर हिंसाचाराचे अगदी पब्लिकमधुन काढलेल्या क्लिप्स बघितल्या आहेत.
- Log in or register to post comments
व
विनोद१८
Mon, 07/25/2016 - 10:54
नवीन
... प्रत्यक्ष रस्त्यावर जे सैन्य असते ते एवढ्या बौद्धिक क्षमतेचे असते का ?
असा प्रश्ण विचारुन तुम्ही आपल्याच देशाच्या सैन्याला कमी लेखताय व त्यांचा अपमान करताय याचे जरा भान ठेवा. भारतीय सैन्याचा इतिहास काय व कसा आहे याविषयीचा तुमचा अभ्यास शुन्य दिसतोय म्हणुन आपल्याला असलेल्या लिहिण्याच्या स्वातंत्र्याचा असा दुरुपयोग करताय. तुम्ही या दुव्यावर
( https://www.facebook.com/Presstitues/videos/1239597949407107/ ) जा म्हणजे तुमच्या प्रश्णांची उत्तरे तुम्हाला मिळतील. ह्या सैनिकाच्या प्रश्णावर उत्तर द्या किंवा स्वता गणवेश घालुन एक सैनिक म्हणुन एकदाच काश्मिरला जाउन या म्हणजे मग समजेल घरी बसुन मिपावर कळफलक बडवुन जिल्ब्या टाकणे व तिकडे काश्मिरात एक सैनिक म्हणुन रस्त्यावर ठामपणे उभे राहुन आन्दोलकांचे दगड खाणे यातला फरक.
... मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने, स्वताः गाडी चालवत बऱ्याच ठिकाणी फिरलोय, स्थानिकांशी अजूनही संपर्कात आहे. तसेच इतर अभ्यासाच्या आधारावर मूळ पोस्ट लिहिल्येय.
म्हणजे काश्मीरचा प्रश्ण आपल्याला जितका समजला तितका तो इतर कुणालाच समजला नाही अस तुमचा गैरसमज झालेला दिसतोय. 'मी स्वतः काश्मिरात ३ वेळा स्वताःच्या गाडीने जाउन आलोय' म्हणजे तो केवळ मलाच समजला असा तुमचा समज झालेला दिसतोय. जे इतर तिकडे आपल्या गाड्या घेउन जात नाहीत त्यांना त्यातले काहीच कळत नाही, समजला तो केवल मला आणि मलाच असा तुमचा एकुण अभिनिवेश दिसतोय ह्या वाक्यातुन. आता भारत सरकारने काश्मिरचा तुमचे मार्गदर्शन घेउन सोडवावा असे तुम्हाला सुचवायचे आहे का ??
फक्त एकच सांगा ही जिलबी तुम्ही कोणत्या उद्देशाने / हेतुने इथे टाकलीत ?? ह्या लेखातुन तुम्हाला कोणाबद्दल नेमके काय सुचवायचे आहे ??
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/25/2016 - 16:20
नवीन
एवढा प्रचंड काळ कोणत्याही प्रदेशात 'आस्फा'सारखे कायदे लागू असणं अमानुष आणि असंवेदनशील वाटतं. हा तुमचा मुद्दा आधीच पटलेला आहे, पण लेख आवडला असं म्हणवत नाही; मतं काय हे नीट न समजल्यामुळे मतांशी सहमती असंही म्हणवत नाही.
अशासारख्या लेखनात जर उग्र भाषा वापरायची असेल तर त्यात विनोदी तिरकस-खवचटपणा असावा किंवा सरळ, साध्या भाषेत लिहावं. इतरांची उद्धृतं देताना तसा स्पष्ट उल्लेख हवा. अन्यथा अजित डोवालांना जेम्स बाँड म्हणण्याबद्दल जसे गैरसमज झालेले आहेत तसे होतात.
पुलेशु
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sat, 07/23/2016 - 14:32
नवीन
अन हो, एक राहिलेले म्हणजे,
एखादा मनुष्य आर्मीची बाजू घेतोय म्हणजे तो संघिष्ट असला पाहिजे असा तुमचा ग्रह असल्यास तो तात्काळ डोक्यातून काढून टाकावा आपण, ही नम्र विनंती, आर्मी कोणाचीच नसते पण सगळ्यांसाठी असते, जमल्यास एखादी चक्कर एखाद्या बटालियनच्या एमएमजी स्थल उर्फ मंदिर मस्जिद गुरुद्वारा स्थलला नक्की द्या!!
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/25/2016 - 16:25
नवीन
सैन्य कोणाचंही (राजकीय विचारधारेचं) नसतं, नसावं हे मान्यच. तसे सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 07/25/2016 - 18:21
नवीन
जसं की...?? म्हणजे सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर हे संघाचेच झाले हे केव्हापासून मानायला लागलात आपण? तसेच राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून पळवल्या तेही सांगावे.
काँग्रेसने गांधीघराण्याचा उदो उदो करण्यापासून थोडी सवड काढली असती तर उपरोल्लिखित किमान दोन महापुरुषांना असं ह्याचं त्याचं झाले म्हणायची सोय राहिली असती का? किमानपक्षी भारतीय जनता ह्यावेळी असे काही मानते का?
डाव्यांचे राष्ट्रप्रेम जगजाहिर आहे. डाव्यांकडून राष्ट्रवाद पळवला असे म्हणायचे असेल तर तो त्यांच्याकडे केव्हा होता हे ही कळावे?
मी बालक अज्ञानी आहे, माझी समज-आकलन अर्थातच तुमच्या सारख्या दिग्गजांपेक्षा फारच कमी आहे. त्यास्तव तुमच्या विधानांचे स्पष्टीकरण मागण्याची जुर्रत करत आहे. उत्तरे मिळतील अशी अपेक्षा करतो. कारण तमाम भारतीयांचे आदराचे, श्रद्धेचे, राष्ट्राभिमानाचे प्रतिक जर 'ह्याचे झाले त्याचे झाले' असे आपण बोलत असाल तर मजसारख्या सामान्य भारतीयाचे मन विचलित होते. ते होऊ नये, बुद्धीभेदाचे डावपेच दोन्ही बाजूंकडून अजिबात सफल होऊ नयेत असे मजसारख्याला वाटते, तस्मात हा प्रतिसादप्रपंच...
- Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 07/25/2016 - 23:17
नवीन
अय्या, मी पण हेच लिहायला आले होते!
असो.
१. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टी संघाने कुठून तरी पळवल्या => म्हणजे त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत,
२. काँग्रेसने सरदार पटेल, भगतसिंग, सावरकर ह्यांच्यापैकी कोणीतरी दोन लोकांची व्यक्तीपूजा करायला हवी होती
३. संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच
असं काही तुम्ही समजता असं मला समजलं. असं समजत नसाल तर माझ्या आकलनातली चूक.
मी आळशी बाई आहे आणि रिअॅक्शनरी लिहिण्याचा हल्ली खूप कंटाळा येतो. तुमचे विचार समजले. उत्तराबद्दल आभार.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Tue, 07/26/2016 - 12:43
नवीन
सो च क्युट
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 07/26/2016 - 15:02
नवीन
मला काय समजलं नाय समजलं किंवा तुम्ही आळशी आहात किंवा तुम्हाला कंटाळा येतो हा विषय तुर्तास बाजूला असू देत.
निम्नलिखित आपलीच विधाने आहेत.
सावरकर, भगतसिंग, सरदार पटेल हे लोकही संघाचे नव्हते, पण मरणोपरान्त त्यांचं संघीकरण झालेलं आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम ह्या गोष्टीही संघ (आणि संघाच्या भावंडांनी) पळवायला आणि त्यावर जणू आपलाच अधिकार आहे असं म्हणायला सुरुवात केलेली आहे.
हे आपण कोणत्या आधारावर, संदर्भासहित लिहिले आहे तेवढं फक्त विचारलंय मी. तुमच्यासारख्या दिग्गजांनी असले विचार ठेवले म्हणजे नक्की काहीतरी आधार असेलच अशी मज भाबड्या पामराची समजूत होती. अन्यथा तत्सम पिंका टाकायला दोन रुपयाचा मावाही खायला लागत नाही असे निरिक्षण आहे.
बाकी 'संघिष्ठ नाहीत म्हणजे डावेच' असलं काहीही मी तरी म्हटलेलं नाही. तसं असतं तर तुमच्या प्रतिसादाला फाट्यावर मारुन पुढे गेलो असतो. पण डावेही नाही किंवा संघिष्ठही नाही म्हणून काहीही लिहायचे व त्यावर कोणी स्पष्टीकरण मागितले तर आळसाचे किंवा कंटाळ्याचे सोयिस्कर पळपुटेपणाचे कारण द्यायचे हे काही पटलं नाही, बघा आता कसं ते..?
- Log in or register to post comments
ज
जयंत कुलकर्णी
Tue, 07/26/2016 - 12:34
नवीन
यातील खरी गंमत ही आहे -
सैन्य कुठल्याही विचारधारेच नसाव असे तुम्ही म्हणता पण त्याच वेळी सैनिकांना मतदानाचा हक्क असतो हे विसरता. सैनिक शेवटी माणूसच असतो आणि त्यालाही राजकीय विचारधारा असते. हे खरे मानले तर सैन्य कोणत्याही विचारधारेचे नसते असे म्हणणे जरा धाडसाचे होईल. हां सध्या बर्यापैकी समतोल आहे असे म्हणता येईल पण तो तसाच राहील असे मानणे भाबडेपणा होईल.... :-)
राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम या भावना कोणीही भारतीयांनी पळवाव्यात व त्यावर अधिकार सांगावा या मताचा मी आहे.... :-)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »