Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कसे करावे?

अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 10:11
🗣 143 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अ‍ॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अ‍ॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते. ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे. ................ आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्‍या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे. तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्‍याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे? काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अ‍ॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्‍या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे? . काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
सल्ला
मदत हवी आहे

प्रतिक्रिया द्या
32343 वाचन

💬 प्रतिसाद (143)
क
कानडा Tue, 07/26/2016 - 10:26 नवीन
महत्त्वाचा प्रश्न आहे. मला एक HDFC Life चे "Little book of legacy" म्हणुन डॉक्युमेंट असते ते माहित आहे. PDF फाईल असते. त्यात आपली माहिती जमा करून ठेऊ शकतो. प्रिंट घेऊ शकतो. अगदी तिच फाईल नाही पण त्यासारखी माहिती तयार करुन ठेऊ शकतो. http://www.hdfclife.com/campaigns/HDFCLife-Little-Book-of-Legacy.pdf --- कानडा
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 10:31 नवीन
ओह्ह्ह. धन्यवाद कानडासाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
र
राजाभाउ Tue, 07/26/2016 - 10:38 नवीन
हे खरच चांगल आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
र
रंगासेठ Tue, 07/26/2016 - 12:27 नवीन
कानडा भाउ, अगदी सहमत. HDFC Life चे "Little book of legacy"अतिशय उपयुक्त आहे. मी त्याच धर्तीवर माहिती एकत्र केली आहे आणि त्यात थोडेफार बदल केलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडा
म
मोदक Tue, 07/26/2016 - 10:28 नवीन
१) मृत्यूपत्र कधीही करता येते. उलट मी सुचवेन आत्ता केलेस तरी चालेल. त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या आणि शक्यतो एका डॉक्टरची (तुझी तपासणी केली आहे आणि सगळे नीट आहे अशा उल्लेखासह) सही आणि शिक्का. २) तुझा एक वेगळा मेल आयडी काढून ठेव त्या मेलवर शक्य ते सगळे डिटेल्स सुटसुटीतपणे पाठव / साठवून ठेव. ३) व्यावसायीक व्यवहार शक्य असेल तर गुगल शीटवर नेता येतात का बघ आणि तुझ्या अत्यंत विश्वासातल्या व्यक्तीला कधीही आवश्यकता भासल्यास या शीटचा अ‍ॅक्सेस मिळेल असे बघ. म्हणजे तुझे नेहमीचे मेल अकाऊंट आणि वरती उल्लेखलेला वेगळा मेल आयडी यांमध्ये ही शीट अ‍ॅक्सेसेबल असेल आणि गरज भासल्यास वरचा मेल आयडी अ‍ॅक्सेसणारी व्यक्ती ती शीट मिळवू शकेल. बाकी प्रश्नांबददल पास.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 10:32 नवीन
ओक्के मोदक. हे करण्यासारखे आहे आणी सुरक्षित वाटतेय. थॅन्क्स
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ग
गवि Tue, 07/26/2016 - 10:33 नवीन
२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे. अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/26/2016 - 10:39 नवीन
२. आणि ३. बद्दल. कितीही विश्वासू वाटणार्या आणि मोठ्या का होईना, पण ऑनलाईन थर्ड पार्टी कंपनीकडे अशी माहिती पाठवून तिथे सेव्ह करण्याबद्दल तीव्र शंका आहे. मुद्दा बरोबर आहे पण बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे. अशा गोष्टी दोनतीन बॅकपसहित विश्वासू व्यक्तीच्या ताब्यात पेनड्राईव्ह, हार्डकॉपी, मेमरीकार्ड वगैरे फिजिकल रुपात दिली तर जास्त बरं नाही का? पॉलिसी बदलली, देणेकर्‍यांची रक्कम बदलली अशा प्रत्येकवेळी बॅकप अपडेट करणे त्रासदायक आहे असे वाटते. ************************* *हा दोन पाच कोटींचा हिशेब "पुण्यामुंबईतील एक घर + टर्म इन्शुअरन्स" असा काढला आहे. अभ्याकडे किती पैसे पडून आहेत मला माहिती नाही. :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 10:42 नवीन
हम्म. हार्ड ड्राइव्हवर अपडेट करीत राहणे जरा अवघडच आहे. नोकरीत नियमितता तर असते. व्यवसायात तेही नाही. . आणि मला हाणू नकात मोदकराव. कोटी सोडा, आकडा लाखात गेला तरी लै झाले. तोही पडून नसतो कधीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/26/2016 - 10:45 नवीन
हा हा :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गवि Tue, 07/26/2016 - 10:55 नवीन
बिलीयन्स मध्ये उलाढाल करणार्‍या कंपन्यांचा डेटा गुगलकडे पडला असताना जास्तीतजास्त दोन पाच कोटींमध्ये व्यवहार* जावू शकणार्‍या आपल्यासारख्यांच्या नादाला गुगल कशाला लागेल असा विचार आहे.
गूगल नाहीच चोरणार. फक्त डेटालीक्स होतात तेव्हा घाऊकच होतात. असे चोरटे मोठ्या संख्येने पण प्रत्येकाची तुलनेत किरकोळ माहिती अशासाठीही चोरतात. आणि अशावेळी गूगल फुकट वापरकर्त्यांना "अर्र सॉरी"खेरीज काही देणं लागत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 07/26/2016 - 11:00 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 07/26/2016 - 10:29 नवीन
५ रात्री तसंच स्वप्न पडतंय असं आपल्याला अनेकदा वाटतं पण खरंतर एकाच लेटेस्ट रात्री पडलेली काही स्वप्नं बॅकवर्ड मेमरीतून रिपीट होऊन आल्यासारखी भासतात. जनरली तेच स्वप्न खरोखर पुन्हा परत पडण्याची शक्यता कमी असते. जर एके रात्री पडलं आणि त्या सकाळी उठून तपशील लिहून ठेवला आणि मग परत पुढच्या एखाद्या रात्री रिपीट झालं तर खात्री करता येते. अर्थात हे अवांतर असलं तरी रोचक वाटतं म्हणून लिहीलं. अविश्वसनीय वाटतं पण बर्याचदा तसंच असतं.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 10:36 नवीन
गविराज, अ‍ॅक्चुअली स्वप्नांच्या बाबतीत मी दुर्दैवीच. माझी झोप मुडद्यासारखी. वर्षातून एखाद दोन वेळी काहीतरी पाहिल्यासारखे वाटते. बाकी नाहीच. मात्र कोण जाणे ह्या स्वरुपाचे (जवळपास) स्वप्न दोन महिन्यापूर्वी पडलेले आणि मलाही पूर्ण आठवत होते. नंतर मात्र नाही. आता सलग हे होतंय. मला लिहुन ठेवावसं वाटलं नाही पण सलग स्वप्नातले साम्य आणी क्रम हा अगदी सेम होता आणि इव्हन त्याचा पडायचा कालावधीसुध्दा. कारण प्रत्येक वेळी मी जागा झालो त्यावेळेस साधारण ६ ते ६.३० वाजलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
राजाभाउ Tue, 07/26/2016 - 10:34 नवीन
च्यायला काय वाट्टेल ते विचार करायलयस अभ्या. अस काय होत नसतय रे आणि हेल्मेट घालतोस की तु तर काळजी करु नये. (अजुन बरीच वर्षे तुला इथ बॅनर, सजावटी वगैरे करायच्या आहेत). पुढचा विषय मात्र महत्वाचा आहे म्हणजे त्यासाठी अपघाती म्रुत्यु होण्याची गरज नाही. आपले आर्थीक व्यवहार, पॉलिस्या, गुंतवणूकी या बाबत आपल्या शिवय घरातील एका तरी माणसाला माहीत आसणे आवश्यक आहे. म्हणजे आत्ता लगेच सांगुन नाही ठेवले तरी सगळे एकत्र लिहुन फाइल वगैरे बनवून ठेवली पाहीजे. (अशी फाइल बनवावी असे अनेक वर्षे मी ठरवत आहे). जाणकार लोकांच्या प्रतिक्रियांच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 10:38 नवीन
करायचे तर भरपूर आहे राजाभाऊ, पण..... असो.. फाईल करायची आणी घरी वडीलांकडे द्यायची आयडीया सध्या करणेबल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ
प
पद्मावति Tue, 07/26/2016 - 10:42 नवीन
विल करायला वयाचं काही बंधन नाही. विल खरंतर करूनच ठेवावं. एखाद्या चांगल्या वकीलाकडे सल्ला मागता येईल. ट्रस्टी म्हणून एखाद्या विश्वासू मित्र/ नातेवाईकाचे नाव देता येते.
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 07/26/2016 - 10:48 नवीन
लोक बॅकअप बद्दल उपाय सुचवत आहेतच, स्वप्नाचं म्हणशील तर एखादवेळेस रुपकात्मक असेल. तुला जरी तिथे तू दिसत असलास तरी दुसर्‍या कोण्या व्यक्तीच्या बाबतीत होणार असलेली गोष्ट तुला दिसत असेल. फार विचार नको करु!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 07/26/2016 - 10:58 नवीन
अच्छा म्हणजे अस कनेक्शन आहे तर... अभ्यासेठ, विल बिल काय करायचं ते करून ठेवा. पण, स्वप्नाचं काही खरं नसतं. आमच्या काळात माझ्या स्वप्नात माधुरी दिक्षीत रोज यायची पण प्रत्यक्षात आयुष्यात त्याचा काही उपयोग झाला नाही. बाकी, चर्चा विषय आणि प्रतिसाद माहितीपूर्ण होत आहेत. धन्यवाद. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 07/26/2016 - 11:22 नवीन
प्राडा ,माझ्याही स्वप्नात माधुरी दीक्षित यायची. ती मला म्हणायची मी तुझ्याशी लग्न करायचे वचन देते. तिने ते काहीसे पाळले राव ! एका दिक्षित आडनावाच्या मुलीशी माझे लग्न झाले. तेवढंच ...... काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/26/2016 - 12:16 नवीन
माझ्या आत्ता लक्षात येतय की माधुरीने आपल्या सगळ्यांनाच गंडवलय. तिने मला पण लग्नाचे वचन दिले होते. जाउदे.... ह्या जन्मी नाही जमले.... पण मी काही अजून आशा सोडली नाही.... पुढच्या जन्मी परत प्रयत्न करेनच. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 12:22 नवीन
तुम्ही आशा सोडली नाहीतर माधुरी कशी येईल? सोडा विंटेजांचा नाद, आलिया, श्रद्धा, सोनम पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/26/2016 - 12:30 नवीन
अबे हट, जुने ते सोनेच असते. आपला पहिला क्रश मधुबाला, नंतर नुतन, आणि मग माधुरी दिक्षीत. माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अस्वस्थामा Tue, 07/26/2016 - 17:07 नवीन
माधुरी नंतर कोणतीच हिरविन आवडली नाही.
म्हंजे तुमचं वय झालं म्हणायचं त्यानंतर.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
उ
उडन खटोला Tue, 07/26/2016 - 17:35 नवीन
>>>>नुतन चंदन सा बदन की छोड दो आंचल? वा वा! तेव्हा निरागस होतात बहुतेक ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
ए
एस Tue, 07/26/2016 - 18:11 नवीन
आजपासून पैजारबुवांना 'जानी दुष्मन' हा किताब देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु Wed, 07/27/2016 - 05:02 नवीन
तर दोस्त म्हणणार बाबा , नूतन साठी तरी रांगेत घेतलं त्यांनी हे काय कमी बाकी दोन्हींबद्दल नाही पण साधना (नैनोंमे) आणि नंदा (लिखा है तेरी) खास आहेत आणि राहतील्ही. पैजारबुवांचे धन्यवाद नूसानं नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
व
वपाडाव Wed, 07/27/2016 - 13:13 नवीन
पहिली, दुसरी अन आखरी... माधुरीच...!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
राही Tue, 07/26/2016 - 10:59 नवीन
असे मानतात की स्वप्नात एखादी घटना ज्या व्यक्तीच्या संदर्भात घडलेली दिसते ती सोडून अन्य व्यक्तीच्या बाबतीत ती घडू शकते. स्वप्नात पाहिलेल्या व्यक्तीस धोका नसतो. अर्थात धोका असो वा नसो, आर्थिक बाबतीत पूर्वनियोजन हे कधीही महत्त्वाचेच.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 07/26/2016 - 11:08 नवीन
एकूणच् असा विचार आपण सर्वांनी करून ठेवणे हिताचे आहेच..स्वप्ने पडोत किंवा न पडोत. सर्व तयारी करून मग कांहीच होणार नाही या आत्मविश्वासाने रहावे. बाकी आपण मिळवलेली माणसे हीच कमाई. किती सांभाळू म्हणले तरी पैशाची कांही खात्री नसते. ( हे आपलं माझं मत.) या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल. तज्ञ सांगू शकतील, आणि समुपदेशनाने/ औषधाने त्याची चिंता/ भीती (असेलच तर) काढून टाकता येईल. वर सांगितलेल्या कुठल्यातरी प्रकारे डेटा साठवून दोन जवळच्या व्यक्तिन्ना त्याबद्दल सांगून ठेवणे पुरेसे आहे. ..आणि हो, तुला शंभर वर्षांहून जास्त आयुष्य मिळण्यासाठी शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 11:16 नवीन
या स्वप्नाचे मूळ या लेखात म्हटल्याप्रमाणे तुला पूर्वी झालेल्या अपघातामधे असू शकेल.
हे बरोबर वाटतेय. पण तो अपघात वॉल्व्होचा होता. बाईकवर आजअखेर मला बरेच छोटेमोठे अपघात झालेले आहेत. पण मोठ्या अपघातानंतर माझे ड्रायव्हिंग टोटलच बदलले. बाईक चालवायचा अ‍ॅटिट्युडच बदलला. भीती किंवा धसका म्हणून नाही तर स्वतः प्रयत्नपूर्वक बदलले. शुभेच्छांबद्दल धन्यवाद आहेतच सार्‍यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
क
कपिलमुनी Tue, 07/26/2016 - 11:13 नवीन
सर्व आर्थिक माहिती डायरी मधे नोंदवावी , ती डायरी अपडेट करत रहावी. घरी आर्थिक पारदर्शकता असावी. म्हणजे देण्या- घेण्याचे व्यवहार , कर्जे , गुंतवणूक, पॉलिसीज याची माहिती पत्नी , आई - वडील यांना असावी. अचानक गचकल्यास काय करावे हे एका जवळच्या मित्रास , भावास माहिती असावे. नॉमिनेशन : सर्व प्रॉपर्टी , बँक , पॉलिसी यांना नॉमिनेशन असावे. नॉमिनेशन असतील तर बँकचे पासवर्डस ची गरज नाही , मॅन्युअली डिटेल्स बघता येतात. याची फाईल बनवून घरी किंवा बँक लॉकर मधे ठेवावी. सर्व कागदपत्रे स्कॅन करून एका ठिकाणी अपलोड करावीत . म्हणजे गहाळ होण्याचा प्रश्न येत नाही. देण्या- घेण्याचे व्यवहार याबद्दल लोक १००% फसवतात याचा वडिलांच्या निधनानंतर अनुभव आहे.एकाही महाभागाने उधार घेतलेले पैसे स्वतःहून आणून दिले नव्हते . डायरी आणि चेकने व्यवहार या सवयीमुळे ते रीकव्हर करता आले============================================================== स्वप्ने रीपीट का होतात? त्याचे काही अर्थ असतात का ? याबद्दल डॉक्टर अधिक सांगू शकतील. फारच स्वप्ने पडली तर म्हातार्‍या संन्यासाला सोबतीला बोलाव :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Tue, 07/26/2016 - 11:39 नवीन
ते स्वप्ना ही एक साउथ इन्डीयन नटी आहे पण..... जाउ दे राव ...आपण ड्रीम्स विषयी बोलू. मी स्वप्नांच्या बाबतीत एकदम भाग्यवान माणूस आहे. प्रत्यक्षातील काश्मीर पेक्षा रम्य काश्मीर मी स्वप्नात पाहिले आहे. स्वप्नात सचिन तेंडूलकर , राज ठाकरे, मोहन जोशी यांच्या शी गप्पा ठोकल्या आहेत. मदनमोहनची गीते स्वप्नात ऐकताना बॅक्ड्रोप होता कसबा पेठेतील एक जुन्या वाड्याचा, ओपी नय्यर ची एकसे एक गाणी अ‍ॅग्रीकल्चर कॉलेजच्च्या शेतात ऐकली स्वप्नात. आमच्या फॅक्टरीतील मार्केटिंग जी एम व सर्व्हीस जी एम चे कडाक्याचे भांडण पाहिले स्वप्नात. धोमचे चे धरण फुटले पण पाणी माझ्या पायाला लागताच ओसरू लागले हे सारे स्वप्नात. मला ८० टक्के रात्रीत स्वप्न पडते. पुन्हा नवी पटकथा घेऊन तीच तीच थीम स्वप्नात येते. हे माझ्या बाबतीत अनेक वेळा घडले आहे. उदा धोम धरणाच्या पाण्याच्या लोंढ्याची ती कथा सारोळा पूल पुणे सातारा रोड व अमृतांजन पाटी खण्डाळा इथेही घडली आहे. यावरून एक दिसते ते असे की मनी वसे ते स्वप्नी दिसे हे खरेच आहे. मला पोहायला येत नाही. प्रवासाची जबरा आवड आहे. गप्पा छाटण्याचा नाद आहे. स्वभाव संघर्ष करणारा आहे. वाई शिरवळ मावळ या परिसरात मी वाढलो आहे. या गोष्टी वरील उदाहरणात दिसून येतील. आता अशी काही संगति तुझ्या बाबतीत लागते का ते पहा मित्रा.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 12:32 नवीन
रोजचे तेच लाइफ आणि तोच विचार याने असे होत असेल असे माझ्या मित्राचे मत आहे. अशी संगती लावायला हरकत नाही चौराकाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
उ
उडन खटोला Tue, 07/26/2016 - 11:42 नवीन
मेलास की कळव. मी पण भटकतोय, कट्टा करु.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 12:30 नवीन
हे भारीय. टाकेन व्यनि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
स
स्पा Tue, 07/26/2016 - 11:44 नवीन
रोचक वाटतंय मलाही नवीन घरी शिफ्ट झाल्यापासून अलार्म लावल्यासारखी रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते, आधीच्या घरी असे कधीच व्हायचे नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/26/2016 - 11:57 नवीन
आनंदोल्हासाने ब्राम्हमुहुर्तावर जाग येत असावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सूड Tue, 07/26/2016 - 12:32 नवीन
रात्री २ ते २:३० च्या दरम्यान जाग येतेच येते,
काही स्वप्न वैगरे पडलेलं असतं का त्याआधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
अ
अभ्या.. Tue, 07/26/2016 - 12:37 नवीन
ते पंच पंच उषःकाले म्हणजे घड्याळात अ‍ॅक्चुअली कधी? स्पावड्याला स्वप्ने लेअरमध्ये पडतात. ;) बाकी धसका स्वप्ने हा इंटरेस्टिंग सबजेक्ट आहे सूडक्या. मला दोन तीनदा आहे आण्भव. एकदम भिंतीच्या कडेवरुन पडतोय किंवा टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ट
टवाळ कार्टा Tue, 07/26/2016 - 16:39 नवीन
टोटल बॅलन्स्च गेलाय असे धसक्याने जागे होणे
हे बर्याचदा अनुभवले आहे...पण आपोआप थांबले काही वर्षांनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कंजूस Tue, 07/26/2016 - 11:50 नवीन
इन्शाला/माशाल्ला स्वप्नाने (रात्री अथवा झोपेतली) तुला जागे केलंय.धागा काढून पुचकण्याअगोदर सर्व विचारी मिपाकरांना कामाला लावलं आहेस याबद्दल तुला आणि स्वप्नाला धन्यवाद.तुझं काहीही होवो पण इतरांचे भले खचितच करतो आहेस.धन्यवाद. तुला लवकरच भेटेन.
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Tue, 07/26/2016 - 12:38 नवीन
+१ सगळ्यांना जागे केले असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 07/26/2016 - 12:04 नवीन
अभ्या तुला उदंड आयुष्य लाभो. माझ्या बाबतीत मी माझ्या बायकोला आणि आई वडिलांना माझ्या गुंतवणुकी बद्दल, येणे आणि देण्याबद्दल सर्वकाही सांगितलेले आहे. त्यात काही बदल झाला तर तो मी लगेच तिघांना अपडेट करतो. पण वर सांगितलेली लिहून ठेवण्याची कल्पना पण चांगली आहे. म्हणजे समजा माझ्या पश्र्चात आई वडिल आणि बायको यांच्यात काही गैरसमज झाले तर ते दुर होण्यास त्या मुळे मदत होईल. तसाही प्रत्येक ठिकाणी नॉमिनी नेमलाच आहे शिवाय घर देखिल दोघांच्या नावावर आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
संग्राम Tue, 07/26/2016 - 12:22 नवीन
https://support.google.com/accounts/answer/3036546?hl=en
  • Log in or register to post comments
र
राजाभाउ Tue, 07/26/2016 - 12:41 नवीन
माझ्या मते हे भारी आहे. ह्याचा उपयोग होउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संग्राम
स
सिरुसेरि Tue, 07/26/2016 - 13:16 नवीन
एखादा विश्वासु / खात्रीचा / माहितीतला / भरवशाचा फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर नेमा . आणी तुमची सगळी आर्थिक गुंतवणुक त्याच्याकडच्या फोलिओमध्ये हस्तांतरीत करा . व तुमच्या कुटुंबियांना त्याची माहिती द्या . फायनानशिअल कंस्ल्टंट / अ‍ॅडवायसर - उदाहरणार्थ - रिलायन्स मनी , मोतीलाल ओस्वाल
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी Tue, 07/26/2016 - 13:22 नवीन
सरल कैलसात या.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Tue, 07/26/2016 - 13:29 नवीन
प्रकरण गंभीर हाय!! सतत एकच स्वप्न पडतयं म्हटल्यावं कायतरी काळंबेरं हाय रे!!! एक काम कर म्हसोबाला कोंबडं काप,सगळं ठीक होईल बघ!!!
  • Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा Tue, 07/26/2016 - 15:44 नवीन
सहमत आहे, पण कोंबडं अमावस्येला कापायचं असतं!! तरच स्वप्नबाधा कमी होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा