कसे करावे?
नमस्कार मंडळी,
थोडी मदत हवी आहे.
...............
म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते.
ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे.
................
आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे.
तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे?
काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे?
.
काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन.
आगाऊ धन्यवाद.
💬 प्रतिसाद
(143)
स
सुबोध खरे
Tue, 07/26/2016 - 16:25
नवीन
स्वप्नाला काहीही अर्थ नसतो. उगाच त्यामुळे आपण मनात सुप्त भीती बाळगणे सोडून द्या.
१९८२ साली गणित सोडलं तरीही आजतागायत मला गणिताची परीक्षा दोन दिवसांनी आहे आणि मला पोर्शनहि माहित नाही अशी स्वप्ने पडतात. आणि हेच स्वप्न मला गेली दोन दशके मधून मधून पडत आली आहेत. याचे काय कारण आहे?
तसे पाहायला गेलो तर बारावी पर्यंत मला गणितात विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction) मिळते आले आहे. टि म वि च्या चार परीक्षाहि विशेष योग्यतेने प्रथम श्रेणी(distinction)मध्येच पास झालो होतो. तेव्हा गणिताबद्दलची सुप्त भीती मनात असेल हाही तर्क फोल ठरतो.
बाकी आपले इच्छापत्र(will) करून ठेवणे आवश्यक आहे. आपले सर्व व्यवहार पारदर्शक असावेत. लग्नापूर्वी माझ्या सर्व गुंतवणुकीत वडिलांना वारसदार ठेवले होते लग्नानंतर बायको आणि आता बायको ५० % आणि दोन्ही मुले २५ % प्रत्येकी. बँकेतील सर्वच्या सर्व खाती, घरे बायकोबरोबर एकत्र नावाने आहेत. त्यांची पूर्ण माहिती बायको आणि दोन्ही मुलांना आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 07/26/2016 - 16:27
नवीन
फक्त आयुर्विमा माझ्या "एकट्याचा" काढलेला आहे. ( त्यात वारसदार म्हणून बायको ५०% आणि मुले २५ % प्रत्येकी)
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 07/27/2016 - 05:30
नवीन
खरे साहेब एवढ्या मोकळेपणामुळे मला आता वाटायला लागलंय की डायबेटीस ची ट्रीटमेम्ट व तपासणी तुमच्याकडूनच घ्यावी.
ते बाकीचे एम्डी नुसते मुके असतात. ( कदाचित डिसपेन्सरी मधले खरे ही तसेच असू शकतील मजबूरी हाय... एका तासात किमान १५ पेशंट तरी आटपायला हवे. )
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/27/2016 - 06:10
नवीन
चौरा साहेब
मी एक तासातच काय दिवसभरातही १५ पेशंट पाहत नाही.
मला भरपूर वेळ रिकामा असतो.
- Log in or register to post comments
श
शिद
Fri, 07/29/2016 - 17:58
नवीन
सेम पिंच. :)
२००३ ला इंजिनीअरींग पासआऊट होवूनसुद्धा मलापण अशीच स्वप्नं पडतात. मजेशीर गोष्ट म्हणजे विषयपण सारखे बदलत असतात.
- Log in or register to post comments
श
शुभां म.
Tue, 07/26/2016 - 14:56
नवीन
टॅक्स सेविंगसाठी म्हणून खुप साऱ्या इन्व्हटमेंट्स केल्या आहेत त्या मुळे हा प्रश्न खूप दिवसापासून भेडसावत आहे.
एका जवळच्या नातेवाईकांच्या अकस्मात मृत्यू मळे त्यांच्या कमी शिक्षण असणाऱ्या बायकोला किती समस्यांना त्यांना सामोरी जावा लागला हे खूप जवळून पहिले, वारसदार मानून बायकोचेच नाव होते पण सर्व कागतपत्रे वेळीच न मिळाल्याने एवढी इन्व्हेस्टमेंट करूनही मिळवा तसा परतावा त्यांना मिळाला नाही.(आणि जो मिळाला तो बाकीच्या नातेवाईकांनी वाटून खाल्ला.)
घोर कलयुग आहे त्या मुळे आताच आपल्या वारसदारांना प्रत्येक इन्व्हटमेंट्सची कल्पना आणि जमेल तेवढे कागत पात्रांच्या प्रति देऊन ठेवण्यातच आपले भले आहे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Tue, 07/26/2016 - 14:57
नवीन
होतं असं कधीकधी अभ्या , जास्त लक्ष द्यायचे नाही . काळाच्यापटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंव्वा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !
असो.
बाकी मी काय म्हणतो अभ्या - एकदा सातार्यात ये , आपण गडावर जाऊन येवु !
आहे तितुकें देवाचें । ऐसें वर्तणें निश्चयाचें ।
मूळ तुटें उद्वेगाचें । येणें रीतीं ॥ २८ ॥
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 07/26/2016 - 15:17
नवीन
उपयुक्त प्रतिसाद येताहेत. अजून माहितीच्या प्रतीक्षेत.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Tue, 07/26/2016 - 15:28
नवीन
अभ्यासेठ ,बिल्कुल घाबरु नका ,अशी स्वप्न वगैरे प्रत्यक्षात येत नसतात.स्वप्न हा आपल्याच मनात दडलेल्या गोष्टीचा अविष्कार आहे.बाकी आईवडीलांना आपले अकाउंटची माहीती ,पासवर्डस सांगण्यात गैर काही नाही.मृत्युपत्रही कधीही करता येते.त्याबाबतीत मात्र वकीलांचा सल्ला घ्या.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 17:59
नवीन
येस बॉस.
तुम्ही एवढे विश्वासानं सांगताहात, मैं नई डरनेवाला.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 07/26/2016 - 16:03
नवीन
खालील गोष्टी करु शकता:
१. दर ३ महिन्यांनी सगळ्या गुंतवणुकींचा आणि पासवर्ड्स चा तपशील असणारा कागद, तारीख घालुन, बंद लिफाफ्यात घरच्यांना द्यायचा. त्यात काय आहे याची माहिती द्यायची. दुसरा लिफाफा दिल्यानंतर पहिला फाडुन नाही टाकायचा फक्त तो वेगळ्या ठिकाणी ठेउन द्यायचा. याचे कारण तुमचे बदलते पासवर्डस. असे ३ -४ लिफाफे जमल्यावर तुमच्या घरच्यांकडे तुमचे आलटुन पालटुन वापरायचे सगळे पासवर्ड आपोआप मिळतील.
तळटीपः लग्न झालेले असल्यास आधी पासवर्ड्स बदला. असेही जुने पासवर्डस एव्हाना कडेवर १ - २ बबडु - छबडु बाळगायला लागले असतील. कधी भेटलात तर बबडु - छबडु " मामा " म्हणुन तुमच्या गळ्यातही पडतील. त्यामुळे ते पासवर्ड्स बायकोच्या ताब्यात देण्याची चुक नका करु. बायको का प्राणी प्रचंड हुषार असतो तस्मात कोडवर्ड मध्ये लिहिलेले तुमचे जुने पासवरड्स " त " वरुन "ताकभात" करुन ओळखले जातील.
२. सर्व बँक अकाउंट आणि विमा पॉलिसीज मध्य नॉमिनी लावुन घ्या.
३. सर्व बँकांमध्ये / इतर आस्थापनांमध्ये तुम्ही तुमच्या नॉमिनेशन बद्दल काय तरतुदी केल्या आहेत आणि तुमच्यानंतर ते पैसे तुमच्या वारसांना / नातेवाईकांना मिळण्यासाठी त्यांना काय करावे लागेल हे लिहुन काढा. शक्यतो ते सर्व फोर्म घरी आणुन ठेवा.
४. मृत्युपत्र कधीही करता येते. तो फार किचकट प्रकारही नसतो. एखादा वकील मित्र गाठा आणी एक साक्षीदार घ्या. मृत्युपत्रात खाजगी माहिती / पासवर्ड देउन नयेत.
५. कर्जे घेतली / दिली असतील तर जी परस्पर सेट ऑफ होतील अशी काही असतील तर लिहुन ठेवा.
६. सर्व कागदपत्रे (गाडी, घर, खाजगी इत्यादी) डिजीटल स्वरुपात घेउन एका पेन ड्राइव्ह वर घरच्यांकडे ठेउन द्या.
७. सर्व किल्ल्यांचा एक जुडगा घरच्यांकडे देउन ठेवा. लॉकर असेल तर त्याचाही यात समावेश असु द्यात.
८. सर्व महत्वाचे फोन नंबर्स एका ठिकाणी लिहुन तो कागद घरच्यांकडे देउन ठेवा.
९. टर्म इन्स्युरन्स काढुन ठेवा. लग्न झालेले नसल्यास स्वतःच्या वार्षिक प्राप्तीच्या किमान ५ पट आणि झालेले असल्यास १० पट असणे उत्तम.
आणी सर्वात महत्वाचे म्हणजे:
१०. मानसोपचारतज्ञांकडे जाउन औषधे घ्या. मी हे उपरोधाने, कुत्स्तितपणे अथवा चेष्टेने म्हणत नसुन गंभीरपणे म्हणतो आहे. एकच स्वप्न सलग पाच दिवस पडणे, त्यातही ते दु:खद असणे आणी त्याची वेळ ठरलेली असणे हे कुठेतारी तुमच्या मानसिक तणावाचे लक्षण आहे. याच्यावर वेळेवर औषधोपचार होणे फार गरजेचे आहे. स्पष्ट बोलतो पण तुम्ही तुमच्या घरच्यांची फायनान्शियली सोय लावालही पण जर खरोखर या मानसिक तणावामुळे तुमचे काही बरे वाईट झाले (मी स्पष्ट बोलतो आहे त्याबद्दल आधीच माफी मागतो) तर त्याचा मानसिक धक्का तुमच्या घरच्यांना जो बसेल त्यामुळे तुम्ही त्यांचे आयुष्य ५ -१० वर्षांनी कमी कराल. अकस्मात मृत्युने मयत सुटतो पण घरचे कायमस्वरुपी मानसिक द्रूष्ट्या खचतात त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे हे टाळा.
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Tue, 07/26/2016 - 16:18
नवीन
+१ भारी प्रतिसाद.
आणखी एक शेपूटः
स्वतःचा आणि कुटुंबियांचा मेडिक्लेम इन्शुरन्सही काढून ठेवा.
- Log in or register to post comments
व
वटवट
Tue, 07/26/2016 - 16:20
नवीन
अतिशय सुंदर आणि लॉजिकल प्रतिसाद.... पुर्णपणे पटेश....
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Tue, 07/26/2016 - 16:26
नवीन
बरेच चांगले माहितीपूर्ण, उपयुक्त प्रतिसाद येत आहेत हे पाहून बरे वाटले. ते यासाठी की धाग्याचे शिर्षक आणि अभ्यादादाचे नाव बघून माझी पाच सहा उत्तरे ठरलेली जी मी नंतर गिळली! ;)
तरी सहज गंमत म्हणून सांगतो, १) करूच नये, हे उत्तम! २) जमेल तसे करावे! ३) मागचा पुढचा विचार न करता, बिनधास्त करावे! ४) व्यनितून सांगतो! ५) प्रतिप्रश्न - पण काय कसे करावे?
बाकी अभ्यादादा, स्वप्नाच म्हणाल तर ते "स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपेत....." किंवा गेलाबाजार, "सपने उन्ही के पूरे होते है...." हे घोकायच की स्वप्न पडायची बंद होतात.
मला तर अजूनही कधी स्वप्न पडलच तर त्यात, 'मी कुठेतरी पायी किंवा सायकलवर चाललोय आणि अचानक, एक रूपयाचा ठोकळा सापडतो, अजून जरा पुढे दोन रू. चा, पुढे पाचचा, मग पुन्हा रॅण्डमली कुठलाही सापडत जातो. पुढे कुठेतरी एकदम दोन-तीन सापडतात. आणि ही सापडलेली चिल्लर कुठे ठेवावी म्हणून मी स्वप्नातून बाहेर पडतो व अर्धवट झोपेत इकडे तिकडे जागा शोधू लागतो. lol =))
चिल माडी!
Sandy
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 07/26/2016 - 19:08
नवीन
तुमचा तर पोकेमॉनच झाला की राव
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 17:51
नवीन
प्रतिसाद खूप आवडला मृत्युंजया,
राग मानायचे कारणच नाही, तू म्हणा कि आदूबाळा. हे जे काही सांगतील ते अनुभवाचेच. फटकळ पणा त्यात काय मानायचा. उलट मोठमोठे डॉक सीए सीएस फुकटात सल्ला देताहेत तो फायदा पाहायचा.
एनी वे, मृत्युन्जयाने दिलेले वरचे सर्व पर्याय जवळपास केलेत, मानसोपचाराची काहीतरी सोय करायलाच हवी. म्हणजे खरच तसं काही असलं तर वेळेवर निपटून जाईल.
धन्यवाद सुबोध सर, मृत्यो आणि आदूबाळ.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 07/26/2016 - 18:18
नवीन
उत्तम प्रतिसाद!
इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा.
मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे.
घर आपल्या नावावर असताना आणि सोसायटी फॉर्म झालेली असताना कायदेशीर कटकटी होऊ नयेत म्हणुन काय काय करणे आवश्यक असते? म्हणजे मी आणि नवरा गचकल्यावर उद्या माझ्या मुलाला डायरेक्ट घर मिळणार की त्यासाठी काही तरतुदी आहेत?
दुसरे असे की माझी क्ष मालमत्ता मला केवळ माझ्या मुलाच्या नावे करायची आहे आणि त्यावर दुसर्या कुणीही हक्क दाखवु नये अशी माझी इच्छा आहे. तर केवळ त्याला नॉमिनी करुन हे काम होईल का? की आणखी काही डिक्लेरेशन आवश्यक आहे?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/27/2016 - 06:19
नवीन
हिंदू वारसा कायद्याप्रमाणे मुले-- मूल एक असेल तर ते एकटे, दोन किंवा अधिक असतील तर विभागून आई बापाच्या संपत्तीचे कायदेशीर वारसदार ठरतात. नॉमिनी हे केवळ विश्वस्त असतात आणि मूल सज्ञान होईपर्यंत ती संपत्ती नॉमिनीकडे विश्वस्त म्हणून असते. परंतु आपण "सुदृढ मनस्थितीत" (sound mind) (यासाठी एखादा डॉक्टर जो वरील वैद्यकीय प्रमाणपत्र देईल त्याला साक्षीदारही करा) असताना आपले इच्छापत्र करून जर ते रजिस्टर करून ठेवलेत तर तो सर्वात सबळ असा पुरावा मानला जातो. त्यातून या इच्छापत्रात आपली मुले हीच वारसदार (natural heir) असतील तर त्यात सहसा कोणत्याही कटकटी येत नाहीत.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/27/2016 - 08:09
नवीन
थोडेफार धन / गुंतवणुक गाठीला असलेल्या लोकांसाठी इच्छापत्र (लिव्हिंग विल) ही आवश्यक गोष्ट आहे यात वाद नाही.
मात्र ते खाली दिलेल्या इतर सोप्या पर्यायांना भक्कम कायदेशीर सोबत म्हणून असावे, एकुलता एक पर्याय म्हणुन नव्हे.
++++++
"संस्थांच्या कार्यामध्ये" आणि "हाऊसिंग सोसायटी, बँक, शेअर्स, म्युचुअल फंड्स, इ मधिल गुंतवणूकीच्या वारसहक्कांसाठी" "नॉमिनी" या शब्दांचा अर्थ वेगवेगळा आहे.
संस्थांच्या कार्यासंबंधी नॉमिनेशन :
१. नॉमिनी म्हणजे एकाद्या गैरहजर असणार्या व्यक्तीच्या जागी त्याच्या पदाचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी नेमलेली दुसरी व्यक्ती (A person or entity who is requested or named to act for another, such as an agent or trustee).
२. त्या दोन्ही व्यक्तींपेक्षा वरिष्ठ पदावर असलेली व त्या दोघांनाही जबाबदार असलेल्या पदावरची व्यक्तीच (relevant authority) अशी नेमणूक करू / रद्द करू शकते. ही प्रक्रिया संस्थेच्या मान्यप्राप्त लेखी व्यवहाराने होते व सर्व संबंधिताना त्याची प्रत जाते.
गुंतवणूकीसंदर्भातले नॉमिनेशन :
१. हा नॉमिनी म्हणजे मूळ मालकीहक्क असलेल्या व्यक्तीच्या (खातेदाराच्या) मृत्युनंतर त्याच्या गुंतवणूकीची विल्हेवाट लावण्याचा हक्क असणारी / वारसदार व्यक्ती असते (A potential successor to another's rights under a contract). अश्या नॉमिनीचे नाव केवळ वारस म्हणून दफ्तरदाखल राहते. मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीसंबंधी काहीही कृती करण्याचे हक्क या नॉमिनीला नसतात. पण मूळ मालकाच्या मृत्युनंतर, त्याचे मृत्युपत्र सादर केल्यावर, इतर कोणतेही पुरावे न लागता, नॉमिनीकडे हक्कांचे सुलभ व पूर्ण हस्तांतरण होते, हा फार मोठा फायदा होतो.
२. अश्या नॉमिनीची नेमणूक केवळ गुंतवणूकीचा मूळ मालकच (उदा : "हाऊसिंग सोसायटीच्या शेअर सर्टीफिकेटवर", "शेअर अथवा म्युचुअल फंड अकाऊंटवर" अथवा "बँक अकाउंटवर" नाव असणारी/र्या व्यक्ती) करू शकतो. एकाच मालमत्तेवर एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नाव असल्यास त्या सर्व व्यक्तींची यासाठी संमती लागते.
३. अश्या नॉमिनी प्रक्रियेसाठी हाऊसिंग सोसायटी कडे एक "मॉडेल बाय लॉ" प्रमाणित अर्ज भरून दिला की काम होते. बँक, शेअर/म्युचुअल फंड कंपन्या यांच्या अकाउंट उघडण्याच्या अर्जात एक भाग (सेक्शन) असतो व तेथे संबंधीत (मूळ व नॉमिनी) व्यक्तींच्या सह्या (काही ठिकाणी फोटोसह) केले की नॉमिनीची नोंद होते. सुरुवातीस ही नोंद केली नसल्यास ती नॉमिनी अर्ज स्वतंत्रपणे भरून नंतर केव्हाही करता येते.
मूळ मालक जिवंत असताना गुंतवणूकीत फेरफार करण्याच्या हक्कांसंबंधी नॉमिनेशन :
१. हाऊसिंग सोसायटीच्यासंदर्भात अश्या हक्कांचा स्पष्ट उल्लेख असलेली रजिस्टर्ड पॉवर ऑफ अॅटर्नी लागते.
२. सर्व बँकांमध्ये आणि बहुतेक इतर आर्थिक गुंतवणूंसाठी मूळ खाते उघडणार्या अर्जात "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व /किंवा "पॉवर ऑफ अॅटर्नी" असे दोन सेक्शन्स असतात. तेथे सह्या व जरूर असल्यास फोटोची नोंद करून मूळ मालक हे हक्क इतर व्यक्तीला देऊ शकतो. ही कृती खाते उघडताना अथवा नंतर केव्हाही करता येते. हे हक्क नंतर केव्हाही परत घेता येतात.
३. "लेटर ऑफ ऑथॉरिटी" व "पॉवर ऑफ अॅटर्नी" हक्क असलेल्या व्यक्तीला, मूळ मालक जिवंत असताना, सर्वसाधारणपणे, अकाउंट बंद करण्याचा हक्क सोडून इतर सर्व हक्क (चेकवर सह्या करणे, पैसे जमा करणे/काढणे, फिक्स्ड डिपॉझिट्स ठेवणे/कॅश करणे, इ) असतात. या हक्कांत गुंतवणूकीच्या संस्थेप्रमाणे थोडेफार फरक असू शकतात.
मूळ गुंतवणूकदारच्या मृत्युनंतर गुंतवणूकीचे हक्क हस्तांतरीत होण्याचा क्रम
१. संयुक्त खाते असल्यास --> दुसरी जिवंत खातेदार व्यक्ती
२. संयुक्त खाते नसल्यास अथवा सर्व खातेदारांचा एकत्र मृत्यु झाल्यास (उदा : अपघात) --> नॉमिनी
३. खातेदाराचा (किंवा सर्व संयुक्त खातेदारांचा एकत्र) मृत्यु व नॉमिनी नाही अश्या परिस्थितीत --> जो कोणी एक वा अनेक जण कायदेशीर वारस असल्याचे सिद्ध करू शकतील ते सर्व.
मृत्युपत्र असणे केव्हाही फायदेशीरच असते. मात्र, वारसांमध्ये झगडे झाल्यास मृत्युपत्रही कोर्टाकडून मान्यताप्राप्त (प्रोबेट) करून घेणे भाग पडते. ही व वरचा मुद्दा ३ मधली प्रक्रिया फार किचकट, वेळखाऊ व दु:खदायक असते... ती संयुक्त खाते व नॉमिनी या सहजसाध्य (केवळ सह्या व फोटोने होणार्या) सोयी वापरून टाळता येते.
वरच्या विवरणांत सर्वसामान्य व्यवस्था दिलेली आहे. दर गुंतवणूक कंपनीच्या नियमाप्रमाणे त्यात फरक असू शकतात. आपल्या कंपनीच्या अधिकार्यांशी संवाद करून मगच स्वतःला मान्य तो पर्याय निवडणे योग्य होईल.
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/27/2016 - 08:23
नवीन
मृत्युपत्रातील / इच्छापत्रातील मालमत्तेच्या वाटणीसंबंधी काही सर्वसाधारण धोपट नियम...
१. मृत्युपत्र करणार्याला पूर्वजांकडून वारसाने मिळालेली मालमत्ता : हीची सर्व वारसांमधे समान विभागणी करावी लागते. यात मृत्युपत्र करणार्याला ढवळाढवळ करता येत नाही.
२. मृत्युपत्र करणार्याने स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता : हीची विभागणी कशी करावी हा सर्वस्वी मृत्युपत्र करणार्याचा हक्क असतो. (यातही बहुदा पत्नीच्या निर्वाहाची व्यवस्था नाकारण्याची मुभा नसावी असा माझा अंदाज आहे.)
या आणि माझ्या वरच्या प्रतिसादात मिपावरचे कायदातज्ञ सुधारणा आणि/अथवा भर घालतीलच.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Wed, 07/27/2016 - 11:29
नवीन
शंका-
ज्या ठिकाणी फेज वन फेज टू अशा पद्धतीने काम होते तेथे गृहनिर्माण संस्था निर्माण होण्यास ५ ते ६ वर्षाचा कालावधी मधे जाउ शकतो. अशा वेळी नॉमिनेशन कसे करायचे ?
माहिती-
मृत्यू पत्रात जेंव्हा केंव्हा आपण एखादा हक्क प्रदान करीत असतो. त्या संबधी निसंदिग्ध स्वरूपात लिहिले पाहिजे. उदा. मुदत पावती असेल तर तिचा क्र. वा एखाद्या गाळा असेल तर त्याचा सर्वे क्रमांक वगैरे. अर्थात माझ्या मृत्यूचे वेळी माझे नावावर कायद्याने असलेली सर्व स्थावर जंगम असा उल्लेख कमीतकमी हवाच !
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/27/2016 - 23:43
नवीन
१. निर्वेधपणे आपल्या नावावर असल्याशिवाय (उदा : सोसायतीतील सदनिकेचे शेअर सर्टीफिकेट ताब्यात असल्याशिवाय) कोणत्याही मालमत्तेचे नॉमिनेशन करता येत नाही. ज्या गोष्टीचे आपण निर्वेध मालक नाही, ती गोष्ट दुसर्याला कशी देवू शकू ?
२. मृत्युपत्रात मालमत्तेचा जितका मोघम संदर्भ तितकी नंतर समस्या उभी राहण्याची सहाजिकच जास्त शक्यता असते.
(अ) जेथे जरूर आहे तेथे पक्के असलेले आकडे जरूर लिहावेत (उदा : अमुक अमुकला माझ्या अमुक बँकेतल्या अमुक खातेक्रमांकातील पैश्यांपैकी / अमुक एफडी पैकी रु १० लाख देण्यात यावे).
(आ) मात्र जेथे मालमत्तेची किंमत कालमानाप्रमाणे बदलत असणार आहे तेथे प्रत्येक वारसाच्या नावाबरोबर त्याला दिलेल्या मालमत्तेचे फक्त योग्य वर्णन पुरेसे आहे (उदा : अकाउंट क्रमांक; मुदत पावतीचा क्रमांक; सोसायटीचे नाव, पत्ता व फ्लॅट क्रमांक; जमिनीच्या सातबार्यावरील सर्वे क्रमांक-हिस्सा क्रमांक, इ वर्णन; वगैरे). थोडक्यात म्हणजे मालमत्तेचा प्रत्येक भाग (आयटेम) त्या वर्णनावरून खात्रीने ठरवता आला तर नंतरचे वादविवाद टळतील. एकच आयटेम अनेक वारसदारांना विभागून द्यायचा असला तर चल किंमत असलेल्या आयटमची विभागणी टक्केवारीने आणि/किंवा इतर कोणत्याही पद्धतीने पण सुस्पष्टपणे करावी (उदा : 'अ' ला ३० टक्के व 'ब' ला ७० टक्के; किंवा 'अ', 'ब' व 'क' यांना समान विभागणी करून; किंवा 'अ' ला ३ लाख रुपये व उरलेले सर्व 'ब' ला; इ)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 07/26/2016 - 16:21
नवीन
मिसळपाव को आपकी जरूरत हाय,
आता तुम्हाला शंभर वर्षांचे आयुष्य तसेही मिळालेय, ते कसे जगायचे याचं प्लॅनिंग करा :)
ते आर्थिक आणि इतरही गोष्टींचे नियोजन करावेच, जाणकार लोक माहिती देत आहेतच,
पण असे विचार जास्त करू नयेत, म्हणजे घाबरवायचं वगैरे नाही, पण एखाद्या गोष्टीचा सारखा विचार केल्यास ती
प्रत्यक्षात उतरण्याचे चान्सेस असतात याचा अनुभव घेतलाय, त्यामुळे अस नकारात्मक विचार शक्यतो करू नये.
स्वप्नावरून मीही गेल्याच आठवड्यात पडलेलं स्वप्न सांगेन,
मी आणि माझी लाडकी भाची माझ्या आजोळच्या वाड्यात, बाहेरच्या खोलीत झोपलोय ( ह्या वाड्यात आम्ही अगदी
वर्षातून एकदा वगैरे गेलो तर जातो, एरवी नाही, मात्र बरंचसं बालपण तिथे गेलंय, खूप कडू गोड आठवणी आहेत)
तर मी मध्येच पाणी प्यायला आतल्या खोलीत येते, तिथे जिना आहे, वर गेले की स्वयंपाकघर. वर जातंच होते
तेवढ्यात पिल्लूचा बोलण्याचा आवाज आला,
आत गेले तर ती नाहीच तिथे... खाली मीच झोपलेय... उशीवर माझेच केस वगैरे पसरलेत,
त्या झोपलेल्या माझ्याकडे पाहतांना पोटात पडलेला खड्डा आणि हृदयाचा चुकलेला ठोका तेव्हा 'जाणवला' ही होता,
तसे स्वतःकडे पाहतांनाच, काय होतंय ते समजून घेत असतांनाच जाग आली. विचित्र होतं ते फार.
अशी भारी भारी स्वप्नं पहिल्यापासूनच पडतात, एक तर आगीत वगैरे अडकलेले असते, नाहीतर समोर वाघ-बीघ
असतात, अगदी गोळीबार ही अनुभवलाय :)
त्यात बहुतेकदा कुणी जवळची व्यक्ति आणि मी संकटात असते, प्रत्यक्षातील भीती स्वप्नात खरी होऊन येत असावी
बहुधा, सब-कॉन्शिअस माईंड फार अॅक्टिव्ह असेल तर होत असावं असं.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 17:55
नवीन
स्वतः स्वतःकडे पाहणे हा अनुभव डेंजर असतो, स्वप्नातच शक्य आहे ते.
एकदा तरी प्रत्यक्षात तसे घडावे अशी फार इच्छा आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Tue, 07/26/2016 - 19:12
नवीन
हादरवून टाकणारा अनुभव होता ना तो, वाईट..
मला सगळ्यात जास्त प्रश्न पडतो, तो म्हणजे आपण गेल्यानंतर काय होईल.. म्हणजे पुढे काय ?
पण असा विचार आला की आजूबाजूचं जग असं डोळ्यांसमोर गोल गोल फिरायला लागतं, मग तो विचार डोक्यातून
काढावाच लागतो, मात्र याचं उत्तर जाणून घ्यायची उत्सुकता फार आहे.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Tue, 07/26/2016 - 16:44
नवीन
गप लग्न करा आणि आपले जे काही आहे ते तीच्या स्वधीन करा. हा.का.ना.का.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 07/26/2016 - 18:03
नवीन
हेच लिहायला आलो होतो....
मी सगळे पैसे बायकोच्या हातात देतो.
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Tue, 07/26/2016 - 19:25
नवीन
आयडीनाम सार्थक केलत:'(
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 07/26/2016 - 20:00
नवीन
पत्नी ही घरातील लक्ष्मी...
http://misalpav.com/node/24546
- Log in or register to post comments
र
रातराणी
Tue, 07/26/2016 - 20:36
नवीन
लग्न करा! स्वप्न पडणे बंद होईल कायमचे =))
- Log in or register to post comments
न
नपा
Mon, 08/01/2016 - 09:08
नवीन
लग्न करा म्हणजे स्वप्न पडणे बंद होईल...किंवा पडला तरी नंतर आठवणार नाही...
बाकी स्वप्न म्हणजे आपण अनुभवलेल्या, पाहिलेल्या, ऐकलेल्या गोष्टींचा अंतर्मनाने केलेला remix
शांत झोपेचा अभाव असला कि साधारणपणे स्वप्न पडतात...डोक्याला मस्त तेल मालिश करून झोपा
या धाग्यामुळे अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली...धन्यवाद
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 07/26/2016 - 18:06
नवीन
ही अशी स्वप्ने पडल्याने, काही होत नाही.
बर्याचदा स्वप्नात माझा कडेलोट झाला आहे किंवा आकाशातून कोसळलो आहे.
तेंव्हा बिंधास्त रहा.
मस्त खानेका, थोडा पिने का और भरपूर चित्र बनाने का.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Tue, 07/26/2016 - 18:13
नवीन
कायदेशीर बाबींंची माहीती जाणकारांंनी दिलेली आहेच एक सुचवू का ? सगळी कामबिमंं बाजूला सारा आणि ४-५ दिवस आई वडीलांंच्या घरी रहायला जा मस्त आईच्या हातचंं गरमागरम जेवा आईच्या मांंडीवर डोक ठेवून झोपा ,वडीलांंशी गप्पा मारा घरच्यांच्या सहवासात मन प्रसन्न होईल .मनावरचा ताण कमी होईल
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 18:30
नवीन
ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी.
जाना तो है...
पण आई सारखी विश्रांती जगात कुठे नाही हे अगदी खरे.
तिचा माझया डोक्यावरून हात फिरला तरी कदाचित मला मानसोपचाराची गरज भासणार नाहीये.
- Log in or register to post comments
_
_मनश्री_
Tue, 07/26/2016 - 18:37
नवीन
खरच जा ,माँँ की एक जादू की झप्पी और सब टेंंशन गायब
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Tue, 07/26/2016 - 19:01
नवीन
>>> ये तो अब रोनेकी बात हो गयी मॅडमजी.
त्याला का लाजावं मग??? बिन्धास्त रडावं माण्सानं.
येक पर्सनल विचारु का???? कस्लं काय भंग बिंग झाला नाहि ना?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 19:05
नवीन
ह्याह्या,
तसलं काय न्हाय लेटेस्टमधी. ;)
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 07/27/2016 - 05:09
नवीन
आलं
अति अवांतर : मृत्युंजयचा सल्ला जबरदस्त आहेच पण त्यात "लवकर लग्न कर" असा नसल्याची किंचित ऊणीव भासते..
अता पुर्ण झाला..
गारसल्ला नाखु
- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 07/26/2016 - 18:18
नवीन
मूळ लेख आणी सर्व प्रतिसाद वाचून निशब्द झालेलो आहे.
अनेक प्रतिसादातून आवश्यक ती व्यावहारिक माहिती उत्तम प्रकारे दिलेलीच आहे, ती सर्वांसाठीच मननीय आणि करणीय आहे. आई-वडिलांना कमित कमी त्रास होईल, अशी सोय करून ठेवणे केंव्हाही चांगलेच.
मी स्वतः पासष्ठाव्या वर्षी सुद्धा अद्याप असली काहीही व्यवस्था केलेली नाही ... आळस. आणि का कुणास ठाऊक, आपण ८५ वर्षे जगणार आहोत असे उगीचच वाटत असते, त्यामुळे "काय घाई आहे, करू कधितरी" हा विचार.
भविष्याविषयी स्वप्ने मला तरी कधी पडलेली नाहीत, पण त्या त्या काळी असलेल्या परिस्थितीची अतिशय सांकेतिक अशी स्वप्ने बरेचदा पडलेली आहेत, आणि त्यातून स्वतःपुरते मार्गदर्शनही मिळालेले आहे.
तुझ्या स्वप्नातही " तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात." हा एक महत्वाचा संकेत आहे, त्यामुळे आवश्यक ती व्यावहारिक व्यवस्था करून निश्चिंत रहावे. अद्याप केला नसल्यास एकदा 'विपश्यना' चा दहा दिवसाचा कोर्स करून घ्यावा.
मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !"
- Log in or register to post comments
व
वेदांत
Wed, 07/27/2016 - 06:43
नवीन
मार्कस ओरेलियस यांनी म्हट्ल्याप्रमाणे "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका ! आपल्या असण्याने किंवा नसण्याने काही अडुन रहाणार नाहीये !"
-------------------
क्या बात है....
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Wed, 07/27/2016 - 06:55
नवीन
अहो,
त्यांनी आपला प्रश्न विचारला आहे त्यावर त्यांना उपाय सांगायच्या ऐवजी काळाच्या पटलावर आपण एक ठिपका कसलं सांगताय?
आपल्या डॉक्टरकडे एखादा रुग्ण ( किंवा आपणच) पोटात गोळा आहे किंवा हाड मोडले म्हणून गेलात आणि त्यानि आपल्याला "काळाच्या पटलावर आपण एक ठिपका आहोत ठिपका" असा सल्ला दिला तर काय वाटेल.
अनुचित प्रतिसाद देण्यापूर्वी दोन वेळेस विचार करा. जिथे तिथे "अध्यात्म" आणू नका.
धाग्याचा विषय काय आणि त्यावर असा प्रतिसाद देणे हा औचित्यभंगाचा प्रकार आहे.
- Log in or register to post comments
उ
उडन खटोला
Wed, 07/27/2016 - 07:08
नवीन
संपादित
कृपया व्यक्तिगत टीकाटिपणी टाळावी.
- संपादक
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 07/27/2016 - 10:03
नवीन
परत एकदा अतिषय विनम्रपणे सांगतोय डॉक्टर , तुम्हाला माझी मते पटतात की पटत नाहीत हा माझ्यालेखी महत्वाचा मुद्दा नाही. पण मी काय प्रतिसाद द्यायचा अन काय द्यायचा नाही हे आपण मला शिकवु नये. कोणालाच शिकवु नये.
इथे प्रत्येक जण आपापले विचार बाळगायला आणि अभिव्यक्त करायला स्वतंत्र आहे. मी तुम्हाला किंव्वा अभ्याला माझा प्रतिसाद वाचा अन त्यावर आपले मत नोंदवा अशी सक्ती केलीली नाही. आपण माझे सर्वच्या सर्व लेखन फाट्यावर मारायला रिकामे आहात. रादर तसे करावे अशी नम्र विनंती आहे. जर आपण खाजवुन खरुज काढणार असाल तर प्रत्युत्तर देणे ही माझी आगतिकता असेल! भले मग आयडी उडाला तरी बेहत्तर ! तसेही आजकाल प्रवोक करणार्याचा आय्डी उडवायचे सोडुन प्रत्युत्तर देणार्याचा आयडी उडवायची फॅशन आहे !
अभ्या, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व !
बाकी काल ह्याच विषयावर जरा अजुन चिंतन करत होतो तेव्हा मार्कस ऑरेलियस ची आठवण आली , तो तर रोमन साम्राज्याचा सम्राट होता , तेही अत्यंत भरभाटीच्या काळातला . पण तसे असुनही नॉर्दन फ्रंटीयर्स वर जर्मॅनिक ट्राईब्स विरोधात चाललेल्या युद्धात स्वतः जातीने सामील होता. मृत्युची तलवार तर त्याच्याही डोक्यावर लटकत होती ! शिवाय आपल्या पाठीमागे हे येवढे विशाल महान रोमन साम्राज्य कमोडस सारख्या नालायक माणासाच्या हातात जाणार हेही स्पष्ट दिसत होते ! पण तरीही तो माणुस , जो की एक अत्यंत प्रजाहितदक्ष राजा आहे तो , आता काय करु अन माझ्यामागे काय होईल अन राज्य कोणाला देवु अन ह्या चिंतनात गढुन गेलेला दिसत नाही, आपण मेल्यानंतर दुनियेचे काय होइल ह्याची आपल्याला पर्वा नाही , नकोच , रादर जिवंत आहोत तोवर कसे मस्त आनंदात समाधानात जगु शकु ह्याचा विचार करु , तो काय म्हणतो पहा:
Be content with what you are and wish not change ; nor dread your last day, nor long for it !

- Log in or register to post comments
च
चित्रगुप्त
Tue, 07/26/2016 - 18:21
नवीन
अगदी अगदी. हे कराच अभ्यासेठ. यातून नक्कीच उभारी मिळेल, आणि विशेषतः त्यांना खूपच चांगले वाटेल.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 07/26/2016 - 18:32
नवीन
उत्तम विषय आणि एकापेक्षा एक सरस प्रतिसाद.
वाखु साठवली आहेच.
- Log in or register to post comments
ल
लालगरूड
Tue, 07/26/2016 - 18:34
नवीन
रिअल लाईफ मध्ये जगताना कधी कधी असं वाटतं या क्षणाचं आपण आधी स्वप्न पाहिले आहे आणि सर्व त्याप्रमाने होत आहे. कुणाला असा अनुभव आहे का? मला खूप आहे.
- Log in or register to post comments
व
विटेकर
गुरुवार, 07/28/2016 - 11:29
नवीन
मला हा अनुभव अनेकदा आला आहे
- Log in or register to post comments
म
मोदक
गुरुवार, 07/28/2016 - 15:26
नवीन
देजा वु म्हणत आहात का?
https://en.wikipedia.org/wiki/D%C3%A9j%C3%A0_vu
- Log in or register to post comments
ग
गंगाधर मुटे
Tue, 07/26/2016 - 19:24
नवीन
स्वत:चे मरण स्वप्नात दिसणे लाभदायक असते, असे मी ऐकून आहे. खरे खोटे देव जाणे. पण खरे असेल तर फ़ायदाच होईल नुकसान होणार नाही. त्यामुळे तनावमुक्त व्हावे, असे माझे मत.
अवांतर :
माझ्याकवितावर द्यावयाचे प्रतिसाद मला मेल करून ठेवा. तुमच्या पश्चातही मी तुमचे प्रतिसाद माझ्या कवितांवर प्रकाशित करत राहीन, ये वादा रहा. ;)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 07/27/2016 - 05:28
नवीन
"पिलीयन रायडर - Tue, 26/07/2016 - 21:48
नवीन
उत्तम प्रतिसाद!
इच्छापत्र (काहींना मृत्युपत्र हा शब्द आवडत नाही) कधीही करता येते. त्यात आपल्या नावावर असलेल्या सर्व मालमत्तेचा उल्लेख हवा.
मला घरासंदर्भात एक प्रश्न आहे- - -"
// नॅामिनी हा फक्त तात्पुरता मालमत्ता मालक होतो आणि ही सोय ब्यान्क आणि घरसह संस्थेसाठी केलेली आहे.खरा वारसदार आल्यावर नॅामिनीने सर्व हक्क त्याच्याकडे द्यायचे असतात.
आणखी उत्तर बाकी आहे.मला वाटतं यासाठी वेगळा धागा काढून ठेवलात तर बरं होईल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »