Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

कसे करावे?

अ
अभ्या..
Tue, 07/26/2016 - 10:11
🗣 143 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, थोडी मदत हवी आहे. ............... म्हणजे कसं आहे की गेले ५ रात्री मला एकाच स्वरुपाचे स्वप्न रोज रात्री पडत आहे. त्या स्वप्नात मी ऑफीसला निघालेलो असतो नेहमेप्रमाणे बाईकवरुन. विजापूर रोडवरुन मला जावे लागते. अचानक एका स्पीडब्रेकरपाशी एक मोठी कंटेनर ट्रक मागच्या बाजुने माझ्या गाडीला उडवते. मी बाजूला उडून पडतो. आणि अचानक सारे शांत झालेले असते. लोक चर्चा करत असतात पण मला काहीही एकू येत नाही. कुणीतरी मला उचलते, मी टोटली डॅमेज झालेला असतो. हात पाय वगैरे निर्जीव दिसतात (हे मला दिसत असते थर्ड पार्टीसारखे) नंतरही काही कळत नाही. लोक बडबड करत असतातच पण आवाज काहीच नाही. नंतर माझी डेड बॉडी अ‍ॅम्ब्युलन्सटाइप गाडीतून कुठेतरी नेतात. दोनदा मी इथेच स्वप्नातून जागा झालो. तीन वेळा मला हेच दिसते पण त्यानंतर घरही (माझे नाही, आई वडीलांचे) दिसते. तिथे सगळे व्यवहार नियमित चालू असतात. रस्ता पण अगदी सुरळीत वाहात असतो. मात्र जिथे अ‍ॅक्सीडेंट झाला तो स्पॉट मात्र घराजवळ दिसतो. अ‍ॅक्चुअली ते अंतर लांब आहे. तो एरीयापण अगदी काहीच न घडल्याप्रमाणे चालू असतो. ह्यानंतर मात्र मला जाग येते. आणि जवळपास सगळे आठवते. ह्यावर विचार करता काहीच संगती लागली नाही पण नियमितपणे हे स्वप्न पडतेय एवढे मात्र खरे. ................ आता एक विचार मात्र डोक्यात घोळतोय. मी तर एकटा राहतोय सध्या. म्हणजे आईवडील त्यांच्या घरी राहतात पण मी बिझी असतो म्हणून ते सारखे फोन करायचे टाळतात आणि मी तर संपर्काच्या बाबतीत दिवाच आहे. त्यांची माझी महिनामहिना भेट होत नाही. उद्या समजा माझ्याबाबतीत बरेवाईट काही घडलेच तर मी काय पूर्वतयारी करुन ठेवावी? म्हणजे माझ्या पॉलिस्या, गुंतवणूकी ह्याबाबत नॉमिनी सध्या आईच आहे पण त्यांना जास्त माहीती नाहीये ह्याबद्दल. माझी बँक खाती, लहान कर्जे, कस्टमरांकडून राहिलेल्या उधार्‍या ह्याबद्दल मला एकट्यालाच माहीती आहे. त्याचे कसे होईल? माझी स्वतःच्या व्यवसायातील काही आर्थिक गोष्टी असतील त्या सांभाळायची माझ्या घरच्यांची बिल्कुल शक्यता नाही तेंव्हा ह्याबाबतीत कसे करावे? मुख्य म्हणजे मी नसताना ह्या गोष्टींचा विचार कशाला करायचा असेही डोक्यात येते पण आपणांमुळे आपल्या घरच्यांना आपल्यानंतर काही त्रास होऊ नये आणि झाला तर फायदाच व्हावा तोही विनात्रास अशी भावना आहे. तर अशा पध्दतीचा इन्फरेमेशन बॅकप कसा ठेवावा? माझे व्यवहार काही फार मोठे नसले तरी एखाद्या सीए अथवा व्यवसायबंधूची मदत कशा पध्दतीने घ्यावी? बँकेचे आकाउंटस, त्यांचे पासवर्डस वगैरे डिट्टेल्स अगदी विश्वासातल्या म्हणजे वडीलांकडे अथवा आईकडे द्यावेत काय? मी ते बर्‍याचदा चेंज करत राहतो. त्याचे कसे व्हावे? काही आर्टीस्टिक प्रॉपर्टी म्हणजे चित्रे, पेन्टींग अशांची व्हॅल्युएशन माझ्यानंतर कुणी करेल त्याला आधीच लीगली राईटस देता येतील काय? विल म्हणजे म्हातारपणातच करता येते का? त्याची काही टर्म्स वगैरे असतात काय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझी काही ऑनलाइन अकाउंटस असतात उदा.: गुगलचे पर्सनल, हपिसचे, मिपाचे अशा अकाउंंटवरची वैय्क्तिक माहीती माझ्याबरोबरच संपून जावी असे काही सेटिंग असते काय? कितीही प्रायव्हसी ठेवली तरी ते अ‍ॅक्सेसिबल असतात असे ऐकलेय पण माझ्या माहीतीची माहीती मला माहीत असणार्‍या व्यक्तींना व्हावी असे वाटत नाही तेंव्हा कसे करावे? . काही उपयुक्त सल्ला मिळाल्यास मी आपला आभारी राहीन. आगाऊ धन्यवाद.
वर्गीकरण
सल्ला
मदत हवी आहे

प्रतिक्रिया द्या
32343 वाचन

💬 प्रतिसाद (143)
च
चौकटराजा Wed, 07/27/2016 - 05:40 नवीन
नुकतेच्च वाटसॉपवर एक पोस्ट वाचली. पोस्ट फॅब्रिकेटेड वाटली पण त्यातून मिळालेला संदेश डोळे उघडणारा होता. टेकी नवरा व सी ए बायको. सुखी संसार पण मूल नाही असा. एके दिवशी ३३ व्या वर्षी अपघातात तो मोटारसायकलवरून मरतो. लॅपटोप मोबाईल मधे सारे पासव्रर्ड ई असतात त्यातला एकही बायकोला माहीत नसतो. लॅपटोप चा पासवर्ड महिन्यातून एकदा बदलण्याचा नियम . त्यामुळे ती महा कटकटीच्या फेर्‍यात सापडते. ऑफिसात अत्यंत शिस्त बद्ध असलेली ती घरी मात्र उद्या बघू वृतीची असते. अशात नॉमिनेशन करायला त्याना वेळच मिळालेला नसतो. घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे...... असा सर्व मामला.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 07/27/2016 - 17:03 नवीन
घर घेताना मधे कोणी गचकेल असा विचार झालेला नसतो. त्याचे हप्ते वगैरे
यासाठी आपले काही झाल्यास मागच्यांना त्रास होउ नये म्हणून लायबीलीटी कव्हर करणारी गुंतवणूक करुन ठेवावी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
क
कवितानागेश Wed, 07/27/2016 - 06:39 नवीन
अभ्या, हेल्मेट घालतोस ना? आता एक चिलखत पण घे! ते स्वप्न खरे होईल असे मानून तयारी करण्यापेक्षा दुसरे चांगले स्वप्न बघायला सुरुवात कर. चांगला १०० वर्षांचा म्हातारा झालायस, तरी दात मजबूत आहेत. भोवती मुले, बाळे, नातवंडे, पतवंडे आहेत, मोठ्ठा उद्योग धंदा होता, तो मुलांमध्ये वाटून देऊन तू निवांतपणे मिसळपाव वर टवाळक्या करतोयस!....... अजून रंगव स्वप्न तुला हवे तेवढे.... आणि रोज तेच बघ. :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता_१३ Wed, 07/27/2016 - 06:49 नवीन
आमेन !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 07/27/2016 - 08:42 नवीन
अभ्या..., तरण्याताठ्या गब्रू जवानाने मन मजबूत ठेवून दु:स्वप्नांना टेंपोत बसवून फाट्यावर सोडावे आणि जग जिंकायला निघावे असे वाटते. मात्र, त्याचबरोबर संपत्तीच्याबाबतीत जे उपयोगी सल्ले मिपाकरांनी दिले आहेत त्यावरही विचार करणे जरूरीचे आहे. ती घाबरट्पणाने नाही तर व्यावहारीक चातुर्य म्हणून करायची गोष्ट आहे. ते उपाय विम्यासारखे असतात. मरण्यासाठी कोणी विमा काढत नाही, तर आपल्या मागे राहणार्‍यांचा विचार त्यामागे असतो. तोच विचार संपत्तीचा लेखाजोखा लिखित स्वरूपात ठेवणे, मृत्युपत्र करणे, नॉमिनी नेमणे, इ पर्यायांमागे असतो. या उपायांमुळे आपल्यामागे आपली संपत्ती बेवारस न राहता अथवा चुकीच्या हाती न पडता, ती आपल्याला हवे असलेल्या योग्य व्यक्तींच्या हाती "विनासायास" जाते. सर्वांना दीर्घ आयुरारोग्य लाभावे हीच सदिच्छा आहे. पण इथून केव्हा जाणार हे कोणालाच माहीत नसते. त्यामुळे अशी व्यवस्था (अगोदर केली नसल्यास) करायला सर्वोत्तम वेळ "आत्ता" हीच असते.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/27/2016 - 09:14 नवीन
येस एक्काकाका, चिंता नाहीच, त्यात अडकतो आहे असेही नाही पण विनासायास त्यांना मिळावे काहीतरी हि प्रामाणिक भावना. बस्स. माझ्यामुळे कदाचित त्यांनी त्रास भोगलाय. मला जाणीव आहे. माझे चुकून काही बरेवाईट झाले तर त्यांना अधिक त्रास होईल ह्याची कल्पना आहे पण आयुष्याच्या वजाबाकीत त्यांच्यासाठी मी मायनस राहीलो असे नको व्हायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
असंका Wed, 07/27/2016 - 08:58 नवीन
किंचित पैसा खर्च करायची तयारी असेल तर ही एक वेबसाइट पण नजरेखालून घालावी. चार्जेस तिथेच खाली दिलेले आहेत. महाराष्ट्र एक्झिक्युटर एन्ड ट्रस्टी कं. लि.
  • Log in or register to post comments
अ
असंका Wed, 07/27/2016 - 09:04 नवीन
ही बँक ऑफ महाराष्ट्रचीच सबसिडियरी असल्याने त्यांच्या वेबसाइटमध्येच माहिती दिसेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
आ
आदूबाळ Wed, 07/27/2016 - 09:24 नवीन
हेच लिहायला आलो होतो. माझा वैयक्तिक अनुभव फार चांगला आहे. संभाव्य कौटुंबिक कटकटी / वादावादी झाल्या नाहीत कारण महा० एक्झि० ट्रस्टींची पारदर्शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
ग
गंम्बा Wed, 07/27/2016 - 15:10 नवीन
आदुबाळ - शक्य झाल्यास वैयक्तीक माहीती सोडुन जास्तीची माहीती द्या. मला स्वताला असे काहीतरी करुन ठेवण्यात रस आहे. ट्रस्ट हा प्रकार नक्की कसा चालतो काहीच माहीती नाही. पाश्चिमात्य देशात हा खुपच कॉमन प्रकार असावा असे गोष्टी सिनेमातुन दिसते. भारतात पहाण्यात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Wed, 07/27/2016 - 17:49 नवीन
ओके, वैयक्तिक माहिती टाळायचा प्रयत्न करतो. आणि पूर्ण स्टोरी लिहितो. ---- सन ९६-९७ सालची गोष्ट असेल. जवळच्या नात्यातली एक वृद्ध व्यक्ती. एका दुर्धर आजाराचं नुकतंच निदान झालं होतं. जिवाला इमिजिएट धोका नसला तरी हळूहळू प्रकृती बिघडत जाणार हे निश्चित होतं. जवळच्या एका हितचिंतकाने लगेच मृत्युपत्र करायला सुचवलं. (कारण मृत्युपत्र करताना व्यक्ती कायद्याच्या नजरेत "ऑफ अ सेन माईंड" लागते, आणि त्या आजारामुळे सॅनिटी कमीकमी होत जाणार हे स्पष्ट होतं.) त्या वृद्ध व्यक्तीकडे फारशी प्रॉपर्टी नव्हती. भाड्याचं घर रीडिव्हेलप होऊन झालेला फ्लॅट, पेन्शनच्या उरलेल्या पैशाच्या केलेल्या एफड्या, कुठचेतरी लटकलेले अ‍ॅरियर्स वगैरे. सामान्यतः अशा वेळी काही वाद व्हायला नको, पण त्या वृद्ध व्यक्तीचे वारसदार लैच कटकटे, दुराभिमानी, इगोइस्टिक वगैरे होते. हे माहीत असल्याने त्या वृद्ध व्यक्तीने काही जबाबदार नातेवाईकांना मृत्युपत्राचा एक्झिक्युटर व्हायची गळ घातली. (एक्झिक्युटर म्हणजे मृत्युपत्रात लिहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडवण्याची जबाबदारी दिलेला माणूस.) पण झालं असं - वृद्ध व्यक्तीच्या हिशोबात ते जबाबदार नातेवाईक तरूण असले, तरी प्रत्यक्षात ते पंचेचाळिशीच्या आसपासचे होते. काहीतरी होऊन ते वृद्ध व्यक्तीच्या आधीच टपकले तर काय घ्या? बरं, नाही टपकले, तरी एक्झिक्युटर होणं - विशेषतः नात्यातल्या व्यक्तीचा - हे वैतागाचं, मानसिक श्रमाचं काम असतं. त्यातून वारसदार म्हणजे... तर एकाने महाराष्ट्र एक्झिक्युटर ट्रस्टीजचा पर्याय सुचवला. वाटलं की एवढी छोटी इस्टेट असल्याने ते ही जबाबदारी घेतील का? चौकशी करता ते हो म्हणाले, त्यांच्या सर्व्हिस अ‍ॅग्रीमेंटवर सह्या झाल्या. मग त्यांच्याकडून एक माणूस येऊन मृत्युपत्रात कोणाला काय, कसं, किती द्यायचं आहे ते वृद्ध व्यक्तीला विचारून त्याच्या नोट्स काढून घेऊन गेला. मग प्रत्यक्ष मृत्युपत्र ड्राफ्ट केलं, ते त्या वारसदारांना दाखवलं. (हे करणं खरं तर आवश्यक नसतं, पण या केसमध्ये वृद्ध व्यक्तीनेच ही सूचना केली होती.) एक मूळप्रत त्यांनी ठेवून घेतली. सन २०१५ मध्ये वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. हे एक्झिक्युटर ट्रस्टींना कळवताच त्यांनी बँक अकाऊंट, एफड्या, सोनं वगैरे ताब्यात घेतलं. फ्लॅटवरचं नाव बदलण्याची प्रक्रिया सुरू केली. वारसदारांची एक मीटिंग घेऊन मृत्युपत्र मोठ्याने वाचून दाखवलं. त्यात घडायच्या त्या नाट्यमय घटना घडल्याच - एका वारसदाराचं म्हणणं होतं की वृद्ध व्यक्तीने मला क्ष द्यायचं ठरवलं होतं आणि तुम्ही य म्हणताय. दुसर्‍या वारसदाराला त्या काळी निरीच्छतेचा टेंपररी झटका आल्याने त्यांनी सर्व हक्क सोडून दिले होते. नंतरच्या वीस वर्षांत (१९९६-२०१५) झटका ओसरला होता, आणि आपल्याला काही मिळावं ही इच्छा जागृत झाली होती. तिसर्‍या वारसदाराकडे वृद्ध व्यक्तीचे बरेच अ‍ॅसेट होते आणि तो बराच काळ शहराबाहेर असे. एक्झिक्युटर ट्रस्टींनी सगळं अत्यंत थंडपणे हाताळलं. वारसदार एक आणि दोनला त्यांना ड्राफ्ट विल वाचायला दिलं तेव्हा अ‍ॅकनॉलेजमेंट घेतली होती ती दाखवली. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतला नव्हता हे पटवून त्यांचं तोंड बंद केलं. तिसर्‍या वारसदाराच्या गावी जाऊन अ‍ॅसेट ताब्यात घेतले. वारसदार एकला पैसे नको होते, पण वृद्ध व्यक्तीची आठवण म्हणून विशिष्ट वस्तू हवी होती. या सगळ्या खाचाखळग्यांतून त्यांनी योग्य प्रकारे त्यांचं काम केलं. तात्पर्य असं, की जिथे मृत्युपत्रामुळे डोक्याला शॉट लागायची शक्यता असते, तेव्हा एक्झिक्युटर ट्रस्टींकडे नक्की जावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
अ
अभ्या.. Wed, 07/27/2016 - 18:06 नवीन
हि माहिती पूर्ण वाचली. खूप चांगली सेवा आहे हि. ह्याबद्दल बिलकुल माहिती नव्हती. अशी सेवा कुणी फर्म अथवा संस्था प्रॉपरली रेट वगैरे ओपन करून देत असेल असेही वाटले नव्हते. मला ते विल वगैरे गोष्टी बडे लोग बडी बाते वाटायचे. हे मात्र आपल्या महाराष्ट्र बँकेकडून आहे म्हणजे भारीच. कारण रिलेशन मेन्टेन केले तर महाबँकेसारखे लोक जगात भारी बँकर सारखी सेवा देतात याचा अनुभव आहे. हि माहिती बर्याच जणांना पुरवली जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
असंका Wed, 07/27/2016 - 21:43 नवीन
+१.. आदुबाळ यांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ग
गंम्बा गुरुवार, 07/28/2016 - 15:20 नवीन
मनापासुन धन्यवाद आदुबाळ. हे सर्व करायला ते फक्त २-३ % घेतात म्हणजे काहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
झ
झकास Sat, 07/30/2016 - 19:00 नवीन
खूपच चांगली माहिती मिळाली एकाच प्रश्न. ह्या व्यक्तीने बर्याच लोकांना मृत्युपत्राबद्दल सांगितले होते. पण सहसा असे होत नसावे. म्हणजे जर मी आणि नवरा मृत्युपत्र केल्यानंतर गचकलो आणि कुणाला कल्पनाच नसेल कि मृत्युपत्र केलेले आहे तर? किंवा माहीत असलेल्या लोकांनी वेळेत एक्झिक्युटर ला कळवले नाही तर काय होण्याची शक्यता आहे? एक नक्की की ही एक्झिक्युटर ची माहिती खूप उपयुक्त आहे. सहा महिन्यांपूर्वी स्वर्गवास झालेल्या माझया नातेवाईकांच्या फॅमिली ला किती त्रास सहन करावा लागतो आहे ते पाहून मी सुद्धा हा विचार सुरू केलाच होता. आम्ही पुढल्या दहा वर्षात वर पोचलो तरी आमची मुले अज्ञान असणार. अश्या वेळी काही वेगळी व्यवस्था करून ठेवता येईल का? मुलांचे शिक्षण नीट होऊन नंतर आमच्या इच्छे प्रमाणे त्यांना संपत्ती मिळेल असे काहीतरी हवे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Sun, 07/31/2016 - 16:06 नवीन
पहिल्या प्रश्नाचं उत्तर मला ठाऊक नाही. सदर वृद्ध व्यक्तीचं पेन्शन महाबँकेतच येत असे, आणि पेन्शन खातं दर वर्षी एकदा माणूस हयात असल्याची खातरजमा करतातच. त्यामुळे एक्झि० ट्रस्टींनी वेगळी भानगड ठेवली नव्हती. (ही फ्लेग्झीबीलिटी मला आवडली. नाहीतर नियमावर बोट ठेवून आणखी एक कागदी घोडा बनवणं त्यांना सहज शक्य होतं.) वारसदार अज्ञान असेल तर तो सज्ञान होईपर्यंत ते ट्रस्टी राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झकास
ग
गंम्बा Wed, 07/27/2016 - 15:06 नवीन
धन्यवाद असंका. मी ह्याच गोष्टीच्या शोधात ह्या धाग्यावर सारखा येत होतो. इच्छापत्र करा, माहीती देऊन ठेवा हे सर्व ठीक आहे. पण असे ट्रस्टी आणि एक्झीक्युटर असणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
आ
आनंद Wed, 07/27/2016 - 09:03 नवीन
अश्या प्रकारची ठराविक वेळेला पडणारी स्वप्ने म्हणजे ब्लॅडर फुल्ल झाल्याची निशाणि असु शकते. मेंदु अश्याप्र्कारचे धक्का दायक स्वप्न पाडुन उठवण्याचा प्रयत्न करु शकतो. तु ३ किंवा ४वाजता उठुन मोकळा होउन ये. मग बघ स्वप्न पडतय का ते?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/27/2016 - 09:09 नवीन
हेचि फळ काय मम चिंतनाला. असो, डोन्ट माईंड आनंद पण माझा मेंदू ब्लॅडर फुल्ल चा मेसेज असा क्रिप्टिक कधी देत नाही. सरळ मेसेज येतो आणि मी उठून रिकामा होऊन परत झोपतो. (च्यामारी वाघाचा मेसेज आठवला) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद
न
नाखु Wed, 07/27/2016 - 13:13 नवीन
श्री अभ्याशेठ यांना एक मोठ्ठा आरसा ( ते दिसू शकतील असा व्यायाम्शाळे सारखा),रात्री झोपताना वाचण्यासाठी चांदोबाचे जुने अंक व काही सिंड्रेला समान परिकथा पुस्तके,एक नवरत्न तेलाचा बाटली आणि आगामी कट्ट्याला पुर्णवेळ हजर राहण्याचे आवतान देऊन करण्यात येत आहे.
अध्य्क्ष : मनाचा थांग पेश्शल आदरणीय गावडे मास्तर प्रमुख पाहुणे : विश्वात भाव ओतणारे जग्नमित्र कवी लोकप्रिय साहित्यीक श्री रा रा आत्मुदा चारोळीवाले. इतर मान्यवर : या वयातही गुलाबी बाणा जपणारे बिरुटे सर,भटकंतीवाले वल्ली महोदय्,आद्य पोपाचार्य गिरिजा,जाग्यावर टांगा पलटीफेम वप्याडाव
आपले नम्र. नाखु,चौरा पिंपरीचिंचवडकर यशोमैया संचालित अभ्या फॅन क्लब किसनदेव स्म्चालीत अभ्या चाहता संघ ठाणे डोंबवलीसह अद्या यांचा बेळगाव निपाणी चिकोडी,अथनी हुबळी सह सत्कार संघ
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे Wed, 07/27/2016 - 13:52 नवीन
स्वप्नांना काहिही अर्थ नसतो. इतके गांभीर्याने घेण्याची गरज नाही. बाकी आर्थिक व्यवहार घरच्यांना माहिती करुन देणे वगैरे कायम करत रहावे (स्वप्नाच्या ट्रीगरची गरज नाही)जेव्हा जेव्हा काही नवी गुंतवणूक कराल तेव्हा. खरतर त्यांच्याशी सल्लामसलतीनेच करावे व्यवहार म्हणजे वेगळी माहिती करून देण्याचीही गरज नाही. बाकी स्वप्नातील घटना वगैरे वापरून आणि वर तुमचा मालमसाला घालून मस्तपैकी लेख लिहा इथे.. :-)
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 07/27/2016 - 14:10 नवीन
झोपेतली स्वप्ने झोपेतली " च " असतात अभ्या , हो , जागेपणी पडलेली / बघितलेली स्वप्ने पूर्ण होत नसतील तर मात्र काही तरी केलं पाहिजे . बाकी नको एवढा विचार करू . Enjoy the work you do.. make sure you earn enough for it. give your parents and wife/ would be wife enough to be happy. and leave everything else to the monk ;)
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 07/27/2016 - 14:54 नवीन
कं लिव्लय अद्द्या"सर"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
ग
गामा पैलवान Wed, 07/27/2016 - 14:56 नवीन
अवांतर : अभ्या.., स्वप्नात स्वत:चा मृत्यू म्हणजे आरोग्याची सुचिन्हे. मज्जाय बाबा तुमची. संदर्भ : http://www.astrogyan.com/dream_prediction_result/did-1437/indian_astrology_dream_prediction_result.html आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
अ
अमेरिकन त्रिशंकू Wed, 07/27/2016 - 16:10 नवीन
भारतात हा विषय कितपत चर्चिला जातो की नाही हे माहिती नाही पण medical directive and medical power of attorney हाही एक महत्वाचा विषय आहे. डॉक्टर मंडळी यावर पण लिहा किंवा एक वेगळा धागा काढा. अतुल गावंडेचं "Being Mortal" हे पुस्तक वाचण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 07/27/2016 - 17:42 नवीन
मला अंधश्रद्धाळू समजाल, पण भावा माझ्या नोकरीत अश्या अश्या गोष्टी पाहिल्यात का माझा भरोसा बसला, कधीही पहाडावर चढाईच्या अगोदर आम्ही पर्वतराज नगारु (स्थानिक भाषेत)ची पूजा केल्याशिवाय म्हणूनच चढत नाही, तर.... कसे करावे? शनिवारी मस्त अंघोळ कर, जुन्या चपला पायात घाल, नव्या पिशवीत घे, एक नारळ घे, फुलं उगाअसल्यास घे, तेल अन अख्खे उडीद न विसरता घे,अन तडक आपला गरिबांचा वाली हनुमान पकड, करायचे काहीच खास नाही मनापासून भीमरूपी महारुद्रा किंवा चालीसा म्हण एकदाच, दंडवत घाल नारळ वाढव, खाऊ नकोस सोबत घे, तेल उडीद देवास वहा, बाहेर पडलास का जुन्या चपला तिथेच सोड अन बदली म्हणून आणलेल्या चपला घाल, दोन बाजूला दोन भकले फेकून दे नारळाची, अन जा कामाला बिनधास्त! किंवा बेस्ट, आईकडून मीठमिरची ओवाळून घे गड्या! त्यासारखे कवचच नाही :)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 07/27/2016 - 17:54 नवीन
बापू, मनातला धसका हा प्रकार मानासिकच आहे, ह्या उपायाने मनोबल वाढत असेल तर हे पण करीन. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे असे उपाय माझी आई ज्या काळजीपोटी करते त्याच काळजीने तू सांगितलं म्हणून अवश्य करिन. जय बजरंगबली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 07/27/2016 - 18:39 नवीन
सगळा खेळच मानसिक असतोय गड्या, आम्ही पर्वताची पूजा करतो खरे पण वेळेला जर avalanch आलेच तर काय उपडणार आम्ही? (हिमालयातले उगा बारके avalanch सुद्धा काहीशे टन बर्फ आणते खाली) बारक्यातल्या बारक्या avalanch मध्येही सापडलो तर पावणे सहा फुट (१७५ सेमी) चा बाप्या क्षणात जीबुलानी फुटबॉलच्या आकाराचा होऊ शकतो, पण तरीही पूजा होतेच रे, अन मिळते ते मनोबलच,माझी पोरे भोळी असतात रे ग्रामीण भागातली भारताच्या कानाकोपऱ्यातली, त्यांना आसरा वाटतो त्या फडफडत्या दिव्याचा, अन खोटे कश्याला बोलू लगा मी साहेब असलो तरी मी बी गावठीच! मला पण आसरा वाटतोच, ह्यात वरतीच लिहायचे राहिले खरे पण ह्याला उगा पूजा नजर वगैरे नको पाहू तर एक मानसिक समाधान म्हणून पाहा हे अध्याहृत आहेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
उ
उडन खटोला Wed, 07/27/2016 - 19:16 नवीन
हे वेग्ळेच आहेत साहेब. मस्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
मुक्त विहारि Wed, 07/27/2016 - 18:13 नवीन
एक नंबर. कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण..... मलातरी तेल आणि उडीदाचा जबरदस्त फायदा झाला आहे. आजी कडून मीठमिरची ओवाळून घेतलेस तर फार उत्तम. बजरंगबली की जय. ह्याचा फायदा झाला तर व्यनि केलस तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ख
खटपट्या Wed, 07/27/2016 - 18:43 नवीन
तेल घरुन घेउन जा. नाहीतर मंदीरातून बाहेर पडणारे तेल बाटल्यात भरून तीथेच विकायला बसलेले असतात. :) रुइच्या पानांच्या हाराचेही तेच. आमचा क्लास मंदीरासमोर असल्यामुळे ही गंमत बघायला मिळायची. कोणा गरीबाचे पोट भरत असेल मारुती रायामुळे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 02:59 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 07/28/2016 - 10:42 नवीन
कुणी ह्याला अंधश्रद्धा म्हणु शकते, पण.
हो ना , पाहुया आता खरे डॉक्टर काय म्हणतात ते .. औचित्यभौचित्यभंग वगैरे वगैरे... आता कळेल की त्यांचे स्कोरसेटलिंग केवळ आमच्यापुरतेच मर्यादित आहे की सार्वत्रिक सार्वजनीन आहे ते !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
स
स्पा गुरुवार, 07/28/2016 - 11:45 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/28/2016 - 15:18 नवीन
मग डुआयडीच्या त्रासावरदेखिल वापरून पहा तेल, उडीद, नायतर आजीकडून दृष्ट सगळं मानसिकच असतं .. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 07/28/2016 - 15:42 नवीन
डू.आय.डी. हा जर मानसिक विभ्रम असता, आणि त्यांचा प्रश्र्न जर फक्त माझ्यापुरताच मर्यादित असता, तर गोष्ट वेगळी होती आणि आहे आणि असेल. डू.आय.डी. ही मिपाला लागलेली कीड आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. बादवे, तुम्हाला डूआयडींच्या बद्दल काळजी वाटते, हे वाचून कौतूक वाटले.... असो, आपल्या सारख्या डू.आय.डींच्या पाठीराख्याला उप-प्रतिसादांचा खेळ खेळण्या इतका आम्हाला वेळ नाही.... हा ह्या धाग्यावर आमचा, आपल्याला शेवटचा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 07/28/2016 - 16:06 नवीन
डु आयडी मानसिक विभ्रम नव्हे हो.. करुन घेतलेला त्रास मानसिक असतो.. सगळे करून घेतात का?? म्हणून मानसिक म्हटलं. एवढ्यावरून तुम्ही तर डु आयडींचा पाठीराखा वगैरे ठरवून स्वर्ग सुतावरून गाठलात.. असो _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
श
शिद Fri, 07/29/2016 - 18:02 नवीन
अभ्या..मस्त खा, प्या आणि मज्जा करा. मज्जानू लाईफ. जास्त विचार नका करू. बाकी, हा धागा काढल्याबद्दल धन्यवाद. बरीच उपयुक्त व नविन माहीती मिळाली. वाचनखूण साठवली आहे.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 07/29/2016 - 19:06 नवीन
बरेच दिवस हा धागा पाहतोय, वाचतोय, तुला नक्की काय प्रतिसाद द्यावा हेच सुचत नव्हतं. शेवटी दोन ओळी मनात आल्या त्या देतोय खाली तुझसे बिछडने के ख्वाब आते है, नींद से भरी गहरी रात में, सुना है तू सोच रहा है, जाते जाते क्या दे जाऊं मेरे हात में | जिंदा है तू, सांस ले रहा है, दुनिया है मेरी तेरी मुलाकात में, सचमें बता, क्या रख्खा है, जेवर, मकान, पैसे और कागजात में | अभ्या, लगा... ठणठणीत तंदुरुस्त र्‍हा. हे स्वप्न पडण्याचं कारण शोध. कोणत्या तरी भयंकर प्रेशरखाली अशी स्वप्नं पडणं कॉमन आहे. ते टेन्शन समोर दिसत नाही, बॅक ऑफ द माइन्ड तयार होतं. बीन देअर, डन दॅट!!
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sat, 07/30/2016 - 21:11 नवीन
स्वप्न वाइट असले की प्रतक्षात चांगल्रे होते व वाइस वर्सा. असे ऐकले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंपाबाई Sat, 07/30/2016 - 21:15 नवीन
वर गामा पैलवानानेही असेच मत लिहिले आहे. गामाचे व माझे एकमत झाले. हे स्वप्न आहे की सत्य?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
ग
गामा पैलवान Sat, 07/30/2016 - 23:19 नवीन
चंपाबाई, माझं मत संदर्भ देऊन व्यक्त केलं आहे, तर तुमचं मत असांदर्भिक आहे. यावरून आपली सहमती स्वप्नातली नसून सत्यातली आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चतुरंग Sat, 08/13/2016 - 04:45 नवीन
जेमतेम ४० वर्षांचा माणूस हार्टअ‍ॅटॅकने गेला आणि मला हा धागा आठवला!! :( आयुष्यातली क्षणभंगुरता आपण टाळू शकत नाहीच परंतु मागे राहू शकणार्‍यांची तजवीज करणे अत्यंतिक गरजेचे आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आणि सगळा दिवस एका विचित्र अस्वस्थतेतच गेला....
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा