Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण

त
तिमा
गुरुवार, 08/04/2016 - 08:32
🗣 169 प्रतिसाद
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो. समजा, तुम्हाला तातडीने दुसर्‍या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्‍या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अ‍ॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात. आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले. तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?

प्रतिक्रिया द्या
26618 वाचन

💬 प्रतिसाद (169)
म
मृत्युन्जय Wed, 08/10/2016 - 06:18 नवीन
मागच्या जन्मी आपण काही तरी वेडे-वाकडे पाप केले म्हणून ह्या देशांत जन्म झाला, असे माझे मत. पापे कमी पडली म्हणायची नाही तर पाकिस्तान, सोमालिया, नायजेरिया, चाड रिप्लब्लिक, सुदान, सिरीया, म्यानमार, घाना, पॅलेस्टिन यांची दारे पण नविन जन्म घेणार्‍यांसाठी उघडीच होती की. गेला बाजार सौदी, येमेन, अफ्गाणिस्तान, काँगो हे देखील कमी नाहित. या देशांमध्ये बाई म्हणून जन्माला आला असतात तर नरक पण बरा वाटला असता डेन्मार्क, स्विझर्लंड, न्युझीलंड इत्यादी देशांमध्ये जन्म घेण्याएवढे पुण्य नसेल कमावले कदाचित पण वरीलपैकी एखाद्या देशात जन्म नाही घेतलात हे सुद्धा मोठे पुण्याचेच काम म्हणायचे की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 08/10/2016 - 14:32 नवीन
=)) तर्कशास्त्राच्या कसोटीवर उतरणारा प्रतिसाद ! मुविसाहेब, मुद्दा विचार करण्यायोग्य आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
अ
अभ्या.. Wed, 08/10/2016 - 16:06 नवीन
हा ना. शिवाय गतजन्मी कुणा खबुत्रांना चार दाणे जास्त घातल्याबद्दल चारचौघात हे मत बोलायला मिळाले हेही नसे थोडके.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बाळ सप्रे गुरुवार, 08/04/2016 - 09:04 नवीन
दिलेली उदाहरणे जीवनतील अनिश्चिततांची आहेत. भ्रष्टाचार नसला तरीही अनिश्चितता या रहाणारच. त्यामुळे पूल पडणे वगैरे दुर्घटना समजून सोडून देणे याखेरीज जास्त विचार करण्याला अर्थ नाही. (सामान्य माणसांनी.. पूलाच्या घटनेसंदर्भातील अधिकारी / अभियंते यांनी नव्हे) आता चांगली वाईट माणसे सगळीकडेच असतात. म्हणून आपण पूल दुर्घटनेला घाबरून पुलाशी येउन थांबून राहू शकत नाही. आता अनिश्चितता स्वीकारणे म्हणजे देवावर भरोसा म्हणजेच आस्तिकता म्हणजेच विज्ञाननिष्ठेशी प्रतारणा समजायचे काहीच कारण नाही.
  • Log in or register to post comments
उ
उडन खटोला गुरुवार, 08/04/2016 - 09:20 नवीन
लेख गंडलाय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 08/04/2016 - 10:00 नवीन
ज्यांना या देशात जन्म झाला याचे वाईट वाटते, त्यांनी इतर देशातल्या (अगदी विकसित देशातल्याही) लोकल बातम्या जरा वाचायची सवय लावून घ्यावी, 'अदर साईड ऑफ ग्रास इज ग्रीनर' म्हणून कुढत बसण्यात पॉईंट नाही, एखाद्याला जसे हवे तसे आयुष्य देण्याची क्षमता या माझ्या देशात नक्कीच आहे, "आपलीच झोळी दुबळी आहे का" हे तपासून घेऊन नंतर देशावर टीका करणे योग्य....
  • Log in or register to post comments
अ
अमितदादा गुरुवार, 08/04/2016 - 10:31 नवीन
सहमत। चांगल्या भौतिक सुविधा, चांगली शासन व्यवस्था, चांगली शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था ह्या सुविधा परदेशात काही एका दिवसात आलेल्या नाहीत, त्या काही शतकांच्या सिव्हिलिझशन आणि industrialization चे परिणाम आहेत. आणि इकडे social issue हे भविष्यात भयंकर रूप धारण करतील किंवा करत आहेत हे अनुभवतो आहे, पुढील पिढी मानसिक समाधानी असेल का ह्याच इकडचे तज्ञ चर्चा करत असतात. आणि भारत ज्या स्टेज मधून जात आहे त्या स्टेज मधून कित्येक देश गेले आहेत मोठं उदाहरण चीन. आपल्या हि देशाचे दिवस बदलतील पण ते बगायला आपण असू कि नाही माहित नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 10:15 नवीन
तिमा, आयुष्य रँडम असतं हो. जास्त लोड घेण्यात पॉईंट नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/04/2016 - 10:25 नवीन
चला चारशेची निश्चिती.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 08/04/2016 - 10:31 नवीन
माझ्या गतजन्माचं माहित नाही पण दहा शतकांपुर्वी या देशात सोन्याचा धूर निघत होता ना? आता जर्मनीत निघतो उसात निघतो तिकडे घुसताहेत/धावताहेत.जिथे आपण आहोत तिथेच काढूयाना सोन्याचा धूर.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/04/2016 - 10:31 नवीन
तिमा उगाच जास्त विचार करु नका नाहितर डोक्याला या पेक्षा मोठा शॉट बसेल. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार गुरुवार, 08/04/2016 - 13:30 नवीन
अजून एक. हे असे विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ, नास्तिक, गोब्राम्हणप्रतिपालक, धर्मपरायण असले शिक्के स्वतःवर मारुन घेउ नका. मारुन घेतले असतील तर ते ओले आहेत तो पर्यंत पुसून टाका. असला शिक्का कपाळावर नसला की विचार करणे किंवा व्यक्त होणे, प्रश्र्णांची उत्तरे शोधणे सहज सोपे होते. मग आपण सर्वच प्रश्र्णांची उत्त्तरे आपल्याच डबक्यात शोधत बसत नाही. एखाद्या प्रश्र्णाचे विज्ञानाला उत्तर देता आले नाही तर ते दुसरीकडे शोधण्याचा मोकळे पणा असायलाच हवा. उत्तर मिळणे महत्वाचे, कसे मिळाले याला फारसे महत्व देउ नये. असे मला वाटते. विज्ञानानेच / अध्यात्मानेच सगळ्या प्रश्र्णांची उत्तरे द्यायला पाहिजे असा हट्ट कदापी नसावा. याने भ्रमनिरासाशिवाय दुसरे काही पदरात पडत नाही. पाणी नेहमी वहाते असावे नाहीतर मग ते तुंबते आणी त्याला वास यायला लागतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सतिश गावडे गुरुवार, 08/04/2016 - 18:07 नवीन
प्रतिसाद प्रचंड आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/05/2016 - 02:53 नवीन
आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नाखु गुरुवार, 08/04/2016 - 10:37 नवीन
मोठ्या (आणी जाणत्या) लोकांच्या मांदीयाळीत "वाचकाला विचारतो कोण?" या न्यायाने गप्प आहे. मिपाकर वारकरी नाखु
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 08/04/2016 - 15:28 नवीन
तुम्हाला या देशात जन्म घेणे पाप वाटते का? एवढच सांगा [ आणि कळपात या , किती दिवस कुंपणावर ? =)) ]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Fri, 08/05/2016 - 05:14 नवीन
मला माणसाने जन्माला येणेच पाप वाटू लागले आहे.... तोच नसता तर मिपाकाथ्याकुट चावणे,मिपाकवीता पचवणे आणि मिपासाहीत्य चघळणे नशीबी आले नस्ते. पण असे मत दिल्यावर मी धर्मसंस्कृती रक्षकांना पाखंडी/धर्मभ्र्ष्ट तर कट्टर नास्तीकांना (नशीब आणि पुण्य शब्दाने) अगदी देवभोळा,आणि कर्मकांडी असल्याची ठाम समजूत होते. अता ही दोन्ही धॄवावरची माणसे आपलीच (मिपाकर)आहेत म्हणून कुंप्णावरून भींतीवर जायचा विचार करतोय्,पण अभ्या भिंतीवच्यांना ढकलून देतो त्यामुळे दुसरा ऊपाय शोधावा. पुन्हा वाचकांचीच पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मुक्त विहारि Fri, 08/05/2016 - 05:22 नवीन
+ १ माणसाचा पाय ह्या पृथ्वीवर पडला आणि पृथ्वीची वाट लागायला सुरुवात झाली. निसर्गाशी सगळ्यात बेईमानपणे वागणारा, सगळ्यात खतरनाक प्राणी म्हणजे माणूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ज
जाबाली गुरुवार, 08/04/2016 - 10:49 नवीन
यथा धेनुसहस्त्रेषु वत्सो विन्दति मातरम् | तथा पूर्वकॄतं कर्म कर्तारमनुगच्छति || विज्ञाननिष्ठ राहणे कठीण आहेच. मनुष्य प्राण्याचा स्वतःवर ताबा नाही. केस वाढवणे थांबवू शकत नाही, वृद्ध होणे थांबवू शकत नाही आणि ईतरसुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत. आज काल आपल्या पूर्वजांच्या विचारांना झुगारून देण्याची फॅशन आली आहे. आपण कर्म करीत राहावे आणि शेवटी कृष्णार्पणमस्तु... असेच होते !
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/04/2016 - 11:06 नवीन
मागला जन्म आणि पापपुण्य या कल्पना सत्य आहेत असं क्षणभर मानून आणि आपल्या देशातल्या सर्व परिस्थितींचा पूर्ण विचार करुन आणि जे काही आठदहा भारताहून प्रगत आणि कमी प्रगत मानले जाणारे इतर देश थोडक्यात का होईना पण पाहिले त्या सॅम्पलवरुन (अनेक देश फार आवडूनही) सर्व जन्मांचं उत्तमात उत्तम फळ म्हणूनच भारतात जन्म मिळाला असं म्हणावंसं वाटतं. काळासोबत हे मत अधिकाधिक पक्कं होत गेलं आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 08/04/2016 - 11:16 नवीन
जे ब्बात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
उ
उडन खटोला गुरुवार, 08/04/2016 - 11:20 नवीन
तालियाँ. .. संपादित व्यक्तिगत टिपणी टाळावी. .......... व्यवस्थेला निव्वळ नावं ठेवण्यापेक्षा व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 11:50 नवीन
....व्यवस्थेमध्ये उतरून सुधार करावा." आपण बहूदा असे करायचा प्रयत्न केला असावा किंवा करणार असाल. मी प्रयत्न केला.अपयश आले आणि माघार घेतली. तितका वेळ आणि पैसा आणि श्रम माझ्याकडे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/05/2016 - 02:54 नवीन
व्यवस्था चालकांना हेही जमत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उडन खटोला
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 11:47 नवीन
पण.... जी जी शहरे मी दर १०-१२ वर्षांनी पाहतो, ती ती शहरे (मग ते डोंबोली असो, की बदलापूर किंवा ठाणे किंवा कल्याण, विदर्भातल्या वर्धा, नागपूर, इथलीही परिस्थिती काही वेगळी नाही.) दिवसेंदिवस अधिकाधिक बकाल झालेलीच आणि सामाजिक सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेलीच दिसतात. कदाचित आमच्या नजरेचा दोष असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
श
शलभ गुरुवार, 08/04/2016 - 12:28 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
स
सुमीत भातखंडे गुरुवार, 08/04/2016 - 15:05 नवीन
एकदम मनातलं बोललात. हजार वेळा सहमत. (पुण्यवान) सुमीत भातखंडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ल
लाल टोपी गुरुवार, 08/04/2016 - 21:24 नवीन
गविंशी शतशः सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
आ
आजानुकर्ण गुरुवार, 08/04/2016 - 21:59 नवीन
उत्तम प्रतिसाद गवि! भारत आणि अमेरिका या दोन देशांत वास्तव्यानंतर सर्व जन्मांचं उत्तमात उत्तम फळ म्हणूनच भारतात जन्म मिळाला असंच मलाही म्हणावंसं वाटतं. काळासोबत हे मत अधिकाधिक पक्कं होत गेलं आहे. गेल्या साठ वर्षात भारताची चांगली प्रगती झाली आहे. उत्तरोत्तरही प्रगतीच होणार आहे असा मला विश्वास वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 08/07/2016 - 08:39 नवीन
गविंच्या मताशी सहमत. बराय भारतात मी आणि सूखी आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मोहनराव गुरुवार, 08/04/2016 - 11:59 नवीन
कोणताही देश परफेक्ट कधीच नसतो. त्याला परफेक्ट बनवावं लागतं. सगळंच काही राजकारण्यांवर सोपवुन शिव्या देत बसण्यात काही अर्थ नसतो. नाम सारख्या लोकसहभागातुन साकारलेल्या संस्थांनी हे दाखवुन दिले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजित - १ Fri, 08/05/2016 - 16:50 नवीन
नाम बीम या सगळ्या राजकारणी लोकांच्या दृष्टीतून "निरुपद्रवी" संस्था आहेत. त्याच्यातून बाकी काहीही सध्या होणार नाहीए. व्यवस्थेत काहीही बदल होणार नाहीएत हे सत्य आहे. जर का व्यवस्थेत बदल करायचा , अगदी व्यवस्थे विरुद्ध एखादा प्रश्न विचारायचा प्रयत्न जरी केलात ना तर इथे भारतात तुमचा सतीश शेट्टी ( भ्रष्टवादी च्या राज्यात ) / सत्येंद्र दुबे ( भाजपच्या राज्यात ) होतो. अशी शेकडो उदाहरणे इथे भारतात मिळतील. अमेरिकेत असे होत नाही. फक्त माफिया ला नादाला तर शक्यता आहे .. नाहीतर बहुतेक वेळा नाहीच. फॉक्स वॅगन चा झोल शोधला गेला. इथे असा कोणी शोधायला गेला असता तर कधीच वर पोचला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 08/04/2016 - 12:02 नवीन
मागच्या जन्मी मुविंनी वेडीवाकडी पापे केलीत. या जन्मात सरळ पापं करा ;) नेक्ष्ट जन्म वेगळ्या देशात मिळेल
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 08/04/2016 - 12:28 नवीन
हीहीहीही. सरळ पापाने वेगळ्या देशात म्हण्जे उदाहरणार्थ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 12:48 नवीन
होना... एक साधे चालणे पण ह्या देशांत स्वस्थपणे उपभोगू देत नाहीत. एका देशात, मी कधी सलग ५-६ किमी चालत असतांना ना फूटपाथ मध्ये खड्डा आला ना कुणी हॉर्न वाजवला ना फेरीवाले आडवे आले. असो, प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या. तसेच, वैयक्तिक आणि सामाजिक जाणीवेच्या कल्पना पण वेगळ्या-वेगळ्या. एखाद्याला हॉस्पीटलच्या खाली सुरु असलेला बँड म्हणजे आनंद वाटत असेल, (आमचा सण आहे, आम्ही वाजवणारच, हे उत्तर ऐकलेले आहे.) तर दुसर्‍याला त्या हॉस्पीटल मधल्या रोग्यांविषयी कणव वाटत असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर गुरुवार, 08/04/2016 - 12:16 नवीन
इंजिनिअर कोणत्या कोट्यातून आला त्यावर पुलाचे भविश्य ठरते हे लॉजिक पटले नाही.आणि आजकाल खाऊजा धोरणामुळे pwd ला काही काम नसते .सगळे पुल ,सार्वजनिक बांधकामं खाजगी कंपण्यांना कॉन्ट्रॅक्ट देऊन बांधली जातात,अश्या कंपण्यात ' जात्यात हुशारचा ' टेंभा मिरवणारेच अधिक आहेत हेवेसांनल.परवा जो पुल पडला तो १९२८ साली बांधला होता व त्यावरचे विंजेनिअर त्याकाळानुसार 'जात्याच हुशार' कॅटेगरीतले होते.
  • Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे गुरुवार, 08/04/2016 - 12:24 नवीन
पुलाचे भविष्य ठरवायला इंजिनिअरची कॅटॅगरी काढायची गरज नाही हे पटले. पण हे सांगताना १९२८ सालच्या इंजिनिअरची कॅटॅगरी काढणेदेखिल तितकेच हास्यास्पद. बादवे १९२८ सालच्या ईंजिनिअरने आपले काम चोख केले आहे. आजच्या स्ट्रक्चरल ऑडीट करून या पुलाला पास करणार्‍याबद्दल विधान असते तर एकवेळ समजू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
च
चंपाबाई गुरुवार, 08/04/2016 - 13:27 नवीन
आणि हा कोटा फक्त जात आरक्षणाचाच बरं का ! पेमेंट आरक्षणावर टीका नै करायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
अ
अनिरुद्ध.वैद्य Fri, 08/05/2016 - 02:56 नवीन
त्येंनी पत्र पाठवले होते म्हणे. यंद्याच्या हुशार लोकांनी फेकून दिले त्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्बोचार्जड फिलॉसॉफर
प
पैसा गुरुवार, 08/04/2016 - 13:25 नवीन
काय झालं तिमा? निराश होण्यासारखं काही तात्कालिक घडलंय का? तुम्ही निराश वाटताय. तुम्हालाच यातून बाहेर यावे लागेल. मध्यंतरी अशा काही दुर्दैवी घटना एकामागून एक कानावर आल्या की रोज सकाळी आपण उठून श्वास घेतो आणि उद्याचा विचार करतो हाच मोठा चमत्कार वाटायला लागला. खरंच माणूस म्हणून जन्माला येणं हे मोठं नशीबच म्हटलं पाहिजे. मग ते मिळालेलं किंवा घडलं/बिघडलेलं आयुष्य बरंवाईट कसंही असो. त्याचा विज्ञाननिष्ठ असण्या नसण्याशी काही संबंध नाही. आपण मेलो की श्वासाबरोबर सगळंच संपणार आहे. तेव्हा आपल्यासाठी देव नशीब आणि ज्ञान विज्ञानासकट सगळंच संपलेलं असेल. नका जास्त विचार करू. आला तो दिवसच काय क्षण सुद्धा आपला म्हणायचा. उद्या कोणी बघितलाय?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 13:46 नवीन
तिमांचा मुद्दा फार वेगळा आहे. इतरांनी केलेल्या चुकीसाठी, सामान्य माणसाने आपले आयुष्य पणाला का लावावे? आणि त्या चुकी साठी हे असे बळी का जावेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा गुरुवार, 08/04/2016 - 13:54 नवीन
चूक कोणाची कसे ठरवणार? आपण सगळेच त्या सिस्टीमचा भाग आहोत. दुसर्‍याकडे बोट दाखवून मोकळे होता येत नाही. आणि खरंच सांगा, आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का? तुम्ही विज्ञाननिष्ठ रहा की पोथीनिष्ठ, पुढच्या क्षणी आपण जिवंत असू अशी काय गॅरेंटी आहे? तरी आपण उद्या सकाळी उठून काय करणार याचा विचार करतोच ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 14:18 नवीन
असे नसते हो. साधारणतः प्रत्येक आस्थापनांत, अपघातांची पुनरावृत्ती परत घडू नये म्हणून प्रयत्न केले जातात. त्यासाठी योग्य ती उपाय=योजना पण केली जाते. एखाद्या व्यक्तीचे नैसर्गिक मरण वेगळे आणि एखाद्या गटाचे सामुहिक अपघातात मरण ओढवणे वेगळे. हलगर्जी पणामुळे घरी असतांना गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होवून अपघात होणे आणि हलगर्जी पणामुळे एखाद्या हॉटेलमधील गॅसचा स्फोट होवून अपघात होणे वेगळे. काही आस्थापनात काही वर्षे डिझास्टर मॅनेजमेंट मध्ये काम केलेले असल्याने, भारतात सामाजीक सुरक्षेला अद्यापही म्हणावे तसे स्थान नाही, हे खेदपुर्वक म्हणावे लागते. ------- "आपण माणूस म्हणून जन्मलो नसतो तर हे सगळे असेच वाटले असते का?" कधी-कधी वाटते की, ह्या जगांत माणूस जितका स्वार्थी, तितका कुणीही स्वार्थी नाही.त्यामुळे इतर कुठल्याही प्राण्यांच्या रुपात जन्मलो असतो तरी, बहूदा माणसांच्या बाबत असेच मत आज तरी झाले असते. घरातील पाळीव प्राणी पण ह्या ना त्या रुपात त्यांना दिलेल्या अन्नाची परतफेड करत असतात, पण मनुष्य प्राणी मात्र, जिथे खाईल तिथेच घाण करेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
क
कपिलमुनी गुरुवार, 08/04/2016 - 15:31 नवीन
भारतात सामाजीक सुरक्षेला अद्यापही म्हणावे तसे स्थान नाही, हे खेदपुर्वक म्हणावे लागते.
सहमत ! बहुधा जास्त लोकसंख्या असल्याने ( अपघातात) माणूस मरणे ही घटना सामाजिकरीत्या संवेदनशील राहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
त
तिमा गुरुवार, 08/04/2016 - 15:07 नवीन
मी निराश वगैरे अजिबात झालो नाहीये. या देशांत जन्म घेतल्याचा मला आनंद आणि अभिमानच आहे. आपल्या देशावर प्रेम आहे म्हणूनच महाड सारख्या घटना घडल्या की दु:ख होते. वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच. जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात. मी फक्त राजकारण्यांना दोष देत नाही. या देशातल्या प्रत्येक माणसाला, 'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन. बाकी या निमित्ताने ज्या प्रतिक्रिया आल्या व येत रहातील त्या सर्वांचे आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 15:22 नवीन
'मी करीन ते प्रत्येक काम परफेक्ट करीन' असे वाटेल तो सुदिन.... असे होणे शक्य नाही. ह्या देशात बर्‍याच व्यक्ती घरात व्यवस्थित असतात, पण घराबाहेर पडल्या, की मग बेशिस्त होतात. आमचे एक बुजुर्ग म्हणायचे ,"शिस्तबद्ध लोकांचा बेशिस्त देश, म्हणजे भारत." सध्या ते इंग्लंडला असतात. "वरवर पहाता ती नैसर्गिक आपत्ती वाटली तरी त्यामागे आपल्या सडलेल्या सिस्टिमचाही सहभाग आहेच.जे आज एकमेकांवर दोषारोप करत आहेत, त्यांना जर आधी त्या पूलाची माहिती होती तर दोन वर्षे स्वस्थ का बसले ? गेलेल्यांविषयी कुणालाच दु:ख नाही, उलट त्यातून राजकीय कुरघोडी सुरु झाल्यात." ते तर फार पुर्वी पासून सुरु आहे.अगदी १०००-१२०० वर्षां पासून हीच स्थिती आहे.अगदी चंद्रगुप्त मौर्याच्या काळापासून.पण निदान त्यावेळी चाणक्य तरी होता, आता चुकुन एखादा चाणक्य झाला तर त्याला पण कुठल्या तरी लफड्यात अडकवतील. म्हणूनच म्हणालो की, हा देश अधोगतीच्या मार्गावर आहे आणि आता प्रगतीचा मार्ग ही फार दूर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
स
स्पा गुरुवार, 08/04/2016 - 14:04 नवीन
न्यूझीलंड ला जॉब मिळायला हवा आवडता देश, जगापासून दूर असतो
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 08/04/2016 - 14:19 नवीन
आमच्या ओळखीतले एक जण तिथेच आहेत. त्यांचे पण हेच म्हणणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 08/04/2016 - 14:29 नवीन
मी अत्ता असाच विचार करत होतो , रेजविक, आईसलॅन्ड येथे जॉब मिळायला हवा आवडता देश, जगापासून दूर असतो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
आ
आदूबाळ गुरुवार, 08/04/2016 - 14:41 नवीन
तिथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. बघा बॉ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा