विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे फार कठीण
एखाद्या भ्रष्टाचारात बुडालेल्या देशांत, विज्ञाननिष्ठ म्हणून रहाणे, हे फार कठीण आहे. उदाहरणे देऊनच ह्या वाक्याचे स्पष्टीकरण देतो.
समजा, तुम्हाला तातडीने दुसर्या गांवी जायचे आहे. वाटेत अनेक पूल आहेत. ते सरकारी यंत्रणांनी तपासून वाहतुकीला खुले ठेवले आहेत. सामान्यतः तुम्ही ठरवल्याप्रमाणे इच्छित स्थळी पोचणारच. पण भ्रष्टाचारी देशात अनेक प्रश्न उदभवतात. आता ते तपासणार्या यंत्रणांमधील इंजिनियर्स हे खरोखरच ज्ञानी आहेत की कुठल्यातरी कोट्यातून अॅडमिशन मिळून पास झालेले आहेत ? तसेच ते ज्ञानी असले तरी कामाशी प्रामाणिक आहेत का नाही ? त्यांच्यावर वरुन दबाव आला आहे का ? या सर्व शक्यतांवर तुमचा प्रवास सुरक्षित आहे का नाही हे ठरते. पावलोपावली भ्र्ष्टाचाराचा अनुभव असल्यामुळे, तुम्ही जास्तीतजास्त काय काळजी घेणार ? म्हणजे शेवटी देवावर्/दैवावर भरवसा ठेवूनच तुम्ही प्रवासाला निघणार! हाच प्रवास रेल्वेने करायचा झाला तरी वरीलप्रमाणेच प्रश्न उदभवतात.
आरोग्यासाठी हिरव्या भाज्या, ताजी फळे खावी असे सांगतात. त्याप्रमाणे तुम्ही आहारात बदल केलेत. तुमच्या खाण्यात शुद्धच भाज्या फळे येतील की रंगवलेली, मेण लावलेली येतील याची काय खात्री ? म्हणजे पुन्हा देवावर, नशिबावर भरवसा ठेवणे आले.
तुम्हाला चर्चगेटहून बांद्रयाला जायचे आहे, वेळ कमी आहे म्हणून तुम्ही विरार फास्ट पकडली आहे. पण दरवाज्यातल्या टोळक्याने तुम्हाला उतरुनच दिले नाही किंवा वाद घातल्याबद्दल चालत्या गाडीतून ढकलून दिले तर तुम्ही इच्छित स्थळी, वेळेत पोचाल याची खात्री काय ? पुन्हा नशिबावर भरवसा.
अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. अशा परिस्थितीत नास्तिक किंवा विज्ञाननिष्ठ कसे रहावे बरे ?
गणामास्तरांसाठी नम्र विनंती : चाफेकर चौकातील पूल हे राजकारण्यांच्या नियोजन शून्य बिनडोकपणाचे स्मारक आहे हे तुम्हीच साम्गू शकाल. वल्ली शेठ: हा पूल सद्यकालीन असल्याने तसेच (त्यांच्या घरासमोरील पूलाचा त्यांना १ पैसाही उपयोग होणार नाही,पण त्रास नक्कीच होणार आहे) तरी लिहिणार नाहीत. दोन्ही पुलांचा अनुभव असलेला नाखु
टेढा है पर मेरा है।हे नक्की, पण... "और इसको सिधा करने के लिये खुद मुझे सिधा होना पडेगा और दुसरोंको सिधा बनानेमे योगदान भी देना पडेगा।"... या पुढच्या मुद्द्यात आपण कमी पडतो. ...आणि हाच मुख्य मुद्दा एखादा देश विकसित आहे/होईल की अजून बराच काळ अविकसित (किंवा जीवाला बरं वाटावं म्हणून वापरला जाणारा शब्द... विकसनशील) राहील ते ठरवतो. :) :(