पुण्यातील माहिती अधिकारी कार्यकर्त्याच्या हत्येचे गूढ
सध्या एक जुनी बातमी वाचली ,,,पुण्याच्या एक RTI कार्यकर्ते ची हत्येच्या तपासाची.......
तो कार्यकर्ता एका रोड बनवणाऱ्या कंपनीने अवैधरित्या संपादित केलेल्या जमिनीची माहिती बाहेर काढत होता. जेव्हा त्या कंपनी चे गैरव्यवहार बाहेर पडायला सुरवात झाली ,,,त्या नंतर लगेचच या कार्यकर्त्याला पुण्यात अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकण्यात आले . त्या नंतर पोलिसानी ज्या पद्धतीने तपास केला त्याचे परिणामी CBI कडे case सोपवण्यात आली. त्या कार्यकर्त्याच्या सख्या भावाने त्याचा लढा पुढे चालू ठेवलाय. तो highcourt मध्ये स्वतः म्हणणे मांडतोय.आणि सगळ्यात वाईट म्हणजे cbi ने पण त्याला आता ठेंगा दाखवलाय . CBI केस बंद करायच्या विचारत आहे म्हणजे बंदच केली होती ,पण त्या सख्या भावाने पुन्हा कोर्टात पिटीशन दाखल करून CBI ला CASE तपास करायला भाग पाडले.
कार्यकर्त्याच्या हत्येला 5 वर्ष उलटून गेल्यावर पण काहीच तपास नव्हता . त्या सख्या भावाचा संशय त्या रोड बनवणाऱ्या कंपनी च्या मालकावर होता ,ती कंपनी महाराष्टाली खूप मोठी रोड बनवणारी कंपनी आहे.ज्यात खूप मोठया लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत.
एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या काही गोष्टी या case मध्ये घडल्या आहेत.
आता सगळ्या पात्रांची नावं सांगतो.
ज्याचा खुन झाला ते सतीश शेट्टी
त्यांचा सख्खा भाऊ संदीप शेट्टी
रोड बनवणारी कंपनी IRB इन्फ्रा.
कंपनी चे मालक वीरेंद्र म्हैसकर.
या हत्येची पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल .
सतीश शेट्टी RIT कार्यकर्ते होते.irb इन्फ्रा ने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या शेजारील गावात अवैधरित्या जमीन संपादित केली होती असा सतीश शेट्टी ना संशय होता . माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सगळी माहिती मागवली आणि त्यांच्या लक्षात आले कि इथे काही काळेबेरे कारभार चाललाय.ज्यामध्ये सरकारी अधिकारी ,irb इन्फ्रा चे अधिकारी ,राजकीय लोक यांचे हितसंबंध गुंतले होते. त्यांनी irb विरोधात complaint दाखल केली. त्यानंतर त्यांना IRB कडून साम, दाम,दंड ,भेद हि नीती अवलंबली गेली. आधी धमकीवजा समाजवण्यात आले.तरी ते ऐकले नाहीत. मग 2 कोटी ची लाच देण्याची गोष्ठ झाली ती हि त्यांनी नाकारली. मग त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी मग पोलीस संरक्षण मागितले कारण त्यांना काही लोकांकडून धोका होता .त्या लोकांची नावे पण त्यांनी पोलिसांना लिहून दिली . तरीपण त्यांची हत्या करण्यात आली.
या नंतर या हत्येचा तपास सुरु झाला.
तपास करणारे अधिकारी यांनी जणू आधीपासूनच ठरवले होते कि काही लोकांना जाणूनबुजून वाचवायचे आहेत.त्या साठी त्यांनी बनावट साक्षीदार तयार केले.त्यात त्यांना यश आले नाही. त्यात एक चमत्कार घडला .राज्य सरकार ने हा तपास CBI म्हणजे देशाची सर्वोच्च तपास यंत्रणे कडे कोणीही मागणी न करता सोपवली. त्या वेळी गृहमंत्री होते आपले आबा .जे आता आपल्यात नाहीयत. CBI कडे CASE गेली कि लोकांना वाटते कि आता दुध का दुध और पाणी का पाणी होते.तसंच सतीश शेट्टी यांचे भाऊ ना पण वाटले ,आणि तपासाची सूत्रे cbi ने मुंबईच्या STF कडे दिली . STF ने चालढकल केली त्यात एक वर्ष गेलं ,त्यानंतर HIGH कोर्ट मध्ये STF म्हटले कि आम्हाला लोंकांची चौकशी करायची आहे,तेव्हा HIGH कोर्ट ने ताशेरे ओढत म्हटले कि या लोकांची नावे संदीप शेट्टी ने एक वर्षांपूर्वी तुम्हाला
सांगितली आहेत .आणि तुम्ही एकवर्ष नंतर तीच नावे आम्हाला सांगताय .मग तुम्ही एक वर्ष काय केलं? अशी ऑर्डर पण त्यांनी दिली ,याची दखल CBI चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन STF कडून तपास काढून घेतला आणि पुण्याचा ACB कडे दिला.नंतर तपासाणे जोर धरला. IRB च्या कार्यालयांवर छापे टाकले .खुप गोष्टी पुढे आल्या. परंतु त्यानंतर CBI च्या वकिलांनी कोर्टात ARGUMENT करणंच
बंद केलं.का कोणास ठाऊक,
थोड्याच दिवसांनी हि case बंद करायचा निर्णय cbi ने घेतला.
परंतु संदीप शेट्टी यांनी हार न मानता पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले .पुन्हा नव्याने पिटीशन दाखल केली . आणि त्यात रिस्पॉन्डन्ट म्हणून cbi चे डायरेक्टर ,आणि तपास करनारे अधिकारी यांना केले.त्यावेळी कोर्टाने पण संदीप शेट्टी ना विचारले कि
आपण इतक्या वरिष्ठ पातळीच्या लोकांना कसे काय रिस्पॉन्डन्ट करू शकता...त्यावेळी संदीप यांनी स्वतः कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले व कोर्टाने हे मान्य केले.
आणि आता height म्हणजे CBI हि CASE पुन्हा रेइन्वेस्टीगेट करणार आहे.म्हणजे इतके वर्षे cbi काय भाकऱ्या थापत होते कि काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
यात हितसंबंध कसे काय आहेत आणि कोनाकोनाचे आहेत याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसून येते कि आपल्या देशातील खुप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे.
देवेंद्र म्हैसकर जे फोर्ब्स मासिकानुसार देशातील पहिल्या 50 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. आणि श्रीमंतीचे रहस्य काय तर रोड तयार करायची मोठी मोठी कंत्राट याना मिळत गेली. Virendra हे नवीमुंबई येथील एका कॉलेज मध्ये डिप्लोमा झालेले आहेत.
त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात दाखल झाले. वीरेंद्र म्हासीस्कर चे वडील कंत्राटदार असताना ते मुंबई मध्ये स्थायिक होते.शिवसेना भाजपा च्या जवळचे होते .ह्या हितासंबंधाच्या जोरावर त्यांनी युतीच्या सरकार वेळी खूप मोठी कंत्राटे मिळवली .आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकार मध्ये बांधकाम व परिवहन मंत्री होते नितीन गडकरी . साहजिक गडकरी यांच्या संमती शिवाय इतकी मोठी कंत्राट मिळणं शक्य नव्हतं. आणि नितीन गडकरी यांचे सुपुत्र देखील या कंपनी च्या भगिनी कंपन्या मध्ये डायरेक्टर बॉडी वर होते असा एक आरोप आहे . या कंपनी मध्ये शरद पवार यांचे पण हजारो शेर आहेत आणि हे त्यांनी जाहीर केले आहे.
त्यात आता पुन्हा युतीचे सरकार आहे . आणि राज्यातली व्यक्ती नितीन गडकरी आता केंद्रात आहेत . साहजिक त्यांचे वजन केंद्रात खुप आहे.
योगायोग बघा , जसं केंद्रात bjp सरकार आले तसं सतीश शेट्टी case मध्ये cbi काम करणं बंद झालंय, म्हणजे ते मनापासून काम करत नाहीय. त्यांना हि case काहीही करून बंद करावी असे आदेश आहेत असाही आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे.
इतकं सगळं लिहायचं कारण कि आपल्या देशात विश्वास ठेवायचा तर कोणावर . राज्यसरकार,राज्यपोलिस, तपास यंत्रणा,राज्यकर्ते,CBI, CID, मंत्री कि आणखी कोण?
आपण अराजकतेकडे वाटचाल करत आहोत का?
असे आणखी 14 rti कार्यकर्ते यांचे बळी गेलेत,,,,त्यांचा तपास शुन्य
दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले,पानसरे गेले,
यांना जेम्स बॉन्ड ने मारले काय?
कि कोणीही या गोष्टींचा छडा लाऊ शकत नाही
का यांनी सर्वांनी स्वतः स्वतः च्या हत्या केल्या,,,सलमान खान case मध्ये चिंकारा काळविटाने पिस्टल ने आत्महत्या केली का?कि फुटपाथ वर झोपलेले लोक स्वतः सलमानच्या गाडीखाली गेले. न्याय लवकर मिळत नसेल तर लोकांनी किती दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या,,,,स्वतः च्या नोकऱ्या सोडून नुसतं कोर्ट कचेरी करायची,,,,आणि यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कोठून?
एकंदरीत माझा स्वतःचा विश्वास या देशावरूनच उडालाय ...इथे पैसा फेको तमाशा देखो असाच प्रकार चाललेय. ज्याच्याकडे पैसा ,सत्ता त्याच्याकडे न्याय . आता तीन महिन्यापूर्वी सतीश शेट्टी प्रकरणामध्ये पहिली अटक झाली आहे आणि ज्यांना अटक झालीय ते आहेत याच case चे तपास करणार पुणे ग्रामीण पोलिसांचे अधिकारी. यांनी जाणीवपूर्वक बोगस पुरावे तयार करून खोटी case तयार केली.मूळ पुरावे नष्ट केले.चुकीचा तपास केला. ANi या हत्येत indirect सहभाग असल्याचा या वर आरोप आहेत. संदीप शेट्टी यांच्या मते हे दोन अधिकारी irb चे पुण्यातले हस्तक असून या case मधले खुप छोटे मासे आहेत. हत्या होऊन 5 वर्ष उलटलेली आहेत.पुढे काय होईल माहित नाही.
मिपा करानो आपल्याला काय वाटते , या प्रकरणात तसेच या सारख्या दुसऱ्या प्रकरणात न्याय मिळायची शक्यता किती आहे? कि जिथे इतके मोठे लोकांचे लागेबांधे असतात .
अच्छा, म्हणजे आपल्यावर परत मुसलमानांचे राज्य आले आहे, दलितांना परत पूर्वीसारखं वागवलं जात आहे आणि मुली परत घरात कोंडल्या गेल्या आहेत असं वाटतं काय आपणास?खरे साहेबांना काय म्हणायचे आहे याबाबत तुमचा थोडासा गैरसमज झाला आहे असे वाटते ! मला ते म्हणणे वेगळे आहे असे वाटते. जरा असा विचार करून पहा... भारतात कालमानाप्रमाणे जुलूम करणारे बदलत गेले आहेत आणि बर्याचदा त्यांची जुलूम करण्याची पद्धत बदलत गेली आहे... पण जुलूम सहन करण्याची आणि/किंवा त्यासंबंद्धी आपल्यात बदल घडवून न आणण्याची जनतेची मनःस्थिती तशीच राहिली आहे. शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर आणि इतर अनेकांनी समाजाला जागे करून त्याच्या ताकदीची आणि जबाबदार्यांची जाणीव करून नवचैतन्य निर्माण केले. जनतेनेही त्यांच्या कार्यकालात प्रगती केली. मात्र या महामानवांचा कार्यकाल समाप्त झाला आणि समाजाच्या प्रगतीला खीळ बसत गेली आहे... बर्याच मुद्द्यांवर समाज तेथेच थांबला आहे किंवा त्याच्या प्रगतीचा वेग नगण्य होत गेला आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे, नंतर आलेल्या काही नेत्यांनी त्या महामानवांच्या चळवळीचे अपहरण करून, मुळ मुद्द्याचे भ्रामक स्वरूप दाखवून, जनतेला भरकवटून आपल्या व्यक्तीगत हितसंबंधांच्या दिशेने वळवले आहे. मुख्य म्हणजे जनता विकासाचा मूळ मार्ग सोडून; जाणून-न जाणून-दबून राहून-आंधळेपणे आपल्या नवीन नेत्यांची तळी उचलत राहिली आहे आणि म्हणून मार्गभ्रष्ट होत गेली आहे. याचा परिणाम जनतेच्या विकासाचा दर खुंटण्यात झाला आहे*. सद्या तर, "पाचेक वर्षांतून एकदा मतदान करून (किंवा न करूनही) निवडून दिले म्हणजे आपले नेते आपोआप संत-सज्जन बनतील आणि जनतेच्या भल्याचीच कामे करतील; जनतेला काही करायची गरजच नाही; जनतेने शिस्त, प्रामाणिकपणा आणि कायदा पाळणे यासारखे किमान मूलभूत गुणधर्म स्वतःत बाणून घेण्यासारख्या गोष्टींची गरज नाही"; हाच विचार आपल्या जनमानसात रुजलेला आहे. थोडक्यात, "असेल माझा हरी, तर देईल मला खाटल्यावरी." हे कळत-नकळत आपल्या मनावर बिंबले आहे. रोजच्या व्यवहारातले अगदी साधे उधाहरण द्यायचे झाले तर : रस्त्यावरच्या कचर्याबद्दल 'सकारण' तक्रार करणार्या आणि त्याबाबत सरकार/सिस्टिमला जबाबदार मानणार्या लोकांपैकी बर्याच जणाना मूळातच आपण रस्त्यावर कचरा टाकू नये हे पटवून द्यावे लागते, आणि दरवेळेस ते त्यांना मान्य होईलच असे नाही ! मग, यापेक्षा मोठ्या मुद्द्यांचा व्यक्तीगत स्वार्थापुढे जाऊन विचार करणे कठीण होत असले तर आश्चर्य कसले ?! :( महामानव आपल्या कालखंडात जनतेला योग्य दिशा दाखवून त्यावर कसे जायचे हे दाखवून देऊ शकतात. पण, वस्तूस्थिती हीच आहे की महामानवही शेवटी मर्त्य मानवच असतात, त्यांनाही त्यांचा काल संपल्यावर या पृथ्वीचा निरोप घेणे भाग असते. देश, समाज सतत पुढे जायचा असेल तर समाजातल्या सर्वच लोकांनी दाखवलेल्या मार्गावरून पुढे जाणे जरूर असते... किंबहुना त्या मार्गात जरूर ते बदल करून प्रगतीला अधिक विकसित करणे जरूर असते. हे नाते काहीसे खेळातल्या प्रशिक्षक/कर्णधार व खेळाडू यांच्या सारखे असते. प्रशिक्षक/कर्णधार मार्गदर्शन करतो, कर्णधार तुमच्या बरोबर खेळही करेल, पण त्यांच्यापैकी कोणीही प्रत्येक खेळाडूचा व्यक्तीगत खेळ करू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला आपला खेळ स्वतःच उत्तम करायचा असतो. किंबहुना, मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा घेऊन जनतेतील प्रत्येकाने आपापली जबाबदारी स्वतः उचलली तरच टीम, समाज, देश पुढे जात राहतो. या बाबतीत आपण भारतीय खूप मागे आहोत, हे सत्य नाकारण्यात काहीच अर्थ नाही. कारण, सत्य स्विकारणे ही सुधारण्याची पहिली पायरी असते. +++++++++++++++ * : देशाच्या सुधारणेला लागणार्या वेळेच्या लांबीसंबंधी आणि नागरिकांच्या सामाजिक-राजकिय जाणिवेसंबंधी थोडीशी तुलना : नॉर्वे हा देश ८ मे १९४५ पर्यंत डेन्मार्क, स्वीडन व जर्मनी या देशांच्या प्रत्यक्ष जोखडाखाली होता किंवा ब्रिटनसारख्या देशाच्या अवैध राजकिय दबावाखाली होता. भारताप्रमाणेच झगडा करून तो १९४५ मध्ये स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र झाला. या वेळेपर्यंत नॉर्वे हा देश अविकसित (त्यावेळेपर्यंत 'विकसनशिल' हा फसवा शब्द वापरात आलेला नव्हता) देश होता. या पार्श्वभूमीवर खालील सत्ये पाहणे रोचक ठरेल : १. साधारणपणे भारताच्या स्वातंत्र्याच्या आसपासच्या काळात नॉर्वेला स्वातंत्र्य मिळाले आहे. २. नॉर्वेतली लोकशाही, राजकीय व्यवस्था (गव्हर्नन्स) आणि भ्र्ष्टाचारमुक्तता जगातल्या पहिल्या तीनात गणली जाते. ३. आजमितीला नॉर्वे जगातल्या सर्वात जास्त विकसित देशांमध्ये गणला जातो. ४. आजमितीला नॉर्वे जगातच नव्हे तर युरोपातही सधन राष्ट्र समजले जाते... ते केवळ देशाच्या जीडीपी किंवा गंगाजळीमुळेच मुळेच नाही तर सर्वसामान्य नॉर्वेजियन नागरिकाचे वार्षिक उत्पन्न सुमारे $७०,००० असल्याने आहे... (सधनतेची समान वाटणी). हे असे का ? याचा थोडा अभ्यास केला तर त्यामागे खालील महत्वाची कारणे दिसतात... १. नॉर्वेला स्वातंत्र्य मिळवून देण्यार्या आणि त्याचे सुरुवातीचे सरकार चालवण्यार्या नेत्यांनी जनतेला केवळ स्वातंत्र्यासाठी उत्तेजित केले असेच नाही तर : (अ) देशाच्या लोकशाहीची घडी नीट बसविण्यासाठी आवश्यक ती "निस्वार्थ काळजी" घेतली, आणि (आ) जनतेला "आपल्या" देशाच्यासंबंधीचे हक्क, जबाबदार्या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे समजावून दिली. २. जनतेने आपल्या जबाबदार्या आणि कर्तव्ये योग्य रितीने आणि प्रामाणिकपणे पार पाडली आणि जरूर तेथे आपल्या वैध हक्कांसाठी आग्रह धरला... आणि हे आजतागायत सतत चालू आहे. यासंबंधीचा माझा व्यक्तीगत अनुभव : ओस्लोच्या भेटीत तेथे गेली २५ वर्षे रेस्तराँ चालवणार्या एका पाकिस्तानी वंशाच्या नॉर्वेजियन नागरिकाशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली होती. त्याच्या शब्दात सांगायचे झाले तर, "साब इधर बहुत हाय टॅक्स है (नॉर्वेमधिल कराचे प्रमाण जिडीपीच्या ४२.२% आहे. व्यक्तिगत कर सरसकट {फ्लॅट} २८% आहे.)। लेकीन बदलेमे सरकार इतनी सुविधा देती है की उसके बारेमे कोई शिकायत नही। फिरभी हमारे देशोंमे और इधरमे एक बहुत बडा फरक है। इधर हमारे एरियाके एमपीने अगर काम नही किया तो हम उसकी कॉलर पकडके सवाल कर सकते है।" विकसित आणि सधन देशांच्या सूचीतील नॉर्वेच्या उच्च स्थानाचे रहस्य या चार साध्या सोप्या वाक्यांत दडले आहे. ...त्या नॉर्वेजियन नागरिकाच्या शेवटच्या वाक्यातील कृती (हे भारतिय एमपीच्या बाबतीत करणे केवळ दिवास्वप्नच असू शकते. पण,) आपण आपल्या शहरातल्या कॉर्पोरेटरच्या संदर्भात करतो आहोत अशी कल्पना (तीही केवळ कल्पनाच करू शकतो म्हणा) करून पाहिले तर... या प्रतिसादातले सुरुवातीपासूनचे सगळे मुद्दे समजून घ्यायला सोपे जाईल ! :(परदेशात जाऊन भारताला नावं ठेवणारी लोकं आणि भारतात राहून परदेशी जाणाऱ्यांना किंवा परदेशी लोकांना नावं ठेवणारी लोकं, दोन्हीही चूक.शरीराने अमेरिकेत राहणाऱ्या अनेक मूळ भारतीयांनी मनात विविध मूल्यांच्या रूपांनी भारत जपलेला दिसला आणि शरीराने भारतात राहून सुद्धा काही लोकांनी अमेरिकेच्या भ्रष्ट मूल्यांच्या आंधळ्या आकर्षणापोटी मनात एक भ्रष्ट अमेरिका पोसलेला दिसला.