Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुण्यातील माहिती अधिकारी कार्यकर्त्याच्या हत्येचे गूढ

य
योगेश कोकरे
Wed, 08/10/2016 - 09:24
🗣 155 प्रतिसाद
सध्या एक जुनी बातमी वाचली ,,,पुण्याच्या एक RTI कार्यकर्ते ची हत्येच्या तपासाची....... तो कार्यकर्ता एका रोड बनवणाऱ्या कंपनीने अवैधरित्या संपादित केलेल्या जमिनीची माहिती बाहेर काढत होता. जेव्हा त्या कंपनी चे गैरव्यवहार बाहेर पडायला सुरवात झाली ,,,त्या नंतर लगेचच या कार्यकर्त्याला पुण्यात अतिशय क्रूर पद्धतीने मारून टाकण्यात आले . त्या नंतर पोलिसानी ज्या पद्धतीने तपास केला त्याचे परिणामी CBI कडे case सोपवण्यात आली. त्या कार्यकर्त्याच्या सख्या भावाने त्याचा लढा पुढे चालू ठेवलाय. तो highcourt मध्ये स्वतः म्हणणे मांडतोय.आणि सगळ्यात वाईट म्हणजे cbi ने पण त्याला आता ठेंगा दाखवलाय . CBI केस बंद करायच्या विचारत आहे म्हणजे बंदच केली होती ,पण त्या सख्या भावाने पुन्हा कोर्टात पिटीशन दाखल करून CBI ला CASE तपास करायला भाग पाडले. कार्यकर्त्याच्या हत्येला 5 वर्ष उलटून गेल्यावर पण काहीच तपास नव्हता . त्या सख्या भावाचा संशय त्या रोड बनवणाऱ्या कंपनी च्या मालकावर होता ,ती कंपनी महाराष्टाली खूप मोठी रोड बनवणारी कंपनी आहे.ज्यात खूप मोठया लोकांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. एखाद्या चित्रपटाला शोभेल अश्या काही गोष्टी या case मध्ये घडल्या आहेत. आता सगळ्या पात्रांची नावं सांगतो. ज्याचा खुन झाला ते सतीश शेट्टी त्यांचा सख्खा भाऊ संदीप शेट्टी रोड बनवणारी कंपनी IRB इन्फ्रा. कंपनी चे मालक वीरेंद्र म्हैसकर. या हत्येची पार्श्वभूमी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल . सतीश शेट्टी RIT कार्यकर्ते होते.irb इन्फ्रा ने मुंबई पुणे द्रुतगती मार्ग या शेजारील गावात अवैधरित्या जमीन संपादित केली होती असा सतीश शेट्टी ना संशय होता . माहितीच्या अधिकाराखाली त्यांनी सगळी माहिती मागवली आणि त्यांच्या लक्षात आले कि इथे काही काळेबेरे कारभार चाललाय.ज्यामध्ये सरकारी अधिकारी ,irb इन्फ्रा चे अधिकारी ,राजकीय लोक यांचे हितसंबंध गुंतले होते. त्यांनी irb विरोधात complaint दाखल केली. त्यानंतर त्यांना IRB कडून साम, दाम,दंड ,भेद हि नीती अवलंबली गेली. आधी धमकीवजा समाजवण्यात आले.तरी ते ऐकले नाहीत. मग 2 कोटी ची लाच देण्याची गोष्ठ झाली ती हि त्यांनी नाकारली. मग त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यांनी मग पोलीस संरक्षण मागितले कारण त्यांना काही लोकांकडून धोका होता .त्या लोकांची नावे पण त्यांनी पोलिसांना लिहून दिली . तरीपण त्यांची हत्या करण्यात आली. या नंतर या हत्येचा तपास सुरु झाला. तपास करणारे अधिकारी यांनी जणू आधीपासूनच ठरवले होते कि काही लोकांना जाणूनबुजून वाचवायचे आहेत.त्या साठी त्यांनी बनावट साक्षीदार तयार केले.त्यात त्यांना यश आले नाही. त्यात एक चमत्कार घडला .राज्य सरकार ने हा तपास CBI म्हणजे देशाची सर्वोच्च तपास यंत्रणे कडे कोणीही मागणी न करता सोपवली. त्या वेळी गृहमंत्री होते आपले आबा .जे आता आपल्यात नाहीयत. CBI कडे CASE गेली कि लोकांना वाटते कि आता दुध का दुध और पाणी का पाणी होते.तसंच सतीश शेट्टी यांचे भाऊ ना पण वाटले ,आणि तपासाची सूत्रे cbi ने मुंबईच्या STF कडे दिली . STF ने चालढकल केली त्यात एक वर्ष गेलं ,त्यानंतर HIGH कोर्ट मध्ये STF म्हटले कि आम्हाला लोंकांची चौकशी करायची आहे,तेव्हा HIGH कोर्ट ने ताशेरे ओढत म्हटले कि या लोकांची नावे संदीप शेट्टी ने एक वर्षांपूर्वी तुम्हाला सांगितली आहेत .आणि तुम्ही एकवर्ष नंतर तीच नावे आम्हाला सांगताय .मग तुम्ही एक वर्ष काय केलं? अशी ऑर्डर पण त्यांनी दिली ,याची दखल CBI चे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेऊन STF कडून तपास काढून घेतला आणि पुण्याचा ACB कडे दिला.नंतर तपासाणे जोर धरला. IRB च्या कार्यालयांवर छापे टाकले .खुप गोष्टी पुढे आल्या. परंतु त्यानंतर CBI च्या वकिलांनी कोर्टात ARGUMENT करणंच बंद केलं.का कोणास ठाऊक, थोड्याच दिवसांनी हि case बंद करायचा निर्णय cbi ने घेतला. परंतु संदीप शेट्टी यांनी हार न मानता पुन्हा कोर्टाचे दरवाजे ठोठावले .पुन्हा नव्याने पिटीशन दाखल केली . आणि त्यात रिस्पॉन्डन्ट म्हणून cbi चे डायरेक्टर ,आणि तपास करनारे अधिकारी यांना केले.त्यावेळी कोर्टाने पण संदीप शेट्टी ना विचारले कि आपण इतक्या वरिष्ठ पातळीच्या लोकांना कसे काय रिस्पॉन्डन्ट करू शकता...त्यावेळी संदीप यांनी स्वतः कोर्टाला आपले म्हणणे पटवून दिले व कोर्टाने हे मान्य केले. आणि आता height म्हणजे CBI हि CASE पुन्हा रेइन्वेस्टीगेट करणार आहे.म्हणजे इतके वर्षे cbi काय भाकऱ्या थापत होते कि काय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यात हितसंबंध कसे काय आहेत आणि कोनाकोनाचे आहेत याचा थोडा अभ्यास केला तर असे दिसून येते कि आपल्या देशातील खुप मोठ्या मोठ्या लोकांचा हात आहे. देवेंद्र म्हैसकर जे फोर्ब्स मासिकानुसार देशातील पहिल्या 50 श्रीमंत लोकांमध्ये आहेत. आणि श्रीमंतीचे रहस्य काय तर रोड तयार करायची मोठी मोठी कंत्राट याना मिळत गेली. Virendra हे नवीमुंबई येथील एका कॉलेज मध्ये डिप्लोमा झालेले आहेत. त्यानंतर ते त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात दाखल झाले. वीरेंद्र म्हासीस्कर चे वडील कंत्राटदार असताना ते मुंबई मध्ये स्थायिक होते.शिवसेना भाजपा च्या जवळचे होते .ह्या हितासंबंधाच्या जोरावर त्यांनी युतीच्या सरकार वेळी खूप मोठी कंत्राटे मिळवली .आणि त्यावेळी महाराष्ट्र सरकार मध्ये बांधकाम व परिवहन मंत्री होते नितीन गडकरी . साहजिक गडकरी यांच्या संमती शिवाय इतकी मोठी कंत्राट मिळणं शक्य नव्हतं. आणि नितीन गडकरी यांचे सुपुत्र देखील या कंपनी च्या भगिनी कंपन्या मध्ये डायरेक्टर बॉडी वर होते असा एक आरोप आहे . या कंपनी मध्ये शरद पवार यांचे पण हजारो शेर आहेत आणि हे त्यांनी जाहीर केले आहे. त्यात आता पुन्हा युतीचे सरकार आहे . आणि राज्यातली व्यक्ती नितीन गडकरी आता केंद्रात आहेत . साहजिक त्यांचे वजन केंद्रात खुप आहे. योगायोग बघा , जसं केंद्रात bjp सरकार आले तसं सतीश शेट्टी case मध्ये cbi काम करणं बंद झालंय, म्हणजे ते मनापासून काम करत नाहीय. त्यांना हि case काहीही करून बंद करावी असे आदेश आहेत असाही आरोप संदीप शेट्टी यांनी केला आहे. इतकं सगळं लिहायचं कारण कि आपल्या देशात विश्वास ठेवायचा तर कोणावर . राज्यसरकार,राज्यपोलिस, तपास यंत्रणा,राज्यकर्ते,CBI, CID, मंत्री कि आणखी कोण? आपण अराजकतेकडे वाटचाल करत आहोत का? असे आणखी 14 rti कार्यकर्ते यांचे बळी गेलेत,,,,त्यांचा तपास शुन्य दाभोलकर गेले, कलबुर्गी गेले,पानसरे गेले, यांना जेम्स बॉन्ड ने मारले काय? कि कोणीही या गोष्टींचा छडा लाऊ शकत नाही का यांनी सर्वांनी स्वतः स्वतः च्या हत्या केल्या,,,सलमान खान case मध्ये चिंकारा काळविटाने पिस्टल ने आत्महत्या केली का?कि फुटपाथ वर झोपलेले लोक स्वतः सलमानच्या गाडीखाली गेले. न्याय लवकर मिळत नसेल तर लोकांनी किती दिवस कोर्टाच्या पायऱ्या झिजवायच्या,,,,स्वतः च्या नोकऱ्या सोडून नुसतं कोर्ट कचेरी करायची,,,,आणि यासाठी जो पैसा लागतो तो आणायचा कोठून? एकंदरीत माझा स्वतःचा विश्वास या देशावरूनच उडालाय ...इथे पैसा फेको तमाशा देखो असाच प्रकार चाललेय. ज्याच्याकडे पैसा ,सत्ता त्याच्याकडे न्याय . आता तीन महिन्यापूर्वी सतीश शेट्टी प्रकरणामध्ये पहिली अटक झाली आहे आणि ज्यांना अटक झालीय ते आहेत याच case चे तपास करणार पुणे ग्रामीण पोलिसांचे अधिकारी. यांनी जाणीवपूर्वक बोगस पुरावे तयार करून खोटी case तयार केली.मूळ पुरावे नष्ट केले.चुकीचा तपास केला. ANi या हत्येत indirect सहभाग असल्याचा या वर आरोप आहेत. संदीप शेट्टी यांच्या मते हे दोन अधिकारी irb चे पुण्यातले हस्तक असून या case मधले खुप छोटे मासे आहेत. हत्या होऊन 5 वर्ष उलटलेली आहेत.पुढे काय होईल माहित नाही. मिपा करानो आपल्याला काय वाटते , या प्रकरणात तसेच या सारख्या दुसऱ्या प्रकरणात न्याय मिळायची शक्यता किती आहे? कि जिथे इतके मोठे लोकांचे लागेबांधे असतात .

प्रतिक्रिया द्या
59275 वाचन

💬 प्रतिसाद (155)
य
योगेश कोकरे Wed, 08/10/2016 - 17:30 नवीन
दादा दोन्ही प्रश्नांची उत्तरे 1) स्वामीला मी ओळखत नाही 2) आम्ही काय केले हे इथे सांगायची गरज नाही .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अनुप ढेरे Wed, 08/10/2016 - 17:39 नवीन
वाह! एकदम बाणेदार प्रतिसाद! तुमच्याकडे चारचाकी असल्यास आणि त्याच्या मागच्या काचेवर काही लिहिलं असल्यास त्याचा फटू पाठवाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
य
योगेश कोकरे Wed, 08/10/2016 - 17:50 नवीन
अनुपजी ...खूप लहान माणूस आहे मी . अजून चार चाकी नाही घेत्तली .पण गाडीच्या मागे काय लिहिले आहे ,या वरून काय निष्कर्ष काढायच्या आहे तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 08/10/2016 - 18:58 नवीन
खिक =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 08/10/2016 - 19:00 नवीन
स्वामी बद्दल स्पा म्हणाला ते मान्य आहे म्हणून असो, पण, जर आपण काय काय केले आहे ते इथे सांगायची गरज नाही असे आपल्याला वाटत असेल तर आपणही इतरांना किडेमुंगी वगैरे शेलकी विशेषणे वापरायचे कारण नाही, कारण स्पष्ट असेल नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
क
कपिलमुनी Wed, 08/10/2016 - 10:56 नवीन
या प्रकरणामधल्या मूळ तपास अधिकार्‍यांनाच अटक झाली आहे ( न्यायकृपेने ते जामिनावर बाहेर सुद्धा आले ). द्रुतगती महामर्गाशेजारील संपादीत जमीनीचे प्रकरणच या मागे आहे हे गावामधला उघड सत्य आहे . तरीसुद्धा स्थानिक पोलीसांनी कित्येक वर्ष तो तपास भलत्याच दिशेला नेला . काही दिवसांपूर्वी या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा ( बस ड्रायव्हर ) मृत्य्पू झाला . सरकार भाजपा किंवा काँग्रसचा नसता तर धनदांडग्यांचाच असता .
  • Log in or register to post comments
य
योगेश कोकरे Wed, 08/10/2016 - 11:10 नवीन
अगदी बरोबर बोललात कपिलमुनी....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ज
जयन्त बा शिम्पि Wed, 08/10/2016 - 11:25 नवीन
मध्य प्रदेशात " व्यापम " घोट्याळ्यात तर ३० ते ३५ साक्षीदार " मरण ( ? ) " पावले म्हणतात ! कुणाचा तरी जबरदस्त वरदहस्त असल्याशिवाय , असे काहीही घडत नसते असे मानण्यास जागा आहे. मुळात 'कायदा गाढव असतो ' हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतेच आहे. कायद्यातील पळवाटा जोपर्यंत नष्ट केल्या जात नाही , तोपर्यंत काहीही करणे म्हणजे दगडावर डोके आपटून घेण्यासारखे आहे असेच वाटते. कायद्याचा धाक कुणालाच नाही, शेवटी एकच म्हणावेसे वाटते की " पराधीन आहे जगती, पुत्र भारताचा , दोष ना कुणाचा " .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 08/10/2016 - 11:50 नवीन
कोल्हापूरमधील रस्त्यांचे काम म्हैसकरांच्या आयआरबी याच कंपनीला दिले होते. त्या कंपनीने कोल्हापूरमध्ये प्रवेश करणार्‍या सर्व रस्त्यांवर टोल आकारायला सुरूवात केल्यावर स्थानिकांनी गोविंद पानसरे व एन डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक महिने आंदोलन केले. टोल पूर्ण रद्द करावा अशी त्यांची मागणी होती. आंदोलकांनी अनेकवेळा टोलबूथ उद्ध्वस्त केले तरी टोल सुरूच राहिला. उच्च न्यायालयाने देखील टोल रद्द करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. पानसरे टोलबंदीच्या आंदोलनाबरोबरच हिंदुत्ववादी संघटनांविरूद्ध सुद्धा जाहीर भाषणे देत होते. २६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता). त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाला पानसरे व आचरटशिरोमणी कोळसे पाटील उपस्थित होते. त्या सर्वांनी प्रकाशन समारंभात संघावर भरपूर टीका केली. तद्दन मूर्खपणाचे आरोप असलेल्या पुस्तक प्रकाशन समारंभाला उपस्थित राहून व त्या समारंभात भाषणे करून पानसरे व कोळसे पाटील यांनी पुस्तकातील आरोपांना एकप्रकारे संमतीच दर्शविली होती. या समारभानंतर काही दिवसातच पानसरेंचा खून झाला व खुनाचे बालंट सनातन प्रभातवर लादण्यात आले. खुनानंतर ७ महिन्यांनी समीर गायकवाड नावाच्या सनातनच्या एका साधकाला अटक केली. त्याला अटक करून जवळ्पास ११ महिने होऊन गेले तरीसुद्धा त्याच्याविरूद्ध पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत व त्यामुळे त्याच्याविरूद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करून खटला सुरू करणे लांबणीवर टाकले जात आहे. पानसरे जसे हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करीत होते तसेच ते कोल्हापूरमधील आयआरबी ने लावलेल्या टोलविरूद्ध सुद्धा जोरदार आंदोलन करीत होते हा मुद्दा पोलिसांनी जाणूनबुजून नजरेआड केलेला दिसतो. विशेषतः सतीश शेट्टीच्या खुनाशी आयआरबीचा संबंध जोडलेला जात असताना हाच संबंध इथे का जोडला नसावा हे गूढ उलगडणे अवघड नाही.
  • Log in or register to post comments
म
मन१ Wed, 08/10/2016 - 12:21 नवीन
किंचित भर / दुरुस्ती
२६/११ च्या मुंबईतील हल्ल्यामागे रा. स्व. संघाचा हात होता असा तद्दन मूर्खपणाचा आरोप असणारे पुस्तक कोल्हापूरातील माजी पोलिस निरीक्षक मुश्रीफ यांनी लिहिले होते (हा हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आहे हे भारतातील सर्व न्यायालयात सिद्ध होऊन कसाबला फाशी दिल्यानंतर सुद्धा असले पुस्तक लिहिणे हा नालायकपणाचा कळस होता).
नेमकं पुस्तक मी वाचलेलं नाही. त्यातले काही उतार्‍यांबद्दल कल्पना आहे. अगदिच ढोबळ व्हर्जन सांगायची मुश्रीफ ह्यांच्या स्टोरीची तर ती अशी -- भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते. त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.) प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत. तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले. . . खरे खोटे माहित नाही. यू ट्यूबवर पोलिस निरिक्षक मुश्रीफ ह्यांचा तासाभराचा विडियो आहे; त्यात अधिक नेमके मुद्दे सापडतील. मी मला आठवताहेत ते आणि समजले होते ते मुद्दे लिहिलेत. . . प्रश्न इतकाच की हे सगळे खरे असेल तर तथाकथित हिंदू अतिरेक्यांना शिक्षा किम्वा त्यांचा शोध कसा काय घेतला जाउ शकत नाही ? आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही. आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/11/2016 - 10:57 नवीन
भारतावर समुद्रमार्गे हल्ला होणार असल्याची खबर गुप्तचर संस्थांना लागली. गुप्तचर संस्थातल्या खबर लागलेल्या काही हिंदू राष्ट्रवादी अतिरेकींचे हस्तक लोकंही होते.
हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी!!!!!!!!!!!!!!!!!
त्यांना एवीतेवी कामटे -करकरे -साळसकर ह्या ए टी एस अधिकार्‍यांचा काटा काढायचा होता. कारण त्यांनी हिंदू राष्ट्रवादी अतिरेकी करत असलेल्या कारवायांच्या तपासात बरीच प्रगती केलेली होती.(मालेगाव स्फोट की समझौता एक्स्प्रेस मधला स्फोट असा काहिसा मामला होता.)
समझोता एक्स्प्रेसमधील स्फोट २००६ मध्ये झाला. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याची प्राथमिक सुनावणी सुद्धा का पूर्ण झाली नसावी? मालेगावमधील स्फोट २६/११/२००८ पूर्वी जेमतेम दीड महिने आधी झाला होता. जर २६/११/२००८ या दिवसापर्यंत (म्हणजे स्फोट झाल्यापासून जेमतेम दीड महिन्यात) या स्फोटाच्या तपासात बरीच प्रगती झाली होती, तर त्यानंतर जवळपास ८ वर्षानंतरसुद्धा खटल्याचे साधे आरोपपत्र सुद्धा का दाखल झाले नसावे?
प्रत्यक्ष पाकी अतिरेक्यांचा जेव्हा हल्ला झाला; त्यावेळी गोम्धळाचे वातावरण माजलेले होते आख्ख्या मुंबैत. तर हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या हिंदू राष्ट्रवादी अतिरेक्यांनी ह्याचा फायदा घेत काही कोव्हर्ट ऑपरेशन्स का पेरलल ऑपरेशन्स म्हणतात ती केली. ए टी एस च्या टीमला मारलं; आणि इतर काही महत्वाचे ठरु शकणारे अडथळे दूर केले. नाव खराब पाकी अतिरेक्यांचे झाले. हिंदू अतिरेकी परस्पर सुटले.
. कमाल आहे! म्हणजे संघ व तथाकथित हिंदू अतिरेक्यांना पाकिस्तानी अतिरेकी नक्की कोणत्या मार्गाने हल्ला करणार, नक्की कोणत्या शहरात हल्ला करणार, त्या शहरातील नक्की कोणकोणत्या ठिकाणांवर हल्ला करणार, नक्की कोणत्या दिवशी व दिवसाच्या कोणत्या वेळी हल्ला करणार, हल्ला झाल्यावर हल्ल्याच्या प्रतिकारासाठी कोणते अधिकारी पाठविले जाणार, ते किती वाजता निघणार व कोणत्या मार्गाने जाणार याची इत्यंभूत माहिती मिळाली होती तर. म्हणून तर या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी आपले अतिरेकी स्क्वॉड करकरे, साळसकर व कामटे जिथे एकत्रित पोहोचतील त्या जागी अचूक वेळी तयार ठेवले होते. या तथाकथित हिंदू अतिरेक्यांकडे प्रत्येक सेकंदाची अचूक माहिती असल्याने एटीएसचे अधिकारी जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा लगेच तिथे बंदुका सज्ज करून तयार असलेल्या तथाकथित हिंदू अतिरेक्यांनी त्यांना लगेच मारून टाकले आणि बिचार्‍या निष्पाप कसाबला त्यात गोवले. मोस्साद, आयएसआय, एफबीआय व केजीबी या जगातील चार गुप्तहेर संघटना एकत्र आल्या तरी त्यांना इतका अचूक प्लॅन तयार करता येणार नाही. धन्य आहे ही पोरकट थिअरी मांडणार्‍यांची आणि त्यांच्या पुस्तक समारंभाला उपस्थित राहून अशा मूर्खपणा व नालायकपणाला पाठिंबा देणार्‍यांची!
आणि हे सगळे खोटे असेल तर मुश्रीफ अजूनही बाहेर कसे ? त्यांच्यावर प्रॉप्पर अब्रूनुकसान वगैरेचा दावा कोणी केल्याचे माझ्यातरी ऐकण्यात नाही. आय मीन, मुद्दा इतका गंभीर आहे की आरोप करुन थांबणे पुरेसे नाही. पुढची कार्यवाही नको का व्हायला ? निदान माजी पोलिस निरिक्षकाच्या माणसाला तरी हे सगळे करण्यात अडचण यायला नको.
ही थिअरी आणि हे आरोप इतक्या महामूर्खपणाचे आहेत की ते आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणे हे मूर्खपणाचे ठरेल. मुश्रीफसारखी माणसे आरोप करताना आपण कायद्याच्या कचाट्यात येऊ नये यासाठी अत्यंत धूर्तपणे आरोप करतात. थेट आरोप करण्याऐवजी "असे लोकांमध्ये बोलले जाते", "आंतरजालावर अशा पोस्ट फिरत असतात" अशा तर्‍हेची नरो वा कुंजरो वा स्वरूपाची संदिग्ध वाक्ये पेरतात जेणेकरून आपण खोट्या आरोपांचे धनी होऊ नये परंतु योग्य तो संदेश सर्वत्र पोहोचविला जाईल असे धोरण असते. अशा महामूर्खांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देणे म्हणजे त्यांच्या पुस्तकाची फुकट प्रसिद्धी करून, पुस्तकाचा खप वाढवून त्यातले असत्य जनतेत पसरवायला मदत केल्यासारखे असते. त्यामुळे संघ परिवाराने मुश्रीफ व त्याच्या या रद्दी पुस्तकातील आरोपांना प्रत्त्युत्तर न देता दुर्लक्ष केले असावे. बादवे, असाच आरोप अंतुले व वाचाळवीर दिग्विजय यांनी केले होते. आपण अडगळीत फेकलो गेल्याने परत प्रकाशात येण्यासाठी अंतुल्यांनी हा सनसनाटी आरोप केला होता, तर "बदनाम हुए तो क्या हुआ, नाम तो हुआ" या मानसिकतेतून कायम बाष्कळ बरळणारे दिग्विजय सिंग यांनी देखील सनसनाटी निर्माण करण्यासाठी हा आरोप केला होता. अंतुले बिचारे आरोप करूनसुद्धा शेवटपर्यत अडगळीतच राहिले तर दिग्विजय सिंग हे केवळ विदूषक म्हणूनच आजतगायत प्रसिद्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१
अ
अंतरा आनंद गुरुवार, 08/11/2016 - 12:10 नवीन
तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे. संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता. कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/11/2016 - 17:30 नवीन
तोंडी आरोप करणे आणि पुरावे देत पुस्तक प्रसिद्ध करणे यात फरक आहे.
काय फरक आहे? पुस्तक लिहिण्याएवढे पुरावे होते तर २६/११/२००८ नंतर ते जाहीर करायला आणि संघाला (आय मीन हिंदू अतिरेक्यांना!) न्यायालयात खेचून बिचार्‍या कसाबचा बचाव करायला हवा होता? तोंडी आरोप केले म्हणजे कमी विश्वासार्ह आणि पुस्तकातून केले म्हणजे संपूर्ण विश्वासार्ह असं काही असतं का? तसं असतं संभाजी ब्रिगेडने जातीय विष ओकलेली सर्व पुस्तके विश्वासार्ह ठरली असती.
संघ परिवार या पुस्तकावर बंदी आणण्यासाठी न्यायालयात जाऊन पुस्तकावर बंदी आणू शकला असता.
संघावर स्थापनेपासून आजतगायत असंख्य आरोप झालेले आहेत. संघाने आजतगायत क्वचितच आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले असेल. आपल्यावर केलेल्या आरोपांविरूद्ध न्यायालयात जाऊन दाद मागणे तर दूरच राहिले. संघावर केले जाणारे आरोप हे तद्दन फालतू असून जाणूनबुजून खोटे आरोप केले जातात हे येथील जनतेला माहिती आहे. आरोप करणारा कितीही मान्यवर असला तरी आरोपातील खरेखोटे जनता जाणून असते. त्यामुळेच खोट्या आरोपांना थारा न मिळता आरोप करणार्‍यांचेच हसे झाले आहे. डॉ. मनमोहन सिंग हे भारतातील अत्यंत मान्यवर व्यक्तिमत्व होते. १९९१-९६ या काळात अर्थमंत्री म्हणून काम केल्यावर त्यांची प्रतिमा विद्वान, अर्थतज्ज्ञ, सुसंस्कृत, मितभाषी इ. गुणांनी नटलेली झाली होती. १९९९ च्या निवडणुकीत दिल्लीत प्रचारसभेत बोलताना, "१९८४ ला जे शिखांचे जे हत्याकांड झाले त्यात संघाचा सुद्धा हात होता" अशा अर्थाचा आरोप केला होता. संघाने या आरोपावर फारशी प्रतिक्रियाच दिली नाही. संघाच्या अंदाजाप्रमाणे हा आरोप मनमोहन सिंगांवरच बूमरँग झाला. दिल्लीत त्यांच्याविरूद्ध शिखांनीच मोठी निदर्शने केली. शेवटी मनमोहन सिंगांना आपण केलेल्या खोट्या आरोपाबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करावी लागली. २-३ दिवसांपूर्वीच आचरटशिरोमणी कोळसेपाटील यांनी आरोप केले की १९८४ च्या दंगलीत ज्यांनी हत्याकांड घडवून आणले त्यापैकी ५०% संघाचे कार्यकर्ते होते. याचे भक्कम पुरावे त्यांच्याकडे आहेत. या आचरटाला एवढेही समजत नाही की यांच्याकडे संघाविरूद्ध इतके भक्कम पुरावे होते तर गेली ३२ वर्षे हे काय करी होते? त्यांनी अजून एक आरोप केला की भारतातील ९०% दंगली संघ सुरू करतो. या बाष्कळ आरोपांवर न्यायालयात जाणे सोडाच, संघाने प्रतिक्रिया सुद्धा दिलेली नाही. कोळसेपाटील यांचा आचरटपणा सुप्रसिद्ध असल्याने असले आरोप करून त्यांचेच हसे होते हे संघाला माहित आहे.
कारण हे पुस्तक म्हणजे घटनाक्रम, त्यातील फटी, कागदपत्रे, विनिता कामटेंनी केलेले आरोप त्याला न मिळालेली उत्तरे याची निरस जंत्री आहे. शिर्षकाएवढा पुस्तकातील मजकूर सनसनाटी नाही. वकिली बाडं, सरकारी कामकाज इत्यादी वाचण्याची सवय असणाराच या पुस्तकातून काही निष्कर्ष काढू शकेल. पण जे पुरावे दिलेत त्याचा उगमही दिलेला आहे तेव्हा मिश्रीफांनी मांडलेली थिअरी चुकीची किंवा पूर्वग्रहदूषित असेल पण पोरकट निश्चित नाही म्हणून कदाचित बंदीची मागणी करण्यापेक्षा दुर्लक्ष करणे म्हणजे गवगवा न होउ देणे जास्त योग्य वाटले असावे.
२६/११ चा हल्ला नक्की कोणी केला याचे संपूर्ण पुरावे सापडले आहेत. त्यातील एक मारेकरी कसाब याच्यावर तीन वेगवेगळ्या न्यायालयात पूर्ण कायदेशीर सुनावणी होऊन त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊन त्याला फाशी झालेली आहे. असे असताना घटना घडून अनेक वर्षे उलटल्यावर व घटनेला नक्की कोण जबाबदार होते ते १००% सिद्ध झाल्यावर असली टुकार पुस्तके लिहून बेछूट आरोप करणे हे पोरकटपणाचेच लक्षण आहे. आधी सांगितल्याप्रमाणे संघ असल्या मूर्खांकडे कायमच दुर्लक्ष करीत आला आहे. त्यामुळे संघाने पुस्तकावर बंदीची मागणी केली नाही यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
अ
अनुप ढेरे गुरुवार, 08/11/2016 - 17:48 नवीन
इथे विचारवंतांचा दुटप्पीपणा दिसतो बर्‍याचदा, अगदी अलिकडे राणा अयुब नावाच्या 'पत्रकार' बाईने ( इशरत प्रकरण जिने बाहेर काढलं ती) २००२च्या दंगलीबद्दल एक स्फोटक पुस्तक प्रसिद्ध केलं. ज्यासाठी तिने गुजरातेत जाऊन गुप्तपणे इन्वेस्टिगेशन केलं. वरिष्ठ पोलिसांशी वगैरे बोलली ज्यांनी मोदी-शहा जोडीबद्द्ल स्फोटक माहिती तिला देली. हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर कोणीही त्याची फार दखल घेतली नाही. त्यावर तिने असं म्हणणं सुरू केलं की ज्या लोकांवर मी आरोप केले त्यांनी माझ्या बद्दल एकाही तक्रार केली नाही ना माझ्यावर खटला भरला. म्हणजेच मी लिहिलेलं खरं आहे. याउलट, गेल्या आठवड्यात आउटलुक मासिकात एका पत्रकाराने संघ/समिती ईशान्य भारतातून तरूण मुलींची वाहतूक करत आहे आणि त्यांच्यावर जाणून बुजून हिंदू संस्कार करत आहे अशी स्टोरी लिहिली. यावर संघाने रितसर खटला दाखल केला आहे. हे झाल्यावर लगेच पत्रकार भावंडांनी आरडाओरडा सुरू केला की तुम्ही पत्रकारांवर असं दडपण कसं आणू शकता, ही दंडेलशाही आहे वगैरे वगैरे. ही डबल ढोलकी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अंतरा आनंद
स
सुबोध खरे Wed, 08/10/2016 - 15:34 नवीन
हल्ला होणारच आहे;र्ह्याची खबर असल्याने आधीच तयार असलेल्या क्या बात है हे हिंदू अतिरेकी तर मोसादच्या तोडीचे असावेत. जे लष्कराला किंवा गुप्तहेरखात्याला माहित नव्हते तेही याना माहित होते. मग दाऊदचा काटा काढायला त्यांना सुपारी का देत नाही? उगाच त्यांच्या विरुद्ध खटला भरून त्यांचे खच्चीकारण वर सरकारचा पैसे आणि न्यायालयाचा वेळ फुकट घालवत आहेत. इतका "आचरटपणा"चा आरोप असल्याने त्यांच्या अब्रुनुकसानीच दावा तरी कसा लावावा. मुश्रिफना "आचरट शिरोमणी" हा किताब द्यावा हसावे कि रडावे हेच कळेनासे झाले आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 08/10/2016 - 17:37 नवीन
ते हिंदु दहशतवादी आयेसायच्या इशार्‍याहुन काम करत होते ते? आयेसाय वाट चुकलेले मुस्लिम तरुण अन माथेफिरु हिंदु लोक्स ह्या दोघांना हत्यारे पुरवत असते अन हे त्यांच्या इशार्‍यावर नाचत असतात!! नागरिकांनी जागरुक राहुन आयेसायचे ईरादे हाणुन पाडायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बबन ताम्बे Wed, 08/10/2016 - 15:54 नवीन
पुस्तकाचे नाव हु कील्ल्ड करकरे असे आहे. काहीही लिहीले आहे. म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच. सीएस्टी वरचे फूटेज दाबुन ठेवले वगैरे . अजून बरच काही लिहिलेय. बरं ते काही संशोधन करून लिहीलेय असेही नाही. प्रारंभीच उल्लेख केलाय की वर्तमानपत्रांतील बातम्या, न्युज च्यानेलच्या वार्ता यावरून निष्कर्ष काढलेत. त्या पुस्तकातील एक चांगली गोष्ट म्हणजे भारतातील मुसलमानांना काही उपदेश केलाय. बाकी सगळा भाग हिंदू षडयंत्र वगैरे वरच आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Wed, 08/10/2016 - 18:16 नवीन
म्हणे पोलिसांनी बनाव करून अतिरेकी म्ह्णून कसाबला सादर केले. तो अतिरेकी नव्ह्ताच.
लोल, कोण लेखक कोण आहे. त्याच्या घरी जाउन त्याच्या पायाचे तीर्थ घ्यावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर Wed, 08/10/2016 - 16:50 नवीन
सुनील शेट्टीच्या पिक्चरमधला एक डायलॉग आहे,त्याला उद्देशून,"साले तुझे ईमानदारी का कीडा काटा है! तस्मात या देशात ईमानदारीचा कीडा काट्वून घेणे चुकीचे आहे.मी तर म्हणतो सर्वांनीच भ्रष्ट व्हावे,मग या देशात नाडले गेलेल्यांच्या नक्षल सारख्या संघटना अनेक संघटना स्थापण होतील,त्या राजकारणी ,उद्योजल यांच्याकडून करोडोच्या खंडण्या गोळा करतील,लोकं मारतील .अराजक माजेल .मग या देशातल्या कंपन्या बाहेर जातील् ,पैसा आटेल.मग या देशात भ्रष्टाचारासाठी काहीच पैसा शिल्लक राहणार नाही.हाच भ्रष्टाचारावर रामबण उपाय आहे,भ्रष्टाचारच भ्रष्टचाराल मारेल.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 08/10/2016 - 18:30 नवीन
तुमच्याकडे, सत्ता आणि पैसा असेल, तर आणि तरच, ह्या देशांत तुम्ही समाधानाने राहू शकता. >> हे मात्र शंभर टक्के खरं आहे मुविकाका, अमेरिका, जापान, इत्यादी सगळे विकसित देशांकडे भरपुर या त्या मार्गाने मिळवलेला पैसा आहे आणि जगावर सत्तादेखील आहे, त्यांचे लांगुलचालन करणारे इतर देशही बर्‍यापैकी समाधानाने जगत आहेत.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 08/10/2016 - 18:57 नवीन
मुविकाका ह्या विषयात आपले एकमत होणे नाही! असो!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 08/10/2016 - 20:56 नवीन
ते मलाही माहित आहे. "संदीप उन्नीकृष्णनच्या" बापाची आणि आमची व्यथा थोडी-फार सारखीच आहे. काही निर्णय जर योग्य वेळी घेतल्या गेले असते आणि अजूनही घेतले गेले तर, "संदीप उन्नीकृष्णन"च्या बापाने जे भोगलंय ते भोगायची वेळ इतर बापांवर येणार नाही. भारतात तरी "रक्षकांच्या जीवावर भक्षक"च जास्त, असे माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
म
माम्लेदारचा पन्खा Wed, 08/10/2016 - 19:10 नवीन
संपूर्ण व्यवस्था बदलू शकत नसाल तर स्वतःला बदला....
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 08/10/2016 - 20:59 नवीन
ज्याला जायचेय त्याने जा. मी थांबणारेय इथेच. 'भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...'
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/11/2016 - 06:20 नवीन
दोन्ही बाजूंची मते एका मर्यादेत पटतात. मला "बाहेर" जाणे सहज शक्य आहे.( हि दर्पोक्ती नसून वस्तुस्थिती आहे). परंतु बाहेरील देश तुम्हाला "त्यांच्या" नागरिकांना वागवतील तसेच वागवतील असे नाही.अर्धे आयुष्य गेल्यावर नवीन ठिकाणी स्वतःला रुजवणे कठीण हि आहे. शिवाय इथेच राहून जसे जमेल तसे( स्वतःच्या जीवाला फारशी तोशीस न लावता) देशकार्याला हातभार लावत सुसह्य जगणे हेच मला पटते. यात "स्वान्त सुखाय" का काय ते समजा. उगाच "जाज्वल्य देशाभिमान" सारखे मोठे शब्द माझ्या मर्यादित मेंदूला झेपत नाहीत. सोसेल तेवढीच "सोसल सर्व्हिस" करतो आणि उरला वेळ स्वतःच्या सुखासाठी वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ग
गंम्बा गुरुवार, 08/11/2016 - 06:45 नवीन
परंतु बाहेरील देश तुम्हाला "त्यांच्या" नागरिकांना वागवतील तसेच वागवतील असे नाही.
डॉक्टर साहेब, नक्की वागवतील. आणि अगदी समजा "त्यांच्या" नागरीकांसारखे नाही वागवले तरी सध्या भारतात तुम्हाला जी वागणुक मिळते आहे त्यापेक्षा शतपटीने चांगले वागवतील.
आयुष्य गेल्यावर नवीन ठिकाणी स्वतःला रुजवणे कठीण हि आहे.
हे कारण ठीक आहे, पण बाकी कसली काळजी करायची गरज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सामान्य वाचक गुरुवार, 08/11/2016 - 07:17 नवीन
बाहेरील देश 'त्यांच्या' नागरिकांच्या प्रमाणे वागवत नाहीत, म्हणजे काय? एक सामान्य माणूस म्हणून तुमच्या ज्या गरजा आणि इच्छा असतात , त्या पूर्ण होण्यात तुम्हाला दुय्यम वागणूक मिळत नाही आपले रोजचे जीवन खूप सुखी आणि असंघर्षमय असते आणि याउलट भारतात तुम्ही प्रथम दर्जाचे नागरिक आहात, म्हणून तुम्हाला काय premium मिळतो? भारतात रोजचे आयुष्य आणि quality of life याबद्दल जास्त बोलायची गरज नाही, या मुद्यावर सगळ्यांचेच एकमत होईल भारत राहणे किंवा न राहणे हा या पलीकडचा विचार आहे उदाहरणार्थ मित्राची आई आपल्या आई पेक्षा जास्त प्रेमळ असली तरी आपल्याला आपल्या आईची कुशी आणि डोक्यावर तिचाच हात लागतो, त्या मित्राकडे राहायला गेलो तरी आपल्याला उपरे वाटते, घराची आठवण येते आणि आपल्या घरात राहताना मित्राच्या घराचे आणि तिथल्या वातावरणाचे आकर्षण वाटत राहते त्यामुळे शेवटी तुम्हाला दोन्हीपैकी काय परवडते याचा विचार करून निर्णय घेणे पण जिथे राहतो त्या घराबद्दल negative बोलत राहून आपले आणि लोकांचे frustration वाढवणे, हे करू नये म्हणजे आपल्या घरात राहून मित्राच्या घराचा उमाळा आणि तिथे राहून आपल्या घराचा गहिवर डांगे साहेबानी वरती म्हटल्याप्रमाणे नकारात्मक बोलून ती भावना exponentially वाढत जाते मग लोक आणखी बोलतात and so on हे एक vicious circle आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक गुरुवार, 08/11/2016 - 08:00 नवीन
पण जिथे राहतो त्या घराबद्दल negative बोलत राहून आपले आणि लोकांचे frustration वाढवणे, हे करू नये लै वेळा सहमत. याच भावना शब्दात मांडायला मला जमत नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक
अ
अमितदादा Wed, 08/10/2016 - 21:54 नवीन
हा एक खदखदनारा विषय आहे, आज वाईट आणि भ्रष्ट् लोकांचं खूप मोठ नेटवर्किंग दिसत ते एकमेकांना सांभाळून घेतात मग ते कोणत्याही पक्षाचे असो किंवा विचारसरणीचे असो। चांगल्या लोकांचं मात्र नेटवर्किंग होत नाही आणि झालं तरी जास्त वेळ टिकत नाही। जेंव्हा जेंव्हा चांगल्या लोकांचं एकजूट झाली तेंव्हा तेंव्हा चांगले बदल पाहाय मिळाले आहेत। IRB ची मुजोरी कोल्हापूर च्या लोकांनी पाहिले आहे , सतेज पाटील हसन मुश्रीफ यासारख्या मंत्र्यांच्या आश्वासन आणि आवाहनाला IRB ने केराची टोपली दाखवली होती कारण एकच सगळी सरकारी यंत्रणा manage करायचं कसब आणि क्षमता। कोल्हापूरात ND पाटील, गोविंद पानसरे यासारखे खमके आणि प्रामाणिक नेते होते म्हणून irb चा पडाव झाला। सलमान खान च प्रकरण सुद्धा न्यायवस्तेवरील विश्वास कमी करणार प्रकरण आहे।
  • Log in or register to post comments
य
योगेश कोकरे गुरुवार, 08/11/2016 - 03:47 नवीन
अजित दादा, ताटकरेसाहेब यांचे नाव ज्या घोटाळ्यातंले आहे तो म्हणजे काही हजारो कोटींचा सिंचन घोटाळा.कोकणातील धरणे बांधण्यात जी कंत्राट अवैधरित्या देण्यात अली त्याबद्दल चे प्रकरण काही दिवसात जोर धरेल असे दिसते आहे....आणि मोठे मासे गालाला लागतील अशी अशा आहे
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर गुरुवार, 08/11/2016 - 06:02 नवीन
भलत्याच अपेक्षा आहेत कि हो तुमच्या. हे वाचून बघा जरा http://www.loksatta.com/mumbai-news/settlement-between-ncp-bjp-to-project-ajit-pawar-in-irrigation-scam-1281739/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
स
सुबोध खरे गुरुवार, 08/11/2016 - 06:13 नवीन
मास्तर हि नुसती "चर्चा" आहे. मोठे साहेब "आहेत" तोवर आणि शिवसेनेची "कटकट" चालू आहे तोवर भाजप उगाच बिळात हात घालणार नाही. पुढच्या निवडणुकीच्या अगोदर अजित दादा आणि तटकरे साहेब सरकारी जावई बनतील असे जाणकार सांगतात. कारण आताच लफडं बाहेर काढलं तर जामीन वगैरे मिळवून हे लोक परत आम्हाला सूडबुद्धीने वागवतात म्हणायला तयार असतील. आणि लोकांची स्मरणशक्ती फारच कमकुवत असते असे एक इंग्रजी म्हण सांगते. राजकीय बुद्धिबळ कसे खेळले जाते हे कोणीच सांगू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
च
चंपाबाई Fri, 08/12/2016 - 08:28 नवीन
मांडवली होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गणामास्तर Fri, 08/12/2016 - 08:48 नवीन
चंपाबाईंशी सहमत. मनातल्या मनात : च्यायला काय पण दिवस आलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
च
चंपाबाई Fri, 08/12/2016 - 10:52 नवीन
इतिहासात मराठे व मोघलांच्यात शेकडो मांडवल्या झाल्या. पानिपतानंतर खुद्द पेशवे व अब्दाली यानी एकमेकाना नजराणे पाठवुन आता मित्रत्वाने राहू असे प्रेम खलिते पाठवले होते. मुम्बैतील हिकडची गादी व तिकडची गादी कधी मारामार्‍या करतात कधी एकत्र वडापाव खातात. मोदीजीसो निवडुन आल्यावर मा. साहेबसो यांच्याकडे चहा प्यायला गेले होते. अजुन लोकांचा भाबडेपणा संपत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
ग
गंम्बा Fri, 08/12/2016 - 11:11 नवीन
चंपाबाई कधी कधी मुद्याचे बोलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे Fri, 08/12/2016 - 14:57 नवीन
मांडवली होईलच असे नाही. कारण जर भाजपाला पूर्ण बहुमत मिळाले तर कुणाची दाढी धरायची पाळी येणार नाही. सत्तर वर्षेपैकी बरीच वर्षे काँग्रेसने केवळ सक्षम विरोधी पक्ष नसल्याने सत्तेत होता. मोठ्या "साहेबांचे" किती दिवस बाकी आहेत हे कुणी सांगू शकत नाही. परंतु सध्या कृषी उत्पन्न बाजार समित्या, सहकारी बँका,साखर कारखाने, बी सी सी आय अशा बऱ्याच ठिकाणहून पीछे हाट चालू आहेच त्यातून साहेबांच्या नंतर सक्षम नेतृत्व कुठे आहे? सध्या उरलेले दिवस "बाहेर" राहण्यासाठी "साहेबच" मांडवली करीत आहेत असे "ऐकिवात" आहे. प्रत्येकाचा "वैभवाचा" आणि "पडता" काळ असतो आणि वैभवाच्या काळात केलेली गुंतवणूक पडत्या काळात कामास येते. तेंव्हा नुसता ओरबाडून खाल्लं असेल तर फाके मारायची पाळी येउ शकते. भुजबळ साहेबांचे उदाहरण पाहून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
च
चंपाबाई Tue, 08/16/2016 - 03:18 नवीन
तेंव्हा नुसता ओरबाडून खाल्लं असेल तर फाके मारायची पाळी येउ शकते. भुजबळ साहेबांचे उदाहरण पाहून घ्या. आणि थोडे आम्हालाही द्या ! शोलेमध्ये गब्बरसिंग गाववाल्याना धमकवायला सचिनला मारून टाकतो, तसे आहे हे. एखाददुसरी केस चालवली की बाकीचे आपोआप मांडवलीला येतात. काँग्रेस भ्रष्ट आहे हे सांगुन वाजपेयीही पाच वर्षे खुर्चीत होते. किती काँग्रेसवाल्याना शिक्षा दिली ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
N
NiluMP Tue, 08/16/2016 - 16:49 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंपाबाई
स
सुबोध खरे गुरुवार, 08/11/2016 - 06:24 नवीन
सुरुवातीला प्याद्यांचा बळी जातो मग हत्ती घोडे आणि उंट येतात. "शेवटी" राजाला वाचवण्यासाठी वजिराचाहि बळी दिला जातो. पण त्याची वेळ यावी लागते. सुरुवातीलाच "वझिराच्या" मागे लागल्यास डाव "उलटण्याची" शक्यता असते.
  • Log in or register to post comments
ज
जाबाली गुरुवार, 08/11/2016 - 06:46 नवीन
अश्याच कित्येक केसेस बाकी आहेत. अनेक वर्ष हे चालू राहतं. पिढ्यानपिढ्या हे चालत राहू शकतं. आपण बदल करू शकतो ह्या भ्रमात भरपूर लोक आहेत आणि होऊन गेलेत. भारतीय सिव्हिल फोर्सस मध्ये काहीही बदल होणार नाहीत हे लक्षात घ्या. उत्तरोत्तर हे सगळं खराब होत जाणार आहे. ह्यात बदल होण्या साठी जहाल मतवादी विचारांची गरज आहे. गुळमुटे धोरण काहीही कामाचे नाही. आपल्या भारतात कायदा आणि सुव्यवस्था हि खिळखिळी झालेली आहे. वरील लेखन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 08/11/2016 - 07:01 नवीन
ह्यात बदल होण्या साठी जहाल मतवादी विचारांची गरज आहे. गुळमुटे धोरण काहीही कामाचे नाही. मग हे क्रांतिकार्य कोण करणार आहे? तुम्ही करता का? आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
ज
जाबाली गुरुवार, 08/11/2016 - 07:49 नवीन
हा माझा व्यक्तिगत विचार झाला. प्रत्येक जण याच विचाराचा असेल असे नाही. हे विचार जेव्हा बहुतांशी लोकांचे होतील तेव्हा जरा बदल जाणवायला लागेल. गोविंद राघो खैरनार यांच्या सारख्यांची गरज आहे (हे फक्त एक उदाहरण झाले). तुम्ही काय किंवा मी काय, आपण फक्त निमित्तमात्र आहोत. आपण एकमेकांच्या पाठीशी उभे असलो तरीही पुष्कळ आहे. अधिक काय लिहू, आपण सर्व सुज्ञ आहातच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चंपाबाई Fri, 08/12/2016 - 08:25 नवीन
ट्रकभर पुरावेवाले का ? आता भाजपा सेना सरकारने सगळीच बांधकामे लीगल करायचा विडा उचलला आहे... आता खैरनारप्रेमी लोक गप्प का बसलेत ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
स
सुबोध खरे Fri, 08/12/2016 - 08:45 नवीन
गोविंद राघो खैरनार हे कितीही प्रामाणिक असले तरी व्यवस्थेने त्यांना बडतर्फ़ केलेच ना. केवळ चांगले काम करता येणे एवढेच आवश्यक नाही तर तुम्हाला नियमांच्या चौकटीत राहून आपल्या अधिकाराचा उत्तम वापर करता आला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण "टी एन शेषन" हे आहे. त्या एकट्या माणसाने हातात पूर्ण अधिकार आल्यावर सरकारला इंगा दाखविला आणि निआवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल करवून आणले . हे जमले नाही तर तुमचा "खैरनार" होतो. "जन पळभर म्हणतील हाय हाय" पण व्यवस्था तशीच राहते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
स
स्वामी संकेतानंद गुरुवार, 08/11/2016 - 07:29 नवीन
जालीय भगतसिंग! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
य
योगेश कोकरे गुरुवार, 08/11/2016 - 08:07 नवीन
आहे त्या व्यवस्थेमध्ये कायदेशीर रित्या काम करणार हुशार प्रामाणिक लोकांची कमी खूप कमी प्रमाणात आहे . आणि ज्यांना व्यवस्थेबद्दल खूप खोलवर माहिती आहे ते लोक" माझीच गाडी , माझीच माडी ,माझ्याच बायकोची बायकोची गोलगोल साडी " ह्या मध्ये गुंतलेले दिसतात . आणि प्ली ज हा ,,माझे हे विधान कोना एकाला उद्देशून नाही . त्यामुळे मिपाकरांनी वयक्तिक घेऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाबाली
ग
गंम्बा गुरुवार, 08/11/2016 - 08:38 नवीन
आहे त्या व्यवस्थेमध्ये कायदेशीर रित्या काम करणार हुशार प्रामाणिक लोकांची कमी खूप कमी प्रमाणात आहे .
व्यवस्था आकाशातुन पडली नाहीये ना व्यवस्थेत काम करणारे दुसर्‍या समाजातुन आले आहेत. व्यवस्थे मधे समाजाचेच प्रतिबिंव दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगेश कोकरे
स
संत घोडेकर गुरुवार, 08/11/2016 - 08:41 नवीन
+१ सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
य
योगेश कोकरे गुरुवार, 08/11/2016 - 09:53 नवीन
म्हणजे जे चाललंय ते असाच चालत राहणार तर . प्रत्येकाने "जे आहे ते असाच राहणार हे ,त्यात बदल व्हायची सुतराम शक्यता आहि "असं जर विचार केला तर बदल कसा होईल . कमीतकमी मी माझ्या परीने थोडाफार बदल घडवण्याचा प्रयत्न का करू नये ? असा विचार करणे पण महत्वाचा आहे . छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा ,पण तो शेजाऱ्याच्या घरात व्हावा " हि मानसिकता सोडायचा थोडातरी प्रयत्न करावा हि अपेक्षा. ..........आता लोक "यावर तुम्ही काय केले ?" असे बालिश प्रतिसाद द्यायला मागेपुढे बघणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा