डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
💬 प्रतिसाद
(114)
अ
अभिजीत अवलिया
गुरुवार, 09/15/2016 - 22:14
नवीन
येत्या दसऱ्याला प्रत्येक शहरातल्या, गावातल्या प्रशासनाने (पोलीस/पालिका) सर्व डॉल्बी मैदानात उभ्या कराव्यात आणि रावणाचे दहन करण्यापेक्षा डॉल्बी नामक राक्षसाचे दहन करावे असे मला वाटते.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/15/2016 - 22:20
नवीन
असो.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/19/2016 - 10:25
नवीन
खून बलात्कार दरोडे चोर्या आणि इतर अनेक अवैध गोष्टी घडत असतात.तेथेथेहीम तेथेही लागू पडेल की मग.
असो.....
सातार्यात दोन वर्षापूर्वी डॉलबी च्या आवाजाच्या हादर्याने ऐन मिरवणूकीत एक जुनी इमारत पडून त्याखाली लोक च्चिरडून मेले. रेझोनन्स मुळे एखादी इमारत मानवी र्हदयाचे काय होत असेल मग?
- Log in or register to post comments
स
साहना
गुरुवार, 09/15/2016 - 22:58
नवीन
पोलिसांना सूट देणे चुकीचे आहे. कायदा कुठे आणि कसा apply व्हावा ह्याबाबत clarity असणे अत्यावश्यक आहे नाहीतर पोलीस आपले जीवन सोपे बनवतील आणि जनतेच्या हक्काची पायमल्ली करतील. उदा कुणी दंगा घडवून आणायची धमकी दिल्यास पोलीस त्यांना सोडून देतील आणि पापभिरू लोकांना जास्त दटावतील.
गणेशोत्सव म्हणजे काल तयार झालेला उत्सव नसून जवळ जवळ एक शतकाचा त्याचा इतिहास आहे आणि आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
गुरुवार, 09/15/2016 - 23:13
नवीन
तुमचा पत्ता द्या ना प्लिज, पुढच्या गणपतीला तुमच्या घरासमोर तीस तास मिरवणूक नाचवणार फुल्ल डिजे लावून! आपल्याला लै आनंद झाला तुमच्यासारखे सपोर्टर पाहून. तेवढा मान तर तुम्हाला दिलाच पाहिजे.
भाड में जाये जनता, मै नाचू जैसे मन मंगता
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 09/16/2016 - 05:06
नवीन
=)))
- Log in or register to post comments
न
नावातकायआहे
Sun, 09/18/2016 - 09:29
नवीन
:-)))
संदिप साहेब माझ्यातर्फे आणिक ३ भिंती...
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 09/16/2016 - 08:32
नवीन
अगदी अगदी...आपण ३-३ तास वेगवेगळ्या मंडळांना संधी देउ...प्रत्येकाला भावनेचा निचरा व्हायला तितकीच मदत...सगळी सोसायटी आर्टिश्टिक फ्लेक्ष लावुन सजवू (फ्लेक्ष बनवायचे काँट्रॅक्ट आप्ल्या अभ्याकडेच द्यायचे)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/16/2016 - 09:28
नवीन
सोडले रे फ्लेक्स. नो पोलिटिकल आणि फेस्टिव्हल. ओन्ली कमर्शिअल कस्टंबर.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Sun, 09/18/2016 - 11:37
नवीन
रीकव्हरी होईना का ??
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 09/18/2016 - 11:53
नवीन
कामाची किळस बसली ते तोंडं बघून. बोर्डवर पण, हपिसात पण. नकोच ते लोक.
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 09/16/2016 - 07:34
नवीन
'पोलिसांना सूट दिली' ह्याचा अर्थ स्वतः पोलिसांनी तसे काही केले तर हरकत नाही ( They are an exception to the rule) असा होतो. तसे काही केलेले दिसत नाही.
आपणांस 'पोलिसांना "डॉल्बी सिस्टीम"* असावी किंवा नसावी" हे केस-बाय-केस ठरवण्याची जबाबदारी दिली आहे, ते चूक आहे' असे म्हणायचे असावे. तसे असेल तर ते अगदी अव्यवहार्य आहे. 'उन्मादा'ची बाब हाताबाहेर जायला लागली तर ती कुठल्यातरी सरकारी विभागाने/खात्याने स्वतःच्या अखत्यारीतच ठरवून त्यावर जे काही करायचे ते केले पाहिजे. आता हे ठरवतांना जे काही निकष त्यांनी वापरायचे, व ते कसे वापरायचे त्यात, ह्या बाबीच्या गांभिर्यानुसार तारतम्य असावे. म्हणजे अगदी ते संपूर्ण शास्त्रीय दृष्ट्या प्रत्येक केसमध्ये साऊंड लेव्हलची मोजमापे घेऊन, कागदोपत्री तशी नोंद करून त्यानुसार निवाडर्यानुसाराशी अपेक्षा करणे अव्यवहार्य आहे, म्हणून चुकिचे आहे.
(* ह्या सर्वात 'डॉल्बी लॅब्स' उगाच बदनाम होते आहे, पण तो वेगळा विषय आहे).
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
गुरुवार, 09/15/2016 - 23:09
नवीन
मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते
Kaka kenjale wah Kay bolalat aapan :)
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
गुरुवार, 09/15/2016 - 23:35
नवीन
डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय?
Great-Thinker, Kumthekar, Kenjale who or whatever you are tell us the advantages of the mentioned sound systems first.
उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
What do you mean by that ? ताब्यात दिला आहे ?
बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला
Disgusting
I could have ignore and kick this dhaga on paud phata as I always do for yours but any way ..
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
गुरुवार, 09/15/2016 - 23:46
नवीन
तुमचा पत्ता द्या ना प्लिज, पुढच्या गणपतीला तुमच्या घरासमोर तीस तास मिरवणूक नाचवणार फुल्ल डिजे लावून!
If Mandar Kenjale is ready for this, I promise i will bear all the expenses for DJ and anything that is / will require to make the festival a spicy one. As Kenjale feel it मिळमिळीत this time. Let's have it Baby thinker.
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
गुरुवार, 09/15/2016 - 23:51
नवीन
आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही.
Sahna ji ka Kya kahna :(
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
गुरुवार, 09/15/2016 - 23:57
नवीन
कायदा कुठे आणि कसा apply व्हावा ह्याबाबत clarity असणे अत्यावश्यक आहे.
Sahana ji knows it better than a bench of high Cort then. Sahana ji ka kya kahana :)
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 09/16/2016 - 00:04
नवीन
विंग्रजी लिवायचे असेल तर कृपया स्पेल्लिंग्स तरी ठीक लिवा नायतर मर्हाटीत लिवा
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/16/2016 - 00:09
नवीन
१) होय, वाईट आहेत असे वाटते. त्या अनारोग्यकारक आहेत.
२) पारंपारीक गणेशविसर्जन मिरवणूक कशी असायची हे पाहिले तर मिळमिळीत वाटणार नाही. आता भक्तिभाव जर मिळमिळीत वाटत असेल तर दोष लोकांच्या विचारात आहे.
३)तरुणाईच्या उन्मादाचा निचरा होण्यास सरकारने दुसरे उपाय योजावेत. ५० टक्के तरुणाई आहे व ५० टक्के निर्बल जनता आहे असे मानल्यास निर्बलांच्या जिवावर तरुणांनी उन्मादाचा निचरा करण्याचे अधिकार नाहीत. एवढेच गाजवायची खुमखुमी असेल तर एखादी झोपडपट्टी, समुद्र किनारा, गटारगंगा, कचर्याचे राज्य असलेली ठिकाणे सफाईस घ्यावीत. सगळी रग जिरेल. अगदी तसेही नकोच असेल तर घरातील माळ्यावर चढवून जुन्या ट्रंका, पेट्या काढून त्यातील सफाई करण्यात आपल्या पालकांना गृहस्वच्छतेस हातभार लावावा. दिवाळीही येऊ घातलिये. भरपूर फराळाचे पदार्थ करून नातेवाईकांना, गरिबान्ला वाटून या.
४)न्यायालयाचा निर्णय पोलिस अमलात आणतायत म्हणून त्यास अतिरेक म्हणताय का?
५)कश्याला? केलाय ना तो आवाज बंद आता! शांत बसा. दिवसभर हॉर्न वाजवून डॉल्बीचा अनुभव देतच असतात!
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/16/2016 - 00:12
नवीन
येथे निर्बल या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. नाचल्याशिवाय पर्याय नाही असे वाटणारी ती तरुणाई व ज्यांना यात पडायचे नाही ती निर्बल असे तात्पुरते मानले आहे.
- Log in or register to post comments
N
nanaba
Fri, 09/16/2016 - 04:10
नवीन
मस्त प्रतिसाद आहे.
मागे सातार्यात डोल्बी मुळे भिंत पडली आणि काही लोक चेंगरून मेलें.
कुत्री- इतर पक्षी - आजारी माणसे - म्हातारी माणसे - लहान बाळे - इतर सामान्य माणसे - ह्या सगळ्यापेक्षा ह्यांची खुमखुमी महत्त्वाची!
ऱेवतीं नी सागितलेल्या गोष्टी करा खरच रग असल्यास
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Fri, 09/16/2016 - 08:34
नवीन
...भिंत नव्हे, इमारत..
बाकी चालूद्या..
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 09/18/2016 - 09:13
नवीन
त्यांना एक भिंत दिसली असेल.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 09:38
नवीन
तुम्ही दोघेही त्याप्रमाणात बरोबर बोलताय, कारण वृत्तपत्रात वेगवेगळ्या बातम्या होत्या. ह्या बातमीनुसार भिंत पडून 3 जणांचा मृत्यू तर ह्या बातमी नुसार घर कोसळून तिघांचा मृत्यू. पण मी त्या भागातील असल्यामुळे व स्थानिक मराठी वृत्तपत्र वाचल्यामुळे भिंतच पडली होती असं म्हणेन.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Sun, 09/18/2016 - 10:32
नवीन
LIC बिल्डिंगच्या शेजारची जी इमारत २०१४ च्या गणेशोत्सवात पडली तिच्या जवळ दोन इमारती सोडून मी रहात होते.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 11:02
नवीन
धन्यवाद, गैरसमज दूर केल्याबद्दल. कारण वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही प्रकारच्या बातम्या वाचल्या होत्या.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 11:19
नवीन
ताई हि पहा सकाळ मधील बातमी ह्या बातमीनुसार राजपथावर डॉल्बीच्या दणदणाटात शेकडो युवक थिरकत असतानाच साडेदहा वाजण्याच्या सुमारास भवानी पेठेत जनता बॅंकेलगतची "प्रीतम एजन्सी‘ हे दुकान असलेल्या इमारतीची भिंत "बीएसएनएल‘ कार्यालयाकडे जाणाऱ्या बोळात कोसळली. या दुर्घटनेत चारही लोक दगड, वीट, मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. .
अर्थात ह्या बातमीपेक्षा मी तुमच्यावर विश्वास ठेवेन कारण तुम्ही प्रत्यक्षदर्शी आहात.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 09/18/2016 - 11:20
नवीन
तसेच हि प्रतिक्रिया विषय वाढवण्यासाठी किंवा प्रतिवाद करण्यासाठी नसून, मी त्यावेळी अशी बातमी स्थानिक वर्तमानपत्रात वाचली होती हे सिद्ध करण्यासाठी आहे.
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Fri, 09/16/2016 - 00:14
नवीन
Let me tell you it is call typo if you are looking so precisely.
Marathit jar hya phone varun lihita aale aste tar English madhye naste lihile ho.
- Log in or register to post comments
स
सचु कुळकर्णी
Fri, 09/16/2016 - 00:27
नवीन
One more thing Sadhana ji (ohh ha cha dha zala) sorry Sahana ji tumchi Californian social service aawadli baw aaplyala.
आम्ही कॅलिफोर्निया मध्ये ग्लोबल धर्म फौंडेशन चालवतो (अध्यात्म आणि शिक्षण क्षेत्र) मी स्वतः Bookstruck.in द्वारे भारतीय साहित्य गरीब लोकां पर्यंत पोचवायचे काम करीत आहे.
They (गरीब) are fortunate that they have religious books instead of bread...or say instead of Kalashnikov.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/16/2016 - 04:28
नवीन
३०० .
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 09/16/2016 - 05:04
नवीन
गणेशोत्सवातील डॉल्बी डीजेमुळेच तर आम्हाला नवनविन भक्तीगीते ऐकायला मिळतात.
आता कालचंच पहा ना. वेळ रात्री जवळपास बाराची. एका मंडळाने अगदी आर्त स्वरातील "बाई वाड्यावर या" हे भक्तीगीत लावले होते. किती आपुलकी असते या लोकांना. स्वतः तर भक्तीरसात न्हाऊन निघतातच, आजूबाजूच्या बायांनाही भक्ती करायला वाड्यावर बोलावतात.
गेल्यावर्षी "शांताबाई" हे भारुड माहिती झाले. त्याच्या आधीच्या वर्षी "पप्पी दे पप्पी दे पारुला" हे भक्तीगीत माहिती झाले ते गणेशोत्सवातच.
त्यामुळे डॉल्बी डीजेवर बंदी हा आमच्या धर्माची गळचेपी करण्याचा प्रयत्न आहे. पण तो आम्ही हाणून पाडू. जर कोणाला आमच्या या पवित्र भक्तीचा त्रास होत असेल तर त्यांनी आमच्या सणांच्या दिवसांमध्ये परदेशात जाऊन राहावे.
वेड मला वाद्याचा
जल्लोष माझ्या ढोल-ताशाचा
गर्व नव्हे तर मला माज आहे
वादक असल्याचा
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/16/2016 - 06:02
नवीन
सरांना पहिल्यांदाच चिडलेलं बघितलं!
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Fri, 09/16/2016 - 06:42
नवीन
एका परात्पर गुरुंनी माझी जन्महिंदू अशी संभावना केल्याने माझे रक्त आता पेटून उठले आहे. आता माघार नाही. नादच खुळा. आता वाघाच्या जबडयात हात घालून त्याचे दातच मोजायचे.
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/16/2016 - 06:51
नवीन
=))
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/16/2016 - 06:58
नवीन
मोजून झाल्यावर कीती असतात तेवढे सांगा.
माहीती असलेली बरी. ;)
- Log in or register to post comments
अ
अजया
Fri, 09/16/2016 - 07:41
नवीन
वाघाच्या दातात काही प्राॅब्लेम असेल तर कळवालच आम्हाला;)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 09/18/2016 - 09:14
नवीन
गोरखभौ झिंदाबाद!
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 09/18/2016 - 11:23
नवीन
अरे वा बोकेशा. लक्षात आहे तुमच्या?
बादवे, परवा किशोर कदम, संदीप पाठक वगैरे सिरिअल पब्लिक शूटिंग्साठी आलेलं. हॉटेलात आले. फोटो बिटो काढले.
गोरखने त्यांना पण विचारले. "पगार कीती पडतो म्हनून"
आम्ही हाणायचा बाकी ठेवलेला. संदीपने का कुणीतरी आकडा सांगितला म्हणे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Mon, 09/19/2016 - 07:57
नवीन
गोरखला पत्रकारितेत जायला सांगा. कल्ला करेल तो तिथे. कुणालाही काहीही थंडपणे विचारू शकणारे लोक सध्या नाहीयेत तिथे.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 09/16/2016 - 08:30
नवीन
हात सांभाळ रे...वाघाने हातच खाल्ला तर तुझ्या भावनांचा निचरा होणे कठिण होउन बसेल =))
- Log in or register to post comments
प
पक्षी
Fri, 09/16/2016 - 09:03
नवीन
खिक्क ...
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Fri, 09/16/2016 - 09:27
नवीन
वाघाच्या निचर्याचे बघा की कोणतरी. गावडे सरांचा हात हाय तो. नुसता थोडीच राहणारे आत.
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sat, 09/17/2016 - 08:30
नवीन
खतरनाक प्रतिसाद!
षटकार स्टेडीयमच्या बाहेर !!
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 09/17/2016 - 14:36
नवीन
अगागागागागा काय बे हे टक्या =)) =)) =))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sat, 09/17/2016 - 14:44
नवीन
तू भावनांचा निचरा हाताने करतो का? ते कसे?
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 09/17/2016 - 15:55
नवीन
याबाबतीत मिळालेली संधी कधीही सोडु नये
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Fri, 09/16/2016 - 09:30
नवीन
@ "पप्पी दे पप्पी दे पारुला" ›››
@ ›››
कचकूण उप हास!
- Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी
Fri, 09/16/2016 - 14:14
नवीन
हा टोला कोणासाठी?????
एका समाजाचा किंबहुना महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा आणि शौर्याचा गौरव म्हणून "ते" वाक्य रूपक अर्थाने वापरले आहे.
(खरोखरच कोण दात मोजायला जात नाहीत)
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 09/16/2016 - 13:03
नवीन
हा हा हा.....
- Log in or register to post comments
- 1
- 2
- 3
- ›
- »