डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
💬 प्रतिसाद
(114)
घ
घाशीराम कोतवाल १.२
Tue, 09/20/2016 - 07:25
नवीन
पुढच्या वर्षासाठी चे भक्ती सन्गीत हे ऐका
डॉल्बीवाल्या बोलाव माझ्या डीजे
मग म्हना जाउंद्या ना बाळासाहेब
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 09/16/2016 - 05:32
नवीन
या पार्श्वभूमीवर हॅमर कल्चर हा लेख जरुर वाचावा.
लोक हल्ली बलात्काराविषयी पण असच बोंब मारतात. खर तर तो लैंगिक भावनांचा निचरा आहे.
फार असहिष्णु होत चाललेत लोक.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 09/16/2016 - 06:30
नवीन
एकीच मारा पर सॉलिड मारा
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Fri, 09/16/2016 - 07:24
नवीन
थोडक्यात, आणि झणझणीत.
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Fri, 09/16/2016 - 07:49
नवीन
मार्मिक !!
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sat, 09/17/2016 - 08:31
नवीन
एकदम अचुक!
- Log in or register to post comments
प
पैसा
Fri, 09/16/2016 - 06:06
नवीन
लेख आणि प्रतिसाद महाळॉळ आहेत! =)) =)) =)) लेखकराव, तुमचा काय साऊंड सिस्टीम भाड्याने द्यायचा साईड बिझनेस हाय का? त्या बिचार्या गणपती बाप्पावर तरी दया करा. हल्ली तो आवाजाला घाबरून पृथ्वीवर येतच नाही म्हणे!
- Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ
Fri, 09/16/2016 - 06:59
नवीन
गणेशोत्सव करूण झाला आहे याबद्दल सहमत.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/16/2016 - 07:43
नवीन
हेच लिहिणार होतो.
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Fri, 09/16/2016 - 09:53
नवीन
तीन डॉक्टरांचे एकमत !
वैद्यक क्षेत्रातील चमत्कार !
- Log in or register to post comments
प
पक्षी
Fri, 09/16/2016 - 07:41
नवीन
काय सांगता, DJ वर बंदी होती. काल आमच्या विभागात गणपती विसर्जनाच्या वेळी फुल्ल आवाजात DJ वाजत होता, आणि तो पण रात्री 11 नंतर बंद झाला(उपकार केले आमच्या वर 11 ला बंद करून).
विवाहात कुठल्या प्रकारच्या उन्मादाचा निचरा करता आपण, कळावे...
जॅम लफडा आहे आपला, बिचार्या पोलिसांनी काय करावं. जर पोलिसांनी, DJ कडे दुर्लक्ष केला असतं तर ह्याच धाग्याचा विषय जरा वेगळा असता... हा धागा पोलिसांच्या गलथान कारभारा बद्दल आणि गणेशोत्सवात होणाऱ्या उन्मादाबद्दल असता ... नाही का?
अवांतर: आपलं बेअरिंग सुटत आहे असं माझं आपलं मत, खुपचं मावळ धागे आणि प्रतिसाद असतात आपले.
कि ह्या id चं बेअरिंग मवाळ ठेवलं आहे आपण.
अति अवांतर: सिगरेट सुटली का ??
- Log in or register to post comments
अ
अद्द्या
Fri, 09/16/2016 - 07:54
नवीन
काय राव ,
काळ मिरवणुकीत फुल्ल टाईट का ?
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/16/2016 - 08:00
नवीन
मुळात सर्व जाती धर्म पंथ आणि जे जे काही असेल त्या सगळ्यांचे सगळे उत्सव सण प्रथा चालीरीती, ह्या पैकी काहीही रस्त्यावर येऊन करण्याची गरज नाही. सगळं बंद करा. ज्याला त्याला ठराविक बंदिस्त जागा द्या आणि घाला म्हणा काय गोंधळ घालयचा तो.
मुर्खांचा बाजार साला. आला गणपती नाचा, आली शिवजयंती नाचा, आली आंबेडकर जयंती नाचा, आली इद/मोहरम नाचा. म्हणजे निमित्त काहीही असो, उद्देश एकच, रस्त्यावर भयंकर कर्कश्य आवाजात आचकट विचकट गाणी वाजवायची त्या गाण्याच्या शब्दांनाही लाजवेल असे आचकट विचकट अंगविक्षेप करुन नाचायचे. तेही दारु पिऊन!!
आणि ह्या सगळ्यामुळे सरकार आणि न्यायालयाला आपला वेळ, पैसा आणि शक्ती खर्च करायला लागावा, या इतका दुसरा मुर्खपणा नाही. अरे कसले नियम करतात आणि कसले त्यावरुन वाद उकरुन काढतात? काही अक्कल?
- Log in or register to post comments
ग
गिरिजा देशपांडे
Fri, 09/16/2016 - 08:03
नवीन
+1111
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/16/2016 - 08:15
नवीन
मुळात सर्व जाती धर्म पंथ आणि जे जे काही असेल त्या सगळ्यांचे सगळे उत्सव सण प्रथा चालीरीती, ह्या पैकी काहीही रस्त्यावर येऊन करण्याची गरज नाही
+१००
हे असे सर्व लष्करी तळांवर असते. त्यामुळे सणांचे पावित्र्य हि टिकून आहे आणि दोन धर्मियात अजिबात वाद किंवा तेढ नाही. मंदिरावरील स्पीकरच्या आवाज १५ फुटाच्या पलीकडे जात नाही कि मशिदीवरील भोंगे कानठळ्या बसवीत नाहीत. मिरवणुकीला डीजे किंवा बोम्बल्या( लाउड स्पीकर)ला परवानगी नाही).
आवाजाची मर्यादा वाढली कि मशिदीवरचे लाऊड स्पीकर आधी बंद करा अशा तर्हेचा बचावाचा पवित्र घेण्याचा प्रश्नच नाही.
http://www.hindustantimes.com/mumbai-news/ganeshotsav-noise-levels-above-limit-at-all-silence-zones/story-gWtwkAshU1CS3aepLZ9T5K.html
सगळे नियम धाब्यावर बसवून सण साजरे करण्याला प्रतिबंध घातलाच पाहिजे. ढोल ताशे तर फोडून टाकले पाहिजेत. १०० लोकांच्या भावनेचा निचरा होण्यासाठी १० हजार लोकांना वेथस धरण्याचा हा अश्लाघ्य प्रकार ताबडतोब थांबवला पाहिजे.
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/16/2016 - 08:22
नवीन
असहिष्णुता...!!!
मोदी सरकार आल्यापासून...
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/16/2016 - 08:25
नवीन
हि बघा सारली काडी मोदकाने..
काय रे मोदका?? :P
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 09/16/2016 - 14:51
नवीन
मि. का.,
तुम्च्या मतान्ना ह्य अधिक काय सहमत होऊ शकेल कुणी?
इत्क सहज आणिक सटिक लिहिले आहे. उम्मीद आहे कि तुमचे हे मत वाचल्या नन्तर काहिच शन्का उरणार नाहित.
-आ. निनाव.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Fri, 09/16/2016 - 08:20
नवीन
धागाकर्त्याने हा धागा काढुन मिपाकरांना त्यांचा उन्माद रिचवण्यास जी मदत केली आहे त्याला तोड नाही..
तर मंडळी वाजवा..!
"आवाज वाढव डिजे तुज्या...
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Fri, 09/16/2016 - 09:36
नवीन
सगा आणि मिकाचे प्रतिसाद वाचून हेच म्हणणार होतो ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Fri, 09/16/2016 - 08:29
नवीन
आजच बघितले, मुंबैत ४ मोठे गणपती अजूनही (सकाळी ११ वाजता) विसर्जनाच्या प्रतिक्षेत होते...आणि असल्या बेजबाबदारपणामुळे ट्रॅफिकचा बट्ट्याबोळ झालेला...चांगले सुरु आहे संस्कृतीरक्षण
- Log in or register to post comments
म
मोदक
Fri, 09/16/2016 - 09:19
नवीन
सध्याचा गणेशोत्सव म्हणजे संस्कृतीरक्षण आहे का?
तुमची संस्कृतीरक्षणाची व्याख्या काय..?
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Fri, 09/16/2016 - 08:50
नवीन
डीजे, समूह अतिढोलवादन या मेंदु बधीर करणार्या नशा आहेत.म्हणून त्या काही लोकांना हव्याहव्याशा वाटतात.
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 09/16/2016 - 09:09
नवीन
काडी टाकुन गंमत बघण्यासाठी धागा काढला आहे असे वाटते
- Log in or register to post comments
प
पाटीलभाऊ
Fri, 09/16/2016 - 09:45
नवीन
एखाद्या गोष्टीचा अतिरेक केव्हाही वाईटच...!
डॉल्बी डीजे वगैरे कधीही आपल्या संस्कृतीचा भाग नव्हता..पण आपल्यातल्याच काही लोकांनी डॉल्बी डीजेला आपल्या संस्कृतीत रुजविण्यास उत्तेजन दिले आहे. डॉल्बी डीजेवर बंदी आणली हे फारच उत्तम केले...
देर आए दुरुस्त आए...!
गणेशोत्सवातली डॉल्बी डीजेची फालतुगिरी वाकड मध्ये अनुभवली आहे. आणि त्याचा त्रिवार णिशेध...!
- Log in or register to post comments
च
चंपाबाई
Fri, 09/16/2016 - 09:46
नवीन
डॉल्बी ऐकून भावना निचरुन चित्त शुद्ध होते !
अरेरे ! पं. भिमसेन , राशीद खान , पं. शिवकुमार , लता , आशा ... असे लोक वर्षानुवर्षे चुकीचं संगीत गात - वाजवत बसलेत आणि आपण मूर्ख लोक त्यांच ऐकत बसलोय
- Log in or register to post comments
झ
झेन
Fri, 09/16/2016 - 09:50
नवीन
सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
परवाणगी कुणाच्या बापाची डॉल्बी आमच्या हक्काची
आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
कोण करतोय तिच्या आXXXXXX भाXXXXX
गणेशोत्सव म्हणजे काल तयार झालेला उत्सव नसून जवळ जवळ एक शतकाचा त्याचा इतिहास आहे आणि आमच्या धार्मिक आणि संस्कृतीकी जीवनाचा तो फार मोठा भाग आहै अश्या गोष्टीं लुडबुड करायला कोर्टाला देऊच नये. उघड उघड जरी कायदा तोडावा लागला तरी हरकत नाही.
संस्कृतीकी जीवनाच्या आड स्वत: कोण ते टिळक का कोण ते सुद्धा येवू शकत नाहीत कारण शतकाचा इतिहास उत्तरोतर प्रगल्भ झालेला आहे. काल "बाई वाड्यावर या" या गाण्याव्रर काही मुली आणि महिलाही आपापल्या भावनांचा काहीतरी..... हं..निचरा करत होत्या.
सरकारने खर तर अश्या उन्माद रीचवण्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहनपर रेशनवर दारूची सोय केली पाहिजे. सागल्यानलाच सोपं होईल, सगळ्यांनीच झीन्गाट व्हायचं, कालपर्यंत ज्यांला कोनाला डोल्बीची परेशानी होती त्यांची पन सोय व्हईल. समद्यांच भल हीच तर लोकशाही ....
चल भावड्या DJ ...DJ ... आवाज वाढव डिजे तुज्या...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 09/16/2016 - 14:48
नवीन
हो काल प्रभात रोड च्या तिथे "कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई" वर साभिनय नाचताना बघून माझे ब्लड्प्रेशर असले वाढले की सरळ घरीच यावे लागले. बायकोला वाटले की त्या फालतू डीजे च्या आवाजामुळे झाले तसे.
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 09/16/2016 - 12:13
नवीन
मी पण १००% नास्तिक आहे.
पण तरीही डॉल्बीवरील बंदीने गणेशोत्सवातली जान निघून गेली, उत्सव मिळमिळित झाला हे वाचून बिचार्या 'भक्तां'बद्दल वाईट वाटले. वाईट्ट ते पोलीस आणि प्रशासन हो...
फक्त एक प्रश्न राहून राहून मनात येतो , टाळ मृदुंगाच्या जल्लोषात 'माऊली माऊली' वा 'ग्यानबा तुकाराम' असे तोंडाने म्हणत तल्लीन होणार्या वारकर्यांना डॉल्बीची का बरे गरज पडत नसावी ? त्यांची वारी , त्यातला तो रिंगण सोहळा का बरे मिळमिळीत होत नसावा ?
- Log in or register to post comments
व
विशुमित
Fri, 09/16/2016 - 13:04
नवीन
<<<<<<<<त्यांची वारी , त्यातला तो रिंगण सोहळा का बरे मिळमिळीत होत नसावा ?>>>>>>
कारण वारी ही संतांनी सुरु केली होती आणि गणेश उत्सव राजकीय नेत्यांनी..!!
मी तर बाबा मस्त नाचलो DJ च्या तालावर रात्री पण गणेशा प्रति भाव तुसभर ही कमी नव्हता झाला.
(संवेदनशील) कानाच्या लोकांना त्रास हा होणारच.
बाकी चालू द्यात
- Log in or register to post comments
अ
अनिता ठाकूर
Fri, 09/16/2016 - 13:23
नवीन
आमच्या सोसायटीसमोर विसर्जन तलाव आहे.कालच्या दिवशी राजकीय नेत्यांचे मंडप पडले.थरथरुन,संतापून, हतबल होऊन आम्ही..........................स्वस्थ बसलो.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Fri, 09/16/2016 - 13:30
नवीन
न्यायालयाने डॉल्बि डीजेच्या परवानगीचे अधिकार पोलिस अधिक्षकांना दिले आहेत,डॉल्बी चालकांनी आवाजाची मर्यादा ओलांडणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही परवानगी दिली गेली नाही,हा मुद्दा आहे.एरवी चिरीमीरी खाणारे या बाबतीत सक्ती का करत आहेत हा मुद्दा आहे.
- Log in or register to post comments
न
निनाव
Fri, 09/16/2016 - 14:10
नवीन
डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का? ------> हे असे प्रश्न असू शकते -, हेच प्रश्न पडले आहे मला!!!!!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/16/2016 - 15:23
नवीन
a Supreme Court judgement to state that freedom to practise religion does not extend to “any and every place”.
मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला धारेवर धरत आवाज प्रदूषणा विरुद्ध पाऊले उचलण्याचा "हुकूम"(WRIT OF MANDAMUS) दिला असून नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी प्रत्येक विभागात एक सक्षम अधिकारी नेमण्याचा हुकूम दिला आहे. आणि अशा अधिकाऱ्याने जर कार्यवाही करण्यासाठी काणा डोळा केला तर त्याच्या विरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
हा घटनेतील कलम २१ प्रमाणे नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे त्यामुळे यात धर्म किंवा जातीचा संबंध येत नाही आणि सर्व धर्माची प्रार्थनास्थळे यांनाही हा आदेश लागू होतो असे न्यायालयाने म्हटले आहे.
आवाज फाउंडेशन या संस्थेने केलेल्या अर्जावर दिलेल्या आदेशाचे पालन न केल्यामुळे( गोंगाट मोजण्याचे मीटर खरेदी न केल्यामुळे) महाराष्ट्राचे गृह सचिव श्री के पी बक्षी याना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे.
याची पुढची सुनावणी ४ ऑक्टोबर ला आहे. यामुळे चिरीमिरी घेऊन काणा डोळा करणे पोलिसांना अशक्य झालेले आहे.
मी स्वतः रात्री १२ वाजून पाच मिनिटांनी आवाजाबद्दल फोन क्र. १०० ला तक्रार केली आणि मुलुंड पोलीस स्टेशनला फोन उचलत नाहीत हि तक्रार केली असता पुढच्या पाच मिनिटात सगळे ढोल ताशे एकदम बंद झाले.
दुर्दैवाने पुण्यात याचीअंमलबजावणी नीट झालेली नाही किंवा नागरिकांना याची पुरेशी माहिती नसावी असे वाटते.
या गोष्टीला सर्वत्र प्रसिध्धी देणे आवश्यकआहे आणि नागरिकांनी जागृत राहणे आवश्यक आहे. नवरात्रीत महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांनी आपल्या आसपास होणाऱ्या आवाजाबद्दल पोलिसांना तक्रार करणे आवश्यक आहे नि पोलीस काही कारवाई करीत नसतील तर आवाज फाउंडेशन च्या वेबसाईट वर तक्रार करा
http://www.dnaindia.com/mumbai/report-strictly-implement-noise-pollution-rules-during-fests-bombay-high-court-tells-state-2245834
मिसळपाव वर याबद्दल अगोदर लेख लिहायला पाहिजे होता असे वाटते.
नागरिक म्हणून कर्तव्यात कसूर झाल्याबद्दल क्षमस्व.
- Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण
Fri, 09/16/2016 - 15:28
नवीन
भ्रष्टाचारातून तयार झालेल्या खड्ड्यात पडून रोज किती जीव जातात, अवैध दारुधंद्यामुळे गरीब मृत्युमुखी पडतात, पोलीसांवर डॉल्बीबंदीचा हकनाक ताण येतो. ते सोडून डॉल्बीच्या मागे का लागता? अाता गाड्यांमुळे प्रदूषण होतंय म्हणून गाड्या चालवायच्या बंद करायच्या का? बैलगाडाबंदी, फटाकाबंदी, गुलालबंदी, दहीहंडीबंदी तसे आता अगरबत्ती लावायलाही बंदी घालणार का? जनरेटर उद्योग, लाईट उद्योग, कामगार, डेकोरेशन, सुतारकाम वगैरे अनेक लोक या बंदीमुळे बेकार होतील. हे कमी शिक्षण असणारे कामगार बेरोजगार होतील आणि ध्वनीप्रदूषणापेक्षा मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होईल. हे एसीमध्ये बसून डॉल्बीवर बंदी घालणारे कधी महाराष्ट्रावर सुलतानी-अस्मानी संकटं आल्यावर धावून आलेत का? विनाकारण डॉल्बीचा इश्यू मोठा करुन गोरगरीब-कामगारांवर अन्याक होतोय.
(इति व्हाट्सॅप फॉर्वर्ड)
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 09/16/2016 - 16:13
नवीन
व्हॅट्सऍप वर येणाऱ्या ढकलपत्रांची लायकी काय असते ते आपल्याला माहिती आहे. सोमवार पेठेत राहणारे आमचे आजोबा घराच्या तीन बाजूला असलेल्या गणेश मंडळांच्या बोम्बल्या लाउड स्पीकरच्या आवाजाने वेडे पिसे होत याची आठवण होत आहे. १०० लोकांच्या सणासाठी १० हजार लोकांना वेठीस धरणे हा मूलभूत हक्काची पायमल्ली आहे.
हे ढकलपत्र पाठवणाऱ्या माणसाला दहीहंडीच्या दिवशी मुंबईत के इ एम रुग्णालयाच्या अस्थिव्यंग उपचाराच्या कक्षात उभे केले पाहिजे. मी १९८८ साली तेथे दहीहंडी च्या दिवशी गेलो तेंव्हा तेथील शल्यक्रियागृह रात्रभर चालू होते आणि तेथे ६८ जणांना शल्यक्रिया करायला लागली. बाकी ज्यांना शक्य आहे त्यांना प्लास्टर घालून घरी पाठवून दिलं.
The Supreme Court may have recently woken up to the inherent danger of ever-steeper human pyramids and the participation of under-age govindas but doctors have long had to deal with the fallout of this revelry. Last year, one person died, while 129 were injured, a significant fall from one death and 290 injuries in 2014.
http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Extra-KEM-docs-to-be-on-call-for-dahi-handi-emergencies/articleshow/53850234.cms
http://indianexpress.com/article/mumbai/365-govindas-hurt-in-dahi-handi-revelry-2-die-on-way/
नऊ थरांची हंडी केली पाहिजे हे कुठल्या धर्मग्रन्थात लिहिले आहे? हा सर्व बाजार आणि त्यांचे प्रायोजक यांनी आपल्या सण आणि समारंभाचे अपहरण केले आहे आणि सामान्य माणसांना वेठीस धरलेले आहे. दहीहंडी वरून पडून जे तरुण कायमचे जायबंदी होतात त्यांच्या आयुष्याची वाताहत होते हे पाहायला कोणता राजकीय पक्ष येतो. त्यांच्या तालावर नाचून आपल्या सणाचे असे व्यंग करणे हा मूर्खपणा आहे. जी तरुण मुले मृत्यूमुखी पडतात त्यांच्या आई वडिलांनी कुणाच्या तोंडाकडे पाहायचे. कांता राजकीय पक्ष किंवा त्यांचा कार्यकर्ता अशा आईबापाला म्हातारपणात आधार देतो आहे?
आमच्या लहानपणी आम्ही तीन थरांची हंडी करीत होतो. मोठी माणसे पडणाऱ्या मुलांना पकडायला उभी राहत. दहा वर्षात एकही मुलाला दुखापत झाली नाही. आमचा सण कुठे कमी पडला?
- Log in or register to post comments
अ
अगम्य
Mon, 09/19/2016 - 09:37
नवीन
"आमच्या लहानपणी आम्ही तीन थरांची हंडी करीत होतो. मोठी माणसे पडणाऱ्या मुलांना पकडायला उभी राहत. दहा वर्षात एकही मुलाला दुखापत झाली नाही. आमचा सण कुठे कमी पडला?"
खरंच सणांमधला तो निरागसपणा आता जवळजवळ नामशेष झाला आहे.
पूर्वी गणपती म्हटले के कितीतरी कार्यक्रम असायचे. कथाकथन, नाटके, व्याख्याने ह्यांची मेजवानी असायची. मंडळातल्या मुलांचे कितीतरी कार्यक्रम आणि स्पर्धा असायच्या. हल्ली ते सारे मागे पडले आहे.
- Log in or register to post comments
ट
टर्बोचार्जड फिलॉसॉफर
Fri, 09/16/2016 - 16:14
नवीन
वरील व्हॉट्सप फॉरवर्डशी सहमत आहे.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Fri, 09/16/2016 - 16:30
नवीन
सगळे सण.. गणपती, शिवजयंती,
काळा पहाड - Tue, 24/03/2015 - 16:15
सगळे सण.. गणपती, शिवजयंती, दिवाळी, दुर्गाष्टमी, आंबेडकर जयंती, मुहर्रम, फर्स्ट इयर, सगळे बर्थडेज पब्लिक पद्धतीनं साजरे करायला कायद्यानं आणि बळाचा वापर करून बंदी आणली पाहिजे. तुमचा धर्म तुमच्या घरात. रस्त्यावर नको. इथं आधी एक गणपती म्हणजेच फक्त त्रास होता आता सगळ्या सणांना हे बेक्कार लोक डीजे आणि ढोल ताशे घेवून फिरतात. ज्यांना एवढंच नाचायचंय त्यांची रग उतरवायला पोलिसांनी सगळ्यांना परेड करून रस्त्यातले खड्डे भरायच्या आणि ट्रॅफिक मॅनेज करायच्या कामाला जुंपलं पाहिजे. जबरदस्तीनं. डेली त्रास साला.
http://www.misalpav.com/comment/680927#comment-680927
अजुनही तितकीच लागु कमेंट!!
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 09/16/2016 - 16:34
नवीन
या चर्चेत तशी बरीच उशीरा एंट्री मारत आहे. तरीही
यातले तांत्रिक डिटेल माहित नाहीत. पण गणेशोत्सवाच्या नावावर जो अभूतपूर्व धांगडधिंगा चालतो तो तरी नक्कीच वाईट आहे.
ते त्यांचे मत झाले आणि त्यात तुम्हाला तथ्य जाणवले. पण तेच इतरांनाही पटावे असे अजिबात नाही.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 09/17/2016 - 06:20
नवीन
एव्हाना आपल्या लक्षात आल असेल की सुजाण सुसंस्कृत व विवेकी असण्याचा व अस्तिक नास्तिकतेचा संबंध नाही! असो!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 09/17/2016 - 06:24
नवीन
हे हे, नेमके! ;)
- Log in or register to post comments
झ
झेन
Sat, 09/17/2016 - 08:09
नवीन
लांडगे अस्तिक-नास्तिक दोन्ही कळपात असतात आणि संधी ची वाट बघत असतात. ढोंगी लांडग्यावरून जनरलायझेशन...... असोच.
कळपाबाहेरचा झेन
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Sat, 09/17/2016 - 08:48
नवीन
बंदोबस्ताच्या पोलिसांचे काय हाल होत असतील दीवसाचे २०-२० तास डॉल्बीच्या पुढे उभे राहुन?
प्रतिज्ञापत्र देउनही सर्रास अतीउच्च आवाजात डॉल्बी लावली जाते, हटकणार्या पोलिसांना मंडळाचे मुजोर कार्यकर्ते मारहाण करतात.
एकंदरीत डॉल्बीला परवानगी देण्यासारखी परीस्तीती राहीली नाही.
भक्ती भावनेचा नीचरा टाळ्या वाजऊन, भजन गाउन करता येतो. बाकी सगळ्या भावनांचा नीचरा रस्त्यावर करायची गरज नाही.
शतकाच्या ईतिहासात ९०% वेळा गणेशोत्सव डॉल्बीशीवाय उत्तम रीत्या, कुणालाही त्रास न होता पार पडला आहे, वाढला आहे. त्यामुळे, गणेशोत्सवात डॉल्बी सारख्या सिस्टमची काहीही गरज नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 09/17/2016 - 09:36
नवीन
गणेशोत्सव, नवरात्र, दोन वेळा साजरी होणारी शिवजयंती, दहीहंडी, आंबेडकर जयंती व पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, बौद्ध पौर्णिमा, ताबूत, मोहर्रम, लग्नमुंजीच्या मिरवणुका, श्रावणातील सार्वजनिक सत्यनारायण इ. रस्त्यावर येऊन साजरे होणारे सर्व सण, समारंभ पूर्णपणे बंद व्हायला हवे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 09/17/2016 - 09:39
नवीन
रस्त्यावर येऊन साजरे होणारे सर्व सण, समारंभ पूर्णपणे बंद व्हायला हवे.
+१००००
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 09/17/2016 - 14:34
नवीन
दिवसेंदिवस गणेशोत्सवाचा प्रवास गुड टू बॅड टू वर्स्ट होत चाललाय,
15 20 वर्षांपूर्वी खूप छान साजरा व्हायचा हा उत्सव, त्याची आतुरतेने वाटही पहायचो, सोसायटीतले लोक सगळे मिळून गणपती पहायला जायचे, मजा असायची, नंतर गर्दीचे वाईट अनुभव यायला लागले आणि मग इच्छाच गेली.
एकदा मिरवणूकीत पाहिले, बाप्पाच्या मूर्तीसमोर टेम्पोवर उभा राहून एक तृतीयपंथी कुठल्या बकवास गाण्यावर इतका अचकट विचकट नाच करत होता, लोक त्याला वर अजून प्रोत्साहन देत होते, किळसवाणा प्रकार सगळा. आत्ताही तसेच दृश्य दिसते सगळीकडे,
काल रस्त्याकडील लोखंडी रेलींवर उभा राहून नाचणारा, फुल झिंगाट तर्राट झालेला, कधीही पडू शकेल अशा अवस्थेत एक माणूस पाहिला. यावेळेस पहिल्यांदा असं झालं की विसर्जन मिरवणूक पहायला बाहेर पडलो, जेमतेम थोडं फिरलो असू, पण त्या गर्दी आणि दणदणाटाने इतका त्रास व्हायला लागला की लगेच मागे फिरलो.
तो डॉल्बी, डीजे प्रकार भयंकर असतो, छळच एक प्रकारे, त्या आवाजाने एखाद्याचा हार्टफेल व्हायचा,
तासनतास तो गोंगाट सहन करणाऱ्या पोलिसांचे किती हाल होतात, एकूण सगळ्या सिस्टीमवरच किती ताण येतो हे दहा दिवस,
फक्त मानाच्या गणपतींची मिरवणूक मात्र छान असते, ढोल ताशे, पारंपारिक खेळ इ.मुळे प्रेक्षणीय, श्रवणीय आणि शिस्तबद्ध.
सर्वच आवाजी उत्सव सिरियसली बंद व्हायला हवेत, त्यातून काहीही साध्य होत नाही, त्यामागील मूळ विचार, हेतू
केव्हाच मागे पडलेत.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Sat, 09/17/2016 - 14:43
नवीन
सगळे डॉल्बी फोडून टाकले पाहिजेत अशा निष्कर्षाप्रत आलेलो आहे. छातीवर हातोडी मारल्यागत वाटते. छुपे ज्यामर लावून हल्लू हल्लू सगळ्या डॉल्बीची वाट लावली पाहिजे असे हिंस्र विचार आजकाल मनात फार येऊ लागलेत.
- Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे
Sat, 09/17/2016 - 15:46
नवीन
हो ना! ध्वनीप्रदुषण करणार्यांना देवाने जाम शिक्षा द्यावी त्यासाठी मी त्याला लोटांगण घालायला तयार आहे
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 09/17/2016 - 21:27
नवीन
अरे वा! मग उद्यापासून १०८ प्रदक्षिणा आणि लोटांगणे तुमच्या आवडीच्या/निवडीच्या देवाला (कुठल्यापण धर्माच्या चालेल हो) घाला आणि मग पहा चमत्कार! शिक्षा म्हणून पुढच्या जन्मी त्या सर्वांची घरे उन्हात बांधली जातील याची मी खात्री देतो बघा. :)
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »