डॉल्बी डीजे साउंड सिस्टिम्सवरील बंदीने गणेशोत्सवाची मजा हरवली असे आपल्याला वाटते का?
यंदाचा गणेशोत्सव डॉल्बी ,डिजेमुक्त करण्यात पोलिस व प्रशासनाला यश आलेले दिसतेय.असे असले तरी यामुळे तरुणाईच्या जल्लोषाला लगाम बसल्याने सर्वत्र नाराजीचा सूर आहे.डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातलेली नाही,फक्त आवाजाच्या मर्यादा पाळाव्यात असे आदेश दिले आहेत.मी स्वतः जरी नास्तिक असलो तरी उत्सवांकडे माझा कल असतो,खास करुण गणेशोत्सव.याला कारणही तसेच आहे.आपल्याकडेचे उत्सव हे मानवी उन्मादाचा निचरा करण्याचे एक उत्तम साधन आहेत असे मला वाटते ,मग ते विवाह असोत,नवरात्र असो,दिवाळी असो वा आपला आवड्ता गणेशोत्सव असो.
उन्माद' हा प्रत्येक माणसात असतोच ,या उन्मादाचा निचरा करण्यासाठी जर कुणी सणांचा आधार घेत असेल तर त्यात गैर काहीच नाही असे माझे मत आहे
गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी सिस्टीमचे प्रस्थ गेल्या काही वर्षात आलेले आहे व भरपुर लोकप्रियही झाले ,त्यामागे बरीच कारणे आहेत ,आवडती गाणी मोठ्या आवाजात ऐकणे ,त्यावर बेधुंद होऊन नाचणे वगैरे.तरुणांमध्ये हे विशेष लोकप्रिय आहे कारण त्यामुळे त्यांच्यातील उन्मादाचा निचरा होतो.पण राज्यात सर्वच ठीकाणी प्रशासन् या डॉल्बी डीजेच्या मागे पडले आहे.या संदर्भात माझे काही मुद्दे व प्रश्न आहेत ते थोडक्यात मांडतो.
१. डॉल्बी व डीजे सिस्टीम खरेच इतक्या वाइट आहेत काय? आपणास काय वाटते?
२.या बंदीमुळे यंदाचा गणेशोत्सव मिळमिळीत झाला असे अनेक तरुणांचे मत मी ऐकले ,मला तरी त्यात तथ्य जाणवले.विसर्जन मिरव्णुकीत जान नसल्याचे चित्र होते.
३. सण, त्यातल्या मिरवणुका ,यातुन जर उन्मादाचा निचरा होत असेल तर काही दिवसांसाठी डॉल्बी सारख्या प्र्कारांना परवाणगी देण्यास काय हरकत आहे?
४.उच्च न्यायालयाने डॉल्बी चा विषय पोलिसांच्या ताब्यात दिला आहे ,पोलिस या बाबतीत अतिरेक करत आहेत असे वाटते का?
५. आपल्या देशात रोज नियम तोडले जातात ,ते ही सर्रास.मग डॉल्बी चालकांनी नियम तोडल्यास एवढा गजहब का होतोय.!
६. पुढील वर्षाच्या गणेशोत्सवात डॉल्बी डीजे यांना परवाणगी द्यावी असे आपल्याला वाटते का?
💬 प्रतिसाद
(114)
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:35
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:35
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:36
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:37
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:37
नवीन
- Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे
Sat, 09/17/2016 - 21:42
नवीन
व्हॉट्स अप वरून साभार
पप्पी दे पप्पी दे पारुला..
आवाज वाढव DJ तुला आईची..
चिमणी उडाली भुर्र..
पोरी जरा जपून दांडा धर..
झिंग झिंग झींगाट...
या आणि अशा अनेक भक्तीरसाने ओथंबलेल्या गाण्यांच्या भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा करुन आपली महान संस्कृती जपण्यासाठी गणपती किंवा इतर सणाच्या काळात विविध चित्रपटांची गाणी कर्णकर्कश आवाजात वाजवली जातात. त्याचा अनेकांना त्रास होतो.
खरं तर या गाण्यांचा भाव न समजल्यामुळे असा त्रास होतो.
ही गाणी समजावी, आपला त्रास कमी व्हावा म्हणून हा छोटासा प्रयत्न.
------
कामावर जायला उशीर झायला
बघतोय रिक्षावाला
बाई मज बघतोय रिक्षावाला
अतिशय भाव पूर्ण गाणं आहे.
अर्थात या धकाधकीच्या जीवनात माझ्या हातून सरळ काहीच होत नाहीय. माझी सगळी गणितं चुकतायत. मला काहीच सुचत नाहीय. कोणीच सोबती नाही, सहकारी नाही, मदत करायला नाही. आपल्याला उशीर झाल्यावर, लगबग असताना जसं आपण रिक्षावाल्याला शोधत असतो, बघत असतो. आपल्याला बघून रिक्षावाला जोरात पुढे जातो असं वाटत असतो. तोही आपल्याला नाकारतो असं आपल्याला वाटतं. अर्थात अडचणीत सापडल्यावर भगवंत शोधत असतो. भगवंत आपल्याला सोडून पुढे चाललाय अशी आपली भावना होते, नैराश्य येते. पण प्रत्यक्षात रिक्षावाला म्हणजे भगवंत आपल्याला बघत असतो. त्याचं आपल्यावर बारीक लक्ष असतं. त्याच्या नजरेतून आपण सुटू शकत नाही
------
बिडी जलैले जिगर से पिया ...
जिगर मा बडी आग है....
अर्थात या ह्रदयात भगवंताच्या भक्तीची आग पेटली आहे. या आगीच्या धगीचा- अंगाराचा फायदा सर्वांना होणार आहे. कुणाला थोडी आग दिल्याने ती कमी होणार नाही. भगवंताच्या भक्तीने माझ्या ह्रदयात लागलेली ही आग इतरांच्या बॉडीत बीडी अर्थात श्वास फुंकण्याचं काम करत आहे.
-------
आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे ...
अर्थात या जगरहाटीच्या कोलाहलात माझ्या अंतर्मनाचा आवाज क्षीण झालाय. हे डीजे म्हणजे भगवंता हा आवाज वाढव, मला आत्मबळ दे. तुझ्या शी तादात्म पावण्यासाठी माझा आवाज तुझ्या पर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या आवाजात बळ भर... हे भगवंता तू हे करणार नसशील तर जगनियंता असलेल्या तुझ्या आईची तुला शपथ आहे. माझा जीव तळमळतोय.
------
पप्पी दे पप्पी दे पारूला
अर्थात हे भगवंता मी किती ही मोठा झालो तरी तुझ्या समोर लहानच आहे. श्लील- अश्लीलतेच्या भावनेच्या पुढे जाण्यासाठी मला मदत कर. जसं लहान मुलांचं अतिशय निरागसतेने- प्रेमाने आपण चुंबन घेतो तसंच हे भगवंता तू पारू म्हणजे मला भक्तिरसाचं चुंबन दे. मला तो निरागस भाव दे.
-------
झालय झिंग झिंगाट
देवीची आरती चालू असताना जस भगत च्या अंगी येत तस तुज़्या आगमना नी मि त्या आनंदानी कोणता ही नशीला पदार्थ न घेता झिंगाट झालोय देवा
-----
याड लागल
भगवंताच्या भक्तित लोक इतके वेडे होतात घर दार संपत्ति माया मोह सगळे पाश तुटले जातात न तुज याड लागत
------
D j वाले बाबू मेरा गाना बजाओ
भगवंताला अत्यंत कळकळी ने सांगितले आहे या भावगीता मधे
डीजे वाले म्हणजे भगवंत
भगवंता माझी प्रार्थना तुज़्या हृदया पर्यन्त पोहचावी म्हणून तुच माझ्या मुखी विराजमान हो आणि तूच म्हण जे तुला हव
हे भाव मनात जागवत आता गणेशोत्सवातील गाणी ऐका. आता त्रास होणार नाह
- Log in or register to post comments
अ
अस्वस्थामा
Sat, 09/17/2016 - 21:55
नवीन
या सगळ्यात कोणी त्या निचर्याबद्दल बोललेच नाही की राव.
मुळात असाही निचरा वगैरे गरजेची गोष्ट आहे हे खरंय पण कुठेपण कोपरा गाठून मोकळे होण्यासारखं हे होतंय.
करा की निचरा इतरांना कशाला त्रास (ते सफाई वगैरे कुचकामी सल्ले आहेत)?
मुळात निचराच करायचा तर "समाजसेवक" अशा नेत्यांनी साउंडप्रूफ असे हॉल सारखे क्लब्स (आपलं ते उत्सव कार्यालये) बांधावीत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना डिजे वगैरे निचर्यासाठी जे काय लागेल ते फुकट उपलब्ध करुन द्यावे. रग जिरेपत्तूर नाचावे आणि गप घरी जावे.
दर शुक्रवारी/शनिवारी हेच कारेक्रम इतरांसाठी पण ठेवावे. एक दिवस मिक्स आणि एकेक दिवस एकच जेंडरच्या लोकांना असे वाटप करावे फारतर (आऱक्षण पण लागू करा ;)).
ते देवा-धर्माचं वायलं आणि हे निचर्याचं वायलं, हे ध्यानात घेतलं पायजे.
येग्झॅक्टली. यात अजून राजकीय/जातीय आणि कसलेकसले मेळावे पण अॅडवा. जे काय साजरं करायचंय ते रस्त्यावर येऊन, इतरांच्या दारात जाऊन, दुसर्यांना त्रास होईल असं नको.
क्लबात जाऊन कानठळ्या आवाजात झिंगून मनसोक्त नाचावे, मैदानात फक्त खेळ व्हावेत आणि रस्त्यावर फक्त दळण-वळण (मग फुटपाथ चालणार्यांसाठी रिकामे व्हावेत हे पण आलंच) व्हावं. सिम्पल्स.!!
पण इतका साधा-सरळ-सोपा विचार केला तर कसं चालेल.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 09/18/2016 - 05:38
नवीन
भारी
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 09/18/2016 - 11:51
नवीन
खरच चांगला विचार आहे, मला मध्ये काही दिवसापूर्वी एका आयडीने विचारणाही केलेली. सोलापुरात इतका उत्सवाचा भडीमार असतो काही लिहित का नाही. मी स्वतःच या उत्सवाच्या अर्थकारणात जी साखळी असते त्याच्याशी संबधित आहे, सो माझे इंटरेस्ट असतातच. पण एक नागरिक म्हनून नाही बघवत हे.
नवल ह्याचेच वाटते की, लोकमान्यानी जो उत्सव बघून ती आयडीया पुण्यात राबवली तो गणपती आमच्या गावातला. आजोबा गणपती. स्वामी श्रध्दानंदांची परंपरा ती. पण नंतर पुण्याच्याच डीजे स्पीकर वॉल, १००-१०० जणाचे ढोलपथक असल्या दलिंदर प्रथा का अनुकरण कराव्यास्या वाटू लागल्या. यंदा परत ते मुलींनी पण फेटे बिटे बांधून ढोल वाजवायचे, मग त्याना बघायला गर्दी, त्यांचे फॅशन शो, तासातासाने मेकप टच करायला एक व्हॅन. च्यामारी काय हाय काय हे? मग ज्ञान्प्रबोधीनी पण. मग पोरांनी उगी फेटेबिटे बांधून बुलेटवर रॅल्या काढायच्या, अरे काय हे. सोलापुरात परंपरा लेझीमची. एकेका मंडळाचे दीड दोन हजार जणांचे पथ लेझीम खेळते. शिस्तीत, एका ड्रेसात. लोकल आमदार खासदारांचे पण डाव पाठ असतात. स्वतः लेझीम घेऊन खेळतात ते. त्याच्या प्रॅक्टीस रात्री रस्त्यावर चालायच्या पण आवाज नाही जास्त. एक हलगी, दोन तडमताशे. बास्स. एका मंडळाने तर एका वर्षी नेहमीचा हलगीवाला एन वेळी निधन पावला म्हनून फक्त संबळाच्या आवाजावर लेझीम खेळला. त्या लेझीमवाल्यांना पण आता डीजेची चटक लावायला सुरुवात झालीय. मानाची मंडळे वन ब्रँड स्पॉन्सर होतात, वर्गणी न मागता येते. सगळे चालते. लिहायला बसलो तर टेराबाईटी मॅटर होईल पण डोक्याच्या बाहेरचा विषय झालाय.
सोलापुरच्याच भाषेत "बसबस केलंय"
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/19/2016 - 10:33
नवीन
आता अजान सुद्धा डॉलबीवरच द्यायला हवी
- Log in or register to post comments
प
पुष्कर जोशी
Mon, 09/19/2016 - 11:20
नवीन
सोपी आयडीया ..
या बाबतीत चिन चा आदर्श घ्यावा .. तिकडे मुख्य सणांना ५ दिवस सुट्टी असते .. पण आधिचा व नंतरचा शनिवार रविवार वर्कींग असतो ... मोठी सुट्टी. मिळआल्याने ज्यांना आवडत नाही ते शहरा बाहेर जातील .. आणि ज्यांना साजरा करायचा आहे ते साजरा पण करतील ..
- Log in or register to post comments
च
चिनार
Mon, 09/19/2016 - 11:47
नवीन
काही अवांतर शंका..
1. डॉल्बी डीजे वर बंदी आणली तशी ढोलपथकांवर का आणल्या जात नाही ? की ढोलपथकांमुळे संस्कृतीरक्षण होते आणि डॉल्बी मुळे होत नाही ? माझ्या माहितीप्रमाणे हे ढोलपथकं पोलिसांना आणि कायद्यांना अजिबात जुमानत नाहीत
2. ढोलपथकांच्या सादरीकरणामध्ये नावीन्य का नसते ? त्याच त्याच थीम वर्षानुवर्षे वाजवतात आणि वरून त्याचा अभिमान सदृश माज दाखवतात.
3. ढोल वाजवत असताना ते एक घंटासदृश्य वाद्य ठणाणण्यात येते. या दोन वाद्यांचा संगीताच्या पातळीवर नेमका काय संबंध आहे ?
4.ढोलपथक आणि डॉल्बी वाजवणाऱ्या कोणाच्याच घरात पेशंट, लहान मुलं, म्हातारे आजी आजोबा नसतात का?
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 09/19/2016 - 11:54
नवीन
अरे शंकासुरा चिनारा
हि घे उत्तरे अन चर्चा
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Mon, 09/19/2016 - 12:14
नवीन
रामकुंडावर एकदा एक छोटीशी पालखी मिरवणूक बघितली होती, अंदाजे वीसेक जण वाजवत असतील, सर्व पारंपरिक वाद्य, चामड्याचे. प्लास्टिक नाही, इतका सुंदर आणि अंगात भिनत जाणारा आवाज कि क्या बात है.. विशेष म्हणजे त्या मिरावणुकीपासून दीडशे फुटावर काहीच ऐकू येत नव्हते, जवळ गेल्यावर त्रास नव्हे तर गुंगी चढत होती नादाची,
खरोखर काही गोष्टी मिनियेचर छान असतात, फुगवून मोठ्या केल्या कि फक्त मोठेपणाचं समाधान मिळतं, बाकी सगळं हरवते,
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3