Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लष्करी मुख्यालयावर अतिरेकी हल्ला, १७ जवान शहीद

ध
धर्मराजमुटके
Sun, 09/18/2016 - 08:50
🗣 142 प्रतिसाद
ही बातमी. जम्मू-काश्मीरमधील उरी येथील लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे आत्मघाती दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे १७ जवान शहीद झाले आहेत. तर, लष्कराच्या प्रतिहल्ल्यात चार दहशतवादी मारले गेले आहेत. चीड आणी हतबलता याशिवाय दुसरे काहिच सुचत नाहिये. पहिले पोलीस आणि आता लष्करी जवान. जे आपल्या रक्षणासाठी आहेत त्यांच्यावरच जीव गमवायची पाळी वारंवार येतेय. तरीही डोके शांत ठेऊनच विचार करायचा, भ्याड हल्ल्यांचा जास्तीत जास्त कडक निंदा करायची आणि मेणबत्ती पेटवून श्रद्धांजली वाहायची याच्यापेक्षा जास्त ऑप्शन्स हाताशी नसणे यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकते ? आजचा दिवसाची खराब सुरुवात. जास्त काही सुचत नाहिये त्यामुळे पुढे लिहित नाही. --------------- श्रद्धांजली वाहण्यापुरता उरलेला एक सामान्य नागरिक
वर्गीकरण
बातम्या

प्रतिक्रिया द्या
31104 वाचन

💬 प्रतिसाद (142)
स
संजय पाटिल Sun, 09/18/2016 - 09:35 नवीन
सीमा ओलांडायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
भ
भिंगरी Sun, 09/18/2016 - 12:12 नवीन
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
भ
भिंगरी Sun, 09/18/2016 - 12:12 नवीन
सीमा वाढवायची वेळ आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल
R
rahul ghate Sun, 09/18/2016 - 10:33 नवीन
झालेला हल्ला अतिशय दुर्दैवी असून , हे प्रकार वाढत आहेत . असे किती जवान शाहिद करायचे व कडी निंदा करून गप्प बसायचा ह्याचा आता सरकार ने विचार करावा . राहुल
  • Log in or register to post comments
त
तेजस आठवले Sun, 09/18/2016 - 11:49 नवीन
अतिशय दुर्दैवी आणि वाईट घटना. ही घटना दुर्दैवी आहे हे खरेच आहे. पण मला असे वाटते की अशा घटनांवरचे धागे काढू नयेत(हे माझे वैयक्तिक मत आहे). होतं काय की एक तर ह्या धाग्यांवर आपण श्रद्धांजली वाहण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाही. मुख्य मुद्दा म्हणजे काही डूआयडींना गरळ ओकायला हाच धागा मिळेल आणि इतक्या संवेदनशील विषयावर अतिशय दुर्दैवी आणि संताप येणाऱ्या प्रतिक्रिया येतील. शेळी जाते जीवानिशी अन खाणारा म्हणतो वातड अशी एक म्हण आहे. आपल्या सर्वांसाठी जे लोक आयुष्य पणाला लावून आपले रक्षण करतात त्यांच्या प्रति आदरांजली आणि जिव्हाळा राहिला दूरच पण कुठल्याही संवेदनशील माणसाला संताप येईल अश्या प्रतिक्रिया इथे येऊ शकतात. काही धाग्यांवर असे झालेले आपण बघतोच. बऱ्याच संवेदनशील विषयांवर मिपा वर ह्यापूर्वी मेगाबायटी चर्चा झालेल्या आहेत.साधक बाधक विचार, परस्परविरोधी, अगदी टोकाचे वाटणारे विचार मांडले गेले आहेत.त्यामुळे काही मजकुराचे संपादन आणि काही आयडींवर बंदी असेही झाले आहे. पण माझ्या मते हे सगळे एका अदृश्य मर्यादेत चालत होते. सध्या मात्र काही डुआयडीनी ठरवून कहर केला आहे. काहीच्या काही प्रतिक्रिया द्याव्यात आणि लोकांनी चिडून जाऊन त्यांना उत्तर द्यावे ह्यासाठी ते आपल्याला भाग पडत आहेत. असो. फारच अवांतर झाले. पण ह्या दुर्दैवी घटनेला आपल्या मिपा कडून गालबोट लागू नये म्हणून हे लिहावे असे वाटले.मिपाचे सदस्य नसलेले पण मिपा वाचणारे असे हजारो, कदाचित लाखो लोक असतील. त्यांना डुआयडी आणि इतर गोष्टी माहित नसणार, पण ह्या डुआयडींच्या आणि त्याला उत्तर म्हणून आलेल्या प्रतिक्रिया वाचून एकूणच मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 12:23 नवीन
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली ! :(
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Sun, 09/18/2016 - 12:42 नवीन
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments
न
नितिन थत्ते Sun, 09/18/2016 - 16:25 नवीन
उरी दहशतवादी हल्ल्याचा निषेध. सरकार या बाबतीत योग्य असेल तो निर्णय घेईलच. जो योग्य त्या माहितीवर आणि सर्व प्रो आणि कॉन यांच्यावर आधारित असेल.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 09/18/2016 - 16:52 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
स
साहना Sun, 09/18/2016 - 16:43 नवीन
तीव्र शब्दांत निषेध ! मृतांना श्रद्धांजली.
  • Log in or register to post comments
म
महामाया Sun, 09/18/2016 - 16:55 नवीन
उरि दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या १७ जवानांना भावपूर्ण श्रध्दांजली !
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 09/18/2016 - 16:59 नवीन

We strongly condemn the cowardly terror attack in Uri. I assure the nation that those behind this despicable attack will not go unpunished.

— Narendra Modi (@narendramodi) September 18, 2016
इथे श्री नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला फक्त सज्जड दम देऊन थांबायला नको असे वाटते, निवडणूक प्रचारा दरम्यान 'एक सर के बदले हम दुष्मन के दस सर लेके आयेंगे' हे श्री नरेंद्र मोदी यांनी बोललेले वाक्य आता खरे करुन दाखवायची वेळ आली आहे. या आधी देशात कुठेही दहशतवादी हल्ला झाल्यावर कडी से कडी निंदा तर कॉंग्रेस सरकार देखिल करत होती, मात्र अशी निंदा न करता काहीतरी ठोस कारवाई करुन आपण कॉंग्रेस पेक्षा वेगळे आहोत हे तमाम भारतीय जनतेला दाखवून द्यायची चांगली संधी त्यांच्याकडे आहे आणि ती त्यांनी सोडू नये असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अजया Sun, 09/18/2016 - 17:57 नवीन
:(
  • Log in or register to post comments
म
मनिमौ Sun, 09/18/2016 - 18:00 नवीन
सांगेन गोष्टी युक्तीच्या चार या विचार सोडुन हातात शस्त्र धारण करायची वेळ आली आहे सर्व शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 04:10 नवीन
बलुचिस्तान : आपण नक्की काय करावे? दासबोध.कॉम यांनी सुरु केलेल्या धाग्यावर मी लिहिलेला प्रतिसाद इथंही उद्धृत करणे गरजेचे वाटत आहे. --- सध्या भारत पाकिस्तान मध्ये एकतर्फी व्यापार करार आहे. म्हणजे आपण Most Favored Nation या तहा प्रमाणे पाकिस्तान ला तेथून येणाऱ्या मालावर जकात सवलती देतो .पण जगात बाकी देश एकमेकांना तीच सवलत देण्याचे बंधन पाळतात तसे पाकिस्तान करत नाही.पाकिस्तान ही सवलत भारतातून पाठवल्या जाणाऱ्या मालावर देत नाही. सबंध इतके बिघडल्या नन्तर तरी हे पाकिस्तान धार्जिणे एकतर्फी धोरण बंद करायला हवे. भारताने पाकिस्तानला MFN सवलत १९९६ साली दिली .पाकिस्तानने अजून तरी तसे केलेले नाही.महात्मा गांधी यांनी शत्रूने एका गालात थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करावा असे म्हटले होते. ते धोरण आजही पुढे चालवले जात आहे असे वाटते .
  • Log in or register to post comments
स
साहना Mon, 09/19/2016 - 04:27 नवीन
आपले नाक कापून पाकिस्तानला अवलक्षण करून काय फायदा ? पाकिस्तान ने भारताला MFN दर्जा नाही दिला ह्यांत पाकिस्तानचेच जास्त नुकसान आहे. पाकिस्तानी आर्मीला चीन आणि अमेरिका कडून भरपूर पैसे मिळतात. त्यांना विशेष फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 06:26 नवीन
कसे काय ? पाकिस्तान भारतातून आयात होणाऱ्या मालावर जकात शुल्क आकारतो . पण आपण पाकिस्तान मधून आयात होणाऱ्या मालावर जकातीच्या सवलती देतो. त्या सवलती आपण बंद करण्याने भारताचे नाक कसे कापले जाईल हे जरा समजावून सांगा. http://www.thehindu.com/news/international/south-asia/pakistan-in-no-mood-to-grant-mfn-status-to-india-yet/article7903550.ece
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
स
साहना Mon, 09/19/2016 - 21:56 नवीन
इकोन १०१: Import duties hurt importing population भारतीय जनतेला पाकिस्तान माल स्वस्तांत मिळतो आहे आहे पण पाकिस्तानी जनतेला भारतीय माल महागात पडतो ह्यांत आमचा फायदा आणि पाकिस्तानी जनतेचे नुकसान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले
र
रमेश आठवले Mon, 09/19/2016 - 22:29 नवीन
समजले नाही पाकिस्तान भारताकडून १५० च्या आसपास वस्तु आयात करतो आणि त्या पाकिस्तानच्या नागरिकांना मुद्दाम जास्त किमतीने विकतो असे आपणाला म्हणायचे आहे काय ? बहुतेक देशात हा दर्जा एकमेकांना दिला जातो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
न
नावातकायआहे Mon, 09/19/2016 - 05:36 नवीन
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=IB7GNx
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 06:10 नवीन
आपले भूतपूर्व पंतप्रधान श्री लाल बहादूर शास्त्री म्हणाले होते तसे आम्ही प्रति हल्ला शत्रूला पाहिजे तसा नव्हे तर आम्हाला पाहिजे तेंव्हा आणि पाहिजे तसा करण्याचा पर्याय खुला ठेवतो. आणि ते त्यांनी करून दाखविले. . सवंग लोकप्रियतेच्या मागे जाण्याऐवजी थंड डोक्याने सर्व गणिते करून प्रतिहल्ला केला जाईल. श्री नरेंद्र मोदी यांच्या कडून अशी अपेक्षा आहे. जनतेला हिंदी चित्रपटासारखे "अगर तुमने अपनी मां का दूध पिया है तो सामने आओ" सारखे खटकेबाज संवाद पसंत असतात. त्याला बळी न पडल्यास "तुमचे मोदी' काय करत आहेत. डॉ मनमोहनपेक्षा वेगळे काय केले म्हणून येथेही प्रतिसाद येतीलच. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नावातकायआहे
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 06:49 नवीन
बाकी सगळे बरोबर आहे, फक्त असल्या बातमीवर राजकीय धुळवड मोदी मनमोहन वगैरे आणायचे पाप करून काय साधले तुम्ही? जर 'अपनी माँ का दूध" वगैरे फिल्मी संवाद आहेत तर "एका मुंडक्याच्या बदली 10 मुंडकी" हा फिल्मी संवाद नसेल का? त्या संदर्भात जर मोदींना प्रश्न विचारले गेले किंवा त्यांच्यावर काही आरोप झाले तर तुम्हाला खुपण्याचे काहीही कारण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 08:21 नवीन
इतिहास पाहून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 09:51 नवीन
मी पण पूर्ण पाहतोय हो, तुम्ही पण पूर्ण पहा, सिलेक्टिव्ह नको, चालतंय काय??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 08:19 नवीन
आणि सर्वंकष युद्ध आर्थिक दृष्ट्या दोघांनाही परवडणारं नाही. जी काही कृती होईल ती ही गणितं डोळ्यांसमोर ठेवून होईल. पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विशुमित Mon, 09/19/2016 - 08:37 नवीन
म्हणजे फक्त उत्तर प्रदेश मधील निवडणुकीवर डोळा ठेवूनच निर्णय होईल ?? जग जिंकायला निघालेल्या अलेक्सझांडर सारखा शेवट मोदींचा होईल यात शंका वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 11:25 नवीन
रच्याकने ' फक्त ' उत्तर प्रदेशातील निवडणुकींवर डोळा ठेवून निर्णय होईल असं कुठे म्हटलंय ते दाखवा. स्वतःला वाटेल तो अर्थ काढायला तुम्ही स्वतंत्र आहात पण दुसरेही तसंच म्हणताहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
व
विशुमित Mon, 09/19/2016 - 11:35 नवीन
तुम्हीच म्हणताय, "पण काहीतरी होईल अशी अपेक्षा आहे कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत" म्हणजे निवडणूक नसती तर नेहमी सारखीच गुळमुळीत प्रतिक्रिया दिली असती, असाच अर्थ लागतो ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 11:36 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ग
गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 09:23 नवीन
कारण उत्तर प्रदेशात निवडणुका आहेत. भाजपला स्वतःला निष्क्रिय दाखवणे परवडणार नाही.
देजा वू? २००१ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतरही दोन महिन्यात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होत्या आणि त्यावेळी केंद्रात वाजपेयींचे सरकार होते तर उत्तर प्रदेशात भाजपचे राजनाथ सिंगांचे.तेव्हा सीमेवर अगदी "आयबॉल टू आयबॉल" परिस्थितीत सैन्य नेलेही होते.पण त्यातून पुढे युध्द वगैरे काहीच झाले नाही. मे २००२ कालच्या उरी हल्ल्याप्रमाणे जम्मूजवळ कालूचक येथे सैनिक छावणीवर हल्ला झाला होता. त्यानंतर वाजपेयी कुपवाडाला गेले होते आणि "मेरा यहा आना अपने आप मै एक प्रतिक है. इसे हमारा पडोसी समजे ना समजे दुनियावाले समजे ना समजे हम विजय का एक नया अध्याय लिखेंगे" असेही बोलले होते.पण पुढे काहीच झाले नाही. अर्थातच धसमुसळेपणाने वाजपेयींनी हल्ला केला नाही हे चांगलेच झाले.आजही परिस्थिती फार वेगळी आहे असे अजिबात् नाही. आणि आताही मोदी काही वेगळा निर्णय घेतील असे वाटतही नाही. सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.याविषयी माझ्यासारख्याने काही बोलणे म्हणजे "उंदीर मारायच्या विभागात नोकरीला असून...." यापेक्षा काही वेगळे नाही. तरीही एक गोष्ट नक्कीच लिहितो की जो काही निर्णय होईल त्यात उत्तर प्रदेशातील निवडणुका हा घटक नसावा/नसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विशुमित Mon, 09/19/2016 - 09:32 नवीन
<<<<<<<<<<सध्या निर्णय प्रक्रीयेमध्ये अजित डोवाल आहेत आणि ते स्वतः शत्रूच्या नाकावर टिच्चून लाहोरमध्ये सात वर्षे हेर म्हणून राहिले होते हे सर्वांनाच माहित आहे.सर्व परिस्थितीची त्यांना नक्कीच जाण आहे आणि त्याप्रमाणे योग्य निर्णय घेतला जाईल ही खात्री आहे.>>>>>>>>>> फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे? असे व्यक्ती प्रेम किती दिवस बाळगणार आहोत आपण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गंम्बा Mon, 09/19/2016 - 11:35 नवीन
फक्त अजित डोवाल च ऑल टाईम टायगर आहेत का? ते खरंच एवढे थोर आहेत तर मग हल्ला झालाच नव्हता पाहिजे?
डोवाल नक्कीच थोर असणार, पण लष्करी छावणी वर हातबाँम्ब टाकता येतील इतक्या जवळ अतिरेकी येत असतील म्हणजे अश्या छावण्यांच्या सुरक्षीतते साठी पेट्रोलिंग वगैरे नसते का? बाप्पु कींवा डॉक्टर खरे सांगु शकतील पण विचित्र वाटले इतके नक्की. भारतीय सैन्य खुप अंडरस्टाफ्फ्ड आहे किंवा प्रचंड स्ट्रेचड आहे असा ही अर्थ निघतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
स
सुबोध खरे Mon, 09/19/2016 - 17:01 नवीन
लष्करात एक म्हण नेहमी सांगितली जाते. "जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैन्याला कोणतीही तटबंदी अभेद्य नसते." जेंव्हा एक दहशतवादी तटबंदी भेदून आत शिरतो तेंव्हा त्याच्या अगोदरचे शंभर दहशतवादी मारले गेलेले असतात/ किंवा त्यांची घुसखोरी नाकाम झालेली असते. हि वस्तुस्थिती जगाच्या समोर मांडण्याची गरज नसते. दुर्दैवाने दहशतवादयांचे धर्मयोद्धा म्हणून मानसिक ध्रुवीकरण झालेले आहे आणि ते अशा मरणाला भीत नाहीत तेंव्हा "निर्भय" माणूस हा जास्त धोकादायक असतो. उडी हे गाव एखाद्या सुळक्यासारखे पाकिस्तानच्या सरहद्दीच्या घुसलेले आहे त्यामुळे तेथील लष्करी तळ हा तीन बाजूनी पाकिस्तानी भूमीने घेरलेला आहे. एका बाजूला तर ते अंतर केवळ ६ किमी इतके कमी आहे. पूर्णपणे सशस्त्र असे दहशतवादी जेंव्हा आत घुसतात तेंव्हा पाकिस्तानी सैन्याचा जोरदार गोळीबार चालू होतो. आपले सैनिक त्यांना प्रत्युत्तर देतात. या धुमश्चक्रीत काही लोक आत घुसतात आणि काही मारले जातात. मारले गेलेल्या दहशतवाद्यांच्या अंगावर पेलेटने पाकिस्तानी भडीमार करतात आणि हि प्रेते तुमच्या हद्दीत "लष्कराने कृत्रिम चकमकीत मारलेले नागरिक" म्हणून उभे केले जातात याला अर्थात काश्मीर मधील फुटीरांची फूस असतेच. जगाची पाहण्याची दृष्टी अशीच आहे कि हा एक दहशतवादी तरी आत घुसलाच कसा? काश्मीर मध्ये दर शंभर मीटर वर एक सैनिक उभा आहे तर हे दहशतवादी घुसतातच कसे? ( पाकिस्तान बरोबर आपली सीमा २९०० किमी आहे. तेही नुसती गस्त घालण्यासाठी ८ तासाला एक आणि एक सुटी साठी असे ४ सैनिक प्रत्येक १०० मीटर साठी उभे केले तर १लाख १६ हजार सैनिक "फक्त" गस्त घालण्यासाठी उभे ठेवावे लागतील हा विचार केलेलाच नाही) आम्ही कर भरतो त्यावरच लष्कराचे पोट भरते मग असा हलगर्जी पणा कसा होतो. अशा तर्हेचे प्रश्न मिपावरच विचारले गेले आहेत. यातील बरेच प्रश्न हे शुद्ध अज्ञानापोटी विचारले गेले आहेत आणि काही आकसापोटी. म्हणून त्यांच्याशी वितंडवाद घालण्याचा मी प्रयत्न केला नाही कि करतही नाही. इथे मूळ मुद्दा दहशतवादी हा नसून त्याला मिळणारी पाकिस्तानी लष्कराची छुपी मदत हा मुद्दा आहे. ती मदत नसती तर १००० पैकी एखादा दहशतवादी आत घुसला असता. सिमी किंवा आय एस आय एस सारख्या संघटनांचे "निद्रिस्त सेल" भारतातील शहरातही आहेत. तेंव्हा केवळ तटबंदी नव्हे तर सगळा देश सुरक्षित करणे आवश्यक आहे. पण आपली जनता फुकट मिळणार्या वीज आणि पाण्यासाठी मत देते किंवा जातीच्या नावावर मत देते किंवा याकूब मेमन सारख्या देशद्रोहाच्या गुन्हेगाराला हुतात्मा म्हणते. स्वतःचे पाच पैसे वाचावेत किंवा स्वतःच्या आरामात कोणताही फरक होऊ नये म्हणून काहीही करायला तयार असते.आपली जनता १००० रुपये दिले तर दाऊद इब्राहिम ला मते द्यायला तयार होईल हे मला खेदाने म्हणावेसे वाटते. छप्पन लप्पन करून कर चुकवण्याला "हुशारी" मानते अशा जनतेने हे समजून घेणे आवश्यक आहे कि युद्ध हे शस्त्राने किंवा लष्करी सामर्थ्याने जिंकता येत नाही तर त्या लष्कराच्या मागे उभ्या असलेल्या जनतेच्या अतुलनीय धैर्याने जिंकता येते. मी माझे कर्तव्य करतो आहे का? शेजारचा माणूस एकही तरी संशयास्पद गोष्टी करतो आहे ते पोलिसांना कळवायच्या ऐवजी कोण त्या लफड्यात पडणार म्हणत असाल तर लष्कराला हे दहशतवादी आत घुसलेच कसे हे विचारण्याचा नैतिक अधिकार आपण गमावलेला आहे हे समजून घ्या. दोन वेळेस ध्वजाला सलाम केला आणि १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला जय हिंद म्हणले कि आपली देशभक्ती जाहीर झाली असे चालणार नाही. असो बाकी चालू द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
स
सही रे सई Mon, 09/19/2016 - 23:23 नवीन
किती संयमीत शब्दात एकेकाला हाणलत हो तुम्ही. अश्या अभ्यासपुर्ण तरीही प्रत्येकाची जागा दाखवून देणार्‍या तुमच्या या लिखाणाची पंखा झाले आहे. मुजरा घ्यावा महाराजा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गंम्बा Tue, 09/20/2016 - 06:32 नवीन
डॉक्टर साहेब, तुमचा प्रतिसाद मला उद्देशुन असला तर पूर्णपणे हुकला आहे. मीच लिहीले होते की असे हल्ले होऊ शकतात ह्याचा एक अर्थ असा निघतो की भारतीय सैन्य अंडरस्टाफ्फ् आहे. आणि जे आहे ते सुद्धा स्ट्रेच्ड आहे म्हणजे त्यांच्या कपॅसिटी पेक्षा जास्त जबाबदारी निभावायला लागते आहे. त्या बद्दल तुमचे मत विचारले तर तुम्ही मला देशभक्ती आणि नैतिकता शिकवायला लागलात. सैन्याचा पगार सरकारी नागरी नोकरापेक्षा कमीतकमी दीडपट असावा असे माझे मत आहे. तुम्ही म्हणता तसे लाखो सैनिक गस्त घालायला लागत असतील तर तसे ते असायला पाहिजेत. त्याचा खर्च बाकीच्या नागरीकांनी केलाच पाहिजे. त्याही पुढे जाउन असे म्हणीन की , भारतीय सैन्याला जर दिल्लीतले सरकार पुरेसे स्वातंत्र्य आणि सुविधा आणि मनुष्यबळ देत नसेल तर सैन्यानी काश्मीर मधे काम करणे बंद करावे. काश्मीर कशाला सर्वत्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 09/20/2016 - 07:38 नवीन
तो तुम्हाला नव्हताच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंम्बा
भ
भटक्य आणि उनाड गुरुवार, 09/29/2016 - 13:35 नवीन
एक नम्बर हाणलात तुम्ही सर....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
फ
फेदरवेट साहेब Mon, 09/19/2016 - 09:54 नवीन
ममो पंप्र होते तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता म्हणता? का "एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" म्हणले गेले तेव्हा पाकिस्तान अण्वस्त्रसज्ज नव्हता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
प
प्रसाद_१९८२ Mon, 09/19/2016 - 10:30 नवीन
"एका मुंडक्यासाठी दहा मुंडकी आणू" हा प्रधान सेवकांचा चुनावी 'जुमला' होता जसे १५ लाख प्रत्येक भारतीय नागरिकाला मिळतील तसाच हा एक, त्याला फार महत्व द्यायची गरज नाही. आणि निवडणुकीत दरम्यान दिलेल्या प्रत्येक घोषणा खर्‍या(च) असतात व त्या राजकारण्याकडून पूर्ण केल्याच जातील हि अपेक्षा ठेवली तर या देशातून गरिबी तर १९७१ सालीच हटायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब
क
कलंत्री Mon, 09/19/2016 - 10:50 नवीन
वो दुध मांगेंगे खीर देंगे, काश्मिर मांगेंगे तो चीर देंगे. अशा घोषनानी नकळतच सर्वांचे डोके भडकावले जातात. पंतप्रधान, सेन्याधिकारी आणि सबळ पक्ष असताना सर्वसामान्य लोकांनी सीमा पार करा, फडशा पाडा असे विचार करणे गैर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
स
सुबोध खरे गुरुवार, 09/29/2016 - 10:54 नवीन
आजच्या हल्ल्याबद्दल काय म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 09/29/2016 - 11:25 नवीन
डॉक्टरांचा सर्जीकल स्ट्राईक सुरु झाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 09/29/2016 - 11:38 नवीन
हल्ला झाला तर आपलं कसं अन कायं काय नुस्कान होइल अन युद्धखोरीविरोधी प्रवचन वगैरे करण्यात बिजी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
क
कलंत्री Mon, 09/19/2016 - 10:24 नवीन
भारत आणि पुरस्कृत हल्ले यात देशाचे अनेक महत्त्वाचे प्रश्न मागे पडतात. चिथावणीखोर विचाराने काहीच साध्य होत नाही. भारत आणि पाकिस्तान यात चांगले संबंध निर्माण व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 10:28 नवीन
जवानांना श्रद्धांजली! नेहमी हेच लिहीत राहण्याची वेळ येते याबद्दल अतीव संताप आणि चीड आहे, त्यापेक्षा जास्त व्यक्तिगत तऱ्हेने मला काहीच करता येत नाही याचीही खंत आहे, राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 09/19/2016 - 10:49 नवीन
राजकीय चिखलेफेकीसाठी वेगळा धागा काढा, संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
राजकीय चिखलफेकीसाठी वेगळा धागा असावा याला सहमती आहे. पण संभाव्य टिकेच्या भितीने मोदी समर्थक व्यथित झाले असतील तर त्याला फाट्यावर मारायला हवे.कुठेतरी लॅप्स असल्याशिवाय अशी घटना घडायची नाही आणि चूक असेल तर टिकाही जरूर व्हावी.हा हल्ला आपल्या सैनिकांवर म्हणजे आपल्या देशावर झालेला आहे.तेव्हा या हल्ल्याविषयी खुलासा मागायचा अधिकार प्रत्येक भारतीयाचा आहे--मग तो/ती मोदी समर्थक असो की नसो.अर्थात यालाही अपवाद आहेतच.ज्यांनी ज्यांनी "भारत देशाचे तुकडे तुकडे व्हावेत--इन्शाल्ला" असल्या अश्लाघ्य प्रकाराचे समर्थन केले होते किंवा त्याला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गोंडस रूप दिले होते त्यांना भारताचे सैनिक मारले गेले याचा आनंदच होईल. तेव्हा असल्या लोकांनी कुठलेही खुलासे मागितले तर ते ढोंग असेल. असे लोक सोडून इतर सर्वांना सरकारकडे खुलासा (नव्हे जाब) मागायचा अधिकार आहे याविषयी शंका नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 09/19/2016 - 11:11 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बोका-ए-आझम Mon, 09/19/2016 - 11:28 नवीन
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत
कुठे दिसले तुम्हाला हे व्यथित समर्थक? मिपावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Mon, 09/19/2016 - 11:34 नवीन
संभाव्य टीकेच्या भीतीने भाजप मोदी समर्थक व्यथित झालेले दिसत आहेत, त्यांच्यावर आगपाखड करण्यासाठी हा धागा वापरणे अनुचित आहे,
इतरांचं माहित नाही, निदान मी तरी टीकेच्या भितीने व्यथित झालेलो नसून माझ्या देशातील २० सैनिकांच्या मॄत्युने व माझ्या देशाच्या हतबलतेने व्यथित झालो आहे. कोणालाही चाहूल लागून न देता सीमा पार करून मोजकेच हल्लेखोर येतात व आपल्या संख्येच्या पाचपट सैनिकांना मारतात व माझा देश अशा सतत होणार्‍या हल्ल्यांविरूद्ध काहीही करू शकत नाही या निराशेतून व संतापातून मी व्यथित झालो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
व
विशुमित Mon, 09/19/2016 - 11:37 नवीन
+111111 सहमत...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा