Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

न
नाखु
Mon, 11/14/2016 - 05:30
🗣 218 प्रतिसाद
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
वर्गीकरण
अभ्यास
अभिव्यक्ती स्वातंत्र्
अर्थ व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
46778 वाचन

💬 प्रतिसाद (218)
ए
एकनाथ जाधव Mon, 11/14/2016 - 10:04 नवीन
आताच ICICI ATM मधुन १ तास उभा रहुन २००० काढले.
  • Log in or register to post comments
प
पैसा Mon, 11/14/2016 - 11:12 नवीन
दुसर्‍या धाग्यावर लिहिले आहे तरी लिहिते. मला खरं तर ८ तारखेला एटीएम वर पैसे काढायचे होते. पण नेहमीच्या एटीएम वर लाईन पाहिली आणि उशीर झालाय उद्या बघू म्हणून घरी आले. रात्री घोषणा झाली तसा अंदाज घेतला. ५०० च्या ६ नोटा होत्या. शंभर एकही नाही. दहाच्या थोड्या चिल्लर. ९ ला सगळेच बंद होत. मात्र दूधवाल्याने ५०० ची एक नोट घेतली आणि आपण बिनधास्त बॅंकेत भरणार सांगून ४०० नीट परत दिले त्यामुळे इमर्जन्सी आली नाही. नेमकी त्याच दिवशी गॅस सिलेंडर आला. मग सासर्‍यांकडून ५०० उसने घेतले. त्यामुळे दुसर्‍या दिवशी पैसे मिळवणे भाग होते. एटीएम सगळी बंद. मग मी आणि नवरा बँकेत गेलो. तिथे तोबा गर्दी होती. एक दिवसाची सुटी बघून दोन ऑफिसर्स आणि एक क्लार्क सुटीवर पळाले होते. शिपाई पंढरपूरच्या वारीला. एकटा मॅनेजर आणि एक शिपायाचा प्रमोशन घेऊन क्लार्क झालेला कॅशियर असे दोघेच खिंड लढवत होते. त्या दिवशी मॅनेजरने एकूण तीन वेळा कॅश आणली असे समजले. तीही स्टेट बँक चावटपणा करून दहा आणि वीसची बंडले देत होती. तसली चिल्लर कॅश. त्यातलेच चार हजार रुपये आणले. आता खर्चाला तर पैसे आहेत म्हटल्यावर हुश्श झाले. आम्ही दोघेही माजी स्टाफ असल्याने बँकेत लाईनमधे उभे रहावे लागले नाही. पण नोटा वगैरे मोजायला मदत हवी असेल तर सांगा म्हणून मॅनेजरला सांगितले. त्यावर आपण दोघे मॅनेज करू असे तो म्हणाला. मग संध्याकाळी केश टॅली करायला प्रॉब्लेम झाला तरी फोन कर, मदतीला येऊ असे म्हणून आम्ही बाहेर पडलो. तोपर्यंत दोन हजारच्या नोटा येणार, सुट्यांचा अजून प्रॉब्लेम होईल इत्यादि माहिती कळली होतीच. दुसर्‍या दिवशी १० लाही बहुतेक एटीएम बंद. नवर्‍याला सासू सासर्‍याना घेऊन आता लगेच रत्नागिरी आणि नंतर मुंबई अशा दोन ट्रिप्स करायच्या आहेत. तिकिटे ऑनलाईन काढली असली तरी खर्चाला पैसे हवेत आणि ते दहाचे निरुपयोगी. म्हणून ११ पासून चालू एटीएम च्या शोधात. फक्त आईच्या आईची बँक, ह्द्फ्च, अक्षिस, आणि स्टेट ब्यांक यांची एटीएम शंभरच्या नोटा घालून चालू होते. त्यांच्यासमोर अर्थातच रांगा. ११ तारखेला ह्द्फ्च च्या एटीएम वर नेटवर्क प्रॉब्लेम झाला म्हणून अचानक बरेच लोक रांग सोडून निघून गेले. नशीबाने आम्ही थांबलो आणि एटीएम सुरू झाले. त्यामुळे १५ मिनिटात शंभराच्या थोड्या नोटा हातात आल्या. १२ तारखेला मी एटीएम पर्यंत पोचताक्षणी त्यातले पैसे संपले. काल पुन्हा एस्बीआय च्या एटीएम वर नेटवर्क प्रॉब्लेम आणि लोक निघून जाणे हे होऊन दहा मिनिटात अजून थोड्या नोटा शंभराच्या नोटा मिळाल्या. आता ५०० च्या नोटा आल्याचे कळले की बँकेत जाईन. फक्त मासे सोडून इतर सर्व गोष्टी को ऑप स्टोअरमधे कार्डावर घेता येत आहेत. त्यामुळे प्रॉब्लेम असा जाणवला नाही. अमेझॉन आणि स्नॅपडीलने क्रेडिट कार्ड खरेदीवर बरेच मोठे डिस्काउंट दिले आहेत त्याचा फायदा घेऊन बरीच किराणा सामानाची खरेदी उरकून घेतली. आता दोन महिने चिंता नाही. फक्त रोजचे दूध भाजी मासे घ्यावे लागतील आणि डाळ तांदूळ आटा हे पुढच्या महिन्यात. हुश्श्य!
  • Log in or register to post comments
फ
फास्टरफेणे Mon, 11/14/2016 - 11:44 नवीन
"आम्ही दोघेही माजी स्टाफ असल्याने" - हे बरंय... तुमचं नावही योग्य आहे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 11/14/2016 - 12:28 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फास्टरफेणे
द
दाते प्रसाद Mon, 11/14/2016 - 11:25 नवीन
एच डी एफ सी बँकेत खात्यावर पैसे भरायला गेलो होतो , १००-१५० लोकं होती ( १०. ३०, सकाळी ), ही शाखा छोटा असल्याने कर्मचारी वर्ग कमी होता . लोकांचा क्यु बनवायला त्यांना मदत केली . रांगेत उभ्या असलेल्या लोकांचे आयडी प्रूफ व्हेरिफाय रांगेतच करायची आयडिया दिली , ३०-३५ मिनिटे रांगेत थांबायला लागलं , ४० एक मिनिटं मदतीत गेली असतील . पण मजा आली
  • Log in or register to post comments
म
मधुका Mon, 11/14/2016 - 12:49 नवीन
समजा, माझ्याकडे ५००० रु आहेत - ५०० व १००० मध्ये. आणि हजार एक रुपये इतर नोटांमध्ये आहेत. आणि जर यात दैनंदिन खानपान भागत असेल तर एटीएम चालू होताच पैसे काढले की काम झाले. दिसणारी घाई उगीचच आहे. जेन्युइन लोक्स सोडले तर बाकी काय आहे? तर ... हा "बस सुटेल, पळा पळा" सिन्ड्रोम (लक्षण) आहे. म्हणजे काय रे भाऊ? आपण जर धावलो नाही, चेंगराचेंगरी केली नाही तर बस सुटेल अशी मानसिकता आणि त्यासाठी पळत सुटणे, मग गर्दी होते, धक्काबुक्की होते. एस टी ष्ट्याण्ड किंवा इतरत्र दिसणारे हे चित्र. आणि हे सगळे कधी? जरी आपले रिझर्वेशन असले तरी जरी ही बस सुटली की दुसरी लगेच ५ मिनिटांत आहे हे ठाऊक असले तरी बसमध्ये ५० एक जागा असतात आणि खाली ३०-४० माणसांचाच घोळका आहे हे दिसत असले तरी
  • Log in or register to post comments
P
palambar Mon, 11/14/2016 - 13:04 नवीन
मि नेहमि सुटे पैसे घेते बँकेतुन , दिवाळि साठि म्हणुन १०,२०,५० च्या जास्त नोटा घेतल्या होत्या , नाणि घेतलि होती त्यामुळे काहिच प्राअ‍ॅब्लेम आला नाहि,
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 11/14/2016 - 13:05 नवीन
मध्यंतरी काही दिवस सुट्टीवर असल्याने १० तारखेला लगेचच ऍक्सिस बँकेत (चिंचवड शाखा) कॅश डिपॉझिट करण्याकरिता गेलो. गर्दी प्रचंड होती पण टोकन देत होते. माझा टोकन क्रमांक १७४ होता व ५५ वा क्रमांक तेथे चालू होता. दोन अडीच तास लागतील असे तेथील कर्मचारी म्हणाले. घरी जाऊन निवांत जेवण करून, मॅच बघून दोनेक तासांनी परत बँकेत आलो. अक्षरश: १० मिनिटात रोख भरणा झाला. पैसे मात्र काढले नाहीत, त्याला रांग होती खूप. तदनंतर मात्र हाती शिल्लक असलेले ३०० ₹ पुरवून पुरवून वापरतोय. कार्ड जवळपास सगळीकडे चालत असल्याने रोख पैशांची फारशी गरज अशी भासली नाही.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Mon, 11/14/2016 - 13:20 नवीन
काल दोन ब्यांकात प्रत्येकी अडीच तास म्हणजे दोन्हींचे मिळून पाच तास रांगेत उभे राहून पैसे काढले स्वनामे धनादेशाने. सार्‍या येटीयमला अक्षरश: टाळे आहे इकडे. दोन्ही ब्यांकेत दोनच्या पाच नोटा मिळाल्या. आता माझ्याकडे दहा नोटांमध्ये वीस हजार आहेत. असो. जीवाच्या भीतीने अधिक काही लिहीत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 13:29 नवीन
जीवाच्या भीतीने अधिक काही लिहीत नाही =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अजया Mon, 11/14/2016 - 15:16 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
प
प्रसाद गोडबोले Mon, 11/14/2016 - 13:46 नवीन
ते २००० च्या नोटांचा रंग जातो म्हणताहेत ते एक डाव कन्फर्म करुन सांगता का जरा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 13:59 नवीन
तोच तर मास्टर प्लॅन आहे, सगळं काळं धन 2k च्या नोटात बदलून घेतील लोक्स, मग 50 दिवसात त्याचा रंग थॉककन उडून जाईल, सर्व नोटा प्युअर सफेद कागद राहून जातील, सफेदी कि चमकार एकीच बार, ये है मोदी सरकार! ही खरी नॅनो टेक्नॉलॉजी आहे, लोक नोटा धूत बसलेत! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:32 नवीन
२००० च्या नोटेचा रंग गेला तरच ती खरी आहे असे समजावे असे आज वित्तसचिव सांगत आहेत म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 11/14/2016 - 13:28 नवीन
दुसर्‍या धाग्यावर माझा अनुभव आधीच लिहिला होता. पण इथे तोच परत थोडक्यात... पैसे बॅंकेत टाकणे, नोटा बदलून घेणे आणि चेकने नकद काढणे या सर्व गोष्टी ११ तारखेला अर्ध्या-पाऊण तासांत केल्या. निवासी व बर्‍याच आयटी कंपन्या असलेल्या भागात असल्यामुळे बँकेत नेहमीच गर्दी असते. त्या दिवशी त्यापेक्षा तीन-चार पट होती. बँकेचा एक माणुस रांगेतून १५-२० जणांना आत सोडत होता. आत बॅंकेचे लोक कारवाईत मदत करत होते, त्यामुळे एकही वाढलेला आवाज ऐकला नाही. चेकने काढलेले पैसे अर्धे १०० च्या व अर्धे २००० च्या नोटांत मिळाले. कार्डने व्यवहार चालू असल्याने ३० डिसेंबरपूर्वी बँकेत जावे लागेल असे वाटत नाही. बँकांचे इतरांचे अनुभव आणि माझा अनुभव पाहता, ज्या बँका मोठ्या आहेत आणि ज्यांचे स्टाफ व व्यवस्थापन चांगले आहे, तेथे चांगले अनुभव आणि इतर ठिकाणी काही समस्या असेच दिसते आहे. म्हणजे समस्या मुख्यतः बँकेतील स्थानिक परिस्थितींवर अवलंबून आहेत.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Mon, 11/14/2016 - 15:21 नवीन
रेल्वे वाले चेक किंवा कार्ड घेतील काय?
  • Log in or register to post comments
त
तनिश Mon, 11/14/2016 - 15:54 नवीन
मी शनिवारी ICICI बॅंकतून 2500 च्या नोटा बदलून घेतल्या,सकाळी 11:00 वाजता रांगेत उभा राहिलो दुपारी 03:30 ला नंबर आला..
  • Log in or register to post comments
ह
हर्षद खुस्पे Tue, 11/15/2016 - 05:44 नवीन
ग्रामीण भागात सहकारी बँकेचे प्रस्थ आहे. त्यांच्या कडे पैसे नाहीत. पतसंस्था बंद आहेत. शहरात व्यवस्था आहे. पण लोकांनी सहकारी संस्था मध्ये पैसे गुंतवले आहे. राष्ट्रीय बँक तालुक्यातील ठिकाणी. शेत मालाला उठाव नसल्याने तो कुजून गेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहेत. लोकांचे हाल कुत्रे पण खात नाही.
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते Tue, 11/15/2016 - 08:29 नवीन
थांबवा तर लागलच नाही परत पैसे भरण्यासाठी स्वतःहून फोन करा वेळ निवडा .. एकंदरीत उत्तम अनुभव बाकीच्या २-४ बँकांमध्ये माझे व्यवहार आहेत त्यापेक्षा
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 08:34 नवीन
हीच माझी बँक आणि हाच अनुभव, :)) बोला, मोहितेसाहेब, आपण स्वप्नरंजन करतो ना, =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
न
नाखु Tue, 11/15/2016 - 08:36 नवीन
आम्च्या एस बी आय ला सांगा ना जरा तुमचं ऐकायला!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 08:53 नवीन
यष्टी आणि व्होल्वोत फरक असणारच ना नाखुकाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ट
टवाळ कार्टा Tue, 11/15/2016 - 11:25 नवीन
कोटक महिंद्रा हाय प्रोफाईल बँक??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Tue, 11/15/2016 - 11:34 नवीन
त्यांच्या नाशकात असेल. :)) बाकी इथे पान नंबर ११३ वर त्यांची वोल्वो ९ नंबरला आहे. यश्टी ३ नंबरला आणि HDFC नामक बँक १ नंबरला आहे. (याहून काही वेगळे पॅरामीटर असतील तर वाचायला नक्की आवडेल.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 11:56 नवीन
येगझकटली!!! नाशकात ग्राहक कमी आहेत बँकेचे पण सर्व्हिस एकदम हायफाय आहे! असो, आम्हाला स्वप्नवत सर्विस मिळते ती यष्टीत मिळत नाही, जे आहे ते आहे, अनुभव हवा तर घ्या स्वतः! यातही माझी खिल्ली उडवण्याची काय हतबलता आहे ते काही कळत नाही बॉ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Tue, 11/15/2016 - 13:00 नवीन
तुम्ही जो अनुभव मांडला तो तुम्ही स्वत: अनुभवल्याने त्याच्या सत्यतेविषयी शंका नाही मात्र त्या अनुभवासोबत पुरवलेली अधिक माहिती चुकीची आहे इतकेच. (उदा. हाय प्रोफाईल बँक वगैरे.) मिपाधर्माप्रमाणे टवाळीचा सूर लागल्यास ते खिलाडूवृत्तीने घ्यावे. हतबलता वगैरे गोष्टींना येथे बहुतेक लोक्स फाट्यावर मारतात. (माझ्यासकट..!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 13:22 नवीन
जी उत्तम ट्रीटमेंट इथं मिळते इतर बँकांत मिळाली नाही, म्हणून तसे म्हटले, त्यात चुकीचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Tue, 11/15/2016 - 13:39 नवीन
मग सर्व्हिस हायफाय आहे असे म्हणा...बँक हायफाय नाहीये रच्याकने याला जर मेगाबायटी उपप्रतिसाद आला तर त्यास फाट्यावर मारणेत येइल =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 14:16 नवीन
बँक आणि सर्व्हिस वेगळं असतं काय? प्लिज एक्स्प्लेन! (आठ शब्द आहेत, किती बाईट्स झाले?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वरुण मोहिते Tue, 11/15/2016 - 15:28 नवीन
ज्यांना जिथे सर्विस चांगली मिळते ती चांगली बँक . उद्या एसबीआय चांगली म्हणून मी बोलो कि ती चांगली पण तिथे सर्विस चे काही वेळा काय वांदे असतात माहित आहे . माझपण आहे एसबीआय ला अकाउंट माझ्यामते भारतात पूर्वीपासून व्यवहार करणाऱ्या बहुतेकांकडे असाव. बाकी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी ह्यांचे व्यवहार लोकांनी पहिले आहेत त्यात आयसीआयसीआय बरी. माझी स्वतःची बहीण मॅनेजर असून मी एचडीएफसी च्या वाटेला जात नाही . तसं पहिला तर सहकारी बँकांमध्ये भारत बँक खूप चांगली आहे मंगलोर कर्नाटक ची आज खूप मोठी बँक आहे. माझ्या शेट्टी मित्रांची हॉटेल आहेत त्यामुळे मलापण आमच्या इथल्या ब्रान्चला चांगली सर्विस असते पण परत तेच ज्याला जे पटेल ती बँक चांगली. जस्ट प्रोफाइल आणि यावरून पाहण्यापेक्षा अनेक बँक चांगल्या सर्विस देत आहेत . माझ्यामते ऍक्सिस पण तिथे माझा अनुभव नाही ऐकून आहे .असो बाकी हाय प्रोफाइल म्हणजे डॉइशे आणि एचएसबीसी वैग्रे वैग्रे .त्यामुळे कोटक ऍक्सिस ने या वेळी चांगली सर्विस दिली आहे याबद्दल दुमत नसावे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ट
टवाळ कार्टा Tue, 11/15/2016 - 21:09 नवीन
बँकेची सर्व्हिस आणि ब्रांचची सर्व्हिस असा फरक नसतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 21:34 नवीन
मला उलटप्रश्न विचारू नका, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, तसेच, डोईश बँकेच्या नाशिक ब्रांचला अगदी घाणेरडी ट्रीटमेंट मिळाली तरी बँकेला हाय प्रोफाइल म्हणायचं का? रच्याकने, प्रत्येक शाखेचे अनुभव सारखेच आहेत माझे. 5 वर्ष अकौंट आहे, अनेक ब्रँच मध्ये गेलोय. जाहिरात नाही, अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 21:58 नवीन
बहुतेक मोठ्या बँकांची एक हाय प्रोफाइल बँकिंग डिव्हिजन असते ज्याला प्रायव्हेट बँकिंग म्हणतात. यात खातं उघडण्यासाठी कमीत कमी फक्त ५ मिलियन डॉलर्स लागतात. इथे असे खाते आहे का कोणाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 22:16 नवीन
धन्यवाद ह्या माहितीबद्दल! खरंच ठाऊक नव्हतं! माझ्यासारख्याला हायप्रोफाईल म्हणजे रस्त्यावर उभे राहून वडापाव खाणाऱ्याला मॅकडी मध्ये बर्गर खाणे हायप्रोफाईलच वाटेल, पाच मिल्यां डॉलर म्हणजे रुपयात किती याचा हिशोब करतो आधी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 22:28 नवीन
फार नाही फक्त ३३ कोटी रुपये लागतात. पण त्याबदल्यात सेवा पण काय भारी मिळतात. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
च
चौकटराजा Tue, 11/15/2016 - 08:48 नवीन
कॉसमॉस बँकेविषयी माझा १५ वर्षाचा अनुभव उत्तम . आज १ तास रांगेत उभा राहिलो. मध्यम वर्गीय माणूस डाम्बिस नाही याची पुनः खात्री पटली. लोक शिस्तीत होते. बॅक कर्मचारी तर पवित्र कर्म करण्याची संधी आली आहे असे वागत होते. मला वाटते या ऐतिहासिक बदलाचा मी साक्षीदार झालो याचा मला अभिमान वा॑टायला हवा. ५०० च्या नोटा आल्या की सगळी कोंडी फुटेल व उद्धव, मुलायम , मायावती, ममता यांच्या हाती उरेल फत्र्या. असाच अनुभव याच दिवशी एच डी एफ सी त आला. पत्नी सिनियर सिटीझन असल्याने प्रवेश लगेच मिळाला. ५ मिनिटात पैसे मिळाले ,पुन्हा लागले पुढच्या आठवड्यात ही मिळतील असा संदेश अधिकार्‍याने दिला. मी त्याला म्हणालो : आज बॅन्कानी देवालाही मगे टाकले अस्तिक व नास्तिक दोघेही लायनीत उभे आहेत. मोदीनी असाच थेट जनतेशी संपर्क ठेवून उमेदवार ,उपकृत कार्यकर्ते यांच्या मिलीभगत ला विराम देऊन एक नवी लोकशाही उभी करावी. पोलिट्कल कम्युनिटी ला आपण सर्वानी मग तिलांजली देउ. !
  • Log in or register to post comments
औ
औरंगजेब Tue, 11/15/2016 - 08:49 नवीन
पैसे भरायचा फार छान अनुभव कल्याण जनता मध्ये आला.कोणीच नव्हते लाईनीत ठाणे-पाचपाखाडी शाखेत. फक्त भरणा चालु आहे. पैसे मिळत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 11:00 नवीन
पाच दिवस बँकांमध्ये जाण्याची हिम्मत केलीच नाही, केवळ दोन एटीएम ना भेट दिली तर त्यांचे शटर डाऊन होते. ९ तारखे पासून मेडिकलचे एक बील डॉक्टरांची दोन बिले असा होता होईतो चेकवर निभावण्याचा प्रयत्न केला, एका मेडीकल लॅबला अगदी १४० चा सुद्धा चेक दिला, १० तारखेस अडचण आली ती दूर कोरेगाव पार्क (पुण्यात) जाऊन विकिपीडिया संदर्भाने एक भेट उरकण्यासाठी रिक्षा शिवाय तरणोपाय नव्हता, सुट्यांचा ओळखीतून कुठूनच बंदोबस्त होतनाही म्हटल्यावर मुलींनी हळूच त्यांचा गल्ला मोकळा करून तात्पुरती सोय केली. वापस येतानाच्या रिक्षावाल्याने आमच्या मागच्या सिटवरच्या गप्पा ऐकुन नोटा रद्द केल्याने महागाई आणि भ्रष्टाचार कमी होईल का असे विचारले - त्याने मिटरच्यावर आगाऊ ३० रुपये मागितले होते त्यामुळे त्याच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्याचा खरपूस समाचार घेतला :) आमचा रिक्षा प्रवास संपेपर्यंत ओशाळून नंतर तो वरचे पैसे नको म्हणाला पण त्याला थोडी फळे विकत घेऊन देऊन उपकृत केले. महिन्याचे सामान दिवाळीमुळे आधीच आले होते, काम करणार्‍यांनाही दिवाळी बोनस दिला असल्यामुळे महिन्याच्या पगारासाठी आजपर्यंत त्यांनी तग धरला, त्यापैकी एक प्रवासास जाणार होत्या त्यांनी ५०० च्या नोटा स्विकारल्या उरलेल्या दोनांसाठी आज महाराष्ट्र बँके शाखेत जाऊन उभा राहीलो तर तेथे बाहेर आधी नावे लिहुन घेऊन नावांचा पुकारा चालू होता आत गेल्यावर पुन्हा लाईन होती, दहा काढावयाचे होते पण पाचा पेक्षा जास्त देत नाही म्हणाले त्यातही प्रत्येकी १०० च्या केवळ दहाच नोटा दिल्या जात होत्या उर्वरीत व्यवहार केवळ २००० च्या दोन नोटांनी ! डिमोनीटायझेशनच्या फायदे आणि मर्यादांची थेअरॉटीकल कल्पना होतीच पण २००० च्या नोटा न टाळता येणे हे एक, दुसरे घरकाम करणार्‍या स्त्रीया साक्षर नसल्यामुळे कोणतीही नकद-पर्यायी व्यवस्था भारतात अमलात येणे किती कठीण असू शकते शिवाय तिसरे ज्यांच्या साठी बँकेत जाऊन पैसे काढले त्या दोन्ही स्त्रीया पैसे नंतर भिशीतच लावणार हे पण नक्की म्हणजे अप्रत्यक्षपणे अधिकृत मार्गातला पैसा अनधिकृत-भिशी मार्गी लागणे अटळ. असो.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 11/15/2016 - 11:43 नवीन
विजया बँकेत अगदी १० - १५ मिनीटात पैसे खात्यावर भरण्याचे काम झाले. काहीही त्रास झाला नाही. मी बँकेत पोहोचलो तेंव्हा नेमका लंच टाईम होता. नंतर लगेचच नंबर लागला आणि पैसे भरून घेतले. पैसे खात्यावर दिसल्याचा मेसेज आला, त्यात पॅन नंबर पण दिसत होता. तसेच, मी जाताना मुद्दाम पॅन कार्डची झेरॉक्स नेली होती. ५० हजार पेक्षा कमी रक्कम आहे तर पॅन कार्ड कशाला हवे, केवायसी आहे की वगैरे हुज्जत घालण्यात बँक कर्मचार्‍यांचा वेळ घेणे पटले नाही.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 11/15/2016 - 11:50 नवीन
एसबीआय ला च काय वशाडी आलीय रांग ५ व्या दिवशी पण कायम आहे ,चिंचवड गावात शाखा उघ्डून अजून उणी पुरी ४ वर्षेच झालीले हैत.तरी इतकी गर्दी का तेच कळेना..काही गणंग पुन्हा पुन्हा येतायत का,पैसे बदलून घ्यायला ते शोधायला पाहिजे बँकेनी आणि शाईचं बूच मारायलाच हवे. गेली २५ वर्षे एस्बीयाशी एकनिष्ठ असलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
च
चौकटराजा Tue, 11/15/2016 - 12:20 नवीन
काही लोक पुन्हा पुन्हा आपले नाही तर दुसर्‍याचे - बोलवित्या धन्याचे पैसे भरायला येत आहेत.पण अशापेक्षा असली ग्राहकांची सम्ख्या जास्त आहे. दरम्यान वाटस अ‍ॅप वर २०१९ पासून आयकर पूर्णपणे बंद तो पर्यंत ५ लाख करमुक्त असा मेसेज फिरू लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ध
धर्मराजमुटके Tue, 11/15/2016 - 12:31 नवीन
सकाळी ११ वा. आमच्या बँकेत गेलो. तिथे नोटा बदलण्यासाठी एक रांग आणि बँक अकाऊंट होल्डर साठी दुसरी अशा दोन रांगा होता. उन्हातान्हात लोक तापत होती. मॅनेजरला विचारले तर तो म्हणाला की शामियाना लावायला सांगितला आहे पण एक दोन दिवस लागतील. मग त्यालाच विचारुन काही मदत हवी आहे काय ते विचारले. सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली. ४ तासात साधारण १५० (बँकेच्या) ग्राहकांनी पैसे बदलले. ४ तासांतील काही निरीक्षणे : १. मी ठाणे घोडबंदर रोड येथे राहतो. बँक देखील ह्याच भागात. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बंगाली भाषेतील मतदान ओळखपत्रे पाहिली. एवढ्या प्रमाणात बंगाली बांधव माझ्या आजुबाजुला राहतात याची मला कल्पनाच नव्हती. एकाकडेही पॅन कार्ड किंवा आधार कार्ड नव्हते. ओन्ली निवडणूक आयोगाचे ओळखपत्र ! २. एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला. ३. एक रिक्षावाले यादव काका म्हणाले की सिनिअर सिटीझनला आणि बायकांना वेगळी लाईन का नाहीये ? मी सांगीतले की साहेब, या शाखेत मुळातच एक काऊंटर आहे. त्याला वाढवून सध्या दोन काऊंटर बनविली आहेत. सगळ्यांसाठी वेगळे वेगळे काऊंटर आता बनविणे शक्य नाही. त्यावर तो मला म्हणाला की मी सिनियर सिटीझन आहे मला पुढे सोडा. पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले. आणि पॅनकार्ड बघीतले तर त्याचे वय ५२ होते. त्यामुळे त्याला पुढे सोडले नाही. अजुन काही वर्षांनंतर तुम्ही २००० ची नोट बदलायला याल तेव्हा तुम्ही सिनियर सिटीझन व्हाल तेव्हा नक्की सोडेन असे सांगीतले.. ४. एक युपीवाले काका टोकन देऊनही सावलीत बसायला तयार होईनात. त्यांचा टोकन नंबर ५१. पण अगदी सुरुवातीपासूनच रांगेत उभे राहिले. त्यांना वेळोवेळी समजावले पण त्यांनी ऐकलेच नाही. शेवटी प्रत्येकाने त्यांना आपापले टोकन क्रमांक दाखवत मागे ढकलत ढकलत योग्य क्रमांकावर आणून पैसे घ्यायला लावले. ५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार. दोन तीन सिनियर आणि एक आजारी महिला यांना रांगेत उभे न राहता पुढे जाता आले. मधेच भाजपावाले येऊन दोन तीन बॉक्स पाण्याच्या बाटल्या वाटून गेले. आता निवडणूकीत पैशाची खोकी नाहित तर पाण्याची खोकी घ्या असे काहीजणांना सांगताच लोकांच्या तोंडावर हसू पसरले. आमच्या बाजुचा हुसेन गादीवाला पैसे काढायला आला तेव्हा त्याला सांगीतले की बाबारे आता तु थोडे दिवस बँकेत पैसे काढायला येऊ नकोस. त्याऐवजी लोकांच्या गाद्या भंगारात विकायला निघतात काय यावर लक्ष ठेव. न जाणे तुला मोठे घबाड सापडेल. एकंदरीत आज २००-३०० लोकांचा जवळून अनुभव घेतला पण कोणीही चुकुन राजकीय चर्चा किंवा ह्या निर्णयावर नाराजगी व्यक्त करणारे स्टेटमेंट केले नाही. शांततेत नोटा बदलून घरी गेले. एकंदरीत आज लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यात मज्जा आली. मी पाहिलेला आकडा कदाचित फारच कमी आहे आणी शहरी विभागातील आहे. ह्या सँपल सेटवरुन "जनता अजिबातच नाराज नाहीच किंवा जनता फारच नाराज आहे" अशा कोठलयाही प्रकारचे निरि़क्षण मी येथे नोंदवत नाहीये याचा राजकीय दृष्टीकोनातून धागे / प्रतिसाद वाचणार्‍यांनी कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/15/2016 - 12:35 नवीन
एक गुंठामंत्री : अरे आमच्या जागेवर ही बॅंक उभी आहे तरी तुम्ही आम्हाला लायनीत उभे करता ? असे वारंवार सांगत होता. त्याला नम्र भाषेत सांगीतले की बाबारे, आपल्या कोणाच्याही कपाळावर आपण कोण आहो ते लिहिलेले नाही. त्यामुळे तुम्ही जागामालक आहात हे मला आणि सरकार दोघांनाही माहित नाही. त्यामुळे प्लीज रांगेत उभे राहा. यावर तो धुसपुसत का होईना पण रांगेत उभा राहिला.
हे शाब्बास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विशुमित Tue, 11/15/2016 - 13:06 नवीन
<<<<<पुरावा विचारल्यावर त्याने मला त्याचे पांढरे केस दाखविले. उत्तरादाखल मी पण त्याला माझे रंगविलेले आणि त्याखाली लपलेले पांढरे केस दाखविले.>>>>> --- वाचून मज्जा आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
ध
धनावडे Tue, 11/15/2016 - 14:07 नवीन
बहुसंख्य लोकांना काही problem नाहीये मग ठाकरे आणि चॅनल वाले एवढे का बोंबलत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चौकटराजा Tue, 11/15/2016 - 15:06 नवीन
पहिल्या पासून शिवसेनेच्या नेत्रुत्वावर "डॉन असल्याचा आरोप फार जुन्या काळापासून आहेच. खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनावडे
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:36 नवीन
खाजगी माध्यमे नेहमी नकारात्म बाजू दाखवितात कारण तिला न्यूजचे मुल्य असते. आपण सुद्धा एखाद्या माणसाने रेलेवेखाली जीव दिला तर पुलावर आपली दुचाकी थांबवून डोकावून पहातो. पण कोणी उन्हाऴ्यात थंड पाणी वाटत असेल तर आपली दुचाकी तिथून चटकन पुढे सरकते. +१११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 16:14 नवीन
>>५. एक शेटीया : हा आपल्या दुकानातील पुर्ण कामगारांची फौज घेऊन आला आणि प्रत्येकाला रांगेत उभे करुन पैसे बदलून घेतले. साधारण ८-१० कामगार.<< विचार करा एखादा लेबर कॉन्ट्रॅक्टर दहा जणांना घेऊन रोज एका बँकेत जाऊन चार हजारच्या रेटने ४० हजार बदलून घेईल ४५ दिवसात १८,००,००० बदलता येऊ शकतील; पैसे बदलून घेणार्‍यांना निवडणूकवाली शाई लावण्याची गरज प्रथमदर्शनी पटली नव्हती पण आता समजली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 17:30 नवीन
ते तर शाई लावली तरी होईलच, रोज 4500 बदलायची परवानगी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Tue, 11/15/2016 - 17:50 नवीन
>>रोज 4500 बदलायची परवानगी आहे.<< बहुधा तसे नसावे. ४५०० एकदाच बदलण्याची परवानगी आहे. वेगवेगळ्या ब्रँच/बँकमधून एकाच व्यक्तीने पुन्हा पुन्हा बदलल्यास तसे होऊन नये म्हणून ट्रॅक करण्याची व्यवस्था उपलब्ध नाही म्हणून समस्या आहे. शाई लावलेली असल्यास बँक / पोस्ट कर्मचार्‍याच्या सहकार्या शिवाय उपद्व्याप करणे कठीण होऊ शकते हे खरे. अर्थात सामान्य जनतेची प्रतिक्रीया काय असेल हे सांगणे तुर्तास कठीण वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा