Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

न
नाखु
Mon, 11/14/2016 - 05:30
🗣 218 प्रतिसाद
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
वर्गीकरण
अभ्यास
अभिव्यक्ती स्वातंत्र्
अर्थ व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
46778 वाचन

💬 प्रतिसाद (218)
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 18:40 नवीन
मला ही शंका निर्णय जाहीर झाला तेव्हाच आली कि एक माणूस वेगवेगळ्या बँकामध्ये जाऊन दोन दोन हजार काढून आणू शकतो. पण मला वाटल कदाचित त्याच्या PAN कार्ड वर ट्रेस करणार असतील. हे शाई लावण आधीच सुचायला हव होत. आज न्यायालयाने ही पैसे काढण्यावर लावलेली लिमिट का आहे असा सरकारला प्रश्न विचारला आहे. न्यायालय कॉमन सेन्स वापरत नाहीत काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 19:24 नवीन
न्यायालयात जे काही बोललं जातं त्याची नोंद होते. त्यामुळे जरी उत्तर माहित असेल तरी प्रश्न विचारला जातो, त्यामुळे प्रश्न आणि उत्तर दोन्हीची नोंद होते. त्यामुळेअगदी बाळबोध वाटणारे किंवा "काय हे एवढं पण माहित नाही" असं वाटू शकणारे प्रश्न पण विचारले जातात. नंतर कोणी असं पण म्हणू शकतं ना की तुम्ही विचारलं नाही म्हणून मी सांगितलं नाही, त्यामुळे ही अवांतर काळजी घेतली जात असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
स
सही रे सई Tue, 11/15/2016 - 19:47 नवीन
नोंद होण्यासाठी असा प्रश्न विचारला असेलही पण नकारघंटा वाजवणारे लोक याचे वेगळेच अर्थ काढून असाही अर्थ काढू शकतील कि बघा हे न्यायालयाला पण हे पसंत नाही किंवा न्यायालयाने पण या वर आक्षेप घेतला. त्यामुळे न्यायालयाने पण आपल्या वाक्यांचा काय अनर्थ काढला जाईल हे विचार करून काही वेळा बोलावे किंवा प्रश्न विचारावे असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क
ट
ट्रेड मार्क Tue, 11/15/2016 - 20:33 नवीन
सध्या अश्या नकारात्मक लोकांचं पेव फुटलंय. त्यातले बरेच पत्रकार आणि संपादक म्हणून मिरवत आहेत. पण त्यामुळे न्यायालय आपली प्रथा बदलेल असं वाटत नाही. जर कोणी असा न्यायाधीशाला काही कळतं की नाही किंवा अजून काही उलटसुलट अर्थ काढला तर "अदालत की तौहीन" अंतर्गत शिक्षा सुनावतील. अर्थात त्यावरूनही रान उठेलच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सही रे सई
ख
खटपट्या Tue, 11/15/2016 - 17:25 नवीन
टाळ्या !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
स्रुजा Tue, 11/15/2016 - 23:14 नवीन
सुरुवातीला तो नाही म्हणाला पण मी सांगितले की माझ्याकडे वेळ आहे. हवे तर मी रांगेला मॅनेज करुन देण्याचे काम करु शकतो, तुमची परवानगी असेल तर. मग तो तयार झाला. त्याच्याकडून बेसीक माहिती घेतली. साधारण ११ ते ३ अशी चार तास रांगेतल्या लोकांना फॉर्म वाटणे, त्यावर टोकन नंबर टाकणे, फॉर्म भरायला मदत करणे, मधे घुसणार्‍यांना परत मागे पिटाळणे इत्यादी कामे केली.
हे फार आवडलं. सरकारला आणि बँकांना जसजशा प्रॅक्टिकल अडचणी कळत जातील तसतसे ते मार्ग काढत जातील. तो पर्यंत तुमच्यासारखे लोकं हे सोपं करण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न करतायेत हे कौतुकास्पद आहे. इथले बरेच प्रतिसाद सकारात्मक आहेत, चांगले अनुभव आल्याचंच सांगतायेत. पण इतर थोडा नाराजीचा सूर लावणारे पण आहेतच. त्यातले राजकारणी सोडले तरी एकुणच मला वाटतं की खास करुन बँक कर्मचार्‍यांना, हे सगळं गणित सोडवायला थोडा तरी वेळ द्यायला हवा. त्यांच्यावर पण आपल्याबरोबरच ही बातमी आदळली आणि २ च दिवसांच्या अवधीत त्यांना कार्यवाही पण सुरु करावी लागली आहे. कदाचित त्यांच्याकडे ऐन वेळी स्टाफ नसणे, नोटा कमी पडणे, छोटी ब्रान्च असल्याने मुळातच एवढ्या गर्दीला हाताळण्यासाठी आवश्यक साधनं नसणे हे अगदी स्वाभाविक आहे. आणि कुणी सध्या तक्रार ही करत नाहीये. आज बातमी आलीये की सगळे टोल्स, आणि आंतरराष्ट्र्य विमानतळाची पार्किंग्ज २४ नोव्हेंबरपर्यंत फ्री असणार आहेत, तेवढीच कॅश कमी लागेल. माझ्या तुटपुंज्या का होईना पण एकुण अनुभवावरुन तरी असं माझ्या लक्षात आलंय की व्हॉल्युमला सांभाळायचं जे उपजत कौशल्य आपल्या व्यवस्थेकडे आहे, ते इतर अनेक ठिकाणांपेक्षा खुपच बरंय. आता पुढच्या भारतवारीत घरी येईपर्यंत कदाचित उधारीचं जीवन जगावं लागेल ;) पण हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
व
विनटूविन Tue, 11/15/2016 - 15:58 नवीन
विश्वेश्वर बँक नव्यानेच शाखा सुरू झालीय. रविवारी दोनहजार मिळाले (शंभरीचे) अजमेरा, मासूळकर नेहरूनगर कोणतेही एटीएम उघडत नाहीत. आयसीआयसीआयचे रविवारी रात्री उघडले होते एक तास.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 11/15/2016 - 16:06 नवीन
लाक्कीया! वापरून टाका सगळे शक्य असेल तिथे, तेवढीच चिल्लर फिरेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनटूविन
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/15/2016 - 17:59 नवीन
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 11/15/2016 - 18:39 नवीन
सेल्फ चेकने जे पैसे काढलेत त्या नोटा कोणत्या डिनॉमिनेशन मध्ये? अजून आता सेल्फ चेकने इतक्यात पैसे काढले नाहीत, म्हणून विचारत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
न
नाखु Wed, 11/16/2016 - 04:09 नवीन
पण दोन हजाराच्या अनिवार्य करीत नाहीत्,अगदी दहा हजार काढणार असाल तर एक दोन नोटा दोन हजाराच्या घेतल्या तरी चालतील.मी ७००० काढताना एक २ हजाराची व उर्वरित १०० च्या ५० असे मिळाले. परिचयातील २-३ लोकांना ५०० उधार दिले आहेत. पोष्टात प्रयत्न करून पहा बदलायच्या असतील तर, आणि पैसे काढायचे असतील तर फक्त आपल्याच शाखेतून (जिथे खाते आहे तिथून्च काढता येतील) भरणा रक्कमेसाठी होम ब्रँच मध्ये खाते असेल तर कितीही भरू शकता पण इतरत्र (त्याच बँकेच्या इतर शाखेत खाते) असेल तर मर्यादा २५००० (पंचविस हजार) आहे हा एस्बीआयच नियम आहे बाकी बँकेत काय नियम आहे माहित नाही. खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Wed, 11/16/2016 - 04:11 नवीन
ठीक आहे नाखु, धन्यवाद. पहिल्यांदा ४,००० आणले तेच पुरत आहेत अजून. बघू, पुढील आठवड्याच्या शेवटी वगैरे जावे लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
प्रचेतस Wed, 11/16/2016 - 04:13 नवीन
मलाही १०० च्या दहा नोटा उधार द्याल का? --परिचयातील प्रचेतस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 11/16/2016 - 04:19 नवीन
भेटणे क्रमप्राप्त आहे. "गडकरी" भेटीच्या हेलपाट्याने त्रस्त नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Wed, 11/16/2016 - 04:23 नवीन
काय करणार. रोख पैशे नसल्याने कार्ड वटवत हिंडावे लागते इकडेतिकडे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
य
यशोधरा Wed, 11/16/2016 - 04:25 नवीन
कोणाचे काय तर कोणाचे काय! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
व
विशुमित Wed, 11/16/2016 - 05:45 नवीन
आमच्याकडे पण २-४ थेम्ब शिंपडा..ऋणी राहील.. पुसटशी ओळख आहेच आपली... या निम्मिताने आणखी गडद्द होईल..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
न
नाखु Wed, 11/16/2016 - 06:03 नवीन
आमेन अस्तु अस्तु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 11/16/2016 - 06:00 नवीन
सहमत! मला ३ दोन हजारांच्या तर १५ शंभर च्या मिळाल्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नरेश माने गुरुवार, 11/17/2016 - 06:32 नवीन
जर बँकेकडे शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा उपलब्ध असतील तर थोड्या नोटा देतात. मी परवा बावीस हजार काढले मुलाची शाळेची फी भरायची आहे आणि घरखर्चासाठी म्हणून. माझ्या आधी रांगेत उभे होते त्यांना दोन हजाराच्याच नोटा देत होते. पण माझा नंबर येण्याआधी बँकेत नवीन रोख रक्कम आली. त्यात शंभर, पन्नास, वीस आणि दहाच्या नोटा होत्या. मला पाच दोन हजाराच्या नोटा दिल्या आणि पन्नासचे दोन बंडल आणि वीसचे एक असे दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/15/2016 - 18:00 नवीन
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/15/2016 - 18:01 नवीन
हाफ़ीसतल्या बँकेत 4000 जमा केले. सेल्फ चेकने 7500 काढले. पाऊण तासात काम झाले. एटीएमवर जाण्याच्या भानगडीत पडलो नाही अजून. जवळच्या अकरा पाचशेच्या नोटा पेट्रोल पंपावर वापरत आहे, आठ गेल्या, तीन बाकी आहेत. भाजी सोडली तर सगळ्याच गोष्टी कार्डने भागत आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Tue, 11/15/2016 - 18:03 नवीन
माफ करा चुकून तीन वेळा पोस्ट झाला प्रतिसाद(काही कळलं नाही काय गडबड झाली) :(
  • Log in or register to post comments
D
DeepakMali Tue, 11/15/2016 - 23:18 नवीन
मी सुद्धा जवळच्या hdfc बँकेत गेलो. माझ्याकडे ७ हजार होते आणि तेही 100 च्या नोटा.. मला तूर्तास जास्त कॅश ची गरज नसल्याने ४ बँकेत भरले. ना जाणो कोणाला कामास येईल हा हेतू. बाकी उरलेले मित्रांना दिले आणि त्यांच्याकडून बँक ट्रान्सफर करून घेतले..
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Wed, 11/16/2016 - 00:14 नवीन
तुमच्यासारखे दोन पाऊलं जास्त पुढे जाऊन मदत करताहेत... वेल डन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DeepakMali
म
मदनबाण Wed, 11/16/2016 - 05:13 नवीन
वाचकां पर्यंत माहिती पोहचावी म्हणुन दुसर्‍या धाग्यात दिलेली लिंक इथे सुद्धा देत आहे... The question that still need to be answered is; are the new Indian currency notes printed with the involvement of blacklisted Crown Agent companies who supplied and were the source of fake notes for Pakistan at the expense of India’s National Security? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- The Secret World Of Indian Currency Printers
  • Log in or register to post comments
व
विशुमित Wed, 11/16/2016 - 05:54 नवीन
व्हाट्सअप वर तर एक बहाद्दराने रु.६०, रु.७५, रु.१०० आणि रु.१५० चे फोटो टाकले आहेत... वर्तमान पत्रे चाळली पण विदा नाही मिळाली... कोणाला अधिक माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/16/2016 - 09:41 नवीन
मी १३, २७ आणि ३८ च्या नोटा देउ शकेन...हव्यात का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
न
नीलमोहर Wed, 11/16/2016 - 10:12 नवीन
लहान मुलांच्या खेळण्यातल्या नोटा चालत नाहीत हो,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विशुमित Wed, 11/16/2016 - 12:34 नवीन
कृपया तुमच्याकडे काही माहिती असेल तर द्या बाकी मला जे नकोय ते कशाला माझ्या माथी मारता??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
विशुमित Wed, 11/16/2016 - 12:42 नवीन
असो..मला विदा मिळाली आहे ...ही स्मृत्यर्थ असलेली नाणी आहेत.. (वरच्या प्रतिसादात "नाणी" टाकण्याचे राहून गेले आहे) http://www.telangananewspaper.com/125-rs-coin-launched-modi/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
न
नीलमोहर Wed, 11/16/2016 - 10:37 नवीन
bom (तेच ते चितळे समोरील) मधून सुदैवाने जास्त लायनीत थांबावे न लागता आणलेली २००० ची नोट बघत निवांत वाट पाहत आहे, बरेच atm बंदच आहेत, Icici मध्ये जास्तीचे असिस्टंट्स नेमले होते, ते सौजन्याने वागत, मदत करत होते, ज्यांचे तिथे अकाउंट्स आहेत त्यांचे काम लगेच होत होते, गर्दी असून मॅनेज होत होतं. रोज बँकांचे मेसेज न चुकता येतायत, असं करा तसं करा, आम्ही सेवेसी तत्पर आहोत :) गेल्या आठ दिवसांत जेमतेम दोन तीनशे रुपये खर्च केले असतील, बाकी लागेल तिथे कार्ड, कामे खोळंबलीयेत पण डोक्याला शांतता तेवढीच.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 11/16/2016 - 11:27 नवीन
काल ज्या बँकेत सेवा केली तिथेच आज खात्यावरुन पाच हजार काढले. फार गर्दी नव्हती. १० मिनिटात काम झाले. एक माणूस नव्या २००० च्या नोटा भरणा करण्यासाठी आला तर कॅशीयरने नव्या नोटा आत्ता लगेच डिपॉजिट करता येणार नाही असे सांगीतले. काय कारण असावे बरे ?
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 11/16/2016 - 12:07 नवीन
आमच्या दूधवाल्याने पण नवी २००० ची नोट घ्यायला नकार दिला. बँकेत भरणा करून घेतील याची ग्यारंटी नाय, म्हणाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
म
मोदक Wed, 11/16/2016 - 12:33 नवीन
मग जुन्या नोटा घेतो आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
स
सस्नेह गुरुवार, 11/17/2016 - 06:44 नवीन
शाणा का खुळा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Wed, 11/16/2016 - 15:35 नवीन
मी आज नव्या नोटा एच डी एफ सी बँकेत भरल्या.रांगेत बसून माझ्या कडे असलेल्या जुन्या नोटा हि भरल्या. दोन्हीला वेगळी स्लिप भरून दिली होती. काहीच प्रश्न नाही उद्भवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
सुधांशुनूलकर Wed, 11/16/2016 - 14:42 नवीन
८ तारखेला ही घोषणा झाल्यापासून बँकेत / एटीएममध्ये गेलोच नव्हतो. हजारेक रुपये जवळ होते, त्यात भागवत होतो. तीन-चार दिवसांत सर्व काही मूळपदावर येईल असं वाटत होतं. मग आम्ही दोघांनी ८ तारखेपासून रवींद्र नाट्य मंदिरमधल्या पु.ल. कला महोत्सवाच्या कार्यक्रमांना शनिवार वगळता रोज हजेरी लावली. मस्त एन्जॉय केलं. पैसे वगैरे शब्दश: विसरून गेलो होतो. बस प्रवासाचा काय तो थोडा खर्च होत होता. पण इतके दिवस झाले, तरी बँका-एटीएमसमोरची गर्दी कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचं दिसत होतं. पैसेही संपत आले. शेवटी आठ दिवसांनी आज सकाळी ९ वाजता बँकेसमोर रांगेत नंबर लावला. सव्वाबारा वाजता नंबर लागला. ५००च्या नोटा खात्यात भरल्या. नोटा बदल होणार नाही, विड्रॉवल स्लिपद्वारे / स्वयंचेकद्वारे फक्त साडेचार हजार रुपये (त्यात २०००च्या दोन आणि शंभराच्या पाच नोटा) काढता येतील, असं ज्ञानामृत मिळालं. मग थोडं डोकं चालवून साडेतीन हजाराची मागणी केली, तेव्हा २०००ची एक, शंभराच्या दहा आणि पन्नासच्या दहा असे साडेतीन हजार मिळाले. बायकोला एका खाजगी बँकेमध्ये ५००च्या नोटा बदलून १००च्या नोटा मिळाल्या. एकूणच खाजगी बँकांमध्ये नम्र सेवा, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये थोडा सरकारी खाक्या, तर सहकारी बँकांमध्ये परिस्थिती मॅनेज करणं अवघड... असं सर्वसाधारण निरीक्षण. या आठ दिवसांमध्ये सामान्य लोकांनी – रोख कमाईवर रोज अवलंबून असलेले दूधवाला, भाजीवाला या लोकांनी उधारी देण्याची तयारी दाखवली. हे लोक खरे असामान्य वाटले. आज एक गंमत – भरघोस वाढलेल्या माझ्या पांढर्‍या दाढीमुळे, पोलिसांनी मला ज्येष्ठ नागरिक समजून आत सोडायची तयारी दाखवली. पण मी ज्येष्ठ नागरिक नाही असं नम्रपणे म्हणून मी रांगेत उभा राहिलो. मग सव्वातीन तासांनी माझा नंबर आल्यावर ज्या आदराने, सन्मानाने पोलिसाने मला आत सोडलं, त्याचं समाधान मला नोटा मिळाल्याच्या समाधानापेक्षा जास्त वाटलं.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 11/16/2016 - 17:15 नवीन
क्या बात हय काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर
ख
खटपट्या Wed, 11/16/2016 - 17:35 नवीन
दाढी वाढवून बघायला पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधांशुनूलकर
स
सुखीमाणूस Wed, 11/16/2016 - 18:24 नवीन
नाहितर नस्ते खर्च चालूच रहातात सध्या घरकामाची बाई आणि मालकिण बाई एकाच स्टेट्सला आहेत.. पैसे नाहित पण मस्त चालले आहे. आपल्याकडे बेहिशेबी पैसा नाहि याचा खराखुरा आनन्द होतो आहे. आज नोटा रद्द झाल्यानन्तर पहिल्यन्दी वडिलाना ब्यान्केत नेले. पटापट कामे झालि मुलगा हौस्टेलला मजेत आहे काहि अडत नाहि त्याचे रोख पैसा नसला तरी जनता सहकारी ब्येन्क मधे काम पटकन झाले. सासर्यन्चे अकाउन्ट मदतिला आले. रान्ग नव्हती व कमी का होइना पैसे देत होते. विरोधकान्चि इतकी काय अडचण होते आहे?
  • Log in or register to post comments
स
सचिन७३८ गुरुवार, 11/17/2016 - 06:54 नवीन
जेलरोड, नाशिक येथे स्टेट बँक ऑफ हैदराबाद शाखेत १०, १३ व १६ तारखेला पैसे भरण्यासाठी गेलो. ४ ते ५ लोकांपेक्षा जास्त मोठी रांग नव्हती. बाकी १०० च्या नोटा मिळत नसून पैसे एकदा काढले तेव्हा फक्त २००० ची नोट मिळाली. अनुभव उत्तम!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 11/17/2016 - 07:08 नवीन
ज्या बँकेचे ग्राहक जितके तशी गर्दी आहे,
  • Log in or register to post comments
न
नरेश माने गुरुवार, 11/17/2016 - 07:17 नवीन
मला वाटते गर्दीचा आणि बँकेच्या ग्राहकांचा काहीही संबंध नाही. कारण बँकेचे ग्राहक जे पैसे भरण्यासाठी किंवा चेकने काढण्यासाठी जात आहेत त्यांचे काम एक तासाच्या आत होत आहे. (याला स्टेट बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन बँका अपवाद असू शकतात. कारण दोन्ही जुन्या सार्वजनिक बॅंका आहेत आणि बहुतेक पेन्शनरांचे खाते हे या दोन बँकात आहेत) ही जी मोठी रांग बहुतेक सर्व बॅंकांच्या बाहेर लागली आहे ती मुख्यत्वे नोटा बदलण्यासाठी आहे. आणि बॅंकेचे खातेदार नसाल तरी बँका नोटा बदलून देत आहेत. आता एका व्यक्तीला एकदाच नोटा बदलून मिळणार अशी सरकारी घोषणा झाल्यावर बहुतेक बॅंकांच्या बाहेरची गर्दी कमी झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सिरुसेरि गुरुवार, 11/17/2016 - 10:05 नवीन
३ प्रकारच्या रांगा दिसत आहेत . नोटा बदलण्यासाठी - हि रांग फारशी मोठी नाही . १५ ते २० मिनीटात नोटा बदलुन मिळतात . रक्कम काढण्यासाठी - हि रांग तुलनेने मोठी आहे . तरी ३० ते ४० मिनीटात काम होते . रक्कम जमा करण्यासाठी - हि रांग सगळ्यात मोठी आहे . निदान एक तासाची निश्चिंती बगुनाना .
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे गुरुवार, 11/17/2016 - 13:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
J
jp_pankaj गुरुवार, 11/17/2016 - 14:51 नवीन
मागील ८ दिवसात आमची शाखा ( लहान आहे.एकुन ५ कर्मचारी आहेत) रोज सरासरी ३५ लाख जमा करतेय. ९ लाख बदलुन देतेय आणी ३ लाख विड्राल होतात. गावातील बँक ऑफ महाराष्ट्र ची सेवा सर्वात चांगली आहे( मलाच धक्का बसतोय). एसबीआय सर्वात बेक्कार. पणजी (आईची आईची आय) बँकच एटीम सर्वात आधी (११ तारखेला ) चालु झाले. बँक ऑफ महाराष्ट्र चे १२ तारखेला (दुसरा धक्का). एकुणच आमच्या गावात कुठेही गोंधळ नाही.लोक एकमेकांना मदत करत आहेत. बँकवाले पुण्यकर्म असल्यासारखे वागत आहेत. लिहीण्यासरखे बरेच आहे पण वेळेअभावी थांबतो. -: जाता जाता- तुमच्याकडील रोख रक्कम जपुन वापरा.पुढील आठवड्यात रोख रक्कमेची चणचण भासु शकते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/19/2016 - 10:50 नवीन
८ नोव्हेंबरला नोटा रद्द करण्याचा निर्णय झाल्यापासून कालपर्यंत पूर्ण थंड होतो. कोणत्याही एटीएम मधून पैसे काढले नव्हते आणि जवळील जुन्या नोटा बदलण्याची घाई करायची नाही असे ठरविले होते. किंबहुना १ डिसेंबर नंतरच मोहीम सुरू करायची असे ठरविले होते. परंतु काल एचडीएफसी बँकेचा लघुसंदेश आला होता. नोटा बदलून घेणे व पैसे काढणे सुलभ होण्यासाठी तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरला कॉल करून वेळ ठरवून बँकेत या. आज सकाळी वृत्तपत्रात वाचले की आजचा दिवस बँका फक्त त्यांच्या खातेदारांनाच सेवा देणार आहेत. बँकेचा इम्पेरिआ ग्राहक असल्याने रिलेशनशिप मॅनेजरला फोन केल्यावर त्याने १२ वाजता शाखेत येण्यास सांगितले. तिथे १२ वाजता पोहोचल्यावर दिसले की बँकेच्या बाहेर अंदाजे २५-३० जणांची रांग आहे. परंतु मॅनेजरने थेट आत घेण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे रांगेत उभे न राहता आत पोहोचलो. इतर जनता रांगेत उभी आहे, परंतु आपण रांगेत न थांबता थेट आत आलो याबद्दल मनातून अपराधी वाटत होते. परंतु बँकेत मी अगदी क्वचितच जातो. बँकेशी संबंधित जवळपास सर्व कामे मी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून करतो. ज्या विशिष्ट शाखेत माझे खाते आहे तिथे तर आज मी जवळपास ३-४ वर्षांनी गेलो. आज अनेक वर्षानंतर एका कामासाठी इतर ग्राहकांवर अन्याय करून बँकेने अधिकृतरित्या दिलेल्या सुविधेचा लाभ घेतला असला तरी मी इतर वेळी बँकेत जाऊन इतर ग्राहकांचा वेळ खात नाही व भविष्यात पुन्हा बॅंकेत प्रत्यक्ष कामाला जाऊन इतर ग्राहकांचा वेळ खाण्याची वेळ लवकर येणार नाही असा सोयिस्कर विचार करून मनातील अपराधी भावना झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. मला तीन कामे करायची होती. जवळ असलेल्या ५००/१००० च्या नोटा खात्यात भरणे, स्वतःच्या खात्यातील २४००० रूपये चेक वापरून काढणे व अजून एक चेक खात्यात भरणे. आम्ही दोघे जोडीने आतील दोन वेगवेगळ्या रांगेत उभे राहून तीनही कामे पूर्ण केली. आयडी प्रुफ व्हेरिफिकेशन सुद्धा १० मिनिटांच्या आतच झाले. जुन्या नोटा भरण्याच्या रांगेत बर्‍यापैकी वेळ गेला. एकंदरीत सर्व काम पूर्ण होण्यास अंदाजे ५५ मिनिटे लागली. हातात २४००० रूपये (२००० च्या १० नोटा व १०० च्या ४०) असल्याने उगाचच गारगार वाटत आहे. बॅंकेचा सर्व कर्मचारी वर्ग अत्यंत सौजन्यशील होता. रांगेत उभे असलेले कोणीही तक्रार करीत नव्हते. बँकेच्या आत व बाहेर गर्दी असूनही लोकांना ठराविक वेळाने आत सोडण्यात येत असल्याने चेंगराचेंगरी झाली नाही.
  • Log in or register to post comments
ए
एस Sat, 11/19/2016 - 13:40 नवीन
बँक ऑफ महाराष्ट्र च्या रांगेत सुमारे तीन तास उभे राहून चार हजार बदलून घेतले. कमाल मर्यादा रु. साडेचार हजार असूनही फक्त चार हजारच दिले. त्याही दोन हजाराच्या दोन नोटा. त्या घ्यायला कोणी तयार नाहीत. एचडीएफसी बँकेत जवळचे पैसे भरायला गेलो तर बरीच मोठी रांग होती. रांगेत उभे राहिल्यानंतर बऱ्याच वेळाने समजले की पैसे डिपॉजिट करायला डिपॉझिट स्लिप, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि एक चेक ही लागतो. चेकबुक नेले नसल्याने परत यावे लागले. स्टेट बँकेपुढची रांग पाहून तिथे थांबण्याचे धाडस झाले नाही. एक शेजारी पैसे बदलून घ्यायला बँक ऑफ इंडिया च्या रांगेत सकाळी आठ वाजता थांबले होते. त्यांचा नंबर दुपारी तीन वाजता लागला. आता युनियन बँक ट्राय करणार आहे. पाहूया. आले सरकारच्या मना...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 11/19/2016 - 18:19 नवीन
पैसे काढायला चेकबुक लागते, भरायला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा