Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अनुभव नोटा बदल आणि पैसे काढणे (आपल्याच खात्यातून)

न
नाखु
Mon, 11/14/2016 - 05:30
🗣 218 प्रतिसाद
ज्या ज्या मिपाकरांनी बँकेत जाऊन आपल्या(च) पाचशे -हजाराच्या नोटा बदलून आणल्या किंवा भरणा केल्या त्यांचे अनुभव इकडे तिकडे (प्रतिसादात) टाकण्यापेक्षा या धाग्यात द्याव्यात या करिता हे दालन खुले केले आहे. एटीम चालू नसल्याने किंवा चालू होताच अर्ध्या तासात रोकड संपल्याने काय हाल होत आहेत ते सांगावेत. नमनाचे तेल झाल्यावर माझे अनुभव. खाते स्टेट बँक ऑफ ईंडीयात माझे आणि लेकाचेही.घरात कन्येच्या पिगी बँक (आज्जी बटव्यातले ३ हजार) व माझे आपत्कालीन ३ हजार भरणा करण्यास व बदलून घेण्यास गेलो. लेकाच्या खात्यातच पिगी बँकेचे जमा करणार होतो त्यानुसार स्लिप वैगरे भरली होतीच.फक्त मला बदलायचे पैसे सविस्तर अर्ज आणि ओळख्पत्र वैगरेसहीत तयारीने गेलो होतो.(शुक्रवार दि.११). बँकेत बर्यापैकी गर्दी होतीच रांगेत किमान १००-१५० नंबर असावेत, मुख्य दारातून एकावेळी १०-१५ लोकांना सोडले जात होते,पण एकूणच बँक कर्मचारी या अचानक आलेल्या लोंढ्याला आणि कामाला तोंड द्यायच्या क्षमतेइतके नव्हते हे वारंवार जाणवत होते. शंका निराकरण करणारा कुठलाही फलक दर्शनी भागात व ठळक असा लावला नव्हता.सूचना ए टीम चा सुरक्षारक्षक देत होता त्याचा अवतार व शरीर यष्टी पहाता त्यालाच सुरक्षेची नितांत गरज होती.त्यातून तो बिचारा अमराठी (बहुधा उत्तर भारतीय) त्याला लोकांच्या शंकांना चौकशीला उत्तर देता येत नव्हते.त्यात रांगेतले लोकही एक्मेकांना अचूक माहीती देण्यापेक्षा नवीन च काहीतरी सांगत होते,प्र्त्येक भरणा रकमेसोबत ओळ्खपत्र (पॅनकार्‍ड ) लागेल असे त्यामुळे आणखीन्च गोंधळ. खरी गंम्मत माझा नंबर येऊन मी आणि मुलगा आत गेल्यावर आली. आम्ही दोघेही गेलो अश्यासाठी की जर आत दोन स्वतंत्र रांगा असतील्,बदलून घेण्यासाठी आणि भरणा करण्यासाठी तर सोयीचे व्हावे म्हणून (आणि तसेच होते स्वतंत्र रांगा होत्या). आत पहिल्यांदा मी भरणा करण्याच्या रांगेत उभा राहिलो आणि मुलाला नोटा बदलून घ्यायच्या रांगेत उभे केले.त्याचा नंबर अंदाजे २०-२५ वा असेल,आणि माझा माझ्या रांगेत फक्त १०-१२. माझ्या पुढील लोकांअध्ये काही संपुर्ण तपशील घेऊन आलेले होतेच पण : दाखला क्रं १ : एक मध्यमवयीन इसम (वय ४०-५०) :. प्र्त्येक भरणा करण्याला ओळ्खपत्र लागेल का? बँकेतल्या बाई (कर्मचारी) : नाही फक्त पन्नास हजाराच्या वर असेल तर लागेल.आणि त्याचे तपशील स्लिपवर लिहा. एक मध्यमवयीन इसम : मग मी या स्लिप बदलून वेगळ्या भरतो तिथेच भरायला सुरुवात वेगवेगळ्या खात्याच्या आणि बाईंकडे एक स्लिप देऊन रक्कम बहुधा ७०-७५ हजार दिले असावेत.बाईंनी पॅनचा तपशील मागताच त्याच स्लिप मध्ये खाडाखोड करून ४९ हजाराची स्लिप केली.उरलेली रक्कम तिथेच इतर स्लिप भरायला सुरुवात.एकूण वेळ सगळे निस्तरायला ३०-३५ मिनिटे. दाखला क्रं १ :रांगेत त्या नंतरचा ५-६ वा नंबर मारवाडी स्त्री तीशीतली(पेहरावावरून व दागिन्यांवरून अंदाज उगा गहजब नको) सोबत एक लहान मुलगा ३-४ वर्षाचा आणि त्या स्त्रीची बहुधा आई. नंबर येताच बँकेतल्या बाई (कर्मचारी) ने साम्गीतले रक्कम ५० हजार आहे तेंव्हा पॅनकार्ड लागेल. बाईम्नी तिथून्च फोन करून घरी चौकश्या सुरु केल्या दोन चार फोना फोनीनंतर , नंतर दिला पॅन नंबर तर चालेल का तेही चिआरून झाले.बँकेतल्या बाईंनी नकार दिल्यावर शेवटी पुन्हा फोन. बँकेतल्या बाई वैतागून तोडगा देतात ४९ हजार भरणा करा पॅनची गरज भासणार नाही,त्याच वेळी त्या आईसाहेब उवाच "हम अब इस हजार रुपये कब भरने आयेंगे" वगैरे जे काम ३-४ मिनिटात होणे होते त्याला वेळ १५-२० मिनिटांचा.माझा नंबर अग्दी २-३ वर येताच बँकेची घोषणा की नोटा बदलीच्या रांगेतल्या पुढच्या १० च लोकांना बदलून मिळतील (रोकड शिल्लक नसल्याने) उरलेल्यांनी उद्या येणे. बँकेच्या मॅनेजराला आधी अंदाज कसा आला नाही ते मलाही कळेना.(बँकेबाहेरील लोकाची चिडचिड/संताप स्वाभावीक होता,किमान टोकन पद्ध्त वापरून फक्त ५०-१०० लोकांनाच थांबण्यास सांगायला पाहिजे होते) शेवटी मुलाकाचा नंबर १५-२० मध्येच असल्याने त्याचे कडून नोटाबदलीचे पैसे घेऊन (आधीच पर्यायी स्लिप भरून ठेवल्याने भरणा करायचे ठरवले) आणि दोन्ही पसे भरणा केले. व्य्वहार होत असताना. नोटाबदलीच्या कौंटरवर २००० हजारच्या नोटा नकोत सगळ्या फक्त शंभरच्याच द्या असे सांगणारे २-४ महाभाग होतेच. थोडक्यात बेशिस्त अनागोंदी आणि पॅनीकता दोन्ही बाजूंनी आहे.(याच कारणामुळे १०-१५ व्य्वहारांना २-३ तास लागत आहेत)
लोक फक्त साक्षर झाले आहेत सुशिक्षीत होण्यास अजून बर्यापैकी मजल गाठावी लागेल.
त्या दिवशी चेक बुक बरोबर नेले नसल्याने काल चेक ने पैसे काढावे लागले मर्यादा १० हजाराची असूनही लगेच निकड नसल्याने ७ हजार काढले (पुन्हा ३ तास खर्ची करून) त्यात पहिली वहिली २ हजाराची नोट मिळाली त्यामुळे कन्या खूष आणि मुलालाही रांगेत थांबल्याचे चीज झाले असे वाटले.(सध्या नोट पिगि बँकेत्च राहिल असे फर्मान कन्येने दिले आहे) कुणाचे अनुभव असतील तर ते टंकावेत.
वर्गीकरण
अभ्यास
अभिव्यक्ती स्वातंत्र्
अर्थ व्यवस्थापन

प्रतिक्रिया द्या
46778 वाचन

💬 प्रतिसाद (218)
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 09:05 नवीन
प्रतिसादाची नोंद घेतली आहे, उत्तर वेगळ्या ठिकाणी ह्याचा संदर्भ घेऊन देईन, बाकी, इथल्या 30 किंवा 30 हजार वाचकांना प्रभावित करण्यासाठी मी इथे लिहीत नाही, मला जे वाटतं ते लिहितो. त्यामुळे निवडणुकीतील राजकारणावर शष्प काय किंवा हिमालयाएवढा काय, बदल माझ्या लिहिण्याने पडेल कि नाही याची काळजी मी करत नाही. तुम्हाला करावासा वाटला याचे कौतुक वाटले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 11/27/2016 - 14:42 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
श
श्रीगुरुजी Sun, 11/27/2016 - 09:39 नवीन
http://www.loksatta.com/anyatha-news/currency-decision-in-america-1348367/
कुबेरांच्या लेखातून -
निवडणुकीच्या निमित्तानं अमेरिकेत हिंडताना जे माहिती होतं त्याचाच पुन्हा प्रत्यय आला. खिशात रोख रक्कम नसली तरी काहीही अडत नाही. कोणीही तिथे क्रेडिट कार्ड स्वीकारतो. अगदी कॉलेज कँटीनमध्येही रोख पसे द्यावे लागत नाहीत. मुळात तिकडे टपरी पद्धतीची दुकानंच नाहीत. वर्तमानपत्रं विकणाराही दुकानात बसलेला असतो आणि तोही क्रेडिट कार्ड स्वीकारतो.
कुबेरांना अमेरिकेची पुरेशी माहिती नाही. मॅक्डोनल्ड्स, बर्गर किंग इ. फास्ट फुड दुकानातून फक्त रोख रक्कमच स्वीकारली जाते. ते क्रेडीट कार्ड घेत नाहीत. अपार्टमेंटचे भाडे फक्त चेक्सनेच स्वीकारले जाते. तिथे क्रेडीट कार्ड किंवा रोख रक्कम स्वीकारत नाहीत. टपरी पद्धतीची छोटी दुकाने शहरात नसली तरी छोट्या गावात अल्प प्रमाणात असतात. ते फक्त रोख रक्कमच घेतात. काही ठिकाणी शनिवारी/रविवारी सकाळी जवळच्या गावातले शेतकरी स्वतःच्या गाड्यातून ताजी भाजी विकण्यास आणतात. ते फक्त रोख रक्कम घेतात. वर्तमानपत्रे दुकानातही मिळतात व व्हेंडिंग यंत्रातूनही मिळतात. व्हेंडिंग यंत्रातून वर्तमानपत्राबरोबरच, सॉफ्ट ड्रिंक्स्चे कॅन्स, किरकोळ खाद्यपदार्थ इ. मिळते व व्हेंडींग यंत्र फक्त रोख रक्कम स्वीकारते. तिथे क्रेडीट कार्ड किंवा चेक चालत नाही. अमेरिकेत बहुसंख्य ठिकाणी क्रेडीट कार्ड, चेक किंवा रोख रक्कम स्वीकारत असले तरी फक्त रोख किंवा फक्त चेक किंवा फक्त क्रेडिट कार्ड स्वीकारणारी बरीच ठिकाणे आहेत. एटीएम यंत्रे कानाकोपर्‍यात मोठ्या संख्येने उपलब्ध असल्याने खिशात रोख पैसे नसले तरी फारसे अडत नाही. अमेरिका अजून पूर्ण स्वरूपात कॅशलेस झाली नसली तरी बर्‍याच प्रमाणात कॅशलेस झालेली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ओ
ओम शतानन्द Sat, 11/26/2016 - 11:25 नवीन
१) bank of Maharashtra -- DOMBIVLI EAST cash deposit old notes Rs 2000/- Aadhar card original and photocopy,& cash withdrawal Rs.6000 (2000*2 + 100*20 ) total time for depositing cash -- 20 minutes 2) DNS bank main branch - withdrawal 2000/- (100*20) time 15 minutes no document rqd except passbook 3) NKGSB bank - withdrawal 4000 time10 min no document reqd except passbook 4) DNS BANK NEHRU MAIDAN BR - WITHDRAWAL DENIED pancard and aadhar card original and photocopy compulsory as per RBI , I had aadhaar copy and original and pan photocopy only. My account was KYC compliant , but still I was told to produce Pan card in original, I asked them that in other branch they never asked me for original PAN as my account is KYC, but I was told that not to argue and waste time here, would be better if ask such questions to RBI
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sat, 11/26/2016 - 12:21 नवीन
दोन दिवसांपूर्वी कोटक बँकेने (आमची सॅलरी अकाउंट्स या बँकेत आहेत ) आमच्या ऑफिसमध्ये येऊन रोख रक्कम वितरीत केली प्रत्येकी २००० रुपये पहिल्या २०० जणांना .... हा त्यांची दुसरी वेळ .... पुढच्या आठवड्यातही असा एक्सटेंशन काउंटर चालवणार आहेत
  • Log in or register to post comments
श
शलभ Sat, 11/26/2016 - 14:29 नवीन
आमच्या ही ऑफीस मधे येणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
स
सामान्य वाचक Sat, 11/26/2016 - 13:08 नवीन
1 नोट मिळाली 7 मिनिटे लागली काळ icici च्या कॅश deposit atm मध्ये जुन्या नोटा भरल्या वेळ 3 मिनिटे
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 11/26/2016 - 15:46 नवीन
टाटा डोकोमो 500 च्या जुन्या नोटा स्वीकारून 600 चा टॉक टाईम देत आहेत. आज एसेमेस आला... हे कसे कायदेशीर?
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Sun, 11/27/2016 - 15:23 नवीन
नक्की काय कायदेशीर कसे विचारत आहात? फक्त ५०० घेऊन ६०० चा टॉकटाइम कि बंद नोटेतुन रिचार्ज? सेल्युलर ऑपेरेटर्स असोसिएशनने सरकारला विनंती केली होती कि टेलिकॉम् सेवेला गरजेची सेवा मानून बिएसएनएलप्रमाणे बाकीच्या कंपन्यांनादेखील बिलांसाठी जुन्या नोटा वापरण्याची परवानगी द्यावी, सरकारने ती अंशतः मान्य करून प्रिपेडसाठी परवानगी दिली आहे. मला वैयक्तिकरित्या हा निर्णय पटला नाही पण बेकायदेशीर काय ते कळले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sun, 11/27/2016 - 19:32 नवीन
बंद नोटे बद्दल बोलतोय, आज नवा मेसेज 500 च्या जुन्या नोटेत 10 जीबी डेटा आणि 90 दिवस वैधता. पण असा रिचार्ज करणाऱ्याचे आयडी माहिती बूथ वाल्याने गोळा करायची व सरकारला द्यायची,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Wed, 11/30/2016 - 07:51 नवीन
बहुतेक तुमचा प्रतिसाद अर्धाच टंकला गेलाय. मलाहि कळले नाही नक्की काय योजना आहे ते. पण हा अत्यंत मूर्खपणाचा निर्णय वाटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभिजित - १ Sun, 11/27/2016 - 07:56 नवीन
काळ डोंबिवली स्टेशन (वेस्ट ) वर ATM समोर १०० माणसे लाईन मध्ये उभी. संध्याकाळी ६ वाजता .. VT एन्ड ATM .
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 11/27/2016 - 09:26 नवीन
हल्लीच... ३ तास लाइन मध्ये उभे राहुन पैसे काढले... ५०० च्या नोटा मिळवण्यासाठी आधी १५०० व नंतर १००० असे काढले, त्यामुळे सगळ्या ५०० च्या नोटा मिळाल्या. :) लोकांचा पगार होण्याचा कालावधी जवळ आला असुन येत्या दिवसात एटीएम लोड वाढण्याची शक्यता दिसत आहे. मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)
  • Log in or register to post comments
व
विचित्रा Wed, 11/30/2016 - 07:18 नवीन
आज कामाच्या ठिकाणाच्या जवळ असणार्या 'महा' बँकेतून १५०० रु. चेकने काढण्याचा प्रयत्न केला.आमच्या छोट्या गावात दोन हजार सुटे मिळणं, फार खटपटीचं ठरतं, म्हणून हा उद्योग. पण २५ मिनिटे रांगेत थांबल्यानंतर, पैसे फक्त हजारच्या पटीत काढता येतील, असं सांगून पाठवणी केली.
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 11/30/2016 - 07:30 नवीन
बँकेत रोकड काढ्ण्याची मर्यादा सात हजारापर्यंत करण्यात आली होती (सुरुवातीला ४ हजारच होती) र
च्याकाने बँकेत गैअरसोयीबद्दला (बँका बँकात रक्कम मर्यादा तफावत अस्ल्याने लोक बँकेला श्या देत होते मोदीला वा भाजपाला श्या देताना दिसले नाहीत का त्याचे उत्तर माहीत नाही.
काल सहा हजार काढले. सगळ्या २ हजाराच्या नोटा. दुसर्यांदा लाईनतला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विचित्रा
व
विशुमित Wed, 11/30/2016 - 07:58 नवीन
मेव्हण्याने लग्नाच्या वाढदिवसाची अनोखी भेट दिली. रु.१० च्या १०० नोटा + रु. १०० च्या १९० नोटा ------------------------ = रु.२०,००० दिवाळीत चेस्टने अंगठी मागितली होती, त्याला जिव्हारी लागले बहुतेक, फकड्याने कहरच केला. आता २ महिने काळजी नाही. पण सासरवाडीच्या उपकाराच्या ओझ्या खाली दबलोय आता. जय मोदी..!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अनिरुद्ध.वैद्य Wed, 11/30/2016 - 08:04 नवीन
मध्ये १५ मिनिटांमध्ये काम झाले. मी निघालो तेव्हा, फार फार तर १० लोकं होती लाईनीत.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Wed, 11/30/2016 - 08:38 नवीन
मी पण हेच लिहायला आलेलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा