Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटा बंदी व परिणाम

स
संदीप डांगे
गुरुवार, 11/17/2016 - 15:04
🗣 187 प्रतिसाद
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत. ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे. इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

प्रतिक्रिया द्या
121754 वाचन

💬 प्रतिसाद (187)
म
मोदक गुरुवार, 11/17/2016 - 15:25 नवीन
उत्तम धागा.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/17/2016 - 15:45 नवीन
फर्स्ट हँड अनुभव ! ठाण्यात अशाच एका ट्रकवाल्याकडून एका कायदा रक्षकाने च्यापाणी मागीतला. ट्रकवालयाने ५०० ची नोट काढून देताच तोडपाणीचे पैसे वळते करुन घेऊन उरलेली रक्कम पैसे परत केली. रोज १०-१०, २०-२० रुपये जमा केल्याची मेहनत फळाला आली. काल माझी बाईक नो पार्कींगमधून उचलून नेली. पोलिसांनी चक्क ५०० ची नोट स्वीकारुन उरलेले २०० रुपये कोणतीही खळखळ न करता परत दिले. वाहतूक पोलिस अधिकृतरित्या ५०० /१००० ची नोट स्वीकारु शकतात काय याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 11/17/2016 - 16:57 नवीन
हो पुण्यातही आर टी ओ ने अक्षरश: हप्ता वसुली प्रमाणे गाड्या उचलायला सुरुवात केली आहे . शिवाय काहीही फालतू कारणे दाखवून पैसा उकळत आहेत, परवा आमच्या मित्राला इन्शुरन्स ची ओरिजिनल कॉपी सोबत का बाळगली नाही म्हणून 200 चा बांबू लावला , त्याने घरी जाऊन ओरिजिनल कॉपी आणून दाखवली तरीही ! म्हणाले गाडी उचलावी लागली म्हणून दंड! ( कायदेशीर दृष्ट्या ओरिजिनल सोबत बाळगणे गरजेचे नसते, पोलिसाने कागदपत्रे जमा करायला 15 दिवसांची मुदत देणे अपेक्सित असते ) असो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
स
संदीप डांगे गुरुवार, 11/17/2016 - 17:06 नवीन
वसुली रोडावली त्यामुळे आता भरपाई करावीच लागेल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ख
खटपट्या गुरुवार, 11/17/2016 - 17:36 नवीन
१० तारखेचा अनुभव वेगळा होता. ५०० ची नोट घ्यावी लागते म्हणून पोलीस पावतीच फाडत नव्हते. गाड्या उचलणार्‍या लोकांना पण सुट्टी दीली होती. आता पोलीस ५००/१००० च्या नोटा घेउन बँकेत भरत असतील कारण त्यांना लाइन लावावी लागत नसेल. रच्याकने - टोल घ्यायला सुरवात केली का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
य
यशोधरा Fri, 11/18/2016 - 05:12 नवीन
रच्याकने - टोल घ्यायला सुरवात केली का ?
अजून नाही म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
म
मराठी_माणूस Fri, 11/18/2016 - 07:05 नवीन
http://www.loksatta.com/desh-videsh-news/toll-suspension-is-extended-in-maharashtra-including-mumbai-till-24th-november-2016-midnight-1341714/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
अ
अभिजित - १ Tue, 11/22/2016 - 15:57 नवीन
हि टोलमाफी वगैरे नसून, टोल पुढे ढकलण्यात येणार आहे. म्हणजे जर का ३१ dec , २०१९ ला टोल कॉन्ट्रॅक्ट संपणार असेल आणि १५ दिवसाची माफी सरकारने दिली असेल तर. १५ Jan , २०२० पर्यंत टोल स्वीकारायला परवानगी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस
स
सतिश गावडे गुरुवार, 11/17/2016 - 17:15 नवीन
संदीपचा मुद्दा योग्य वाटतो. प्रतिसादातील दोन उदाहरणे शहरातील आहेत. त्यांची तुलना "लाईन"च्या ट्रकबरोबर होऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 11/17/2016 - 17:42 नवीन
उत्तम कल्पनेवरचा धागा. प्रतिसादकांनी समस्येबरोबर तिच्या निराकरणासाठी काही शक्य उपाय सुचवले तर धाग्याची उपयुक्तता वाढेल. हे उपाय त्या समस्येत अडकलेल्या आपल्या माहितीतल्या लोकांना सांगू शकू व जमल्यास त्या माहितीच्या आधारे त्यांची मदतही करू शकू.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे गुरुवार, 11/17/2016 - 17:49 नवीन
धन्यवाद! अगदी हाच विचार आहे यामागे! गावडे सर, बरोबर ओळखलंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ध
धर्मराजमुटके गुरुवार, 11/17/2016 - 18:09 नवीन
या धाग्यावर अवांतर आहे पण मला टोईंग व्हॅनची पावती बघून नेहमी प्रचंड प्रमाणात चीड येते. एक टोईंग व्हॅन एका वेळेस कमीतकमी १० दुचाकी उचलत असेल आणि दिवसाकाठी कमीतकमी २० फेर्‍या मारत असेल. महिन्याचे अगदी २५ दिवस व्हॅन चालत असेल तरी मासिक उत्पन्न ५ लाखाच्या आसपास असावे. मग असे असतांना हे लोक पावतीवर सर्व्हिस टॅक्स नंबर असलेली पावती का देत नाहीत ? किंवा जर वार्षिक उत्पन्न १० लाखाच्या आसपास असेल तर टॅक्स नंबर घेणे बंधनकारक नाही पण मग तसी सुचना सर्व्हिस बिलावर छापणे आवश्यक असते ना ? कि ही सरकारच्या संगनमताने चाललेली चोरी आहे काय ? किंवा माझी समजूत चुकीची आहे ?
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 11/18/2016 - 08:11 नवीन
टोव्हींग व्हॅन ही भाड्याने वाहतुक पोलीसांना दीलेली असते. दंडाची पावती पोलीसदादा देतो ती सरकारची असते. गाड्या कीतीही उचला टोव्हींग मालकाला ठरलेलेच पैसे मिळतात. बर्‍याच वेळेला या व्हॅन मोठ्या पोलीस अधीकार्‍यांच्या असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके
च
चिनार गुरुवार, 11/17/2016 - 19:28 नवीन
बाब्बो..संदीप भौ नी तर नाव घेऊन मुशकील करून टाकली आमचीवाली. एकंदरीत ज्ञानाचं म्हणाल तर आमचं कसं झालाय ना संदीप भौ...ते म्हणतात ना एक ना धड भाराभर चिंध्या...! असो. तुम्ही दिलेल्या परिस्थितेचे जमेल तसे विश्लेषण करतो...सांभाळून घेजा.. असं समजा की आपले गुरुभादूरसिंग ८ नोव्हेंबर ला संध्याकाळी मुंबईहून २ लाखाची रोकड घेऊन निघाले. रात्री झालेल्या घोषणेची त्यांना एका पेट्रोल पंपावर थांबेपर्यंत काहीही कल्पना नाही. त्याविषयी कळताच गुरुबहादूरसिंगांनी हादरायचे काहीच कारण नाही(तसेही ट्रक ड्रायव्हर मानसिक दृष्ट्र्या कणखर असतातच. अर्थात त्यांना तुमचे हे मानसिक वगैरे शब्द माहिती नसतात!). काहीही झाले तरी त्यांच्या जवळची रोकड ही अवैध ठरत नाही. कारण त्यांच्याजवळ मालाचे बिल आणि एल आर कॉपी आहे (एल आर म्हणजे कोणता माल कुठून कुठे जातो आहे ह्याचे ट्रान्सपोर्टर ने केलेले बिल). रस्त्यात पोलिसांनी पकडले आणि पाचशे -हजाराच्या नोटा कुठे घेऊन चालला असे विचारले तरी ह्या कागदपत्रांमुळे ही अवैध वाहतूक नाही हे सिद्ध होते. दोन लाख रोकड ही रस्त्यातील खर्चासाठी केलेली तरतूद आहे हे पोलिसांना पटवून देता येते. राहिला प्रश्न गुरुबहादूर सिंग ह्यांच्या खर्चाचा...तर साधारणपणे ट्रक ड्रायव्हर लोकांचे खाण्यापिण्याचे धाबे ठरलेले असतात. आणि तिथे उधारी वगैरे अतिशय सामान्य गोष्ट आहे. गुरुबहादूर सिंग यांना मूळ समस्या आहे ती पेट्रोल आणि रोड टॅक्स किंवा एंट्री टॅक्स ची. आणि हा प्रश्न सद्ध्या कितीतरी गुरुबहादूरसिंगांना भेडसावत आहे. काही पेट्रोल पापं वाले पाचशे -हजारांची नोट स्वीकारतात. पण एंट्री टॅक्स दिला नाही तर पुढे जाताच येत नाही. अश्या वेळी ट्रक रस्त्याच्या कडेला लावून तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे ह्याशिवाय काहीही पर्याय नाही. नोटबंदीमुळे देशातले कितीतरी व्यवहार बंद आहेत त्यात आणखी एका गुरुबहादूरसिंगांची भर...बाकी काहीही नाही... आणि मला विचारलं तर नोटबंदी असो वा नसो, ट्रान्सपोर्ट हा अतिशय बेभरवश्याचा धंदा आहे. असल्या कितीतरी समस्या गुरुबहादूरसिंगांसमोर येत असतात. अश्या वेळी शक्य तो मार्ग काढून ते पुढे जातात. माल पोहोचवायला उशीर होतोय, आता काय होणार असे प्रश्न वैयक्तिक पातळीवर गुरुबहादूरसिंगांना पडत नाही. सोबत असलेला माल सुखरूप (आणि जमलंच तर वेळेवर) त्याच्या मुक्कामावर पोहोचवायचा आहे एवढेच त्यांना माहिती असते. आणि हे काम गुरुबहादूरसिंग इमाने -इतबारे करतात. अवांतर - गुरुबहादूरसिंग त्यांच्या मालकाचे सोडून इतर कोणाचेही काहीही ऐकत नसतो. उदा. माल अर्जंट आहे. मुंबईहून कोलकात्याला चार दिवसात पोहोचला पाहिजे असं मुंबईच्या कंपनीने ठणकावून सांगितले तरी गुरुबहादूरसिंग आपल्या ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक जे सांगेल तेच करेल. म्हणजे मुंबईहून नागपूरपर्यंत पोहोचल्यावर मालकाने फोन करून जर कन्याकुमारीला जायला सांगितले तर आपले गुरुबहादूरसिंग कुठलाही विचार न करता तेच करतील !!
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 05:08 नवीन
आजची बातमी, नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेत. तसे पत्रक शाखेत लावले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 07:34 नवीन
विशेष सूचना -- हे नोटा बदली करून मिळणारे पैसे आहेत स्वतःच्या खात्यातून काढायचे पैसे नव्हेत. माहिती पूर्ण द्यावी हि विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/18/2016 - 08:21 नवीन
तपशिल बरेचं मिसलेले आहेत. रोज २००० रुपये बदलुन मिळतील. बाकी रोजचे पैसे काढायची लिमीट अजुनतरी बदललेली नाही. असे तपशिल नेमके विसरल्याने सरकारला गोळ्या द्यायची संधी डॉ.डांगेसरांना मिळते, तस्मात अधिकृत बातम्यांवरचं विश्वास ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:16 नवीन
http://epaper.lokmat.com/epapermain.aspx?queryed=44 फक्त एकदाच संधी ■ ५00 आणि१000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळसुरू असली तरी नाशिक जिल्ह्याच्या अग्रणी बॅँक असलेल्या बॅँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ३0 डिसेंबरपर्यंत एका व्यक्तीला एकदाच ४५00 रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहेत. शुक्रवारपासून तर दोन हजार रुपयेच मिळणार असून, त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार आहे. बॅँक ऑफ महाराष्ट्रने या निर्णयाची प्रत टिळकपथ येथील शाखेमध्ये लावण्यात आली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 09:20 नवीन
आपण कितीही पैसे बँकेत भरु शकता आणि एकावेळेस 1०००० काढता येतात. मग हे नोटा बदलीबद्दल रडारड कशाला? चावटपणाचा बाजार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:23 नवीन
ब्वॉर्र!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 09:33 नवीन
LOL
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:10 नवीन
फक्त नोटा बदलीतच काळ्याचा पांढरा पैसा होतो ना ? मग चेकने कितीका मिळेनात, काय उपयोग ? नाईलाजाने बोंब मारणे भाग आहे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुखीमाणूस Fri, 11/18/2016 - 10:32 नवीन
मेरा भारत महान
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/18/2016 - 11:14 नवीन
अगदी हेच म्हणतो मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 10:52 नवीन
तुमचं म्हणणं बरोबर आहे. मी नोटा बदली करण्याचा प्रयत्न कार्यालयीन वेळेत करत होतो. माझे खाते icici बँकेत पण icici ची शाखा माझ्या कार्यालयाच्या जवळपास नाही. मग अशा वेळी जवळ असलेल्या इंदसइंड्च्या शाखेत नोता बदलाव्यात असा विचार केला. मागील आठवड्यात एकदा थोड्या नोता बदलल्या. पण या आठवड्यात पुन्हा बदलता आल्या नाही. त्यामुळे गैरसोय झाली.. यात मला काळ्याचे पांढरे करायचे होते वगैरे असे काही नाही...त्यामुळे पुर्ण कालावधित (म्हणजे ३० डिसेंबर पर्यंत) फक्त एकदाच पैसे बदलता येतील हा नियम त्रासदायक वाटतो आहे. पण मला वाटते यात पुन्हा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बदल करतील. आणि मुख्य म्हणजे १ डिसेंबरपर्यंत हा सगळा गोंधळ आटोपलेला असेल अशी आशा करुयात कारण महिन्याच्या एक ते दहा तारखांपर्यंत रोखीने खूप व्यहवार होत असतात. बर्‍याच ठिकाणी पगार देखील रोखीने होतात. तोवर पाचशेची नवी नोट बर्‍यापैकी उपलब्ध झालेली असेल अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 07:34 नवीन
नाशिक महाराष्ट्र बँकेत 30 डिसेंम्बर पर्यन्त प्रत्येक एका व्यक्तीला एकदाच फक्त 2000 रुपये मिळणार आहेत खात्यातून फक्त २००० रूपये काढता येणार आहेत की २००० रूपये एकदाच बदलून मिळणार आहेत..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 07:57 नवीन
'बदलून' मिळणारे आहेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/18/2016 - 08:00 नवीन
मग तसे स्पष्ट लिहायला विसरलात का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
साहेब.. Fri, 11/18/2016 - 08:01 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:17 नवीन
हो, विसरलो पण जाणून बुजून नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/18/2016 - 10:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 10:47 नवीन
याला वैद्यकीय भाषेत Selective amnesia( निवडक विस्मरण) म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सस्नेह Fri, 11/18/2016 - 11:35 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Fri, 11/18/2016 - 23:11 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 07:32 नवीन
आपल्या तूटपूंज्या अनुभवातून आलेली अर्धीच माहिती. सर्व गुरु बहादूर सिंग रस्त्यात बर्याच लोकांची वाहतूक करीत असतात त्याचे भाडे एस टीच्या भाड्यापेक्षा थोडे कमी असते. यामुळे गुरु बहादूर सिंगच्या जवळ सुटे पैसे भरपूर असतात. कोणत्याही हायवे वर उभे राहून "हात दाखवा आणि ट्रक थांबवा" माझ्या एका मित्राचे १८ ट्रक आहेत, त्याच्या जवळ बसून एकदा जेवताना बऱ्याच गप्पा मारल्यावर बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या. सर्वच गुरु बहादूर सिंग सारख्या लोकांचे पगार २००६ साली ३८००-४००० होते. कारण लोईस आणि आरटी ओ वाल्याना चिरीमिरी देऊन( यात ट्रकचा "पास" ओकॅट्रॉय चुकवल्याचे पैसे हे सर्व मालकानी भरायचे असत) त्यांचे अशा वाहतुकीतून १०-१२,०००/- उत्पन्न होत असे त्यामुळे झाडून साऱ्या ट्रक ड्रॉयव्हरचे पगार कमीच असत. अजून एक उदाहरण --माझा मित्र पुण्याच्या रहेजा कंपनीत संचालक पदावर आहे. तेंव्हा १९९५ मध्ये तो वरिष्ठ अभियंता म्हणून होता. त्यांच्या कोंढवा साईट वर वाळू घेऊन आलेल्या एका ट्रकवाल्याशी( नाव संपत) बोलत असताना त्याने विचारले कि तुला पगार किती. त्यावर संपत म्हणाला १८०० रुपये. माझा मित्र म्हणाला तुझे भागते कसे त्यावर तो हसला आणि म्हणाला साहेब तुम्ही माझ्या बरोबर चला. एक दिवस माझा मित्र त्याच्या बरोबर ट्रक मधून दौंडला गेला(तेथे त्याचे काका राहतात). वाटेत भैरोबा नाल्याला त्याच्या ट्रक मध्ये ४० माणसे चढली. त्यांना त्याने दौंडच्या नाक्याला उतरवले. दौंडला त्याने ट्रक मालकाच्या घराशेजारी उभा केला. दहा वीस पावले चालून आपली मारुती गाडी घेतली त्यात माझ्या मित्राला बसवले आणि त्याच्या काकांच्या घरी पोहोचवले. जाताना म्हणाला साहेब मी रोज या ४० माणसांना सकाळी दौंडवर ट्रक मध्ये वाळू वर बसऊन पुण्याला नेतो प्रत्येकी १० रुपये. तेंव्हा एस टी चे तिकीट १७. ५० रुपये होते. दौंड नाक्यावर ५० रुपये आणि पुणे नाक्या वर ५० रुपये देतो. येताना परत तीच माणसे. ट्रक येताना रिकामा असतो.लोक वर्तमानपत्रावर बसतात/ झोपतात रोज माझी कमाई रुपये ६००/- फक्त. आयकर नाही माझा मित्र म्हणाला हा पठ्या महिन्याला १८-२०,०००/- कमावतो तू डॉक्टर होऊन आणि मी इंजिनियर होऊन काय क्रांती केली? तेंव्हा डांगे अण्णा दिसतं तसं नसतं.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 07:56 नवीन
तेंव्हा डांगे अण्णा दिसतं तसं नसतं. ^^^ हे कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 08:22 नवीन
काळा चष्मा काढा असे लिहिण्या ऐवजी लिहिलं होतं तुम्ही समजून घेतलं नाही म्हणून असं फोडून सांगायला लागतंय.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:19 नवीन
मी काळा चष्मा लावल्याचे उगाच... का बरे 'आ बैल मुझे मार' करत आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 09:34 नवीन
म्हण चुकली का? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:35 नवीन
लवकरच कळेल, :) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 09:49 नवीन
चार दिवसांनी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 08:46 नवीन
@ संदिप डांगे तुम्ही "रुपये ५०० आणि १००० च्या नोटांवर बंदी" वर दिलेले कांही प्रतिसाद येथे एकत्र करत आहे. यावर तुम्ही लेख लिहून माझ्यासारख्या सामान्य जनतेचे अज्ञान दूर करावे ही नम्र विनंती. ************************************************************ संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 15:03 जसजसे पुढे जात आहोत, तसतसे अनेक प्रश्न उभे राहत आहेत. सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत. बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक? ****** मोदक - Fri, 11/11/2016 - 19:02 >>>>बॅण्केच्या लाईनमधे कोण उभे आहेत? बडे उद्योजक, नेते, क्लासवन अधिकारी, उच्चपदस्थ की सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक? तुमच्या मते, सामान्य गरिब/मध्यमवर्गिय नागरिक आत्ता बँकेच्या लाईनीमध्ये का उभे आहेत..? >>>>सामान्य लोकांना प्रचंड त्रास होत आहे, काळापैसा असणारे शांत आहेत. हे कशावरून ठरवलेत..? ****** संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 21:16 (प्रतिसादाचा कांही भाग डॉक्टर खरेंच्या प्रतिसादाला उत्तर दिलेला आहे.) बाकी उर्वरित प्रतिसादासाठी स्टे ट्युन्ड! ************************************************************ संदीप डांगे - Fri, 11/11/2016 - 15:29 हा प्रकार म्हणजे कोणाची म्हैस आणि कोणाला उठबैस असा झालेला आहे, चार दिवसात व्यवहार ठप्प राहून किती नुकसान झालंय व हे नुकसान काळ्या पैशाच्या प्रमाणात किती आहे याची आकडेवारी येईल तेव्हा बोलता येईल. सविस्तर प्रतिसाद किंवा लेख चारपाच दिवसांनी लिहितो, बघूया! ************************************************************ संदीप डांगे - Sat, 12/11/2016 - 08:32 काही सुविद्य, सर्वज्ञ लोकांचे प्रश्न वाचून "ब्रेड नै मिळत तर केक का खात नै तुम्ही लोक?" हा सुप्रसिद्ध प्रश्न आठवला! ****** मोदक - Sat, 12/11/2016 - 08:40 ही अशी वाक्ये हवेत आरोप करायला चांगली असतात, पण यामुळे साध्य काहीच होत नाही. त्यापेक्षा तुम्हाला विचारलेल्या नेमक्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही? ****** संदीप डांगे - Sat, 12/11/2016 - 09:35 देतो कि, चार दिवस थांबा तर... ************************************************************
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 09:47 नवीन
चार दिवस होतील १२/११/२०२० ला १६+४=२०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 11/18/2016 - 16:05 नवीन
तुम्ही अंदाज अपना अपना नामक सुप्परडुप्परहिट पिच्चर पाहिलाय का हो डॉक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 08:55 नवीन
उत्तम धागा. आपला परीघ किती छोटा आहे हे धागा वाचुन कळाले. एखादा ट्रक ड्रायव्हर २० लाख रुपये घेउन निघु शकतो हे तर माझ्यासाठी कल्पनेतही शक्य नाही. म्हणजे मुळात ट्रक ड्रायव्हर कडे इतके पैसे असतात किंवा मालक त्यांच्यावर इतक्या पैशाचा विश्वास ठेवतो हेच अनाकलनीय आहे. माझ्या ओळखीचे काही ट्रक ड्रायव्हर आहेत ते सांगायचे की महाराष्ट्रातुन केरळ पर्यंत जाण्यासाठी मालका कडून ८ ते १० हजार मिळायचे. कधीकधी त्याहुन कमी आणी तेवढ्या पैशांसाठीही रस्त्यात दरोडेखोर हातपात तोडायला किंवा जीवे मारायला कमी करायचे नाहित. इथे तर २० लाख घेऊन जाणारे ट्रक ड्रायव्हर्स आहेत असेही दिसते. त्यामुळे पैसा किती मातीमोल झालाय याची जाणीव झाली. शिवाय एक ट्रकभर माल देशाच्या एका कोपर्‍यातुन दुसरीकडे घेउन जाण्यासाठी २० लाख रुपये खर्च येतो हे वाचुन तर डोळेच फिरायची पाळी आली ( खर्चासाठी नको असतील तर कोणी कशाला इतका पैसा जवळ बाळगेल ना ? ). शिवाय एका ट्रकामार्फत मालाची ने आण करण्यासाठी २० लाख खर्च येत असेल तर असे १० ट्रक बाळगणार्‍या माणसाला किती वर्किंग कॅपिटल लागत असेल? हे सगळेच गणित माझ्या आकलनशक्तीपलीकडचे आहे. शिवाय एक ट्रक भरुन माल वाहतुक करण्यासाट्ठी २० लाख लागत असतील तर त्या वस्तुची किंमत किती प्रचंड वाढत असेल याचेही नीटसे आकलन होत नाही आहे. आपल्याला अर्थशास्त्र थोडेफार कळते हा भ्रमाचा भोपळा आज फुटला आणि एक ट्रक ड्रायव्हर २० लाखाची कॅश बाळगतो केवळ सामानाच्या वाहतुकीसाठी हे बघता २० लाख म्हटल्यावर माझे डोळे जे विस्फारतात त्यामुळे आपला वकूब किती मर्यादित आहे याची देखील जाणीव झाली.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 11/18/2016 - 09:33 नवीन
परवा ऑफिसमध्ये आम्हांला घेऊन जाताना कॅब ड्रायव्हर उवाच " काय सांगू आठवडा झालाय, माझ्या बॅंकेतून साडे़आठ नऊ लाखाची कॅश आणली होती, घरी सांगत होतो, लवकर जाऊन दागिने आणा, अप्ण घरच्या लोकांनी जायला उशीर केला आणि ९ ला ही बातमी. आता माझी सगळी कॅश फुकट झाली. "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 09:38 नवीन
जर पैसे बँक अकाउंट मधुन काढुन आणले असतील तर ते परत बँक अकाउंट मध्ये जमा करता येतीलच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 11/18/2016 - 09:42 नवीन
होय, तेच सांगितले त्याला पण त्याला तेच करायचे नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 09:46 नवीन
म्हणजेच तो काळा पैसा होता. ज्याच्याकडे काळा पैसाच ९ लाख असेल तो किती धनवान असेल बरे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
य
यशोधरा Fri, 11/18/2016 - 09:49 नवीन
तूच सांग!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा