Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटा बंदी व परिणाम

स
संदीप डांगे
गुरुवार, 11/17/2016 - 15:04
🗣 187 प्रतिसाद
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत. ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे. इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

प्रतिक्रिया द्या
121754 वाचन

💬 प्रतिसाद (187)
म
मोदक Fri, 11/18/2016 - 12:19 नवीन
बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे मग अशी माहिती येथे देण्याचे कारण..? पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार? अच्छा, हे सगळे तुम्हीच ठरवलेत का..? एकच सल्ला देतो. "मुद्देसूद आणि विषयाशी संबंधित उत्तरे द्या" स्वतः दिशाभूल करणारी उत्तरे दिल्यानंतर असे व्हिक्टीम कार्ड वापरणे ही जुनी पद्धत झाली. असो. अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो! अशा गोष्टींसाठीच मोदीसरकारने हे पाऊल उचलले आहे. :) (सगळे व्यवहार ऑनलाईन आले तर अनेकांच्या दोन नंबरच्या कमाईवर आणि पोटावर पाय येणार आहे हे ही उघड आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 13:22 नवीन
"बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे" असे कबूल करून तरीही ती आपल्याबाजूचा पुरावा दिल्याने लेखकाची विश्वासार्हता कमी होते, हे सार्वकालीक सत्य सांगायला हवेच असे नाही. अश्या वस्तूस्थितीत, ती चर्चा किंवा बातमी, नरेंद्र मोदी / राहूल गांधी / ओबामा / ट्रंप / आईनस्टाईन किंवा आणखी कोणाच्या संबंधात आहे याने काहीssssssही फरक पडत नाही, असे माझे ठाम मत आहे. कोणता एक झेंडा डोळे मिटून सतत हातात घेण्याइतका मी माझ्या बुद्धीचा अपमान करू शकत नाही. त्यामुळे ज्याला जे श्रेय देणे योग्य आहे त्याला ते देण्याचा प्रामाणिकपणा पाळताना मला कधीच अडचण आलेली नाही. हे एका लेखात लिखाणाच्या भरात लिहिलेले पण प्रामाणिक वाक्य, परत परत लिहावे लागेल असे वाटले नव्हते. पण, जग आहे तसे स्विकारून पुढे जावे लागते, हे पुरेसे माहित असल्याने, असो. विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील नव्हे तर कोणत्याही चर्चेचा जीव असतो. विश्वासार्हता नसलेली चर्चा म्हणजे केवळ वितंडवाद किंवा राजकारणी चलाखी बनते. या दोन्हीतही मला रस नसल्याने व खुद्द धाग्याकर्त्याने विश्वासार्हता हा अनावश्यक तपशील असतो व त्याच्याकडे दुर्लक्ष करावे असा निर्देश केल्याने या धाग्याला माझा रामराम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 10:43 नवीन
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. हे आपलेच वाक्य आहेना? मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 10:43 नवीन
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. हे आपलेच वाक्य आहेना? मग वेगळा संदर्भ देऊन शाब्दिक कोलांट्या मारु नका.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 11/18/2016 - 10:48 नवीन
तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. == सुबोध खरे सर, तो त्यांचा फर्स्ट हँड अनुभव आहे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 10:57 नवीन
कोणता? शाब्दिक कोलांट्याचा?-))-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद_१९८२
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:21 नवीन
शाब्दिक कोलांट्या....? =)) =))
  • Log in or register to post comments
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 11/18/2016 - 11:30 नवीन
उदाहरण काही झेपले नाही (माझा परीघ थोडा वेगळा आहे). ट्रक ड्राइवर, २ लाख, २० लाख, व्यवहार ठप्प सगळंच अगम्य आहे! दुसऱ्या उदाहरणांची प्रतीक्षा!
  • Log in or register to post comments
उ
उमेश माधवराव मसलेकर Fri, 11/18/2016 - 11:31 नवीन
मला समाजात नाही की, हे सर्व लोक निरर्थक रडारड का करत आहेत? रोग असाध्य झाल्यावर कधी न कधी तरी शल्यकर्म करावे लागेलच ना ? का त्याचाही मुहूर्त काढायचा ? शल्यकर्म केल्यानंतर काही दिवस तरी त्या टाक्यांमुळे त्रास तर होणारच ना ? आणि पथ्यही पाळावे लागेल शिवाय २-४ वेळा तरी डॉक्टरकडे जाऊन तपासणी करावी लागेल व औषधपाणी वेळेवर करावे लागेल.पण शेवटी जीव तर वाचला ना !!! हेही नसे थोडके !!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 11/18/2016 - 11:44 नवीन
पण काय आहे कि, वर्तमान सरकार वर रोजच्यारोज टिका केल्याशिवाय, देशातील काहि चश्मेबहाद्दूर लोकांना सकाळी प्रेशरच येत नसावे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उमेश माधवराव मसलेकर
म
मारवा Fri, 11/18/2016 - 12:00 नवीन
?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 12:01 नवीन
चश्मेबहाद्दूर लोक हहपुवा
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:02 नवीन
सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध: पैचान कोन?? “The present government is not in a position to measure the correct quantum of black money because those who have the black money will actually convert into new currency notes. Now the sufferers are the aam aurats(women) and aadmis(men). Those who are illiterates, who have no access to the banking facilities. And they will be ones, who will affected by such diversionary measures. People who have no bank accounts, their life savings will be targetted.” “They will fall victim to middlemen who will scare them that the notes are worthless and charge them hefty fees to convert them. They will also be ripped off by shopkeepers.” “This policy of Mr. ₹₹₹₹₹₹ is only meant for the blue blood and not for the sweating, red-blooded, toiling millions. It is not going to affect those who have numbered accounts in Swiss accounts, but will hit those who do not have any bank account even in India,” she had said.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 12:19 नवीन
दिदी मालद्यातून पैसे येणे बंदझाले ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:39 नवीन
मीनाक्षी लेखीना मालद्यातून पैसे येतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Fri, 11/18/2016 - 12:42 नवीन
नै हो ममतांचे नाही हे वाक्य बिजेपीच्या 'मिनाक्षी लेखी' यांचे संसदीय भाषणाचा निवडक चाळणी लावलेला भाग आहे. ६५ टक्के लोकांकडे बँक अकाऊंट नाही अशी त्यांची तक्रार त्या भाषणात होती त्यानंतर मोदी सरकार आले आणि मोदींनी बहुतांशांना रिकामी का होईनात बँक अकाऊंट उघडून दिली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
अ
अर्धवटराव Fri, 11/18/2016 - 23:38 नवीन
तुम्ही असले प्रतिसाद नोटा बदलीच्या दुष्परिणांचा दाखला म्हणुन द्यायला लागला आहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
उ
उमेश माधवराव मसलेकर Fri, 11/18/2016 - 12:04 नवीन
आणि त्या चष्मेबद्दुर लोकांमध्ये शिरोमणि आहेत चुकून दिल्ली सारख्या चिमुकल्या व अर्ध-राज्याची सत्ता मिळालेला अरविंद केजरीवाल !!! ह्या माणसाची नोटबंदीच्या पहिल्या दिवशी प्रतिक्रिया होती "मौन" आणि लगेच हा माणूस विरोधाच्या पवित्र्यात गेला.कॉंग्रेसची आधी प्रतिक्रिया होती की कॉंग्रेस पक्ष काळ्या पैशयाच्या विरोधात ह्या निर्णयाच्या बाजूने आहे आणि नंतर त्यांनीही कोलांट-उडी मारली.आणि हा संधिसाधू अरविंद काल काय म्हणाला की "आझाद भारत का ये सबसे बडा घोटाला है" तरी बरे आहे की आतापर्यन्त मोदी सरकारवर एकही घोटाळ्याचा गंभीर आरोप झालेला नाही.आणि हा म्हणतोय की "घोटाला ". ह्याला तर ह्याच्या मुलाच्या जन्मातही घोटाळच झालेला दिसणार.पंचतंत्राच्या गोष्टीत "धूर्त कोल्हा " हे पात्र दाखवलेले आहे,माझ्या मते भारतीय राजकारणातील धूर्त कोल्हा " अरविंद केजरीवाल " आहे.बिचारे अण्णा हजारे !!! त्यांचा ह्या धूर्त कोल्हयाने शिडीसारखा वापर केला आणि नंतर त्यांना फेकून दिले !!!
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/18/2016 - 12:16 नवीन
जी मांडणी करत आहेत ती ट़क उदाहरण चुकले म्हणुन आता बरे झाले एरवी विरोध करणे अवघड होते डांगेंच्या ट्रकलाच आता धरून ठेवण्यात फायदा आहे ( मी पुर्णपणे मोदी निर्णयाच्या बाजुने आहे )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:38 नवीन
=)) =)) तरी गा पै यांनी आधीच worn केलं होतं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Fri, 11/18/2016 - 12:23 नवीन
म्हणणे असे आहे डांगे यांच्या मांडणीचा ट्रकशुन्य प्रतीवाद शक्य नाही का ?
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 11/18/2016 - 12:27 नवीन
मी एकाही ठिकाणी ट्रकबद्दल प्रश्न उपस्थित केला नाहीये. तो मुद्दा इतका तकलादू आहे की कोणीही (खराखुरा) फर्स्टहँड अनुभव असलेली व्यक्ती समजेल की तो दावा किती चुकीचा आहे..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:37 नवीन
तो माझा दावाच आहे असं कुठं म्हटलंय? उदाहरण आहे, आता ते ज्यादा विश्लेषण करण्यात पॉईंट नाही, कारण मूळ विषय ट्रकवल्याचा 20 लाख खर्च हा नव्हताच! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 12:58 नवीन
मग ट्रकवाल्याला आणलाच कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 13:25 नवीन
हा प्रश्न तुम्हाला पडलाय म्हणजेच उत्तर देऊन उपयोग नाही असे मला समजते! मेगाबायटीचा त्रासही होतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
म
मारवा Fri, 11/18/2016 - 12:56 नवीन
आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 11/18/2016 - 12:56 नवीन
आपण ट्रकची टायरची हवाच अनेक प्रतीसादी खिळे मारून कधीचीच काढलेली आहे आता हा ट्रक माहीतीचा महामार्ग अडवुन ट्रॉफीक जाम करत आहे विनंती एकच आहे मुळ मांडणी वर मंथन व्हावे कँसेट अडकलीय
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 11/18/2016 - 13:36 नवीन
धागाकर्त्याने दिलेल्या प्रतिसादांनुसार, त्यांना मूळ मांडणी आणि त्यावर सुयोग्य विचारमंथन यावर भर द्यायचा आहे की विशिष्ट अजेंडा राबवायचा आहे आणि विद्यमान सरकारच्या नावे फक्त खडे फोडायचे आहेत हे नक्की करूदेत.. मग आपण आहोतच चर्चा करायला..! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 13:54 नवीन
मोदकराव, ट्रक आणि 20 लाखांचा अत्यन्त गैरलागू मुद्दा लावून धरणारे अजेंडा ठरवून मोकळं झालेत! आता फक्त शिमगा करायचा धाग्यवर... :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 13:48 नवीन
नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत. या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 13:49 नवीन
नशीब, अजून कोणी ह्या ट्रक चा रजिस्टर नंबर, ड्राईव्हरचे लायसन, पियूसी, इन्शुरन्स, जकात पावत्या यांच्या पंतप्रधान कार्यालयातून अटेस्टड कॉपीज मागितल्या नाहीत. या पुढे कोणीही काहीही नुसतं उदाहरण दिले की त्याचा पूर्ण खरा तपशील मिळाल्याशिवाय चर्चा करायचीच नाही हि आता खूणगाठ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 13:59 नवीन
ट्रक काढुन मुद्दा मांडता आला तर विचार करण्यात येइल. अन्यथा ट्रकची हवा गेल्यामुळे मागे मोटारी येउन ट्रॅफिक जाम झाल्याबद्दल मागुन येणार्‍या मोटारीला दोष देण्यात अर्थ नाही, खासकरुन ट्रकची हवा काढणारे खिळे ट्रकचालकानेच पसरवले असतील तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
य
याॅर्कर Fri, 11/18/2016 - 13:38 नवीन
नोटाबंदी निर्णयामुळे सरकारी तिजोरीत किती पैसा जमा झाला? किती लोकांच्या मागे आयकरवल्यांची चौकशी सुरू झाली? याचा डिट्टेल तपशील सरकारने येत्या दोन महिन्यानंतर देणे योग्य ठरेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 13:51 नवीन
नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच. फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे. मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
स
संपत Fri, 11/18/2016 - 13:51 नवीन
माझा परीघ लहान आहे.. पण २० एक वर्षांपूर्वी एक ट्रकवाला ओळखीचा होता. त्याच्याकडे व्यापारी मालाच्या बदल्यात दुसऱ्या गावातील व्यापाऱ्याला देण्यासाठी कॅश द्यायचे हे ठाऊक होते. आणि त्याच्याकडे गावठी पिस्तुलही होते. सध्याची परिस्थिती ठाऊक नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 14:03 नवीन
संपत भाऊ! तुम्ही खोटं बोलताय, त्या ड्राईव्हरचे नाव नंबर लायसन लागेल, त्या शिवाय तुमचा अनुभव विश्वासार्ह नाही! ;) -आदेशावरून! :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 13:52 नवीन
नोटा रद्द करण्याचा निर्णय योग्यच. फक्त अंमलबजावणी योग्य रितीने होणे अपेक्षित होते. दोन-तीन दिवसात जर पुरेशा प्रमाणात नवीन नोटा उपलब्ध होवून लोक पूढे आपल्या कामाला लागू शकले असते तर ओरड करण्याचं काहीच कारण नव्हतं. ATM पुढे तास न तास उभा राहणारा माणूस काही काळ्याचे पांढरे करत नाहीये इतकं नक्की. पण अशा प्रकारे तास न तास ATM पूढे उभं रहायला लागणं, कोणत्या ATM ला पैसे मिळतील हे सतत शोधत रहावं लागणं (तेही ९ दिवसानंतर) हे अंमलबजावणीचं साफ अपयश आहे. मोदीविरोधक वा मोदीभक्त असण्याचा प्रश्नच नाही. देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर loss off productivity चा विचार करायला हवा.
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 13:59 नवीन
विरोध शस्त्रक्रियेला नसून 'अर्धवट तयारीनीशी' केलेल्या शस्त्रक्रियेला आहे. इथे रुग्णाला फाडून ठेवलंय पण पुढची काही साधन-सामुग्री अजून यायचीच आहे असं झालंय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 14:05 नवीन
पैसे अकाउंट मधुन काढुन घेता येत आहेत की नाही? माझ्या घरच्यांनी आज स्वतःच्या अकाऊंट मधुन पैसे काढले. १५ - २० मिनिटात काम झाले. मग नक्की काय प्रॉब्लेम आहे? आपल्याकडचा पैसा पांढरा असेल तर स्वतःच्या अकाउंट मध्ये भरा आणि पैसे काढा. "नोटा "बदलुनच" घ्यायचा अट्टाहास का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 14:21 नवीन
माझा पैसा पांढराच आहे नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही. ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत. समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Sat, 11/19/2016 - 06:39 नवीन
तुमचा पैसा पांढरा , काळा, हिरवा अथवा गुलाबी असल्याबद्दल मी काहिच टिप्पणी केलेली नाही आहे. तुम्ही सरसकटपणे "देशातील जनता तास न तास ATM पूढे उभं राहिल्यावर" असा प्रतिसाद देत आहात. साधारणपणे सगळ्यांच्याच बँका अथवा त्यांच्या शाखा घरा अथवा ऑफिसच्या कामाज्वळ असतात. लांबवर कुठेतरी अकाउंट उघडुन तेच लोक साधारणपणे वापरत बसत नाहित. आपल्यासारख्या काही लोकांचा अपवाद नक्की असेल. अश्या लोकांनी बँक अकाउंट बदलुन घेणे सोयिस्कर असते. अर्थात आता या घाईगर्दीत ते शक्य नसावे. आधीच केले गेले असते तर कदाचित उपयोग झाला असता. आपल्याला बर्‍याच बँकांच्या लायनीमध्ये उभे रहायला लागत असेल तर त्याचा अर्थ आजुबाजुला बर्‍याच बँका आहेत. असे असताना आपण आपले अकाउंत आडवळणाच्या बँकेत का उघडले हे उलगडत नाही. अर्थात त्यामागे आपले काही वैयक्तिक कारण असेल. पण इतके सगळे फिल्टर लावुन झाल्यावर अडलेले लोक फारच कमी आहेत. इतर सर्वांनी लायनीत उभे राहुन सर्वांचेच कष्ट वाढवण्याचे कारण नाही. बादवे तुम्ही हे एक सरसक्ट विधान केले होते. तुम्हाला स्वतःला असा काही अमुकतमुक त्रास होतो आहे असे सांङितले नव्हते आणि त्या अनुषंगाने मी माझे विधान केले नव्हते. त्यामुळे मला असंवेदनशील वगैरे म्हणण्याची मौज वाटली. उगा छोट्या चोट्ञा गोष्टींना असंवेदनशील म्हणायची फ्याशन आली आहे आजकाल. ग्रो अप. अर्थात प्रत्येकाकडे असा समजुतदारपणा असलाच पाहिजे असा माझा अट्टाहास्स नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक Fri, 11/18/2016 - 14:22 नवीन
माझा पैसा पांढराच आहे नोटा डिपॉजिट करायला ब्रॅच मध्ये जावे लागेल पण ज्या बँकेत माझे अकाउंट आहे त्याची ब्रँच जवळपास नाही. ATM मध्ये पैसे मिळत नाहीयेत. समोरच्याची परिस्थिती जाणून न घेता त्याच्या प्रयत्नांना 'अट्टहास' म्हणणे म्हणजे संवेदनशीलतेचा अभाव. प्रत्येकाने दुसर्‍याबद्दल संवेदनशील असावे असा माझा 'अट्टहास' नाही. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 13:53 नवीन
मारवा साहेब हा वितंडवाद आहे हे मान्य करून पुढे जाऊ. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. असे लिहून डांगे साहेब ट्रक बद्दलचा प्रसंग लिहितात. शेवटी इतर प्रसंगांचे स्वागत आहे! असे लिहिले आहे. म्हणजे धाग्यात मूळ हा प्रसंगच आहे आणि तो प्रसंग म्हणजे १०० टक्के थापा आहेत. असे असताना चर्चा कशावर होणार. माझ्या मित्राची जी कहाणी मी लिहिलि आहे त्याचे आता २० ट्रक आहेत. तो स्पष्ट म्हणाला ट्रक ड्रॉयव्हर जवळ आम्ही जास्तीत जास्त १०,००० रुपये देतो कारण अत्यंत विश्वासार्ह ड्रायव्हर नसेल तर सर्व ड्रायव्हर कुठेतरी घाटात पाटा तुटला, इंजिन सीझ झाले अशा तर्हेच्या खोट्या तक्रारी सांगून मालकाकडून पैसे काढतात. धंद्याच्या सुरुवातीला त्याला त्याच्या ट्रक ड्रॉयव्हरने खंडाळा घाटात ऍक्सल मोडला ८०००/- रुपये खर्च येईल असे म्हणाला. हा त्याला म्हणाला आहे तिथेच थांब मी येतोय. आणि गाडी घेऊन जाणार होता तेंव्हा थोड्या वेळाने त्याचा फोन आला कि साहेब ते दुसऱ्या मेकॅनिक ला दाखवले त्याने ६०० रुपयात रिपेयर केले. मित्र म्हणाला कि ड्रायव्हर लोक शेंडी लावण्यात पटाईत असतात. कुठेही अफाट खर्च येतो सांगितले( १०,००० पेक्षा जास्त) तर तिथे मला विमानाने जाणे परवडेल. एकदा त्यांना हे कळून चुकले कि साहेब सहज सहजी गंडणार नाहीत यानंतर असे प्रकार कमी झाले. सगळ्या ट्रक ड्रायव्हरचे "वरकड" उत्पन्नच पगारापेक्षा कितीतरी जास्त असते त्यामुळे त्यांना स्वामिनिष्ठा(loyalty) हा प्रकार जरा कमीच असतो. कारण एकाची नोकरीसोडली तर दुसरीकडे नोकरी मिळतेच. तिथेही पगार हे वरचे उत्पन्न धरूनच असतो. बाकी त्यांचे इतर उत्पन्न वेश्यागमन दारू गांजा पिणे इ सुरस चमत्कारिक कथा अनेक आहेत. मूळ हे २ लक्ष रुपये हेच थोतांड आहे तर २० लाख रुपये कुठून येणार. २० लाख रुपयात त्या ड्रायव्हर ला पळून जाऊन नवीन ट्रक घेऊन धंदा सुरु करता येईल ज्या मूळ पायावर डांगे अण्णांनी हा धागा काढला आहे तोच ढिसाळ आहे तेंव्हा त्यावर चर्चा काय करणार. यामुळे यापुढे मी काही लिहीत नाही. इति लेखनसीमा.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 14:02 नवीन
ज्याचा त्याचा परीघ असतो. डांगे अणांचा परीघ मोठा आहे. त्यांचा अनुभव दाडगा आहे. त्यान्च्या ओळखीतले ट्रक ड्रायव्हर २० - २० लाख घेउन इकडुन तिकडे जातात. याच्या एक दशांश पैसे सुद्धा आम्ही एका देशातुन दुसरीकडे जातो तेव्हा बाळगु शकत नाही. त्यान्च्या माहितीतल्या ड्रायव्हर्स ना जकात भरण्यासाठी आणि इतर खर्चासाठी २० - २० लाख रुपये लागतात ते बघता त्यांचा परीघ किती मोठा आहे याची तुम्हाला कल्पना यायला हवी होती. केवळ हसण्यावारी न्यायची गोष्ट नाही आहे ही. त्या ऐवजी आपण आपला परीघ वाढवुयात. तुम्ही काळे चष्मे लाबुन प्रत्येक गोष्टीकडे बघणार असाल तर मात्र निरुपाय आहे. बाकी अजुन काय बोलणार मी? ज्याचा त्याचा परीघ, वर्तुळ, त्रिज्या वगैरे तुम्ही समजौन घ्यालच अशी आशा आहे. याऊप्पर डांगे सर खोटे बोलत आहेत हेच पालुपद तुम्हाला लावायचे असेल तर चर्चा होणार कशी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 14:22 नवीन
मृत्युंजय साहेब काही नाही तरी २३ वर्षे लष्करात काढली आहेत त्यामुळे एका शहरातून दुसऱ्या शहरात बदलीच्या वेळेस सामान ट्रकनेच पाठवायला लागते. केवळ निवृत्त होऊन १० वर्षे झाली आहेत म्हणून काही बोललो नव्हतो. मुंबईहुन विशाखापटणम येथे १९९८ साली माझे आणि एका मित्राचे सामान एका ट्रक मध्ये भरून पाठवले तेंव्हा त्याचा खर्च रुपये ७०००/- आला( प्रत्येकी ३५००/-) मी मुंबईत सामान चढवले आणि विशाखापटणमला मित्राने उतरवले आणि तोच ट्रक शेवटपर्यंत ४ दिवसात गेला. तेंव्हा एका किनाऱ्यापासून दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत सामान न्यायला इतकाच खर्च आला त्यावेळेस ट्रक ड्रायव्हरला काय २ लाख रुपये दिले असतील. उगाच उंदराला ऐरावत म्हणणे फार होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
संपत Fri, 11/18/2016 - 15:08 नवीन
डॉक्टर साहेब, मला वाटते तुम्ही दिले आहेत ते उदाहरण आणि डांगे साहेब देत आहेत ते उदाहरण ह्यात फरक आहे. डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते. हि पद्धत थोडीफार तरी भारतात होती / आहे /असे वाटते. आता ट्रक ड्रायवरला इतकी रक्कम कोण देईल असे म्हणणे असेल तर त्यात फारसे तथ्य नाही.. भारतात विश्वासावर अनेक गोष्टी चालतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 15:15 नवीन
डांगे साहेब जी रक्कम म्हणत आहेत ती डिलिवरीची रक्कम आहे असे मला वाटते. हे ही मान्य. मग ड्रायव्हरला काय चिंता..? रक्कम देणारा आणि घेणारा गोंधळ घालूदेत. त्याला फक्त ट्रक चालवायचा आहे आणि रकमेची डिलीव्हरी द्यायची आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 15:17 नवीन
स्वकष्टाने कमावलेले २० लाख जर कोणाला द्यायचे असतील तर चेकने देता येतील...कॅश द्यायची काय गरज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
स
संपत Fri, 11/18/2016 - 15:36 नवीन
मी फक्त ड्रायवरकडे इतकी रक्कम असण्याची शक्यता कशी असेल ह्याबद्दल बोलत होतो.. डॉक्टर साहेबांचा त्यालाच आक्षेप होता असे मला वाटतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 16:10 नवीन
एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. यात डिलिव्हरीची रक्कम असल्याचा पुसटसा सुद्धा उल्लेख नाही. आणि वीस लाख ? स्वतःच्या ड्रायव्हर कडे इतकी रक्कम कुणी ठेवेल? बढिया है जाऊ द्या हो साहेब. कशाला वाद घालताय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संपत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा