Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

नोटा बंदी व परिणाम

स
संदीप डांगे
गुरुवार, 11/17/2016 - 15:04
🗣 187 प्रतिसाद
नोटा बंदी प्रकरणाने संमिश्र भावना बघायला मिळत आहेत. सर्वच लोक आपापल्या परीघ, आकलनक्षमता, राजकीय विचार, जीवनशैली, पूर्वग्रह यांच्या एकत्रित प्रभावाने सदर घटनेकडे बघत आहेत. सोशल मिडीयावर फिरणाऱ्या एका विनोदचित्रानुसार झीन्यूज च्या लैनीतले लोक्स जाम खुश आहेत, आजतक च्या लैनीतल्याना थोडाफार त्रास होतोय तर एन्ड-द-टीव्हीच्या च्या लायनीत लोक मरत आहेत. जेवढं प्रसार माध्यमं व सोशल मिडीया यातून माहित होतंय, पसरवल्या जातंय त्याबाहेरही बरंच मोठं जग आहे ज्यावर ह्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम झालेत, होत आहेत, होणार आहेत. ह्या धाग्याचा विषय आहे की कोणकोणत्या क्षेत्रातल्या लोकांवर याचा कसा परिणाम झाला व त्यांनी त्यातून कसा मार्ग काढला काढत आहेत ह्याबद्दल चर्चा करणे, यायोगे आपल्या परिघाबाहेर काय होतंय व त्यातून आपल्यालाही दोन गोष्टी शिकायला मिळून ज्ञानाचे क्षितिज जरा विस्तारेल. मी सुरुवात करतो व इतर सदस्यांनीही आपले प्रश्न व अनुभव, माहिती सांगावी, जमल्यास तिऱ्हाइत कधी चांगला उपाय सुचवू शकतो हे समजून उपायही सांगावे. एक उदाहरण आहे ट्रान्सपोर्ट च्या ट्रकवाल्यांचं. एखादा गुरुभादूरसिंग मुंबईहून कोलकाता ट्रक घेऊन निघतो, त्याला टोलनाके, जकात, पोलीस, लाच, स्वतःचा खर्च, इंधन इत्यादीसाठी बरीच मोठी रक्कम घेऊन निघावे लागते. कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते. पूर्ण रस्त्यात तो ऑन हिज ओन म्हणजे स्वतःवर अवलंबून असतो. अशा प्रसंगी मध्येच कुठेही त्याला अर्ध्या रात्री कळते की आता आपल्या जवळची रक्कम शून्य झाली, फक्त कागद आहेत तेव्हा त्याच्यासाठी सरकारी नियमात बसणारे कोणते उपाय आहेत? लाच घेणारे आता पैसे स्वीकारत नाहीत, जाऊ देतील तसेच याची शाश्वती नाही, पम्पवाले अजून दोन दिवस मदत करतील, एवढी रक्कम कोणतीही बँक बदलून देणार नाही. तेव्हा त्याच्याकडे काय उपाय आहेत किंवा तुमच्या कुणाच्या माहितीत असे काही झालेले? मला वाटतं चिनार जोशी यांना ह्यातलं ठाऊक आहे त्यांनीही आपले विचार मांडावे. इतर प्रसंगांचे स्वागत आहे!

प्रतिक्रिया द्या
121754 वाचन

💬 प्रतिसाद (187)
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 09:52 नवीन
माझा परीघ नाही ग तेवढा. डांगे सर सांगु शकतील. त्यांच्या माहितीतल्या ज्या ट्रक ड्रायव्ह्वरला २० लाख घेउन फिरायची सवय असेल त्याच्याशी तुलना करुन काही माहिती देता येइल. अर्थात तो ट्रक ड्रायव्हर २० लाखाचा व्हाइट मनी घेउन फिरतो असे दिसते आहे (काळा असेल तर त्याची गैरसोय होते आहे अशी तक्रार करता येणार नाही) त्यामुळे तुलना होउ शकेल की नाही ते माहिती नाही. माझे तर डोकेच चालेनासे झाले आहे २० लाखाची गोष्ट ऐकल्यापासुन. त्यामुळे मी काय सांगणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 10:03 नवीन
LoL कॅब ड्रायव्हरने मालकीची जागा विकली, ते पैसे बँकेत भरले जागेचे पैसे आलेत असे दाखवून, आता त्याला फ्लॅट घ्यायचाय, 20 लाखाचा, बिल्डर 10 लाख व्हाइट आणि बाकीचे रोख ब्लॅक मागतोय, त्याच्यासाठी आणलेत पैसे काढून! बिल्डर जुन्या नोटा घेतो कि नाही हे अजून कळले नाही! 20 लाखाची गोष्ट... lol!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
च
चेतन सुभाष गुगळे गुरुवार, 06/25/2020 - 12:51 नवीन
माझ्या बंधूंनी २०१० साली फ्लॅट विकत घेतला रु.३२ लाखात - पूर्ण चेक पेमेंट - फूल व्हाईट - नो ब्लॅक मनी. त्याच बिल्डरच्या सासर्‍याकडून मी दुकान विकत घेतले २०१४ साली रु.३० लाखात - पुन्हा एकदा पूर्ण चेक पेमेंट - फूल व्हाईट - नो ब्लॅक मनी. तुमच्या उदाहरणातील खरेदीदार २० लाखाच्या फ्लॅटकरिता निम्मे म्हणजे १० लाख रुपये ब्लॅकमध्ये का देतोय? तेही २०१६ मध्ये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
य
यशोधरा Fri, 11/18/2016 - 10:18 नवीन
आम्ही तर दागिन्यांसाठी साडेआठ - नऊ लाख क्याश काढली हे ऐकूनच गार पडलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मार्मिक गोडसे Fri, 11/18/2016 - 09:53 नवीन
म्हणजेच तो काळा पैसा होता.
एकदा जरी पैसा बँक सिस्टिमम्ध्ये गेला की त्या खातेदारावर इन्कम सोर्स दाखवण्याची जबाबदारी येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 10:03 नवीन
आणि इन्कम सोर्स असेल तर त्याला प्रॉब्लेम नाही येणार. त्या माणसाला पैसा परत बँकेत जमा करायचा नाही यातच सगळे आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:18 नवीन
काढलेल्या पैशांची आता त्याच्या बँकेत नोंद झाली आहेच. कधी चौकशी झालीच तर ते पैसे कोठून आले व त्याचे करविवरण कुठे आहे हे प्रश्न पुढे येतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
मार्मिक गोडसे Fri, 11/18/2016 - 10:19 नवीन
त्या माणसाला पैसा परत बँकेत जमा करायचा नाही यातच सगळे आले.
तेच म्हणायचंय मला. आता त्या माणसाने ते पैसे पुन्हा बँकेत टाकले काय किंवा न टाकले काय त्याला इन्कम सोर्स दाखवावाच लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 09:16 नवीन
LoL
  • Log in or register to post comments
न
नया है वह Fri, 11/18/2016 - 09:48 नवीन
LoL
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 09:50 नवीन
नोटाबंदीचे परिणाम #DeMonetisation Compiled ! 1.माओवाद्यांना दणका 2.काश्मीरमधील दगडफेक बंद 3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद 4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या 5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु . 6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले 7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली 8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल 9.औषध दुकानांत जोरदार विक्री 10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ 11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या . 12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला 13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार . 14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार . 15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक . 16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट 17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट 18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले . 19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका 20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद 21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत 22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार . 21. ड्रग माफिया उध्वस्त 22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात 23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद 27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!! 28. हवाला धंदा मंदीत 29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल 30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला 31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले . 32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली . 33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल 34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला . 35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे .
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 11/18/2016 - 09:54 नवीन
इतकं सगळं गुडी गुडी वाचुन डोळे पाणावलेच राव ! #जप्_हो_श्याम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
शाम भागवत गुरुवार, 06/25/2020 - 13:01 नवीन
ओ, मला कशाला मधे खेचताय? मी जप करतोच आहे की!!!!!!! मी जप करत नाहीये असे तुम्हाला का वाटतंय??? ;) :)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
म
मोदक Fri, 11/18/2016 - 10:02 नवीन
धन्यवाद, यावर सविस्तर प्रतिसाद लिहितो, उत्तरे असतील अशी अपेक्षा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 10:06 नवीन
मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक! 'निरक्षीरविवेक' दिसतो का बघू... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 10:23 नवीन
ओके. पहिली गोष्ट - मोदीसमर्थकांना विचारलेला प्रश्न मूळ प्रतिसादात कुठेही दिसला नाही. तुम्ही दिलेला प्रतिसाद म्हणजे "नोटाबंदीचे अमुक अमुक परिणाम" झालेले आहेत. या थाटाचा आहे. यावर मी "धन्यवाद, यावर सविस्तर प्रतिसाद लिहितो, उत्तरे असतील अशी अपेक्षा आहे." असे लिहिल्यानंतर "मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक!" असे सपशेल घूमजाव करत आहात. दुसरी गोष्ट - मूळ प्रतिसादातील गोष्टी सरकारतर्फे जाहीर झालेल्या कोणत्याही पत्रकात वाचावयास मिळालेल्या नाहीत. तसेच, हे दावे मिसळपाव वर कोणी केले आहेत का..? प्रतिसाद बघायला आवडेल. कुठेतरी कोणीतरी लिहिलेल्या गोष्टी आणून (आणि तुमची येथील एकंदर वाटचाल बघून, या बहुदा तुम्हीच पिकवलेल्या कंड्या असाव्यात याचीही शक्यता नाकारता येणार नाही..!) त्यावरून येथील सदस्यांचा "निरक्षीरविवेक" तपासणे हे लॉजिक गंडल्याचे लक्षण आहे. येथे कोणी असे काही लिहिले असल्यास त्या सदस्याकडून उत्तराची अपेक्षा करणे अयोग्य नाही मात्र, आपणच काहीतरी पिकवून / उचलून आणायचे आणि "द्या आता यावर उत्तर" हा दावा कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:05 नवीन
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही! बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी! फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते, उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;) मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/18/2016 - 11:36 नवीन
सर्वात प्रथम, तुमचा प्रतिसाद आल्यावर माझा पडला, पण तुमचा वाचला नव्हता व तसेही तो तुमच्या प्रतिसादाला उद्देशून नाही! आणखी वेगळी कारणे शोधा हो. तुमच्या पहिल्या आणि दुसर्‍या प्रतिसादात तब्बल १६ मिनीटांचा फरक आहे. अर्थात तुम्ही २४ तास लॉग-इन असणे अपेक्षित नाहीये पण तुमचा माझ्या प्रतिसादानंतर पडला हा दावा पोकळ आहे इतकेच. बाकी हे दावे समर्थकांचेच! इथल्या कोणी म्हटलं असं म्हटलं नाही मी! कुठल्या समर्थकांचे..? ते त्या समर्थकांना जिकडे दावे केलेत तिकडे विचारा आणि इथल्या समर्थकांनी दावे केले असले तर इथे विचारा. जर सरकारने असे दावे केले असले तर त्याचे पुरावे आणा. फक्त विचारतोय कि हे फायदे झालेत कि नाही समर्थकांच्या मते, निरर्थक प्रश्न. ("तुमच्या बायकोने तुम्हाला मारणे बंद केले आहे का..?" छाप टुकार जोक आठवला या प्रश्नावरून - हे वैयक्तीक घेवू नये, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर हो / नाही मध्ये मिळत नाही इतके दाखवण्यासाठी दिलेले खूप जुने उदाहरण आहे.) उत्तर द्या असा जाब विचारत नाहीये, यातलं काय खरं काय खोटं तेवढं विचारत आहे, कारण समर्थक सत्यच सांगतात सत्यशिवाय काहीच बोलत नाहीत असे आता आताच कळले आहे ;) मीही एक समर्थक आहे आणि मी असा कधीही दावा केला नाहीये की वरील मुद्दे सत्य आहेत. तसेच वरील सर्व मुद्द्यांचा आवाका इतका मोठा आहे की एकाच व्यक्तीने हे सगळे अभ्यासून इतक्या लवकर निष्कर्ष काढणे थोडे अवघड आहे. ..किंवा जसे तुम्ही योजनेविरूद्ध उतावळेपणाने आणि दिशाभूल करणारे धागे / प्रतिसाद लिहीत आहात तसे मी करत नाही इतके पुरेसे आहे. मी अंधविरोधक हे आपण ठरवून टाकले ना, आता माझ्या कोणत्याही मताला शून्य किंमत! माझ्या निरीक्षणांना "तुमचे बेसलेस प्रतिसाद" हा भक्कम पाया आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 10:29 नवीन
मोदीसमर्थकाना विचारतोय ह्यातलं काय बरोबर, काय चूक! 'निरक्षीरविवेक' दिसतो का बघू... ;)
अशी एकतर्फी विचारपूस नको. हेच प्रश्न मोदीविरोधकांना सुद्धा विचारा आणि बघा त्यांचा नीरक्षीरविवेक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:45 नवीन
मोदीसमर्थक आणि विरोधक, दोघांनाही हाच प्रश्न विचारलात तरच प्रश्नही "निरक्षीरविवेकी" होईल, नाही का ? असे न केल्यामुळे, तुम्ही भावनेच्या भरात घसरू लागला आहात का असे विचारले तर चूक होईल का ?! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:11 नवीन
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त, हरिश्चंद्री समर्थकांच्या मोहोर उठण्याची गरज आहे वरील फायद्यांवर, म्हणजे सामान्य जनता रामराज्याच्या स्वप्नात दंग होण्यास मोकळी! भावनेच्या भरात घसरण्याचा प्रसंग कसा असतो हे तुम्ही इथे पाहिलेत म्हणून विचारत आहात काय? http://www.misalpav.com/comment/900742#comment-900742
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मोदक Fri, 11/18/2016 - 11:42 नवीन
विरोधक फक्त विरोधासाठो विरोध करतात हे ठरलं ना आता, त्यांचा विषय समाप्त सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध हा निकोप लोकशाहीसाठी आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:50 नवीन
सुयोग्य आणि मुद्देसूद विरोध ^^^ हे कोण कसे ठरवणार? काही काळापूर्वी नोटबंदीच्या विरोधात भाजपची अधिकृत मते आजच्या विरोधकांच्या मतांसारखीच होती!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/18/2016 - 12:08 नवीन
भाजपाची अधिकृत मते आणि त्यावेळी नक्की कशाने विरोध झाला यावर सवडीने एक लेख लिहा, तेथे बोलूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:42 नवीन
खाली इंग्रजीत मीनाक्षी लेखी यांच्या प्रेस काँफेरेन्स चा काही भाग इंग्रजीत टाकलाय! मुद्देसूद व सुयोग्य आहे का ते वाचून सांगा! पूर्ण भाषण उडवून टाकलं जायच्या आत युट्युब वर पाहून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक Fri, 11/18/2016 - 15:17 नवीन
पूर्ण भाषणाची लिंक आहे का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 10:23 नवीन
नोटाबंदीचे परिणाम
अजून काही परीणाम - ३६) केजरीवाल, उद्धव, ममता इ. गरीबांच्या होणार्‍या हालांमुळे कळवळले. ३७) देशातील नागरिकांची चूल बंद झाली, देश उद्ध्वस्त झाला, लोक हक्काचे पैसे असून उपाशी मरायला लागले. ३८) मोदी सरकार गरीब विरोधी, कामगार विरोधी, शेतकरी विरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. ३९) रतन टाटा, अण्णा हजारे, कैलाश सत्यार्थी, नारायण मूर्ती, सुधा मूर्ती इ. बड्या धेंडांना नोटा रद्द करण्याचा निर्णय आधीच समजला होता. त्यामुळे हा निर्णय येण्याआधीच त्यांनी आपापल्या ५००/१००० च्या नोटा बदलून घेतल्या. ४०) जनता रडत असताना मोदी खो खो हसत आहेत. ४१) रद्द केलेल्या नोटांमधून १० लाख कोटी रूपये जमा होणार आहेत. मोदी त्यातील ८ लाख रूपये उद्योगपतींच्या (अडाणी आणि अंबानी) घशात घालून त्यांची कर्जे माफ करणार आहेत. ४२) या निर्णयामुळे अडाणी आणि अंबानी एका रात्रीत धनाढ्य झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 11:25 नवीन
ओके. प्रश्न प्रामाणिकपणे विचारले आहेत, उपरोधाने नाहीत या गृहितकावर उत्तरे देतो 1.माओवाद्यांना दणका काही प्रमाणात बसला आहे असे बातम्यांवरून दिसते. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात खंडणीचे पैसे होते व ते ५००/१००० च्या नोटांमध्ये होते आणि आता ते बदलून घेणे अवघड झाले आहे असे बातम्यात सांगण्यात येते. 2.काश्मीरमधील दगडफेक बंद दगडफेक थांबलेली दिसत आहे. 3. काश्मीरमधील शाळा जाळणे बंद शाळा जाळणे बंद झालेले दिसत आहे. शालांत परीक्षेला ९९% उपस्थिती होती असा वृत्तांत आहे. 4.भ्रष्टाचारींनी नोटा जाळल्या काही जणांनी जाळल्या असे दाखविले. परंतु ही संख्या अत्यल्प असावी. 5.तूर दाळीचे भाव कोसळून ८० रु . कल्पना नाही. 6. किराणा दुकान ,भाजीपाला फळ विक्रेते ,पानवाला ,चहावाला यांनी डेबिट कार्ड स्वॅपिंग मशिन बसवले काही जणांनी बसविले आहे. 7.मनपा ,नगरपालिका ,ग्रामपालिका यांची विक्रमी करवसूली मोठ्या प्रमाणात करवसुली झाली आहे. 8.वीज वितरण कंपनीची जुनी बाकी वसूल नक्की आकडा माहित नाही. परंतु काही प्रमाणात थकबाकी वसूल झाल्याचे सांगितले जाते. 9.औषध दुकानांत जोरदार विक्री होय. 10. मेट्रो रेल मध्ये smart cards विक्रीत वाढ कल्पना नाही. 11.अनेक व्यावसायिकांचे ४ वर्षांची जुने येणे वसूल ,वरून नवीन ऑर्डर मिळाल्या . कल्पना नाही. 12.mobile wallets पेमेंटचा वापर वाढला होय 13. बॅंकांच्या तिजोरीत ७ लाख कोटींची वाढ .कर्जावरील व डिपॉझीटवरील व्याजदर कमी होणार .उद्योगाला कमी व्याजात भांडवल मिळणार . ही प्रकिया सुरू झाली आहे. 14. बाजार समितीत येणाऱ्या शेतीमालाचे चेक किंवा ऑनलाईन पेमेंट .सगळा पैसा अगोदर बॅंकेत येणार . किती प्रमाणात कल्पना नाही. परंतु आजच वाचले की कांद्याचे पेमेंट चेक्सने देण्यात येणार आहे. 15. प्रॉपर्टीतील काळ्या पैशाला ब्रेक यापुढे प्रॉपर्टी खरेदीसाठी के वाय सी आवश्यक . १००% ब्रेक लागणे अशक्य आहे. केवायसी पूर्वीपासूनच सक्तीचे होते. त्यामुळे या क्षेत्रावर फारसा परीणाम झाल्याचे दिसत नाही. 16. प्रॉपर्टींच्या किमतीत 25% घट कल्पना नाही. 17.लोकशाही आणखी भक्कम झाली . सर्व जाती धर्माचे लोक ,गरीब व करोडपती एकाच रांगेत उभे राहिले .भेद नष्ट उपरोधिक विधान 18.नकली नोटांच्या धंद्याचे कंबरडे मोडले . सध्या तरी मोडलेले दिसते. 19.उत्तर प्रदेश व पंजाबच्या निवडणूकीत काळा पैसा वापरू पाहणाऱ्या राजकीय पक्षांना दणका सध्या तरी दणका बसलेला दिसतो. परंतु राजकीय पक्ष यातूनही मार्ग काढणार व मतदारांचे नुकसान होऊन देणार नाहीत. 20 जे एन यु मधील गायब झालेला नजीब आणि वन रॅंक वन पेन्शन चर्चा बंद जेएनयु मधील नजीब ची चर्चा फक्त निधर्मांधच करीत होते. ९९.९९% जनता यात सहभागी नव्हती. परंतु उर्वरीत मुठभरांची सुद्धा चर्चा बंद झाली आहे. ओ आर ओ पी चर्चा ८ नोव्हेंबर पर्यंत बंद होत आलीच होती. आता मात्र ती पूर्ण बंद झाली आहे. 21. Rs.2000 च्या नोटेमुळे सरकारच्या प्रिंटींग खर्चात बचत कल्पना नाही. 22.जाळलेल्या किंवा यापुढे चलनात न राहणाऱ्या नोटांमुळे सरकारची वित्तिय तूट कमी होणार . शक्यता आहे. 21. ड्रग माफिया उध्वस्त ड्रग माफियांवर या निर्णयामुळे फारसा परीणाम झाला नसावा. झाला असल्यास तो तात्पुरता असणार. 22.इन्कम टॅक्सच्या धाडींमुळे काळा पैसा नियंत्रणात काही प्रमाणात 23.पोलिसांच्या नाकाबंदीमुळे काळा पैशाची वाहतूक बंद काही प्रमाणात 27. खरं जीवन जगायला सुरुवात फालतू क्रिकेट मॅच व बॉलिवूड सिनेमे बंद . Facing real life !!! उपरोधिक वाक्य 28. हवाला धंदा मंदीत तात्पुरता परीणाम 29. बेटिंग ,सट्टा यांचे हाल तात्पुरता परीणाम 30. लोकांची मते मिळतील की नाही याची पर्वा न करता पंतप्रधान देशहितासाठी कडक निर्णय घेउ शकतो याची देशाला प्रथमच जाणीव झाली. देश बदलायचा असेल तर काही आवश्यक बदल घडवलेच पाहिजेत असा विचार देशात प्रबळ झाला उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे. 31.नेता निस्वार्थी असू शकतो हे देशवासीयांना जाणवले . उपरोध असला तरी नक्कीच तसे झाले आहे. 32.दीर्घकाळात देश पुढे जाणार या विश्वासातून देश रांगेत उभा राहिला . अल्प काळ वेदना दीर्घ काळ फायदा ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली. भावनेचे माहित नाही, परंतु या निर्णयाला बहुतेकांचा पाठिंबा आहे. 33.भारताचे अनुकरण करा ही मागणी पाकिस्तान व ऑस्ट्रेलियात झाली विश्वगुरुकडे भारताची वाटचाल उपरोधिक वाक्य. मात्र पाकिस्तानमध्ये अशी मागणी झालेली आहे. 34. जगातील सर्वात मोठी लोकशाही असूनदेखील भारत कठोर निर्णय घेउ शकतो आणि सर्वसामान्य जनता त्याचे स्वागत करते हा संदेश जगात गेला. उपरोधिक वाक्य 35. कुठेही दगडफेक ,आग ,बस रेल्वे जाळपोळ न होता हा बदल स्वीकारला गेला आता रांगाही कमी झाल्या जनजीवन पूर्वपदावर येतेय .नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे . उपरोधिक वाक्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:39 नवीन
हेच हवे होते! धन्यवाद! काही उपरोधिक वाक्य सोडली तर इतर परिणामावर चर्चा होऊ शकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
आ
आदिजोशी Fri, 11/18/2016 - 10:08 नवीन
रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 11/18/2016 - 10:31 नवीन
रस्त्यात मधेच नवा ट्रक विकत घेतात का? किती टेपा टाकायच्या ह्याला लिमिट असायला हवं. --- Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदिजोशी
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 10:18 नवीन
खी खी खी...ट्रकवाले जर २० लाख कॅश घेउन फिरत असते तर सगळ्यात जास्त मुडदे त्यांचेच पडले असते...भारतात ट्रकमधून २० लाख कॅश घेउन मालवाहतूक करता येते....ते सुध्धा कोणतेही पिस्तुल...गेलाबाजार गावठी कट्टा सोबत न घेता हे वाचून डोळे पाणावले =))
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:25 नवीन
२० लाख X भारतातील वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची संख्या = ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 10:35 नवीन
या हिशोबाने भारतात "टरक"वाल्यांना लग्नाच्या बाजारात सगळ्यात जास्त डिमांड असायला हवी...त्या ऐवजी तेच भलत्या बाजारात जाताना दिसतात म्हणे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 10:39 नवीन
प्रत्येक ट्रक रोज घेऊन फिरतो हे आपले कल्पनारंजन आवडले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 10:47 नवीन
कार्ड वापरून व्यवहार करणारेही असतीलच पण खर्चाचे स्वरूप बघता रोख रकमेचा वापर जास्त आहे, तेव्हा आपल्या सरदारजीने दोन ते तीन लाख रुपये सोबत घेतले आहेत, बऱ्याच केसेस मध्ये हि रक्कम वीस लाख सुद्धा असते.
प्रत्येक ट्रक नसला तरी बर्याच केसेस म्हणजे १० पैकी किती ट्रक अपेक्षित आहेत ते जाणून घ्यायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 10:54 नवीन
ते माझे कल्पनारंजन नाही, तुमचा "विपर्यास" आहे ! "वाहतूकीसाठी रोज वापरल्या जाण्यार्‍या" चा सरळ साध्या शब्दांचा सद्य चर्चेतला अर्थ इतका तिरका केला जाईल असे वाटत नव्हते !!! असो. तेव्हा, अजून बाळबोध शब्दांत तेच समीकरण देतो, त्याचा हिशेब करा, उत्तर तेच येईल :) ... २० लाख प्रतिट्रक X भारतातील वाहतूकीसाठी एका दिवसात वापरल्या जाण्यार्‍या ट्रक्सची अव्हरेज संख्या = ट्रकने रोज चलनवलन होणारे रु(डोळे फिरणारी संख्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 10:27 नवीन
नारायण मूर्तींच्या गाडीचा चालक लक्षाधीश असू शकतो तर कारपेक्षा मोठी गाडी (म्हणजे ट्रक) चालविणारा २० लक्ष रूपये खिशात ठेवून का हिंडणार नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 10:33 नवीन
नारायणमुर्तींच्या चालकाला पगार कॅशमध्ये मिळतो??? त्याचे आयकर विवरणपत्र नसण्याची शक्यता किती? तो भारतभर लाखभर रुपये कॅशमध्ये जवळ बाळगून फिरतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Fri, 11/18/2016 - 10:37 नवीन
उपरोध लक्षात आलेला दिसत नाही. असो. मूर्तींच्या चालकाला आयकर रिटर्न्स भरण्याइतका पगार मिळत नव्हता. त्याला दिल्या गेलेल्या समभागांची किंमत अनेक लक्ष होती. त्याअर्थाने तो लक्षाधीश होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 11/18/2016 - 10:48 नवीन
आर्र्र्र्र्र्र्र्र्र...असं होतं का ते...आय माय स्वारी बर्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
वरुण मोहिते Fri, 11/18/2016 - 10:24 नवीन
२० लाख घेऊन जाणारा ट्रक हा एकटा नसतो जो ट्रान्सपोर्टर आहे त्याच्या भारत भर ओळखी असतात . त्यामुळे काही फरक पडत नाही . कुठल्याही परिस्थितीत ते पुढे जाऊ शकतात. छोटे आहेत त्यांचं मानलं जरी प्रॉब्लेम झाला आहे तरी दुसऱ्या दिवशी पोस्ट ऑफिस आणि मनी कुरियर द्वारे पैसे पोचत आहेत . त्यामुळे त्यांना काही फरक नाही पडलाय सध्यातरी . बेकायदेशीर रित्या मुंबई मध्ये पैसे कमवणाऱ्या मुली आणि त्यांचे मालक यांनी एकतर बाहेर ट्रान्स्फर केले मालकांनी.जे मालक आहेत त्यांनी . आणि बहुतेक काम मुली या युपी बिहार च्या नेपाळ सीमा जवळ तिकडे केले .पुढचं पुढे .बिल्डर आणि व्यावसायिकांची कहाणी अजून वेगळी आहे .
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 10:33 नवीन
http://coastaldigest.com/index.php/news/63149-rs-26-lakh-unaccounted-cash-seized-at-kaup-talapady https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/city/hyderabad/Rs-20L-in-old-notes-seized-from-milk-tanker/amp_articleshow/55403963.cms
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Fri, 11/18/2016 - 10:42 नवीन
या वरच्या बातमीत जे वीस लाख रुपये पोलिसांनी पकडलेत ते, तुम्ही लेखात लिहिल्याप्रमाणे त्या ट्रक ड्रायव्हरच्या प्रवास खर्चासाठी असल्याचे तरी या वरिल बातमीवरुन दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
म
मृत्युन्जय Fri, 11/18/2016 - 11:08 नवीन
तुमच्या धाग्यातला आशय आणी या दोन्ही बातम्या यांमध्ये परस्पर संबंध नाही हे नमूद करु इच्छितो. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसे मालवाहतुकीसाठी लागतच नव्हते हे दोन्ही बातम्यांमधुन स्स्पष्ट होते आहे. अश्या अजुन बातम्या शोधायच्या झाल्या तर कोटींनी पैसे पकडल्याच्या देखील अनेको बातम्या मिळतील. एका बातमीप्रमाणे: १. काळा पैसाच जप्त झाला आहे. तो पैसा अवैध मार्गांनी निवडणुकीत वापरला जाणार होता. २. पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा चालकाने पळुन जायचा प्रयत्न केला ३. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्ट्मेंट कडे तक्रार देखील केली गेली आहे. दुसर्‍या बातमीप्रमाणे: १. २० लाखाची रोकड देउन व्यवहार केला जात होता. २. सगळ्या नोटा १००० च्या होत्या आणि व्यवहार १००० च्या नोटा रद्द्द झाल्यानंतर केला जात होता. त्यामुळे मुळात हा काळ्या पैशातला व्यवहार होता. ३. २०००० पेक्शा जास्त व्यवहार रोखीने करणे हे बेकायदा आहे. हा नियम अनेक वर्षे अस्तित्वात आहे. तस्मात २० लाखाचा रोखीने व्यवहार केल्यास तो बेकायदेशीर आहे. मुळात काळा पैसा हा असाच बेकायदा व्यवहारातुन तयार होतो. वरील दोन्ही प्रकरणांमध्ये पैसा सदर चालकाला मालवाहतुकीसाठी आणि वैध कारणांसाठी लागत नव्हता. तुमच्या धाग्याचा आशय "सामान्य, सुजाण, सजग" नागरिकांना (चालकांना) होणार्‍या त्रासाबद्दल असल्याने वरील दोन्ही लिंका अतिशय निरुपयोगी आहेत असे सांगु इच्छितो. अर्थात माझा परीघ छोटा असल्याकारणाने आपल्या कडुन यावर अजुन विस्तृत विवेचन मिळाल्यास आनंद होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/18/2016 - 11:27 नवीन
http://coastaldigest.com/index.php/news/63149-rs-26-lakh-unaccounted-cash-seized-at-kaup-talapady १. हे २० लाख ट्रकच्या खर्चाचे नव्हते तर दुध उत्पादकांना दुधाची किंमत नकद देण्यासाठी नेले होते असा ट्रकमालकाचा दावा आहे. २. ट्रक स्थानिक स्तरावर एका डेअरीतून दुसर्‍या डेअरीत दुधाची वाहतूक करतो आहे, म्हणजे ट्रकच्या खर्चाकरिता रु२० लाख काय रु२०,००० हजार सुद्धा गरजेचे नसणार. ====== https://www.google.co.in/amp/m.timesofindia.com/city/hyderabad/Rs-20L-in-old-notes-seized-from-milk-tanker/amp_articleshow/55403963.cms १. यातील ट्रकमधे सापडलेले रु२० लाख तेथे कसे आणि का आले हे मला माहित नाहीत असे ड्रायव्हरने सांगितले आहे. बातमीप्रमाणे त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळण्याचा प्रयत्न केला होता. अर्थातच हे, एक एक लाखांच्या बंडलांत काळजीपूर्वक ठेवलेले पैसे (These 20 packets were neatly wrapped and kept in a carry bag in the tool box) ट्रकच्या खर्चाकरिता नक्कीच नसावेत. २. उरलेले रु६.२ पैसे एका खाजगी कारमध्ये सापडले, म्हणजे त्यांचा सद्य चर्चेशी काहीही संबंध नाही. डांगेसाहेब, तुमचे प्रतिसाद वाचण्याजोगे असतात व बर्‍याचदा (कोणतीही बाजू घेऊन का होईना, पण) विचारपूर्वक लिहिलेले असतात असा समज आहे, म्हणून मी ते वाचतो. हा प्रतिसाद त्या प्रतिमेत अजिबात बसणारा नाही. या वेळेस तुम्ही मुद्दा सिद्ध करण्याच्या ओघात वाहवून जाऊन पूर्णपणे असंबधित व चुकीची उदाहरणे दिली आहेत असे खेदाने नमूद करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 11:47 नवीन
बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे पण होतंय कसं कि इथे मी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाचं काटेकोर पोस्टमार्टम केले जात आहे. त्यामुळे आशय सोडून भलत्याच अनावश्यक तपशीलावर जोर देऊन मूळ मुद्दा नाकारण्याचा प्रयत्न होत आहे. धाग्याचा मूळ विषय व त्याचा रोख मोदी व सरकार विरोधातच आहे असे वाटून घेऊन हि चिरफाड चालू आहे, चालुद्या. काय बोलणार? अनेक गोष्टी आहेत ज्याचे पुरावे ऑनलाइन नाही मिळणार पण... असो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 11:59 नवीन
बातमी संबंधित नाही हे मलाही मान्य आहे मेगाबायटी प्रतिसाद न देता डांगेअण्णांचे पांढरे निशाण? अतर्क्य आणि आश्चर्य कारक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Fri, 11/18/2016 - 12:06 नवीन
There is no point wasting time in pointless, fruitless word-war! I prefer worthiness in attack as well as defence!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 11/18/2016 - 12:16 नवीन
पण बातमी तुम्हीच दिलीत ना? मग?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा