Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

"कॅश-लेस" आणि "लेस-कॅश" मधिल संभ्रम : खरोखरचा की बनवलेला ???

ड
डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/08/2016 - 09:47
🗣 139 प्रतिसाद
सद्या "कॅश-लेस अर्थव्यवस्था = १००% कॅश-लेस ट्रन्झॅक्शन्स" हे चुकीचे समीकरण सिद्ध करण्यासाठी तथाकथित विचारवंत राजकारणी आणि अर्थतज्ज्ञांमध्ये अहमहमिका चालली आहे. ती इतक्या अतीरेकी स्तरापर्यंत ताणली जात आहे की, त्यामागे असलेला, शाब्दीक विपर्यास करून सामान्य जनतेचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न जास्त जास्त उघड होत चालला आहे. नकद व्यवहारांमध्ये भ्रष्टाचार करण्याला वाव असतो आणि नकद न वापरता केलेल्या व्यवहारांत भ्रष्टाचार करणे फार कठीण असते. यावरून, हे ना ते कारण पुढे करून, सर्व व्यवहार नकदेने करायची सूट असायलाच पाहिजेत असा आग्रह करणार्‍यांच्या उघड-गुप्त उद्येशांची कल्पना करणे फार कठीण नाही. आर्थिक व्यवहार व अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे म्हणणे खालीलप्रमाणे आहे... The government has been taking steps to promote "cashless or digital transactions" to take India towards a "less-cash economy". या वाक्यातल्या cashless or digital transactions व less-cash economy या शब्दप्रयोगांतील फरक (जर अगोदर खरोखरच समजला नसेल तर), स्वतःचा गैरसमज टाळण्यासाठी व दुसर्‍यांचा गैरसमज न करण्यासाठी, समजून घेणे जरूर आहे. तो फरक (समजला नसल्यास) इस्काटून असा आहे... १. नकद पैसे न वापरता, बँक / कार्ड / ऑनलाईन इ प्रकार वापरून केलेल्या आर्थिक व्यवहाराला "कॅश-लेस ट्रान्झॅक्शन" म्हणतात... हे प्रत्येक व्यवहारासंबंधीचे विधान आहे. २. जिच्यात शक्य तेवढी जास्तीत जास्त (१००% नव्हे) कॅशलेस ट्रान्झॅक्शन्स होतात, अश्या अर्थव्यवस्थेला "लेस-कॅश अर्थव्यवस्था" असे म्हणतात... हे देशाच्या अर्थव्यवस्थेसंबंधीचे विधान आहे. पूर्णविराम (पक्षी : पिरियड) !
वर्गीकरण
अर्थकारण
राजकारण
हितसंबंध
वगैरे
वगैरे...

प्रतिक्रिया द्या
29312 वाचन

💬 प्रतिसाद (139)
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 11:10 नवीन
वर पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
व
वरुण मोहिते गुरुवार, 12/08/2016 - 11:20 नवीन
नोटबंदी किंवा काही चलनबंदी केली १९६० अँड १९७० .. त्यानंतर अमर्याद ड्रग ट्रॅफिकिंग चालू होतं. जसा आता म्हणतात कि पाकिस्तान चे अटॅक बंद झाले नोटबंदी मुळे तसाच प्रकार . परत एक प्रश्न भ्रष्टाचार हि वृत्ती आहे . त्यामुळे बंद होणार नाही आहे .
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 11:47 नवीन
"नोटाबंदी हा भ्रष्टाचारविरुद्धचा एकुलता एक रामबाण उपाय नसून त्यासाठी केल्या जाणर्‍या अनेक उपायांच्या साखळितली एक कडी आहे" इतके समजावून घेतले की मग बाकीचे प्रश्नही सोडवायला मदत होईल. याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही. त्यापेक्षा, अनेक प्रकारचे उपाय, अनेक महिने चालू ठेवून, भ्रष्टाचार "अर्थव्यवस्थेवर परिणाम करू शकणार नाही" व "सर्वसामान्य माणसाचे जीवन कठीण करणार नाही" इतपत ताब्यात आणणे, हे व्यावहारीक उद्यिष्ट्य होईल. विकसित देशांमध्येही "हेच साधणे आणि ते वर्षानुवर्षे तसेच कायम राखणे" यावर शक्ती खर्च केली जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वरुण मोहिते
न
नितिन थत्ते गुरुवार, 12/08/2016 - 11:54 नवीन
>>७० वर्षांची घाण घाण ७० वर्षांची आहे याची खात्री आहे का? की घाण ७००० वर्षांची आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
व
विशुमित गुरुवार, 12/08/2016 - 12:38 नवीन
खरी गोम या ७० वर्षात झालेल्या घाणीत आहे, त्यामुळे नोटबंदी वाल्यानी किती ही समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर विश्वास ठेवणे महा कठीण आहे. मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 12:44 नवीन
मागील ७० वर्षातील देशच मला जवळचा वाटत होता, पण या २-३ वर्षात जी देशाची विभागणी झाली आहे त्याने आपण आपल्याच देशात परकीय झाले आहोत याचा आभास होतो आहे. तुमचे गुपीत इतके उघडपणे सांगू नका हो, हे म्हणजे अगदी हे झाले ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 12/08/2016 - 16:37 नवीन
फक्त काहीतरी प्रतिसाद देऊन जणू त्यांच्या वाक्याचं खंडन केलंय असा आभास उत्पन्न करणारा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/08/2016 - 14:26 नवीन
याशिवाय, ७० वर्षांची घाण एका उपायाने आणि एका रात्रीत (किंवा एक महिन्यांतही) साफ करण्यासाठी सरकारकडे काही जादू आहे, ही कल्पनाही ठीक नाही.
मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. आज हे सरकार ह्याच घाणेरड्या कार्डचा उपयोग काळा पैसा शोधण्यासाठी का करतेय मग? एका रात्रीत भ्रष्टाचार, काळा पैसा साफ करायची ह्या सरकारलाच घाई आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 15:59 नवीन
मागील सरकारला घाणच साचवायची होती म्हणून तर पॅन कार्ड, आधार कार्ड काढ्ले होते. जनतेच्या फायद्याचे साधन नुसते हाती असून फायदा नसतो, त्याचा उपयोग कसा करायचा हे माहीत असूनही फायदा नसतो, ते शस्त्र योग्य प्रकारे उपयोग करायची नियत व धमक असली आणि त्या प्रत्यक्षात उपयोग केला तरच त्याचे फायदे जनतेला मिळतात, हा व्यवस्थापनाचा मूलभूत नियम आहे. त्याविरुद्ध, स्वतःला हवी असलेली साधने तयार करून ती जनतेच्या नकळत कशी वापरली गेली याचे एक खास उदाहरण मिपावरच इतर कोठेतरी दिले होते, पण शोधाशोध न करता त्वरीत पाहता यावे यासाठी, इथे परत देत आहे. रोचक माहिती आहे त्यात... आतापर्यंत, अनेक स्कॅम्स जगजाहीर झाल्या आहेतच, त्यात ही एक भर, अजून आतापर्यंत पुढे न आलेल्या किती बाहेर पडतील ते भविष्यच सांगेल :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/08/2016 - 16:26 नवीन
युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. त्याचा चांगला परिणाम झाला होता. कमोडीटी मार्केटमध्ये अजुनही घोटाळे चालुच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 12/08/2016 - 17:24 नवीन
युपीए २ च्या कार्यकाळात पी. नोट बाबत कडक धोरण राबवले होते व FII ला KYC Mandatory केले होते असे आठवते. खरंच ???!!! =)) अहो वर दिलेली क्लिपमध्ये तर सेबी व वित्तमंत्रालयाला १०० वर उदाहरणे नावासकट दिली असताना काही कारवाई केली गेली नाही असे नावासकट सांगितले आहे. तुम्ही तुमची माहिती परत तपासून पहायची गरज आहे. यासंबधात जालावर पोत्यानी विश्वासू दुवे आहेत. P-Notes ची व्याख्याच याबाबतीत काय ते सगळे उघड करते आहे... Participatory Notes commonly known as P-Notes or PNs are instruments issued by registered foreign institutional investors (FII) to overseas investors, who wish to invest in the Indian stock markets without registering themselves with the market regulator, the Securities and Exchange Board of India - SEBI. पी नोट्स बेनामी असू शकतील व त्यातले खरे गुंतवणूकदार कोण आहेत हे सेबीला कळू नये आणि विचारण्याचाही हक्क असू नये असे ते कायदे व नियम होते. सद्य सरकारने रिनिगोशिएशन करून आता त्या कायदे-नियमा अंतर्गत अनेक देशांशी केलेल्या करारांत योग्य ते बदल केले आहेत. कोणतेही कायदे करून हेतुपुर्रसर केलेले घोटाळे सुधारणे व ते कायदे वापरून परदेशांशी केलेले करार एकतर्फी बाद करता येत नाहीत. त्याला वेळकाढू कायदेशीर मार्ग वापरून, संबंधीत परदेशांशी चर्चा करून व त्या सरकारांना काही काळाची (बर्‍याचदा एक-दोन आर्थिक वर्षाची तरी) मुदत देवूनच नंतरच दोन्ही बाजूंना मान्य बदल व्यवहारात आणता येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/08/2016 - 14:59 नवीन
दोन महत्वाच्या घोषणा ,,, कॅशलेस होण्यासाठी २०० रुपयांपर्यंतची खरेदी कार्ड वापरून केली तर सर्विस टॅक्स नाही पेट्रोल व डिझेल खरेदी कार्ड वापरून स्वस्त ....
  • Log in or register to post comments
अ
असंका गुरुवार, 12/08/2016 - 15:09 नवीन
कशावरचा सर्विस टॅक्स? खरेदीवरचा की पेमेंट चार्जेसवरचा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 12/08/2016 - 16:40 नवीन
२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने) अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे? अन सर्विस टॅक्स कुणाला नाही? सर्विस घेणारा टॅक्स भरतो का तो? की सर्विस देणारा? कस्ली भयंकर येडी घालतंय हे सरकार. अन तरीही भजनगायकी थांबतच नाहिये. कठीणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
ह
हतोळकरांचा प्रसाद गुरुवार, 12/08/2016 - 18:30 नवीन
२०० रुपयांचं पेट्रोल भरलं तर घसघशीत दीड रुपया सूट? (०.७५%ने)
तो दिड रुपया महत्वाचा आहे की नाही हे ज्याचं त्याला ठरवू देणं जास्त योग्य ठरणार नाही का? ज्याला महत्वाचे नाहीत त्याने २०० रु. रोख द्यावेत.
अन ३% ट्रँजॅक्शन कॉस्टप्रमाणे एक्स्ट्राचे ६ रुपये जाणार ते कुणाच्या तीर्थरूपांनी द्यायचे?
यासाठी कोणाच्याच तिर्थरूपांकडे जाण्याची गरज नाही. डोळे बंद करून ३% चार्जवालं कार्ड घेणाऱ्यांनी स्वतःच भरणं जास्त योग्य ठरेल. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जरूर टीका करावी पण टिकाच करायची म्हटली तर मग ती सरकारने कुठलाही निर्णय नाही घेतला तरी करता येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/08/2016 - 18:40 नवीन
आनंदी गोपाळ मी फक्त नवीन निर्णय काय आहे ते लिहिले आहे .. हा निर्णय योग्य / अयोग्य असे कुठलेही मत दिलेले नही यात भजन गायकीचा संबंध येतोच कुठे ? उगाच स्वतः चे फस्ट्रेशन आमच्यावर लादु नका दुसरी गोष्ट : योग्य कार्ड वापरले तर पेट्रोल भरल्यावर कुठलाही चार्ज लागत नाही ... एवढी साधी गोष्ट नसमजणाऱ्या / दुर्लक्ष करणाऱ्या माणसांना तिर्थरुप आठवणे साहजिकच आहे ... उगाच कोणावर टीका करण्यापेक्षा (स्पष्ट सांगायचे तर बाप काढण्या पेक्षा) आपला अभ्यास वाढावा ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/08/2016 - 15:00 नवीन
२००० रुपयांपर्यंतची खरेदी कार्ड वापरून केली तर सर्विस टॅक्स नाही असे वाचवे
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 12/08/2016 - 15:31 नवीन
असं जगात कुठे आहे का हो ???? हेच पैसे आपल्याकडून वसूल केले जाणार टॅक्स किंवा अनेक माध्यमांतून . या कंपन्या डिस्काउंट देतात बाकी ऑनलाईन व्यवहारांवर त्यांना पॉईंट्स असतात ,जाहिराती असतात त्यामुळे देतात . पेट्रोल वैग्रे वर स्वस्त लोल
  • Log in or register to post comments
व
वरुण मोहिते गुरुवार, 12/08/2016 - 16:52 नवीन
असेल तर भाजप चा इतिहास पण पहा . एक निर्णय झाला तर ७-८ धागे आले . बाकी गोष्टींवर आले नव्हते कधी . वन्स अगेन लोल
  • Log in or register to post comments
च
चिगो गुरुवार, 12/08/2016 - 17:53 नवीन
आजच 'डिजीटल ट्रान्झॅक्शन्स'वर सेमिनार घेतला आम्ही, बँकाच्या मदतीने.. मी बोलतांना हेच बोललो बँकवाल्यांना कि बाबारे, जे काही मार्ग आहेत कॅशलेस ट्रान्झॅक्शन्सचे आहेत ते सगळे सांगा, मग ते युपीआय असो, वा युएसएसडी, मोबाईल वॉलेट्स, कार्ड पेमेंट असो किंवा आणखी काही असो.. त्यातले 'डूज अँड डोन्ट्स' सांगा.. लोकांना जे पटेल, जे जमेल ते तो घेतील. आता बघूयात, काय होतंय ते.. बाकी आता जरा 'देशभक्ती'चा ज्वर जरा कमी झाला असेल, तर राज्यशकट हाकणारे जरा अर्थकारणावर बोलतील अशी अपेक्षा आहे.. महीनाभरापासून गुर्मीनी भरलेल्या गुरकावण्याच ऐकायला मिळताहेत. आतातरी जे लोक मोबाईल फक्त कॉल घेण्यापुरता वापरतात (आणि ज्यांना मोबाईल सायलेंटवर लागलाच तर 'साऊंड मोड'वर कसा आणायचा हे कळत नाही) त्यांना, ज्यांना मोबाईल वॉलेट्स वापरायचे नसतील त्यांना, ज्यांच्या गावापासून बँका किमान २५-३० किमी दुर आहेत त्यांना, ज्यांच्या गावात नेटवर्क योग्यप्रकारे मिळत नाही त्यांना,ज्यांना सगळं करता येत असूनही स्वतःचा कायदेशीर पैसा कॅशमध्ये वापरायचा आहे त्यांना, जेवढा हवा असेल तेवढा पैसा कधी मार्केटमधे येणार, हेपण सरकारनी सांगायला हवं..
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 12/08/2016 - 18:27 नवीन
ग्रामीण लोक्स,गरीब,निरक्षर इ.ची संख्या पण अव्वा च्या सव्वा आहे.अशा लोकांना सरकारने विचारत घेतलं आहे कि नै ते सरकारच जाणे! डिजीटल ट्रान्झॅक्शन,ऑनलाईन पे,प्लास्टिक मनी इ. कंसेप्ट्स कशा त्यांना समजवणार ते सरकारलाच माहित. आणि ग्रामीण आणि निम्नशहरीय लोकं आता हळूहळू सरकाच्या नावानं बोटं मोडत आहेत.बँकेच्या रांगेत अनेक खमंग शिव्या ऐकायला येत आहेत,लग्न ठरलेल्या याद्या आणि पत्रिका दाखवूनही मर्यादित रक्कमच दिली जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
आ
आनंदी गोपाळ गुरुवार, 12/08/2016 - 18:33 नवीन
ह्यॅ! कैतरीच कै? हे #$#^%चे फुकटे, टॅक्स न भरणारे एकजात फुकटखाऊ, काँग्रेसने मातवून ठेवलेले अंगठेभाद्दर! त्यांची पत्रास कशाला बाळगायला हवी? मरतील तर बरं होईल. तेवढंच काँग्रेसमुक्तीच्या दिशेने अजून एक पाऊल. बाई म्हटल्या होत्या, 'गरीबी हटाओ' आम्ही गरीबांनाच हटवणार आहोत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
म
मोदक Fri, 12/09/2016 - 03:53 नवीन
पुरावे मिळाले का..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
स
सुज्ञ गुरुवार, 12/08/2016 - 19:37 नवीन
.. पन वीज वापरण्यापेक्षा मेणबत्ती वापरणे सोपे .. विज निर्माण करण्यासाठी धरण बांधणे , अणू प्रकल्प चालवणे , सौर्यप्रकल्प चालवणे त्यात पैसे खर्च करणे वगैरे बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात . शिवाय विजेचे बिल देखील खूप असते . सर्वसामान्यांना ते परवडणार नाही .. त्याशिवाय मेणबत्ती लगेच उपलब्ध देखील होते . भसकन काडी ओढली कि लगेच लगेच मेणबत्ती पेटलीच . त्याशिवाय भारतात काही ठिकाणी वीज पोचवण्यात अडचणी खूप .. मेणबत्ती लगेच मिळते .. त्यामुळे मी म्हणतो .. वीज का वापरा ? मेणबत्तीच वापरू . अंतिम उद्देश प्रकाश पाडणे हाच आहे ना ? अरे पण जगातील प्रगत देश तर वीज वापरतात .. अरे का काय घंटा फरक पडलाय का त्यांना ? आम्ही १० मेणबत्य्या लावल्यावर तेवढाच उजेड पडला . त्यावर मी प्रश्न विचारतो . जगात वीज वापरली म्हणून मेणबत्त्या वापरायचे थांबले का ? किंवा जगात वीज वापरल्याने खूप जास्त प्रकाश पडला का ? पण सरकार म्हणते वीज वापरा. पण आता आमचे "नकोसे" सरकार आहे .. सरकार वीज वापर असे सांगत आहे म्हणजे सक्ती करत आहे ( ???? ).. मग तर सरकार काहीही म्हणूदे . निर्बुद्ध युक्तिवाद करणे हे आपले परम कर्तव्य आहे . हो हो .. आमच्या लक्षातच नाही आले . :) चला मी चालू होतो .. मेणबत्ती वापरणे हे आरोग्याच्या दृष्टीने देखील हानिकारक नाही असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते लिंका अ ब क .
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास गुरुवार, 12/08/2016 - 19:55 नवीन
छान लिहिले आहे नावाप्रमाणेच सुज्ञ आहात ... सलाम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/08/2016 - 19:53 नवीन
विनाव्यत्यय, खात्रीशीर व मोफत वीज सरकारकडून मिळणार असेल तर काहीही हरकत नाही. पण समजा वीज खंडीत झाली, किवा कमीजास्त भार वाढून आमचे नुकसान झाले तर सरकारनी जबाबदारी घ्यावी.
  • Log in or register to post comments
न
निओ१ गुरुवार, 12/08/2016 - 19:59 नवीन
सर्व काही मोफत हवे, कष्ट नकोत, खर्च नकोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/08/2016 - 20:03 नवीन
ऐपत नाही आमची. सध्याचे सरकार ह्याहून वेगळे काय करते आहे?
  • Log in or register to post comments
न
निओ१ गुरुवार, 12/08/2016 - 20:07 नवीन
मग आधीच्या सरकारने जे केले तेच करत रहावे व आपण फक्त बघत रहावे असेच वाटत आहे का? तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे गुरुवार, 12/08/2016 - 20:14 नवीन
तुम्हाला अडचण ही तर नाही की आधीच्यानी केले नाही व ह्यांनी केले ?
त्यांनी असा मुर्खपणा केला असता तर तेव्हाही हेच वाटले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
न
निओ१ गुरुवार, 12/08/2016 - 20:18 नवीन
केले हे योग्य की अयोग्य ? आपले मत बाजूला ठेऊन सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
म
मार्मिक गोडसे Fri, 12/09/2016 - 06:59 नवीन
केले हे योग्य की अयोग्य ?
अयोग्य पध्ततीने केले आहे. अनेक घोडचुका केल्या आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निओ१
म
मार्मिक गोडसे Fri, 12/09/2016 - 07:02 नवीन
पद्धतीने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
स
सुज्ञ गुरुवार, 12/08/2016 - 20:08 नवीन
आणि मी डी क्लास शहरात राहतो (यड्राव फाटा - इचलकरंजी) पण दारू सकट सर्वठिकाणी मी कार्ड देतो . एखाद दोन वेळेस रांगेत उभारून पैसे काढावे लागले याव्यतिरिक्त मला कसलाही त्रास जहाल नाही . वडापाव चहा कोफी वगैरे देखील सुरळीत चालू आहे ..थट्टा चाचा तुम्ही राहता कोठे ? बाकी गरीब दारू का पितो वगैरे फालतू प्रश्न विचारू नका.. बाकी. जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले .. बाकी जाता जाता अर्थात नगरपलिका निवडनुकांचे निकाल याची साक्ष देतातच .. पण तरीही .. लोकांना भडकवण्याचा व त्यातून राजकीय स्वार्थ साधण्याचा कसला जळफळाट म्हणायचा हा .
  • Log in or register to post comments
न
निओ१ गुरुवार, 12/08/2016 - 20:13 नवीन
नका, उत्तर देत बसू. मी उत्तर देणे बंद केले आहे व शक्यतो धागालेखक देखील बंद करेल. विरोध करायचा झाला तर विरोध करणारच मग अगदी वरण आधी की भात आधी की आधी भात की वरण? यावर देखील हे दंगा घालतीलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
य
याॅर्कर Fri, 12/09/2016 - 02:39 नवीन
जाता जाता.. बुर्ली अमणापूर जयसिंगपूर कुरुंदवाड नरसोबा वाडी वगैरे सर्व खेडेगावातून माझे मित्र आहेत ( पश्चिम महाराष्ट्र ) आणि सर्वजण २ ३ वेळेस बँकेच्या रांगेत उभे राहून आले आहेत . त्यापैकी कोणीही इथे मिपावर लेख पाडले नाहीत अथवा काही भयंकर झाले असेही सांगितले नाही अथवा मी मुद्धाम विषय काढले तरीही मला बोलले नाहीत. मिपावर देखील अनेक लोकांनी जास्त त्रास झाला नाही हेच सांगितले ..
ही शुद्ध लोणकढी थाप आहे. ग्रामीण भागातील लोकांना त्रास होतोय,फक्त काहीजण प्रियसीने दिलेला त्रास गोड मानून घेतात त्यातला प्रकार हाय ह्यो:-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/09/2016 - 03:50 नवीन
दुसऱ्या एका धाग्यावरचा प्रतिसाद इथे टाकतो. समजा वाटलंच आणि वेळ मिळालाच तर पाहून घ्या. उगाच बँकांच्या रांगेतल्या लोकांची मतं नाहीयेत ती, म्हणून इथे टाकली. तुम्हाला खरंच लोकांच्या मनात काय खदखदतंय हे पहायची इच्छा असेल तर खालील विडिओ पहा. उगाच तथ्यहीन चर्चा करण्यापेक्षा हे प्रत्यक्ष लोकांचं मत पाहणं जास्त माहितिकारक नाहीये का? https://youtu.be/-XtYRZ_Bn4g https://youtu.be/0bpVIl1P9y8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Fri, 12/09/2016 - 06:01 नवीन
नोटाबंदीचा हनिमून पिरियड आहे हो:-) त्यावेळचा त्रास गोडच वाटतो,नंतर तिटकारा येईल लोकांना.आणि हनिमून पिरीयड काळातील जनतेच्या प्रतिक्रिया खाजगी चॅनेलनी घेतल्या आहेत त्यांच्या सोयीने.ग्रामीण अर्थकारण आणि सहकार याची री पण मुंबईत मुख्यालय असलेल्या चॅनेलन्सना कळणार नाही.बँक मॅनेजरला टक्केवारीवर मॅनेज करणारे भरपूर काळे लोक आहेत,असे लोक आलिशान बंगल्यात एसीची हवा खात,बिअरचा घोट घेत,सिगरेटचा धूर सोडत निवांत असतात ते कधीही बँकेच्या लाईनीत थांबत नसतात.कोलकात्या भाजप नेत्याचे तेहतीस लाख पकडले होते सगळ्या दोन हजाराच्या नोटा होत्या.इतर पक्षाचेही असे बरेच गुंठामंत्रीछाप लोक आहेत. बँकेच्या लाईनीत थांबणारे कोण आहेत याचा सर्वेच करावा.सगळे सामान्य,मध्यमवर्गीय लोकं आहेत. शिवाय लोकांचा युपीए सरकारविषयीचा राग अजून मावळला नाही,म्हणून सद्य सरकारशिवाय त्यांना तरणोपाय नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद
ह
हतोळकरांचा प्रसाद Fri, 12/09/2016 - 08:23 नवीन
कठीण आहे! _/\_. नोटबंदीच्या २७ व्या दिवशी कुठल्याही रांगेत न जाता बाजारात जाऊन घेतलेल्या प्रतिक्रिया आहेत(एबीपी माझा भाजपधार्जिणी वाहिनी आहे असे आपल्याला वाटत असल्यास विषयच खुंटतो). असो! त्रास होतो आहे हे कुणीही नाकारलेलं नाहीच आहे पण सरसकट सगळ्यांना दररोज दिवस-दिवस बँकेच्या रांगेत उभं राहावं लागतंय मृगजळ ते तयार करणार्यांनाच लखलाभ होवो! १. जनभावनेची जमिनी सत्यता पडताळावी २. सरकारचे वाभाडे ३१ नंतर काढावेत एवढंच काय ते सांगणे आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
स
सुज्ञ गुरुवार, 12/08/2016 - 20:43 नवीन
आधीच्या सरकारने १० कानाखाली मारल्या व कधीतरी पाठीत गोंजारले १० कानाखाली खाल्लेले लोक प्रचंड आहेत .गोंजारून घेऊन आणि तितकाच विचार करू शकणारे लोक .. गोंजारून घेऊन मग शांत बसलेले लोक हो आत्ताचे सरकार कानाखाली वाजवून सांगत आहे की लोकहो ..जागे व्हा . किमान जागे करण्याचा प्रयत्न तरी करत आहे.. पण ज्यांना फालतू गोंजारून घ्यायची सवय झाली आहे . आणि त्यामुळे येथे काहीच घडू शकत नाही असे युक्तिवाद करतात त्यांना काय करावे
  • Log in or register to post comments
आ
आजानुकर्ण गुरुवार, 12/08/2016 - 20:53 नवीन
सरकारचे काम कानाखाली मारणे असते हे नव्याने समजले. फारच सूज्ञ सुज्ञ प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
स
सुज्ञ गुरुवार, 12/08/2016 - 21:30 नवीन
आजानुकर्ण .. आपले प्रतिसादात अत्यन्त हास्यास्पद असतात .. त्यामुळे आपण ते टंकण्याचे कष्ट घेतले नाहीत तरी चालेल .आपल्या प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही . आपला एका धाग्यावरील प्रतिसाद .. "कार्ड मशीन बंद पडलंय. कार्ड नेटवर्क बंद पडलंय. आम्ही फक्त विसा घेतो मास्टरकार्ड नाही. तिथं कोल्ड हार्ड कॅश ही नेहमीच कामी येते" हा आपला प्रतिसाद म्हणजे "पाणी संपल्यास दगड नेहेमीच कामी येतो आणि तो कुठेही मिळतो . पाणी दुर्मिळ आहे त्यामुळे लोकांनी दगडच वापरा" छाप आहे . तस्मात आपले लेखनश्रम कमी करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण
आ
आजानुकर्ण Fri, 12/09/2016 - 04:54 नवीन
प्रतिसादांवर प्रतिसाद देण्याची आमची बुद्धी नाही
किमान इतकं समजून घेण्याची तुमची बुद्धी आहे हे समजल्याने गहिवरुन आले. बाकी माझे प्रतिसाद वाचण्याचे कष्ट कमी करा. तुम्हाला ते झेपत नाहीत हे दिसतंय. बुद्धीला जास्त ताण देऊ नका. काळजी घ्या. बाकी पाणी संपल्यावर दगड वापरण्याचा तुम्हाला बराच अनुभव दिसतोय! दगड वापरण्यावर आक्षेप असल्यास पाणी संपल्यावर दगड वापरला नाही तरी चालेल. फक्त बाकीच्यांपासून लांब राहा. आणखी काय सांगणार. तुम्ही सूज्ञ सुज्ञ आहातच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुज्ञ
अ
अभिजीत अवलिया Fri, 12/09/2016 - 04:10 नवीन
म्हात्रे साहेब, भारतातील एकंदरीत काळ्या पैशापैकी फक्त ६ टक्के पैसा हा नोटांच्या स्वरूपात होता. तसेच ५०० व १००० च्या एकूण नोटांपैकी ८० टक्के नोटा बँकेत जमा झालेल्या आहेत. उरलेल्या ३१डिसेम्बर पर्यंत होतीलच. त्यामुळे जमा झालेल्या नोटांचा माग काढून त्यातल्या ज्या काळ्या पैशाशी संबंधित होत्या त्यावर सरकार कशी कारवाई करते हे पाहून सध्याच्या निर्णयाचे मोजमाप करता येईल. तसेच आर्थिक भ्रष्टाचार करणारे लोक नोटांऐवजी कुठेतरी भूखंड, फ्लॅट, गाळा ह्या स्वरूपात देखील मलिदा घेतात. त्यामुळे छोटी नोट म्हणजे देशातील भ्रष्टाचार कमी करायला मदत हे अजिबात मान्य नाही. बाकी गेल्या ७० वर्षाची घाण साफ करून, अजून १०० वर्ष साफ करायला पुरणार नाहीत एवढी घाण ५ वर्षात (अजून अडीच उरलीत म्हणा फक्त) निर्माण होऊ नये ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 12/09/2016 - 06:09 नवीन
वाचकांपर्यंत QSAM (Query Service on Aadhaar Mapper) or *99*99# सेवेची माहिती पोहचावी म्हणुन खालील प्रतिसाद देत आहे. *99# PowerPoint Presentation QSAM (Query Service on Aadhaar Mapper) or *99*99# लेटेस्ट न्यूज :- लवकरच 500 रुपयांची नवी नोट चलनात : आरबीआय नोटाबंदीनंतर एका दिवसात 15 हजार किलो सोन्याची खरेदी नोटाबंदीनंतरची सर्वात मोठी कारवाई, १७० कोटींची रोकड जप्त 43 लाखांच्या नव्या नोटांसह टीव्ही अभिनेता पोलिसांच्या ताब्यात मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- DJ Snake (ft. Justin Bieber) - Let Me Love You | Tum Hi Ho (Vidya Vox Mashup Cover)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/10/2016 - 07:52 नवीन
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे... १. Digital payments soar by up to 300% after demonetisation Upasana Taku, co-founder of another wallet company MobiKwik, said digital payment options are rapidly coming up across many essential services, which will give a fillip for setting up a cashless economy. "Wallets are being installed at highways, gas stations, essential service points, and at a large number of retail stations. २. Demonetisation effect: How the common man is going digital amid cash crunch
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/10/2016 - 08:55 नवीन
लोकांचा त्रास कमी करण्यासाठी आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आकर्षक करण्यासाठीच्या काही योजना... Image removed.  Image removed. Image removed.  Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अमर विश्वास Sat, 12/10/2016 - 10:55 नवीन
डॉक्टरसाहेब आपला प्रतिसाद दिसत नाही . परत पोस्ट कराल का? या योजनांबद्दल वाचले आहे . नक्की चांगला परिणाम होईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/10/2016 - 11:00 नवीन
मला तर ती चित्रे दिसत आहेत. परत एकदा रिफ्रेश करून पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमर विश्वास
न
निओ१ Sat, 12/10/2016 - 11:03 नवीन
मला ही दिसत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा